अग्निहोत्र-१ आणि २

Submitted by मोरपिस on 6 November, 2019 - 03:24

काही दिवसांपूर्वीच अग्निहोत्र-२ ही मालिका येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अग्निहोत्राच्या पहिल्या भागाने तर धुमाकूळ घातला होता. त्यामध्ये शरद पोंक्षे, मोहन जोशी, विनय आपटे, इला भाटे, मुक्ता बर्वे इ. कलाकारांच्या अभिनयाने ही मालिका खूप रंजक बनली होती. आता अग्निहोत्र-२ ही मालिकासुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडणार यात शंका नाही. अग्निहोत्रच्या दुसऱ्या भागात पहिल्या भागातील जास्तीत जास्त कलाकार असतील तर अजूनच मजा येईल. दुसऱ्या भागात काय नवीन रहस्य दडलेली असतील हे पहायची माझी खूप उत्सुकता आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नीलची बहीणपण येईलना, ती अग्निहोत्रीचना डायरेक्टली, मृण्मयी गोडबोले होतीना की दुसरी कोणी होती.

मुक्ता बर्वे इन्पेक्टर मातृका दाखवली तर इंटरेस्टींग होईल सिरीयल.

त्यात गेल्या सीझनमधल्या नवीन मुलींमध्ये फक्त मुक्ताच येऊ शकते.>> हे पटले
रोहिणी
उषा
भगवती
मुक्ता
सई
अक्षरा
डायरेक्ट अग्निहोत्रींच्य घरी जन्मलेल्या

सई >>> सुन होतीना, नीलची बायको, आत्ता बाळ झालंय त्यांना असा उल्लेख आहे ह्या सीझनमधे.

>> त्यात गेल्या सीझनमधल्या नवीन मुलींमध्ये फक्त मुक्ताच येऊ शकते.
मॄण्मयी गोडबोले (वैदेही) पण येऊ शकते की.

घरच्या मुली म्हणजे अग्निहोत्रींच्या मुलांना झालेल्या मुली. मुली ज्या लग्न होऊन गेल्या त्यां मुलींच्या मुलीना कदाचित काउंट केले जाणार नाही (उदा. रोहिणीची मुलगी धरली जाणार नाही)
सप्तमातृका
पहिली पिढी : रोहिणी, उषा, भगवती,
दुसरी पिढी : मंजुळा, वैदेही, अक्षरा,
या सहा झाल्या, अजुन एक यायची आहे.
भगवती पण यायची आहे

आणखी एक लॉजिक
याच पिढीतल्या सर्व मुली
मणी
रोहिणी
श्रीपाद
उषा
सतेज
भगवती
भरत (असायला हवी) - तरच सात होतील ना

मागच्या पिढीतल्या बऱ्याच जणांना वाडा आणि अग्निहोत्र याबद्दल आस्था नाही फार, सिरीयल त्यावरच आहे म्हणून नवीन मातृका असतील, समीहाला अजून जाणीव झाली नाहीये तिच्या मातृका अस्तित्वाची. तीही वाडा अग्निहोत्र बाजूने जाईल.

त्या समीहाचं इंप्रेशन पडतेय, चांगला करतेय रोल अक्षरापेक्षा. अक्षरा बरा करतेय, कुठे कुठे अजुनही एकसुरी वाटते.

मी तेच आठवायचा प्रयत्न करतेय कित्ती दिवस, पण विसरले साफ. अन्वय होतं असं वाटत नाही मात्र किंवा सतेज, भारत पण नाही.

आता जरा इंटरेस्टींग होईल सिरीयल असं वाटतंय. समिहाला जाणवेल काहीतरी, ती त्या खोलीत अडकली आहे.

पहिल्या सीझनच्या शेवटच्या भागात नीलला ज्या चुलत अग्निहोत्रीकडून पत्र येते, त्याचे नाव काय होते ?>>>ते कळू नये म्हणुनच मागच्या सिझनचे भाग आपल्यासमोरुन गायब केले असावेत.

पहिल्या सीझनच्या शेवटच्या भागात नीलला ज्या चुलत अग्निहोत्रीकडून पत्र येते, त्याचे नाव काय होते ?
बहुतेक अवयच होत.
मुक्ता बर्वे मालिकेत नाही,तिनेच सांगितले आहे की ती आता प्रेक्षकाच्या भूमिकेतून मालिका बघणार आहे.
जर टीआरपी मिळाला नाही आणि जर जिवलगासारखी बुडायला लागली तर राजवाडे विचार करतील सिनियर मंडळीना आणायचा.

बहुतेक अवयच होत. >>> अन्वय का. पण त्याला अग्निहोत्र, वाड्याबद्द्ल काही ओढ नाही दाखवली, उलट वाडा त्याला विकायचा असतो.

पत्र पाठवणारा इतका स्वार्थी वाटला नाही त्यावेळी. आपुलकीने contact केलं असं वाटलेलं.

जिवलगासारखी बुडायला लागली तर राजवाडे विचार करतील सिनियर मंडळीना आणायचा. >>> ह्याचा जीवच थोडा होता आणि वेळ योग्य नव्हती म्हणजे त्यावेळी मीही सोनी मराठीवर मराठी करोडपती बघत होते. बाकी बरेच जण सु भा बघत होते. अर्थात मी बघायचे जिवलगा त्याच वेळी बरेचदा.

अग्नीहोत्र संपताना तरी आणायला हवं नील, मृण्मयी, मुक्ता, स्पृहा यांना एखाद दोन भाग. मी लिहिलं सिद्धार्थला missing u in agnihotra. जाम आवडायचा तो मला. मुक्ताला पण लिहायला हवं हे, कसलं भारी काम केलं होतं तिने.

