बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मला नाही वाटत पराग रुपालीला सोडेल असं. त्याच आणि तिच चांगलं जमत होत . दुसरं म्हणजे तो पण डिव्होर्सी आहे आणि ती पण . दोघांनाही मुलबाळ नाहीये आणि दोघेही टीव्ही वर व्यवस्थित बिझी आहेत. रुपालीला मी हिंदी मालिकेत बघितलं आहे . सुमित राघवन बरोबर. मराठी पेक्षा हिंदीत जास्त पैसे मिळतात खर तर . अशी बरीच दोघांमध्ये सिमिलॅरिटी असल्याने तो काही तिला सोडणार नाही असं वाटतंय . ती त्याला कितपत रिस्पॉन्स देईल ती पुढची गोष्ट Happy

गेली का रुपाली, छान झालं. योग्य निर्णय.
बिचुकले गेस्ट की सदस्य हा निर्णय उद्या परवा होईल ना? मला आता वाटतेय ( किंवा विशफुल थिंकिंग) की आता नाही करणार त्यांना सदस्य.
पराग चे चॅनल नाही पाहिले, पण तोही चाप्टर आहे. प्यार की खिचडी वगैरे सगळे फक्त अटेन्शन घेण्याचा आणि बिबॉ ने मिळालेला टीआरपी कॅश करण्याचा प्रकार असू शकतो.

वीणाची आई जे बोलली त्यावर मांजरेकर नाव न घेता म्हणाले की इथले सगळे शहाणे आहेत. बाहेर जाताना इथली भांडणं इथेच सोडून जातात.
पण शिवानी तर बाहेरच होती, जेव्हा तिला हे कळलं. वर मी वीणाबद्दल डिटेक्टिव्हगिरी करून आले आहे, असंही सांगत होती.
परत आल्यावर ती बिग बॉ सला म्हणाली, तुम्ही माझी विनंती मान्य करून मला परत येऊ दिलत. म्हणजे बाहेर जाऊन सूड घ्यायची तयारी करून पुन्हा आतही येता येतं.

एकूण शिवानी सगळ्या नियमांना अपवाद आहे आणि तिला कोणतेही नियम लागू होत नाहीत.

भांडी घासण्याच्या भांडणात शिव एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत होता, तर समोरची नेहासुद्धा तेच करत होती. पण सोडून द्या, असं फक्त शिवला सांगितलं. त्यांच्या टीव्हीत नेहाचा आवाज फिल्टर होतो.

हो भरत, शिवानी नेहा सोडून बाकीच्यांच्या चुका फार मोठ्या करून सांगतात. शिवला हिटलर, मुसोलिनी वगैरे अगदी लादेन उपमा दिली म्हणून youtubeवर राग व्यक्त केलाय, काही vlogs मध्ये आणि शिवानी फेवरेट, तिला मात्र soft कॉर्नर असंही म्हटलंय. आता मला खरंतर केळकर वगैरे आवडायचा नाही अजिबात पण आता ह्या grpला target करतात अति म्हणून माझा soft कॉर्नर तिकडे गेलाय.

शिवानी नेहा यांनी दबंगगिरी केली तर मग फूलनदेवी वगैरे उपमा नाही.

नेहा काल बरी दिसत होती. केस नीट होते.

काल कोणी observe केलं का? ममां ने जागा change करा म्हटल्यावर शिव पटकन उठला पण वीणा मधली seat सोडायला तयारच नव्हती.. नेहाला मध्ये बसायला सांगितल्यावर सुद्धा वीणा जागची हलली नाही... मग बिचुकलेला वीणाच्या जागेवर बसायला सांगितलं तेही तिला सोयीस्कर पणे कळलं नाही... आणि side ला बसावं लागलं म्हणून तोंड पाडून बसली होती

आरोह चांगला खेळतो त्याला पहिल्या पासुन संधी द्यायला हवी होती.
ते रिन चे काहितरी कार्य होते त्यात बिचुकले बोलले अभिजित काय रस्तो रस्ती मिळतिल पण त्याच्या पूढे बिचुकले पाहिजे ते बिलकूल नाही आवडले. खरोखर बिचुकले आपल्याला सोडून सगळ्याना तुच्छ
समजतात. त्यांच्या कडे इतके पैसे आहेत तर म जेल मध्ये का गेले होते.

