देशी ब्राह्मणवादास सीमारेषा सुद्धा अडवू शकत नाहीत काय ?

Submitted by कांदामुळा on 14 July, 2019 - 00:53

मला अशा गोष्टी व्यवस्थित मांडण्याचा अनुभव कमीच आहे. थेटच मुद्द्यावर येतो.

भारतात त्यातही महाराष्ट्रात राहून मला जातीयवाद म्हणजे काय हे जाणवलं नव्हतं. माझ्या दृष्टीने उच्च असणारी माझी जात, खालच्या जातीच्या माणसाला पाहून किंचितसुखावणारा) सुखावणारा माझा अंहं, मला एकंदर जातव्यवस्थेत मी कुठे आहे हे समजू देत नव्हती. त्यातही जरा सत्ता उपभोगणा-या घराण्यात जन्म झाल्याने सगळे कसे रूबाबात चालले होते. त्यामुळे जातीयवादाबाबत बोलणा-यांना मी तुच्छ समजत होतो.

पण कॉलेजच्या प्रवेशाला वडलांनी जात प्रमाणपत्र काढून आणले तेव्हां मी ओबीसी प्रवर्गात मोडत असल्याचे मला समजले. हा माझ्या दृष्टीने धक्काच होता. मागासवर्गीय या शब्दाचा मला अत्यंत तिटकारा होता. पण माझ्या नावाला हा शब्द जोडला गेला. पण थोड्याच दिवसात सर्वच जण बिनदिक्कतपणे जातीचा अर्ज आणतात आणि प्रतिष्ठीत म्हणूनही वावरतात हे सवयीचे झाले. पुन्हा सर्व पूर्ववत झाले.

मध्यंतरी आम्ही मोटरसायकल्स वर राजस्थानात गेलो होतो. तेव्हां मात्र स्व अभिनामाच्या ठिक-या उडाल्या. राजस्थानात ब्राह्मण आणि राजपूत सोडले तर सर्वच जण पिछडा म्हणजे शूद्र समजले जातात. आम्हाला थेटच जात विचारायचे. माझी जात सांगितली की अरे भाई ब्राह्मण हो ? क्षत्रिय हो ? असे विचारले जायचे. या दोन्ही प्रश्नांना नकारार्थी उत्तरे दिली की मग याने शूद्र हो असा प्रश्न यायचा. हा अनुभव जवळपास सर्वच ठिकाणी आला. शूद्रांना पाणी देताना आजही राजस्थानात वेगळे भांडे दिले जाते. आम्ही सांगितले की महाराष्ट्रात आम्हाला खूप मान आहे. आम्ही सवर्ण आहोत. पण ते सांगायचे की आम्ही वर्ण बघतो. जे या दोन वर्णाचे नाहीत ते सर्वच शूद्र म्हणजे पिछडा. एकाने विचारले की ओबीसी मे आते हो का ? मी हो म्हटल्यावर तो हसला. म्हणजे या पुढे मी काय समजावणार ?

त्यांच्या हे सर्व अंगवळणी पडलेले आहे. महाराष्ट्रात इतकी उघड जातव्यवस्था नाही. त्यामुळे मध्यमजातींना ती जाणवत नाही. यामुळे आपण भारी आहोत असे उगीच वाटते. राजस्थानातल्या अनुभवाने डोळे उघडले. नंतर उत्तर प्रदेश बिहारचे मित्र पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी झाले. त्यांनी जातव्यव्स्थेचे जे वर्णन केले त्यामुळे सुन्नच झालो. इथे जातीचा उल्लेख हा अगदी सर्रास आहे. थोडक्यात जे आहे ते आहे. लपवाछपवी नाही.

मी पहिल्यांदा आमच्या महाराष्ट्रात असे नाही हे सांगायला बघायचो. पण त्यांच्याकडून व्यवस्थित चिरफाड झाली. महाराष्ट्रातही पश्चिम महाराष्ट्रात मराठा वर्चस्व आहे तर उर्वरीत महाराष्ट्रात ओबीसी. त्यातही कुणबी वर्चस्व जास्त आहे. ब्राह्मणांचे वर्चस्व प्रशासन आणि पूर्वी बहुराष्ट्रीय कंपन्यात असायचे. आता आयटीत आहे. राष्ट्रीय पक्ष हे बहुत करून ब्राह्मणांचे अंकीत आहेत. माध्यमांमधे ब्राह्मणी वर्चस्व आहे. न्यायव्यवस्थेत ब्राह्मण वर्चस्व आहे.

पण राज्याराज्यात त्या त्या प्रदेशातल्या प्रबळ जातींचे वर्चस्व आहे.
मी आता जेव्हां विचार करतो तेव्हां ज्या समूहांना कुठेच प्रतिनिधित्व नाही, त्यांना आपल्या तक्रारी मांडताना, समस्या मांडताना किती अडचणी येत असतील असा विचार येतो. तरी देखील माझ्या पेक्षा कनिष्ठ समूहांचे प्रश्न मला भिडतात असा माझा दावा नाही. ज्याप्रमाणे मी पुरूष असल्याने माझ्याकडे स्त्री जाणिवा नाहीत किंवा अन्य जेण्डरच्या जाणिवा असणे शक्य नाही त्यामुळे मला त्यांच्या समस्या जाणवणेही शक्य नाही हे सत्य आहे तसेच जातजाणिवांचेही होत असावे.

