देशी ब्राह्मणवादास सीमारेषा सुद्धा अडवू शकत नाहीत काय ?

Submitted by कांदामुळा on 14 July, 2019 - 00:53

मला अशा गोष्टी व्यवस्थित मांडण्याचा अनुभव कमीच आहे. थेटच मुद्द्यावर येतो.

भारतात त्यातही महाराष्ट्रात राहून मला जातीयवाद म्हणजे काय हे जाणवलं नव्हतं. माझ्या दृष्टीने उच्च असणारी माझी जात, खालच्या जातीच्या माणसाला पाहून किंचितसुखावणारा) सुखावणारा माझा अंहं, मला एकंदर जातव्यवस्थेत मी कुठे आहे हे समजू देत नव्हती. त्यातही जरा सत्ता उपभोगणा-या घराण्यात जन्म झाल्याने सगळे कसे रूबाबात चालले होते. त्यामुळे जातीयवादाबाबत बोलणा-यांना मी तुच्छ समजत होतो.

पण कॉलेजच्या प्रवेशाला वडलांनी जात प्रमाणपत्र काढून आणले तेव्हां मी ओबीसी प्रवर्गात मोडत असल्याचे मला समजले. हा माझ्या दृष्टीने धक्काच होता. मागासवर्गीय या शब्दाचा मला अत्यंत तिटकारा होता. पण माझ्या नावाला हा शब्द जोडला गेला. पण थोड्याच दिवसात सर्वच जण बिनदिक्कतपणे जातीचा अर्ज आणतात आणि प्रतिष्ठीत म्हणूनही वावरतात हे सवयीचे झाले. पुन्हा सर्व पूर्ववत झाले.

मध्यंतरी आम्ही मोटरसायकल्स वर राजस्थानात गेलो होतो. तेव्हां मात्र स्व अभिनामाच्या ठिक-या उडाल्या. राजस्थानात ब्राह्मण आणि राजपूत सोडले तर सर्वच जण पिछडा म्हणजे शूद्र समजले जातात. आम्हाला थेटच जात विचारायचे. माझी जात सांगितली की अरे भाई ब्राह्मण हो ? क्षत्रिय हो ? असे विचारले जायचे. या दोन्ही प्रश्नांना नकारार्थी उत्तरे दिली की मग याने शूद्र हो असा प्रश्न यायचा. हा अनुभव जवळपास सर्वच ठिकाणी आला. शूद्रांना पाणी देताना आजही राजस्थानात वेगळे भांडे दिले जाते. आम्ही सांगितले की महाराष्ट्रात आम्हाला खूप मान आहे. आम्ही सवर्ण आहोत. पण ते सांगायचे की आम्ही वर्ण बघतो. जे या दोन वर्णाचे नाहीत ते सर्वच शूद्र म्हणजे पिछडा. एकाने विचारले की ओबीसी मे आते हो का ? मी हो म्हटल्यावर तो हसला. म्हणजे या पुढे मी काय समजावणार ?

त्यांच्या हे सर्व अंगवळणी पडलेले आहे. महाराष्ट्रात इतकी उघड जातव्यवस्था नाही. त्यामुळे मध्यमजातींना ती जाणवत नाही. यामुळे आपण भारी आहोत असे उगीच वाटते. राजस्थानातल्या अनुभवाने डोळे उघडले. नंतर उत्तर प्रदेश बिहारचे मित्र पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी झाले. त्यांनी जातव्यव्स्थेचे जे वर्णन केले त्यामुळे सुन्नच झालो. इथे जातीचा उल्लेख हा अगदी सर्रास आहे. थोडक्यात जे आहे ते आहे. लपवाछपवी नाही.

मी पहिल्यांदा आमच्या महाराष्ट्रात असे नाही हे सांगायला बघायचो. पण त्यांच्याकडून व्यवस्थित चिरफाड झाली. महाराष्ट्रातही पश्चिम महाराष्ट्रात मराठा वर्चस्व आहे तर उर्वरीत महाराष्ट्रात ओबीसी. त्यातही कुणबी वर्चस्व जास्त आहे. ब्राह्मणांचे वर्चस्व प्रशासन आणि पूर्वी बहुराष्ट्रीय कंपन्यात असायचे. आता आयटीत आहे. राष्ट्रीय पक्ष हे बहुत करून ब्राह्मणांचे अंकीत आहेत. माध्यमांमधे ब्राह्मणी वर्चस्व आहे. न्यायव्यवस्थेत ब्राह्मण वर्चस्व आहे.

पण राज्याराज्यात त्या त्या प्रदेशातल्या प्रबळ जातींचे वर्चस्व आहे.
मी आता जेव्हां विचार करतो तेव्हां ज्या समूहांना कुठेच प्रतिनिधित्व नाही, त्यांना आपल्या तक्रारी मांडताना, समस्या मांडताना किती अडचणी येत असतील असा विचार येतो. तरी देखील माझ्या पेक्षा कनिष्ठ समूहांचे प्रश्न मला भिडतात असा माझा दावा नाही. ज्याप्रमाणे मी पुरूष असल्याने माझ्याकडे स्त्री जाणिवा नाहीत किंवा अन्य जेण्डरच्या जाणिवा असणे शक्य नाही त्यामुळे मला त्यांच्या समस्या जाणवणेही शक्य नाही हे सत्य आहे तसेच जातजाणिवांचेही होत असावे.

मात्र मी जेव्हां मला वरीष्ठ समजून या व्यवस्थेचे फायदे उपटत होतो तेव्हां मला कोणतेही दोष तीत दिसत नव्हते. तसेच माझ्यापेक्षा वरीष्ठ जातींचे होत असावे असे मला आता वाटते.

