बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हो अन्जू बघ तू हे दोघे तिकडे चहा पित बसले आणी हिना तिकडे gaurd सारखी शिवानि ला तिकडे येण्या पासुन अडवत होती. की तुमच्या सगळ्यांसाठी नंतर आहे suprise. जर केले होते तर सगळ्याना एकत्र दाखवायचे ना. हो हिना चा bad डे होता काल. खर बीबी नी दुसरी काही तरी शिक्षा द्यायची ना.

हो हिना चा bad डे होता काल. खर बीबी नी दुसरी काही तरी शिक्षा द्यायची ना.>>कसली शिक्षा? आणि हीना nominate कधी झाली?मला का नाही दिसलं?

हिना ला का केली शिक्षा ?! कधी दाखवलं हे ? कालच्या भागात का ? माझं मिस झालं वाटतं मग .. आज खूप दिवसांनी आले इथे .. तर १५०+ कंमेंट्स .. अधल्या मधल्या वाचल्या ..

सुधारेल हळू हळू, काल कमी होते तसे दोघे एकत्र. फक्त त्याने दोन मिनिटं तिच्याबरोबर बसायचा प्रयत्न केला तर सगळे आले, त्याने सगळ्यांसाठी सरप्राईज केलं होते. तिच्याशी दोन मिनिटं बोलावसं वाटलं आधी त्याला तर काय झालं. थोडा वेळ लागेल ना त्याला, एवढी सवय सोडायला.
<<
It's not Shiv-Veena private residence to expect privacy , of course will be surrounded by people, they can't expect that in BB house .

हिना ला का केली शिक्षा ?! कधी दाखवलं हे ? >>> आज दाखवणार. काल तिने निर्णय फिरवला तिचाच, तिला काय करावं ते सुचेना.

पण हिनाला म्हणून nominate करणे मला पटत नाही. शिवानीच्या नाकावर टिच्चून आणली आणि शिवानी आली म्हणून ही जड झाली का bb ना. यापेक्षा संचालक म्हणून सुरेखाताई किती फेल गेलेल्या परागच्या वेळी. तेव्हा त्यांना कुठे दिली काही शिक्षा.

विणा सून म्हणून आली तर शिवच्या आईचं खरं नाही. >>> म्हणून हादरलेत ना घरचे Lol , त्यांनी किती सांगायचा प्रयत्न केला की हीना भोळी आहे पण शिवचं कशाला लक्ष जातंय तिथे. खूप आईने सांगितलं ही पोरगी भोळी आहे बघ खूप, बोलत असली तरी.

आत्ता बिचुकलेची मजा करताना फनी व्हिडीओ बघितला. त्यात एकमेकांवर मारक्या म्हशीसारख्या शिंग उगारणाऱ्या दोघी आणि दोघे एकत्र आलेले. वीणा शिवानी आणि शिव आरोह.

एनीवे शिव वीणाला एकत्र राहायचं असेल तर पब्लिकच्या हातात voting ऑप्शन आहे आणि bb च्या हातात पण कोणाच किती दाखवावं हा ऑप्शन आहे. ते दोघे सोडून बाकी घरात कोणी नाही का, त्याचं दाखवायची गरज काय आहे. कालचे वेगळं होतं पण एरवी सांगतेय. ते दोघेच घरात राहत असल्यासारखे bb पण दाखवतात.

काल शिव पण नाही आवडला... केळकर फुस लावत होता त्याला. खरे तर स्वतःहुन बाहेर पडला असता तर जास्त आवडले असते. काय मिळाले अखिलादुपणा करुन.

लग्न तर खुप लांबची गोष्ट आहे तिने जे बीबी च्या घरात मैत्रीच रिलेशन आहे ते जरी बाहेर तसेच ठेवले तरी खुप आहे.

काल आरोह भारीच खेळला.. राग आणि आसवे एकदमच असतात त्याची... किती रागावला होता.. थंडच होत न्हवता. Happy
शिव तर आवडतच नाहि..

काल शिव हिनाचं फ्रेंडशिप डे सरप्राईज्ड मस्त होतं सर्वांसाठी. >>>>>>>>> +++++++१११११११११११ नशीब, हे तरी दाखवल. नाहीतर तेपण अनसीन अनदेखामध्ये टाकल असत त्यान्नी.

त्यात बिचुकले उगाच जादूटोणा वगैरे करत बसले. Lol काल त्यान्नी दोन वेळा बावळटपणा केला. सरप्राईजच्या वेळी शिवानीला शिव हिना काळी जादू करत आहेत सान्गत फिरले. दुसर्यावेळी, टास्कमध्ये राऊंड सम्पल्यावर त्यान्नी खाम्बावर नाव चिकटवल.

