अग्निहोत्र-१ आणि २

Submitted by मोरपिस on 6 November, 2019 - 03:24

काही दिवसांपूर्वीच अग्निहोत्र-२ ही मालिका येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अग्निहोत्राच्या पहिल्या भागाने तर धुमाकूळ घातला होता. त्यामध्ये शरद पोंक्षे, मोहन जोशी, विनय आपटे, इला भाटे, मुक्ता बर्वे इ. कलाकारांच्या अभिनयाने ही मालिका खूप रंजक बनली होती. आता अग्निहोत्र-२ ही मालिकासुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडणार यात शंका नाही. अग्निहोत्रच्या दुसऱ्या भागात पहिल्या भागातील जास्तीत जास्त कलाकार असतील तर अजूनच मजा येईल. दुसऱ्या भागात काय नवीन रहस्य दडलेली असतील हे पहायची माझी खूप उत्सुकता आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पण तिला नाशिकचे अग्नहोत्रींंचा उल्लेख आणि वाड्याचे फोटोज पाहून क्लिक कसे झाले नै?......मेमरी लॉस असेल किंवा त्या विक्रमला किंवा तिच्या मुलीला खरी ओळख द्यायची नसेल
पल्लवी पाटील म्हणे गोव्यातली चोर असते अस तिने एका इंटर्व्ह्यू मध्ये सांगितल होत.बघू कस आणत आहेत तिला.

सिझन १ म्हणजे जूनी अग्निहोत्र सिरीयल पूर्ण बघायची आहे, >>
निर्माते, स्टार प्रवाह, यूट्युब, हॉटस्टार कुणाकडेच भाग नाहीत का?
http://marathitvserial.com वर भाग पुर्वी होते, आता नाहीत
४२२ भाग होते असे दिसतेय.

निर्माते, स्टार प्रवाह, यूट्युब, हॉटस्टार कुणाकडेच भाग नाहीत का?
http://marathitvserial.com वर भाग पुर्वी होते, आता नाहीत
४२२ भाग होते असे दिसतेय.>>>>>> हो ना, पण आता नाहीत हे व्हिडिओ, unavailable असं येतय ह्या साईट वर, मध्यंतरी स्टार प्रवाह वर पण अग्निहोत्र परत दाखवायला सुरवात केली होती पण दुपारी वगैरे असं मला आठवतय .

पण मग तिच्या मुलीला अक्षरा कशी ओळखत नाही >>> हे सिरीयलमधे होऊ शकतं Lol

पण तिला नाशिकचे अग्नहोत्रींंचा उल्लेख आणि वाड्याचे फोटोज पाहून क्लिक कसे झाले नै? >>> हे मीही सिरीयल बघताना बोलत होते स्वत:शीच. सात मातृका जमवायच्या तर अग्निहोत्री संबंधित असतील असं वाटतंय मात्र. सारखं त्या मातृका दाखवतातना.

तो एक हिरो आलाय तो स्तवन शिंदे आहे का, प्रवाहवरच एक श्रेयस तळपदेची सिरीयल होती, ती चालली नाही त्यात हा हिरो होता बहुतेक आणि अमृता देशमुख हल्ली झी युवा सिरीयलमध्ये असते ती नायिका होती. तेव्हा हनुवटीवर ते stiches वगैरे नव्हते दिसत त्याच्या, मी पहिला भाग बघितलेला.

मध्यंतरी स्टार प्रवाह वर पण अग्निहोत्र परत दाखवायला सुरवात केली होती पण दुपारी वगैरे असं मला आठवतय . >>> हो आणि बंदही केली लगेच थोडे दिवसांनी.

मध्यंतरी स्टार प्रवाह वर पण अग्निहोत्र परत दाखवायला सुरवात केली होती पण दुपारी वगैरे असं मला आठवतय . >>> हो आणि बंदही केली लगेच थोडे दिवसांनी.