मात्र मी जेव्हां मला वरीष्ठ समजून या व्यवस्थेचे फायदे उपटत होतो तेव्हां मला कोणतेही दोष तीत दिसत नव्हते. तसेच माझ्यापेक्षा वरीष्ठ जातींचे होत असावे असे मला आता वाटते.

कदाचित या जातजाणिवांमुळे या व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोण भिन्न भिन्न असावा. यातूनच मतभेदांना सुरूवात होत असावी. हे मतभेद अत्यंत टोकाचे आहेत. इतके की त्यामुळे संघर्षाची ठिणगी पडते.

जातीव्यवस्थेचे मला लाभ वाटत होते तोपर्यंत इतरांच्या नुकसानीची मला पर्वा नव्हती. मी त्याकडे डोळेझाक करीत असे. कदाचित त्यावर चर्चाच होऊ नये असे मला वाटत होते. मी फक्त त्यांचे लक्ष लाभांकडे कसे जाईल आणि ते गुणगाण कसे करतील यास सामोपचाराचे धोरण समजत होतो. माझ्या ठसठासणा-या गळूला धक्का लागू नये त्याप्रमाणे मला लाभ पोहोचवणा-या बाबींकडे लक्ष वेधले जाऊ नये ही माझी हास्यास्पद धडपड आता मला मजेशीर वाटते.

या काळात अनेक लोकांशी संपर्क आला. उत्तम श्रोता असल्याने मी ते ऐकत गेलो. वाचत गेलो. मी फुले आंबेडकरी साहीत्य वाचत गेलो. अंतर्बाह्य बदलत गेलो. मी कधीही हिंदुत्ववादी पक्षांचा नव्हतो. मात्र सौम्य हिंदुत्ववादी होतोच. त्यामुळे फारसे काही विशेष वाटत नव्व्हते.

आपण जर देश सोडून गेलो तर आपल्याला या काळ्या वास्तवापासून सुटका मिळेल असे विचार मनात घोळू लागले होते.
मात्र एका मित्राने आपले अनुभव शेअर केले आहेत. त्याने ते फेसबुकवर सुद्धा मांडले. त्याला देशभरात प्रसिद्धी मिळत आहे.

त्याच्या म्हणण्यानुसार तो परदेशात स्थायिक झाला होता. तिथे भारतीयांना पाहून त्याचे देशप्रेम जागृत झाले ( कदाचित आपला माणूस परदेशात भेटणे यामुळे सुरक्षित वाटले असावे). त्याने त्याच्याशी दोस्ती केली. त्याच्यामुळे अनेक भारतियांशी मैत्री झाली. पुढे त्याला अनेक ठिकाणी बोलावले जाऊ लागले. ते ही घरी येत. सण, उत्सव साजरे होते. हे सर्व पंजाबी होते. पंजाबी उत्सवप्रिय असतात. सतत सेलिब्रेशन मूड मधे असतात. हे दिवस आनंदात गेले.

पुढे तो त्याच्या सोशल अकाउंटवरून भारतातल्या जातव्यवस्थेबाबत लिखाण करू लागला. त्याचा अकाउंटला नवीन मंडळी सुद्धा होती. त्यांच्या वाचनात हे सर्व येऊ लागले. त्यांना धक्का बसला. हळू हळू या सर्वांनी त्याच्याशी संपर्क कमी केला. पुढे तर त्याला बोलवणे कमी झाले. अगदी लग्नसमारंभात सुद्धा आमंत्रण देणे टाळले जाऊ लागले. आता तर वाळीतच टाकले आहे.

याने एक दोघांना विचारले देखील. पण त्याला उत्तर मिळाले नाही. त्याला इग्नोर करणे चालूच आहे. पहिल्यांदा जो मित्र भेटला त्याच्या घरी हा गेला असता अनवॉण्टेड गेस्ट सारखी ट्रीटमेंट त्याला मिळाली. नंतर सूचकपणे कुछ भी उटपटांग लिखते हो, देश के खिलाफ कुछ भी बकवास करते हो.. हमे डेकोरम मेण्टेन करना है वगैरे वगैरे त्याने कळवले. त्याला कटवले.

हा मित्र यादव आहे. बाकीची पंजाबी मंडळी उच्चजातीची आहेत.
अलिकडे जातव्यवस्थेच्या वास्तवावर बोलणे हा देशद्रोहद्रोहला जातो. प्रतिष्ठीत चर्चेच्या संकेतस्थळावर या विषयावर लिहीणे अप्रतिष्ठीत समजले जाते. भलतेच मुद्दे काढून मूळ विषयाला फाटे फोडण्याचा प्रयत्न होतो. अथवा दाहकता कमी करण्याचा प्रयत्न होतो. अथवा उच्चजातींकडूनच आम्हालाच द्वेषाची वागणूक मिळते म्हणून आम्ही इकडे आलो असा कांगावा केला जातो.

