मला अशा गोष्टी व्यवस्थित मांडण्याचा अनुभव कमीच आहे. थेटच मुद्द्यावर येतो.
भारतात त्यातही महाराष्ट्रात राहून मला जातीयवाद म्हणजे काय हे जाणवलं नव्हतं. माझ्या दृष्टीने उच्च असणारी माझी जात, खालच्या जातीच्या माणसाला पाहून किंचितसुखावणारा) सुखावणारा माझा अंहं, मला एकंदर जातव्यवस्थेत मी कुठे आहे हे समजू देत नव्हती. त्यातही जरा सत्ता उपभोगणा-या घराण्यात जन्म झाल्याने सगळे कसे रूबाबात चालले होते. त्यामुळे जातीयवादाबाबत बोलणा-यांना मी तुच्छ समजत होतो.
पण कॉलेजच्या प्रवेशाला वडलांनी जात प्रमाणपत्र काढून आणले तेव्हां मी ओबीसी प्रवर्गात मोडत असल्याचे मला समजले. हा माझ्या दृष्टीने धक्काच होता. मागासवर्गीय या शब्दाचा मला अत्यंत तिटकारा होता. पण माझ्या नावाला हा शब्द जोडला गेला. पण थोड्याच दिवसात सर्वच जण बिनदिक्कतपणे जातीचा अर्ज आणतात आणि प्रतिष्ठीत म्हणूनही वावरतात हे सवयीचे झाले. पुन्हा सर्व पूर्ववत झाले.
मध्यंतरी आम्ही मोटरसायकल्स वर राजस्थानात गेलो होतो. तेव्हां मात्र स्व अभिनामाच्या ठिक-या उडाल्या. राजस्थानात ब्राह्मण आणि राजपूत सोडले तर सर्वच जण पिछडा म्हणजे शूद्र समजले जातात. आम्हाला थेटच जात विचारायचे. माझी जात सांगितली की अरे भाई ब्राह्मण हो ? क्षत्रिय हो ? असे विचारले जायचे. या दोन्ही प्रश्नांना नकारार्थी उत्तरे दिली की मग याने शूद्र हो असा प्रश्न यायचा. हा अनुभव जवळपास सर्वच ठिकाणी आला. शूद्रांना पाणी देताना आजही राजस्थानात वेगळे भांडे दिले जाते. आम्ही सांगितले की महाराष्ट्रात आम्हाला खूप मान आहे. आम्ही सवर्ण आहोत. पण ते सांगायचे की आम्ही वर्ण बघतो. जे या दोन वर्णाचे नाहीत ते सर्वच शूद्र म्हणजे पिछडा. एकाने विचारले की ओबीसी मे आते हो का ? मी हो म्हटल्यावर तो हसला. म्हणजे या पुढे मी काय समजावणार ?
त्यांच्या हे सर्व अंगवळणी पडलेले आहे. महाराष्ट्रात इतकी उघड जातव्यवस्था नाही. त्यामुळे मध्यमजातींना ती जाणवत नाही. यामुळे आपण भारी आहोत असे उगीच वाटते. राजस्थानातल्या अनुभवाने डोळे उघडले. नंतर उत्तर प्रदेश बिहारचे मित्र पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी झाले. त्यांनी जातव्यव्स्थेचे जे वर्णन केले त्यामुळे सुन्नच झालो. इथे जातीचा उल्लेख हा अगदी सर्रास आहे. थोडक्यात जे आहे ते आहे. लपवाछपवी नाही.
मी पहिल्यांदा आमच्या महाराष्ट्रात असे नाही हे सांगायला बघायचो. पण त्यांच्याकडून व्यवस्थित चिरफाड झाली. महाराष्ट्रातही पश्चिम महाराष्ट्रात मराठा वर्चस्व आहे तर उर्वरीत महाराष्ट्रात ओबीसी. त्यातही कुणबी वर्चस्व जास्त आहे. ब्राह्मणांचे वर्चस्व प्रशासन आणि पूर्वी बहुराष्ट्रीय कंपन्यात असायचे. आता आयटीत आहे. राष्ट्रीय पक्ष हे बहुत करून ब्राह्मणांचे अंकीत आहेत. माध्यमांमधे ब्राह्मणी वर्चस्व आहे. न्यायव्यवस्थेत ब्राह्मण वर्चस्व आहे.
पण राज्याराज्यात त्या त्या प्रदेशातल्या प्रबळ जातींचे वर्चस्व आहे.
