देशी ब्राह्मणवादास सीमारेषा सुद्धा अडवू शकत नाहीत काय ?

Submitted by कांदामुळा on 14 July, 2019 - 00:53

मला अशा गोष्टी व्यवस्थित मांडण्याचा अनुभव कमीच आहे. थेटच मुद्द्यावर येतो.

भारतात त्यातही महाराष्ट्रात राहून मला जातीयवाद म्हणजे काय हे जाणवलं नव्हतं. माझ्या दृष्टीने उच्च असणारी माझी जात, खालच्या जातीच्या माणसाला पाहून किंचितसुखावणारा) सुखावणारा माझा अंहं, मला एकंदर जातव्यवस्थेत मी कुठे आहे हे समजू देत नव्हती. त्यातही जरा सत्ता उपभोगणा-या घराण्यात जन्म झाल्याने सगळे कसे रूबाबात चालले होते. त्यामुळे जातीयवादाबाबत बोलणा-यांना मी तुच्छ समजत होतो.

पण कॉलेजच्या प्रवेशाला वडलांनी जात प्रमाणपत्र काढून आणले तेव्हां मी ओबीसी प्रवर्गात मोडत असल्याचे मला समजले. हा माझ्या दृष्टीने धक्काच होता. मागासवर्गीय या शब्दाचा मला अत्यंत तिटकारा होता. पण माझ्या नावाला हा शब्द जोडला गेला. पण थोड्याच दिवसात सर्वच जण बिनदिक्कतपणे जातीचा अर्ज आणतात आणि प्रतिष्ठीत म्हणूनही वावरतात हे सवयीचे झाले. पुन्हा सर्व पूर्ववत झाले.

मध्यंतरी आम्ही मोटरसायकल्स वर राजस्थानात गेलो होतो. तेव्हां मात्र स्व अभिनामाच्या ठिक-या उडाल्या. राजस्थानात ब्राह्मण आणि राजपूत सोडले तर सर्वच जण पिछडा म्हणजे शूद्र समजले जातात. आम्हाला थेटच जात विचारायचे. माझी जात सांगितली की अरे भाई ब्राह्मण हो ? क्षत्रिय हो ? असे विचारले जायचे. या दोन्ही प्रश्नांना नकारार्थी उत्तरे दिली की मग याने शूद्र हो असा प्रश्न यायचा. हा अनुभव जवळपास सर्वच ठिकाणी आला. शूद्रांना पाणी देताना आजही राजस्थानात वेगळे भांडे दिले जाते. आम्ही सांगितले की महाराष्ट्रात आम्हाला खूप मान आहे. आम्ही सवर्ण आहोत. पण ते सांगायचे की आम्ही वर्ण बघतो. जे या दोन वर्णाचे नाहीत ते सर्वच शूद्र म्हणजे पिछडा. एकाने विचारले की ओबीसी मे आते हो का ? मी हो म्हटल्यावर तो हसला. म्हणजे या पुढे मी काय समजावणार ?

त्यांच्या हे सर्व अंगवळणी पडलेले आहे. महाराष्ट्रात इतकी उघड जातव्यवस्था नाही. त्यामुळे मध्यमजातींना ती जाणवत नाही. यामुळे आपण भारी आहोत असे उगीच वाटते. राजस्थानातल्या अनुभवाने डोळे उघडले. नंतर उत्तर प्रदेश बिहारचे मित्र पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी झाले. त्यांनी जातव्यव्स्थेचे जे वर्णन केले त्यामुळे सुन्नच झालो. इथे जातीचा उल्लेख हा अगदी सर्रास आहे. थोडक्यात जे आहे ते आहे. लपवाछपवी नाही.

मी पहिल्यांदा आमच्या महाराष्ट्रात असे नाही हे सांगायला बघायचो. पण त्यांच्याकडून व्यवस्थित चिरफाड झाली. महाराष्ट्रातही पश्चिम महाराष्ट्रात मराठा वर्चस्व आहे तर उर्वरीत महाराष्ट्रात ओबीसी. त्यातही कुणबी वर्चस्व जास्त आहे. ब्राह्मणांचे वर्चस्व प्रशासन आणि पूर्वी बहुराष्ट्रीय कंपन्यात असायचे. आता आयटीत आहे. राष्ट्रीय पक्ष हे बहुत करून ब्राह्मणांचे अंकीत आहेत. माध्यमांमधे ब्राह्मणी वर्चस्व आहे. न्यायव्यवस्थेत ब्राह्मण वर्चस्व आहे.