परदेशात उच्चजातींच्या संस्था आहेत. विवाहसंस्था आहेत.
ते त्यांचे स्वातंत्र्य आहेच म्हणा. पण इकडे आल्याने आता खालच्या जातींकडून जातीयवादाचे टोमणे ऐकायला मिळत नाहीत हे सुख आहे असे एकाने सांगितल्याचे मित्राने नमूद केले आहे.

मी सुद्धा अनेक (रेडीफ सारख्या) स्थळांवर परदेशस्थ भारतियांची शेरेबाजी वाचलेली आहे. अत्यंत द्वेषपूर्ण अशी शेरेबाजी करून अब तुम्हारा सडा हुआ संविधान हमारा कुछ उखाड नही सकता असे सांगितलेले असते.

परदेशात गेल्याने आपल्यावर कारवाई होणार नाही हा विचार कदाचित देशात असताना कायद्याने कारवाई होईल म्हणून समंजस रहायला भाग पाडत असेल का ? मी अशी शेरेबाजी कधी केली नाही. कराविशी वाटली नाही. कदाचित सुख अनुभवले पण किमान खालच्यांना हिणवावे अस्से वाटले नाही हा फरक असेल. लिमिटेड का असेना सेक्युलॅरिझम असावा हा. कशाला काय म्हणतात याच्यात मला जायचे नाही. व्याख्यांमधे मला इंटरेस्ट नाही. मी गावातला माणूस आहे. मला माणसामाणसातला व्यवहार कळतो. त्याला साखरेत लपेटून मांडणे आम्हाला जमत नाही. जे आहे ते रोख ठोक बोलायची सवय आहे.

परदेशात गेल्यावर तरी जातीयवादाला गाडण्याची संधी मिळू शकते. पण तसे होत नाही हे दुर्दैवी आहे.
मराठी लोक असे वागतात का ? उघड वागत नसतील ही खात्री आहे. पण एखाद्याचे विचार कळाल्यानंतर देखील त्याला आपल्यात स्थान मिळते का ? असे म्हणण्याचे कारण म्हणजे देशातून येणा-यात निम्न जातींची आता कुठे सुरूवात आहे. तर वरीष्ठ जाती तिकडे किमान तीन पिढ्यांपासून सेटल झालेल्या आहेत.

त्यांचे जे सांस्कृतिक जग आहे, त्यात वेगळ्या विचाराला स्थान आहे का ?
मी जर उद्या गेलो आणि मी गणपती बसवणार नाही, वर्गणी देणार नाही, मी शिवजयंती करणार, फुले जयंती करणार, शाहू जयंती करणार असे म्हणू लागलो तर माझ्या विचारांचा सन्मान होतो का ? की पंजाब्यांप्रमाणे इथेही वागतात ?
कम्फर्ट लेव्हलप्रमाणे आपल्या संस्कृतीचा मनुष्य आपल्या सर्कलमधे असावा हे स्वाभाविक आहे. मात्र रॅशनलिस्ट्स, पुरोगामी यांच्याकडून थोड्या अपेक्षा असतात. त्या अपेक्षांप्रमाणे ते माझ्याशी वागतील का ?

की परदेशात गेल्यावर थेट आपल्या विचारांचे लोक शोधून मी त्यांच्याशीच मैत्री करावी आणि आपला कम्फर्ट झोन शोधावा ?
(परदेशात जाईन की नाही हे माहीत नाही. मी हा तात्विक प्रश्न विचारला आहे)

कृपया , या लेखाचा उद्देश कुणालाही न दुखावणे हा आहे. मला ज्यावर चर्चा करायची आहे तो विषय समजावून घेऊन चर्चा करावी ही नम्र विनंती. माझे लिखाण प्रक्षोभक, आक्षेपार्ह किंवा खोडसाळ वाटल्यास आपण ते काढू शकता. मात्र जर या ठिकाणी चर्चा झाली तर आनंद होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिरा यांच्या पोस्ट वरुन एका बाजूने अनेकवर्षे अन्याय केला म्हणून आता दुसर्‍याबाजूकडून बंडाची ठिणगी समर्थनीय ठरते असं वाचल्याने ते वाक्य लिहिलेले. एकदा बंड केलं की ते कधी हाताबाहेर जाईल ते समजणार नाही. अर्थात मग अन्यायग्रस्त बाजूने नुसतं हातावर हात धरुन अन्याय सहन करायचा का? हे आर्ग्युमेंट येईल आणि ते अगदी बरोबरही असेल.... पण अशावेळी मी माझ्या ऑफस्प्रिंगचीच बाजू घेईन. हा स्टॉमॅन झाला असेल, पण डोक्यात तेच विचार आलेले.