कदाचित या जातजाणिवांमुळे या व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोण भिन्न भिन्न असावा. यातूनच मतभेदांना सुरूवात होत असावी. हे मतभेद अत्यंत टोकाचे आहेत. इतके की त्यामुळे संघर्षाची ठिणगी पडते.

जातीव्यवस्थेचे मला लाभ वाटत होते तोपर्यंत इतरांच्या नुकसानीची मला पर्वा नव्हती. मी त्याकडे डोळेझाक करीत असे. कदाचित त्यावर चर्चाच होऊ नये असे मला वाटत होते. मी फक्त त्यांचे लक्ष लाभांकडे कसे जाईल आणि ते गुणगाण कसे करतील यास सामोपचाराचे धोरण समजत होतो. माझ्या ठसठासणा-या गळूला धक्का लागू नये त्याप्रमाणे मला लाभ पोहोचवणा-या बाबींकडे लक्ष वेधले जाऊ नये ही माझी हास्यास्पद धडपड आता मला मजेशीर वाटते.

या काळात अनेक लोकांशी संपर्क आला. उत्तम श्रोता असल्याने मी ते ऐकत गेलो. वाचत गेलो. मी फुले आंबेडकरी साहीत्य वाचत गेलो. अंतर्बाह्य बदलत गेलो. मी कधीही हिंदुत्ववादी पक्षांचा नव्हतो. मात्र सौम्य हिंदुत्ववादी होतोच. त्यामुळे फारसे काही विशेष वाटत नव्व्हते.

आपण जर देश सोडून गेलो तर आपल्याला या काळ्या वास्तवापासून सुटका मिळेल असे विचार मनात घोळू लागले होते.
मात्र एका मित्राने आपले अनुभव शेअर केले आहेत. त्याने ते फेसबुकवर सुद्धा मांडले. त्याला देशभरात प्रसिद्धी मिळत आहे.

त्याच्या म्हणण्यानुसार तो परदेशात स्थायिक झाला होता. तिथे भारतीयांना पाहून त्याचे देशप्रेम जागृत झाले ( कदाचित आपला माणूस परदेशात भेटणे यामुळे सुरक्षित वाटले असावे). त्याने त्याच्याशी दोस्ती केली. त्याच्यामुळे अनेक भारतियांशी मैत्री झाली. पुढे त्याला अनेक ठिकाणी बोलावले जाऊ लागले. ते ही घरी येत. सण, उत्सव साजरे होते. हे सर्व पंजाबी होते. पंजाबी उत्सवप्रिय असतात. सतत सेलिब्रेशन मूड मधे असतात. हे दिवस आनंदात गेले.

पुढे तो त्याच्या सोशल अकाउंटवरून भारतातल्या जातव्यवस्थेबाबत लिखाण करू लागला. त्याचा अकाउंटला नवीन मंडळी सुद्धा होती. त्यांच्या वाचनात हे सर्व येऊ लागले. त्यांना धक्का बसला. हळू हळू या सर्वांनी त्याच्याशी संपर्क कमी केला. पुढे तर त्याला बोलवणे कमी झाले. अगदी लग्नसमारंभात सुद्धा आमंत्रण देणे टाळले जाऊ लागले. आता तर वाळीतच टाकले आहे.

याने एक दोघांना विचारले देखील. पण त्याला उत्तर मिळाले नाही. त्याला इग्नोर करणे चालूच आहे. पहिल्यांदा जो मित्र भेटला त्याच्या घरी हा गेला असता अनवॉण्टेड गेस्ट सारखी ट्रीटमेंट त्याला मिळाली. नंतर सूचकपणे कुछ भी उटपटांग लिखते हो, देश के खिलाफ कुछ भी बकवास करते हो.. हमे डेकोरम मेण्टेन करना है वगैरे वगैरे त्याने कळवले. त्याला कटवले.

हा मित्र यादव आहे. बाकीची पंजाबी मंडळी उच्चजातीची आहेत.
अलिकडे जातव्यवस्थेच्या वास्तवावर बोलणे हा देशद्रोहद्रोहला जातो. प्रतिष्ठीत चर्चेच्या संकेतस्थळावर या विषयावर लिहीणे अप्रतिष्ठीत समजले जाते. भलतेच मुद्दे काढून मूळ विषयाला फाटे फोडण्याचा प्रयत्न होतो. अथवा दाहकता कमी करण्याचा प्रयत्न होतो. अथवा उच्चजातींकडूनच आम्हालाच द्वेषाची वागणूक मिळते म्हणून आम्ही इकडे आलो असा कांगावा केला जातो.

परदेशात उच्चजातींच्या संस्था आहेत. विवाहसंस्था आहेत.
ते त्यांचे स्वातंत्र्य आहेच म्हणा. पण इकडे आल्याने आता खालच्या जातींकडून जातीयवादाचे टोमणे ऐकायला मिळत नाहीत हे सुख आहे असे एकाने सांगितल्याचे मित्राने नमूद केले आहे.

मी सुद्धा अनेक (रेडीफ सारख्या) स्थळांवर परदेशस्थ भारतियांची शेरेबाजी वाचलेली आहे. अत्यंत द्वेषपूर्ण अशी शेरेबाजी करून अब तुम्हारा सडा हुआ संविधान हमारा कुछ उखाड नही सकता असे सांगितलेले असते.

परदेशात गेल्याने आपल्यावर कारवाई होणार नाही हा विचार कदाचित देशात असताना कायद्याने कारवाई होईल म्हणून समंजस रहायला भाग पाडत असेल का ? मी अशी शेरेबाजी कधी केली नाही. कराविशी वाटली नाही. कदाचित सुख अनुभवले पण किमान खालच्यांना हिणवावे अस्से वाटले नाही हा फरक असेल. लिमिटेड का असेना सेक्युलॅरिझम असावा हा. कशाला काय म्हणतात याच्यात मला जायचे नाही. व्याख्यांमधे मला इंटरेस्ट नाही. मी गावातला माणूस आहे. मला माणसामाणसातला व्यवहार कळतो. त्याला साखरेत लपेटून मांडणे आम्हाला जमत नाही. जे आहे ते रोख ठोक बोलायची सवय आहे.

