मला अशा गोष्टी व्यवस्थित मांडण्याचा अनुभव कमीच आहे. थेटच मुद्द्यावर येतो.
भारतात त्यातही महाराष्ट्रात राहून मला जातीयवाद म्हणजे काय हे जाणवलं नव्हतं. माझ्या दृष्टीने उच्च असणारी माझी जात, खालच्या जातीच्या माणसाला पाहून किंचितसुखावणारा) सुखावणारा माझा अंहं, मला एकंदर जातव्यवस्थेत मी कुठे आहे हे समजू देत नव्हती. त्यातही जरा सत्ता उपभोगणा-या घराण्यात जन्म झाल्याने सगळे कसे रूबाबात चालले होते. त्यामुळे जातीयवादाबाबत बोलणा-यांना मी तुच्छ समजत होतो.
पण कॉलेजच्या प्रवेशाला वडलांनी जात प्रमाणपत्र काढून आणले तेव्हां मी ओबीसी प्रवर्गात मोडत असल्याचे मला समजले. हा माझ्या दृष्टीने धक्काच होता. मागासवर्गीय या शब्दाचा मला अत्यंत तिटकारा होता. पण माझ्या नावाला हा शब्द जोडला गेला. पण थोड्याच दिवसात सर्वच जण बिनदिक्कतपणे जातीचा अर्ज आणतात आणि प्रतिष्ठीत म्हणूनही वावरतात हे सवयीचे झाले. पुन्हा सर्व पूर्ववत झाले.
मध्यंतरी आम्ही मोटरसायकल्स वर राजस्थानात गेलो होतो. तेव्हां मात्र स्व अभिनामाच्या ठिक-या उडाल्या. राजस्थानात ब्राह्मण आणि राजपूत सोडले तर सर्वच जण पिछडा म्हणजे शूद्र समजले जातात. आम्हाला थेटच जात विचारायचे. माझी जात सांगितली की अरे भाई ब्राह्मण हो ? क्षत्रिय हो ? असे विचारले जायचे. या दोन्ही प्रश्नांना नकारार्थी उत्तरे दिली की मग याने शूद्र हो असा प्रश्न यायचा. हा अनुभव जवळपास सर्वच ठिकाणी आला. शूद्रांना पाणी देताना आजही राजस्थानात वेगळे भांडे दिले जाते. आम्ही सांगितले की महाराष्ट्रात आम्हाला खूप मान आहे. आम्ही सवर्ण आहोत. पण ते सांगायचे की आम्ही वर्ण बघतो. जे या दोन वर्णाचे नाहीत ते सर्वच शूद्र म्हणजे पिछडा. एकाने विचारले की ओबीसी मे आते हो का ? मी हो म्हटल्यावर तो हसला. म्हणजे या पुढे मी काय समजावणार ?
त्यांच्या हे सर्व अंगवळणी पडलेले आहे. महाराष्ट्रात इतकी उघड जातव्यवस्था नाही. त्यामुळे मध्यमजातींना ती जाणवत नाही. यामुळे आपण भारी आहोत असे उगीच वाटते. राजस्थानातल्या अनुभवाने डोळे उघडले. नंतर उत्तर प्रदेश बिहारचे मित्र पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी झाले. त्यांनी जातव्यव्स्थेचे जे वर्णन केले त्यामुळे सुन्नच झालो. इथे जातीचा उल्लेख हा अगदी सर्रास आहे. थोडक्यात जे आहे ते आहे. लपवाछपवी नाही.
मी पहिल्यांदा आमच्या महाराष्ट्रात असे नाही हे सांगायला बघायचो. पण त्यांच्याकडून व्यवस्थित चिरफाड झाली. महाराष्ट्रातही पश्चिम महाराष्ट्रात मराठा वर्चस्व आहे तर उर्वरीत महाराष्ट्रात ओबीसी. त्यातही कुणबी वर्चस्व जास्त आहे. ब्राह्मणांचे वर्चस्व प्रशासन आणि पूर्वी बहुराष्ट्रीय कंपन्यात असायचे. आता आयटीत आहे. राष्ट्रीय पक्ष हे बहुत करून ब्राह्मणांचे अंकीत आहेत. माध्यमांमधे ब्राह्मणी वर्चस्व आहे. न्यायव्यवस्थेत ब्राह्मण वर्चस्व आहे.