व्यत्यय आणि फारेंड दोघांच्या पोस्ट मधले मुद्दे मी ही पाळतो.
मुलाला आपली जात, उतरंड याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. भारताबाहेर रहात असल्याने ते सहज शक्य झालं आणि गरज भासली नाही हे ही एक कारण असेलच. पण आता त्याला सिव्हिल राईट्स बद्दल माहिती आहे, सो उतरंडीबद्दल ही सांगणार आहे. जे वास्तव आहे ते अजिबात नाकारायचं नाहिये. आणि ते बाहेरुन कळण्याआधी मी सांगितलं तर अधिक चांगलं. त्याच्या जातीचा त्याला काही फायदा मिळू नये असंच वाटतं. आरक्षणाबद्द्ल व्यत्यय यांच्याशी सहमत. मलाही अ‍ॅडमिशनच्या वेळी राग आलेला.. पण म्हणून ज्याला सीट मिळाली त्याच्या बद्दल/ जातींबद्द्ल कधीही वाईट वाटलं नाही आणि आरक्षणाची आवश्यकता ही नंतर कळली. भारतात मी फक्त शहरात राहिलो आहे, आणि बबल मध्ये रहात असताना मला फर्स्ट हँड उतरंडीवरील कुठल्याही जातीचा माझ्या जातीवरुन काहीही वाईट अनुभव आलेला नाही.
गेल्या काही वर्षांत जातीवरुन आरक्षणाची जी टूम निघाली आहे... आणि आर्थिक आरक्षण हा तर महाप्रचंड विनोद आहे... त्याला मात्र अजिबात पाठिंबा नाही. त्याने अधिकाधिक लोकांना झळ पोहोचुन ज्या जातींना खरी गरज आहे त्यांच्या बद्दल कटूता निर्माण होईल अशी एक भिती वाटते.
आणि यच्चयावत आरक्षण नसलेल्या व्यक्तींना आरक्षणाचा राग येत असेल तर मेसेज पोहोचवण्यात मोठी चुक होत्येय. आरक्षण का आहे हे शाळेत शिकवलं पाहिजे हे परत एकदा लिहितो.

<<< आरक्षणाबद्द्ल व्यत्यय यांच्याशी सहमत. मलाही अ‍ॅडमिशनच्या वेळी राग आलेला.. पण म्हणून ज्याला सीट मिळाली त्याच्या बद्दल/ जातींबद्द्ल कधीही वाईट वाटलं नाही आणि आरक्षणाची आवश्यकता ही नंतर कळली. >>

निव्वळ या मुद्द्याशी १००% असहमत. (अ‍ॅडमिशनमध्ये माझी सीट गेली नसली तरीही) कुणालाही जातीवर आधारित आरक्षण देऊ नये असे माझे स्पष्ट मत आहे. निसर्गात समता असा नियम लागू होत नाही., कोटा सिस्टीम नसते.

खरंतर आता भारतात २ च जाती आहेत, आरक्षण मिळणारे आणि आरक्षण न मिळणारे अशा.

ब्राम्हणवाद रिलेटेड वाद ट्विटर सीईओने हातात धरलेल्या पोस्टरवरूनही झाला होता. ते आता आठवलं. त्यावेळी ट्विटरने माफी मागितली होती व तो वाद त्यामुळे शमला.

https://www.financialexpress.com/india-news/twitter-row-congress-manish-...

<<< जातीच्या आधारावर गावकुसाबाहेर ज्या समाजात ठेवतात त्याला निसर्गाचे नियम लागू होत नाहीत. >>>

निसर्गाचे नियम सर्वांना सारखेच लागू होतात.
It is not the most intellectual of the species that survives; it is not the strongest that survives; but the species that survives is the one that is able best to adapt and adjust to the changing environment in which it finds itself.

<<< माझ्या वैयक्तिक पातळीवर मी कसं वागायचा प्रयत्न करतो ते सांगतो. दुसर्‍या कोणी तसंच वागावं हा अजिबात आग्रह नाही
* माझ्या सध्याच्या सुस्थितीला माझी उच्च जात, थोडी फार का होईना, कारणीभुत आहे याची कायम जाणीव असते
* तळागाळात खितपत पडलेल्या खालच्या जातीच्या लोकांच्या हालपेष्टांना जी अनेक कारणे आहेत त्यातील एक कारण माझ्या पुर्वजांनी केलेला अन्याय आहे याची मला जाणीव आहे. किंबहुना मला या वास्तवाची लाज वाटते
* मला आणि माझ्या मुलांना अडचणीचे असुनही मी जात्याधारीत आरक्षणाचे समर्थन करतो कारण मला त्यामागची मिमांसा पटलेली आहे. (मी स्वतः सुद्धा इंजिनीअरींगच्या अ‍ॅडमिशनच्या वेळी रडलो होतो, पण आता प्रगल्भ झाल्यावर माझे विचार बदललेत)
* आरक्षण हा गरीबी हटाओ उपक्रम नाही याची मला जाणीव आहे. म्हणुन मी उत्पन्नावर आधारीत आरक्षणाची मागणी करत नाही.
* सध्याच्या जात्याधारीत आरक्षणामध्ये काही सुधारणा (क्रिमी लेयर, २ पिढ्यांनी फायदा घेतल्यावर तिसर्‍या पिढील आरक्षण नाही इ.) शक्य असल्या तरी त्याच्या इम्प्लिमेंटशन मध्ये येउ शकणार्‍या अडचणींची मला जाणीव आहे. त्याबाबत मी खुप आग्रही नाही.
* मी स्वतः जात मानत नसल्याने "माझी जात" असा अभिमान नाहीच आहे. तरीही माझ्या आडनावावरुन लोक जेव्हा माझी उच्च जात ओळखतात तेव्हा स्वजाती(?) पासुन लांब रहायचा माझा प्रयत्न असतो.
* मला कनिष्ठ जातींकडुन नेहमीच्या व्यवहारात कडवटपणा फारसा जाणवलेला नाही. अर्थात हा माझ्या दृष्टीकोनाचा परीणाम असु शकतो. उदाहरणार्थ आर्टिकल १५ वरच्या परिक्षणात मला लख्ख द्वेष जाणवला नाही. >>

----------- सहमत... विचार आवडले आणि पटलेही.

