पुन्हा एकदा नारायण धारपांची पुस्तके - विचार/समीक्षा

Submitted by अज्ञातवासी on 9 May, 2020 - 01:22

नमस्कार.
आधीच्या धाग्याची संपादनाची वेळ उलटून गेली असल्याने हा नवीन धागा काढतोय.
जुन्या धाग्याची लिंक.
https://www.maayboli.com/node/71955

मागच्या धाग्यावर मी २२ पुस्तके वाचून त्यांची रेटिंग दिली होती. मात्र त्यात अनेक धारपांच्या चाहत्यांचा हातभार लागला होता. काही पुस्तके नव्याने कळली, आणि अनेक चांगल्या लोकांशी फक्त धारप या दुव्याने जोडलो गेलो.
तर, आजपासून हा वाचनयज्ञ पुन्हा सुरु करत आहे.

एक ते पाच च्या रेटिंगवर मी माझं मत मांडेन.

★ - बिलकुल वाचलं नाही तरी चालेल
★★ - वाचलं न वाचलं काही फरक पडत नाही
★★★ - वाचायला तर हवं
★★★★ - वाचायलाच हवं
★★★★★ - काहीही करा, हे पुस्तक चुकवू नका
(ही फक्त माझी रेटिंग. वाचकांच्याही रेटिंगचं स्वागत आहे.)
तर,
स्वाहा!!!

मी वाचलेली पुस्तके व रेटिंग
२३. रावतेंचा पछाडलेला वाडा - ★★★

वाचकांची रेटिंग

१. लुचाई - आदीश्री - ★★★1/2

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जास्त करून मी रोमात असतो क्वचितच लिहितो.
आवडीचा धागा म्हणून लिहितो आहे.

अवकाशाशी जडले नाते हा "दि स्टार ब्रिज" या कादंबरीचा स्वैरअनुवाद आहे.
दोन्ही पुस्तके आऊट ऑफ प्रिंट आहेत.
radhanisha. ला हि पुस्तके मिळाली का?

रावतेंचा पछाडलेला वाडा!
>>>>>
काल रात्री हे पुस्तक वाचून संपवलं. खरं सांगायला गेलं, तर हे धारपाचं अर्धवट राहिलेलं पुस्तक डॉ. अरुण मांडे यांनी पूर्ण केलंय, आणि बिलीव मी, अरुण मांडे यांच्या पहिल्याच वाक्यात लगेच हे पुस्तक कुणी दुसरी व्यक्ती लिहायला लागलंय, याची जाणीव होते. पण फुल मार्क्स फॉर एफर्ट!
ही कथा एका पछाडलेल्या वाड्याची असून, त्यातल्या दुष्ट शक्तींचा नायनाट करण्यासाठी काही लोक कसे एकत्र येतात हे बघण्यासारखं आहे. यात अजून एक सबप्लॉट आहे.
रेटिंग - ★★★

काल अंधारातली उर्वशी वाचलं
भन्नाट आहेत कथा

मी या वर्षात अमाप वाचन केले आहे धारप कथा

लुचाई ला सगळ्यात वरचे स्थान
त्यांनतर स्वाहा

@आशुचँप - रेटिंग आणि एक दोन ओळींची माहिती द्याल का? मी हेडर मध्ये अपडेट करत जाईन
@अजय - वेटिंग फॉर युवर रेटिंग
@आदीश्री - धन्यवाद. जमलं तर डिस्क्रिप्शन लिहून मग रेटिंगही द्या... Happy

