देशी ब्राह्मणवादास सीमारेषा सुद्धा अडवू शकत नाहीत काय ?

Submitted by कांदामुळा on 14 July, 2019 - 00:53

मला अशा गोष्टी व्यवस्थित मांडण्याचा अनुभव कमीच आहे. थेटच मुद्द्यावर येतो.

भारतात त्यातही महाराष्ट्रात राहून मला जातीयवाद म्हणजे काय हे जाणवलं नव्हतं. माझ्या दृष्टीने उच्च असणारी माझी जात, खालच्या जातीच्या माणसाला पाहून किंचितसुखावणारा) सुखावणारा माझा अंहं, मला एकंदर जातव्यवस्थेत मी कुठे आहे हे समजू देत नव्हती. त्यातही जरा सत्ता उपभोगणा-या घराण्यात जन्म झाल्याने सगळे कसे रूबाबात चालले होते. त्यामुळे जातीयवादाबाबत बोलणा-यांना मी तुच्छ समजत होतो.

पण कॉलेजच्या प्रवेशाला वडलांनी जात प्रमाणपत्र काढून आणले तेव्हां मी ओबीसी प्रवर्गात मोडत असल्याचे मला समजले. हा माझ्या दृष्टीने धक्काच होता. मागासवर्गीय या शब्दाचा मला अत्यंत तिटकारा होता. पण माझ्या नावाला हा शब्द जोडला गेला. पण थोड्याच दिवसात सर्वच जण बिनदिक्कतपणे जातीचा अर्ज आणतात आणि प्रतिष्ठीत म्हणूनही वावरतात हे सवयीचे झाले. पुन्हा सर्व पूर्ववत झाले.

मध्यंतरी आम्ही मोटरसायकल्स वर राजस्थानात गेलो होतो. तेव्हां मात्र स्व अभिनामाच्या ठिक-या उडाल्या. राजस्थानात ब्राह्मण आणि राजपूत सोडले तर सर्वच जण पिछडा म्हणजे शूद्र समजले जातात. आम्हाला थेटच जात विचारायचे. माझी जात सांगितली की अरे भाई ब्राह्मण हो ? क्षत्रिय हो ? असे विचारले जायचे. या दोन्ही प्रश्नांना नकारार्थी उत्तरे दिली की मग याने शूद्र हो असा प्रश्न यायचा. हा अनुभव जवळपास सर्वच ठिकाणी आला. शूद्रांना पाणी देताना आजही राजस्थानात वेगळे भांडे दिले जाते. आम्ही सांगितले की महाराष्ट्रात आम्हाला खूप मान आहे. आम्ही सवर्ण आहोत. पण ते सांगायचे की आम्ही वर्ण बघतो. जे या दोन वर्णाचे नाहीत ते सर्वच शूद्र म्हणजे पिछडा. एकाने विचारले की ओबीसी मे आते हो का ? मी हो म्हटल्यावर तो हसला. म्हणजे या पुढे मी काय समजावणार ?

त्यांच्या हे सर्व अंगवळणी पडलेले आहे. महाराष्ट्रात इतकी उघड जातव्यवस्था नाही. त्यामुळे मध्यमजातींना ती जाणवत नाही. यामुळे आपण भारी आहोत असे उगीच वाटते. राजस्थानातल्या अनुभवाने डोळे उघडले. नंतर उत्तर प्रदेश बिहारचे मित्र पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी झाले. त्यांनी जातव्यव्स्थेचे जे वर्णन केले त्यामुळे सुन्नच झालो. इथे जातीचा उल्लेख हा अगदी सर्रास आहे. थोडक्यात जे आहे ते आहे. लपवाछपवी नाही.

मी पहिल्यांदा आमच्या महाराष्ट्रात असे नाही हे सांगायला बघायचो. पण त्यांच्याकडून व्यवस्थित चिरफाड झाली. महाराष्ट्रातही पश्चिम महाराष्ट्रात मराठा वर्चस्व आहे तर उर्वरीत महाराष्ट्रात ओबीसी. त्यातही कुणबी वर्चस्व जास्त आहे. ब्राह्मणांचे वर्चस्व प्रशासन आणि पूर्वी बहुराष्ट्रीय कंपन्यात असायचे. आता आयटीत आहे. राष्ट्रीय पक्ष हे बहुत करून ब्राह्मणांचे अंकीत आहेत. माध्यमांमधे ब्राह्मणी वर्चस्व आहे. न्यायव्यवस्थेत ब्राह्मण वर्चस्व आहे.

पण राज्याराज्यात त्या त्या प्रदेशातल्या प्रबळ जातींचे वर्चस्व आहे.
मी आता जेव्हां विचार करतो तेव्हां ज्या समूहांना कुठेच प्रतिनिधित्व नाही, त्यांना आपल्या तक्रारी मांडताना, समस्या मांडताना किती अडचणी येत असतील असा विचार येतो. तरी देखील माझ्या पेक्षा कनिष्ठ समूहांचे प्रश्न मला भिडतात असा माझा दावा नाही. ज्याप्रमाणे मी पुरूष असल्याने माझ्याकडे स्त्री जाणिवा नाहीत किंवा अन्य जेण्डरच्या जाणिवा असणे शक्य नाही त्यामुळे मला त्यांच्या समस्या जाणवणेही शक्य नाही हे सत्य आहे तसेच जातजाणिवांचेही होत असावे.

