देशी ब्राह्मणवादास सीमारेषा सुद्धा अडवू शकत नाहीत काय ?

Submitted by कांदामुळा on 14 July, 2019 - 00:53

मला अशा गोष्टी व्यवस्थित मांडण्याचा अनुभव कमीच आहे. थेटच मुद्द्यावर येतो.

भारतात त्यातही महाराष्ट्रात राहून मला जातीयवाद म्हणजे काय हे जाणवलं नव्हतं. माझ्या दृष्टीने उच्च असणारी माझी जात, खालच्या जातीच्या माणसाला पाहून किंचितसुखावणारा) सुखावणारा माझा अंहं, मला एकंदर जातव्यवस्थेत मी कुठे आहे हे समजू देत नव्हती. त्यातही जरा सत्ता उपभोगणा-या घराण्यात जन्म झाल्याने सगळे कसे रूबाबात चालले होते. त्यामुळे जातीयवादाबाबत बोलणा-यांना मी तुच्छ समजत होतो.

पण कॉलेजच्या प्रवेशाला वडलांनी जात प्रमाणपत्र काढून आणले तेव्हां मी ओबीसी प्रवर्गात मोडत असल्याचे मला समजले. हा माझ्या दृष्टीने धक्काच होता. मागासवर्गीय या शब्दाचा मला अत्यंत तिटकारा होता. पण माझ्या नावाला हा शब्द जोडला गेला. पण थोड्याच दिवसात सर्वच जण बिनदिक्कतपणे जातीचा अर्ज आणतात आणि प्रतिष्ठीत म्हणूनही वावरतात हे सवयीचे झाले. पुन्हा सर्व पूर्ववत झाले.

मध्यंतरी आम्ही मोटरसायकल्स वर राजस्थानात गेलो होतो. तेव्हां मात्र स्व अभिनामाच्या ठिक-या उडाल्या. राजस्थानात ब्राह्मण आणि राजपूत सोडले तर सर्वच जण पिछडा म्हणजे शूद्र समजले जातात. आम्हाला थेटच जात विचारायचे. माझी जात सांगितली की अरे भाई ब्राह्मण हो ? क्षत्रिय हो ? असे विचारले जायचे. या दोन्ही प्रश्नांना नकारार्थी उत्तरे दिली की मग याने शूद्र हो असा प्रश्न यायचा. हा अनुभव जवळपास सर्वच ठिकाणी आला. शूद्रांना पाणी देताना आजही राजस्थानात वेगळे भांडे दिले जाते. आम्ही सांगितले की महाराष्ट्रात आम्हाला खूप मान आहे. आम्ही सवर्ण आहोत. पण ते सांगायचे की आम्ही वर्ण बघतो. जे या दोन वर्णाचे नाहीत ते सर्वच शूद्र म्हणजे पिछडा. एकाने विचारले की ओबीसी मे आते हो का ? मी हो म्हटल्यावर तो हसला. म्हणजे या पुढे मी काय समजावणार ?

त्यांच्या हे सर्व अंगवळणी पडलेले आहे. महाराष्ट्रात इतकी उघड जातव्यवस्था नाही. त्यामुळे मध्यमजातींना ती जाणवत नाही. यामुळे आपण भारी आहोत असे उगीच वाटते. राजस्थानातल्या अनुभवाने डोळे उघडले. नंतर उत्तर प्रदेश बिहारचे मित्र पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी झाले. त्यांनी जातव्यव्स्थेचे जे वर्णन केले त्यामुळे सुन्नच झालो. इथे जातीचा उल्लेख हा अगदी सर्रास आहे. थोडक्यात जे आहे ते आहे. लपवाछपवी नाही.

मी पहिल्यांदा आमच्या महाराष्ट्रात असे नाही हे सांगायला बघायचो. पण त्यांच्याकडून व्यवस्थित चिरफाड झाली. महाराष्ट्रातही पश्चिम महाराष्ट्रात मराठा वर्चस्व आहे तर उर्वरीत महाराष्ट्रात ओबीसी. त्यातही कुणबी वर्चस्व जास्त आहे. ब्राह्मणांचे वर्चस्व प्रशासन आणि पूर्वी बहुराष्ट्रीय कंपन्यात असायचे. आता आयटीत आहे. राष्ट्रीय पक्ष हे बहुत करून ब्राह्मणांचे अंकीत आहेत. माध्यमांमधे ब्राह्मणी वर्चस्व आहे. न्यायव्यवस्थेत ब्राह्मण वर्चस्व आहे.