पण राज्याराज्यात त्या त्या प्रदेशातल्या प्रबळ जातींचे वर्चस्व आहे.
मी आता जेव्हां विचार करतो तेव्हां ज्या समूहांना कुठेच प्रतिनिधित्व नाही, त्यांना आपल्या तक्रारी मांडताना, समस्या मांडताना किती अडचणी येत असतील असा विचार येतो. तरी देखील माझ्या पेक्षा कनिष्ठ समूहांचे प्रश्न मला भिडतात असा माझा दावा नाही. ज्याप्रमाणे मी पुरूष असल्याने माझ्याकडे स्त्री जाणिवा नाहीत किंवा अन्य जेण्डरच्या जाणिवा असणे शक्य नाही त्यामुळे मला त्यांच्या समस्या जाणवणेही शक्य नाही हे सत्य आहे तसेच जातजाणिवांचेही होत असावे.

मात्र मी जेव्हां मला वरीष्ठ समजून या व्यवस्थेचे फायदे उपटत होतो तेव्हां मला कोणतेही दोष तीत दिसत नव्हते. तसेच माझ्यापेक्षा वरीष्ठ जातींचे होत असावे असे मला आता वाटते.

कदाचित या जातजाणिवांमुळे या व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोण भिन्न भिन्न असावा. यातूनच मतभेदांना सुरूवात होत असावी. हे मतभेद अत्यंत टोकाचे आहेत. इतके की त्यामुळे संघर्षाची ठिणगी पडते.

जातीव्यवस्थेचे मला लाभ वाटत होते तोपर्यंत इतरांच्या नुकसानीची मला पर्वा नव्हती. मी त्याकडे डोळेझाक करीत असे. कदाचित त्यावर चर्चाच होऊ नये असे मला वाटत होते. मी फक्त त्यांचे लक्ष लाभांकडे कसे जाईल आणि ते गुणगाण कसे करतील यास सामोपचाराचे धोरण समजत होतो. माझ्या ठसठासणा-या गळूला धक्का लागू नये त्याप्रमाणे मला लाभ पोहोचवणा-या बाबींकडे लक्ष वेधले जाऊ नये ही माझी हास्यास्पद धडपड आता मला मजेशीर वाटते.

या काळात अनेक लोकांशी संपर्क आला. उत्तम श्रोता असल्याने मी ते ऐकत गेलो. वाचत गेलो. मी फुले आंबेडकरी साहीत्य वाचत गेलो. अंतर्बाह्य बदलत गेलो. मी कधीही हिंदुत्ववादी पक्षांचा नव्हतो. मात्र सौम्य हिंदुत्ववादी होतोच. त्यामुळे फारसे काही विशेष वाटत नव्व्हते.

आपण जर देश सोडून गेलो तर आपल्याला या काळ्या वास्तवापासून सुटका मिळेल असे विचार मनात घोळू लागले होते.
मात्र एका मित्राने आपले अनुभव शेअर केले आहेत. त्याने ते फेसबुकवर सुद्धा मांडले. त्याला देशभरात प्रसिद्धी मिळत आहे.

त्याच्या म्हणण्यानुसार तो परदेशात स्थायिक झाला होता. तिथे भारतीयांना पाहून त्याचे देशप्रेम जागृत झाले ( कदाचित आपला माणूस परदेशात भेटणे यामुळे सुरक्षित वाटले असावे). त्याने त्याच्याशी दोस्ती केली. त्याच्यामुळे अनेक भारतियांशी मैत्री झाली. पुढे त्याला अनेक ठिकाणी बोलावले जाऊ लागले. ते ही घरी येत. सण, उत्सव साजरे होते. हे सर्व पंजाबी होते. पंजाबी उत्सवप्रिय असतात. सतत सेलिब्रेशन मूड मधे असतात. हे दिवस आनंदात गेले.

पुढे तो त्याच्या सोशल अकाउंटवरून भारतातल्या जातव्यवस्थेबाबत लिखाण करू लागला. त्याचा अकाउंटला नवीन मंडळी सुद्धा होती. त्यांच्या वाचनात हे सर्व येऊ लागले. त्यांना धक्का बसला. हळू हळू या सर्वांनी त्याच्याशी संपर्क कमी केला. पुढे तर त्याला बोलवणे कमी झाले. अगदी लग्नसमारंभात सुद्धा आमंत्रण देणे टाळले जाऊ लागले. आता तर वाळीतच टाकले आहे.