मात्र मी जेव्हां मला वरीष्ठ समजून या व्यवस्थेचे फायदे उपटत होतो तेव्हां मला कोणतेही दोष तीत दिसत नव्हते. तसेच माझ्यापेक्षा वरीष्ठ जातींचे होत असावे असे मला आता वाटते.

कदाचित या जातजाणिवांमुळे या व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोण भिन्न भिन्न असावा. यातूनच मतभेदांना सुरूवात होत असावी. हे मतभेद अत्यंत टोकाचे आहेत. इतके की त्यामुळे संघर्षाची ठिणगी पडते.

जातीव्यवस्थेचे मला लाभ वाटत होते तोपर्यंत इतरांच्या नुकसानीची मला पर्वा नव्हती. मी त्याकडे डोळेझाक करीत असे. कदाचित त्यावर चर्चाच होऊ नये असे मला वाटत होते. मी फक्त त्यांचे लक्ष लाभांकडे कसे जाईल आणि ते गुणगाण कसे करतील यास सामोपचाराचे धोरण समजत होतो. माझ्या ठसठासणा-या गळूला धक्का लागू नये त्याप्रमाणे मला लाभ पोहोचवणा-या बाबींकडे लक्ष वेधले जाऊ नये ही माझी हास्यास्पद धडपड आता मला मजेशीर वाटते.

या काळात अनेक लोकांशी संपर्क आला. उत्तम श्रोता असल्याने मी ते ऐकत गेलो. वाचत गेलो. मी फुले आंबेडकरी साहीत्य वाचत गेलो. अंतर्बाह्य बदलत गेलो. मी कधीही हिंदुत्ववादी पक्षांचा नव्हतो. मात्र सौम्य हिंदुत्ववादी होतोच. त्यामुळे फारसे काही विशेष वाटत नव्व्हते.

आपण जर देश सोडून गेलो तर आपल्याला या काळ्या वास्तवापासून सुटका मिळेल असे विचार मनात घोळू लागले होते.
मात्र एका मित्राने आपले अनुभव शेअर केले आहेत. त्याने ते फेसबुकवर सुद्धा मांडले. त्याला देशभरात प्रसिद्धी मिळत आहे.

त्याच्या म्हणण्यानुसार तो परदेशात स्थायिक झाला होता. तिथे भारतीयांना पाहून त्याचे देशप्रेम जागृत झाले ( कदाचित आपला माणूस परदेशात भेटणे यामुळे सुरक्षित वाटले असावे). त्याने त्याच्याशी दोस्ती केली. त्याच्यामुळे अनेक भारतियांशी मैत्री झाली. पुढे त्याला अनेक ठिकाणी बोलावले जाऊ लागले. ते ही घरी येत. सण, उत्सव साजरे होते. हे सर्व पंजाबी होते. पंजाबी उत्सवप्रिय असतात. सतत सेलिब्रेशन मूड मधे असतात. हे दिवस आनंदात गेले.

पुढे तो त्याच्या सोशल अकाउंटवरून भारतातल्या जातव्यवस्थेबाबत लिखाण करू लागला. त्याचा अकाउंटला नवीन मंडळी सुद्धा होती. त्यांच्या वाचनात हे सर्व येऊ लागले. त्यांना धक्का बसला. हळू हळू या सर्वांनी त्याच्याशी संपर्क कमी केला. पुढे तर त्याला बोलवणे कमी झाले. अगदी लग्नसमारंभात सुद्धा आमंत्रण देणे टाळले जाऊ लागले. आता तर वाळीतच टाकले आहे.

याने एक दोघांना विचारले देखील. पण त्याला उत्तर मिळाले नाही. त्याला इग्नोर करणे चालूच आहे. पहिल्यांदा जो मित्र भेटला त्याच्या घरी हा गेला असता अनवॉण्टेड गेस्ट सारखी ट्रीटमेंट त्याला मिळाली. नंतर सूचकपणे कुछ भी उटपटांग लिखते हो, देश के खिलाफ कुछ भी बकवास करते हो.. हमे डेकोरम मेण्टेन करना है वगैरे वगैरे त्याने कळवले. त्याला कटवले.

हा मित्र यादव आहे. बाकीची पंजाबी मंडळी उच्चजातीची आहेत.
अलिकडे जातव्यवस्थेच्या वास्तवावर बोलणे हा देशद्रोहद्रोहला जातो. प्रतिष्ठीत चर्चेच्या संकेतस्थळावर या विषयावर लिहीणे अप्रतिष्ठीत समजले जाते. भलतेच मुद्दे काढून मूळ विषयाला फाटे फोडण्याचा प्रयत्न होतो. अथवा दाहकता कमी करण्याचा प्रयत्न होतो. अथवा उच्चजातींकडूनच आम्हालाच द्वेषाची वागणूक मिळते म्हणून आम्ही इकडे आलो असा कांगावा केला जातो.

परदेशात उच्चजातींच्या संस्था आहेत. विवाहसंस्था आहेत.
ते त्यांचे स्वातंत्र्य आहेच म्हणा. पण इकडे आल्याने आता खालच्या जातींकडून जातीयवादाचे टोमणे ऐकायला मिळत नाहीत हे सुख आहे असे एकाने सांगितल्याचे मित्राने नमूद केले आहे.

मी सुद्धा अनेक (रेडीफ सारख्या) स्थळांवर परदेशस्थ भारतियांची शेरेबाजी वाचलेली आहे. अत्यंत द्वेषपूर्ण अशी शेरेबाजी करून अब तुम्हारा सडा हुआ संविधान हमारा कुछ उखाड नही सकता असे सांगितलेले असते.