परदेशात गेल्यावर तरी जातीयवादाला गाडण्याची संधी मिळू शकते. पण तसे होत नाही हे दुर्दैवी आहे.
मराठी लोक असे वागतात का ? उघड वागत नसतील ही खात्री आहे. पण एखाद्याचे विचार कळाल्यानंतर देखील त्याला आपल्यात स्थान मिळते का ? असे म्हणण्याचे कारण म्हणजे देशातून येणा-यात निम्न जातींची आता कुठे सुरूवात आहे. तर वरीष्ठ जाती तिकडे किमान तीन पिढ्यांपासून सेटल झालेल्या आहेत.

त्यांचे जे सांस्कृतिक जग आहे, त्यात वेगळ्या विचाराला स्थान आहे का ?
मी जर उद्या गेलो आणि मी गणपती बसवणार नाही, वर्गणी देणार नाही, मी शिवजयंती करणार, फुले जयंती करणार, शाहू जयंती करणार असे म्हणू लागलो तर माझ्या विचारांचा सन्मान होतो का ? की पंजाब्यांप्रमाणे इथेही वागतात ?
कम्फर्ट लेव्हलप्रमाणे आपल्या संस्कृतीचा मनुष्य आपल्या सर्कलमधे असावा हे स्वाभाविक आहे. मात्र रॅशनलिस्ट्स, पुरोगामी यांच्याकडून थोड्या अपेक्षा असतात. त्या अपेक्षांप्रमाणे ते माझ्याशी वागतील का ?

की परदेशात गेल्यावर थेट आपल्या विचारांचे लोक शोधून मी त्यांच्याशीच मैत्री करावी आणि आपला कम्फर्ट झोन शोधावा ?
(परदेशात जाईन की नाही हे माहीत नाही. मी हा तात्विक प्रश्न विचारला आहे)

कृपया , या लेखाचा उद्देश कुणालाही न दुखावणे हा आहे. मला ज्यावर चर्चा करायची आहे तो विषय समजावून घेऊन चर्चा करावी ही नम्र विनंती. माझे लिखाण प्रक्षोभक, आक्षेपार्ह किंवा खोडसाळ वाटल्यास आपण ते काढू शकता. मात्र जर या ठिकाणी चर्चा झाली तर आनंद होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सनव यांच्याशी सहमत
वर्चस्ववाद हा तितकाच अर्थवाही आणि संज्ञा स्पष्ट करणारा पर्यायी शब्द असतानाही ब्राह्मणवाद हा शब्द वापरण्याचा अट्टाहास समजू शकत नाहीये

कारण हा शब्द वापरणारे सगळेच त्या अर्थाने वापरतील किंवा वाचणारे त्याच अर्थाने घेतील याची खात्री आहे का?
इतके तरल आणि केवळ तार्तिक विचार करणारे किती आहेत?

आता अमेरिकन समाजातही, इंग्रजी भाषेत हा शब्द विशिष्ट जात या पलीकडे जाऊन वापरला जातोय म्हटल्यावर आणखी काही लिहायची गरज नसावी. >> भरत, इथे तो बॉस्टन मधल्या एका गटाबद्दल वापरला जातो. तसा केलेला वापर आणि ब्राह्मणवाद म्हणून केलेला वापर मला दोन्ही पूर्ण वेगळे वाटतात. त्यामुळे तो संदर्भ इथे लागू नाही.

किंबहुना सत्ता कशी राबवावी याचेही नियम ब्राह्मणच बनवीत. >> मी याच घाउकपणाबद्दल बोलतोय. तत्कालीन ब्राह्मण समाज धरला तर त्यातले असे कितीसे या अधिकारपदावर असतील? ४%, ५%? बाकीच्यांचे काय? ब्राह्मण समाज काही हीच कामे फक्त करत नव्हता. शेती पासून ते राज्यातील विविध प्रकारची अकाउण्टिंगची कामे, ते तत्कालीन सैन्यापर्यंत सर्वत्र असणारे ब्राह्मण लोक होते. त्यांचा यात काय सहभाग होता, जो बाकी उच्चजातीय समजल्या जाणार्‍या जातींमधील जनतेचा नव्हता?

वरकरणी नावात ब्राह्मणवाद/ब्राह्मिनिकल वगैरे असले तरी आत लख्खपणे कसे ब्राह्मणांचा द्वेष करणारे असतात ते अशा लेखातून उघडपणे दिसते. लेख लांबलचक आहे, अनेकदा "आखिर कहना क्या चाहते हो" फीलिंग येते, पण लेख खर्‍या खोट्या समजुतींवर आधारित ब्राह्मणद्वेषाने भरलेला आहे हे अगदी स्पष्ट आहे. सनातनी ब्राह्मण वाईटच. पण पुरोगामी ब्राह्मण सुद्धा साळसूद आणि अजेण्डा असलेले. म्हणजे एकूण ब्राह्मण वाइटच. हा नवा अर्थ आहे.

त्यावरून ब्राह्मणवाद शब्द प्रत्यक्ष वापरात डायल्यूट होउन कोठपर्यंत पोहोचला आहे ते लक्षात येइल.

स्वतःला पुरोगामी समजणार्‍या सर्कल्स मधे हा एक पॅटर्न आहे. बहुधा इतर पुरोगामी लोकांचे अ‍ॅप्रूव्हल असावे म्हणून लेखात गरज असो वा नसो एक कशाला तरी "ब्राह्मणी" म्हणून टीका करणे गरजेचे असावे. तेथीलच दुसर्‍या एका लेखातील हे वाक्य पाहा म्हणजे लक्षात येइल.