मी आता जेव्हां विचार करतो तेव्हां ज्या समूहांना कुठेच प्रतिनिधित्व नाही, त्यांना आपल्या तक्रारी मांडताना, समस्या मांडताना किती अडचणी येत असतील असा विचार येतो. तरी देखील माझ्या पेक्षा कनिष्ठ समूहांचे प्रश्न मला भिडतात असा माझा दावा नाही. ज्याप्रमाणे मी पुरूष असल्याने माझ्याकडे स्त्री जाणिवा नाहीत किंवा अन्य जेण्डरच्या जाणिवा असणे शक्य नाही त्यामुळे मला त्यांच्या समस्या जाणवणेही शक्य नाही हे सत्य आहे तसेच जातजाणिवांचेही होत असावे.
मात्र मी जेव्हां मला वरीष्ठ समजून या व्यवस्थेचे फायदे उपटत होतो तेव्हां मला कोणतेही दोष तीत दिसत नव्हते. तसेच माझ्यापेक्षा वरीष्ठ जातींचे होत असावे असे मला आता वाटते.
कदाचित या जातजाणिवांमुळे या व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोण भिन्न भिन्न असावा. यातूनच मतभेदांना सुरूवात होत असावी. हे मतभेद अत्यंत टोकाचे आहेत. इतके की त्यामुळे संघर्षाची ठिणगी पडते.
जातीव्यवस्थेचे मला लाभ वाटत होते तोपर्यंत इतरांच्या नुकसानीची मला पर्वा नव्हती. मी त्याकडे डोळेझाक करीत असे. कदाचित त्यावर चर्चाच होऊ नये असे मला वाटत होते. मी फक्त त्यांचे लक्ष लाभांकडे कसे जाईल आणि ते गुणगाण कसे करतील यास सामोपचाराचे धोरण समजत होतो. माझ्या ठसठासणा-या गळूला धक्का लागू नये त्याप्रमाणे मला लाभ पोहोचवणा-या बाबींकडे लक्ष वेधले जाऊ नये ही माझी हास्यास्पद धडपड आता मला मजेशीर वाटते.
या काळात अनेक लोकांशी संपर्क आला. उत्तम श्रोता असल्याने मी ते ऐकत गेलो. वाचत गेलो. मी फुले आंबेडकरी साहीत्य वाचत गेलो. अंतर्बाह्य बदलत गेलो. मी कधीही हिंदुत्ववादी पक्षांचा नव्हतो. मात्र सौम्य हिंदुत्ववादी होतोच. त्यामुळे फारसे काही विशेष वाटत नव्व्हते.
आपण जर देश सोडून गेलो तर आपल्याला या काळ्या वास्तवापासून सुटका मिळेल असे विचार मनात घोळू लागले होते.
मात्र एका मित्राने आपले अनुभव शेअर केले आहेत. त्याने ते फेसबुकवर सुद्धा मांडले. त्याला देशभरात प्रसिद्धी मिळत आहे.
त्याच्या म्हणण्यानुसार तो परदेशात स्थायिक झाला होता. तिथे भारतीयांना पाहून त्याचे देशप्रेम जागृत झाले ( कदाचित आपला माणूस परदेशात भेटणे यामुळे सुरक्षित वाटले असावे). त्याने त्याच्याशी दोस्ती केली. त्याच्यामुळे अनेक भारतियांशी मैत्री झाली. पुढे त्याला अनेक ठिकाणी बोलावले जाऊ लागले. ते ही घरी येत. सण, उत्सव साजरे होते. हे सर्व पंजाबी होते. पंजाबी उत्सवप्रिय असतात. सतत सेलिब्रेशन मूड मधे असतात. हे दिवस आनंदात गेले.
पुढे तो त्याच्या सोशल अकाउंटवरून भारतातल्या जातव्यवस्थेबाबत लिखाण करू लागला. त्याचा अकाउंटला नवीन मंडळी सुद्धा होती. त्यांच्या वाचनात हे सर्व येऊ लागले. त्यांना धक्का बसला. हळू हळू या सर्वांनी त्याच्याशी संपर्क कमी केला. पुढे तर त्याला बोलवणे कमी झाले. अगदी लग्नसमारंभात सुद्धा आमंत्रण देणे टाळले जाऊ लागले. आता तर वाळीतच टाकले आहे.
याने एक दोघांना विचारले देखील. पण त्याला उत्तर मिळाले नाही. त्याला इग्नोर करणे चालूच आहे. पहिल्यांदा जो मित्र भेटला त्याच्या घरी हा गेला असता अनवॉण्टेड गेस्ट सारखी ट्रीटमेंट त्याला मिळाली. नंतर सूचकपणे कुछ भी उटपटांग लिखते हो, देश के खिलाफ कुछ भी बकवास करते हो.. हमे डेकोरम मेण्टेन करना है वगैरे वगैरे त्याने कळवले. त्याला कटवले.