पण राज्याराज्यात त्या त्या प्रदेशातल्या प्रबळ जातींचे वर्चस्व आहे.
मी आता जेव्हां विचार करतो तेव्हां ज्या समूहांना कुठेच प्रतिनिधित्व नाही, त्यांना आपल्या तक्रारी मांडताना, समस्या मांडताना किती अडचणी येत असतील असा विचार येतो. तरी देखील माझ्या पेक्षा कनिष्ठ समूहांचे प्रश्न मला भिडतात असा माझा दावा नाही. ज्याप्रमाणे मी पुरूष असल्याने माझ्याकडे स्त्री जाणिवा नाहीत किंवा अन्य जेण्डरच्या जाणिवा असणे शक्य नाही त्यामुळे मला त्यांच्या समस्या जाणवणेही शक्य नाही हे सत्य आहे तसेच जातजाणिवांचेही होत असावे.

मात्र मी जेव्हां मला वरीष्ठ समजून या व्यवस्थेचे फायदे उपटत होतो तेव्हां मला कोणतेही दोष तीत दिसत नव्हते. तसेच माझ्यापेक्षा वरीष्ठ जातींचे होत असावे असे मला आता वाटते.

कदाचित या जातजाणिवांमुळे या व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोण भिन्न भिन्न असावा. यातूनच मतभेदांना सुरूवात होत असावी. हे मतभेद अत्यंत टोकाचे आहेत. इतके की त्यामुळे संघर्षाची ठिणगी पडते.

जातीव्यवस्थेचे मला लाभ वाटत होते तोपर्यंत इतरांच्या नुकसानीची मला पर्वा नव्हती. मी त्याकडे डोळेझाक करीत असे. कदाचित त्यावर चर्चाच होऊ नये असे मला वाटत होते. मी फक्त त्यांचे लक्ष लाभांकडे कसे जाईल आणि ते गुणगाण कसे करतील यास सामोपचाराचे धोरण समजत होतो. माझ्या ठसठासणा-या गळूला धक्का लागू नये त्याप्रमाणे मला लाभ पोहोचवणा-या बाबींकडे लक्ष वेधले जाऊ नये ही माझी हास्यास्पद धडपड आता मला मजेशीर वाटते.

या काळात अनेक लोकांशी संपर्क आला. उत्तम श्रोता असल्याने मी ते ऐकत गेलो. वाचत गेलो. मी फुले आंबेडकरी साहीत्य वाचत गेलो. अंतर्बाह्य बदलत गेलो. मी कधीही हिंदुत्ववादी पक्षांचा नव्हतो. मात्र सौम्य हिंदुत्ववादी होतोच. त्यामुळे फारसे काही विशेष वाटत नव्व्हते.

आपण जर देश सोडून गेलो तर आपल्याला या काळ्या वास्तवापासून सुटका मिळेल असे विचार मनात घोळू लागले होते.
मात्र एका मित्राने आपले अनुभव शेअर केले आहेत. त्याने ते फेसबुकवर सुद्धा मांडले. त्याला देशभरात प्रसिद्धी मिळत आहे.

त्याच्या म्हणण्यानुसार तो परदेशात स्थायिक झाला होता. तिथे भारतीयांना पाहून त्याचे देशप्रेम जागृत झाले ( कदाचित आपला माणूस परदेशात भेटणे यामुळे सुरक्षित वाटले असावे). त्याने त्याच्याशी दोस्ती केली. त्याच्यामुळे अनेक भारतियांशी मैत्री झाली. पुढे त्याला अनेक ठिकाणी बोलावले जाऊ लागले. ते ही घरी येत. सण, उत्सव साजरे होते. हे सर्व पंजाबी होते. पंजाबी उत्सवप्रिय असतात. सतत सेलिब्रेशन मूड मधे असतात. हे दिवस आनंदात गेले.

