बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

bb म्हणाले तर म्हणे माझ्याकडे पैसाच नाही, मी पैशासाठी आले इथे.
>>मला पण ती हे बोललेली त्याचे आश्चर्य वाटले होते.

शिवानी अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालीये, ह्या एकदोन सिरीयल, चल तीन चार म्हणू, पण हिने किशोरी शहाणे सारखी इतक्या फिल्म मधे कामं केली असती तर बघायलाच नको अशी वागली असती.
बादवे मला काल "किशुताई" अजिबात आवडली नाही कपाळावर जे काही लावलं होतं ते (बिंदी???) अजिबात आवडलं नाही. त्या आदल्या रात्री बिचूकले बरोबर बोलत बसलेली तेव्हा छान दिसत होती, नाईट सूट मधे

किशोरीताईकडे काल बघवत नव्हतं.

शिवानीचा चांगला होता, तिचे स्पॉन्सरड असतात, पण कधी कधीच चांगले असतात. हल्ली बरेचदा चांगले असतात. ती दिसायला सुंदर आहे पण गोडवा नाही चेहेऱ्यावर, तो किशोरीताईच्या असतो, म्हणून कधी कधी चांगले ड्रेस आणि भयानक मेकअप नसेल तर ताई cute आणि ग्रेसफुल दिसते.

शिवानि ला नेहमी स्वत: चे कौतुक करावे तिला सगळ्यांनी चांगले म्हणावे असे वाटत असते. ती सेल्फ centred आहे.

हो चांगलंच जाणवतं हे.

एखादा सामान्य माणूस चार पैसे कमावून एक वाचवून, एक गावी पाठवून पण दोन पैशात घर चांगलं चालवतो. ही एकटी कमवत असेल तरी मराठीपेक्षा हिंदीत चौपट पैसे मिळतात, असं मागे एका interview त ऐशवर्या नारकरने सांगितलं होतं, त्यामुळे मी सरप्राईजड, मी इतकं काम केलं सांगत होती आणि पैसे नाहीत पण म्हणाली.

नेहा कॅप्टन झाल्याची खबर आहे. गो गर्ल !
आजपर्यंत बर्‍याच जणांना कॅप्टनसी साठी मदत केली तिनी, तिचं स्वतःचं ओव्हरड्यू होतंच!
आता केळ्या नॉमीनेट व्हावा आणि घराबाहेर पडावा. त्याला व्होट्स खूप कमी असावीत, पहिल्यापासूनच! पण तो ममांचा लाडका आहे, त्यामुळे अनेक शकला लढवून त्याला नॉमिनेशनपासूनच लांब ठेवला. ठीक आहे. नॉट सो पॉप्युलर लोकांना पैसे मिळवून द्यायचं सामाजिक कार्य काही वाईट नाही.

काल ममांचा सूट काय भयाण होता!! Uhoh बिचुकले परवडले त्यांच्यापेक्षा असे म्हणायची वेळ आली !! Lol
यावेळी शिवानी, हिना, रुपालीचे कपडे आवडले. किशोरीचा चांगला होता तसा पण टू मच वाटतात मला तिचे गेटप. खूप झगमगाट कायम, जरदोझी आणि ज्युलरी. वीणाचा ड्रेस चांगला होता पण जरा मेसी वाटला त्या इकडून तिकडून लोंबणार्‍या पदरामुळे. नेहाने एकूणच आख्ख्या सीझन मधे कपड्यांवर फारसा विचार केला नसावा Happy पण बरीच बरी दिसली काल. मागच्या सीझन ला मेन अजिबात कपड्यांवर लक्ष द्यायचे नाहीत. झब्बा घातला की झाले अशी बहुधा त्यांची कल्पना होती. यावेळी शिव आणि आरोह चे कपडे चांगले असतात. माधव चे पण छान स्टायलिश असायचे. केळ्याचेही कधी कधी चांगले असतात. काल चांगले होते.
<
+१ , मांजरेकरचा जोकर झालाय.
यावेळी हाउसमेट्स मात्रं सगळे चक्क बर्या कपड्यात होते , नेहासकट सगळे व्यवस्थित हेअर अँड मेकप मधे होते Happy
वीणा थोडी विचित्रं दिसत होती कारण सुटलेलं पोट फ्लाँट होत होतं , किशोरी नेहेमी संगीत- मेहेन्दी फंक्शनला चालल्यासारखी नटते Happy
हिनाच्या इअररिंग्ज मस्तं होत्या, मला हव्या आहेत त्या Proud
रुपालीचा ड्रेस खरच मस्तं , तिचा एलिमिनेशन नंतर एव्ही कसला बेकार होता , उरकून टाकल्यासारखा बनवला एडीटींग टिमने Biggrin

नेहा व्ह्यायला हवीच होती, ती झालीच नव्हती. पण किशोरी वीणामध्ये वाद विवाद झाले, कोणाची चूक, काही कळलं नाही पण वीणाने नेहाचं ऐकलं. त्यामुळे ताई, केळकर भडकलेत विणावर.