हा मित्र यादव आहे. बाकीची पंजाबी मंडळी उच्चजातीची आहेत.
अलिकडे जातव्यवस्थेच्या वास्तवावर बोलणे हा देशद्रोहद्रोहला जातो. प्रतिष्ठीत चर्चेच्या संकेतस्थळावर या विषयावर लिहीणे अप्रतिष्ठीत समजले जाते. भलतेच मुद्दे काढून मूळ विषयाला फाटे फोडण्याचा प्रयत्न होतो. अथवा दाहकता कमी करण्याचा प्रयत्न होतो. अथवा उच्चजातींकडूनच आम्हालाच द्वेषाची वागणूक मिळते म्हणून आम्ही इकडे आलो असा कांगावा केला जातो.
परदेशात उच्चजातींच्या संस्था आहेत. विवाहसंस्था आहेत.
ते त्यांचे स्वातंत्र्य आहेच म्हणा. पण इकडे आल्याने आता खालच्या जातींकडून जातीयवादाचे टोमणे ऐकायला मिळत नाहीत हे सुख आहे असे एकाने सांगितल्याचे मित्राने नमूद केले आहे.
मी सुद्धा अनेक (रेडीफ सारख्या) स्थळांवर परदेशस्थ भारतियांची शेरेबाजी वाचलेली आहे. अत्यंत द्वेषपूर्ण अशी शेरेबाजी करून अब तुम्हारा सडा हुआ संविधान हमारा कुछ उखाड नही सकता असे सांगितलेले असते.
परदेशात गेल्याने आपल्यावर कारवाई होणार नाही हा विचार कदाचित देशात असताना कायद्याने कारवाई होईल म्हणून समंजस रहायला भाग पाडत असेल का ? मी अशी शेरेबाजी कधी केली नाही. कराविशी वाटली नाही. कदाचित सुख अनुभवले पण किमान खालच्यांना हिणवावे अस्से वाटले नाही हा फरक असेल. लिमिटेड का असेना सेक्युलॅरिझम असावा हा. कशाला काय म्हणतात याच्यात मला जायचे नाही. व्याख्यांमधे मला इंटरेस्ट नाही. मी गावातला माणूस आहे. मला माणसामाणसातला व्यवहार कळतो. त्याला साखरेत लपेटून मांडणे आम्हाला जमत नाही. जे आहे ते रोख ठोक बोलायची सवय आहे.
परदेशात गेल्यावर तरी जातीयवादाला गाडण्याची संधी मिळू शकते. पण तसे होत नाही हे दुर्दैवी आहे.
मराठी लोक असे वागतात का ? उघड वागत नसतील ही खात्री आहे. पण एखाद्याचे विचार कळाल्यानंतर देखील त्याला आपल्यात स्थान मिळते का ? असे म्हणण्याचे कारण म्हणजे देशातून येणा-यात निम्न जातींची आता कुठे सुरूवात आहे. तर वरीष्ठ जाती तिकडे किमान तीन पिढ्यांपासून सेटल झालेल्या आहेत.
त्यांचे जे सांस्कृतिक जग आहे, त्यात वेगळ्या विचाराला स्थान आहे का ?
मी जर उद्या गेलो आणि मी गणपती बसवणार नाही, वर्गणी देणार नाही, मी शिवजयंती करणार, फुले जयंती करणार, शाहू जयंती करणार असे म्हणू लागलो तर माझ्या विचारांचा सन्मान होतो का ? की पंजाब्यांप्रमाणे इथेही वागतात ?
कम्फर्ट लेव्हलप्रमाणे आपल्या संस्कृतीचा मनुष्य आपल्या सर्कलमधे असावा हे स्वाभाविक आहे. मात्र रॅशनलिस्ट्स, पुरोगामी यांच्याकडून थोड्या अपेक्षा असतात. त्या अपेक्षांप्रमाणे ते माझ्याशी वागतील का ?
की परदेशात गेल्यावर थेट आपल्या विचारांचे लोक शोधून मी त्यांच्याशीच मैत्री करावी आणि आपला कम्फर्ट झोन शोधावा ?
(परदेशात जाईन की नाही हे माहीत नाही. मी हा तात्विक प्रश्न विचारला आहे)
कृपया , या लेखाचा उद्देश कुणालाही न दुखावणे हा आहे. मला ज्यावर चर्चा करायची आहे तो विषय समजावून घेऊन चर्चा करावी ही नम्र विनंती. माझे लिखाण प्रक्षोभक, आक्षेपार्ह किंवा खोडसाळ वाटल्यास आपण ते काढू शकता. मात्र जर या ठिकाणी चर्चा झाली तर आनंद होईल.