मला एक कळत नाही की महादेव जिवंत आहे असं त्याच्या घरच्यांना वाटत असेल तर पोलीस missing केस नोंदवून त्याला शोधत का नाहीत, त्याचं डेथ सर्टिफिकेट असलं तरी घरच्यांचा विश्वास नसेल, काहीतरी काळंबेरं आहे असं वाटत असेल तर पोलिसांनी दखल घ्यायला हवीना. ते वाडा नावावर करणे, फसवणूक ते वेगळं पण महादेवला शोधायला काय हरकत आहे.

पहिल्या सीझनच्या शेवटच्या भागात नीलला ज्या चुलत अग्निहोत्रीकडून पत्र येते, त्याचे नाव काय होते ?
>>>>>>>>>>>>>>>
Anvay Satej Agnihotri

Anvay Satej Agnihotri >>> अरे वा. मला खरंच आठवत नाहीये, UP आणि Rajsmi ग्रेट मेमरी. मला अजिबात ओळखीची नाही वाटली ही नावं. अर्थात त्या नावांवरूनच पुढे स्टोरी जाणार म्हणा.

अन्वयने संपर्क केल्यावर मग पुढे वाड्यात सर्व familyने भेट दिल्यावर जे घडलं ते दाखवतील कधीतरी. त्याचा उल्लेख अक्षराच्या आईच्या बोलण्यात येतो म्हणून ती नाशिक आणि वाड्यापासून लांब राहूया म्हणत असते.

मुळात सिरियल किती वर्ष पुढे नेली आहे हे दाखवलेल नाही.खरतर पहिले काही भाग नेमक काय झाल हे दाखवायला हव होत.
सिझन 1 संपताना सगळे अग्निहोत्री एकत्र आणि आनंदी दाखवले होते,मग त्यांच्यापैकी कुणीच महादेवशी संबंध ठेवू नये,?
लीना भागवत जी भाडेकरु होती ,ती आणि तिचा मुलगा यांच काय झाल?
तिच्या मुलाला पुढे या मुलींपैकी कोणाचातरी हीरो दाखवू शकतात.
अजून सात मात्रुका सापडत नाहीत पण.आधीच्या सिझनमधल्या नाही घेणार बहुतेक.

आजचा एपिसोड एकदम भारी....समिहा ची ऐक्टिंग खूप मस्त...चोर दरवाजा आणि त्यामागील बोळात केलेल नेपथ्य जबरदस्त.. ती कोळीष्टक..आजुबाजुचा परिसर एकदम अनुरुप.. मला तर वाटत पहिल्या सिजन पेक्षा ह्या सिजन ने लवकर वेग घेतला रहस्य शोधायला..

भारी होता एपिसोड. समीहा खरंच छान करते. आता खरंच वेग येऊदे, नाहीतर जाम स्लो झाल्यासारखी वाटतेय.

मुळात सिरियल किती वर्ष पुढे नेली आहे हे दाखवलेल नाही.खरतर पहिले काही भाग नेमक काय झाल हे दाखवायला हव होत. >>> हो ना.

ते आता मधेच दाखवतील कधीतरी अन्वय, सतेज, भारत वगैरे वाड्यात गेले होते काही वर्षापूर्वी, तेव्हा काय घडलं तिथे.

काल इथे लिहायचं राहीलं पण मी त्यांच्या fb पेजवर लिहून आले की अक्षरा दोनदा पाय न धुता अग्निहोत्र, देवघरात गेली. दोनदा ती चप्पल घालून बाहेर गेली, आत आली तरी पाय न धुता गेली तिथे. बाहेरून आल्यावर पाय धुऊन मगच जायचं असा नियम आहेना. आपणहि बाहेरून घरात आल्यावर हातपाय धुतो ना आधी.

हे अग्निहोत्री पूर्वज फारच डोक्या चे होते वाटत..चोर दरवाजा काय,भुयार काय,श्लोक वाचुन दरवाजा उघडणे ,बुद्धिबळाचा पट.. सॉलिड डोक लावलय..

अगदी अगदी, अमेझिंग सर्वच. आता बुद्धीबळाने उद्या तरी दोघी बाहेर पडोत, नाहीतर कंटाळा येईल मात्र.

मूर्ती वगैरे पाहिल्यावर एकदम असंभवची आठवण झाली.ण काल शैलेश दातारला एकदम अस विक्रुत का दाखवल,राक्षसाची मूर्ती आवडते काय,जरि विचित्र वाटल.म्हणजे तो ही व्हिलन दिखवणार का?
त्या असंभवसारखा इथेही तळघरात खजिना वगैरे असेल का?
तो वाडा पेशवेकालीन आहे अस महादेवला सांगताना पहिल्या पर्वात ऐकल्याच आठवत आहे.

काल मधेच अ‍ॅनिमेशन राक्षस दाखवला ना . नक्की कुठल्या वयोगटासाठी दाखवणार आहेत.
मूर्ती वगैरे पाहिल्यावर एकदम असंभवची आठवण झाली. > हो. त्यात पण एक शेणाने लिंपलेल भुयार घेतलं होत. त्यापेक्षा इथलं भुयार चांग्ल घेत्लय. पण जरा काहीही दाखवताय्त. आता सुरूवातीलाच असा बालिश प्र्कार सुरू झाला तर बहुधा वाढतच जाईल नन्तर.

तो राक्षस अग्निहोत्र विझवतो असं स्वप्न पडत असतेना तिला त्याचं रूप तलगेरी सर. ते स्वप्न दाखवताना अ‍ॅनिमेशन दाखवतात.

तो सुहास पळशीकर मूळ पुरुष वगैरे असेल का आणि तो अग्निहोत्राचं रक्षण करत असेल.

Pages