बाकी वीणाच्या loyalty बद्दल अजिबात कौतुक केलं नाही उलट अभिजीत जिंकल्याचा आनंद व्यक्त केला म्हणून ओरडले तिला... हे नाही आवडलं अरे ती प्रामाणिकपणे खेळली तर तेही सांगा की positively....आणि शिवानीने वीणाची loyalty prove झाल्यावर लगेच sorry म्हटलंच नाही.,नाहीतर विषय तिथेच संपाला असता... पण शिवानीने सगळं रामायण घडल्यावर बाहेर गेल्यानंतर sorry म्हटलं...हे नाही दिसले मांजरेकरला... बाकी शिव, वीणा, आणि केळकर mature enough आहेत त्यांना कळतं कुठे चूप बसायचे.. Bigg boss आणि मांजरेकर partial होत आहेत हे त्यांनाही कळत असेल म्हणुन पटलं नाही तरी argue करत नाहीत..

विणा सतत वाकडं तोंड करून फुसफुसत आणि फुरफुरत असते. तिचा माज आणि मोठ्ठे मोठ्ठे हातवारे पाहूनच ती डोक्यात जाते.

रुपालीचा भाऊ संकेत आणि त्याच्या मित्राची छोटी मुलगी दिक्षिता आलेली, >>>>>>>>अच्छा मला तेच समजेना कि रुपाली ला काही मुलबाळ नाही असं मी आधी इथेच वाचलं होतं मग हि कोण?. Thank you अन्जू

हिना शिवच्या खुप मागे मागे करत होती शीवची आई आणि बहिण येऊन गेल्यावर. विणा रडत बसली होती तिलाच नंतर रिलीज नाही केलं म्हणून, तेव्हा शीव तिच्याशी बोलायला जात होता तर हीना मधे मधे येउन सूत्र आपल्या हातात घ्यायला बघत होती. शीवला विचारत होती कि आता तू तिच्याशी काय बोलणार? तिथे रुपाली आहे जास्ती लोक झाले तर चिडचिड होइल वगैरे वगैरे Uhoh किती चिकटू आहे हिना

मै, भरत ,मोक्षू च्या वरच्या पोस्टी पटल्या.
ममां खुपच बायस्ड वागतात. शिव वर खुपच डाफरतात तो बिचारा उलटून बोलत नाही.

विणा तिच्या आईला रुपाली आणि शिवानीला भेटवायला आली तेव्हा म्हणाली कि रुपाली चांगली आहे, आणि शिवानी पण चांगली आहे विणाची आई जे बोलली त्यामुळे विणा थोडी ऑकवर्ड झाली असेल. विणाची आई म्हणाली ती शिवानी थोडी रागीष्ट (हा कुठचा नवीन शब्द?) आहे. तेव्हा विणा आईला समजावताना म्हणाली की मम्मा ती लहानपण आहे.

