अग्निहोत्र-१ आणि २

Submitted by मोरपिस on 6 November, 2019 - 03:24

काही दिवसांपूर्वीच अग्निहोत्र-२ ही मालिका येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अग्निहोत्राच्या पहिल्या भागाने तर धुमाकूळ घातला होता. त्यामध्ये शरद पोंक्षे, मोहन जोशी, विनय आपटे, इला भाटे, मुक्ता बर्वे इ. कलाकारांच्या अभिनयाने ही मालिका खूप रंजक बनली होती. आता अग्निहोत्र-२ ही मालिकासुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडणार यात शंका नाही. अग्निहोत्रच्या दुसऱ्या भागात पहिल्या भागातील जास्तीत जास्त कलाकार असतील तर अजूनच मजा येईल. दुसऱ्या भागात काय नवीन रहस्य दडलेली असतील हे पहायची माझी खूप उत्सुकता आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खरंय, उगीच असंभव मार्गाने जाऊ नये ही मालिका. असंभव खूप चांगलीच मालिका होती पण अग्नीहोत्र १ चा usp कोणी खलनायक नाही. सर्व जण आपापल्या नशीबाने वेगवेगळ्या दिशांना जातात आणि शेवटी पुन्हा एकदा एकत्र येतात यात कुठेही अमानवी गोष्टी फारशा दाखवल्या नव्हत्या. यात मात्र कुठलासा असूर, भुयार, मानवी कवट्या असा बराच अ आणि अ मालमसाला भरत आहेत. त्यात मालिका अडकून पडली तर आवडणार नाही. छान सशक्त नवीन व्यक्तिरेखा येऊ देत आणि अग्नीहोत्र १ चा usp कायम राहू देत!

एक कळत नाही.. रोहिणी आत्या तिथे राहिली आहे..जेव्हा अक्षरा गायब होते..तेव्हा इथे तिथे शोधत बसते..तिला तर भुयाराची पूर्ण माहिती हवी.. अचानक गायब झाल्या दोन्ही मुली तेव्हा तिने भुयारात बघायला हवं होत..atleast दरवाजा उघडून डोकावून बघायला हवं होत...अक्षरा एवढं सांगते आल्यावर तर तिला काहिच कुतूहल वाटल नाही की खरच या मुली आत जाऊन आल्या..

यात मात्र कुठलासा असूर, भुयार, मानवी कवट्या असा बराच अ आणि अ मालमसाला भरत आहेत. >>> हो, भीती वाटली बघून, कोणी कोणाला मारुन वगैरे तिथे पुरलं की काय किंवा अघोरी शक्ती वगैरे. त्या शैलेश दातारलापण परवा बघून भीती वाटली. भुयार किंवा त्यातली कोडी हे दाखवलेलं आवडलं मला पण मानवी कवट्या वगैरे नको होत्या असं वाटलं.

अक्षरा एवढं सांगते आल्यावर तर तिला काहिच कुतूहल वाटल नाही की खरच या मुली आत जाऊन आल्या.. >>> हो तिला अजिबात कुतुहल वाटलं नाही, पुर्वीची पिढी इथे जाऊ नको सांगितलं की अगदी नम्रपणे ऐकायची त्यातली ती. पण तरीही तिथून ह्या परत आल्यावर काहीतरी वाटायला हवं तसं नाही दिसलं. उद्या बघुया.

तो सगळ्यात मजेशीर संवाद होता.
अक्षरा - अग्नीहोत्राच्या खोलीजवळ एक बंद दरवाजा आहे.
रोहिणी आत्या - तिथे जायचं नाही!
अक्षरा - आम्ही गेलो Lol
या संवादाचं टायमिंग असं होतं की हसायलाच आलं पटकन!