परदेशात गेल्याने आपल्यावर कारवाई होणार नाही हा विचार कदाचित देशात असताना कायद्याने कारवाई होईल म्हणून समंजस रहायला भाग पाडत असेल का ? मी अशी शेरेबाजी कधी केली नाही. कराविशी वाटली नाही. कदाचित सुख अनुभवले पण किमान खालच्यांना हिणवावे अस्से वाटले नाही हा फरक असेल. लिमिटेड का असेना सेक्युलॅरिझम असावा हा. कशाला काय म्हणतात याच्यात मला जायचे नाही. व्याख्यांमधे मला इंटरेस्ट नाही. मी गावातला माणूस आहे. मला माणसामाणसातला व्यवहार कळतो. त्याला साखरेत लपेटून मांडणे आम्हाला जमत नाही. जे आहे ते रोख ठोक बोलायची सवय आहे.

परदेशात गेल्यावर तरी जातीयवादाला गाडण्याची संधी मिळू शकते. पण तसे होत नाही हे दुर्दैवी आहे.
मराठी लोक असे वागतात का ? उघड वागत नसतील ही खात्री आहे. पण एखाद्याचे विचार कळाल्यानंतर देखील त्याला आपल्यात स्थान मिळते का ? असे म्हणण्याचे कारण म्हणजे देशातून येणा-यात निम्न जातींची आता कुठे सुरूवात आहे. तर वरीष्ठ जाती तिकडे किमान तीन पिढ्यांपासून सेटल झालेल्या आहेत.

त्यांचे जे सांस्कृतिक जग आहे, त्यात वेगळ्या विचाराला स्थान आहे का ?
मी जर उद्या गेलो आणि मी गणपती बसवणार नाही, वर्गणी देणार नाही, मी शिवजयंती करणार, फुले जयंती करणार, शाहू जयंती करणार असे म्हणू लागलो तर माझ्या विचारांचा सन्मान होतो का ? की पंजाब्यांप्रमाणे इथेही वागतात ?
कम्फर्ट लेव्हलप्रमाणे आपल्या संस्कृतीचा मनुष्य आपल्या सर्कलमधे असावा हे स्वाभाविक आहे. मात्र रॅशनलिस्ट्स, पुरोगामी यांच्याकडून थोड्या अपेक्षा असतात. त्या अपेक्षांप्रमाणे ते माझ्याशी वागतील का ?

की परदेशात गेल्यावर थेट आपल्या विचारांचे लोक शोधून मी त्यांच्याशीच मैत्री करावी आणि आपला कम्फर्ट झोन शोधावा ?
(परदेशात जाईन की नाही हे माहीत नाही. मी हा तात्विक प्रश्न विचारला आहे)

कृपया , या लेखाचा उद्देश कुणालाही न दुखावणे हा आहे. मला ज्यावर चर्चा करायची आहे तो विषय समजावून घेऊन चर्चा करावी ही नम्र विनंती. माझे लिखाण प्रक्षोभक, आक्षेपार्ह किंवा खोडसाळ वाटल्यास आपण ते काढू शकता. मात्र जर या ठिकाणी चर्चा झाली तर आनंद होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

__/\__

वर्चस्ववादही नको आणि ब्राहमणवादही नको. समन्वय म्हणून आपण ब्राह्मणवर्चस्ववाद म्हणूया का? ! (हलकेच घ्यावे)

ब्राम्हणवर्चस्ववाद शब्द अगदी योग्य आहे.
ब्राम्हणवर्चस्ववादात ब्राम्हण धर्मसत्तेच्या केंद्राअनुसार श्रेष्ठ, वर्चस्व गाजवणारे असणं , ते सर्वाना मान्य असणं आणि त्यामुळे ब्राम्हण अन्यायापासून इम्युन असणं हे निकष आहेत.

पण आज ज्या जातीवादाच्या घटना दिसतात त्यात वेगवेगळ्या केसेस असतात. ब्राम्हणांचं वर्चस्व अमान्य असलेले समूहही जातीवाद करतात. काही वेळा त्यात ब्राम्हणही victim असतात. ब्राम्हणवर्चस्व न मानणारे समूह आपल्या नेत्याच्या वारसांसमोर ,कुटुंबीयांसमोर आनंदानेे झुकतात- त्यांना जन्माधारित नेतृत्व मान्य असतं. काहीजणांना स्वतःच्या बेनिफिटपुरती जातीव्यवस्था मान्य असते , पण ब्राम्हणवर्चस्व अमान्य असतं. म्हणूनच आजच्या काळात ब्राम्हण(वर्चस्व)वाद हा शब्द सरसकट वापरता येणार नाही. जातीवाद हाच शब्द योग्य राहील.

हीरा, नियम सर्वप्रथम ज्या समूहाने निर्माण केले त्याच्याच नावाने ती संस्कृती अथवा नियम अथवा प्रणाली ओळखले जातात. हे मान्य परंतु काही शब्द हे विद्रोही चळ्वळींनी रुढ केले.आमचा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्याला आहे ही शब्दरचना तर मी कित्येक वर्षे ऐकतो आहे. यात ब्राह्मण्य म्हणजे काय तर अज्ञानाचा फायदा घेउन केलेले शोषण, समाजात जेजे काही विषमता पसरवणारे आहे ते म्हणजे ब्राह्मण्य. अन्यायाचे जे समर्थन करते ते ब्राह्मण्य.जे जे सकल कुटील ते ब्राह्मण्य. असा तो ब्राह्मण्याचा अर्थ अभिप्रेत आहे. सहवेदनेचा विचार तुम्ही मांडलात की त्याला ब्राह्मणी कावा म्हणतात. अंनिस चे नरेंद्र दाभोलकर देखील या आरोपातून सुटले नाहित. त्यांच्या तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाच्या मनोगतात पान ७ वर वाचा. http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=5421983945435441997... मूळ चर्चा जिज्ञासूंना वाचायची असल्यास वरच्या प्रतिसादात लिंक दिली आहेच.

