अग्निहोत्र-१ आणि २

Submitted by मोरपिस on 6 November, 2019 - 03:24

काही दिवसांपूर्वीच अग्निहोत्र-२ ही मालिका येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अग्निहोत्राच्या पहिल्या भागाने तर धुमाकूळ घातला होता. त्यामध्ये शरद पोंक्षे, मोहन जोशी, विनय आपटे, इला भाटे, मुक्ता बर्वे इ. कलाकारांच्या अभिनयाने ही मालिका खूप रंजक बनली होती. आता अग्निहोत्र-२ ही मालिकासुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडणार यात शंका नाही. अग्निहोत्रच्या दुसऱ्या भागात पहिल्या भागातील जास्तीत जास्त कलाकार असतील तर अजूनच मजा येईल. दुसऱ्या भागात काय नवीन रहस्य दडलेली असतील हे पहायची माझी खूप उत्सुकता आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तो 'तांबडेबाबा तेरी शरणमे' वाला श्रीपादचा मित्र असतो. त्याला तो कचरा का असं काहीतरी म्हणत असतो. मला एक सीन स्पष्ट आठवतोय. मुक्ताला महादेवने भर पावसात घराबाहेर काढलेलं असतं. आणि भिजून येऊन ती बिचारी अग्निहोत्र विझू नये म्हणून त्यात तूप ओतत बसते. त्यावर महादेव भडकतो कारण तमासगीर आईच्या पोटी जन्म घेतलेल्या मुलीने (आणि बहुतेक बाईने!) अग्निहोत्राला हात लावू नये असं त्याला वाटत असतं. त्यावर मुक्ता म्हणजे मंजुळा त्याला मीही अग्निहोत्री आहे असं सुनावते.

आजच्या पाच मालिकांचं पोट भरेल एवढा ऐवज होता पहिल्या अग्निहोत्र मालिकेत. यावेळी कसा दर्जा असेल ते बघण्याची उत्सुकता आहे>>+१
आताच्या मालिकांसारखे प्रत्येकाच्या चेहर्‍यावरचा भाव्/डोळे फिरवताना दाखवणे, फालतू संवाद, मनातल्या मनात कट रचने, वेळ खाउपणा करायला नको.
अग्निहोत्र सुरुवातीचे भाग(जे हॉटस्टार वर आहेत) बघताना आताच्या मालिकांचा दर्जा किती खालावलाय हे जाणवत राहते Sad

आस्तादची gf दाखवलेली, ती खरोखर त्याची gf होती, दुर्दैवाने तिला कॅन्सर झाला आणि ती गेली Sad . नंतर bb त आस्ताद सांगायचा.

अग्निहोत्र मालिका मस्तच होती पण तिचं basic premise हे अंधश्रध्देवर आधारलेलं व डळमळीत होतं. सगळ्यात मोठं 'रहस्य' उलगडल्यावर फुसकं वाटलं होतं.

----- स्पॉयलर अलर्ट - -----

-------------------------------------------------

---------------------------------------------------
--------------------------------------

मोहन आगाशेंची पत्नी बाळंत होते व तिला मुलगा होतो. पण आप्पा (मोहन आगाशे) ज्योतिषी व वैद्य असतात. ते मुलाची कुंडली मांडून हा मुलगा आपल्या घरात राहिला तर त्याचं भलं होणार नाही असं ठरवतात. मग दूर गावी मुलाला एका जोडप्याकडे ठेवतात. त्याच्या खर्चाची तरतूद करतात. पत्नीही हे सर्व मान्य करते. आप्पा जमेल तेव्हा मुलाला भेटत असतात, पत्र लिहितात पण या मुलाच्या अस्तित्वाबद्दल नंतर झालेल्या ५ मुलांना सांगतही नाहीत. मग एका पॉईंटला मुलांना तो मुलगा (जो आता विक्रम गोखले असतो) आपल्या वडिलांचा मुलगा असल्याचं कळतं. सुरुवातीला हे काहीतरी आप्पाचं अफेअर व त्यातून मूल असं असावं असं मुलांना वाटतं. नंतर कळतं की तो आपल्याच आईचा मुलगा- आपला सख्खा भाऊच आहे. फुस्स. झाला सस्पेन्स खतम. त्यात त्या मुलाचं नाव 'अग्रज' असतं हे ऐकून तर खूप हसायला आलं होतं. कोथरुडकरांसाठी अग्रजचा अर्थच वेगळा आहे Biggrin

सनव, हो तो बार अगदीच फुसका निघाला होता. जाम चडफड झाली होती. आता इतक्या वर्षात असे फुसके बार खूप पाहिलेत. त्यामुळे इतकी चिडचिड नाही व्हायची.