पुढे तो त्याच्या सोशल अकाउंटवरून भारतातल्या जातव्यवस्थेबाबत लिखाण करू लागला. त्याचा अकाउंटला नवीन मंडळी सुद्धा होती. त्यांच्या वाचनात हे सर्व येऊ लागले. त्यांना धक्का बसला. हळू हळू या सर्वांनी त्याच्याशी संपर्क कमी केला. पुढे तर त्याला बोलवणे कमी झाले. अगदी लग्नसमारंभात सुद्धा आमंत्रण देणे टाळले जाऊ लागले. आता तर वाळीतच टाकले आहे.

याने एक दोघांना विचारले देखील. पण त्याला उत्तर मिळाले नाही. त्याला इग्नोर करणे चालूच आहे. पहिल्यांदा जो मित्र भेटला त्याच्या घरी हा गेला असता अनवॉण्टेड गेस्ट सारखी ट्रीटमेंट त्याला मिळाली. नंतर सूचकपणे कुछ भी उटपटांग लिखते हो, देश के खिलाफ कुछ भी बकवास करते हो.. हमे डेकोरम मेण्टेन करना है वगैरे वगैरे त्याने कळवले. त्याला कटवले.

हा मित्र यादव आहे. बाकीची पंजाबी मंडळी उच्चजातीची आहेत.
अलिकडे जातव्यवस्थेच्या वास्तवावर बोलणे हा देशद्रोहद्रोहला जातो. प्रतिष्ठीत चर्चेच्या संकेतस्थळावर या विषयावर लिहीणे अप्रतिष्ठीत समजले जाते. भलतेच मुद्दे काढून मूळ विषयाला फाटे फोडण्याचा प्रयत्न होतो. अथवा दाहकता कमी करण्याचा प्रयत्न होतो. अथवा उच्चजातींकडूनच आम्हालाच द्वेषाची वागणूक मिळते म्हणून आम्ही इकडे आलो असा कांगावा केला जातो.

परदेशात उच्चजातींच्या संस्था आहेत. विवाहसंस्था आहेत.
ते त्यांचे स्वातंत्र्य आहेच म्हणा. पण इकडे आल्याने आता खालच्या जातींकडून जातीयवादाचे टोमणे ऐकायला मिळत नाहीत हे सुख आहे असे एकाने सांगितल्याचे मित्राने नमूद केले आहे.

मी सुद्धा अनेक (रेडीफ सारख्या) स्थळांवर परदेशस्थ भारतियांची शेरेबाजी वाचलेली आहे. अत्यंत द्वेषपूर्ण अशी शेरेबाजी करून अब तुम्हारा सडा हुआ संविधान हमारा कुछ उखाड नही सकता असे सांगितलेले असते.

परदेशात गेल्याने आपल्यावर कारवाई होणार नाही हा विचार कदाचित देशात असताना कायद्याने कारवाई होईल म्हणून समंजस रहायला भाग पाडत असेल का ? मी अशी शेरेबाजी कधी केली नाही. कराविशी वाटली नाही. कदाचित सुख अनुभवले पण किमान खालच्यांना हिणवावे अस्से वाटले नाही हा फरक असेल. लिमिटेड का असेना सेक्युलॅरिझम असावा हा. कशाला काय म्हणतात याच्यात मला जायचे नाही. व्याख्यांमधे मला इंटरेस्ट नाही. मी गावातला माणूस आहे. मला माणसामाणसातला व्यवहार कळतो. त्याला साखरेत लपेटून मांडणे आम्हाला जमत नाही. जे आहे ते रोख ठोक बोलायची सवय आहे.

परदेशात गेल्यावर तरी जातीयवादाला गाडण्याची संधी मिळू शकते. पण तसे होत नाही हे दुर्दैवी आहे.
मराठी लोक असे वागतात का ? उघड वागत नसतील ही खात्री आहे. पण एखाद्याचे विचार कळाल्यानंतर देखील त्याला आपल्यात स्थान मिळते का ? असे म्हणण्याचे कारण म्हणजे देशातून येणा-यात निम्न जातींची आता कुठे सुरूवात आहे. तर वरीष्ठ जाती तिकडे किमान तीन पिढ्यांपासून सेटल झालेल्या आहेत.