'ब्राह्मण' असल्याने माझ्या मुलांना त्रास होईल म्हणून सर्वांनी ब्राह्मणवाद शब्द वापरणे सोडून द्यावे <- असं म्हणणं आहे का?

आम्ही काही जातपात मानत नाही, मुलांनादेखील त्याच्या उच्चजातीविषयी काही सांगितले नाही.
पण तरीही ती ब्राह्मणच आहेत(!?) किंवा इतरजण त्यांना ब्राह्मण म्हणूनच ओळखतात.
∆ हे कसं काय होतंय? मी माझ्या जातीतच लग्न केल्याने? आडनाव लावत असल्याने? जातीशी सलग्न काही सवयी पाळत असल्याने?
या सगळ्यात काही बदल करता येणं शक्यय का? करायची इच्छा आहे का? करायचा प्रयत्न केल्यास काय अडचणी येऊ शकतात?
===

आर्टिकल १५ वरचा लेख पूर्ण वाचला नाही पण त्यातला पहिलाच मुद्दा रोचक वाटला. ब्राह्मण इन्स्पेक्टर (किती ब्राह्मण असतील पोलीस खात्यात?) नायक, ब्राह्मण सामाजिक कार्यकर्ती (या असतील बऱ्याच. दोन्ही अंदाजच) नायिका.
मी तिनचारदातरी इथे काल्पनिक लेखनावर प्रश्न विचारला होता -> कथेतील कोणत्या पत्रांची आडनाव काय ठेवायची हे लेखक कसं ठरवतो? उदा लव्ह इन ट्रबल भाग- १३ इथे बघा कुलकर्णी, काळे,बर्वे,भावे & झेंडे… आहेत.

पूर्णा घटो नैव करोति शब्दम्
अर्धो घटों नूनमपैति घोषम् ।
विद्वान कुलीनों न करोति शब्दम्
जल्पन्ति मूढास्तुमगुणैर्विहीना ।।

एमी, मी आधी विचारलेला प्रश्न इथे पुन्हा टाकते-
ब्राम्हणवाद ,ब्राम्हनश्रेष्ठत्व अमान्य असलेल्या , ब्राम्हणवादविरोध हा बेस असलेल्या समूहांकडून ब्राम्हणांवर किंवा इतर समूहांवर जातीवाचक अन्याय होतो , राजकीय घराणेशाही (जन्माधारित वर्चस्व) प्रमोट केलं जातं त्यालाही ब्राम्हणवाद म्हणायचं का? हा बेसिक मुद्दा आहे.

व्यत्यय, तुमच्या पोस्ट्स आवडल्या. काही पोस्ट्सकडे दुर्लक्ष करावे की ही संधी समजून त्यांचा प्रतिवाद करावा याबाबत माझा गोंधळ झाला.
कांदामुळा यांचेही असेच झाले आहे का ? त्यांची गाडी आता ब्राह्मणवादाकडे वळालेली दिसली.
काही पोस्ट्स शाब्दीक कोट्या करणा-या तर काही शाब्दीक कीस पाडणा-या आहेत. या चर्चेचा सूर बिघडवण्यास समर्थ होत्या. मात्र इथे जाणकार खेळाडू असल्याप्रमाणे नेमक्या पोस्ट्स वगळल्या गेल्या आहेत.
याबद्दल सर्वांचे अभिनंदन.

पण ज्याप्रमाणे ब्राह्मणवाद या शब्दामुळे थोड्याच लोकांना अर्थ समजतो अशी भीती इथे काही जणांना वाटते, त्याचप्रमाणे खोडसाळपणा ओळखण्याची कुवत सुद्धा थोड्याच जणांकडे असणार असे मान्य करायला हरकत नाही.

मुस्लीम दहशतवाद हा शब्द निर्माण करणे आणि त्याचा सातत्याने प्रचार करणे, दलितांचा संबंध नक्षलवादाशी जोडणे, टीव्हीवर आंबेडकरी तरूण नक्षलवादाकडे वळतो आहे का अशी शीर्षके देऊन चर्चा घडवून आणणे मात्र सावरकरांबाबतच्या कार्यक्रमावर सडकून टीका करणे अशा काही क्रमातून शब्दांच्या अर्थाबद्दल सजग असणारे आणि नसणारे यांच्यातला फरक स्पष्ट व्हावा.

शब्दांचा अर्थ आपल्यावर उलटणारा नसावा, मात्र त्यांचा वापर समाजात फूट पाडता यावी, ठराविक समाजाला लक्ष्य करता यावे या नीतीला काय नाव द्यायचे ? कारण आता ब्रिटीश भारतात राहीलेले नाहीत. जर याला ब्रिटीश नीती म्हणावे तर ही नीती वापरणारा समूह मोठ्या प्रमाणात मीडीयात कोणता आहे त्याच्या नावाने का देऊ नये ?