धनुडी, अंजू - अगदी बरोबर !!
२०१४ किंवा २०१५ असेल, नक्की आठवत नाही. स्टारप्रवाह वर IST वेळेप्रमाणे प्रमाणे दुपारी एक-दिड वाजता दाखवायचे आणि अचानक सकाळी साडेसहा ला नेली आणि मग अचानक बंदच केली. मी तेंव्हा पाहत नव्हते पण आई म्हणाली होती तेंव्हा इंडिया मध्ये सध्या पुन्हा दाखवत आहेत. हॉटस्टार वर असलेले ६६ भाग हे तेंव्हाचेच असणार असा माझा अंदाज आहे. कारण तेंव्हाही इतकेच एपिसोड झाले होते . youtube वर तेंव्हाही सगळेच भाग होते आणि माझे आधीच २ वेळा पूर्ण सिझन पाहून झाले होते. Happy

youtube वर तेंव्हाही सगळेच भाग होते आणि माझे आधीच २ वेळा पूर्ण सिझन पाहून झाले होते.>>>>>> तेव्हाही म्हणजे? अत्ता युट्युब वर आहेत का पुढचे भाग? नाही दिसत. Sad

मनिला २०१७ का १८ ला परत दुपारी साडेबाराला सुरु केलेली आणि गुंडाळली, मी बघायचे नाही पण लोकं विचारत होते fb पेजवर. उत्तर द्यायची काही प्रथाच नसते channelची.

समीहाचे आजोबा खुश झाले, नाशिक अग्निहोत्री ऐकून पण तिला काही स्पंदने जाणवत नाहीयेत, ती अग्निहोत्रात पाणी ओतणार बहुतेक आज.

नेटवर अग्निहोत्र म्हणजे होम किंवा हवन (जो थोडाकाळ चालतो, अखंड नाही) याचीच फक्त माहिती मिळते. > हो. खूप पुर्वी मी एका कुटुंबात पाहिलं होतं. एक तांब्याचं य्ज्ञकुंड सारखं पात्र अस्तं. गोवर्‍या तूप इ. साधन वापरून ते सकाळ संध्याकाळ पेटवायचं. सकाळचं नक्की आठवत नाहीये; पण संध्याकाळी सूर्यास्ताची वेळ असते. ती चुकवायची नाही म्हणून घरात कोणा न कोणाला थांबाव लागे. पण अखंड वगैरे नसे ते.>>

ते जे अग्निहोत्र आहे ते रोज सर्वांना करण्यासाठीच आहे. जे अग्निहोत्री असतात, त्यांच्याकडे अखंड असते चालू; धुनी सारखे. म्हणजे
अग्निहोत्र सकाळ संध्याकाळीच करतात, परंतु अग्नी अखंड चेतवलेला असतो, तो कधीही विझत नाही. नाशकात अजूनही आहेत अशी कुटुंबे.

राजवाड्यांचे दिग्दर्शन गंडलंय काय? आधी पण महादेव च्या तेराव्याला फक्त हे ४-५ जणंच असतात .. गावातलं कोणीच नसत ..त्याचा मित्र पण नाही तरीपण कोणाला शंका येत नाही . मृत्यू प्रमाणपत्राच काय? आणि आता अण्णाकाका गायब आहे तरी अक्षरा कोणाला सांगत नाही.

अग्निहोत्र-१ मध्ये दाखवलं होतं बहुधा की उषा अग्निहोत्रात पाणी ओतून ते विझवते कारण ती नास्तिक असते. पुढे तिच्या नवर्‍याला तो निरपराध असतानाही आदिवासी जाळून मारतात आणि ते दृश्य बघून ती वेडी होते (पुढे २०-२५ वर्ष वेड्यांच्या हॉस्पिटलात असते) असं दाखवलं होतं.
अग्निहोत्रात पाणी ओतणं आणि नवरा जळून मरणं असं कनेक्शन दाखवायचा प्रयत्न असावा असं मला वाटलं. अंधश्रध्दा म्हणता येईल की असा नास्तिकपणा केला तर बघा काय होतं.
चिन्मय मांडलेकरने तो छोटासाच रोल फार सुरेख केला होता. त्याचा जळून मरण्याचा प्रसंग डेंजर होता..अजून लक्षात आहे.

चिन्मय मांडलेकरने तो छोटासाच रोल फार सुरेख केला होता. त्याचा जळून मरण्याचा प्रसंग डेंजर होता..अजून लक्षात आहे. >>हो सनव माझ्याही खूप अंगावर आला होता तो प्रसंग, पक्का लक्षात आहे.