काही आठवणी …
माझ्या वडिलांनी ६० च्या दशकात नारायण धारपांना पत्र लिहिले होते व त्याचे नारायण धारपांनी सविस्तर उत्तर पाठवले होते, जे वडिलांनी आम्हा मुलांना मोठे झाल्यावर दाखवले. बहुतेक काही शंका निरसन बद्दल होते.
आम्ही घरात नारायण धारपांच्या पुस्तकाबद्दल चर्चा करायचो आणि मित्रमंडळींच्यातहि चर्चा करायचो. त्यात चक्रावळ(नावाबद्दल खात्री नाही) या कथेवर जोरदार चर्चा केलेली आठवते.
समर्थ आणि आप्पा या यक्तीरेखेबद्दल …
घरात किंवा आजूबाजूला कुठलाही समारंभ झाला की त्यात कोणी समर्थां सारखी व्यक्तिरेखा आहे का हे मी व माझा मोठा भाऊ शोधायचो … आणि गम्मत म्हणजे एक दोन लोक तशी वाटायची.
एकदा आमच्या घरात एक समारंभ झाला तो संपल्यावर माझा भाऊ म्हणाला, बघितल्यास का शेवटी जो माणूस गेला तो अगदी समर्थांच्या सारखा होता, पांढरा शुभ्र शर्ट, स्वच्छ विजार, पायात साध्या चपला, चेहेऱ्यावर तेज, बोलणे अगदी शांत पण हुकमती …
९० च्या दशकात मी पूण्यात बालगंधर्व समोर फर्निचर च्या दुकानासमोरून उगीचच जायचो, वाटायचे कि कदाचित नारायण धारप दिसतील पण तो योग नाहीच आला.

अवकाशाशी जडले नाते अद्याप मिळालेली नाही , बाकी बरीच पुस्तकं मिळाली आहेत ... बहुतेक आधी वाचलेलीच आहेत .. केशवगढी मधल्या शेवटच्या 3 - 4 कथा फक्त आधी वाचलेल्या नव्हत्या..

धारपांच्या काही कथांमध्ये अपेक्षित शेवट असतो तरीही नि काही शब्द पुनरुक्ती असूनही वाचायला आवडतात. उदा खसखसता आवाज, काचेच्या धाग्यासारखा ताणला गेलेला क्षण, गुळगुळीत सनला इ.. आमच्या घरी बरीच मंडळी धारप फॅन आहेत..

नारायण धारप यांच्या वैज्ञानिक संकल्पनांविषयी …
नारायण धारप यांनी अवकाश, काळ व मिती(प्रतल) यांविषयी त्यांच्या कथेतून भरपूर लिहिले आहे.
अवकाश वक्रता, अनेक मिती, प्रतल, multidimentions. व काळाच्या स्थिर होण्याबद्दल (फ्रीझिंग ऑफ time.)
याबद्दल ते लिहितात. त्यांचा काही विशेष अभ्यास होता का?
जाणकार वाचकांची मते जाणून घ्यायला आवडेल.

मी पण सध्या समर्थांना आव्हान वाचते आहे. कितव्यांदा तरी. त्यातल्या पहिल्या कथेतला काही भाग इतका सीजी करून फिल्म करण्या सारखा आहे. छान हॉरर शॉर्‍ट फिल्म होउ शकेल. इतके पावर्फुल लेखन आहे. ते लेकीला मराठीतून वाचून दाखवताना पण मला समर्थांची थोडी पावर मिळाल्या चा अनुभव आला. हि इज ऑसम्

पडछाया
4.5 स्टार
यात या कथा आहेत:
पडछाया
मुक्ती
तो कोण होता
मन मोहाचे घर
तितु
मोहन किरपेकर
चेटकीण
बळी
चौरस्ता

सर्व कथा पैसे वसूल आहेत.तुंबाड चित्रपटाचे दोनपैकी एक प्रेरणास्थळ म्हणून बळी नक्की वाचा.अंगावर काटा येईल.
मन मोहाचे घर आणि चेटकीण अंगावर शहारा आणतील.ही चेटकीण कथा आणि स्वतंत्र चेटकीण कादंबरी या दोन्ही पूर्ण वेगळ्या आहेत.
अनाहूत आणि मुक्ती डोळ्यात पाणी आणतील.
चौरस्ता आणि मोहन किरपेकर या वेगळ्या स्टाईल च्या कथा आहेत.
शीर्षककथा चांगली आहे पण वाचायला मोठी.

एक स्वगत
किंडल बुक ना अनुक्रमणिका नाहीत.वाचकाला सरप्राईज देणे, किंडल रिडींग लेआऊट मध्ये वाचतात त्यामुळे पान नंबर निरुपयोगी ठरणे हे उद्देश असतील.पण वाचकांनी जुन्या आवृत्ती ची तुलना करून 'अमुक अमुक कथा या पुस्तकात आता का नाहीत' विचारू नये हाही उद्देश कधीकधी जाणवतो.

देवाज्ञा
4.5
सलग कादंबरी आहे.निअर डेथ एक्सपिरियन्स वर आधारित.वेगळी संकल्पना आहे.