वर जे प्रश्न विपर्यास म्हणून विचारले जात आहे तेच सूत्र पकडून असे उलटे प्रश्न का विचारले जाऊ नयेत ?

सर्व प्रश्र्नांची उत्तरं ही केवळ प्रत्येक जातीचे इस्राएलसारखे स्वतंत्र राष्ट्र तयार करून मिळतील. आपल्या राष्ट्रात केवळ आपल्या जातीचे लोक असले तर जातवाद होणार नाही व राष्ट्र प्रगतीपथावर जातील असे माझं वैयक्तिक मत आहे. लवकरच भारताचे विभाजन जातीनिहाय घडो. धार्मिक आधारावर पाकिस्तान स्वतंत्र झाला तसं आता जातीच्या आधारावर वेगवेगळ्या देशांत भारताचे विभाजन झाले तर किती बहार येईल. मला कोणी जातीवरून हिणवणार नाही. माझी असं व्हावं ही खूप मनापासून इच्छा आहे.

>>मात्र सावरकरांबाबतच्या कार्यक्रमावर सडकून टीका करणे <<

तरीच म्हंटले अजुन सावरकर, गोडसे वगैरेंवर कशी यांची गाडी आली नाही
हे असले लोक कितीही आयडी बदलून आले तरी मळमळ बाहेर पडायची काही रहात नाही Proud

:-))

तरीच म्हंटले अजुन सावरकर, गोडसे वगैरेंवर कशी यांची गाडी आली नाही
हे असले लोक कितीही आयडी बदलून आले तरी मळमळ बाहेर पडायची काही रहात नाही Proud

नवीन Submitted by खरा पुणेकर on 26 July, 2019 - 09:57
>> त्याला डोळे मिटुन दुध पिणे म्हणतात. म्हणजे स्वतः काहीतरी खोडसाळ पणा करायचा नि खुप कमी लोकान्कडे खोडसाळपणा ओळखण्याची कुवत आहे अशी स्वतःची समजुत करुन घ्यायची !

I don't believe it! अनपेक्षित आयडी कडून अनपेक्षित प्रतिसाद, ये कहां आ गए हम! एकदम टडोपा मोमेंट!

आज ब्राह्मणांचे वर्चस्व सरकारी कार्यालयात उच्चपदस्थांमधे आहे. मोक्याच्या जागी सर्वत्र ब्राह्मण आहेत. अल्पसंख्य असूनही अनेक पक्षांची धोरणे ब्राह्मण ठरवतात. कुठे पक्षावर नियंत्रण असणारा ब्युरो ब्राह्मणांच्या हाती असतो तर कुठे मातृसंघटना ब्राह्मणी नियंत्रणात चालणारी असते. राजकारणच नाही न्याययंत्रणेत ब्राह्मण आहेत, मीडीयात आहेत, लष्करात उच्चपदस्थ सर्वच ब्राह्मण आहेत.
त्यामुळे आजही ब्राह्मणवाद हा शब्द खटकत नाही. कारण हे वर्चस्व संपुष्टात येऊ नये यासाठी नित्य नव्या खेळ्या करण्यात ब्राह्मण वर्चस्ववादी लोक पटाईत आहेत. त्यांना भांडवलदारांकडून उपलब्ध होणारा पैसा, मीडीयातील वर्चस्व यामुळे सहजच आपला अजेण्डा सेट करता येतो.
हे वर्चस्व म्हणजेच ब्राह्मणवाद असा अर्थ आता ब्राह्मणवाद या शब्दाला प्राप्त झालेला आहे.

मूळ अर्थ असा नाही. ब्राह्मणी व्यवस्थेचं समर्थन करणारा कुणीही ब्राह्मणवादी. कारण जातीयवाद ही उतरंडच ब्राह्मणी व्यवस्था आहे. ती हिंदू नाही. हिंदू धर्माच्या आधीपासून म्हणजे शंकराचार्यांच्या आधीपासून हे स्ट्रक्चर आहे. वैदीक ब्राह्मणांपासून आहे. ब्राह्मणांनी वेळोवेळी नियम बनवलेली, नियमात सुधारणा केलेली पण ब्राह्मणांच्याच अधिकारात ब्राह्मणांकडून नियंत्रित केलेली ही संस्था म्हणजे ब्राह्मणी व्यवस्था. या व्यवस्थेच्या समर्थनार्थ जो कुणी असेल तो ब्राह्मणवादी. मग तो अज्ञानाने असेल किंवा जाणतेपणी असेल.

ब्राह्मणी व्यवस्था ब्राह्मणांकडून नियंत्रित केली जाते. यातील ब्राह्मण ही जात जशी ब्राह्मणी व्यवस्थेचा भाग आहे, तशाच इतर जातीही ब्राह्मणी व्यवस्थेचा भाग आहेत. हिंदू हे नाव परकियांनी दिले आहे. कुठलीही जात सांगणे हा ब्राह्मणी व्यवस्थेला बळकट करण्याचा प्रकार आहे. इतर जातींच्या नावे ही व्यवस्था ओळखली जाऊ शकत नाही कारण ती या व्यवस्थेची ओळखच नाही. त्या जाती या राज्याराज्यात प्रबळ असल्या तरीही राज्याच्या बाहेर त्यांचे अस्तित्व नगण्य असते.