याने एक दोघांना विचारले देखील. पण त्याला उत्तर मिळाले नाही. त्याला इग्नोर करणे चालूच आहे. पहिल्यांदा जो मित्र भेटला त्याच्या घरी हा गेला असता अनवॉण्टेड गेस्ट सारखी ट्रीटमेंट त्याला मिळाली. नंतर सूचकपणे कुछ भी उटपटांग लिखते हो, देश के खिलाफ कुछ भी बकवास करते हो.. हमे डेकोरम मेण्टेन करना है वगैरे वगैरे त्याने कळवले. त्याला कटवले.

हा मित्र यादव आहे. बाकीची पंजाबी मंडळी उच्चजातीची आहेत.
अलिकडे जातव्यवस्थेच्या वास्तवावर बोलणे हा देशद्रोहद्रोहला जातो. प्रतिष्ठीत चर्चेच्या संकेतस्थळावर या विषयावर लिहीणे अप्रतिष्ठीत समजले जाते. भलतेच मुद्दे काढून मूळ विषयाला फाटे फोडण्याचा प्रयत्न होतो. अथवा दाहकता कमी करण्याचा प्रयत्न होतो. अथवा उच्चजातींकडूनच आम्हालाच द्वेषाची वागणूक मिळते म्हणून आम्ही इकडे आलो असा कांगावा केला जातो.

परदेशात उच्चजातींच्या संस्था आहेत. विवाहसंस्था आहेत.
ते त्यांचे स्वातंत्र्य आहेच म्हणा. पण इकडे आल्याने आता खालच्या जातींकडून जातीयवादाचे टोमणे ऐकायला मिळत नाहीत हे सुख आहे असे एकाने सांगितल्याचे मित्राने नमूद केले आहे.

मी सुद्धा अनेक (रेडीफ सारख्या) स्थळांवर परदेशस्थ भारतियांची शेरेबाजी वाचलेली आहे. अत्यंत द्वेषपूर्ण अशी शेरेबाजी करून अब तुम्हारा सडा हुआ संविधान हमारा कुछ उखाड नही सकता असे सांगितलेले असते.

परदेशात गेल्याने आपल्यावर कारवाई होणार नाही हा विचार कदाचित देशात असताना कायद्याने कारवाई होईल म्हणून समंजस रहायला भाग पाडत असेल का ? मी अशी शेरेबाजी कधी केली नाही. कराविशी वाटली नाही. कदाचित सुख अनुभवले पण किमान खालच्यांना हिणवावे अस्से वाटले नाही हा फरक असेल. लिमिटेड का असेना सेक्युलॅरिझम असावा हा. कशाला काय म्हणतात याच्यात मला जायचे नाही. व्याख्यांमधे मला इंटरेस्ट नाही. मी गावातला माणूस आहे. मला माणसामाणसातला व्यवहार कळतो. त्याला साखरेत लपेटून मांडणे आम्हाला जमत नाही. जे आहे ते रोख ठोक बोलायची सवय आहे.

परदेशात गेल्यावर तरी जातीयवादाला गाडण्याची संधी मिळू शकते. पण तसे होत नाही हे दुर्दैवी आहे.
मराठी लोक असे वागतात का ? उघड वागत नसतील ही खात्री आहे. पण एखाद्याचे विचार कळाल्यानंतर देखील त्याला आपल्यात स्थान मिळते का ? असे म्हणण्याचे कारण म्हणजे देशातून येणा-यात निम्न जातींची आता कुठे सुरूवात आहे. तर वरीष्ठ जाती तिकडे किमान तीन पिढ्यांपासून सेटल झालेल्या आहेत.

त्यांचे जे सांस्कृतिक जग आहे, त्यात वेगळ्या विचाराला स्थान आहे का ?
मी जर उद्या गेलो आणि मी गणपती बसवणार नाही, वर्गणी देणार नाही, मी शिवजयंती करणार, फुले जयंती करणार, शाहू जयंती करणार असे म्हणू लागलो तर माझ्या विचारांचा सन्मान होतो का ? की पंजाब्यांप्रमाणे इथेही वागतात ?
कम्फर्ट लेव्हलप्रमाणे आपल्या संस्कृतीचा मनुष्य आपल्या सर्कलमधे असावा हे स्वाभाविक आहे. मात्र रॅशनलिस्ट्स, पुरोगामी यांच्याकडून थोड्या अपेक्षा असतात. त्या अपेक्षांप्रमाणे ते माझ्याशी वागतील का ?

