अग्निहोत्र-१ आणि २

Submitted by मोरपिस on 6 November, 2019 - 03:24

काही दिवसांपूर्वीच अग्निहोत्र-२ ही मालिका येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अग्निहोत्राच्या पहिल्या भागाने तर धुमाकूळ घातला होता. त्यामध्ये शरद पोंक्षे, मोहन जोशी, विनय आपटे, इला भाटे, मुक्ता बर्वे इ. कलाकारांच्या अभिनयाने ही मालिका खूप रंजक बनली होती. आता अग्निहोत्र-२ ही मालिकासुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडणार यात शंका नाही. अग्निहोत्रच्या दुसऱ्या भागात पहिल्या भागातील जास्तीत जास्त कलाकार असतील तर अजूनच मजा येईल. दुसऱ्या भागात काय नवीन रहस्य दडलेली असतील हे पहायची माझी खूप उत्सुकता आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

इथे अग्निहोत्र मालिकेची हाइप पाहून मी ते उपलब्ध भाग पाहिले आणि पुढे नसल्याने बोअर होतंय आता. आईबरोबर या विषयी चर्चा करताना तिने असंभव नावाची मालिका सुचवली जी राजवाडेंचीच आहे. चांगलीय वाटतीय मालिका. सर्व भाग आहेत यूटुबवर

सं कु ची एन्ट्री बर्‍याच उशीरा आहे. स रा होता की.

असंभवमधे स रा पोलीसच होता पण त्याच्या भूमिकेला एक रोमँटिक टच पण दिला होता. शर्वरी पाटणकर त्याची हिरॉइन होती.

इथली चर्चा वाचून मी पण अग्निहोत्र २ बघणार. आधीच्याचा काहीतरी संबंध ठेवतीलच पण मी सुद्धा पहिला भाग नाही पाहिलेला.
इथे शंकासमाधान होईलच Happy

पण सिद्धार्थ चांदेकर असायला हवा यात, पहिल्या सिझनची जान होता तो, म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातून होती सिरीयल. आता तो असणं अवघड वाटतंय मोठा हिरो झालाय तो, इतक्या दिवसांसाठी वेळ देईल की नाही माहीत नाही तसाही तो असता तर एव्हाना प्रोमोत दाखवलाच असता...

पण सिद्धार्थ चांदेकर असायला हवा यात, पहिल्या सिझनची जान होता तो >>> अगदी अगदी. नील अग्निहोत्रीचा मुलगा म्हणून दाखवा त्याला.

अग्निहोत्र 1 बघायला सुरवात केली आहे... खरं तर मला अपूर्ण गोष्टी वाचायला किंवा पाहायला अजिबात आवडत नाही.. तरीही इथल्या comments वाचून अग्निहोत्र 1 बघायची इच्छा झाली... खरंच मस्त आहे serial... पूर्ण parts बघायची खूप इच्छा आहे... कोणाला माहित झाले तर please सांगा कुठे बघायला मिळतील सगळे parts ते...

आभाळमाया ही पहिली मालिका असावी जिचा दुसरा भाग निघाला होता.>>>>>>> हे कधी झालं? मला आभाळमाया चा दुसरा भाग निघाल्याचं आठवतच नाहीये, तो कुठे बघायला मिळेल? कोण होतं त्यात?

कोणाला माहित झाले तर please सांगा कुठे बघायला मिळतील सगळे parts ते... >>> नाही ना. स्टार प्रवाह fb वर पण बरेच जण विचारतायेत, कोणीही उत्तर द्यायला येत नाहीये.

हे कधी झालं? मला आभाळमाया चा दुसरा भाग निघाल्याचं आठवतच नाहीये, तो कुठे बघायला मिळेल? कोण होतं त्यात? >>>>>>> दुसर्या भागात सुकन्या कुलकर्णीच्या मुलीन्ची लग्ने झालेली दाखवली आहेत. एकीचा डिवोर्स होतो. सुकन्या मुख्याध्यापिका होते. स्मिता सरवदे होती त्यात. झी ५ वर आहे दुसरा भाग.

उमेश कामत होता दुसऱ्या भागात. अर्थात तेव्हा आमच्याकडे केबल नव्हती, मी आईकडे गेले की कधी मधेच बघायचे. पण उमेश स्मिताचा हिरो हे मला अजिबात आवडलं नव्हतं, एवढंच आठवतंय.

उमेश कामत होता दुसऱ्या भागात. अर्थात तेव्हा आमच्याकडे केबल नव्हती, मी आईकडे गेले की कधी मधेच बघायचे. पण उमेश स्मिताचा हिरो हे मला अजिबात आवडलं नव्हतं, एवढंच आठवतंय. >>>>>> त्या भागात आताचे बरेचसे लोकप्रिय कलाकार आहेत. त्यान्च्या स्ट्रगलिन्गचा काळ होता त्यावेळी. श्रेयस तळपदे, सुबोध भावे, प्रसाद ओक वै वै. प्रिया बापटसुद्दा होती वाटत.