"मॅडम तूच सांग बरं.. ('तूच सांग' - पारधी महिला भल्याभल्यांना 'आरं -तुरं' 'आगं-तूगं' करतात. त्यांकडे 'आहो- जाहो' घालण्याचं ब्राह्मणी पितृसत्ताक कल्चर अजून पर्यंत तरी फार पोहचलं नाही.)

>>त्यामुळे तो संदर्भ इथे लागू नाही.<<. +१
या चर्चेत "बॉस्टन ब्राह्मिन" हि टर्म आणणं हेच मूळात गैरलागु (टँजंट) आहे. (त्यामुळे त्या शब्दाला धरुन पुढे गेलेली चर्चा हास्यास्पद आहे) हे सो कॉल्ड बॉस्टन ब्राह्मिन्स इलिट गटात मोडायचे/मोडतात. तात्कालिन समाजावर त्यांनी अत्याचार केला, वर्चस्व गाजवलं असा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड नाहि. म्हणजेच ब्राह्मणवाद या शब्दाचा जो अर्थ भारतात अपेक्षित आहे त्याचा दूर-दूरचाहि संबंध "बॉस्टन ब्राह्मिन" या टर्मशी नाहि. संबंध जोडायचाच असेल तर साउथमधल्या प्लँटेशन मालकांशी एकवेळ जोडु शकाल; त्यांनी गुलामांवर केलेल्या अत्याचारांवरुन...

लेख आणि प्रतिसाद वाचताना रोलर कोस्टर मधे बसल्या प्रमाणे झालं. मूळ लेखात लेखकाने मनातली खळबळ मांडली आहे. शेवटी जो प्रश्न विचारला आहे, त्याची उत्तरे सुरूवातीसच मिळून गेली आहेत.

नंतर जी चर्चा चालू आहे तिचा आणि लेखकाच्या मनोगताचा फारसा संबंध नाही. जे ईव्हीएम च्या धाग्यावर सुद्धा आढळले. आता चर्चा चालू आहे ती ब्राह्मणवाद या शब्दाच्या वापरावर. इथेही काही जण ईव्हीएम च्या धाग्यावर ज्याप्रमाणे आक्षेप घेत होते तसेच बेसलेस आरोप करत आहेत असे वाटले. मात्र काही सेन्सिबल प्रतिसादक आहेत.

त्यांचे म्हणणे समजून घ्यायला आवडेल. ते पुरेसे स्पष्ट झालेले नाही.

फारएण्ड या लेखकाचे प्रतिसाद चांगले आहेत. त्यास भरत, हीरा आणि चिनूक्स यांनी जी उत्तरे दिली आहेत अशा प्रकारच्या चर्चा मराठी जगतात अपेक्षित आहेत. आर्टिकल १५ वरच्या लेखिकेचा लेख अर्धवट वाचला. मला यात कुठेही द्वेष आढळला नाही. ब्राह्मणी नेणिवांबाबत लिहीणे हा द्वेष कसा काय होऊ शकतो ?

ज्याला तसे जाणवत असेल त्याने तसे बोलायचे नाही का ? मुळात हा लेख उस्फूर्त आहे असे वाटत नाही. कारण हिंदी आणि इंग्रजीत अशा स्वरूपाचे दोनेक लेख पाहण्यात आहेत, ज्याचे कौतुक खुद्द दिग्दर्शकाने केले आहे. त्याचे म्हणणे की ही चर्चा सुरू व्हावी हा माझ्या सिनेमाचा उद्देश होता. त्याला अशाच प्रकारे दुस-या बाजूने उत्तर आले पाहीजे. थोडक्यात या निमित्ताने घुसळण व्हावी हा दिग्दर्शकाचा हेतू आहे. दिग्दर्शकाच्या हेतूवर संशय घेण्यावर खुद्द दिग्दर्शकालाही आक्षेप नाही.

मात्र त्याने कथेचा नायक ब्राह्मण का या आक्षेपाचे उत्तर दिले आहे. तो म्हणतो त्यामुळे ज्यांना सिनेमा समजायला हवा त्यांना त्या नजरेतून सिनेमा पाहता यावा असे मला वाटते. मला हे उत्तर पटलेले आहे. पण ते पटावे असा खुद्द दिग्दर्शकाचा आग्रह नाही.

ब्राह्मण समाज हाच फक्त हे नियम बनवण्यास पात्र होता. प्रत्यक्ष किती लोक या प्रक्रियेत सामील होते किंवा यासाठी किती लोकांची गरज होती हे दुय्यम नाही का? निर्णयप्रक्रियेत सामील असण्यासाठी ब्राह्मण असण्याची अट/ आवश्यकता होती हे महत्त्वाचे. शेती सार्वत्रिकच होती. दारिद्र्यही सार्वत्रिक होते. सामाजिक अधिकार मात्र वेगवेगळे होते आणि ते उतरंडीच्या स्वरूपात होते. मागची हजारदीडहजार वर्षे वर्णव्यवस्था अधिकाधिक दृढ होत गेली.
मंडल आयोगाने मागासलेपणा ठरवण्याचे अनेक निकष सांगितले आहेत. आर्थिक मागासलेपण हा एकच निकष नाही. समाजामध्ये हीन दर्जा असणे हा प्रमुख निकष आहे. ही हीनता खेडोपाडी चाळीसपन्नास वर्षांपूर्वीपर्यंत तीव्र होती. सध्याच्या शहरवासीयांना त्याची कल्पनाही येणे शक्य नाही. मी पाहिलेली एक दोन उदाहरणे दिली असती. पण ती सर्वज्नात आहेत आणि लेखनविस्तार होईल.
इतिहास स्वीकारून पुढे जाणे हे योग्य. आणि सुदैवाने आज ब्राह्मणांनी निदान महाराष्ट्रात तरी हा मार्ग पत्करला आहे. जागृत बहुजनांत याबद्दल असूया दिसते हे खरे. पण पूर्वकटुता नष्ट होण्यास वेळ लागणारच. मुख्य म्हणजे बहुजनसमाजाने हे नियम स्वीकारले होते,; हे असेच असणार, किंवा ते योग्यच आहे अशीही त्यांची धारणा होती. आता या मानसिकतेतून मुक्त होताना बंडाची ठिणगी उडणारच. सामंजस्य आणि समरसता येण्यास वेळ लागणारच. त्यासाठी काही शतके जावी लागतील. एकदोन पिढ्यांमध्ये होणारे हे काम नाही.