पण राज्याराज्यात त्या त्या प्रदेशातल्या प्रबळ जातींचे वर्चस्व आहे.
मी आता जेव्हां विचार करतो तेव्हां ज्या समूहांना कुठेच प्रतिनिधित्व नाही, त्यांना आपल्या तक्रारी मांडताना, समस्या मांडताना किती अडचणी येत असतील असा विचार येतो. तरी देखील माझ्या पेक्षा कनिष्ठ समूहांचे प्रश्न मला भिडतात असा माझा दावा नाही. ज्याप्रमाणे मी पुरूष असल्याने माझ्याकडे स्त्री जाणिवा नाहीत किंवा अन्य जेण्डरच्या जाणिवा असणे शक्य नाही त्यामुळे मला त्यांच्या समस्या जाणवणेही शक्य नाही हे सत्य आहे तसेच जातजाणिवांचेही होत असावे.
मात्र मी जेव्हां मला वरीष्ठ समजून या व्यवस्थेचे फायदे उपटत होतो तेव्हां मला कोणतेही दोष तीत दिसत नव्हते. तसेच माझ्यापेक्षा वरीष्ठ जातींचे होत असावे असे मला आता वाटते.
कदाचित या जातजाणिवांमुळे या व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोण भिन्न भिन्न असावा. यातूनच मतभेदांना सुरूवात होत असावी. हे मतभेद अत्यंत टोकाचे आहेत. इतके की त्यामुळे संघर्षाची ठिणगी पडते.
जातीव्यवस्थेचे मला लाभ वाटत होते तोपर्यंत इतरांच्या नुकसानीची मला पर्वा नव्हती. मी त्याकडे डोळेझाक करीत असे. कदाचित त्यावर चर्चाच होऊ नये असे मला वाटत होते. मी फक्त त्यांचे लक्ष लाभांकडे कसे जाईल आणि ते गुणगाण कसे करतील यास सामोपचाराचे धोरण समजत होतो. माझ्या ठसठासणा-या गळूला धक्का लागू नये त्याप्रमाणे मला लाभ पोहोचवणा-या बाबींकडे लक्ष वेधले जाऊ नये ही माझी हास्यास्पद धडपड आता मला मजेशीर वाटते.
या काळात अनेक लोकांशी संपर्क आला. उत्तम श्रोता असल्याने मी ते ऐकत गेलो. वाचत गेलो. मी फुले आंबेडकरी साहीत्य वाचत गेलो. अंतर्बाह्य बदलत गेलो. मी कधीही हिंदुत्ववादी पक्षांचा नव्हतो. मात्र सौम्य हिंदुत्ववादी होतोच. त्यामुळे फारसे काही विशेष वाटत नव्व्हते.
आपण जर देश सोडून गेलो तर आपल्याला या काळ्या वास्तवापासून सुटका मिळेल असे विचार मनात घोळू लागले होते.
मात्र एका मित्राने आपले अनुभव शेअर केले आहेत. त्याने ते फेसबुकवर सुद्धा मांडले. त्याला देशभरात प्रसिद्धी मिळत आहे.
त्याच्या म्हणण्यानुसार तो परदेशात स्थायिक झाला होता. तिथे भारतीयांना पाहून त्याचे देशप्रेम जागृत झाले ( कदाचित आपला माणूस परदेशात भेटणे यामुळे सुरक्षित वाटले असावे). त्याने त्याच्याशी दोस्ती केली. त्याच्यामुळे अनेक भारतियांशी मैत्री झाली. पुढे त्याला अनेक ठिकाणी बोलावले जाऊ लागले. ते ही घरी येत. सण, उत्सव साजरे होते. हे सर्व पंजाबी होते. पंजाबी उत्सवप्रिय असतात. सतत सेलिब्रेशन मूड मधे असतात. हे दिवस आनंदात गेले.