पण अग्नीहोत्र १ चा usp कोणी खलनायक नाही. सर्व जण आपापल्या नशीबाने वेगवेगळ्या दिशांना जातात आणि शेवटी पुन्हा एकदा एकत्र येतात यात कुठेही अमानवी गोष्टी फारशा दाखवल्या नव्हत्या. >>> +१००

पहिल्या भागात नातेसंबंधातले ताणतणाव होते आणि ते फारसे अतर्क्य नव्हते वाटले. नविन नाती घटतानाचे खटके अगदी व्यवस्थीत दाखवले होते. या भागात ज्याला कधी पाहिलेच नाहीये त्याला मुखत्यारपत्र दिले हेच मुळी पटले नाहीये. आणि परत जुन्या संचात एक से एक कलाकार होते. या वेळेस समिहा, महादेवकाका आणि सतेज सोडल्यास बाकी सगळेच रटाळवाणा अभिनय करताहेत.

या धाग्याचे 'पिसे काढायच्या' धाग्यात रुपांतर होऊ नये असं मनापासून वाटतय.

मी पल्लवी पाटीलची वाट बघतेय, तिने अतिशय उत्तम अभिनय केलेला रुंजी आणि बापमाणूस मधे. रुंजी मी क्वचित बघितली पण बापमाणूस महीनाभर बघितलेली. जबरदस्त व्हिलन केलेला तिने.

ती आणि समीहा झालेली प्रतिक्षा अक्षराला भारी पडतील.

या धाग्याचे 'पिसे काढायच्या' धाग्यात रुपांतर होऊ नये असं मनापासून वाटतय. >>> खरं आहे. तो स्वप्नातला अ‍ॅनिमेटेड राक्षस दाखवला तेव्हाच मला यात असं का दाखवलं वाटलं. सरळ एखादा खरा राक्षस दाखवायचा होता. आता ते प्रतिनिधित्व शैलेश दातार करेल.

यात अनेक व्हिलन दिसतायेत. अण्णाकाका आणि शैलेश दातार हे दोन व्हिलन समोर आलेत. दोन मातृका आणि दोन व्हिलन, आता मला सात व्हिलन आणतायेत की काय असंही वाटायला लागलं. अति केलं तर नाही बघता येणार मला.

कोणीतरी इथे लिहील्याप्रमाणे लव ट्रँगल येणार आता. फाफटपसारा वाढत चालला सिरीयलमधला.

तो गोव्याचा कोण नवीन मुलगा दाखवलाय, अँटीक पीस विकत घेणारा, त्याची ती ओठातली रींग किती विचित्र दिसत होती. त्याच्याबरोबर पल्लवी पाटील असेल का, तो नाशिकला येणार आहेना, तर तीही येईल.

परवाचा अर्धा भाग मी बघितला नाही. एकदम विहीरीवर त्या मुद्रा साफ करतात ते कामगार तिथपासून बघितलं, कोणी त्याआधीचं सांगू शकतं का. शैलेश दातार भानावर कधी येतो, त्याआधीच्या एपिसोडमधे तो कितीतरी वेळ त्या मुर्तीकडे बघत असतो, तेव्हा त्याचे डोळे बघून भीती वाटली.

लव्ह ट्रँगल असा नव्हता तो,फक्त सईच लग्न नीलशी होउ नये म्हणून तिचे वडील संतोष जुवेकरच स्थळ आणतात,पण सई तिथेच त्याला खर काय ते सांगते ,6/7 भागांपुरताच संतोष होता.तेही अगदी शेवटी.

लक्षात राहण्याइतके आणि जाणवण्याइतके नव्हते लव्ह ट्रँगल्स. यावेळी जरा वाटतंय, तो अतीच करतोय असं वाटलं. अक्षराचा हात धरून बसवतो झोपाळ्यावर हे जरा अति वाटलं. नुकतीच ओळख झालीयना. अक्षरा हसत बसते, काहीच बोलत नाही.

समहाऊ मला ते बोअर होणार बहुतेक, काल एकाच एपिसोडमधे झालं. सातजणी येणार असतील, तर ह्यात वेळ कशाला घालवता.

पल्लवी पाटील 'कुसुम मनोहर लेले' नाटकात काम करतेय. तिच्याबरोबर तिचा नवरा संग्राम समेळ आणि शशांक केतकर आहे. या मालिकेत तिची एन्ट्री कधी होणार काय माहिती.

अखेर पल्लवी पाटीलची एंन्ट्री झाली.कोकणी बोलण्यावर आजकाल राखेचापासून फार भर दिला जात आहे.तिची भाषा गोव्यात असल्यामुळें गोवन आहे.
पण खर सांगायच तर मालिकेच काहीतरी बिनसल आहे हे खर,अजून पकड घेत नाही.