आर्टिकल १५ या सिनेमात काही सत्य घटना आणि कल्पनाविलास यांचा बेमालूम मिलाफ केल्याने प्रेक्षकांपैकी दलित प्रेक्षकवर्ग सिनेमाकडून वेगळ्या अपेक्षा करू लागतो. यातले चंद्रशेखर रावणवर बेतलेले पात्र आहे ते काल्पनिक आहे. हे पात्र बदायूं हत्याकांडाच्या वेळी कुठेही नव्हते. बदायूं हत्याकांडावर हा सिनेमा बेतलेला असला तरी बदायूंची ती कहाणी नाही हे अनेकांना लक्षात येत नाही. मध्येच ऊना प्रकरणाचा ओझरता उल्लेख दिसतो. ऊना गुजरात मधे आहे.

थोडक्यात दिग्दर्शकाला भाष्य करायचे आहे हे कुणीच लक्षात घेत नाही. ब्राह्मण संघटना विरोध करतात तर दलितांना त्यात आझाद आणि वेमुला दिसतो. दिग्दर्शकाला नायक कुठेच नको आहे. अयान रंजन हा नायक नाही. हा एक आपल्याप्रमाणेच अस्वस्थ होणारा प्रेक्षक आहे , ज्याच्या नजरेतून व्यवस्था दाखवली गेली आहे.

अलिकडे हिंदी सिनेमात दलित नायक का नसतो अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. ही आधीपासूनच सुरू झालेली आहे. आर्टिकल १५ आला आणि या चर्चेला खतपाणी मिळालं. थोडक्यात सांगायचे तर ही चर्चा पुढे नेण्यासाठी आर्टिकल १५ चं बळ मिळालं आणि सिनेमाचा बळी गेला. ही कलाकृती त्या चर्चेतून वगळून पहायला हवी होती.

धमसंगिनी रमागोरख या मॅडम निष्क्रीय विचारवंत असल्याने आपले महत्व कसे अधोरेखित होईल याचे दर्शन त्यांच्या लेखातून दिसते. तेच या लेखातही दिसले आहे. मात्र त्याला ब्राह्मणी द्वेष म्हणता येत नाही. ब्राह्मणी द्वेषाची व्याख्या पोकळ आहे असे म्हणावे लागेल. सध्या जे काही घडत आहे त्याचे विश्लेषणच होऊ नये असा कावा ब्राह्मणी द्वेष हा शब्द प्रचलित करण्यामागे असावा.

ब्राह्मणांच्या किती हत्या होतात ? ब्राह्मणांच्या किती हत्या जातीय विद्वेषातून होतात ? किती वेळा अमूक एका देवाची मिरवणूक काढली म्हणून ब्राह्मणांवर हल्ले झाले, घरं दारं जाळली गेली ? खून बलात्कार होऊनही मीडीया गप्प आहे असे किती वेळा घडले ? अशा घटना ज्यांच्या बाबतीत वारंवार घडतात त्यांच्या बाबत उदासीन असणा-यांनी कुणी काय शब्द वापरावेत याचे अधिकारवाणीने जारी केलेले आज्ञापत्र पाहून मौज वाटली.

माफ करा असे टप्प्याटप्प्यात प्रतिसाद दिले. पण प्रत्येक मुद्द्याकडे एकाच प्रतिसादात पाहता येणार नाही.

वर जो दलितांबाबत गंभीर गुन्ह्यांचा उल्लेख केला आहे, त्यामागची भावना वेगवेगळी असू शकेल. पण हे गुन्हे झाल्यानंतरची उदासीनता कशातून येते याचे विश्लेषण अनेकांना अती वाटणे हेच कोषात राहण्याचे निदर्शक आहे. अशा चर्चा नकोशा वाटणे हे ही. दलितांच्या हत्या हे रोजचे रडे झाले आहे. त्याचे उत्तरदायित्व कुणालाही नको असते. यातूनच मग असे गुन्हे खोटेच असतात इथपासून ते दलितच कसे त्यांच्या वागण्यामुळे हे सर्व ओढवून घेतात , तेच कसे जबाबदार असतात अशा चर्चांना ऊत येतो. या चर्चा चालू असतात हे नाकारणार का ?

जिथे दलित नाहीत अशा कितीशा चर्चांमधे दलित अत्याचाराचा उल्लेख निव्वळ सवर्ण करत असतील ?
अरे ये तो होता ही रहता है हा जो सूर आहे तो आर्टिकल १५ ने पकडला आहे. त्यामुळे घुसळण आवश्यक आहे असे सिनेमाकर्त्याला वाटते.

हाच सूर निर्भया हत्याकांड, आरूषी हत्याकांड, जेसिका लाल हत्याकांड याबाबत दिसतो का ? यावर मीडीयाने ज्या पद्धतीने आवाज उठवला, निकाल बदलायला लावले असे किती वेळा दलित हत्याकांडांमधे घडले ?