राजीव साने मुलाखत भाग 1 https://youtu.be/T60T7bjG36s
1 तास 1 मिनिट 36 से

राजीव साने मुलाखत भाग 2
https://youtu.be/jCmvZehEn6E
58 मि. 27 सेकंद

आता या चर्चेतील मुख्य महत्वाचा भाग म्हणजे समता नावाचे मूल्य. त्या विषयी 2 र्‍या भागाच्या सुरवातीलाच चर्चा केली आहे.
एकूणच चर्चा ही वैचारिक मेजवानी आहे. अर्थात फक्त जिज्ञासूंसाठीच. राजीव साने कोण याविषयी परिचय त्यांच्या ब्लोग वर http://rajeevsane.blogspot.com/

Thanks sir.

प्रकाश घाटपांडे साहेब.
तुमचा लेख वर वर चाळला. तुम्ही कोणाबद्दल लिहीले आहे हे ? मुळात तुमचे निष्कर्ष अत्यंत पूर्वग्रहदूषित आहेत. तुम्हाला आलेले अनुभव कुणाचे आहेत , हे समजले नाही.

आमचा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्याला आहे ही शब्दरचना तर मी कित्येक वर्षे ऐकतो आहे. >>> हे वाक्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहे.
मूळ वाक्य असे आहे की मी ब्राह्मणांच्या विरोधात नसून ब्राह्मण्याच्या विरोधात आहे.

तुमच्या मते ही शब्दरचना चुकीची आहे. तर मग तुमचे या एकंदर विचारांशीच तीव्र मतभेद आहेत. तुमचे इतरही लेख वाचले.

तुम्ही ज्योतिष हे शास्त्र आहे याला बेनेफिट ऑफ डाऊट देऊ इच्छिता. अंनिस ज्योतिषाला शास्त्र मानत नाही. अंनिस चे विचार मान्य नसणा-यांचे विचार समजून घेणे याला तुम्ही विज्ञान म्हणता.
तर अंनिस हा बामणी कावा आहे असे म्हणणा-यांचे म्हणणे तुम्हाला मान्य नाही.

तुमच्या लक्षात येतंय का ?

पुरोगामी म्हणवणा-यांमधे एकवाक्यता असायला हवी. अंनिसचे म्हणणे जे मान्य करणार नाहीत ते ब्राह्मणवादावर बोलणारे पुरोगामी नाहीत. पण अंनिसचे म्हणणे मान्य नसणारे ज्योतिषी हे मुळात प्रतिगामी नव्हेत असे तुम्हाला वाटते. त्यातच तुमच्या एका लेखातून दुसरीकडे असा लिंक्सचा पसारा आहे. तो विश्वाप्रमाणे न संपणारा आहे. त्यामुळे या लिंक्स पाहणे वेळेअभावी शक्य नाही.

राजन साने हे निर्दोष व्यक्तिमत्त्व आहे का ? यांचे म्हणणे प्रमाण आहे काय ? वेळेअभावी इथेच विचारणा करतोय.

राजन साने हे निर्दोष व्यक्तिमत्त्व आहे का ? यांचे म्हणणे प्रमाण आहे काय ? वेळेअभावी इथेच विचारणा करतोय.

नवीन Submitted by संजय पगारे on 27 July, 2019 - 10:49 >>>

आता बरोबर मुद्दा मांडलात भाऊ. हेच प्रश्न सर्व पूज्य नेत्यांपासून केजरीवाल आणि तुम्हालाही व ज्या कुठल्या फुरोगाम्याने ब्राह्मणवाद हा शब्द शोधला त्यालाही लागू होतात.. Lol

तुमचा लेख वर वर चाळला. तुम्ही कोणाबद्दल लिहीले आहे हे ? मुळात तुमचे निष्कर्ष अत्यंत पूर्वग्रहदूषित आहेत. तुम्हाला आलेले अनुभव कुणाचे आहेत , हे समजले नाही.>>> ही कुणाबद्दल लिहिले नसुन सर्वसाधारण माझे निरिक्षण आहे. निष्कर्ष नव्हे.मतभिन्नतेचेही स्वागत आहे.

घाटपांडे सर
राजीव सानेंच्या मुलाखती तुम्ही काळजीपूर्वक ऐकलेल्या आहेत का ?
https://youtu.be/jCmvZehEn6E?t=3

इथे क्लिक केल्यास सानेंचे विचार ऐकायला मिळतील. समता हे मूल्यच नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

तसेच सरदार सरोवर प्रकल्पाच्या बाबतीत विस्थापितांचे पुनर्वसन याबाबतचे त्यांचे विचार सुद्धा अश्चर्यकारक आहेत. तुमची आवड साधारणपणे ध्यानात आली.

सानेंनी समता हे मूल्यच नाही हे तुम्हाला पटलेले असेल तर तुम्हाला अधिक सामाजिक आकलनाची आणि अभ्यासाची आवश्यकता आहे असे माझे म्हणणे आहे.