की परदेशात गेल्यावर थेट आपल्या विचारांचे लोक शोधून मी त्यांच्याशीच मैत्री करावी आणि आपला कम्फर्ट झोन शोधावा ?
(परदेशात जाईन की नाही हे माहीत नाही. मी हा तात्विक प्रश्न विचारला आहे)

कृपया , या लेखाचा उद्देश कुणालाही न दुखावणे हा आहे. मला ज्यावर चर्चा करायची आहे तो विषय समजावून घेऊन चर्चा करावी ही नम्र विनंती. माझे लिखाण प्रक्षोभक, आक्षेपार्ह किंवा खोडसाळ वाटल्यास आपण ते काढू शकता. मात्र जर या ठिकाणी चर्चा झाली तर आनंद होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅडमिनला कळवले आहे. त्यांनी निर्णय घ्यावा. तुम्हाला पटण्यासाठी किंवा पटवण्यासाठी लिहीले नाही. विचारलेच आहे तर शेरेबाजी बंद करा आणि वैयक्तिक न होता लिहा. मायबोलीचे नुकसान झाले की फायदा याची काळजी तुम्ही करण्यची गरज नाही असे माझे मत आहे. यावर शेरेबाजी करायची असेल तर मला माझा मार्ग खुला आहे. विचारले म्हणून उत्तर दिले. नाहीतर गरज नव्हती.

अ‍ॅडमिनला कळवले आहे. त्यांनी निर्णय घ्यावा. तुम्हाला पटण्यासाठी किंवा पटवण्यासाठी लिहीले नाही. विचारलेच आहे तर शेरेबाजी बंद करा आणि वैयक्तिक न होता लिहा. मायबोलीचे नुकसान झाले की फायदा याची काळजी तुम्ही करण्यची गरज नाही असे माझे मत आहे. यावर शेरेबाजी करायची असेल तर मला माझा मार्ग खुला आहे. विचारले म्हणून उत्तर दिले. नाहीतर गरज नव्हती.

Submitted by म्याऊ on 30 July, 2019 - 07:51 >>

म्याऊ ताई, मी तुझ्यावर वैयक्तिक शेरेबाजी केली याचे काय पुरावे तुझ्याकडे आहेत?

माझा आयडी ट्रोलिंग लिजंड आहे, मायबोलीवरची कीड आहे असे काहीही असंबद्ध तू कुठलाही संबंध नसताना लिहिले. त्याची तक्रार केलीस की नाही?

तुझं जे काही चाललंय त्यालाच ट्रोलिंग म्हणतात.

> मुळात ठराविक संख्येने प्रतिनिधी "निवडून" यावेत ही अपेक्षाच लोकशाहीशी विसंगत आहे. त्याऐवजी किती प्रतिनिधी निवडणुकीला उभे राहू शकले >
आरक्षण म्हणजे प्रत्येक जातीजमातीलिंग यांना शिक्षण, सरकारी नोकरी आणि राजकारण या तीन क्षेत्रात योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे म्हणून केलेली नियमावली आहे. त्यामुळे केवळ निवडणुकीला उभे राहून चालणार नाही, निवडून यायला हवेत.

> किंवा एखाद्या समाजाची आर्थिक व शैक्षणिक स्थिती कशी आहे, त्या समाजातील मुलांची शाळेतील उपस्थिती किती आहे, पालकांना शिक्षणाचे महत्त्व वाटते की नाही व किती तरुण पदवीधर शिक्षणापर्यंत मजल मारतात असे व आणखीही काही निकष बरोबर ठरतील. > याचा 'राजकारणातील आरक्षणाचा दर १० वर्षांनीआढावा घ्यावा' याच्याशी काय संबंध आहे?

> मुळात ठराविक संख्येने प्रतिनिधी "निवडून" यावेत ही अपेक्षाच लोकशाहीशी विसंगत आहे. त्याऐवजी किती प्रतिनिधी निवडणुकीला उभे राहू शकले >
आरक्षण म्हणजे प्रत्येक जातीजमातीलिंग यांना शिक्षण, सरकारी नोकरी आणि राजकारण या तीन क्षेत्रात योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे म्हणून केलेली नियमावली आहे. त्यामुळे केवळ निवडणुकीला उभे राहून चालणार नाही, निवडून यायला हवेत. >>>

(पुढील प्रश्न मी आधी विचारायला हवा होता) एखादा मतदारसंघ आरक्षित असतो, तिथेही आरक्षित गटात नसलेले लोक निवडून येतात असे तुमचे मत आहे का? योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व म्हणजे नक्की काय आणि त्याचे निकष कोण बनवतो? हे निकष 1950 पासून तसेच आहेत की बदलले जातात?