विणा तिच्या आईला रुपाली आणि शिवानीला भेटवायला आली तेव्हा म्हणाली कि रुपाली चांगली आहे, आणि शिवानी पण चांगली आहे विणाची आई जे बोलली त्यामुळे विणा थोडी ऑकवर्ड झाली असेल. विणाची आई म्हणाली ती शिवानी थोडी रागीष्ट (हा कुठचा नवीन शब्द?) आहे. तेव्हा विणा आईला समजावताना म्हणाली की मम्मा ती लहानपण आहे.>>>हो अगदीच जाणवलं ते... वीणाला पण somehow तिच्या आईचं वागणं over the board वाटलं.. तिने शिवानी आणि रुपालीशी बोलल्यानंतर लगेच 'चल जाऊ दे, सोड ना' असे म्हटले... वीणाला तिच्या आईचे बोलणे जरी पटले असेल तरी तिला या लोकांसोबत अजून 1 महिना रहायचे आहे... तर इतका hatred घेऊन कसं चालेल असा विचार केला असेल.. In fact सगळयांना फाडफाड बोलण्याआधी वीणा च्या आईने पण हा विचार करायला पाहिजे होता...
पण तरीही मांजरेकर तिच्या आईला उद्देशून जे बोलले ते नाही पटलं... तुम्ही contestants ना सूचना देऊ शकता कसं वागायचं, कसं राहायचं... पण त्यांचे parents चुकले, हे दर्शवणे नाही पटले.. Parents येतातच 10 - 15 min साठी त्यातही त्यांनी त्यांना जे वाटतं ते का बोलू नये?? मग सरळ स्क्रिप्ट ठेवायची हातात की हे पाठ करून बोला आत मध्ये जाऊन.. आणि मांजरेकर बोलल्यामुळे आधीच ढगात असलेली शिवानी अजूनच वर चढली.. म्हणजे तिला तिच्या चुका दाखवण्याची पात्रता bigg Boss आणि मांजरेकर यांची नाही हे ओळखून त्या शिवानीला बोलल्या त्याचा issue मांजरेकरने करण्याची काहीच गरज नव्हती... प्रत्येकाची बोलण्याची पद्धत असते.. वीणा च्या आईची पद्धत थोडी arrogant होती पण म्हणुन त्या contender नसताना महेश ने त्यांना सुनावणे अजिबातच नाही पटलं... शिवाय मांजरेकर काय बोलले 'हे इथेच भांडतात आणि इथेच विसरतात', काय विसरतात? 2 week पूर्वी म्हटलेले negetive vibes शिवानीने आत्ता उकरून काढले.. आणि एरवी पण सतत वीणाला पाण्यात बघत असते... फक्त 1 week ती वीणा सोबत चांगलं वागली.. आणि तिच्या विरुद्ध जरा काही बोललं की persoal gruges मनात धरून एखाद्याच्या मागेच लागते... आणि तिला bigg boss आणि मांजरेकर पाठी घालतात हे जास्त disgusting आहे..

वीणाच्या आईचा अनकट सीन ज्यात ती सगळ्यांशी खूप छान बोलली आहे,ते व्हायरल होत आहे,त्यामुळे सोमिवर वीणाला आणि तिच्या आईला खूप सिंपथी मिळत आहे.
हे सगळ बिबॉस मुद्दाम करत आहेत अस वाटत आहै,म्हणजे यांनाच शिव आणि वीणाला न्यायच असेल टॉपमध्ये,पण असच कस नेणार,म्हणून आधी टार्गेट करायच आणि मग अस दाखवायच की बघा ममांच्या बोलण्यामुळे त्यांनी त्यांचा गेम कसा इंम्प्रुव्ह केला.

शिव वीणा तसेही जाणारच आहेत टॉप ५ मधे, टार्गेट करा किंवा नका करु ! शिव तर टॉप २ मधे नक्की, आज म्हणे वीणाला डेंजर झोन मधे दाखवणार, समजेलच रात्री.
वीणाच्या आईला सोशल मिडीयावर सगळे शिव्याच घालतायेत, मला नाही दिसली कुठे सिंपथी वगैरे.
बोलली असेलही चांगली पण पोरीला ऑन स्क्रीन अफेअरला एन्करेज करून आली हे हायलाइट झाले, शिवच्या आईच्या एग्झॅक्ट विरुध्द , म्हणून ती बाई नाही आवडली.
अत्तापर्यन्त तरी एलिमिनेशन्स अ‍ॅज एक्स्पेक्टेड होती, मैथीली-दिग्या - बाप्पा -सुरेखाताई - वैशाली - माधव हेच त्यात्या वेळी जाणे अपेक्षित होते आणि तेच गेले ! रुपाली अपेक्षेपेक्षा जास्त टिकली कारण ती नॉमिनेट झाली नाही, पण झाल्यावर लगेच गेली.

वीणा कित्ती फेक आहे यार, रुपाली गेटच्या बाहेर पडल्या पडल्या तिने तिचे खोटे अश्रू कसे टीचकीने उडवले.. किती फेक असावं माणसाने???
मला वाटतं ती शिवबद्दलपण काही सिरीयस वगैरे नाहीये, encash करतीये फक्त पब्लिसिटी सगळी... तो मात्र बराच सिरीयस दिसतोय तिच्याबद्दल, तो मला तसाही जेन्यूईन प्लेयर वाटतो.

मोक्षु छान कमेंट्स.

वीणा नेहेमी एक नं वर असते voting मध्ये तरी तिला danger zone मध्ये दाखवून confidence कमी करतायेत तिचा. मागे ठीक पण आज तरी एक नं votes तिला आहेत हे दाखवायला हवं होतं. सारखं काय तिला danger zone मध्ये टाकायचं.