त्यांचे जे सांस्कृतिक जग आहे, त्यात वेगळ्या विचाराला स्थान आहे का ?
मी जर उद्या गेलो आणि मी गणपती बसवणार नाही, वर्गणी देणार नाही, मी शिवजयंती करणार, फुले जयंती करणार, शाहू जयंती करणार असे म्हणू लागलो तर माझ्या विचारांचा सन्मान होतो का ? की पंजाब्यांप्रमाणे इथेही वागतात ?
कम्फर्ट लेव्हलप्रमाणे आपल्या संस्कृतीचा मनुष्य आपल्या सर्कलमधे असावा हे स्वाभाविक आहे. मात्र रॅशनलिस्ट्स, पुरोगामी यांच्याकडून थोड्या अपेक्षा असतात. त्या अपेक्षांप्रमाणे ते माझ्याशी वागतील का ?

की परदेशात गेल्यावर थेट आपल्या विचारांचे लोक शोधून मी त्यांच्याशीच मैत्री करावी आणि आपला कम्फर्ट झोन शोधावा ?
(परदेशात जाईन की नाही हे माहीत नाही. मी हा तात्विक प्रश्न विचारला आहे)

कृपया , या लेखाचा उद्देश कुणालाही न दुखावणे हा आहे. मला ज्यावर चर्चा करायची आहे तो विषय समजावून घेऊन चर्चा करावी ही नम्र विनंती. माझे लिखाण प्रक्षोभक, आक्षेपार्ह किंवा खोडसाळ वाटल्यास आपण ते काढू शकता. मात्र जर या ठिकाणी चर्चा झाली तर आनंद होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जन्माधारित विषमता उत्तर हिंदुस्थानात अजूनही तीव्र आहे. वर वर पाहाता जे उच्चवर्णीय दिसत नाहीत त्यांना हाड हुड होताना पाहिले आहे. महाराष्ट्रात सध्यातरी इतकी तीव्रता सरसकट सर्वत्र नसावी. तीस चाळीस वर्षापूर्वी थोडीफार असावी. घरातल्या अतिवृद्ध माणसांच्या बरोबर नेलेल्या मदतनिसांचे सकाळी सकाळी पायरीवर तोंड पाहावे लागले म्हणून आळंदीच्या माऊली मंदिरात सोवळ्यातल्या पुजाऱ्यांनी शिव्या दिलेल्या आणि बाजूला हटायला अंगावर धावून सांगितलेले अजूनही कानात घुमते. तेव्हा त्यातला विखार तेव्हढासा जाणवला नव्हता पण आता जाणवतो. त्यानंतर आमच्या घरातली तीर्थयात्रा कमी झाली. सध्या असे होत नसावे, फक्त अस्वच्छता आणि बेशिस्त असावी असे अनेक वृत्तांतांवरून वाटते.

सध्या असे होत नसावे, >>>>>>
मध्यंतरी दलित राष्ट्रपतींना प्रवेश नाकारला, की धक्काबुक्की झाली अशी काहीशी न्यूज वाचली होती.

नरेंद्र जाधवांना देखील मंदिर प्रवेश नाकारला होता (ऑन रेग्युलर बेसिस) वगैरे वाचले आहे

अनेक ब्राह्मणांना आपल्या जातीचा एक विशिष्ट समज आहे, आणि तो झिरपत झिरपत व्यवस्थित पसरलेला आहे. बळी तो कान पिळी म्हणताना, ब्राह्मणांनी बळी कुणाला ठरवायचे हा हक्कच आपल्याकडे राखून ठेवला. आजही तो ताठा अनेक ब्राह्मण लोकांत स्पष्ट दिसून येतो. त्यानंतर येतात तथाकथित बुद्धिजीवी.. आम्ही जात मानीत नाही, दलितांना आम्ही सामावून घेतो म्हणणारे हे लोक, पण या वाक्यातच हिपोक्रसी दिसून येते. या लोकांनी नीट आरशात पाहिले तर यांचे यांना कळेल की आपण जे बोलतो, लिहितो, ते आपणच आचरणात आणीत नाही.
काही काही अपवाद मात्र जरूर आहेत, जसे अतुल कुळकर्णी.