मुख्याध्यापिका की विद्यापीठाची कुलगुरू ? >>>>>>> नक्की आठवत नाही. असेल कदाचित

संज्योत हर्डीकर पहिल्या सीझनमध्ये होती, ती मला फार आवडायची. जयराम हर्डीकर यांची मुलगी. तिचे बाबा पण मला फार आवडायचे, त्यांचे जाणे चटका लाऊन गेलेलं, मी शाळेत होते तेव्हा.

संज्योत नंतर कुठे दिसलीच नाही.

दुसर्या भागात सुकन्या कुलकर्णीच्या मुलीन्ची लग्ने झालेली दाखवली आहेत. एकीचा डिवोर्स होतो. सुकन्या मुख्याध्यापिका होते. स्मिता सरवदे होती त्यात. झी ५ वर आहे दुसरा भाग.>>>> थँक्यू सूलू, अन्जू. थोडं थोडं आठवलं, मला वाटतं माझ्या डोक्यात वादळ वाट आणि आभाळमाया सिझन २ चा गुंता झालाय सगळा. सगळंच एकत्र आठवतय Happy

मी आता एपिसोड २६ परेन्त आले. मांडणी, भाषा, अ‍ॅक्टिंग कथानक मस्त आहे. नील ची आई फार त्रास दायक आहे. सिद्धार्थ चांदेकर छान काम
करतो. सई आश्ले षा, वैदेही ह्या पोरी फारच वैताग दायक आहेत. एडिट करून टाकायला हव्या. महादेव काकाचे कॅरेक्टर छान आहे. तो सर्व भाग मस्त आहे. लीना भागवत.

असंभव मला आवडलेली मोक्षु. कधी कधी मधे बोअर व्हायचे काही भाग पण समहाऊ सगळे बघितले होते. उमेश आणि उर्मिला किंवा त्याआधी उमेश आणि मानसी साळवी जोडी खूप आवडलेली. मानसीच्या जागी उर्मिला आली, तिनेही काम छान केलं. ती त्याआधी तुझ्याविनामधेही मला आवडलेली. अभिनय सर्वांचेच छान झालेले. सुनील बर्वे, मंजुषा दातार अगदी लक्षात राहीलेत अजूनही. आनंद अभ्यंकर यांनी एजेड रोल केला होता, आजोबांचा. त्यांची मान हलणारी बघून मात्र माझी मान दुखायची, मस्त केलेलं त्यांनी.

मनस्विता थॅक्स लिंकसाठी, मस्त आहे हेही टायटल साँग. आधीचं, कुणी अग्निहोत्री कानात अजुनही घुमतंय, सॉलिड होतं ते.

अग्निहोत्र hotstar वर पाहायला सुरुवात केली तेव्हा ते अर्धवट आहे माहीत नव्हतं. ते 66 भाग पहाताना त्या सिरियलने अक्षरशः haunt केलं होतं. आता उरलेले भाग पहाण्यासाठी मी खूप वाट पहाते आहे. पण ते कुठेच नाहीत.

नीलम शिर्केची व्हिलन पण अंगावर यायची, काम चांगलं करायची ती. >>> खूपच भारी काम केलय तिने. तिची नजर कसली जबरदस्त होती. अक्षरशः अंगावर काटा यायचा.

खूपच भारी काम केलय तिने. तिची नजर कसली जबरदस्त होती. अक्षरशः अंगावर काटा यायचा.>>>> +१००. मी असंभव मालिका पुर्न पाहिली होती.मला वाटत त्याच वेळी , अग्निहोत्र प्रवाह वर दाखवत होते, आनि झी वर अंसभव.

एखादी टीम चांगली जमून येते, कथा आवडते, सर्वांचा अभिनय आवडतो अशा फार कमी मालिका आहेत त्यात अग्नीहोत्र आणि असंभव ह्या दोन्ही एक नंबर.

मी पाहतोय असंभव. सत्तरेक भाग झालेत बघून. बोअर झालं कि पळवून-पळवून पाहायचं. नीलम शिर्केची ती मान खाली झुकवून डोळे वटारून पाहण्याची ट्रेडमार्क मुव्ह मराठीत खलनायिकेचा मापदंडच असेल.

नीलम शिर्के आधी प्रदीप पटवर्धन बरोबर एका कॉमेडी सीरियल मध्ये असायची. पण असंभव मध्ये फारच वेगळी भूमिका समर्थपणॅ केली तिने. नंतर / सध्या दिसली नाही कुठे.

Pages