पुढे तो त्याच्या सोशल अकाउंटवरून भारतातल्या जातव्यवस्थेबाबत लिखाण करू लागला. त्याचा अकाउंटला नवीन मंडळी सुद्धा होती. त्यांच्या वाचनात हे सर्व येऊ लागले. त्यांना धक्का बसला. हळू हळू या सर्वांनी त्याच्याशी संपर्क कमी केला. पुढे तर त्याला बोलवणे कमी झाले. अगदी लग्नसमारंभात सुद्धा आमंत्रण देणे टाळले जाऊ लागले. आता तर वाळीतच टाकले आहे.
याने एक दोघांना विचारले देखील. पण त्याला उत्तर मिळाले नाही. त्याला इग्नोर करणे चालूच आहे. पहिल्यांदा जो मित्र भेटला त्याच्या घरी हा गेला असता अनवॉण्टेड गेस्ट सारखी ट्रीटमेंट त्याला मिळाली. नंतर सूचकपणे कुछ भी उटपटांग लिखते हो, देश के खिलाफ कुछ भी बकवास करते हो.. हमे डेकोरम मेण्टेन करना है वगैरे वगैरे त्याने कळवले. त्याला कटवले.
हा मित्र यादव आहे. बाकीची पंजाबी मंडळी उच्चजातीची आहेत.
अलिकडे जातव्यवस्थेच्या वास्तवावर बोलणे हा देशद्रोहद्रोहला जातो. प्रतिष्ठीत चर्चेच्या संकेतस्थळावर या विषयावर लिहीणे अप्रतिष्ठीत समजले जाते. भलतेच मुद्दे काढून मूळ विषयाला फाटे फोडण्याचा प्रयत्न होतो. अथवा दाहकता कमी करण्याचा प्रयत्न होतो. अथवा उच्चजातींकडूनच आम्हालाच द्वेषाची वागणूक मिळते म्हणून आम्ही इकडे आलो असा कांगावा केला जातो.
परदेशात उच्चजातींच्या संस्था आहेत. विवाहसंस्था आहेत.
ते त्यांचे स्वातंत्र्य आहेच म्हणा. पण इकडे आल्याने आता खालच्या जातींकडून जातीयवादाचे टोमणे ऐकायला मिळत नाहीत हे सुख आहे असे एकाने सांगितल्याचे मित्राने नमूद केले आहे.
मी सुद्धा अनेक (रेडीफ सारख्या) स्थळांवर परदेशस्थ भारतियांची शेरेबाजी वाचलेली आहे. अत्यंत द्वेषपूर्ण अशी शेरेबाजी करून अब तुम्हारा सडा हुआ संविधान हमारा कुछ उखाड नही सकता असे सांगितलेले असते.
परदेशात गेल्याने आपल्यावर कारवाई होणार नाही हा विचार कदाचित देशात असताना कायद्याने कारवाई होईल म्हणून समंजस रहायला भाग पाडत असेल का ? मी अशी शेरेबाजी कधी केली नाही. कराविशी वाटली नाही. कदाचित सुख अनुभवले पण किमान खालच्यांना हिणवावे अस्से वाटले नाही हा फरक असेल. लिमिटेड का असेना सेक्युलॅरिझम असावा हा. कशाला काय म्हणतात याच्यात मला जायचे नाही. व्याख्यांमधे मला इंटरेस्ट नाही. मी गावातला माणूस आहे. मला माणसामाणसातला व्यवहार कळतो. त्याला साखरेत लपेटून मांडणे आम्हाला जमत नाही. जे आहे ते रोख ठोक बोलायची सवय आहे.
परदेशात गेल्यावर तरी जातीयवादाला गाडण्याची संधी मिळू शकते. पण तसे होत नाही हे दुर्दैवी आहे.