हिना सारखी निर्णय बदलत होती कि. ताई बाबत. मला आरोहचं दोघींना एक चान्स द्यावा हेही पटलं आणि हिनाचे प्रॉपर्टी नुकसान झालं हेही पटलं. पण मेन खांब कसा पडला हेच मी बघितलं नाही, त्यामुळे काय बोलणार पण नवीन कॅप्टन झाला कोणीतरी हे छान झालं.

आधीचा निर्णय योग्य होता हिनाचा आरोह शिव यांना बाद करण्याचा मग तेच ह्या बाबतीत लागू की अजून काही वेगळं घडलं, नीट बघणाऱ्यांनी लिहावं.

वोटिंग च्या बाबतीत सदस्यांमध्ये गैरसमज करुन काय मिळते .
जशी वोट पडलीयेत त्याच क्रमाने ठेवायचे ना . रुपाली बरोबर बॉटम मध्ये आरोह च असेल बहुदा पण वीणा ला ठेवले.

आज। आरोह स्वतः ला एक नं वोट होते, गृहीत धरून शिवला बडबडत होता की केळकरला.।>>>>>हेहेहेहे मला पण खुप हसू आलं, त्याला वाटतय कि शिव आणि हा नॉमिनेशन ला आले तर ह्याला जास्ती व्होट मिळतील????? गैरसमज किती असावा माणसाला!!
आरोह नंतर आलाय. त्याला बाहेर शिवची लोकप्रियता माहीती असेलच की

आरोह ची बायको खुप छान आहे. मराठी बीबी ला सिंगल मुले कोण मिळतच नाही वाटत. मागच्या वेळेला कोणच सिंगल कोणच नव्हते. यावेळेला एकटा शीव आहे. आरोह रडण्यामध्ये केळकरला competition देणार असे वाटते सारखा रडतो बायको आली तर रडत होता 1वीक तर झाला होता येउन आणी काल मित्रा चा फ़ोन आलेला तेंव्हा पण रडत होता.

काल बाहेर निघताना रुपाली वीणा शी काही जास्त बोलली नाही. शिवानि ला बोलली की 1सप्टेंबर पर्यंत रहा . चिडली आहे वाटत वीणावर ती.
Without मेकअप काही लोक ओळखूच येत नाहित ती अक्षया गुरव मला ओळखलिच नाही पहिल्यांदा नीट बघितल्यावर लक्षात आले.

असे अनफेअर, क्लूलेस संचालक खूप वेळा झालेत पूर्वी. आताच काय इतके ! बेसिकली आता हिनाला काढायचे असेल बिबॉ ना. दुसरे काय!
फारच ऑब्व्हियस होईल आता ती गेली तर!

मागच्यावर्षी काहीतरी मूळ स्रोतचं नुकसान झालं किंवा नष्ट करणे चूक असं होतं ना, सुशांत मेघावेळी ते चौकट उभी केलेली तेव्हा, आरोह शिव ज्या बेसवर बाद झाला, त्याच बेसवर कि. ताई आणि वीणा दोघी बाद होणं योग्य हे नेहा वीणा चं जास्त योग्य अस वाटतं.

तिने पहिला निर्णय नीट विचार करून दिला नसेल तरी फिरवायला नको होता नेहा वीणाचं ऐकून बदलायला नको होता. जाउदे मीच confused.

कि. ताईने खांब मिठी मारून धरून ठेवला असता तर बरं झालं असतं ना.

हिनाला उगाच नॉमीनेट करणार, तिच्यावर जाम प्रेशर टाकत होते सर्वच. ती आधी ठाम होती पण नंतर ताई होती म्हणून तिला सुचेना काही बहुतेक.

काल शिव हिनाचं फ्रेंडशिप डे सरप्राईज्ड मस्त होतं सर्वांसाठी. त्यात बिचुकले उगाच जादूटोणा वगैरे करत बसले.

हिनाचे खूप फॅन्स आहेत, आधीपासूनच ओळखतात त्या व्यतिरिक्त, bb मुळे पण झालेत, त्यामुळे ती सेफ होईल पण काढायचेच असेल तर bb ना तर काय.

शिवानीला फायनलचा assurance दिलाय बहुतेक, काल एवढ्या जोमाने टास्क करत नव्हती पण काड्या टाकायला पुढे होती.

Amupari नॉमीनेट कोण झालं ते आज कळेल.

आरोह कसा लहान मुलांसारखा चिडतो Lol रोडीज वरून काय बोलत होता,Nomination वरुन काय बोलला,केळकरला पाहिल्या राऊंड मध्ये out झाल्यावरुन काय बोलत होता.. Funny एकदम.. शिवला इतक weak समजतात हे लोक? यातच बुद्धीची कीव वाटली.. शिवानी बाई स्वतः साठी तर खेळली नाही आणि शिवला पाहिल्या राऊंडला आउट करणार होती म्हणे Lol दुसरा joke.. आणि यातच negativity आली गं शिवानी... स्वतःला वाचवायच्या आधी दुसर्‍याला खड्ड्यात ढकलायला पाहत होती, पडली मग जाऊन खड्ड्यात स्वत:च... Btw शिवानीला सगळे strong का म्हणतात? हे कोणाला कळलं असेल तर प्लीज मला समजावून सांगा ना...