आणि या लेखाच्या निमित्ताने अजून एक मुद्दा पुढे आणावासा वाटतो, तो म्हणजे गेल्या निवडणुकीपासून आपण सारे एक आहोत, फक्त धर्माच्या नावाने एक व्हा, हिंदुत्व वगैरे फालतूगिरी, अगदी इथेच एका प्रतिसादात सुद्धा ती दिसून आली, आणि त्यावर लगोलग दुसऱ्या एका id ने आक्षेप देखील घेतला.. जी फक्त आणि फक्त मत मिळवण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड आहे, दुर्दैवाने ती यशस्वीदेखील ठरली!

चांगली चर्चा चालू आहे.

मोठा प्रतिसाद लिहला असेल तर cntr A - cntr C करून मगच Save बटन क्लिक करायची सवय लावून घ्या सगळ्यांनी.

मोठा प्रतिसाद लिहला असेल तर cntr A - cntr C करून मगच Save बटन क्लिक करायची सवय लावून घ्या सगळ्यांनी. >>> ++१

मायबोलीच्या विंडोत प्रतिसाद लिहीला आणि सेव्ह करताना चुकून बॅकस्पेस दाबले गेले तर खूप गंमती होतात. बरेचसे स्पेलिंग आपोआपच बदलतात.

फुरोगाम्यांनी, फुरोगाम्यांच्या वापरासाठी, फुरोगाम्यांच्या मदतीने बनवलेल्या फुरोगामी व्याख्या.... Lol

all Hindus for the lynching of an innocent Muslim.
कृपया हे वाक्य पहा. आताच एक गुन्हेगाराला लोकांनी मारहाण केली तर त्याचा फोटो काही लोक कायप्पा, थोपू व इतर ठिकाणी डिपी वर लावताना पाहिलेत. व तो इनोसंट नव्हता असे लोकांचे म्हणणे होते.

हीरा तुमच्या पोस्टस वाचून आश्चर्य वाटले. ब्राह्मणवाद हा शब्द ब्राह्मणांबद्दल नाही असे वेळोवेळी सांगण्यात येते. पण तुमच्या पोस्ट्स वाचून तो ब्राह्मणांबद्दलच आहे असे त्यातून ध्वनित होते.

ब्राह्नणांनी केलेल्या नियमांप्रमाणे आणि त्यांच्या मतानुसार समाज चाले. >>>
काही दयार्द्र ब्राह्मण आणि संतसज्जनही होते पण ते अल्पसंख्य होते. >>>> म्हणजे बाकी सगळे वाईट होते असा अर्थ घ्यायचा का? धर्मसत्ता चालवणारे ब्राह्मण आणि ब्राह्मण जातीतील लोक यात गल्लत झाली आहे.

महाराष्ट्रावर गेली अनेक दशके सत्ता मराठ्यांची आहे असे म्हणणे, किंवा मुसलमानांनी भारतातील जनतेवर अत्याचार केले असे म्हणणे जितके ढोबळ आणि चूक आहे तितकेच हे ही आहे. समाजातील गोष्टींबाबत धार्मिक नियम बनवणारे/राबवणारे काही २-३ टक्के सोडले तर बाकीचे ब्राह्मण जातीतील लोक यात कोठेच नव्हते. एकूण ही व्यवस्था निर्माण करण्यात त्यांचा काहीच वेगळा हात नव्ह्ता. समाजातील तथाकथित उच्च जातीतील इतर लोक व हे ब्राह्मण यांच्यात काहीच फरक नव्हता.

महाराष्ट्रातील एखाद्या खेड्यातील गरीब मराठा शेतकर्‍याने त्याच्या जातीतील अनेक लोक सरंजामी मानसिकतेचे आहेत, अनेक लोक पिढ्यानपिढ्या सत्तेवर आहेत याचे बॅगेज का म्हणून डोक्यावर घेउन फिरायचे? हे लोक काय करतात याच्याशी त्याचा काय संबंध? वरचे ब्राह्मणांचे उदाहरण तसेच आहे.