> याचा 'राजकारणातील आरक्षणाचा दर १० वर्षांनीआढावा घ्यावा' याच्याशी काय संबंध आहे? >> कारण त्यावरून समाजाची स्थिती समजून येते.

एखाद्या समाजाची संख्याच कमी असेल तर अशा समाजाची संख्या निवडणुकीत प्रभाव पाडू शकत नाही. त्या वेळी शैक्षणिक जागृती, आर्थिक व शैक्षणिक स्थिती व शिक्षण पूर्ण करण्याकडे कल आहे की नाही, अशाच बाबी पहिल्या जाव्यात व त्यात कमतरता असेल तर प्रतिनिधी निवडून येण्याची वाट पाहण्या ऐवजी त्या समस्यांवर उपाययोजना करावी असे माझे मत आहे.

> (पुढील प्रश्न मी आधी विचारायला हवा होता) एखादा मतदारसंघ आरक्षित असतो, तिथेही आरक्षित गटात नसलेले लोक निवडून येतात असे तुमचे मत आहे का? योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व म्हणजे नक्की काय आणि त्याचे निकष कोण बनवतो? हे निकष 1950 पासून तसेच आहेत की बदलले जातात? > 'अनारक्षित मतदारसंघातून आरक्षित जातीचा व्यक्ती निवडणुकीला उभा राहून && निवडून येतो' असे तुमचे निरीक्षण आहे का? किती प्रमाणात?
हे व्हायला चालू झाले आणि तिकडून त्यांना पुरेसे प्रतिनिधीत्व मिळायला लागले की 'आरक्षित मतदारसंघ' किंवा राजकारणातले आरक्षण हा प्रकार बंद होईल.

> एखाद्या समाजाची संख्याच कमी असेल तर अशा समाजाची संख्या निवडणुकीत प्रभाव पाडू शकत नाही. > म्हणजे अल्पसंख्य धर्माचे लोक निवडणुकीत काही फरक पाडत नाहीत त्यामुळे त्या ह्यांचे लांगूलचालन, हे ते कुरवाळणे वगैरे बडबडीला काही अर्थ नाही हे तुम्हाला मान्य आहे तर.

> त्या वेळी शैक्षणिक जागृती, आर्थिक व शैक्षणिक स्थिती व शिक्षण पूर्ण करण्याकडे कल आहे की नाही, अशाच बाबी पहिल्या जाव्यात व त्यात कमतरता असेल तर प्रतिनिधी निवडून येण्याची वाट पाहण्या ऐवजी त्या समस्यांवर उपाययोजना करावी असे माझे मत आहे. > सगळे उपाय सायमलटेनिअसली चालू असतात.

कृपया माझ्यावरून वाद नको. जे लिहायचे ते मी लिहिले आहे. ज्यांना पटायचे त्यांना ते पटेल. वैयक्तिक पातळीवर मला कुणाला उत्तर द्यायचे नाही. कुणी मुद्दा मांडला असता तर कदाचित पुढच्या वेळी पाहिले असते. मायबोलीवर सिद्ध झाल्याने प्रॉब्लेम सुटतात असे वाटत नाही.

अनारक्षित मतदारसंघातून आरक्षित जातीचा व्यक्ती निवडणुकीला उभा राहून && निवडून येतो' असे तुमचे निरीक्षण आहे का? किती प्रमाणात?
हे व्हायला चालू झाले आणि तिकडून त्यांना पुरेसे प्रतिनिधीत्व मिळायला लागले की 'आरक्षित मतदारसंघ' किंवा राजकारणातले आरक्षण हा प्रकार बंद होईल. >>

एखादि व्यक्ती निवडून येते त्यामागे बरेच फॅक्टर्स असतात. फक्त ती आरक्षित समाजातील आहे म्हणून त्या व्यक्तीला कुणीही निवडून देणार नाही. पण अमुक एका समाजाची व्यक्ती योग्य प्रमाणात (ते किती ते कोणाला माहीत आहे?) निवडून येत नाही म्हणून राजकीय आरक्षण चालू ठेवायचे हा इतर सर्व जातींच्या समाजावर केलेला अन्याय आहे. बर अशा आरक्षित व्यक्ती किती प्रमाणात निवडून याव्यात त्याचे निकष कोण ठरवतो वा 1950 पासून ते निकष बद्दललेत का हे तुम्हाला माहीत नाही असे दिसतेय (मलाही माहिती नाही , पण तुम्हाला माहिती असेल म्हणून विचारले होते).