हिनाचं संचालन किती फनी आहे, ह.ह.पु.वा ! “शिवानी हा माणुस, वीणा हा माणुस” त्या टास्क पेक्षा हिनाचं संचालन एन्टेरटेनिंग होतं Biggrin
हिनाला बिचारीला सगळे घोळात घेत होते, हेच शिवानी अस्स्ती तर कोणाची हिंमत होती वाद घालायची !
किशोरीला उगीच बाद केलं, एनीवे तशीही नेहाच झाली असती कॅप्टन.
हिनाला बिचारीला जास्तं शिक्षा झाली .
शिव आरोह खुन्नस पहायला मजा येतेय मला, आज चूक शिवची होती, त्याने आधी धक्का दिला अगदी क्लिअरली, आरोह द अँग्रीयंग मॅन आवडतोय मला ! तो चिडून जे केळ्याला बोलला तेही एकदम स्पॉट ऑन होतं , आय होप आरोह राहील अजुन !
बाकी शिव काही सुधारत नाही, किती सांगितलं म.मा , त्याची आई, बहिण, मागच्या वेळी आलेली ऑडियन्स मेंबर पण परत तीच चूक करतोय.
बिचुकले गेस्ट आहे हे बिगबॉस विसरलेत का Uhoh

बाकी शिव काही सुधारत नाही, >>> सुधारेल हळू हळू, काल कमी होते तसे दोघे एकत्र. फक्त त्याने दोन मिनिटं तिच्याबरोबर बसायचा प्रयत्न केला तर सगळे आले, त्याने सगळ्यांसाठी सरप्राईज केलं होते. तिच्याशी दोन मिनिटं बोलावसं वाटलं आधी त्याला तर काय झालं. थोडा वेळ लागेल ना त्याला, एवढी सवय सोडायला.

अगदी त्याने तोडून टाकावं अशी सगळ्यांची अपेक्षा चूक आहे. थोडा वेळ द्यायला हवा. प्रयत्न करताना दिसतायेत दोघेही.

किशोरीला उगीच बाद केलं, एनीवे तशीही नेहाच झाली असती कॅप्टन.>>नाही... किशोरी बाद नसती झाली तर ती झाली असती कैप्टन..कारण किशोरी ने धरलेला खांब पडला होता so तो out of order झाला असता मग फक्त नेहा चा खांब राहील असता अन्तिम फेरी साठी..आणि एका खाम्बावर परत 2ंnd time एकाच व्यक्तीला नाव लावायची परवानगी नव्हती..मग त्या हिशोबाने किशोरीला.च नाव लावता आल असत आणि ती जिंकली असती..शेवटला वीणा ने माती खाल्ली.. तस बघायला आता किशोरी वीणा शिव केळकर एकत्र असतात..सो त्यानी नेहा ला टारगेट करायला हव होत..केळकर बोलला नंतर किशोरी ला की वीणा अशी काय वागते..आपल्या पैकी कोणी कप्तान झालं असत तरी चालल असत...बाकी आता ती शिवानी आणि बिचुकले ची गर्दी कमी करा..ते दोघ टास्क एका पैशाचा नीट करत नाहित..आणि म्हणे यांना trophy हवी Lol

तुरु पण खांबाचं काय, म्हणजे स्त्रोत खांब होताना. मलाही तो निर्णय देऊन फिरवला ते आवडलं नाही. नेहाचं ठीक आहे तिने स्वत:चा स्वार्थ बघितला पण वीणा किती भोचकपणा करत होती उगाच. किशोरीताई झाली असती तर तिला एवढं काय होतं.

शिवानी आणि बिचुकले ची गर्दी कमी करा..ते दोघ टास्क एका पैशाचा नीट करत नाहित..आणि म्हणे यांना trophy हवी >>> Lol शिवानीला फायनलची खात्री दिलीय bb ने कारण task मध्ये उगाच रडणे, नाटकं करणे एवढंच येतं. वीणा तिच्यापेक्षा नक्कीच चांगले प्रयत्न करते task मध्ये.

शिवानीचा ड्रामाचं जास्त.

बिचारी हीना, उगाच फिरवला स्वतःचा आधीचा निर्णय नेहा वीणाचं ऐकून. तिच्या मनात पण नेहाला कॅप्टन करायचं होतं. मग आधीच ताईंना बाद करायचं ना.

शीव हुशार आहे . सगळ्यांसाठी म्हनूण हीना कडुन ते दिवे वगैर करुन घेतले. आणी मग पहिल्यांदा विणा ला बोलावून दाखवुन तिथे दोघे जण चहा पित बसले. बिचारी हीना तिकडे शेजारी उभी राहीलेली.

मला हसू आलं हे वाचून Lol . आता मी परत तो शॉट बघेन. पण आता तिची आणि वीणाची छान मैत्री झालीय. काल हिनाचा बेकार दिवस होता म्हणजे, इथे असं आणि तिथे तसं. खरंच बिचारी.

Pages