बिचारी हीना, >>>>>>>>> हो ना. सुरुवातीपासून ती फेअर खेळत होती. शेवटच्यावेळी तिला निर्णय फिरवावा लागला.

हिनाचं संचालन किती फनी आहे, ह.ह.पु.वा ! “शिवानी हा माणुस, वीणा हा माणुस>>>>>>>> Biggrin

शिव आरोहच्या भाण्डणात आधी चूक आरोहची होती. आरोहने त्याच्याशी डिल केली होती की तो हिरवा खाम्ब सिलेक्ट करेल आणि शिव लाल सिलेक्ट करेल. नेहाशी मात्र आरोहने वेगळी डिल केली. शब्द फिरविला त्याने. लाल खाम्बाकडे गेला.

' साला' हि शिवी असते का?

हिना आरोहशी त्याला कन्सोलिन्ग करण्याचा निमित्ताने चिपकूगिरी करत होती ते नाही आवडले. त्याचवेळी शिवानीसुद्दा तिकडे होती, आता ती त्या गोष्टीच भाण्डवल करेल. शिव विणा सुद्दा इतके चिकटत नसतात.

बिचकुले टास्कआधी नेहाला काहीतरी सान्गण्यासाठी बोलावतो तिथून केळकर आणि हिना पहिल्या राऊंडनन्तर भाण्डत होते तिथपर्यन्त सिग्नल गेल्यामुळे बघायलाच मिळाल नाही. केळकर कसा आऊट झाला पहिल्या राऊंडमध्ये ? तो हिनाशी वाद का घालत होता?

केळकर कसा आऊट झाला पहिल्या राऊंडमध्ये ? तो हिनाशी वाद का घालत होता?>> केळकर खांबाशी पोहोचला पण त्याने स्टिकर नव्हता चिकटवला . शिवानी ला खांब च मिळाला नव्हता .. तर केळकर चा स्टिकर निघत नाही हे बघून नेहा ने शिवानी ला ओरडून सांगितलं अगं पटकन स्टिकर लाव त्याचा निघत नाहीये etc .. मग शिवणीने केळकर च्या खांबाला स्टिकर लावला स्वतःचा .. म्हणून हिना ने त्याला बाद केलं . त्यावर तो चिडला कि स्टिकर लावणं महत्वाचं नाहीये .. मी पहिले पोहोचलोय . माझा स्टिकर निघत नाही तर मी काय करू .. वगैरे . हिना ने आधीच सांगितलं होतं कि खांबावर ज्याचं नावाचा स्टिकर दिसेल त्यालाच ग्राह्य धरणार मी ....

मग शिवणीने केळकर च्या खांबाला स्टिकर लावला स्वतःचा .. म्हणून हिना ने त्याला बाद केलं . >>नाही .शिवानी ने अभिजित बिचुकले नी पकडलेल्या खांबाला स्टिकर लावला . बिचुकले ना पण स्टिकर काढता येत नव्हता तो त्याना शिवानि ने काढून दिला आणी बिचुकले नी लगेच तो अभीजित केळकर च्या खांबाला लावला. केळकर चा ही स्टिकर निघत नव्हता. हिना ने अधीच संगीतले होते की ज्याचे नाव मला खांबवर पहिले दिसेल त्याचा तो खांब. पण अभिजित केळकर ला असे वाटत होते की जो प्रथम खांब पकडणार त्याचा खांब होईल.

शिवानी ने अभिजित बिचुकले नी पकडलेल्या खांबाला स्टिकर लावला . आणी बिचुकले नी अभीजित केळकर च्या खांबाला लावला>> हो हो हो .. मी आत्ता हेच दुरुस्त करायला इथे आलेले Lol .. पण आता नाही करत Proud

>>शिव आरोहच्या भाण्डणात आधी चूक आरोहची होती. आरोहने त्याच्याशी डिल केली होती की तो हिरवा खाम्ब सिलेक्ट करेल आणि शिव लाल सिलेक्ट करेल. नेहाशी मात्र आरोहने वेगळी डिल केली. शब्द फिरविला त्याने. लाल खाम्बाकडे गेला.<<
करेक्ट! हि अंदरकि बात लपवायलाच तो एव्हढा आकांड्तांडव करत होता असं वाटत होतं...

हिना संचालकपदाच्या जबाबदारीने दबुन गेल्याने मुर्खासारखे निर्णय बदलत होती. तिला धडा मिळणं आवश्यक होतं, पण नॉमिनेट करणं हि खूप मोठी शिक्षा आहे, एस्पेशियली तिला सेफ केलेलं असताना...