ते तिघे ब्राह्मण म्हणाले ,
ते तिघे ब्राह्मण म्हणाले , "आम्हाला दहा महीने द्या. या दहा महीन्यांमधे या घोड्यांना चांगले अन्न, औषधे देऊन सुदृढ बनवून रेस मधे पळण्यासाठी आम्ही तयार करू . मग हवं तर महाराजांनी रेस लावावी "
महाराज म्हणाले "म्हणजे तुम्ही घोड्यांना आरक्षण द्यायला तयार आहात, पण माणसाच्या बाबतीत तुम्हाला ही गोष्ट लक्षात येत नाही ?">>>>>
गोष्टीतल्या ब्राह्मणांनी फक्त 10 महिने मागितले होते. 10 महिन्यात त्यांनी ते घोडे इतर सशक्त घोड्यांसारखे तयार केले असते. हे घोडे रेसमध्ये धावून कदाचित पहिले आलेही असते. रेस संपल्यावर काय? लगेच ते घोडे परत पहिल्यासारखे मरतुकडे झाले असते की दहा महिन्याच्या काळात मिळालेल्या विशेष खुराकामुळे इतर सामान्य घोड्यांइतपत सामान्य झाले असते?
त्यांना मग त्या विशिष्ट खुराकाची गरज राहिली नसती? आणि नंतर त्यांच्या मुलांचे काय? विशिष्ट खुराक खाऊन तगड्या झालेल्या घोड्यांनी संतती मात्र ती तशीच आधीसारखी मरतुकडी पैदा केली असती की त्यांची संतती ही इतर घोड्यांसारखी सामान्य, शर्यतीत उतरण्याजोगी झाली असती? की त्या घोड्यांच्या मालकांनी हा विशिष्ट खुराक त्या घोड्यांच्या भविष्यातल्या अगणित पिढ्यांना अगणित वर्षे मिळतच रहावा ही मागणी केली असती?
असो. आंबेडकरांनी आरक्षण 10 वर्षेच दिले जावे असे नमूद केले होते असे वाचलेय.
बाकी सगळ्या बाबतीत आंबेडकरांना द्रष्टा वगैरे मानणारे लोक त्यांना 10 वर्षेच का पुरेशी वाटली किंवा 10 वर्षे पुरेशी आहेत असे वाटण्याची चूक त्यांनी का केली याबद्दल कधी बोलताना दिसत नाही.
असो. मूळ विषय काय प्रचंड भरकटलाय. सध्या राजकारणाचे सगळे धागे थंड पडल्यामुळे असे धागे धुगधुगी देताहेत लोकांना. तेच ते लोक त्याच त्या शिळ्या कढ्यांना ऊत आणताहेत...

सो. आंबेडकरांनी आरक्षण 10
सो. आंबेडकरांनी आरक्षण 10 वर्षेच दिले जावे असे नमूद केले होते असे वाचलेय. >>> संदर्भ द्या. संघाचे नकोत. बाबासाहेबांनी असे कुठे म्हटले याचे मुळातून संदर्भ द्या.
गोष्टीतल्या ब्राह्मणांनी फक्त
गोष्टीतल्या ब्राह्मणांनी फक्त 10 महिने मागितले होते. 10 महिन्यात त्यांनी ते घोडे इतर सशक्त घोड्यांसारखे तयार केले असते. हे घोडे रेसमध्ये धावून कदाचित पहिले आलेही असते. रेस संपल्यावर काय? लगेच ते घोडे परत पहिल्यासारखे मरतुकडे झाले असते की दहा महिन्याच्या काळात मिळालेल्या विशेष खुराकामुळे इतर सामान्य घोड्यांइतपत सामान्य झाले असते? >>>> याला कीस पाडणे किंवा वितंडवाद असे नाव आहे. रूपक, दार्शनिक संकल्पना समजण्यासाठी असते. घोड्यांच्या शर्यतीतून समता हे तत्त्व समजण्यासाठी ही गोष्ट आहे. पुढचा कल्पनाविलास हा हास्यास्पद आहे. धन्यवाद .
तेच ते लोक त्याच त्या शिळ्या
तेच ते लोक त्याच त्या शिळ्या कढ्यांना ऊत आणताहेत... >>> मला वाटते घाटपांडे साहेबांनी या लिंक्स इथे आणून दिल्या आहेत. त्यांना आक्षेप घ्यावा ही विनंती. तसा आक्षेप घेतला गेला नसल्याने चर्चा झाली.