पण बाहेर सगळं आउट होतं की. आतले स्पर्धक सोडून सर्व दुनियाला माहितेय की वीणाला एक नं चं voting आहे.

आता शिव वीणा च्या विरोधातली लोकं आणतात. लग्न task कोणी घेतला, त्यांना लक्झरी बजेट मिळावे ही व्यवस्था कोणी केली. आधी शिव वीणा जोडी आवडते म्हणणारे कोणी आणले. आता आपल्यावर काही घ्यायचं नाहीये का bb ना.

बिचुकलेला कसंही वागून सदस्य केलेलं दिसतंय. कॅप्टन्सी task मध्ये आहे तो. आता त्याला कॅप्टन करा. नेहा आणि वीणा अजूनही कॅप्टन झालेल्या नाहीयेत.

https://www.youtube.com/watch?v=Axl0i8jtIA0

ज्जे बात. वा वा कलेजेमे थंडक पड गयी.

वीणाच्या आईला अति निगेटिव्ह दाखवून आता मेकर्सचा पचका voot वाल्यांनी केला. मी मूळ क्लिप बघितली नाहीये.

शिवच्या आईच्या एग्झॅक्ट विरुध्द , म्हणून ती बाई नाही आवडली. >>> दोघीही आपापल्या जागी बरोबर होत्या. शिवचा गेम बिघडतोय हे त्याला सांगायचा प्रयत्न केला शीवच्या आई बहिणीने आणि शिव वीणा जोडी आवडतेय सगळ्यांना हे वीणाच्या आईने सांगायचा प्रयत्न केला, आवडते आहेच बाहेर पन्नास टक्के लोकांना तरी. दोघीही चूक नाहीयेत. अफेअर सुरु करायला वीणाच्या आईने सांगितलं का, हे इथे एवढं पुढे गेल्यावर ती आलीना. तिने दोघांना गेम नीट खेळा बाहेर आल्यावर बघू हेही सांगितलं.

शिव आधीही कोणा कोणाच्या मागे असेल पण इथे तो अडकला आहे आणि तिच्यासाठी गेम सोडायला तयार हे बघितल्यावर शिवच्या घरचे हादरणारचं, त्यामुळे तेही योग्य.

डीजे तूच म्हणाली होतीस ना की तो रोडीज मध्ये पण मागे होता कोणाच्यातरी, त्याची strategy असेल, घरच्यांनी माहिती असेल पण असं तर घरच्यांवरून दिसलं नाही, ते हादरलेत खरोखर.

त्याची strategy असेल तर त्याने कलर्स लीड चेहेरा पकडून गेला असेल पण आता खरोखर अडकला असेल. आधी वीणामुळे त्याला फायदा झाला आणि आता त्याच्यामुळे वीणाला होतोय. तो रोडीजचा असला तरी मराठी सामान्य लोकांना वीणा जेवढी माहिती असेल तेवढा शिव माहिती नव्हता.

आल्या आल्या त्याने शिवानी बिचुकलेनी सांगितल्यावर ऐकते का उलटं काहीतरी असं म्हणून मस्करी केली तर शिवानीने त्याला सुनावलं होतं.

नेहा बिचुकले वादात नेहा छा गयी, आज केसांचं पण नीट होतं. त्यामुळे बघताना बरं वाटलं.

https://www.youtube.com/watch?v=KhciTAxNXN0

आज स्पेशल task turning point मध्ये खरोखर किशोरीताई, शिव आणि वीणा यांनी मन जिंकलं. केळकरने पण चांगलं काम केलं मित्रासाठी पण त्याला success नाही मिळाला.

