अग्निहोत्र-१ आणि २

Submitted by मोरपिस on 6 November, 2019 - 03:24

काही दिवसांपूर्वीच अग्निहोत्र-२ ही मालिका येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अग्निहोत्राच्या पहिल्या भागाने तर धुमाकूळ घातला होता. त्यामध्ये शरद पोंक्षे, मोहन जोशी, विनय आपटे, इला भाटे, मुक्ता बर्वे इ. कलाकारांच्या अभिनयाने ही मालिका खूप रंजक बनली होती. आता अग्निहोत्र-२ ही मालिकासुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडणार यात शंका नाही. अग्निहोत्रच्या दुसऱ्या भागात पहिल्या भागातील जास्तीत जास्त कलाकार असतील तर अजूनच मजा येईल. दुसऱ्या भागात काय नवीन रहस्य दडलेली असतील हे पहायची माझी खूप उत्सुकता आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नक्की 2 डिसेंबरपासून आहे ना? मी पेपरात 25 नोव्हेंबरपासून असं वाचलं होतं. 2 डिसेंबर चेनेलवर सांगितलं का?

चॅनेल फेसबुकवर बघितलं, तिथे लिहूनही आले की तुम्ही बरेचदा तुमच्या नवीन मालिका पोस्टपोन्ड करता.

हो, जर मी त्यांच्या फेसबुकवर गेले आणि समजलं तर नक्की सांगेन, सध्या ते चॅनेल मात्र लावलं जात नाहीये, अग्निहोत्रसाठीच लावेन बहुतेक.

अर्रे, शरद पोंक्षेंबद्दल हे माहित नव्हते. Sad त्यांनी बेश्ट काम केलं होतं. खुपच बारीक झालेत की.
अग्निहोत्र फार आवडली होती. चांदेकर व पोंक्षेंनी फारच सुंदर काम केले होते.

2 december पासून.रात्री 10वाजता आहे,पल्लवी पाटील,रश्मी अनपट प्रतीक्षा मुणगेकर,या आहेत.

पल्लवी पाटील असेल तर आवडते मला.

मी त्यांच्या fb पेजवर लिहून आले की माझी एक विनंती आहे, दुसरा सिझन सुरु करताना पहिल्या सीझनचा आढावा घ्या, ज्यांनी बघितला नसेल पहिला सिझन त्यांना समजेल कारण hotstar वर पण सर्व एपिसोडस नाहीयेत.

>>हो, जर मी त्यांच्या फेसबुकवर गेले आणि समजलं तर नक्की सांगेन

धन्यवाद! मी त्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाहिये केबलवर. डिसेंबरमध्ये करेन.

>>दुसरा सिझन सुरु करताना पहिल्या सीझनचा आढावा घ्या, ज्यांनी बघितला नसेल पहिला सिझन त्यांना समजेल

उत्तम सूचना. युएस मधल्या मालिकांचा नवा सीझन सुरु करताना हे नेहमी करतात. अर्थात जुन्या कथेचा काही संबंध असेल तरच हे योग्य आहे. अन्यथा नवी विटी नवं राज्य करावं हेच बरं.

>>काय होते त्या पहिल्या अग्निहोत्राची स्टोरी?

भलं मोठं अग्निहोत्री कुटुंब. इतस्ततः विखुरलेले सदस्य. वाड्याचा दरवाज्यावर असलेल्या आठ का नऊ गणेशमूर्ती. त्यातल्या बर्‍याच गायब. त्यामागे काही रहस्य. नक्शलवाद्याशी संसार करून त्याची हत्या झाल्यावर मानसिक स्वास्थ्य हरवून बसलेली घरातली एक मुलगी उषा. तमासगीर बाईशी, तुळसाशी संसार करून तिला आणि मुलीला, मंजुळाला, वार्‍यावर सोडलेला एक नाकर्ता मुलगा श्रीपाद. त्या मुलीला कुटुंबात सामावून घ्यायचं की नाही ह्यावरून मतमतांतरं. घरात अहोरात्र धडधडणारं अग्निहोत्र. त्याची काळजी घेणारा वाड्यात एकटा राहणारा महादेव. शहरात राहणारा चिंतामणी. ह्या चौघांची आणखी एक बहिण रोहिणी. चिंतामणीची आई गेल्यावर तिच्या एका विधवा मैत्रिणीने ह्यांच्या घरी राहून ह्या पाच मुलांना सांभाळलेलं असतं. पण चिंतामणी तिच्यावर आणि वडिलांवर संशय घेतो म्हणून तिच्या मुलाचं, दिनेशचं आणि ह्या कुटूंबाचं वैर निर्माण झालेलं असतं. हे ६ जण ही एक पिढी. तळघरातल्या देवघरात अचानक प्रकट होणारे मोरूकाका हे आधीच्या पिढितलं एक पात्र. तिसरी पिढी म्हणजे दिनेश, चिंतामणी, उषा आणि श्रीपादची मुलं. एव्हढी पात्रं आठवत आहेत. नेमकं ते गणपतींचं रहस्य आठवत नाहिये काय होतं ते.