हिंदू धर्मातील प्रथांवर
हिंदू धर्मातील प्रथांवर पोटतिडकीने बोलणारे इतर धर्मांचा विषय आला की लकवा मारल्यासारखे गार पडतात. तीन तलाकविषयी एवढी चर्चा संसदेत, वृत्तपत्रांतून सुरू आहे पण इथे कुणी शब्दाने तो विषय काढला नाही.
साधना जी एकच नंबर बोललात. दंडवत घ्यावा व काही स्वगतांना इग्नोर मारावा ही विनंती.
मरतुकड्या घोड्यांना चांगला
मरतुकड्या घोड्यांना चांगला खुराक मिळतोय हे पाहून चांगले घोडे थोडे दिवस चारा खायचे बंद करून मरतुकडे बनायचे व मरतुकड्या घोड्यांना मिळणारा विशेष आहार मिळावा यासाठी झटू लागले. जे चरायला जाऊन पोट भरत होते ते मुद्दाम मरतुकडे बनून पौष्टिक आहार मागू लागले.
संजय पगारे साहेब, तुमच्या
संजय पगारे साहेब, तुमच्या पोस्ट्स वाचल्या. आवडल्या आणि पटल्या.
आपल्यासारखी स्पष्टता येण्यासाठी काय वाचन करावे हे कृपया मला संपर्कातून कळवावे ही विनंती.
मेश्राम म्हणाले, ब्राह्मणी
मेश्राम म्हणाले, ब्राह्मणी व्यवस्थेने आपल्याला भिन्न जातींमध्ये विभागले आहे. आता इव्हीएम मशीनमधून आपल्या मतदानाची चोरी केली जात आहे. संविधान आणि लोकशाही संपविण्यासाठी इव्हीएमचा वापर होत आहे. त्यामुळे इव्हीएमला नष्ट करणे गरजेचे आहे. मतपत्रिकेची मागणी करताना इव्हीएमचे सत्य सांगितले पाहिजे. इव्हीएम असेल तर, पारदर्शक निवडणूक होऊ शकत नाही. ती मागास टेक्नोलॉजी आहे. याविरोधात आंदोलन, जनजागृती करण्याची गरज आहे. भाजप सरकार संसदेत बहुमतात आहेत, पण लोकांमध्ये अल्पमतात आहेत. त्यांनी लोकांच्या मतांवर दरोडा घातला आहे. मॉब लिचिंग प्रकरणे घडवून आणून देशातील सदस्यांवरील लोकांचे लक्ष हटवले जात आहे.
शेट्टी म्हणाले, ''आपण एकाच
शेट्टी म्हणाले, ''आपण एकाच दिशेने जाणारे प्रवासी आहोत, सर्वांनी एकमेकांशी मदत केली पाहिजे अन्यथा पेशवाईची गिधाडे झडप घालण्यासाठी फिरत आहेत. 'इगो' बाजूला ठेवा महाराष्ट्रातील जनतेला, शेतकऱ्याला सन्मानने जगायचे असले तर या गिधाडां विरोधात लढले पाहिजे. माणसा माणसात, धर्मा धर्मात, जातींमध्ये भांडणे लावून देणारे लोक महाराष्ट्रात आले आहेत. यांच्या पेक्षा इंग्रज परवडले. ही विचाराची लढाई असल्याने एकत्र आले पाहिजे.'' ''राज्यातील प्रस्थापित राजकारणी मंडळींना या परिस्थितीचे काही देणे घेणे नाही. ते सत्तेचा लाभ घेण्यासाठी भाजप शिवसेनेत जात आहेत. त्यामुळे हे बुडणारे जहाज वाचविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. केंद्राच्या व राज्याच्या शेतकऱ्यांसाठीच्या योजना या दलाल व मुठभर लोकांना फायदा मिळवून देणाऱ्या आहेत. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्र उध्वस्त होत आहे. पंतप्रधान फसल योजना ही प्रधानमंत्री कार्पोरेट कल्याण योजना आहे. शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था पहाता या वीमा कंपन्या कंगाल झाल्या पाहिजे होत्या. पण त्यांना हजारो कोटीचा फायदा झाला पाहिजे,'' अशी टीका शेट्टी यांनी केली.
पुणे : ''महाराष्ट्रातील
पुणे : ''महाराष्ट्रातील जनतेला, शेतकऱ्यांना सन्मानाने वागवायचे असेल तर आपल्याला एकत्र आले पाहिजे, अन्यथा आपल्यावर झडप घालण्यासाठी पेशवाईची गिधाडे घिरट्या घालत आहेत,'' अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी भाजप-शिवसेनेवर टीका केली.