अक्षरा आणि सामिहाचा भाग बघताना कंटाळा आला. मलाच काय माझा मुलागाही मालिका बघताना काय तेच तेच वाक्य बोलतायत असे म्हणाला . या दोघींच्या भागात तू निघून जा मी जाणार नाही या शिवाय वेगळ काहीच दाखवलं गेले नाही. अजून कहर म्हणजे अक्षरा जेव्हा आत्याला फोन करून स्पष्ट सांगते कि अण्णा काका इथे नाहीत म्हणून मी राहिले तरी आत्याच्या डोक्यात काहीच कसं संशयी आलं नाही. ती सारखी एकाच म्हणत होती. तुझ्या अन्णाकाकाला सांग तो बघेल काय .

अक्षरा आणि सामिहाचा भाग बघताना कंटाळा आला. >>>अगदी! नुसता आरडाओरडा

कहर म्हणजे अक्षरा जेव्हा आत्याला फोन करून स्पष्ट सांगते कि अण्णा काका इथे नाहीत म्हणून मी राहिले तरी आत्याच्या डोक्यात काहीच कसं संशयी आलं नाही>>> हो आणि आत्याने अक्षराला थातुरमातुर समजावून झटकल्यासारखे केले..

सतेज अग्निहोत्रींच्या कुटुंबाबद्दल सहानुभूती वाटतेय एकंदरीत बाकीच्या कुटुंबांंपेक्षा
मध्यमवर्गीय राहणी.. आजारी वडील..मुलाची नोकरी आणि राहणीमान ही साधेसे...आईची तारेवरची कसरत..आणि एक अक्षरा तिला कोणी दाद देत नाहीये.

ती मागच्या भागात अक्षराच्या भावासोबत साडीवाली मुलगी कोण होती?

ती अक्षरा स्तोत्र पण चुकीच म्हणताना दाखवली आहे. गणपती स्तोत्र म्हणताना नारदपुराणे आहे ती रामदास पुराणे म्हणते.

ती अक्षरा स्तोत्र पण चुकीच म्हणताना दाखवली आहे. गणपती स्तोत्र म्हणताना नारदपुराणे आहे ती रामदास पुराणे म्हणते. >>> हो का, माझं लक्ष नव्हतं.

ती समीहा फार सहज अभिनय करते, अक्षराचा बरेचदा ओवर वाटतो.

ती माया आणि तो अन्वय स्वार्थी दाखवलेत, पैशासाठी हपापलेले. अन्वयला पण वाडा विकायचा असतो.

अन्वय सुद्धा काकाबरोबर डिलमध्ये सामील असावा >>> हो बहुतेक.

ते महादेवकाका बिचारे परत तावडीत सापडले भारतच्या.

सप्तमातृका म्हणजे अग्निहोत्रींच्या मुली असाव्यात
रोहिणी
उषा
भगवती
अक्षरा
बाकीच्या येतील

समीहा पण कनेक्टेड आहे, तिची आहुती घेतली अग्नीहोत्राने आणि तो सुहास पळशीकर तिला मातृका म्हणतोय असं दाखवलं.

पल्लवी पाटील येणार आहे.

आधीच्या धरल्या तर सहा होतात पण मला नवीन सात वाटतायेत म्हणजे अक्षरा, समीहा, पल्लवी येणार आहे ती तिसरी. अजून एकेक सावकाश येतील. खूप स्लो वाटतेय सिरीयल यावेळी.

हो आणि मृण्मयी गोडबोले, स्पृहा आणि अजून एक पण होतीना. कनेक्शनवाईज म्हणतेय, म्हणजे आडनाव अग्निहोत्री असेल असं नाही पण त्यांच्या मुली.

त्यामुळे मला वाटतं नवीन मातृका असतील.

आई माहेरची अग्निहोत्री असे कनेक्शन नाही. स्वतः अग्निहोत्री आडनाव लावणाऱ्या मुली - त्यात गेल्या सीझनमधल्या नवीन मुलींमध्ये फक्त मुक्ताच येऊ शकते.

Pages