मराठी लोक असे वागतात का ? उघड वागत नसतील ही खात्री आहे. पण एखाद्याचे विचार कळाल्यानंतर देखील त्याला आपल्यात स्थान मिळते का ? असे म्हणण्याचे कारण म्हणजे देशातून येणा-यात निम्न जातींची आता कुठे सुरूवात आहे. तर वरीष्ठ जाती तिकडे किमान तीन पिढ्यांपासून सेटल झालेल्या आहेत.
त्यांचे जे सांस्कृतिक जग आहे, त्यात वेगळ्या विचाराला स्थान आहे का ?
मी जर उद्या गेलो आणि मी गणपती बसवणार नाही, वर्गणी देणार नाही, मी शिवजयंती करणार, फुले जयंती करणार, शाहू जयंती करणार असे म्हणू लागलो तर माझ्या विचारांचा सन्मान होतो का ? की पंजाब्यांप्रमाणे इथेही वागतात ?
कम्फर्ट लेव्हलप्रमाणे आपल्या संस्कृतीचा मनुष्य आपल्या सर्कलमधे असावा हे स्वाभाविक आहे. मात्र रॅशनलिस्ट्स, पुरोगामी यांच्याकडून थोड्या अपेक्षा असतात. त्या अपेक्षांप्रमाणे ते माझ्याशी वागतील का ?
की परदेशात गेल्यावर थेट आपल्या विचारांचे लोक शोधून मी त्यांच्याशीच मैत्री करावी आणि आपला कम्फर्ट झोन शोधावा ?
(परदेशात जाईन की नाही हे माहीत नाही. मी हा तात्विक प्रश्न विचारला आहे)
कृपया , या लेखाचा उद्देश कुणालाही न दुखावणे हा आहे. मला ज्यावर चर्चा करायची आहे तो विषय समजावून घेऊन चर्चा करावी ही नम्र विनंती. माझे लिखाण प्रक्षोभक, आक्षेपार्ह किंवा खोडसाळ वाटल्यास आपण ते काढू शकता. मात्र जर या ठिकाणी चर्चा झाली तर आनंद होईल.
प्रिंटच्या लेखाखालच्या
प्रिंटच्या लेखाखालच्या कमेंट्स वाचाव्यात.
भरत,
भरत,
वारीत जातीभेद नसतो हा गैरसमज आहे. ब्राह्मणांच्या वेगळ्या दिंड्या असतात आणि या दिंड्या कोणत्या, हे वारकर्यांना ठाऊक असतं. काही दिंड्यांमध्ये सोवळ्यात स्वयंपाक असतो.
छान संयत लेख आणि त्यावर संयमी
छान संयत लेख आणि त्यावर संयमी चर्चा घडवली आहे ह्यासाठी सर्वांचे विशेष कौतुक.
जातीभेद हां सर्वत्र असतोच. भारत की इतर देश काहीही फरक नाही. हां मनुष्य(अव)गुण सगळीकडे समान आहे आणि असणार !! फक्त ही जातव्यवस्था समाजाच्या विकासास बाधा आणणारी ठरू नये म्हणजेच समाजातील कुठल्याही व्यक्तिस आपली जात लपवायला लागू नए आणि जातीचे अवाजवी श्रेष्ठत्वही मिरवता येऊ नए. ( अवांतर - जसे इथे अतिशय संयत लिखाण करणारा आणि खरंच सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या ह्या सुंदर लेखाचा धागामालक ख़ास जातीविषयक लिखाणासाठी सेफ्टी म्हणून नवीन आयडी घेवून अवतरले तसे न होता वातावरण इतके निकोप हवे की ब्राह्मण असो की ब्राह्मणेतर कोणीही हां लेख लिहायला आपली ओळख लपवावी लागता नए)
चिनूक्स, हे माहीत नव्हतं.
चिनूक्स, हे माहीत नव्हतं.
मी मायबोलीवर अजात या डॉक्युमेंटरीबद्दल लिहिलेलं. त्यात काही अभ्यासकांनी संतांनाही जातीप्रमाणेच जागा ठरवून दिल्या गेल्यात असं म्हटलेलं. मला तो जास्तच ताणून काढलेला निष्कर्ष वाटला होता. आता हे वाचल्यावर वाटतंय की जातिभेद हा कोणत्याही प्रवाहावर आणि विचारावर कब्जा करतोच.