अंजु,
सिंपल आहे, तिच्या आईने २ गोष्टी चांगल्या बोलल्या म्हणून जे वाईट बोलली ते पुसलं जात नाही, तिच्या जागी बरोबर असो किंवा चूक, ऑडीयन्स त्यांना जो बोध घ्यायचाय तोच घेणार.
शिव आवडतो म्हणून त्याचा गेम खराब करणारं बोललेली तर नाहीच आवडलं, हेच अरोह किंवा माधव बरोबर अफेअर असतं तर कदाचित राग नसता आला पण शिव नं.१ आहे, त्याचा गेम अ‍ॅफेक्ट होतोय.
वीणाला अर्थात फरक पडत नाही उलट फायदा होतो, ती स्वतः काही शिव सारखी टास्क मास्तर नाही कि शिवानीसारखी अख्ख घर स्वतःभोवती फिरवण्याची कला अवगत असलेली क्वीनबी सुध्दा नाही, उलट विदाउट शिव पूर्ण निगेटिव , कटकटी आहे, एक अनॉयिंग परसनॅलिटी सेम जुई गडकरी सारखी.
शिवचा गेम खराब होतो आणि बोलणीही शिव फक्तं आणि फक्तं वीणामुळे खातोय , केळकरनेही वीणामुळेच बोलणी खाल्ली.
त्यामुळे वीणा आणि तिची आई दोन्ही व्यक्ती निगेटिव माझ्यासारख्या अनेकांना वाटते.
टॉप ५ मधे जर वीणा किंवा शिवानीपैकी एकच जाणार असेल तर मला सध्याच्या स्टेजला शिवानी पुढे गेलेली आवडेल.

डीजे नक्कीच तुझ्या पोस्टचा आदर आहे मला.

पण प्रत्येकाची एक बाजू असते. तो त्याच्या साईडने बघत असतो तसं दोन्ही घरच्यांचे आहे. आधी त्याच्या घरच्यांनाही वाह वाह राधाशी मैत्री करतोय, छान हे वाटलं असणार.

वीणाच्या आईने शिवानीला सुनावलं तीन गोष्टींवरून त्यातल्या दोन काढायला नको होत्या, एक काढली ते उत्तम झालं. शिवानी ज्या हीन पातळीला जाऊन बोलत होती रुपालीसमोर ते इतर घरच्यांना कुठे माहिती होतं, प्रेक्षकांना माहिती होतं. रुपालीची आई आली असती तरी तिने बिचुकलेची तासडली असती. वीणाने माफी मागूनही शिवानी विषय तोच तोच ताणत होती, शेवटी bb चं वैतागले आणि गप्प केलं तिला, तेव्हा वीणाने तिच्या आई बाबांची पण माफी मागितली.

इतकं निगेटिव्ह आईला दाखवून वीणाची votes कमी झाली नाहीत हेही खरं.

बाहेरून बघून येऊन मग इथे नाटकं करणे आणि त्यामुळे शिवानी पुढे जाणार असेल तर तो विणावर अन्याय आहे माझ्यामते.

एनीवे स्वत:हून अति मोठी चूक किंवा गुन्हा केला नाही काही बिग बॉसच्या घरात तर channel सपोर्ट नक्कीच वीणाला असणार शिवानीपेक्षा कारण एकच वीणाची सिरीयल तुफान चालली आणि शिवानीची ह्या channel वरची सिरीयल सहा महिनेही चालली नाही. केवळ वीणाला इथे यायला मिळावे म्हणून सिरीयल आटोपती घेतली नाहीतर trp होता त्याला. सिरीयल मला अजिबात आवडत नव्हती, मी बघत नव्हते पण चालत होती हे नक्की. शिवानीची सिरीयल सुंदर माझं घर चालण्यासाठी channel ने त्यावेळी खूप प्रयत्न केले पण नाही चालली.

एनीवे माझे पहिले तीन शिव केळकर नेहा हे असतील. नंबर मागे पुढे होऊ शकतात.

मला पण या व्हिडिओमुळे किंवा इतर काही बोलणे कट केल्यामुळे काहीच फरक नाही वाटला, जे ती बोलली ते बोललीच आहे की.
शिव - वीणाची जोडी प्रेक्षकांना आवडत असेलही पण तरी एका आईने मुलीला तू अफेअर चालू ठेव. बाकी पुढचं पुढे बघू हे म्हणणे विचित्र वाटले. सेम असेच विचित्र स्मिताच्या आई ने "बिकिनी घाल जरा" असे तीन तीनदा म्हटले तेव्हा वाटले होते.
त्या मानाने शिव च्या बहिणीचे "तुमची मैत्री छान आहे पण जरा डिस्टन्स ठेवा" हे म्हणणे जरा नॉर्मल , जास्त प्रॅक्टिकल वाटले , की बाबा कुणाच्याही घरच्यांची अशीच रिअ‍ॅक्शन होईल असे वाटले.