याला कीस पाडणे किंवा वितंडवाद
याला कीस पाडणे किंवा वितंडवाद असे नाव आहे. रूपक, दार्शनिक संकल्पना समजण्यासाठी असते. >>>>>> अरेच्चा, पगारे हे बरोबर नाही. तुम्ही रूपक वापरलं, पण तेच रूपक पुढे वापरून साधनाताईंनी पुढचे प्रश्न विचारले तर ते किस पाडणं कसं? अगदीच तार्किक आशेत ते. तुमच्या पोस्ट्स चांगल्या आहेत, काही मुद्दे पटताहेत आणि काही प्रश्न परत विचार करायला लावताहेत. फारेन्ड, सनव नाव पटकन आठवली, पण दोन्ही बाजूच्या बऱ्याच जणांचे मुद्दे चांगले आहेत. इतर बऱ्याच धाग्यांसारखी चर्चा भरकटली नाही आणि संयमित भाषेत मुद्दे मांडले जाताहेत हे आवडलं. वाचते आहे.
ब्राह्मणद्वेषाचा असा चष्मा
ब्राह्मणद्वेषाचा असा चष्मा लावलेल्या लोकांकडुन काय अपेक्षा करणार? यांना खुर्चीची ओढ नाही तर जनतेचा कळवळा आहे.? मा. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वच्छ, पारदर्शक कारभाराला विरोध करू शकत नसल्याने पेशवाई शब्द वापरून खालच्या दर्जाची टीका करणे हेच यांचे जिवित कार्य बनलं आहे.
I am a male but don’t find
I am a male but don’t find the term male chauvinism is offensive
तेच ते लोक त्याच त्या शिळ्या
तेच ते लोक त्याच त्या शिळ्या कढ्यांना ऊत आणताहेत...
>>>
सहमत!
बरोबर.
बरोबर.
https://www.esakal.com/pune
https://www.esakal.com/pune/raju-shetty-criticizes-bjp-and-shiv-sena-202624
>> शिळ्या कढीला ऊत म्हणणारांनो या बातमीतून समाजात काय संदेश जातो. ब्राह्मण व ब्राह्मणवाद वेगळे आहेत हे सांगणारी तथाकथित पुढाऱ्यांची मुक्ताफळं यावर चर्चा करावी. किंवा शांत बसावे.
पेशव्यांच्या काळात असेलही
पेशव्यांच्या काळात असेलही जातीयवाद. पेशवे गेले इंग्रज आले. इंग्रज गेले. भारतात लोकशाही आली. लोकशाही मार्गाने महाराष्ट्रात ब्राह्मण जातीचा मुख्यमंत्री झाला व तो चांगल्या पद्धतीने कारभार करत आहे, त्यामुळे परत निवडून येण्याची शक्यता दाट आहे. तेव्हा जी मंडळी आपल्या कार्यामुळे जनतेला आकर्षित करू शकत नाहीत ती अशी पेशवाई वगैरे भाषा वापरतात. जर कुणाला अन्याय होत आहे असे वाटते तर न्यायालये, पोलिस यंत्रणा अन्याय निवारणासाठी उपलब्ध आहे.
याला कीस पाडणे किंवा वितंडवाद
याला कीस पाडणे किंवा वितंडवाद असे नाव आहे. रूपक, दार्शनिक संकल्पना समजण्यासाठी असते. घोड्यांच्या शर्यतीतून समता हे तत्त्व समजण्यासाठी ही गोष्ट आहे. पुढचा कल्पनाविलास हा हास्यास्पद आहे. धन्यवाद .
Submitted by संजय पगारे on 28 July, 2019 - 08:23 >>>
वा भाऊ, अडचणीच्या युक्तिवादाला हास्यास्पद म्हणायची खोड इथे फार जुनी आहे.
एखादी आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या दुबळी व्यक्ती आरक्षणाच्या मदतीने पुढे आली की त्या व्यक्तीची अपत्येही तेच दुबळेपण घेऊन वावरतात काय, ज्यामुळे त्यांनाही आरक्षणाची मदत मिळावी? हा साधा सरळ लॉजिकल प्रश्न आहे. तो तुम्हाला हास्यास्पद का वाटला? बरं हे हास्यास्पद वाटतंय तर तुम्ही दिलेले घोड्यांचे उदाहरणही हास्यास्पद ठरते.
धाग्याच्या शिर्षकावरून ध्यान हटवण्यासाठी आणखी किती गुर्हाळ घालणार?
