अग्निहोत्र-१ आणि २

Submitted by मोरपिस on 6 November, 2019 - 03:24

काही दिवसांपूर्वीच अग्निहोत्र-२ ही मालिका येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अग्निहोत्राच्या पहिल्या भागाने तर धुमाकूळ घातला होता. त्यामध्ये शरद पोंक्षे, मोहन जोशी, विनय आपटे, इला भाटे, मुक्ता बर्वे इ. कलाकारांच्या अभिनयाने ही मालिका खूप रंजक बनली होती. आता अग्निहोत्र-२ ही मालिकासुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडणार यात शंका नाही. अग्निहोत्रच्या दुसऱ्या भागात पहिल्या भागातील जास्तीत जास्त कलाकार असतील तर अजूनच मजा येईल. दुसऱ्या भागात काय नवीन रहस्य दडलेली असतील हे पहायची माझी खूप उत्सुकता आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मी आता एपिसोड २६ परेन्त आले. मांडणी, भाषा, अ‍ॅक्टिंग कथानक मस्त आहे. नील ची आई फार त्रास दायक आहे. सिद्धार्थ चांदेकर छान काम
करतो. सई आश्ले षा, वैदेही ह्या पोरी फारच वैताग दायक आहेत. एडिट करून टाकायला हव्या. महादेव काकाचे कॅरेक्टर छान आहे. तो सर्व भाग मस्त आहे. लीना भागवत.>>>>

हाहा अगदी सहमत आहे.
महादेव काकाचे सर्व सीन्स आवडायचे. लीना भागवतही मस्त. वाड्यातले सर्व सीन्स छान होते. शंकर आणि महादेवची भांडणं फनी असायची.
सई आणि वैदेही मला पण खूप खूप बोअर वाटायच्या. मी परत अग्निहोत्र पाहिली तर या दोन बायकांचे सीन्स नक्की फॉरवर्ड करेन. नीलची दुसरी मैत्रिण अनुजा साठ्ये (परमाणु फेम) छान होती. आश्लेषा चांगली होती पण ती मुलगी नंतर कुठे दिसलीच नाही.
इला भाटे आवडायची. मोहन जोशी पण. विनय आपटे शुभांगी गोखले पण एकदम मस्त.

बाय द वे, फक्त ६६ एपिसोड टाकणं हा दुष्टपणा आहे. श्रीरंग गोडबोले, राजवाडे, शरद पोंक्षे या लोकांच्या फेसबुक - इन्स्टावर मोहिम चालवली पाहिजे लोकांनी. ऑर्कुटवर एकेकाळी मोठा फॅनक्लब होता या मालिकेचा. तेव्हाही महादेवच सगळ्यांचा फेवरिट होता.

१ डिसेंबर रोजी आठवणी अग्निहोत्रच्या असा कार्यक्रम रात्री ८ वाजता आहे .

१ डिसेंबर रोजी आठवणी अग्निहोत्रच्या असा कार्यक्रम रात्री ८ वाजता आहे . >>> अरे वा, बघायला हवा.

राजन भिसे जबरी अभिनय. शरद पोंक्षेपण भारी. रश्मी अनपट आधीपेक्षा सुधारणा वाटली पण ओके. अनुराधा राज्याध्यक्ष मस्त.

वाडा यावेळेचा मनात पोचत नाहीये, कृत्रिम का वाटतोय मला.

नि़ळ्याचा उल्लेख का नाही काकांकडून. यावेळी चुलत घराणी असतील.

राजन भिसे जबरी अभिनय. शरद पोंक्षेपण +१

पुण्यातलं घर 'अंधाधुन' सिनेमातल्या आयुष्मान खुरानाच्या घरासारखं वाटलं. तेच आहे का? प्रभात रोडवरचा बंगला टाईप.

महादेवकाकांचा चुलत भाऊ सतेज अग्निहोत्री म्हणजे राजन भिसे. पहील्या सीझनमधे नव्हते ते.

सख्खी भावंडं आता येत जात नाहीत नाशिकला म्हणून काकांनी चुलत भावांशी संपर्क साधलाय की आता या, मला हे झेपत नाही सर्व. अजून एका चुलत भावाचं नांव घेतलं पण मला समजलं नाही.

पहील्या सीझनमधे फक्त सख्खी भावंडं होती, शेवटी नीलला कोणाचं पत्र येतं ते नाव मी विसरले. कोणीतरी चुलत अग्नीहोत्री पण सतेज नाव नव्हतं.

सप्तमातृका फोटो दाखवतायेत. सात मुली दाखवणार असतील तर एवढी चुलत भावंडं पांगलेली असतील का, काय माहीती.

आज डोंबिवलीत परीसंवाद आहे संध्याकाळी, पण मला नाही जाता येणार.

नील अमेरिकेत आहे असे कुठे वर्णन प्रोमोत ऐकले वाटते. >>> अच्छा. पण कधीतरी येत असेल भारतात तर नाशिकला नक्की जाणार तो, कारण त्यानेच पुढाकार घेतलेला पहील्या सीझनला. असा उल्लेख हवा होता की नील कधीतरी क्वचित का होईना येऊन जातो.

काही गोष्टी आणखी उलगडल्या नाहीत.
१ आणि २ चे काळ समांतर नाहीत.
मग नीलने लाईट फोन आणून दिला होता. तरी महादेव काका कंदिलावरच चालवतोय.
भाडेकरु बाई आणि मुलगा होते.
त्यांचे काय झाले असेल?

नवरा पण म्हणत होता, लाईट का नाहीत अजूनही.

पहील्या भागातले काहीजण आहेत. बदलेला आस्ताद म्हणजे त्याची रिप्लेसमेंट होता तो, शुभांगी गोखले, उदय टीकेकर, इला भाटे याही भागात आहेत.

त्यामुळे सख्खे चुलत असे सगळे अग्नीहोत्री एकत्र येतील यावेळी बहुतेक.

भाडेकरु बाई आणि मुलगा होते. >>> त्या बाई सोनीच्या सिरीयलमधे गेल्या, आनंदी जग हे सारे.

मला मेन रोल रश्मीला दिलाय ते फार आवडलं नाही, ती एकसुरी वाटते मला. तिची ही चौथी का पाचवी सिरीयल. सेम डायलॉग डीलिव्हरी. थोडी बरी वाटली पण समहाउ मेन नको होती.

पल्लवी पाटील मेन हवी होती, ती अभिनय सॉलिड करते.

याचे रिपीट टेलिकास्ट कधी आहे ? मी मिसला पहिला भाग >>> आत्ता तीनला रिपिट सुरु झालाय, सकाळी साडेनऊला पण असेल.

त्या बाई सोनीच्या सिरीयलमधे गेल्या, आनंदी जग हे सारे.>> Lol लीला भागवत
हॉटस्टार वर व्हीआयपी घेतले तर सर्व भाग दिसत आहेत
दुसर्‍या भागात लाइट ही आले
आणि नीलचा उल्लेखही आला
घोंगडेवाले बाबा कलाकार कोण आहेत?

Pages