जर निकषांबद्धलच माहिती नसेल तर आरक्षण हा प्रकार कधी बंद होईल याची भविष्यवाणी ना केलेली बरी.

------------
म्हणजे अल्पसंख्य धर्माचे लोक निवडणुकीत काही फरक पाडत नाहीत त्यामुळे त्या ह्यांचे लांगूलचालन, हे ते कुरवाळणे वगैरे बडबडीला काही अर्थ नाही हे तुम्हाला मान्य आहे तर. >>

नाही तुम्ही लिहिलंय ते मी कधीही लिहिलं नाही व मला ते मान्य नाही. कारण जातीनिहाय आरक्षण व ज्यांचे लांगुलचालन केले जाण्याचा आरोप होतो तो समाज यांचा एकमेकांशी काहीही संबंन्ध नाही.

संजय पगारे आणि अ‍ॅमी - तुमच्या पोस्टी आवडल्या... विचार करायला लावणार्‍या आहेत. धन्यवाद.

>>मी-माझा आणि खरा पुणेकर हे मायबोलीवरची कीड आहेत. यांचा बंदोबस्त अ‍ॅडमिन महोदयांनी करावा ही विनंती.

Submitted by म्याऊ on 30 July, 2019 - 07:29<<

हा नक्कीच संभ्रमुद्दीन आहे Rofl

अ‍ॅमी
खूप समजूतदार पोस्ट्स आहेत. मात्र आरक्षणाबद्दल इथे विषय नसल्याने मी ते टाळले होते. आता आलाच आहे तर..
राजकीय आरक्षण हे सर्वसाधारण मतदारसंघातून राखीव म्हणून दिल्यास त्या मतदारघातला राखीव उमेदवार आपला अजेण्डा रेटू शकत नाही. यासाठी विभक्त मतदारसंघाची मागणी झाली. ती मान्यही झाली मात्र पुणे करारान्वये विभक्त मतदारसंघ सोडून द्यावा लागला. पुढे राखीव मतदारसंघात सवर्ण पकपक्षाचे गुलाम असणारे उमेदवार निवडून आले ज्यांना स्वतःचा अजेण्डा नव्हता आणि असता तरी पक्षशिस्तीपुढे तो रेटणे शक्य नव्हते. त्यामुळे राखीव मतदारसंघ कुचकामी ठरले. यासाठी १० वर्षांनंतर राजकीय आरक्षण संपवले जावे असे बाबासाहेबांनी मत मांडले होते. हे मत मात्र हिंदुत्ववाद्यांना आणि ब्राह्मणवाद्यांना प्रमाण वाटते. आणि ते विपर्यास करून नेहमी मांडले जाते. यासाठीच संदर्भ मागितले होते. ते संदर्भ कुणाकडेच नसतात.

मी आत्ता जे लिहीणार आहे ते मायबोलीसारख्या प्लॅटफॉर्मवर कधीही येऊन गेले नसेल तर दुर्दैव आहे.

बाबासाहेब हे द्रष्टे नाहीत असे म्हणणा-यांची आरक्षणाबाबत कोल्हेकुई चालू असते की जगाच्या अंताबाबत आरक्षण चालू राहणार आहे का ? मुळात याच्या सर्व चर्चा उपलब्ध आहेत. अनेक द्रष्ट्या पुरूषांचे म्हणणे ऐकलेले असलेल्या सुशिक्षितांना घटना समितीतल्या चर्चा माहीत नसाव्यात याचा खेद वाटतो.

आरक्षण का आहे याचे दाखले पाहीले. पण ते पोट भरण्याचे अजिबातच साधन नाही. ते प्रतिनिधित्व आहे. दुर्बल घटकांना शासन , प्रशासन, शिक्ष्ण यात मज्जाव होऊ नये म्हणून कायदेशीर तरतूद आहे. ही तरतूद कधी बंद होईल ? तर दुर्बल घटकांना मज्जाव होईल अशी परिस्थिती राहणार नाही तेव्हां.