हा जो फरक आहे, ही जी उदासीनता आहे ती ज्यातून येते त्या मानसिकतेचे नाव ब्राह्मणवाद आहे. माझे आत्ताचे प्रतिसाद आवरते घेत आहे. मात्र ब्राह्मणवादाबाबतचे म्हणणे संपले नाही. पुन्हा केव्हांतरी.
(आर्टिकल १५ च्या उल्लेखाने विषयांतर झाले. हीरा यांचा प्रतिसाद हे प्रतिसाद लिहीत असताना आल्याने नजरेआड झाला.)

पण पूर्वकटुता नष्ट होण्यास वेळ लागणारच. मुख्य म्हणजे बहुजनसमाजाने हे नियम स्वीकारले होते,; हे असेच असणार, किंवा ते योग्यच आहे अशीही त्यांची धारणा होती. आता या मानसिकतेतून मुक्त होताना बंडाची ठिणगी उडणारच. सामंजस्य आणि समरसता येण्यास वेळ लागणारच. त्यासाठी काही शतके जावी लागतील. एकदोन पिढ्यांमध्ये होणारे हे काम नाही.

Bingo !
निरपराधाना द्वेषाचा व हिंसेचा सामना करावा लागणे हे नॅचरल, अपरिहार्य, समर्थनीय व योग्यच आहे. तसंच, यासाठी ते निरपराध लोक व हजारो वर्षपूर्वीचे त्यांचे पूर्वज जबाबदार असून हिंसा करणाऱ्याना दोष देता येत नाही.
मस्त फिलॉसॉफी आहे ही. अभिनंदन!!!

चांगल्या चर्चेत वरच्या कांगावखोर प्रतिसादासारखे प्रतिसाद टा़ळता आले तर खूप बरे होईल. अर्थात हे आवाहन आहे. दुर्लक्ष करणे हाती आहेच.

>>आता या मानसिकतेतून मुक्त होताना बंडाची ठिणगी उडणारच. सामंजस्य आणि समरसता येण्यास वेळ लागणारच.>> तुम्हाला समजतंय तुम्ही काय लिहिताय का उजीलाटा?
बंडाची ठिणगी म्हणजे त्यात होणाऱ्या हिंसेचे ही समर्थन होईलच. आणि त्यात समाजकंटक सामील होऊन आपली पोळी भाजून घ्यायला कशाचाही धरबंध ठेवणार नाहीत. मी माझ्या मुलांना जन्माधारित काहीही दिलं नाही आणि शिकवलं नाही तरी या बहुजन समाजाला (मुद्दाम लिहिलंय... तुमच्या पोस्ट मध्ये आहे म्हणून) माझं उतरंडीत स्थान माहीत असेलच आणि त्यांच्यावर/त्यांच्या आधीच्या पिढ्यांवर झालेला अन्याय ते माझ्या आणि पुढच्या पिढीच्या वचप्यातून वसूल करणार.... two wrongs don't make a right.
समरसता यायला मी माझ्या मुलांचा बळी द्यावा असलं काही लॉजिक असेल तर खड्ड्यात गेली ती समरसता. (हे उद्वेगाने लिहितोय... पण ते खरं आहे)

अच्छा. म्हणजे या आधीच्या कित्येक पिढ्या बळी गेल्या, त्यातून त्यांनी एकाच पिढीत शिकले पाहीजे नाहीतर गेले खड्ड्यात. चांगले चालले आहे. किती बळी गेले याची काही आकडेवारी मिळेल का ? काल्पनिक भीतीने ही उद्विग्नता. पण अजूनही स्वातंत्र्यानंतर घटना घडताहेत तरी त्यांनी बोलूच नये.
थोडक्यात समजूतदारपणा नावालाच आहे. कुणालाही समता नको आहे. समरसतेच्या नावाखाली हिंदूराष्ट्र हवे आहे. समरसता हेच एक ढोंग आहे. या संस्कृतीत समरस होऊन जायचे मात्र आपल्या संस्कृतीचे स्वातंत्र्य मागायचे नाही. बहुजन समाज म्हणून ज्या प्रबळ जाती आज उदयाला आलेल्या आहेत त्यांना लोकशाहीत आपली केंद्रातील सत्ता कायम ठेवावी या उद्देशाने फ्री हॅण्ड दिला गेला. यातले कोणीही शैक्षणिक पार्श्वभूमीचे नसताना महत्वाची पदे दिली आणि वाटेल तशी सत्ता राबवू दिली. याचे परिणाम आहेत. कार्यकारणभाव न पाहताच निष्कर्ष काढण्याकडे आता कल झुकू लागला असल्याने मी रजा घेतो.

जर पुन्हा कुणी वळणावर आणण्याचा प्रयत्न केलाच तर पाहूयात.

संजय पगारे , तुम्ही EVM च्या धाग्याचा उल्लेख करून तिथे बेसलेस आक्षेप घेतले जात आहेत वगैरे तारे तोडलेत, प्रत्यक्षात EVM बाबत तुमची स्वतःची भूमिका गंडलेली आहे व त्या धाग्यावरून तुम्ही पळ काढलात. आता पुन्हा कधी येताय त्या चर्चेत सामील व्हायला?

दोन्ही बाजूचे प्रतिसाद वाचून, वर्चस्ववादाला आता ब्राम्हणवाद न म्हणता वर्चस्ववादच म्हणायला काय हरकत आहे असे मला वाटू लागले आहे. आणि या सारख्याच इतर कुठल्या संज्ञा वापरात असतील तर त्याही बदलायला हव्यात.