मी सानेंचे व्हिडीओ पाहणे थांबवले आहे. त्यांचे लेख वाचावे असे काही आता वाटत नाही. कारण जन्माधारीत समान संधी बाबत एका सूचक प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ते भाग्य असते. भाग्याला चॅलेंज कसे करता असे भंपक उत्तर दिले आहे. कोपरकरांच्या आवाजाला फिरक आहे, माझ्या आवाजाला का नाही म्हणून मी कोपरकरांचा द्वेष करू का असे उत्तर हे तुमच्या सानेंच्या अद्वितीयतेची साक्ष द्यायला पुरे आहे.

यावर भाष्य करण्याची आवश्यकता आहे का ?

माझी मते तुम्हाला मान्यच व्हावी असा माझा आग्रह नाही. मी फक्त ती मांडली.तुमची मते तुम्ही मांडली आहेत.पुर्णविराम

मते मान्य होणे किंवा न मान्य होणे हा वेगळा विषय आहे. असंबद्ध मतं मांडून आहे ती चर्चा दुसरीकडे नेणे हा दुसरा विषय आणि जी मतं अभ्यासाविना मांडलेली असतात ती पटण्या न पटण्याबाबत चर्चा करणे हा आणखी एक स्वतंत्र विषय आहे.

पृथ्वी चपटीच आहे असे मत मी मांडले तर ते मान्य होणे किंवा न होणे या कॅटेगरीत बसत नाही. सानेंचा समता या विषयाचा अभ्यास नाही.

समतेचं मत मांडण्यासाठी बाबासाहेबांनी फ्रेंच राज्यक्रांतीचा फक्त अभ्यास केला नसून फ्रान्समधील तत्कालीन समाजरचना, ब्रिटनमधील रचना , नंतरच्या अमेरिकेतील गुलामांच्या सामाजिक स्टेटसबाबतची सामाजिक रचना यांचा तौलनिक अभ्यास मांडलेला आहे. त्यानंतर भारतातील जन्माधिष्ठीत व्यवस्था याचाही अभ्यास केलेला आहे.

शाहू महाराजांनी समता म्हणजे काय याचे खूपच सोपे उदाहरण दिले आहे. ते अगदी अशिक्षित माणसालाही पटण्यासारखे आहे.

समता म्हणजे काय हे समजण्यासाठी फ्रेंच राज्यक्रांतीचे उदाहरण द्यायची आवश्यकता नाही. भारतात काय सामाजिक व्यवस्था आहे याचे आकलन आणि ती उघडे डोळे असणा-या सर्वांना समोर पाहता येण्यासातखी आहे.

कर्णाला पराक्रम गाजवूनही शिक्षण घेता येत नाही किंवा राजा होण्यास तो लायक नसणे अथवा एकलव्याला क्षमता असूनही शिक्षण नाकारणे यास जर भाग्याचे खेळ म्हणत असाल तर तुम्ही सानेंचे विचार मान्य करण्यासाठी पात्र ठरता. मात्र तुम्ही अंधश्रद्धा समितीच्या चळवळीशी म्हणजेच पर्यायाने पुरोगामी चळवळीशी संबंधित आहात असा दावा करत असाल तर मग विनाकारण अपेक्षा ठेवल्या जातात.

तशा ठेवण्याची आवश्यकता नाही हे समजले. याबद्दल आपले आभार.

कार्ल मार्क्सने एकदा वैतागून म्हंटले - थॅक गॉड, आय अ‍ॅम नॉट अ मार्क्सिस्ट. कार्ल मार्क्स मार्क्सवादी नव्हता हे सर्वांनी मान्य केले.

आता ब्राह्मण वैतागुन म्हणताहेत आम्ही ब्राह्मणवादी नाही. सर्वांनी मान्य करावे की ब्राह्मण हे ब्राह्मणवादी नव्हेत.

विषय संपला.

हा धागा अनंत काळापर्यंत चालू शकेल. " काहीजणांना स्वतःच्या बेनिफिटपुरती जातीव्यवस्था मान्य असते , पण ब्राम्हणवर्चस्व अमान्य असतं. म्हणूनच आजच्या काळात ब्राम्हण(वर्चस्व)वाद हा शब्द सरसकट वापरता येणार नाही. जातीवाद हाच शब्द योग्य राहील."
हा सनव जी यांचा प्रतिसाद सर्वात जास्त पटणारा आहे.

आज शिंपी समाजातील माणसाने खर्च केलेल्या १०० रूपयातले जवळजवळ ९८ रूपये बाहेर जात आहेत... शिंपी समाजात फक्त २ रूपयेच परत येत आहेत... हेच कारण आहे कि आपल्यातले काहीच आर्थिक सबळ होत आहेत... परंतु समाज म्हणुन आपण सबळ होत नाही...

म्हणुनच माझी सर्वांना विनंती आहे... मी जे सांगतोय त्याची सुरूवात करा... कठीण आहे पण अशक्य नाही... आपल्याकडे धंद्यात उतरणारी मुल कमी आहेत... पण मी जे सांगतोय ते केल तर त्यांना धंद्यात यश मिळण्याची शक्यता वाढेल आणि जास्तित जास्त शिंपी समाजातिल मुले धंद्यात उतरतील... आपली एक साधी कृती त्यांना प्रोत्साहन देईल....