एकंदर जाती मानणाऱ्या व उघड
एकंदर जाती मानणाऱ्या व उघड/लपवून त्या पाळणाऱ्या समाजात जात लोप पावणे ही शक्यता अशक्य वाटतेय. सार्वजनिक जीवनातून त्या एकवेळ जातील पण व्यक्तिगत आयुष्यातून जाणे कठीण दिसतेय.
बाकी भारतात जसा जातीभेद आहे तसे माणसामाणसातील भेद वेगवेगळ्या नावांनी जगभर अस्तित्वात आहेत याबद्दल सहमत.
वर्ण आधारित जातव्यवस्था
वर्ण आधारित जातव्यवस्था आपल्याकडे होती तशीच वर्ग आधारित व्यवस्था इतर देशांत होती. अमेरिकेत सर्व वंशांची सरमिसळ असली तरी केवळ कायद्यामुळे अश्वेत लोकांना वर्णभेदाला सामोरे जावे लागत नाही.
त्या प्रिन्टच्या लेखकाने ही
त्या प्रिन्टच्या लेखकाने ही बातमी वाचली नाही वाटतं>>>
अजेंडा असतो, कुठले विचार प्रसूत करायचे याचा. लेखकाने तो वापरलाय.
प्रतिसादात विविध अजेंड्याच्या लोकांनी एकमेकांना व लेखकाला ठोकलेय.
कायद्यामुळे अश्वेत लोकांना
कायद्यामुळे अश्वेत लोकांना वर्णभेदाला सामोरे जावे लागत नाही>> >
कायदा करूनही कुठे संपलाय वर्णभेद? अधून मधून बातम्या येत असतातच...
प्रत्येक घटनेची केस स्टडी
प्रत्येक घटनेची केस स्टडी वेगळी. त्यात थंब रूल असा नसतो.
+१००
आमच्या ओळखीत एका नॉर्थ इंडियन बनिया मुलीने मराठी मागासवर्गीय मुलाशी लग्न केलं. तिच्या घरच्यांनी विरोध वगैरे तर सोडाच पण अगदी घाईघाई करून ताबडतोब लग्न करून दिलं. का तर म्हणे त्यांच्या जातीत लग्न करून द्यायचं तर प्रचंड हुंडा द्यावा लागतो, खूप खर्च करावा लागतो आणि इकडे त्या मुलाचे घरचे पुरोगामी विचारांचे असल्याने त्यांनी काहीच मागितलं नाही!
अजात बद्दल. अवांतर.
अजात बद्दल. अवांतर.
तुकडोजी महाराजांसारखे एक साधू होते. नाव आठवत नाही. त्यांना जातीभेद मान्य नव्हते. आपल्या अनुयायांना जात सोडायला लावून रोटी बेटी व्यवहार करायला सांगितले. अनुयायांनी कागदपत्रांवर सुध्दा जात लावायचे बंद केले. तर सरकारी महसूल खात्यासारख्या यंत्रणांनी जातीचा रकाना कोरा सोडता येणार नाही असे सांगितले. अनुयायांनी ऐकले नाही तर यांनी मनानेच अजात हा शब्द रकान्यात लिहिला व अजात ही नवी जात तयार झाली.
जातिभेद नाहीतच, हा हिंदू
जातिभेद नाहीतच, हा हिंदू विरोधी , अजेंडावाल्या लोकांनी केलेला प्रचार आहे इथपासून ते जगभरात सगळीकडेच कुठले ना कुठले भेद असतातच हा स्पेक्ट्रम चांगला सोयिस्कर आहे.
महात्मा बसवेश्वरांनी ज्या
महात्मा बसवेश्वरांनी ज्या ज्या भेदभाव निर्मूलनासाठी वेगळा पंथ काढला त्याला आज त्याच लोकांकडून हरताळ फसला जातोय.