उन्नाव ची घटना, खैरलांजी, खर्डा, सहारणपूरचे दंगे, मराठवाड्याचे दंगे, रमाबाई आंबेडकरनगर हत्याकांड आणि अशा लाखो गंभीर गुन्ह्याच्या घटना घडत असतानाही जे आता कुठे जातीयवाद राहीलाय असा प्रश्न विचारतात ते ब्राह्मणवादी होत. त्यांना ही परिस्थिती अशीच ठेवून मलमपट्टीच्या उपाययोजना मात्र गुंडाळायच्या आहेत. साधारण उलट्या काळजाची मंडळी ज्याप्रमाणे हत्याकांडांकडे पाहतात तशीच विचारसरणी या मंडळींची असते. हे लोक जाणूनबुजून आरक्षणाची गल्लत मेरीटशी करतात. दोन्हींचा काही एक संबंध नाही.

संजय पगारे भाऊ, तुमच्या मताशी सहमत, आरक्षणाचा व मेरिटचा लांबलांबचाही संबंध नाही.
रेल्वेतील राखीव जागांच्या भरतीत, नापासांतल्या उत्तम लोकांना निवडले गेले तेव्हा तुम्ही सांगताय त्यावर शिक्कामोर्तबच झाले. शेवटी प्रतिनिधित्व महत्वाचे आहे, मेरिट वा क्वालिटीला ऑप्शन ला टाकलं तरीही चालतं....

अ‍ॅमी , अतिशय समंजस पोस्ट्स.
एकटीने किल्ला लढवलात तर.

Submitted by संजय पगारे on 30 July, 2019 - 19:27 >>>
माझ्यातर्फेही किल्ला लढवल्याबद्धल हार्दिक अभिनंदन, पण किल्ला लढवला म्हणजे नक्की काय ते कोण सांगेल बरं? काही ending notes वगैरे...?

खरा पुणेकर आणि मी-माझा म्हणजे मंदार जोशी आणि बेफिकीर यांची जोडी शोभावी अशी जोडी आहे. पण बेफिकीर हे मंदार जोशीप्रमाणेच असंवेदनशील, खुनशी जरी असले तरी सामाजिक आकलनाच्या बाबतीत इतकेच अर्धवट आणि अडाणचोट आहेत का ? असतील बुवा. नेहमीच्या आयडीने पांघरूण घेताना ओढाताण होत असेल इतकेच.
बाकी मेरीट हल्ली सगळीकडेच व्हायरल होतांना दिसतंय. Lol
अंगाशी आलं की हे मेरीट आमचं नाहीच म्हणून झटकून टाकताहेत. Lol

कित्येक हजार वर्षे ओरबाडून फुकट खाल्ल्यावरचा माज आहे हा.

काही लोकान्च आता एकच जीवनध्येय आहे, ते म्हणजे खरा पुणेकर व मी-माझा या दोन आयडीन्ना काहीही/ कसेही करुन डिवचणे व प्रशासकान्ना हे दोन आयडी उडवायला लावणे !

लहानपणी ऐकलेली गोष्ट बुड बुड घागरी आणि एक प्रचलित म्हण मांजर डोळे मिटुन दूध पीते ....
एकूण काय तर अनेक शेकडो हजारो वर्षे मांजर कुलोत्पन्न फुकटचे खात असतात हे जगजाहिर आहे Light 1
आता ती मांजर भटाघरची की वाण्याकडची ते ती मांजरच जाणो बुवा !

जाऊ द्या ने बे, ब्राह्मण काय ब्राह्मणवाद काय? काय फरक पडतो? जास्त अंगावर आलं त ब्राह्मणांनी मस्त धर्मांतर करून किरीस्ताव होऊन जावं हे माझं प्रामाणिक मत आहे.
म्हणजे ह्या सगळ्या वाद्यांवाल्यांवर मस्त अल्पसंख्यांकवाद फेकता येतो Wink

तसही भारतात लोकशाही अजून फारफारतर 20 किवा 30 वर्ष टिकेल. नंतर एकतर आर्यावर्त किंवा गझवा ए हिंद पैकी एक यशस्वी होऊन सगळ खलास होणारच.

तेव्हा काळाची पावलं ओळखून सर्वांनी निर्णय घ्यावा.