I am a male but don’t find
I am a male but don’t find the term male chauvinism is offensive
Submitted by vijaykulkarni on 28 July, 2019 - 09:41 >>>
I am not a brahmin, but I find the term brahmanvad wrong and intentionally created to spread hatred.
ब्राम्हणद्वेष म्हणजेच भारतीय
ब्राम्हणद्वेष म्हणजेच भारतीय अँटी-सेमेटिसिझम... आता भारतात एखादा हिटलर येऊन ब्राम्हणांचा नायनाट कधी करणार त्याची वाट बघा.
ब्राम्हणद्वेष म्हणजेच भारतीय
ब्राम्हणद्वेष म्हणजेच भारतीय अँटी-सेमेटिसिझम... आता भारतात एखादा हिटलर येऊन ब्राम्हणांचा नायनाट कधी करणार त्याची वाट बघा. >>
One of the most hilarious arguments I read on this thread 
प्रचंड ट्रोलिंग मुळे मी
प्रचंड ट्रोलिंग मुळे मी सोडलेला हा तिसरा धागा आहे.
नेहेमी वाचनमोडात असतो, पण
नेहेमी वाचनमोडात असतो, पण पगारेंमुळे लिहावं वाटलं.
तुमचे काही मुद्दे ठीक आहेत, पण तुम्हाला आत्मपरिक्षणाची गरज आहे असे वाटले. तुम्ही एकावर एक आणि मोठमोठे प्रतिसाद टाकताय, पण त्यावर इतरांनी काही भाष्य केले मात्र तुम्हाला काहीही पटत नाहीये. इतरांचे काही मुद्दे असतील तर तुम्ही फक्त ते खोडण्याकरताच वाचताय असं वाटतंय. आता तर इतर लॉजिकली लिहिणार्यांनीही (दोन्ही बाजुच्या) लिहिणं बंद केलंय हे कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल. असो, तुम्ही धागा सोडण्याआधी जमल्यास एवढं वाचावं असं वाटलं म्हणून लिहिलं. तुम्ही लिहित रहा, पण मीच योग्य, इतरांची मतं फक्त चॅलेंज करणं, स्वतः holier than thou हा अॅप्रोच न ठेवता लिहिलं तर तुमची मतं जास्त सिरियसली घेता येतील.
वारी, पगारेंना
वारी, पगारेंना आत्मपरीक्षणाची गरज कशी आहे हे उदाहरणे देऊन स्पष्ट करा बरं.
तुमचा आक्षेप मोठ्या प्रतिसादांना आहे की मतं खोडून काढण्याला आहे ?
त्यांचे कोणते मत चुकीचे आहे व त्यावर इतरांनी लॉजिकल मत मांडले आहे हे स्पष्ट केले तर बरे होईल.
मुद्दा मांडा. शेरे नको.
माझ्यावर पण शेरेबाजी झाली आहे. तुम्ही त्याला मत समजत असाल तर मग राहूद्यात.
कांमु
कांमु
तसं नाही हो. इथे काही आयडी सर्रास शेलक्या भाषेत उद्धार करत असताना काही आयडी कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेलेले असतात. एखाद्याने त्याला उद्देशून ट्रोलिंग हा शब्द वापरला की ते लगेचच चवताळून येतात. तसंच काही तरी असेल हे.
हो ना हो वारी ?
तुमचा प्रतिसाद बघा बरं किती संयत शब्दात, कुलीन, शालीन भाषेत दिला आहे. प्रत्येकाला जमतं का हे ? तुम्हाला नाही ना खटकलं ते ... ट्रोलिंग ?
> गोष्टीतल्या ब्राह्मणांनी
> गोष्टीतल्या ब्राह्मणांनी फक्त 10 महिने मागितले होते. 10 महिन्यात त्यांनी ते घोडे इतर सशक्त घोड्यांसारखे तयार केले असते. हे घोडे रेसमध्ये धावून कदाचित पहिले आलेही असते. रेस संपल्यावर काय? लगेच ते घोडे परत पहिल्यासारखे मरतुकडे झाले असते की दहा महिन्याच्या काळात मिळालेल्या विशेष खुराकामुळे इतर सामान्य घोड्यांइतपत सामान्य झाले असते?