आजच्या पाच मालिकांचं पोट भरेल एवढा ऐवज होता पहिल्या अग्निहोत्र मालिकेत. यावेळी कसा दर्जा असेल ते बघण्याची उत्सुकता आहे. एलतिगो नंतर पहिल्यांदाच एखादी मराठी मालिका बघायची इच्छा झाली आहे.
मला सगळं कथानक आठवतंय पण लोकांना उगीच स्पॉयलर नकोत द्यायला!

फुल्टू राडा आहे की मग ही पण सिरीयल. > मल्टी-स्टारर (केवढी आणि कित्ती जबरदस्त कास्ट होती!) , बिग-बजेट, कसदार अभिनय, सुरेख दिग्दर्शन! त्यातले खलनायक पण जबरी होते ( तांबडे बाबा वाला तो एक होता आणि बाप्पा कि काहीतरी नावाचा एक्जण पण फार अप्रतिम काम होत)

स्वप्ना बरच आठवतय की तुम्हाला!

Thanks for the revision Happy

माझ्या आठवणीप्रमाणे:
मंजुळा: मुक्ता बर्वे
श्रीपाद: उदय टीकेकर
महादेव: शरद पोंक्षे
चिंतामणी: मोहन जोशी
रोहिणी: शुभांगी संगवई-गोखले
चिंतामणीची बायको: इला भाटे
रोहिणीचा नवरा: विनय आपटे
दिनेश: अविनाश नारकर (बहुतेक)
मोरुकाका: विक्रम गोखले

आणि पुढच्या पिढीत सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी गोडबोले (चिंतामणीची मुले), मृण्मयी देशपांडे (दिनेश ची मुलगी), आस्ताद काळे (रोहिणीचा मुलगा) वगैरे लोक होते
स्पृहा जोशी पण होती बहुतेक वकीलाच्या रोलमध्ये आणि मिलिंद शिंदेचा पण रोल होता
मोहन आगाशे बहुतेक चिंतामणी, रोहिणी वगैरेंचे वडील होते

खुप मन लावून बघितल्याने अजुनही बरेचसे कास्टींग आठवतय!

स्पृहा जोशी पण होती बहुतेक वकीलाच्या रोलमध्ये >>> न चळवळीत ओढली गेलेलीची मुलगी. तो रोल स्मिता तळवळकरच्या सुनेने केलेला, सुलेखा तळवळकरने.

सतीश राजवाडे इन्स्पेक्टर होते.

आज म. टा. मध्ये अग्निहोत्रविषयी नवी बातमी आली आहे. सात नायिका असणार आहेत. सप्तमातृकाचे रहस्य असणार आहे.

बादवे प्रोमोमध्ये दिसणारे राजन ताम्हाणे पहिल्या अग्निहोत्रमध्ये होते का?

सुरेखा तळवलकर नव्हती. कोणीतरी वेगळीच होती उषा. या सगळ्या भावंडांचे वेगवेगळ्या वयातले रोल्स पण होते!
दिनेशची भूमिका आधी गिरीश ओक करायचे.
लीना भागवत पण होती वाड्याततली भाडेकरू. प्रभामामी म्हणजे दिनेशची आई तिची भूमिका सुहास जोशींनी केली होती.

बादवे प्रोमोमध्ये दिसणारे राजन ताम्हाणे पहिल्या अग्निहोत्रमध्ये होते का? >>> मला राजन भिसे दिसले. ते होते का आठवत नाहीये.

बादवे प्रोमोमध्ये दिसणारे राजन ताम्हाणे पहिल्या अग्निहोत्रमध्ये होते का? >>> मला राजन भिसे दिसले. ते होते का आठवत नाहीये. >>>>>>>>>> हा ते राजन भिसे. आडनावात कनफ्यूजन झाल होत माझ.

मुक्ता बर्वे उदय टिकेकर आणि तमाशा मध्ये काम करणारी या दोघींची मुलगी. उपेंद्र लिमये आठवत नाहीये मला.

>>लिहीलं आहे मी नाव, सुलेखा तळवळकर.

हो बरोबर. ती होती उषा....उषाकाका Happy

>>लीना भागवत पण होती वाड्याततली भाडेकरू. प्रभामामी म्हणजे दिनेशची आई तिची भूमिका सुहास जोशींनी केली होती.
येप....लीनाला एक मुलगा असतो.

>>राजन ताम्हाणे पहिल्या अग्निहोत्रमध्ये होते का? मला राजन भिसे

हे दोघेही त्यात असतील तर मला आठवत नाहियेत.

>>उपेंद्र लिमये पण होता, मुक्ता बर्वे त्याची मुलगी असते.

नाही अग, उदय टिकेकर होता श्रीपाद.

Pages