कुणीही कितीही निकोप चर्चेचा वगैरे आव आणला तरी या असल्या धाग्यांमधून जातीय तेढ वाढत जाण्यासच मदत होते असे माझे मत झालेले आहे!
ऐकण्याच्या, समजून घेण्याच्या, त्यावर विचार करण्याची क्षमता/इच्छा असलेले आयडी अपवादात्मक असतात..... असो!

ब्राह्मण समाज हाच फक्त हे नियम बनवण्यास पात्र होता. प्रत्यक्ष किती लोक या प्रक्रियेत सामील होते किंवा यासाठी किती लोकांची गरज होती हे दुय्यम नाही का? निर्णयप्रक्रियेत सामील असण्यासाठी ब्राह्मण असण्याची अट/ आवश्यकता होती हे महत्त्वाचे. >>> त्याने काय सिद्ध होते? त्या बाकीच्या ९०% लोकांना का जबाबदार धरायचे, त्यांची जात आणि या प्रक्तियेत सामील असलेल्यांची जात एकच होती म्हणून?

पण पूर्वकटुता नष्ट होण्यास वेळ लागणारच. >>> माझा पॉइण्ट शब्दाच्या वापराबद्दलच्या अट्टाहासाबद्दल आणि घाउक दोषारोपाबद्दल आहे. पण ही पूर्वकटुता असलेली नसलेली नव्याने निर्माण केली जात आहे. सध्या दिसत असलेली कटुता ही नैसर्गिक नाही - ती निखारे घालून घालून फुलवलेली आहे. पिढयनपिढ्या जे लोक पिचले गेले त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्या आंदोलन करणार्‍या फौजा तयार करून आपला राजकीय फायदा पदरात पाडून त्यांना पुन्हा वार्‍यावर सोडण्याकरता ती निर्माण केलेली आहे.

संजय पगारे - तुम्ही दलितांवरच्या अत्याचारांबद्दल, समाजाच्या त्याबद्दलच्या उदासीनतेबद्दल आणि या बाफवरच्या विषयापेक्षा ते कितीतरी पट गंभीर असण्याबद्दल जे लिहीले आहे त्याबद्दल असहमती असण्याचे काहीच कारण नाही. ही इथली चर्चा गेली काही पाने ब्राह्मणवाद व एकूणच ब्राह्मणांना घाउकपणे दोष देणे याबद्दल होती - माझी मते केवळ त्यासंदर्भात आहेत.

<< दोन्ही बाजूचे प्रतिसाद वाचून, वर्चस्ववादाला आता ब्राम्हणवाद न म्हणता वर्चस्ववादच म्हणायला काय हरकत आहे असे मला वाटू लागले आहे. >>

--------- ब्राह्मणांच्या वर्चस्वाचा काळ हा केवळ २ - ४ पिढ्या नाही (हजारो वर्षांचा आहे) त्यामुळे वर्चस्वासाठी जात वाचक शब्दाची जोड मिळाली. आणि समाज मनावर घट्ट कोरलेल्या (जातीयवादाच्या) जखमा बुझायला काही अवधी लागेलच. आजही आपण या खोट्या वर्चस्वाच्या मानसिकते मधुन पुर्णपणे बाहेर आलेलो नाही आहे.

येथेच मायबोलीवर, "गावाबाहेर उकिरडा.... तुमच्यासाठी वेगळा बा फ काढून दिलेला आहे... तिथे लोळा... " अशा अर्थाचे वाचले होते. समाजाच्या विशिष्ट घटकाला गावाबाहेर रहाण्याची खास सोय केलेली असायची आणि त्या आठवणी क्लेशदायक आहेत पण आज त्याची आठवाण कशासाठी ?
त्या आय डीच्या असल्या खिजवण्याला किती लोकांनी आक्षेप घेतला होता?
किती लोकांनी त्या विकृतीला "खिक" म्हणुन प्रतिसाद दिला होता?

पण ही पूर्वकटुता असलेली नसलेली नव्याने निर्माण केली जात आहे. सध्या दिसत असलेली कटुता ही नैसर्गिक नाही - ती निखारे घालून घालून फुलवलेली आहे.> नेहमी तसेच असेल असे नाही. कित्येक वेळा ती स्वानुभवातुन देखील निर्माण होते.
एक अनुभव इथे सांगते. आम्ही केसरीबरोबर एका टुरला गेलो होतो. एकुण १६ / १७ कुटुंबे होती.वातावरण खेळीमेलीचे होते. मजा मस्ती चालु होती.मुख्य म्हणजे सगळेचजण वेगवेगळ्या जातीचे धर्माचे असुनदेखील उच्च विद्याविभुषित होते. अशात एकदा सगळे एका सकळी न्याहरी करत असताना एका बापट काकुंनी ( नाव बदलेले आहे) आमच्यात, आपल्यात (हे एका जोशी काकुंकडे बघुन )नाव बदलेले आहे) ) अशी गोष्ट सुरु केली.
आधी असलेले खेळीमेळीचे वातावरणच बदलुन गेले. खुद्द जोशी काकुंनादेखील ते आवडले नाही. ती गोष्ट आपल्यातच कशी स्वच्छता असते, बाकी सगळे कसे अस्वच्छ असतात अशा अर्थाची होती.
असे प्रसंग वेळोवेळी घडत असतात. त्यात्यनाही कटुता निर्मान होते.

फारएण्ड >> ओके समजले. पण बाहेरच्या व्यक्तीला हे समजणे शक्य नाही. तसेही एका धाग्यापुरता असा निष्कर्ष काढण्याऐवजी एकूणच काढलेला बरा नाही का ?

उदय आपण सरसकट वर्चस्ववादाला ब्राम्हणवाद म्हणावे की नाही याबद्दल चर्चा करत आहोत असे गृहीत धरले आहे.
जर कुणी मी ब्राम्हण म्हणुन मी श्रेष्ठ समजत त्याच मानसिकतेत वागत, वावरत असेल तर त्याला ब्राह्मणवादीच म्हणावे लागेल.