त्यांना मग त्या विशिष्ट खुराकाची गरज राहिली नसती? आणि नंतर त्यांच्या मुलांचे काय? विशिष्ट खुराक खाऊन तगड्या झालेल्या घोड्यांनी संतती मात्र ती तशीच आधीसारखी मरतुकडी पैदा केली असती की त्यांची संतती ही इतर घोड्यांसारखी सामान्य, शर्यतीत उतरण्याजोगी झाली असती? की त्या घोड्यांच्या मालकांनी हा विशिष्ट खुराक त्या घोड्यांच्या भविष्यातल्या अगणित पिढ्यांना अगणित वर्षे मिळतच रहावा ही मागणी केली असती? >
आरक्षण हे दुबळ्याना सबळ करून सिस्टममध्ये आणण्यासाठी दिलेले पाठबळ/खुराक आहे <- हा आरक्षणकडे बघण्याचा एक दृष्टिकोन झाला.
आरक्षण हे प्रत्येक जातीजमाती(किंवा लिंग)ला सिस्टममध्ये प्रतिनिधीत्व मिळावे म्हणून निर्माण केलेली पद्धत आहे <- हा आरक्षणकडे बघण्याचा दुसरा दृष्टिकोन झाला.
दोन्ही दृष्टिकोन एकत्र करूनदेखील पाहता येतील.
जातीआधारित आरक्षणाला विरोध करण्याआधी दोन मिनिट थांबून लिंगाआधारीत आरक्षणाबद्दल विचार (ते का दिले जाते, का आवश्यक आहे) करावा म्हणजे सगळा विरोध गळून पडतो.
===
> आंबेडकरांनी आरक्षण 10 वर्षेच दिले जावे असे नमूद केले होते असे वाचलेय.
बाकी सगळ्या बाबतीत आंबेडकरांना द्रष्टा वगैरे मानणारे लोक त्यांना 10 वर्षेच का पुरेशी वाटली किंवा 10 वर्षे पुरेशी आहेत असे वाटण्याची चूक त्यांनी का केली याबद्दल कधी बोलताना दिसत नाही. >
हा १० वर्ष उल्लेख फक्त राजकारणातील आरक्षणसंदर्भात आहे. दर १० वर्षांनी आढावा घ्यावा, जर आरक्षित जातीचे पुरेसे (योग्य प्रमाणात) लोकप्रतिनिधी निवडून येताहेत असे दिसू लागले तर हे (केवळ हेच, राजकारणतले) आरक्षण बंद करावे असा उल्लेख आहे. त्यानुसार दर १० वर्षांनी आढावा घेतला जातो आणि अजूनही पुरेसे प्रतिनिधी निवडून येत नाहीयत हे दिसून येते.
प्रचंड ट्रोलिंग मुळे मी
प्रचंड ट्रोलिंग मुळे मी सोडलेला हा तिसरा धागा आहे.
नवीन Submitted by संजय पगारे on 29 July, 2019 - 19:30. >>>
अरेरे, फारच नुकसान झालं धाग्याचं.
धाग्याच्या कोअर विषयावर आधीच चर्चा होऊन शिर्षकावर चर्चा सुरू असताना आपलेच ज्ञानरुपी घोडे पुढे रेटणारे खरे ट्रोलर आहेत. त्या ट्रोलर्समुळे सगळ्याच चर्चेला खीळ बसली. ती चर्चा आता पुढे सरकेल ही अपेक्षा.
मी-माझा आणि खरा पुणेकर हे
मी-माझा आणि खरा पुणेकर हे मायबोलीवरची कीड आहेत. यांचा बंदोबस्त अॅडमिन महोदयांनी करावा ही विनंती.
त्यानुसार दर १० वर्षांनी
त्यानुसार दर १० वर्षांनी आढावा घेतला जातो आणि अजूनही पुरेसे प्रतिनिधी निवडून येत नाहीयत हे दिसून येते.
Submitted by ॲमी on 30 July, 2019 - 06:46 >>>
मुळात ठराविक संख्येने प्रतिनिधी "निवडून" यावेत ही अपेक्षाच लोकशाहीशी विसंगत आहे. त्याऐवजी किती प्रतिनिधी निवडणुकीला उभे राहू शकले किंवा एखाद्या समाजाची आर्थिक व शैक्षणिक स्थिती कशी आहे, त्या समाजातील मुलांची शाळेतील उपस्थिती किती आहे, पालकांना शिक्षणाचे महत्त्व वाटते की नाही व किती तरुण पदवीधर शिक्षणापर्यंत मजल मारतात असे व आणखीही काही निकष बरोबर ठरतील.
मी-माझा आणि खरा पुणेकर हे
मी-माझा आणि खरा पुणेकर हे मायबोलीवरची कीड आहेत. यांचा बंदोबस्त अॅडमिन महोदयांनी करावा ही विनंती.
Submitted by म्याऊ on 30 July, 2019 - 07:29 >>
असे तुला का वाटते म्याऊताई?
Pages