>>आस्तादची gf दाखवलेली, ती खरोखर त्याची gf होती, दुर्दैवाने तिला कॅन्सर झाला आणि ती गेली 

Sad हे नव्हतं माहित. तिचा चेहेरा आठवतो मला. नाव आज कळलं

मला त्यावेळी सिद्धार्थ चांदेकर खुप आवडायचा. शरद पोंक्षे व त्याची काका पुतण्याची केमिस्ट्री मस्त दाखवली होती. ते शरद पोंक्षेचं त्याला सारखं निळ्या निळ्या हाक मारणं अजून आठवतं.

मला त्यावेळी सिद्धार्थ चांदेकर खुप आवडायचा. शरद पोंक्षे व त्याची काका पुतण्याची केमिस्ट्री मस्त दाखवली होती. ते शरद पोंक्षेचं त्याला सारखं निळ्या निळ्या हाक मारणं अजून आठवतं. >>> मम.

सि चां मला अजूनही आवडतो.

डिसक्लेमर :
वाड्यात तळघरात एक गोल तबकडी असते भिंतीत. त्यात आठ कप्पे. मुुुुुुुुुुुुलांच्यातला कलह मिटून सगळी एकत्र यावीत या इच्छेने आप्पा एकेकाला एक एक गणपती देतात. पुढे तिसऱ्या पिढीतला नील हे रहस्य सोडवतो. जसजशी सगळी मुलं एकत्र येत जातात, त्यांच्याकडचे गणपती तबकडीतल्या कप्यात एक एक गणपती फिट होत जातात. अन मग खालची गुप्त खोली उघडली जाते. आत वंशपरंपरागत पोथ्या कागदपत्र असतात. आयुर्वेदाची वगैरे. पण त्या खोलीचा चोर दरवाजाही असतो जो मोठ्या मुलाला माहिती असतो. अन अग्निहोत्र कुटुंब तिथवर पोहोचतॆ तर हा मोठा मुलगाही तिथे असतो. अन मग सगळं मुलांचं रहस्य उलगडतं.
ती खोली उघडली जाई पर्यंत सगळं छान डेव्हलप केलं होतं. पण खाली फक्त जुन्या पोथ्या, कागदपत्र इतकच हे जरा फुसकं झालेलं.
डिसक्लेमर समाप्त.

पण एकुणात आवडलीच होती मालिका. एक तर ठोस कथा होती, टर्न अँड ट्विट्स होते, उत्कंठा, आकर्षकता, धक्के, तत्कालिन इतिहास, राजकारण, अर्थकारण सगळं योग्य प्रमाणात होतं. छोटीमोठी रहस्य होती जी छान मांडली, उलगडली होती. छोट्या प्रेमकथा होत्या. मुख्य म्हणजे कुटुंबांमधलं वातावरण खरंखुरं वाटत होतं. मध्यमवर्गीय घरं घरंच वाटत होती.
शिवाय सगळ्यांचा उत्तम अभिनय, उत्तम दिग्दर्शन, संकलन, संगीत सगळच कष्टाने, लक्ष देऊन केलेलं. प्रेक्षकांच्या माथी मारा काहीही. असं काही नव्हतं.
सो अग्निहोत्र दोन नक्की बघणार. खरं तर अग्निहोत्र एक पुन्हा दाखवली तरी सगळी बघेन, इतकी सुंदर Happy

अग्निहोत्र १ पाहीली नव्हती. आता २ बघावी असा विचार करत होते.

पण वरचा सगळा कुटाणा वाचून आता काही समजेल का अशी शंका वाटतिये Uhoh

सान्वी, हो त्यांचं नातं मस्त दाखवलं होतं. अवल, रहस्य सांगितल्याबद्दल धनस. बाकी मालिकेबद्दल तुम्ही जे लिहिलंय त्याच्याशी सहमत. मलाही तेव्हा सिध्दार्थ आवडायचा.

मी नताशा, जरुर बघा हो मालिका. पहिल्या सिझनचा दुसर्याशी संबंध नसेल. आणि असलाच तर हम सब है ना Happy

>>खरं तर अग्निहोत्र एक पुन्हा दाखवली तरी सगळी बघेन, इतकी सुंदर 

अगदी अगदी

मेघना वैद्य पण होती ना अग्निहोत्रमध्ये? मोहन जोशींची बायको का? केसांचा बॉबकट वगैरे होता. वादळवाटमधल्या गेटअपपेक्षा खूपच वेगळा होता गेटअप. मी पूर्ण मालिका पाहिली नव्हती. काही भाग पाहिले होते. आवडले होते.

सगळे आशा शेलारना विसरले की. ज्या सरपंचाचा मुक्ता बर्वेवर डोळा असतो त्याच्या बायकोची भूमिका केली होती त्यांनी. छोटीशीच भूमिका होती पण नवर्‍याच्या अफेअर (मुक्ता बर्वेची आई) बद्दल राग, त्याच्याबद्दलची भिती आणि तरीही खमकेपणा अफलातून दाखवला होता त्यांनी. त्यामानाने होसूत्याघ मध्ये अगदीच एकांगी भूमिका होती.