महाराष्ट्रात मराठा प्रबळ असले तरी राज्याचे बाहेर एकूणात त्यांचे अस्तित्व मराठा म्हणून अदखलपात्र आहे. याउलट ब्राह्मण प्रत्येक राज्यात अल्पसंख्य असले तरीही भारतातल्या प्रत्येक राज्यात ब्राह्मण जात आहे. ती याच नावाने आहे. आणि तिची ओळख एकच आहे. प्रत्येक राज्यात ब्राह्मणांचे स्टेटस एकच आहे.

त्यामुळे ब्राह्मण नेत्याला राष्ट्रीय नेता म्हटले जाते. शरद पवारांना कित्येक वर्षे प्रबळ मराठा नेता म्हटले जात होते. मराठा उल्लेखाने ते आपोआपच स्थानिक पातळीवर मर्यादीत होत होते.
असे कैक दाखले आहेत जे ब्राह्मणवादाला अधोरेखित करतात.

पण समजा उद्या जर या जातींनी एकाच ओळखीवर देशात आपले राष्ट्रीय अस्तित्व निर्माण केले आणि संपूर्ण नियंत्रण आपल्या ताब्यात घेतले. आताप्रमाणेच राज्यघटना धाब्यावर बसवून जातीच्या जाती नियंत्रण येण्यासाठी कारभार केला तर त्याला ब्राह्मणवाद म्हणणार का हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे.

पण तशी वेळ अद्याप आलेली नाही. आत्ता जे आहे त्यावर आपण चर्चा केली पाहीजे. वेळ आली की आपण त्या स्थितीवर पण चर्चा करू. तशी वेळ आली तर ब्राह्मणवाद या शब्दावर बहीष्कार घातला पाहीजे आणि नियंत्रण करू पाहणा-या , जातीचे वर्चस्व प्रस्थापित करू पाहणा-या जातीच्या नावाने व्यवस्था ओळखली गेली पाहीजे म्हणजे चित्र स्पष्ट होईल.

एखाद्या विचाराच्या आधारे जेव्हां व्यवस्था नियंत्रित होईल तेव्हां त्या विचाराच्या नावाने तो वाद ओळखला जाईल. नक्षलवाद मानणा-यांनी जर सरकार स्थापन केले, सामाजिक नियम बनवले आणि न्याय, प्रशासन, मीडीया यात आपले नियंत्रण मिळवले तर त्याला नक्षली व्यवस्थाच म्हटले पाहीजे. आदिवासी भागात याच नावाने तिची ओळख आहे. हे एक उदाहरण झाले.

ब्राह्मणी व्यवस्थेत खालच्या जातीला ब्राह्मणत्व प्रात होत नसल्याने तसेही त्यांना वर्चस्व सहजासहजी मिळत नाही. हा ही ब्राह्मणवादच आहे. त्यामुळे अमक्यांचे सरकार पण त्याला ब्राह्मणवादच का असे प्रश्न निरर्थक, विपर्यास करणारे किंवा आकलनाकडे दुलक्ष करणारे आहेत असे म्हणेन.

>>ब्राह्मणी व्यवस्थेचं समर्थन करणारा कुणीही ब्राह्मणवादी. कारण जातीयवाद ही उतरंडच ब्राह्मणी व्यवस्था आहे. <<

एखाद्या वादाला जातीचे नाव देउन वरुन परत त्याच जातीला जातीयवादी म्हणणऱ्यांची मला गंमत वाटते Happy

बाकी आख्खा प्रतिसाद म्हणजे फक्त मळमळच आहे..... बाकी काही नाही Proud

ब्राह्मण्य.ब्राह्मणवाद,ब्राह्मणीकरण, वगैरे वगैरे चर्चा साधारण १९८८ पासुन वाचतोय, ऐकतोय,अनुभवतो आहे. या विषयी झालेली मायबोळीवरील चर्चा येथील लोकांनी जरुर वाचावी. काहींनी ती वाचली असेलही. जातीय विष्लेषणाबद्दल थोडसं https://www.maayboli.com/node/52369

ए ना चॉलबे. जातींच्या आधारे देशाची लोसं प्रमाणात वाटणी झाली पाहिजे यासाठी पंप्र, राप यांची भेट घेऊन लवकरच नोटबंदी सारखा बॉंबस्फोट करावा म्हणून त्यांचे मन वळवणार आहे. न रहेगा बांस,.....