शिवानीसारखी अख्ख घर स्वतःभोवती फिरवण्याची कला अवगत असलेली क्वीनबी सुध्दा नाही, >>> नसुदे. मेन हिरोला आपल्या अवतीभवती फिरवायला लावण्याची कला आहेना Wink . बास की त्यावर मिळवला की bb नी बराच trp. शिव आधी स्वत:चं पाठीमागे लागला सतत. त्यांचे चांगलं bonding होतं आणि आहे. तिने त्याला नाही सांगितलं की तू task नीट खेळू नकोस. त्याने त्याला हवं ते केलं.

बोलणीही शिव फक्तं आणि फक्तं वीणामुळे खातोय , केळकरनेही वीणामुळेच बोलणी खाल्ली. >>> हे तिने नाही सांगितलं, ती तिची बाजू मांडायला समर्थ होती आणि आहे. हे उगाच करतात तर ती काय करणार. तिनेही आरोह शिवला बोलला taskवरून तेव्हा शिवची बाजू घेतली.

हे डोक्यातून काढून टाका की वीणा शिवमुळे पुढे जातेय, तिला channel पुढे नेतंय. त्यांना नको असेल ती तर क्षणात काढू शकतात. त्यांना तिला न्यायचं असेल फायनलला तर नेणार. तिची शिडी channel आहे, शिव नाही.

एनीवे तिने दोन task खूप छान केले होते आणि जिंकून दिले होते आणि शिवसाठी कॅप्टन्सीचा त्याग केला होता. माधव कॅप्टन झाला तोही task तिने छान केला. रुपालीच्या वेळी बाकी सगळ्यांना मी nominate नाही करणार, कॅप्टन नाही झाले तरी चालेल असं म्हणून योग्य stand घेतला होता.

काल मांजरेकरांनी शिवानी-वीणाच्या "त्या" एपिसोडला दिलेला स्पिन अचंबित (ड्ब्ल्युटिएफ मोमेंट) करणारा होता. आता मांजरेकरांचीच शाळा घ्यायची वेळ आलेली आहे. "ओव्हर अ‍ॅनलायझिंग लिड्स टु प्रॉब्लेम्स दॅट डोंट इवन एक्झिस्ट इन दि फर्स्ट प्लेस", हे सांगा कोणितरी मास्तरांना...

जे आधीच वीणा-हेटर्स होते त्यांना तिच्या आईमुळे आणखी एक निमित्त मिळालं एवढंच.

वीणा-शिव बाँडिंग आवडणारं पब्लिकही भरपूर आहे.

मांजरेकर डबल ढोलकी - त्या दोघांना सारखं एकत्र असण्यावरून बोलायचं आणि वीकेंडला त्या दोघांना ओढून ताणून एकत्र बांधायचं, त्यासाठी आरोप करायला आले ल्या प्रेक्षकाच्या कानात सांगायचं.

बिचुकलेंनी मांजरेकरांची भरपूर शोभा केली आहे. बिचुकले गेले त्या आठवड्यात त्यांनी त्याच्या वागण्यावर रुद्रावतार धारण केला होता. सगळ्या हाउसमेट्सना तुम्ही बिचु कलेचं ऐकून कसं घेतलंत वगैरे विचारलं होतं. आता त्यांच्या समोरच बिचुकले वाट्टेल ते बडबडतोय आ णि हे पाच मिनिटं ऐकून घेऊन मग त्याचा संबंध काय असं विचारतात. हेच वीणा, हीना, शिव किंवा माधवनी केलं असतं तर त्यांना शब्दाशब्दाला अडवलं असतं.

भरत बिचुकले गेले त्या आठवड्यात वीणाचं किती कौतुक करत होते, ती एकटीच त्यांच्या अवतीभवती नसते, हांजी हांजी नाही करत. आता सगळे उलटे.

आता त्यांच्या समोरच बिचुकले वाट्टेल ते बडबडतोय आ णि हे पाच मिनिटं ऐकून घेऊन मग त्याचा संबंध काय असं विचारतात. हेच वीणा, हीना, शिव किंवा माधवनी केलं असतं तर त्यांना शब्दाशब्दाला अडवलं असतं. >>> अगदी अगदी.

Pages