हे नक्कीच करा

1) डॉक्टर शिंपी निवडा
2) वकील शिंपी निवडा
3) इंजीनियर शिंपी निवडा
4) सी.ए शिंपी निवडा
5) भाजी वाला शिंपी निवडा
6) मोबाइल रिचार्ज स्टोअर्स शिंपी निवडा
7) मेडिकल स्टोअर्स शिंपी निवडा
8) दूध डेअरी शिंपी निवडा
9) प्रिटींग प्रेस शिंपी निवडा
10) इंशुरन्स वाला शिंपी निवडा
11) स्टेशनरी स्टोअर्स शिंपी निवडा
12) कपडयाचे दुकान शिंपी निवडा
13) इलेक्टृनिक व इलेक्टृीकल स्टोअर्स शिंपी निवडा
14) शेती कृषि सेवा केंद्र शिंपी निवडा
15) टृॅव्हल बुकींग शिंंपी निवडा
16) फ्लोअर मिल शिंपी निवडा
17) किराणा स्टोअर्स शिंपी निवडा
18) हार्डवेअर दुकान शिंपी निवडा
19) झेरॅाक्स सेंटर शिंपी निवडा
20) हॅाटेल शिंपी निवडा
21) इतर उपयोगी वस्तुसाठी शिंपी व्यापारी निवडा

समाजाच्या माणसाला मोठे करणे म्हणजेच समाज आर्थिक दृष्टया सुदृढ़ करणे होय।
मग बघा 10 वर्षात शिंपी समाजाची आर्थिक सुधारणा कशी होत नाही...
जेव्हा घेणारे , विकणारे आणि निर्माता आपणच राहु तेव्हा नक्की शिंपी समाजाची आर्थिक स्थिती सुधारेल...

वरील पोस्ट ' विश्वसंत संतशिरोमणी नामदेव महाराज' या फेसबुक पानावरुन कॉपी केली आहे. मला स्क्रीन शॉट टाकायला जमलं नाही. अशाप्रकारच्या बहुतेक समाजांच्या पोस्ट सोशल मीडिया वर फिरत असतात. तर मग देशाचे नागरिक म्हणून एकोपा कसा काय राहील.

कांदामुळा लेखक आपण हा आयडी घेऊन अत्यंत सभ्यपणाचा आव आणून ब्राह्मणांकडे व पर्यायाने हिंदू धर्मावर बोट दाखवून आपल्या मनातली मळमळ इथं ओकली आहे. मुद्दाम ब्राह्मणवाद शब्द रेटून कोणतेही लॉजिक न लावता जातीवादाचे खापर फक्त ब्राह्मणांवर फोडत आहे. ब्राह्मणवादाचा ब्राह्मणांशी संबंध नाही हे सांगताना दहशतवादाचा दहशतवादाशी संबंध नाही, यासारखं तुम्ही मान्य करत नाही.
या सगळ्याच्या मुळाशी आपण एक हिंदू धर्म विरोधी व्यक्ती आहात व हिंदू धर्म आपल्या डोळ्यात सलत आहे हे खरे कारण आहे. जर आपण आपली ओळख जाहीर केली तर आपला चेहरा उघड होईलच अशी मला खात्री आहे.

<< या सगळ्याच्या मुळाशी आपण एक हिंदू धर्म विरोधी व्यक्ती आहात व हिंदू धर्म आपल्या डोळ्यात सलत आहे हे खरे कारण आहे. जर आपण आपली ओळख जाहीर केली तर आपला चेहरा उघड होईलच अशी मला खात्री आहे. >>

-------- हिंदू धर्मात काही उणिवा असतील आणि त्या दाखवल्या तर धर्मविरोधी कसे ठरतो ? काही उणिवा असतील आणि त्या दाखवल्या, त्यावर बोधक चर्चा केली, संवाद साधला तर त्यातुन काही चांगलेच बाहेर पडेल. आपल्या धर्मात सती जाण्याची अघोरी प्रथा होती.... मुलींना शिक्षणा पासुन दूर ठेवण्याची पद्धत होती.... बंद झालीच ना ? जातीच्या आधारावर फार मोठा भेदभाव होता आणि अजुनही आहे किंवा स्वरुप बदलले आहे.

आज २०१९ मधे पण बेटी बचाव, बेटी पढाव सारख्या योजना आणाव्या लागतात. अजुनही आपल्याला खुप मोठा पल्ला गाठायचा आहे हेच दर्शवते.

धर्मात असलेल्या उणिवांना दाखवणे याला धर्मविरोध संबोधणे हाच मोठा धर्म विरोध आहे. मग पण तो धर्म कुठलाही असेल.

प्रकाश घाटपांडे आपण राजीव सानेंची जी लिंक दिली दिली आहे त्याबद्दल आभार. काल संध्याकाळच्या एका चर्चासत्रात त्याचा संदर्भ वापरताना फायदा झाला. यावर चांगली चर्चा झाली. मध्यंतरी अभिराम दीक्षित नामक एक नवपुरोगामी व्यक्तीमत्व प्रकाशात आले होते. त्याच प्रमाणे राजीव साने असावेत. राजीव दीक्षित म्हणूनही एक व्यक्तीमत्व मध्यंतरी प्रसिद्धीस आले होते. दुर्दैवाने ते आत्ता हयात नाहीत. पुरोगामी विचारांमधले हवे ते घ्यायचे , अडचणीचे सोडून द्यायचे आणि विचारांच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली ज्या गोष्टी त्याज्य आहेत म्हणून सिद्ध झालेल्या आहेत त्या पुन्हा आणणे असा एक कार्यक्रम गेल्या कही वर्षात आढळून येतो. साखरेच्या पाकात कार्ल्याचा डोस जसा दिला जातो, त्याचप्रमाणे पुरोगामी शैलीत प्रतिगामी विचार मांडणे व त्यास अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणणे हा हातचलाखीचा खेळ आहे.