विचारवंत लोक ब्राह्मणवाद आणि ब्राह्मण हे वेगळे समजत असले, तरी सर्वसामान्य लोक दोन्ही एकच समजतात याची अनेक उदाहरणे दिसतात. मग असा एका जातीला घाउक दोषी ठरवणारा शब्द का हट्टाने वापरायचा? उद्या कोणीही कोणावर बॉम्ब टाकला तरी त्याला इस्लामी दहशतवाद म्हंटलेले चालेल का? इथे मुस्लिमांनीच केलेल्या दहशतवादालाही इस्लामी दहशतवाद म्हणू नये असे म्हंटले जाते. बाकीच्यांचे तर सोडून द्या. कारण इस्लामी म्हणण्याने त्या सगळ्या समाजाकडे बोट दाखवल्यासारखे होते. ती कर्टसी ब्राह्मणांच्या बाबतीत का नाही?

नवीन Submitted by फारएण्ड on 24 July, 2019 - 20:36>>>> + 1

मग असा एका जातीला घाउक दोषी ठरवणारा शब्द का हट्टाने वापरायचा? >>>> शास्त्र असतं ते.

मला वाटतं , ब्राह्मणवाद ही संज्ञा कशी बनली हे हीरा सांगू पाहत आहेत.
आता अमेरिकन समाजातही, इंग्रजी भाषेत हा शब्द विशिष्ट जात या पलीकडे जाऊन वापरला जातोय म्हटल्यावर आणखी काही लिहायची गरज नसावी.
ब्राह्मणवादावर टीका करणं म्हणजे ब्राह्मणांना दोष देणं नाही, हे इतके वेळा लिहूनही गाडं तिथेच येतं.

भरत, तो अर्थ माहित आहे. पण त्या शब्दाचा नक्की अर्थ माहित असलेले कितीसे असतील? बहुतांश लोक सरसकट तो अर्थ ब्राह्मण जातीसाठी समजतात व ब्राह्मण समाजाबद्दलचा द्वेष व्यक्त करताना वापरतात.. आणि ह्याची तुम्हालाही कल्पना असावी. मग असे असताना गैरसमज होवू देणारा तो शब्द मुद्दाम का वापरावा? तुम्ही किती जणांचं प्रबोधन करणार आणि कसं?

मला स्वत:ला म्हणाल तर ह्या व अश्या अनेक गोष्टींचा राग किंवा अजून काही वाटणे बंद झाले आहे कारण असेच चालू राहणार माहित आहे.

ब्राह्मणवादावर टीका करणं म्हणजे ब्राह्मणांना दोष देणं नाही, हे इतके वेळा लिहूनही गाडं तिथेच येतं. >> तर तो शब्द बदलला पाहिजे. हा अर्थ कंवे करण्यात भाषा/ समाज कमी पडला आहे. इस्लामी दहशतवाद हे चपखल उदा वाटतंय.
>>शास्त्र असतं ते. >>अश्विनी Biggrin

बरोबर.

भरत, ब्राम्हणवाद या concept साठी ब्राम्हण सर्वश्रेष्ठ आहेत हे सर्वांना मान्य असणे आणि ब्राम्हण त्यामुळे अन्यायग्रस्त असू न शकणे हे निकष असावेत. नसावेत का?
आजच्या भारतात हे निकष आहेत का? ब्राम्हणांना सर्वश्रेष्ठ न मानणारे लोकही जातीय हल्ले व अन्याय करतात (ब्राम्हण व इतर अनेक जातींवर). ब्राम्हण हे अनेकदा victim असतात. मग आजच्या जातीयवादाला ब्राम्हणवाद कसं म्हणणार ?
जन्मावर आधारित श्रेष्ठत्व - ब्राम्हणवाद विरोधाचा फलक हाती धरलेले काही पक्ष बघा. त्यांनाही त्यांच्या दिवंगत नेत्याच्या रक्ताचे नातू पणतू नेतेपदी हवे असतात. कुठे नेता जिवंत असतानाच मुलं सुना निवडणूक लढवून पद स्वीकारतात. कुठे महिला नेता अपत्यहीन असेल तर तिचा भाऊ , भाचा पक्ष सांभाळतो. पण हे अधिकृत ब्राम्हणवाद विरोधी पक्ष आहेत. त्यामुळे ते ब्राम्हणवादी आहेत असं म्हणता येत नाही. जन्म श्रेष्ठत्ववादी म्हणजेच जातीयवादी मात्र नक्कीच आहेत.