तुम्ही जे लिहिले आहे हे वाचुन धक्का बसला. लेख उत्तम लिहिलेला आहे. खरंच या जातीय वादातून आपण अजुन का बाहेर येत नाही? इकडे चंद्रावर आपण जातो आहोत. आणि अजुन जातीयवादात अडकत आहोत हे निश्चितच घृणास्पद आहे. माझे वडील स्वातंत्र्यसैनिक असल्यामुळे असेल कदाचित पण त्यांनी कधी जातीयवादाला प्रोत्साहन दिलेले मी बघितले नाही. आमच्याकडे येणाऱ्या व्यक्ती, आमचे नाते संबंधी यांच्यामध्ये या विषयावर कधीच चर्चा होत नाहीत. त्यामुळे असेल कदाचित पण आम्ही या वादाला कधी महत्व दिले नाही. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे एवढीच आमच्या घरातील शिकवण आहे. कधीतरी एका मैत्रिणीकडून या बाबतीत दिली जाणारी वागणूक याबद्दल ऐकले तेव्हा ते खरे वाटले नव्हते. आता हे पुढच्या पिढीच्या, म्हणजे तुमच्या हातात आहे, हा वाद मिटवणे.

तुम्ही जे लिहिले आहे हे वाचुन धक्का बसला. लेख उत्तम लिहिलेला आहे. खरंच या जातीय वादातून आपण अजुन का बाहेर येत नाही? इकडे चंद्रावर आपण जातो आहोत. आणि अजुन जातीयवादात अडकत आहोत हे निश्चितच घृणास्पद आहे. माझे वडील स्वातंत्र्यसैनिक असल्यामुळे असेल कदाचित पण त्यांनी कधी जातीयवादाला प्रोत्साहन दिलेले मी बघितले नाही. आमच्याकडे येणाऱ्या व्यक्ती, आमचे नाते संबंधी यांच्यामध्ये या विषयावर कधीच चर्चा होत नाहीत. त्यामुळे असेल कदाचित पण आम्ही या वादाला कधी महत्व दिले नाही. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे एवढीच आमच्या घरातील शिकवण आहे. कधीतरी एका मैत्रिणीकडून या बाबतीत दिली जाणारी वागणूक याबद्दल ऐकले तेव्हा ते खरे वाटले नव्हते. आता हे पुढच्या पिढीच्या, म्हणजे तुमच्या हातात आहे, हा वाद मिटवणे.
तुम्ही जे प्रामाणिकपणे लिहिले आहे त्याबद्दल तुमचे खूप कौतुक वाटते.

कारण हे वर्चस्व संपुष्टात येऊ नये यासाठी नित्य नव्या खेळ्या करण्यात ब्राह्मण वर्चस्ववादी लोक पटाईत आहेत. >>>> उदाहरणार्थ? माझा समज होता हे काम राजकारण्यांचं आहे.

त्यांना भांडवलदारांकडून उपलब्ध होणारा पैसा, मीडीयातील वर्चस्व यामुळे सहजच आपला अजेण्डा सेट करता येतो. >>>> उदाहरणार्थ? माझा समज होता हे काम राजकारण्यांचं आहे.

वर्चस्ववादही नको आणि ब्राहमणवादही नको. समन्वय म्हणून आपण ब्राह्मणवर्चस्ववाद म्हणूया का? ! (हलकेच घ्यावे)
पण खरोखर, नॉमेंक्लेचर तसेच आहे. neanderthal माणसासारखा सांगाडा कुठेही सापडला तरी तो neanderthal माणूसच. कारण तसा मानवी सांगाडा अथवा अवशेष सर्वप्रथम Neanderthal या गावात सापडले होते. हरप्पासंस्कृतीसारखे अवशेष कुठेही सापडले तरी ते हरप्पा संस्कृतीचेच अवशेष. कारण या संस्कृतीच्या खुणा सर्वप्रथम हरप्पा या गावी सापडल्या होत्या. byzantine साम्राज्य जरी खोरासान आणि बाल्ख पर्यंत आणि कास्पियन समुद्रापर्यंत पसरले होते, तरी ते byzantine साम्राज्यच, कारण ते Byzantine या शहरातून चालत असे, आणि गम्मत म्हणजे या विस्तीर्ण प्रदेशातले नागरिक स्वत:ला रोमनच मानीत आणि म्हणवून घेत असत. कारण रोम हे सगळ्याचे आदिस्थान होते.
नियम सर्वप्रथम ज्या समूहाने निर्माण केले त्याच्याच नावाने ती संस्कृती अथवा नियम अथवा प्रणाली ओळखले जातात. मग इतर समूहही ते नियम पाळीत का असेनात.

उदाहरणे अस्थानी आहेत
इथे एखादा वाद/वादी हे मुख्यत्वे विचारधारे/प्रवृत्ती संदर्भात वापरले जातेय हा फरक लक्षात घ्या!

आणि ती प्रवृत्ती/विचारधारा लोप पावल्यानंतरही किंवा मक्तेदारी बदलल्यानंतरही तोच शब्द धरुन राहणे योग्य नाही

विचारधारा, प्रणाली हे सर्व प्रवर्तकाच्या किंवा उद्गात्याच्या नावाने ओळखले जातात. मग ती एक व्यक्ती असो किंवा एखादा समूह, संस्था असो.
Bombay club ही संस्था १९४०-१९६० पर्यंतच्या भारतीय चित्रकलेच्या क्षेत्रात अग्रेसर होती. त्यांच्या सभासदांनी मिळून काही नवे प्रयोग केले, नवे विचार मांडले. त्यांना Bombay club हेच नाव आहे. रविकिरणीकविता हे आणखी एक उदाहरण.

Pages