पुन्हा पुन्हा गुळगुळीत झालेली उदाहरणे द्यायला नकोत म्हणून दिली नाहीत. पण द्यायला हरकत नाही असे वाटते.

घाटपांडे सर,

समता या मूल्यावर जिज्ञासूंसाठी चर्चा झाली असे तुम्ही म्हटले आहे. फ्रेंच राज्यक्रांती समता , स्वातंत्र्य व बंधुता या तत्त्वांची जननी आहे. या तत्त्वांच्या रक्षणासाठी नेपोलियनला युद्धं करावी लागली. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळचा समाज कसा होता याचे वर्णन बाबासाहेबांनी तपशीलवार केले आहे. सानेंनी त्यास स्पर्शही केलेला नाही. युरोपियन समाज हा एकजिनसी समाज होता असे म्हटले तरी चालेल. त्यामधे पदावर आधारीत श्रेण्या होत्या, सरदार, उमराव आणि राजघराणे यांना मान होता. मात्र जन्माधारीत श्रेण्यांची व्यवस्था इतर समाजात नव्हती. संपूर्ण समाज उतरंडीवर नव्हता. त्यामुळे सानेंनी भाग्याचं जे काही रडगाणं लावलं आहे त्याचा कशाशी संबंध नाही.

फ्रेंचांनी हे आपले भाग्य आहे असे समजून तैसेचि रहावे असे म्हटले असते तर त्यांचा उठाव झालाच नसता. फ्रेंच राज्यक्रांतीच्या रक्षणासाठी नेपोलियननेही युरोपातील राज्यसत्तेशी महायुद्ध केले नसते.

रशियाच्या झार राजा आहे, मग मी त्याच्यावर का जळू ? त्याचा मत्सर का करू ? कारण झार हा सर्वश्रेष्ठच आहे. ह नैसर्गिकच आहे असा विचार नेपोलियनने केला नाही. नाही का ? साने उदाहरणे सुद्धा चमत्कारीक देतात. डॉक्टरचा मत्सर आयटी इंजिनीअर का करेल ? या दोघांचे स्टेटस आणि त्यावरून मिळणारा आदर आणि अमीर उमराव यांना मिळणारी वागणूक व सत्तेच्या अधिकाराने मिळणारा आदर यात ते फरक करतात का ?

तीच गोष्ट भारतातील जन्माधारीत व्यवस्थेची. कुणब्याने शेतात शेती करावी मात्र ज्ञानार्जन करू नये. धार्मिक उपदेशाच्या बदल्यात ब्राह्मणाच्या घरी शेतमाल नेऊन टाकावा. अस्पृश्याने गावाबाहेर रहावे. पाण्यावर पहिला हक्क सर्वात उच्च जातीचा. त्यानंतर खाली खाली तो झिरपत जाईल. स्पृश्य लोकांच्या पाणवठ्यावर अस्पृश्याने पाणी भरू नये.

या सर्व गोष्टींची तुलना राजीव सानेंच्या भाग्य आणि आदराची श्रेणी यांच्याशी करून पहा. हे जनंआधारीत स्टेटस घालवणे हा वेडगळपणा आहे असेच ते सुचवतात. समता हे मूल्यच नाही याचा अर्थ आणखी काय होतो ?

शाहू महाराजांचे उदाहरण ऐकण्यात नसेल तर आता देतो. त्यानंतर सानेंचे भाषण पुन्हा ऐका.

उत्पादनात पण समता हवी याचा सानेंना विसर पडला आहे. भाग्य आणि समता यांचा संबंध जमला नाही. अस्पृश्य जातीत जन्माला येणे हे भाग्य आहे का ? म्हणजे हे भाग्य आहे म्हणून तसेच रहावे असे साने सर सुचवतात का ? चांगले भाग्य असल्याने ज्यांचा जन्म चांगल्या जातीत झाला त्याने खालच्या बद्दल सहवेदना, समवेदना, करूणा बाळगायची असे साने सर म्हणतात. खरं तर ते काय बडबड करत आहेत हे त्यांचे त्यांना तरी समजतेय का ?

कितीही क्लिशे झाली तरी समता समजावून सांगणारी दोन उदाहरणे साने सरांनी ऐकलेली नसावीत. शाहू महाराजांचे उदाहरण. त्या वेळी समता हा शब्द महाराजांनी वापरला नव्हता. आरक्षणावर महाराजांचे मुख्य चिटणीस आणि अन्य दोन ब्राह्मण मंडळी महाराजांशी वाद घालत होती. त्यांचे जे मुद्दे होते तेच साने सर आत्ता मांडत आहेत.

शाहू महाराज त्यांना घेऊन पागेत गेले. त्यातले दोन आजारी, मरतुकडे घोडे त्यांनी निवडले. दोन सर्वात सुदृढ घोडे निवडले. मग त्यांच्याशी वाद घालणा-या मंडळींना ते म्हणाले दोन दिवसात या घोड्यांची शर्यत ठेवा. मरतुकडे घोडे त्यांनी आरक्षणाला विरोध करणा-यांकडे दिले. म्हणाले यांची जबाबदारी तुमची. दोन सुदृढ घोडे स्वत:कडे ठेवले. म्हणाले , हे घोडे माझ्यातर्फे शर्यतीत धावणार.