माझ्या लहानपापासून आतापर्यंत चा जातीवाद विषयी अनुभव वरून हे सांगू शकतो की .
काळानुसार जातीवाद ची तीव्रता कमी झाली आहे ती पूर्णतः नष्ट झाला आहे असे म्हणता येणार नाही .
जातीवाद पूर्ण नष्ट करायचा असेल तर द्वेषाचे राजकारण केले जावू नये .
जाती जाती मध्ये द्वेष निर्माण होईल अशा विचारणा तिलांजली देणे गरजेचं आहे .
सर्वांना बरोबर घेवून जाणाऱ्या समाजसुधारक आणि राजकीय नेतृत्वाची गरज आहे आणि त्याचीच उणीव सध्या जाणवत आहे.
दहा प्रसंगात ९ प्रसंग चांगले असतील आणि १ प्रसंग खराब असेल तर अपवाद समजून त्या प्रसंगाला हवा दिली जावू नये .
जबाबदारी सर्वांची आहे .
प्रत्येका नी स्वतः मध्ये जरी बदल करायचा ठरवला तरी एकदिवस जात विरहित समाज नक्की निर्माण होईल

काळानुसार जातीवाद ची तीव्रता कमी झाली आहे ती पूर्णतः नष्ट झाला आहे असे म्हणता येणार नाही >>>> ज्या दिवशी जातीवरून मिळालेले आरक्षण संपूर्णपणे रद्द होऊन ते फक्त जात किंवा धर्म न पाहता फक्त आर्थिक निकषांवर दिले जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने जातीवाद नष्ट होईल. तोपर्यंत कितीही नाही म्हणले तरी तो राहिलंच. लोकशाहीमध्ये तरी जातीवाद नष्ट होणे जवळपास अशक्य आहे. मतांच्या राजकारणासाठी ते आवश्यक आहे....त्यामुळे निदान पुढची १०० वर्षे तरी जातीवाद नष्ट होईल असे वाटत नाही.

<< काळानुसार जातीवाद ची तीव्रता कमी झाली आहे ती पूर्णतः नष्ट झाला आहे असे म्हणता येणार नाही >>>> ज्या दिवशी जातीवरून मिळालेले आरक्षण संपूर्णपणे रद्द होऊन ते फक्त जात किंवा धर्म न पाहता फक्त आर्थिक निकषांवर दिले जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने जातीवाद नष्ट होईल. तोपर्यंत कितीही नाही म्हणले तरी तो राहिलंच. लोकशाहीमध्ये तरी जातीवाद नष्ट होणे जवळपास अशक्य आहे. मतांच्या राजकारणासाठी ते आवश्यक आहे....त्यामुळे निदान पुढची १०० वर्षे तरी जातीवाद नष्ट होईल असे वाटत नाही. >>

--------- हे कशाच्या आधारावर ? जातीवरुन आरक्षण देण्याआधीच्या काळात जातीयवाद अजिबातच नव्हता का?

जातीवरुन आरक्षण देण्याआधीच्या काळात जातीयवाद अजिबातच नव्हता का?

नवीन Submitted by उदय on 15 August, 2019 - 06:37 >>>

त्याकाळची व आताची सामाजिक परिस्थिती सारखी आहे का? त्या काळाशी आताच्या काळाशी तुलना करून उपयोग काय? उलट आता लोक जाती विसरून जायला बघतात तेव्हा कुठल्या ना कुठल्या कारणाने जातीयवाद समोर येतो आणि जातींची आठवण करुन देतो. आणि असा जातीयवाद पुढे आणणार्यात स्वतःला जातनिरपेक्ष म्हणवणारे व टीआरपीसाठी काहीही करणारे पत्रकार पुढे असतात, कारण ते अगदी वेचून वेचून जातींशी संबंधित वाईट गोष्टी पुन्हा पुन्हा समाजाच्या समोर ठळक करतात व जे लोक जात मनातही न आणता रोजचे व्यवहार करत असतात, ते अशा गोष्टी पाहून अस्वस्थ होतात. त्याऐवजी नुसत्या पत्रकारांनी जरी फक्त सकारात्मक गोष्टी पुढे आणल्या तर लोकांना इतर लोक जातीयवादाला कशी तिलांजली देतात हे दिसेल व त्यांना तसे करायला प्रोत्साहन मिळेल.

नवीन Submitted by मी-माझा on 14 August, 2019 - 21:34 >>> बरोबर. काळ बदलत असताना आणि जातीयवादाच्या रेषा पुसत होत असतानाच काही ना काही कारणावरून गरजेनुसार जात आणि काही वेळेला धर्म मध्ये आणला जातो आणि दरी निर्माण करायचा प्रयत्न केला जातो आणि सद्यस्थितीत याचे महत्वाचे कारण राजकीय लाभ हेच आहे असे प्रकर्षाने जाणवते.

Pages