जातिभेद नाहीतच, हा हिंदू
जातिभेद नाहीतच, हा हिंदू विरोधी , अजेंडावाल्या लोकांनी केलेला प्रचार आहे इथपासून ते जगभरात सगळीकडेच कुठले ना कुठले भेद असतातच हा स्पेक्ट्रम चांगला सोयिस्कर आहे.
Submitted by भरत. on 15 July, 2019 -
>> बरोबर, ज्यांना जातीभेदाचा सामना करावा लागला नाही, त्यांना सोयीस्कर असाच आहे.
जातिभेद नाहीतच, हा हिंदू
जातिभेद नाहीतच, हा हिंदू विरोधी , अजेंडावाल्या लोकांनी केलेला प्रचार आहे इथपासून ते जगभरात सगळीकडेच कुठले ना कुठले भेद असतातच हा स्पेक्ट्रम चांगला सोयिस्कर आहे
हा अस्तित्वातील स्पेक्ट्रम आहे. दोन्ही टोकांपासून सुरवात करून बघितले तरीही प्रत्येक बिंदूवर गर्दी आढळेल.
ब्राह्मणवाद या शब्दाचा
ब्राह्मणवाद या शब्दाचा ब्राह्मण जातीशी संबंध नाही.
https://www.google.com/amp/s/www.firstpost.com/india/are-brahmins-scapeg...
तसेच आता जाती पेक्षा धर्म
तसेच आता जाती पेक्षा धर्म टार्गेट केला जातोय. >> यावर थोडा प्रकाश टाकणार का ? कुठला धर्म टार्गेट केला जातोय?? कुठल्या जातीपेक्षा?
देशात जे काही चालले आहे हे
देशात जे काही चालले आहे हे दिसतच असेल की आपणास म्हणतो मी.
ब्राह्मणवाद या शब्दाचा
ब्राह्मणवाद या शब्दाचा ब्राह्मण जातीशी संबंध नाही.<<<
2016 चा एकांगी लेख दिसतो हा! नेमका ब्राह्मणांनी काही दशके, शतके पूर्वी केलेल्या गोष्टींना उद्धृत करणारा दुसरा पॅरा वाचला. हा विचार म्हणजेच खरे तर जातीयवाद आहे. या पूर्वीच्या विचारांचे कुणी असू नये हा तो उदात्त विचार आणि म्हणून त्या विचारांचे प्रामुख्याने (प्रामुख्याने) जे कधी काळी होते ते आज तर असूच नयेत हा दुसरा मूळ विचार! नुसते गोल गोल घुमवायचे शब्द! अभिप्रेत आशय तोच! लिंका हव्या तेवढ्या उपलब्ध दिमतीला!
आणि देशी ब्राह्मणवाद म्हणजे काय?
धावपळ करू नका एखादा विरोधी प्रतिसाद दिसला की लगेच!
धन्यवाद बेफिकीर जी. तुमच्या
धन्यवाद बेफिकीर जी. तुमच्या इतके चांगल्या शब्दात विचार मांडणे मला शक्य नाही.
लेखाच्या शीर्षकातील
लेखाच्या शीर्षकातील ब्राह्मणवाद हा शब्द काढणे सर्वार्थाने योग्य आहे.
ब्राह्मणवाद म्हणजे ब्राह्मण जातीचे लोक आज जे म्हणतात ते, हा अर्थ सर्रास समजला जाणारा आहे
मराठावादी, मातंगवादी हे शब्द वाचायला, ऐकायला 2019 मध्ये आवडेल का? कधीतरी तरी लिहिले, ऐकले गेले आहेत का? त्या 'वादांना' सोशल व प्रिंट मीडिया अव्हेरते असे कुठे बघण्यात आहे का?
(प्रत्येकाचा काहीतरी जातीय विचार व 'वाद' असतोच ना?)
मराठा मोर्चा निघाला जो शांत पडला. नंतर याच शासनाने मराठा आरक्षण देऊ केले जे ऐतिहासिक ठरले.