जर तुमचे घोडे हरले तर तुम्हाला शिक्षा मिळणार.

त्यावर ते तिघेही हा अन्याय आहे. आमचे घोडे कसे जिंकणार ? हे तर मरायला टेकले आहेत, ते तुमच्या घोड्यांचा सामना कसा करणार ? असा प्रश्न त्यांनी विचारला.
महाराज म्हणाले "मग काय करायला पाहीजे ?"
ते तिघे ब्राह्मण म्हणाले , "आम्हाला दहा महीने द्या. या दहा महीन्यांमधे या घोड्यांना चांगले अन्न, औषधे देऊन सुदृढ बनवून रेस मधे पळण्यासाठी आम्ही तयार करू . मग हवं तर महाराजांनी रेस लावावी "
महाराज म्हणाले "म्हणजे तुम्ही घोड्यांना आरक्षण द्यायला तयार आहात, पण माणसाच्या बाबतीत तुम्हाला ही गोष्ट लक्षात येत नाही ?"

तिघेही खजील झाले.

एका पातळीवर आणण्यासाठी उपाययोजना करणे म्हणजे समता. समानता म्हणजे सगळेच समान पातळीवर असणे. फ्रान्स मधे उतरंड नसल्य़ाने सगळे समान पातळीवर होते. जी काही असमानता होती ती उमराव, राजे महाराजे यांच्या स्टेटसमुळे होती. त्या विरोधात राज्यक्रांती झाली. राजघराण्याकडे जन्माने आलेले श्रेष्ठत्व नाकारून सर्वांना एका पातळीवर आणणे हे समतेचे तत्त्व होते.

भारतात ते जातीआधारीत श्रेष्ठत्वाच्या उतरंडीत वेगळ्या पद्धतीने लागू होते.

इतकं दळण दळुनही ब्राह्मणवाद म्हणण्याऐवजी वर्चस्ववाद, जातीवाद म्हणायला तयार नाहीत हे ब्राह्मणांच्या आडून हिंदू धर्म कसा वाईट आहे यावरच बऱ्याच जणांनी भर दिला आहे. लेखकाने आपलं नाव, जात ही मुद्दाम जाहीर केली नाही. काय सांगावं इतर धर्मीय माणूस मुद्दाम असा लेख पाडत असेलही. जर एखाद्या व्यक्तीचे संस्कार/ विचार चांगले नाहीत म्हणून त्याला कुणी टाळलं तर तो ब्राह्मणवाद म्हणजेच उचनीच वाद कसा म्हणता येईल. एखाद्या समाज गटात थोर व्यक्ती जन्मली म्हणून तो सगळा समाज थोर होत नाही तसेच चोर व्यक्ती जन्मली म्हणून चोरही होत नाही. आपल्याला जर इतरांकडून चांगली वागणूक हवी आहे तर आपण इतरांना अपेक्षित वागलं पाहिजे. इथं अनेकांनी सांगितले की उच्च जातीचा असूनही मला कटुता आढळली नाही किंवा उलटही.

शर्यतीस कोणत्याही समतावाद्याचा नकार नाही. मात्र शर्यतीसाठी सगळे एका पातळीवर हवेत हा आग्रह म्हणजे समता. कुस्ती ही एका वजनगटात केली जाते. ५५ किलोच्या पहिलवानाची कुस्ती १०० किलो वजनी गटात केली जात नाही. एका वजनी गटात ज्याची कामगिरी उत्तम तो विजेता हे तत्त्व समतावाद्यांना मान्य आहे. एखाद्याचे वजन कायम ४० किलोच भरत असेल तर त्याला कुस्तीतच भाग घेता येत नाही. पण त्याचे वजन कमी भरण्याचे कारण कुपोषण हे असेल तर त्यात कामगिरी, श्रेष्ठत्व किंवा क्षमता यांचा काय संबंध आहे ? त्याचे कुपोषण बंद झाले, त्यालाही इतर पहिलवानांना मिळणारा आहार व संधी मिळाली तर त्याच्या तब्येतीत सुधारणा होईल. ४० किलोचा कदाचित ५५ किलो, ७५ किलो अथवा १०० किलो वजनी गटासाठी पात्र होईल. मात्र पुढे त्याला कुस्तीच्या कौशल्यावरच विजय मिळेल. हे कौशल्य कमावण्य़ाची संधी मिळणे आणि इतरांप्रमाणे आहार व तफावत दूर करण्यासाठी औषधयोजना राबवणे हे समतेचे तत्त्व आहे. समता आणि समानता यात हा फरक आहे.

सानेंचा स्वत:च गोंधळ असेल तर त्यांनी अभ्यास करावा. स्वत:चा गोंधळ दूर करावा. अर्थात त्यांना ऐकणारे आहेत म्हटल्यावर या गोंधळाचे चाहते आहेत असे म्हटले तरी चालेल.

सानेंचा गोंधळ लक्षात आला असेल तर घाटपांडे सरांनी मतस्वातंत्र्य म्हणजे काय यावरही पुन्हा एकदा विचार करावा.

पृथ्वी गोल आहे हे विज्ञानाने सिद्ध झाले आहे. ती पुन्हा चपटी आहे असे अत्यंत हुषारीने मांडणे याला अभिव्यक्तीस्वातंत्र म्हणायचे का ?

Pages