सध्या दिसत असलेली कटुता ही नैसर्गिक नाही - ती निखारे घालून घालून फुलवलेली आहे. पिढयनपिढ्या जे लोक पिचले गेले त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्या आंदोलन करणार्‍या फौजा तयार करून आपला राजकीय फायदा पदरात पाडून त्यांना पुन्हा वार्‍यावर सोडण्याकरता ती निर्माण केलेली आहे.>>>>>>

पूर्णपणे सहमत.

ज्यांच्यावर पिढ्यानपिढ्या अन्याय झाला, त्यांच्या आजच्या नेत्यांनी त्यांना आजही तिथेच खितपत ठेवले आहे. त्यांना शहाणे केले तर यांचे नेतेपद झिडकारले जाईल ही भीती असावी.

'बंड' हा शब्द वापरताना सशस्त्र/ हिंसात्मक चळवळ अभिप्रेत नव्हती. 'विद्रोह' (dissent) हा जड शब्द नको म्हणून बंड हा शब्द वापरला. अधिकारांची चौकट मोडण्याची इच्छा किंवा तसा प्रयत्न हा अर्थ. तसेही ' मन बंड करून उठले' यासारखी वाक्ये सररास वापरली जातात मराठीमध्ये सामान्य अर्थाने.
'उजीलाटा' आणि काय लिहिताय ते कळतंय का तुम्हांला ' हे जरा अतिच वाटलं. ('अधिक हिंसक' असे विनोदाने लिहावेसे वाटतेय)

भारतात काही विनोद लोकप्रिय आहेत.
कायदा सर्वांसाठी समान आहे.
जात पात मानू नका मात्र आरक्षण जातीवरच मिळेल.
शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एकही निरपराध्याला शिक्षा झाली नाही पाहिजे.

>> त्या बाकीच्या ९०% लोकांना का जबाबदार धरायचे,
>> सध्या दिसत असलेली कटुता ही नैसर्गिक नाही
>> त्यांच्या आजच्या नेत्यांनी त्यांना आजही तिथेच खितपत ठेवले आहे.

जन्माधारित जातव्यवस्था वाईट हे (निदान चारचौघात) सगळेच मान्य करतात. पण अशी सामाजिक व्यवस्था निर्माण आणि मजबुत होण्यात आपल्या पुर्वजांचा सहभाग होता हे कटु वास्तव सध्याचे ब्राह्मण अंगावर पडलेल्या पालीसारखं झटकुन टाकताहेत असं जाणवतंय. सनव यांनी दुसर्‍या धाग्यात "जातीव्यवस्था मनुने प्रस्थापित केली आणि मनु क्षत्रिय होता, तसेही राजे क्षत्रिय असल्याने प्रस्थापित व्यवस्थेची जबाबदारी क्षत्रियांची आहे" असा युक्तिवाद केला आहे.

>> समरसता यायला मी माझ्या मुलांचा बळी द्यावा असलं काही लॉजिक असेल तर खड्ड्यात गेली ती समरसता.
हे स्ट्रॉमॅन आर्ग्युमेंट सनव यांनी केलं असतं तर समजु शकलो असतो. अमितव यांनी असा काल्पनिक बागुलबुवा उभा करावा याचं सखेद आश्चर्य वाटलं

माझ्या वैयक्तिक पातळीवर मी कसं वागायचा प्रयत्न करतो ते सांगतो. दुसर्‍या कोणी तसंच वागावं हा अजिबात आग्रह नाही
* माझ्या सध्याच्या सुस्थितीला माझी उच्च जात, थोडी फार का होईना, कारणीभुत आहे याची कायम जाणीव असते
* तळागाळात खितपत पडलेल्या खालच्या जातीच्या लोकांच्या हालपेष्टांना जी अनेक कारणे आहेत त्यातील एक कारण माझ्या पुर्वजांनी केलेला अन्याय आहे याची मला जाणीव आहे. किंबहुना मला या वास्तवाची लाज वाटते
* मला आणि माझ्या मुलांना अडचणीचे असुनही मी जात्याधारीत आरक्षणाचे समर्थन करतो कारण मला त्यामागची मिमांसा पटलेली आहे. (मी स्वतः सुद्धा इंजिनीअरींगच्या अ‍ॅडमिशनच्या वेळी रडलो होतो, पण आता प्रगल्भ झाल्यावर माझे विचार बदललेत)
* आरक्षण हा गरीबी हटाओ उपक्रम नाही याची मला जाणीव आहे. म्हणुन मी उत्पन्नावर आधारीत आरक्षणाची मागणी करत नाही.
* सध्याच्या जात्याधारीत आरक्षणामध्ये काही सुधारणा (क्रिमी लेयर, २ पिढ्यांनी फायदा घेतल्यावर तिसर्‍या पिढील आरक्षण नाही इ.) शक्य असल्या तरी त्याच्या इम्प्लिमेंटशन मध्ये येउ शकणार्‍या अडचणींची मला जाणीव आहे. त्याबाबत मी खुप आग्रही नाही.
* मी स्वतः जात मानत नसल्याने "माझी जात" असा अभिमान नाहीच आहे. तरीही माझ्या आडनावावरुन लोक जेव्हा माझी उच्च जात ओळखतात तेव्हा स्वजाती(?) पासुन लांब रहायचा माझा प्रयत्न असतो.
* मला कनिष्ठ जातींकडुन नेहमीच्या व्यवहारात कडवटपणा फारसा जाणवलेला नाही. अर्थात हा माझ्या दृष्टीकोनाचा परीणाम असु शकतो. उदाहरणार्थ आर्टिकल १५ वरच्या परिक्षणात मला लख्ख द्वेष जाणवला नाही.

Pages