असले गोंधळ तर दरच टास्क मधे होतात. हिनाला डायरेक्ट नॉमिनेट केलं याचा अर्थ बिबॉ ना तिला आता घालवायचे असावे असाच वाटला मला. संचालक म्हणून कामगिरी हे फक्त निमित्त शोधलं त्यांनी.
शिवानी अजिबात जिम्कण्याचा प्रयत्न च करत नव्हती असे वाटले. काही फिक्स डील आहे की काय तिचं पण?! आणि बिचुकलेंना घालवा आता! तेही युसलेस आहेत टाक्स मधे. आता नेहा, आरोह, शिवानी, बिचुकले, हिना हे ५ लोक सध्या एकेकटेच दिसताय्त. कुणाचंच कुणाशी बाँडिंग नाही. उरलेला दुसरा ग्रुप मात्र बराच घट्ट आहे अजून. आता किशोरी पण त्यांच्यात दिसते कायम.

हिना आरोहशी त्याला कन्सोलिन्ग करण्याचा निमित्ताने चिपकूगिरी करत होती ते नाही आवडले. त्याचवेळी शिवानीसुद्दा तिकडे होती, आता ती त्या गोष्टीच भाण्डवल करेल. शिव विणा सुद्दा इतके चिकटत नसतात. >>> खरं आहे. हीना बरेचदा फार जवळ जाते शिवच्याही, तो अंतर ठेवतो. शिव वीणाचं कधीच अश्लील वाटत नाही. हीना का अशी वागते काय माहिती पण जाणवतं बरेचदा.

>>शिव आरोहच्या भाण्डणात आधी चूक आरोहची होती. आरोहने त्याच्याशी डिल केली होती की तो हिरवा खाम्ब सिलेक्ट करेल आणि शिव लाल सिलेक्ट करेल. नेहाशी मात्र आरोहने वेगळी डिल केली. शब्द फिरविला त्याने. लाल खाम्बाकडे गेला.<<
करेक्ट! हि अंदरकि बात लपवायलाच तो एव्हढा आकांड्तांडव करत होता असं वाटत होतं... >>> अगदी अगदी.

किशोरी आता स्ट्रांग आहे म्हणून केळकर ने तिला आपल्या ग्रुप मध्ये घेतले असेल आधी ती जाणार आहे असे वाटल्याने कोण नीट बोलत नव्हते तिच्याशी वीणा रुपाली वगैरे.

Bdw वेग वेगळ्या रंगाचे खांब देण्याचा काय significance होता कोणाला समजला का?..असही ते सगळे खांब एक सारखेच काम करत होते..

Bdw वेग वेगळ्या रंगाचे खांब देण्याचा काय significance होता कोणाला समजला का?..>>deal करण्यासाठी आणि out of order pole ठरवण्यासाठी disscuss करण्यासाठी

खरं तर किशोरी अजूनही तीच ती क्लूलेस डंब बाई आहे जी सुरुवातीला होती. टास्क प्रामाणिक पणे खेळते, पण अजूनही तिला काहीही गेम, डावपेच कळत नाहीत की कसलाही स्टँड घेऊ शकत नाही की कुणाला कन्फ्रन्ट करता येत नाही तिला. पण तिला लोकांची सिंपथी मिळतेय हे खरं . कुठेतरी लोकांना तिचा सरळपणा अपील होत असावा आणि थोडे लक पण. ( जरी सतत नॉमिनेशन मधे येत असली तरी)

Bdw वेग वेगळ्या रंगाचे खांब देण्याचा काय significance होता कोणाला समजला का?..असही ते सगळे खांब एक सारखेच काम करत होते.. >>> मला तर काहीच कळत नव्हतं आणि शिव आरोह भांडण झाल्यावर मी उठले tv समोरून कि आता शेवटीच नीट बघूया.

खर तर सुरेखा ताई नंतर किशोरी ताईंचा नम्बर होता पण विणा आणी रुपाली नी त्याना वेगळे केल्यापासून किशोरीला खुप सपोर्ट मिळाला. आणी गेम कळत नसला तरी खेळण्याचा प्रयत्न करते ती.

शिवराळ शिवानी प्लस फेक, दादागिरी, सायको शिवानी थँक्स. आज तुझ्यामुळे नेहा चक्क आवडली मला, ती अतिशय योग्य होती पण तू उगाच फालतू इगो ठेवलास.

वीणा शिव bonding good. त्यांना सध्या कोणी वेगळं करू शकत नाही Lol

केळकरने उगाच आग लावली कि ताई आणि वीणात आणि मूर्ख वीणा लगेच ताईंना विचारायला गेली, केळकर मस्त बाजुला त्यात हे सर्व बिचुकलेसमोर झालं.

आज हिनाची खरोखर दया आली.

Pages