का जगात कुठेही कोणावर कसलाही जन्मावर आधारित अन्याय झाला तर त्याला ब्राम्हणवादच म्हणायचं असा तुमचा हट्ट आहे?

अमेरिकेबद्दल पुन्हा सांगितलं पाहिजे की तिथे बोस्टन ब्राम्हण ही टर्म रेसिस्ट किंवा व्हाईट सुप्रीमसी या अर्थी अजिबात वापरली जात नाही. या लोकांबद्दल एकूण कौतुकाचा सूर असतो.
तसंच, व्हाईट सुप्रीमसी आणि रेसिझम या दोन वेगळ्या टर्म आहेत. व्हाईट लोकांवरही नॉन व्हाईट लोकांकडून रेसिस्ट हल्ले होतात. त्यालाही व्हाईट सुप्रीमसीच म्हणा असा हट्ट तिथले अतिडावेसुद्धा धरत नाहीत!

फार एंड, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. संपूर्ण समाजाचे वर्तणूकनियम बनवणारी एक संस्था होती आणि या नियम बनवण्याऱ्या संस्थेत फक्त ब्राह्मणच सहभागी असू शकत होते. म्हणून ह्या नियमांनुसार चालणाऱ्या कल्चर अथवा संस्कृतीला ब्राह्मनिकल कल्चर असे म्हणतात. ही एक टर्मिनॉलॉजी आहे. यात द्वेषाचा भाग कुठे आला? क्षत्रियांची राजकीय सत्ता होती. सामाजिक बाबतीत त्यांनाही हे नियम पाळावे लागत. किंबहुना सत्ता कशी राबवावी याचेही नियम ब्राह्मणच बनवीत. समाजवर्तणूकीची घडी घालण्याचे काम ब्राह्मणांकडे होते. शास्त्रे लिहिण्याचे, त्याचा अर्थ लावण्याचे व नियमानुसार समाज चालतो आहे की नाही यावर देखरेख ठेवण्याचे काम ब्राह्मणांचे होतें. सगळे सामाजिक वाद अंतिम निवाड्यासाठी शास्त्रीपंडितांकडे जात. प्रथम लहानसहान गावातले शास्त्री, नंतर जवळची मोठी गावे, मग नगरातली पंडितसभा आणि शेवटी सुप्रीम कोर्ट म्हणजे पैठण, काशी वगैरे धर्मपीठे अश्या पायऱ्या असत. ही तत्कालीन व्यवस्था होती.
आणि मी ब्राह्मणवाद हा शब्द वापरलेला नाही. या शब्दास सध्या लाभलेली द्वेषाची किनार मला अभिप्रेत नाही.
आणि दया हा गुण सार्वत्रिक नसतो. भीरु किंवा पापभीरु असे सामान्य लोक नियमांनुसार वागणे पसंत करतात. ते या नियमांच्या योग्यायोग्यतेची चिकित्सा करीत बसत नाहीत. बरेवाईटपणा तपासत बसत नाहीत. हे सामान्य लोक बहुसंख्य असतात. आणि रूढीनियमाच्या योग्यायोग्यतेची चिकित्सा करून प्रसंगी त्यांना आव्हान देणारे संतसज्जनादि लोक, जरी त्यांतले अनेक ब्राह्मण होते असतील तरी अल्पसंख्यच असतात.

ता. क. : हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती हे दोन्ही शब्द उपरोल्लेखित व्यवस्थेचे वर्णन करताना समर्पक ठरत नाहीत. अर्थात अलीकडे ब्राह्मनिकल हा इंग्लिश शब्द लोकांना मानवत नाही असे दिसते. चालायचेच. एकेकाळी अभिमानाने मिरवण्याजोगी बिरुदे काळ बदलला की नकोशी होतात. आता मॅन पॉवर, चेअरमन वगैरे शब्द बदलून लिंगनिरपेक्ष शब्द वापरण्याकडे कल आहे. पण शब्द बदलल्याने, पूर्वी पुरुषवर्चस्वाचा जमाना होता, हे सत्य पुसले जात नाही ना? मात्र, जुन्या चुका पुढे चालू न ठेवणे हे आपल्या हातांत असते. शब्द आणि संज्ना बदलता येतात. इतिहास नाही.