यालाही ब्राह्मणवाद म्हणा मग!
ब्राह्मणांमुळे
ब्राह्मणांमुळे ब्राह्मणेतरांना नोकऱ्या मिळाल्या, शिक्षणाची दारे खुली झाली हाही देशी ब्राह्मणवाद का? २०१९ मध्ये?
कोणी सांगावे की त्यांना शिक्षण न मिळू शकण्याची कारणे एका जातीशी निगडीत होती
बेफिकीर,
बेफिकीर,
तुमच्या वरच्या प्रतिसाअदावरून तुम्हांला ब्राह्मणवाद या शब्दाचा अर्थ कळला नाही, हे दिसतंय. तो अगोदर समजून घ्या कृपया. धन्यवाद.
चस्च
चस्च
मला वाटतं, एकंदरीतच भारतीय
मला वाटतं, एकंदरीतच भारतीय मनांमध्ये प्रचंड असुरक्षितता आहे, जी इतके दिवस परंपरेनं आली होती. आताची जी असुरक्षितता आहे ती उद्याच्या " जगण्याच्या प्रचंड स्पर्धेतल्या अनिश्चीततेतून" आलेली आहे. त्यामुळं कितीही सुधारणा झाल्या असं वाटलं तरी त्या वरवरच्या आहेत हे वेळोवेळी सिद्ध होत असते.
या सकटच जगावे लागेल आपल्याला, आपल्या परीनं मायक्रोसुधारणा करत, इतरांशी लढाई करत !
चौ को अगदी
चौ को
अगदी
बेफिकीर,
बेफिकीर,
तुमच्या वरच्या प्रतिसाअदावरून तुम्हांला ब्राह्मणवाद या शब्दाचा अर्थ कळला नाही, हे दिसतंय. तो अगोदर समजून घ्या कृपया. धन्यवाद.
Submitted by चिनूक्स on 16 July, 2019 - 18:59 >>>
त्यापेक्षा तुम्ही त्या शब्दाचा अर्थच सरळ बदलून त्यांना हवा तसा करून घ्या बरं.
चिनूक्स,
चिनूक्स,
ब्राह्मणवाद या शब्दाचा अर्थ तुमच्यामते मला कळणे यात माझ्या आयुष्याची इतिकर्तव्यता नाही हे आधी लक्षात घ्या
ब्राह्मणवाद या शब्दात थेट जातीय उल्लेख आहे
तुम्ही कितीही रेटलेत की त्याचा ब्राह्मण जातीशी संबंध नाही तरी देशातील 90 टक्के जनता तोच संबंध लावणार आहे
कुठे कुठे धावाल तुम्ही, ते तसे नाही हे पटवायला?
धागाकर्त्याने 'देशी' ब्राह्मणवाद म्हणजे काय हे अजून सांगायचेच आहे
तसेही, तुम्ही म्हणता तो मुद्दा जमेस धरला तरी त्यात एखाद्या वेगळ्या जातीचे नाव टाकले तरी चालायला हवे ना?
बरोबर. स्वत: ला असुरक्षित
बरोबर. स्वत: ला असुरक्षित समजणारे, ब्राह्मणवाद त्यांच्या असुरक्षितेला कारणीभूत असल्यासारखं भासवतात मात्र ते जो काही त्यांच्या जातीचा आक्रमकवाद जोपासत आहेत त्याचे काय? पुरोगामी असणे म्हणजे ब्राह्मणांना शिव्या देणे हे सुरू आहे.
चिनूक्स या लेखात ब्राह्मणवाद
चिनूक्स या लेखात ब्राह्मणवाद हा शब्द /शीर्षक कोणत्या अर्थाने घेतले आहे हे समजावून सांगाल काय.
Ajachya kalat soft target
Ajachya kalat soft target zala ahe brahman ha shabd. Kunihi ya ani tapali marun ja.. Befikir hyanchya mhananyapramane jar marathavad kinva tatsam shabd vaparala asata tar he samarthan karanare tyanchya virodhat gele asate.
Pages