उषाचा (स्पृहाची आई) म्हातारपणीचा रोल सुलेखा तळवलकरांनी केला होता. तरुणपणीच्या रोलकरता कुणी दुसरी अभिनेत्री होती.

शरद पोंक्षे आणि लीना भागवत मधलं 'तुझं माझं जमेना अन तुझ्यावाचून करमेना' नातं मस्त दाखवलं होतं.

खास धन्यवाद स्वप्ना_राज , सनव ह्यांना आधीची कथा लिहिल्याने.
——
पण बराच राडा आहे कथेत. त्यामुळे अग्निहोत्र २ बघून आपल्या डोक्याचा दही बनवायचे की नाही ठरवावे लागेल.
राखेचा हि एकच अण्णाबाज सिरियल बघवली काहीच दिवस.

आस्तादची gf दाखवलेली, ती खरोखर त्याची gf होती, दुर्दैवाने तिला कॅन्सर झाला आणि ती गेली Sad . >
म्रुण्मयी देशपांडे ची बहिण प्राजक्ता हनमघर दाखवली होती.> नाही बहुतेक. चेहेरा वेग्ळाच आहे.

झंपी, मी नताशा दुसरा सिझन बघा. त्याचा पहिल्याशी काही संबंध नाही असं दिसतंय. मोहन जोशींच्या बायकोच्ं काम इला भाटेनी केलं होतं. इथे कोणीतरी सतिश राजवाडेने इन्स्पेक्टरचं काम केलं होतं असं म्हटलंय. ते असंभवमध्ये ना? ह्यात होता तो?

स रा चं मीच लिहीलेलं, यात पण होता असं आठवतंय. मुक्ताबद्दल सॉफ्ट कॉर्नर होता असं दिसलं त्यामुळे तो तिचा हिरो असेल वाटलेलं, पण मालिका फार वाढवली नव्हती.

सगळे आशा शेलारना विसरले की. >>> मला नाही आठवत. मला तिचं नाव घेतलं की गुंतताच आठवतं.

आता परत तो काका एकटा दाखवला आहे, म्हणजे पहील्या सीझनला एकत्र आलेले परत पांगले की काय. त्याचा शेवट सगळे एकत्र आले असा होता.

दुसऱ्या सिझनचा पहिल्या सीझनशी काहीच संबंध नसेल असं कसं होईल.

अंजू, मला असं म्हणायचं होतं की पहिला सिझन पाहिला नसेल तर दुसरा कळणारच नाही अश्यातला प्रकार नसेल. एक कुटुंब सोडलं तर बाकी काही कॉमन थ्रेड नसावं बहुतेक.

मी नताशा, जरुर बघा हो मालिका. पहिल्या सिझनचा दुसर्याशी संबंध नसेल. आणि असलाच तर हम सब है ना >>> नक्की स्वप्ना Happy

स्वप्ना मी स्पेसिफिक असं तुमच्या पोस्टवर नाही लिहिलं, माझ्या डोक्यात सुरु होतं लिहिताना की असं कसं असू शकेल की पहिल्या भागाशी संबंध नाही ते पटकन लिहिलं. कदाचित नसेलही. बघूया कसं घेतात ते.

एकीकडे दोन शक्यता वाटतात. शेवटी नीलला एका दुसऱ्या अग्नीहोत्री घराण्यातल्या मुलाचं पत्र आलेलं असतं, तिथून पुढे नेतील कारण त्यामुळे दुसरा भाग येईल असं वाटलेलं किंवा ह्या सर्वांचीच पुढची पिढी दाखवतील किंवा वेगळंच काही.

जे काही असेल ते इंटरेस्टिंग असुदे आणि ओघवतं असुदे पहिल्यासारखं. पकाऊ नको.

अग्निहोत्र १ मधे संदेश कुलकर्णी पण होता. तरुण पोलिस इन्स्पेक्टर. त्याचं मंजूळा बरोबर जमलेलं दाखवलं आहे.

हो, आणि मुख्य म्हणजे शेवट नीट करु देत. ह्या सगळ्या मालिका शेवटात मार खातात >>> अगदी अगदी.

अग्निहोत्र १ मधे संदेश कुलकर्णी पण होता. तरुण पोलिस इन्स्पेक्टर. त्याचं मंजूळा बरोबर जमलेलं दाखवलं आहे. >>> हो का मग स रा नव्हता का. मला स रा का आठवतोय.

>>राजन ताम्हाणे पहिल्या अग्निहोत्रमध्ये होते का? मला राजन भिसे

हे दोघेही त्यात असतील तर मला आठवत नाहियेत. >>>>>>> मला राजन भिसे म्हणायच होत स्वप्ना, पण आडनावात गोन्धळ झाला माझा. अहो २ च्या प्रोमोत राजन भिसे वेडयासारखे काहीतरी बरळत मोजत असतात. सो, मला वाटल त्यान्चा नक्कीच पहिल्या भागाशी सम्बन्ध असावा.

Pages