हीरा,
ब्राम्हण व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर जातीवाचक अन्याय केला तर त्याला आजही ब्राम्हणवाद जरूर म्हणा. इथे कोणीही विरोध केलेला नाही.
पण आजच्या भारतात ब्राम्हणवादविरोधी असलेल्या , ब्राम्हणांना सर्वश्रेष्ठ न मानणाऱ्या व्यक्तींकडूनही जन्माधारित श्रेष्ठत्व व जातीयवाद केला जात आहे. त्याला तुम्ही ब्राम्हणवाद म्हणू नका हेच आम्ही सांगत आहोत. जातीयवाद ही broad term त्यासाठी योग्य राहील.
ब्राम्हणवाद या टर्मचा द्वेष पसरवण्यासाठी गैरवापर होतो आहे हे लिहून झालं आहे. जर तेच उद्दिष्ट असेल तर नक्कीच हा शब्द वापरत राहावा, चुकीचा असला तरीही.

ब्राह्मिनिकल/ब्राह्मणवाद या संज्ञा ज्यांना अयोग्य वा अन्यायकारक वाटत आहेत त्यांना 'ब्राह्मण' ही स्वतःची ओळख (आयडेंटिटी) वाटते का? पूर्ण नसले तरी अंशतः वाटते का?
ज्यांना वाटत नाही, त्यांना ही संज्ञा चुकीची आहे असे वाटते का?

क्लिष्ट आणि न संपणारा विषय आहे हा

ब्राम्हणांना सध्याच्या काळात सुप्त आणि उघड द्वेषाचा सामना करावा लागतो हे जितक खरं आहे तितकंच हजारो वर्षांच्या काळात जे काही घडलं आहे आणि आज ही इथे तिथे घडत असतं ते ही खरं आहे

अन्याय सगळे सगळ्यांवर जमेल तसा करतच असतात.

आणि तसं पहायला गेलं तर सध्या सर्वत्र विरोध आणि विसंवाद कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिसत आहेच की

ब्राम्हण विरुद्ध मराठा, मराठी विरुद्ध गुजराती, भाजप विरुद्ध काँग्रेस, हिंदू विरुद्ध मुस्लिम, नेटिव्ह विरुद्ध परके,
मी विरुद्ध तू इत्यादी इत्यादी आणि अनेक

त्याचच हे वेगळं स्वरूप

वर इतरांनी लिहिल्याप्रमाणे काही बदलणार नाही, हे असंच सुरु राहणार

<जर तेच उद्दिष्ट असेल तर नक्कीच हा शब्द वापरत राहावा, चुकीचा असला तरीही.>

ब्राह्मणवाद हा शब्द (गेली अनेक दशकं) समाजशास्त्रातही वापरला जातो. अभ्यासकांच्या हेतूंवर संशय घेण्याआधी या शब्दाची पार्श्वभूमी तपासणे योग्य.
बच्चन सिंह 'दलित ब्राह्मणवाद' असा वापर करतात, तेव्हा त्यांचा हेतू नक्की काय असतो?

बाबू जगजीवनराम यांनी 'जातिवाद अथवा ब्राह्मणवाद' असं म्हटलं असलं, तरी जिथे त्यांना विषमतेबरोबरच वर्चस्व दाखवायचं असेल, तिथे त्यांनी ब्राह्मणवाद हा शब्दच वापरला आहे.

इतिहासाचा अभ्यास करताना आजच्या काळातली मूल्यं आणि मूठभरांची अस्मिता ध्यानी ठेवून चालत नसतं.

चिनूक्स,
ब्राम्हणवाद ,ब्राम्हनश्रेष्ठत्व अमान्य असलेल्या समूहांकडून ब्राम्हणांवर किंवा इतर समूहांवर जातीवाचक अन्याय होतो त्यालाही ब्राम्हणवाद म्हणायचं का? हा बेसिक मुद्दा आहे.

कोणीही कोणावरही जन्माधारित/जातीवाचक अन्याय केला की त्याला ब्राम्हणवाद म्हणायचं का? याचं हो किंवा नाही उत्तर कोणी देईल का?

Pages