मी नाही बघत, आणि इथलं वाचून पण वाटतय कि एवढी काही ग्रेट नाही मालिका पहिल्या सिझन सारखी. मला पहिला सिझन हवाय यार पूर्ण.

पण खर सांगायच तर मालिकेच काहीतरी बिनसल आहे हे खर,अजून पकड घेत नाही. >>> अगदी अगदी.

काल चिन्मयी सुमित आणि शुभांगी संगवई ह्या दोन स्पेशलला आलेल्या, छान मुलाखत होत होती, मी अग्निहोत्रवर शिफ्ट झाले पण काल भारत असं का वागतो याचं कारण समजलं. त्याच्या आईला अपमानास्पद वागणूक मिळाली होती, तिने सांगितलं आहे बदला घ्यायला पण हे काहीच सतेजला कसं माहिती नाही.

समीर परांजपेची एन्ट्री झाली, हा माझा फेवरेट आहे. यात फार काम असेल की नाही काय माहिती. पण हि मालिका फार स्लो होतेय. फ्लो नाहीये, सात जणी आणणार तर वेग हवा होता. समीहा छा गयी है, हे मात्र खरं, फार impressive वाटते. प्रतीक्षा आणि पल्लवी समोर रश्मी अगदी फिकी वाटतेय.

कुठल्याच सिरीयलचा दुसरा भाग पकड घेत नाही हे इथेही होतंय दुर्दैवाने.

Btw ओठातली रिंगवाला कोण आहे, तो चांगला आहे पण मला ती रिंगच दिसते आणि ती बघून माझे ओठ दुखतात. काय यार दोघांना कपडे दिलेत, काय नाचत होते नी काय नी काय. टीका नाही पण त्यांचे मूळ रूप दिसत नाहीये, खुलत नाहीये.

हाहा मी हे पहिल्या पानावरच लिहिलं होतं की ही मालिका बेक्कार असणार.

स्टार प्रवाह आणि सतिश राजवाडे- दोघांच्याही प्रोग्रॅमिंगचा दर्जा अलीकडे खूप खालवलाय.

आज समिहा म्हणजे प्रतीक्षा मुणगेकरने काय सॉलिड अभिनय केलाय तिच्या बाबांशी फोनवर बोलताना, जबरदस्त touching.

वेग नाहीये मालिकेला. ही लिमिटेड एपिसोडसचा उद्देश ठेऊन करायला हवी होती, इतकी स्लो चालली तर trp मिळणार नाही आणि गुंडाळावी लागेल.

या मालिकेतील माया म्हणजे अन्वयची बायको ,मुग्धा परांजपे म्हणजे सूर नवा मधल्या आताच्या सिझनमधल्या त्या
परांजपे किकू होत्या ,त्यांची मुलगी.
तिला अग्निहोत्र मध्ये पाहिल्यावर आधी पाहिल्याच आठवत होत पण कुठे ते लक्षात येत नव्हत,सहज म्हणून इंन्स्टा अकाउंट पाहिल तर कळल.

आज चिंचवडला शंकराच्या देवळात मी अग्निहोत्र बघितले.
हाच मंगलमूर्ती वाडा की काय, पण तसे तिथे लिहिलेले नव्हते. ट्रस्ट देखील चिंचवड देवस्थानचा नव्हता.
कुणाला माहिती आहे का?

ती अक्षरा स्वत: बरेचदा चपला घालून वाड्यात फिरते आणि लोका सांगे ब्रह्मज्ञान सारखी दुसऱ्यांना चपला काढा, विहिरीवर हातपाय धुवा करत असते. शनिवारी पण ती फिरत होती, बाहेरून येऊन हात पाय न धुता चपलांसकट.

मागेही मी लिहिलं होतं त्यांच्या fb पेजवर जेव्हा तुम्ही ठासून ठासून हा नियम आहे सांगता तेव्हा अशी चूक होणं बरोबर नाही, वारंवार होतेय. आता परत जाऊन लिहायला लागेल मला.

Pages