बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अन्जु,
ते बॉलिवुडस्पाय काय किंवा इतर चॅनल्स, पुरावा एकाकडेही नसतो, एकाचं बघून दुसरेही तोच ट्रेंड पसरवतात अंदाजे.
बिगबॉसमराठी खबरी ट्विटर अकाउंट आहे, त्याच्या न्युजची वाट पाहून मग सगळे ल्ग्गेच तीच न्युज पसरवतात.
एलिमिनेशन्स न्युज बाहेर येतात आधी कारण एपिसोड पिक्चराइझ होतो १ दिवस आधी, पण व्होटींग ट्रेंड वगैरे अन्दाजाने पसरतात, चॅनल कुठलही प्रुफ देत नाही.
मिनिमम गॅरेंटी प्रकार मात्र असतो सेलिब्रिटी स्टेटस नुसार, हिन्दी सिझनला काँटेस्ट्न्ट्सच बोलताना दाखवले.

आरोह मलाही आवडतो. तो राहावा म्हणून मी त्याला votes दिलेली आहेत पण त्याने जो समज करून करून घेतलाय ना की त्याला एक नं votes आहेत तो चुकीचा आहे आणि शिव समोर आला तर त्यालाच जास्त votes मिळतील हा. त्याने बाहेर पडावे ह्या समजातून. बाकी रोडीज, रोडीज हे तो म्हणत राहणार एकंदरीत असं वाटतं.

त्याला bb यांनी पहिल्यापासून आणायला हवं होतं हे मी मागेच लिहिलेलं तो आला तेव्हा.

ते बॉलिवुडस्पाय काय किंवा इतर चॅनल्स, पुरावा एकाकडेही नसतो, एकाचं बघून दुसरेही तोच ट्रेंड पसरवतात अंदाजे. >>> अच्छा, thank u. आता हे बघायलाच नको असं असेल तर. उगाच आपला वेळ घालवायचा.

काल शिव वीणाला सांगत होता एकंदरीत नेहा आणि आरोहने त्या तिघांना उल्लू बनवलं म्हणजे शिव वीणा आणि ताई आणि त्या दोघींच्यात भांडणे लावली हे पटले मला आणि केळकरने पण काडी टाकली होती ताई आणि वीणात दोनदा Lol

बिग बॉस फ्लॉप आहे म्हणता म्हणता त्याच्या जिवावर आणखी किती लोक काय काय करताहेत! >>> हो आणि चक्क मराठी bb वर हिंदीत जास्त आहेत. एक सुरतहून गुज्जू पण करतो हिंदीत.

शिवानी किती भडक आहे जनरलीच. कधीच आवडली नाही ती. >>> अगदी अगदी. ती मानसिकदृष्ट्याही स्टेबल वाटत नाहीये, आता हे bb नीच अधूनमधून झटके आणून कोणाकोणाला target कर सांगितलं असेल spice साठी तर माहिती नाही.

किशोरी ला 'उद्धवा अजब तुझे सरकार' गाणे माहित नाही?

बिचुकले चा फालतूपणा चालू असताना केळकर आणि किशोरी त्याच्या आजूबाजूला घुटमळत राहून त्याला का महत्व देत होते कुणास ठाऊक?

आरोह पक्का कोथरुडी वाटतोय

बिचूकले एखाद्या नियमाचा भंग करून बाहेर जाण्याची शक्यता जास्त वाटतेय!

बिचूकले एखाद्या नियमाचा भंग करून बाहेर जाण्याची शक्यता जास्त वाटतेय! >>> त्याला सदस्य डिक्लेअर केलं का, कारण मी मध्ये मध्ये बघत नाही म्हणजे tv सुरु असतो एकीकडे. तसं नसेल तर काढा आता. तो गोल गोल फिरवत उल्लू बनवतो सगळ्यांना, अगदी म मां ना पण.

त्याची मजा घेणारे बाकीचे सदस्य असे काही प्रोमोज दाखवतात ते एपिसोड मध्ये दाखवत नाहीत.

खरं तर किशोरी अजूनही तीच ती क्लूलेस डंब बाई आहे जी सुरुवातीला होती. टास्क प्रामाणिक पणे खेळते, पण अजूनही तिला काहीही गेम, डावपेच कळत नाहीत की कसलाही स्टँड घेऊ शकत नाही की कुणाला कन्फ्रन्ट करता येत नाही तिला. पण तिला लोकांची सिंपथी मिळतेय हे खरं . कुठेतरी लोकांना तिचा सरळपणा अपील होत असावा आणि थोडे लक पण. ( जरी सतत नॉमिनेशन मधे येत असली तरी )+ ११११११११
हो आणि काल शिवानी आणि हीनाशी डील करताना किती अगतिकता दाखवत होत्या. म्हणाल्या की नेहा काय strong आहे ती गेली नॉमिनेशन मध्ये तरी ती येईल पण माझं तसं नाही .अजिबात कॉन्फिडन्स नाही स्वतःवर. परवा केळकर शी डील करताना पण तसचं अतिशय अगतिक होवून बोलत होत्या .
>शिव आरोहच्या भाण्डणात आधी चूक आरोहची होती. आरोहने त्याच्याशी डिल केली होती की तो हिरवा खाम्ब सिलेक्ट करेल आणि शिव लाल सिलेक्ट करेल. नेहाशी मात्र आरोहने वेगळी डिल केली. शब्द फिरविला त्याने. लाल खाम्बाकडे गेला.<<
करेक्ट! हि अंदरकि बात लपवायलाच तो एव्हढा आकांड्तांडव करत होता असं वाटत होतं... >>> अगदी अगदी. +हो अगदी बरोबर.

लास्ट सीज़न ला नंदकुमार जसे आऊ ना तलवार काढायला उसकवत होता तसे असेल आरोह चे शीव ला चिडवायला तो rodies rodies करत असेल. मला पण आरोह आवडतो. तो पहिल्या पासुन हवा होता.
मला तरी बिचुकले ला टीवी वर बघायला ईतका कंटाळा येतो घरात असणारया सदस्यान चे कसे होत असेल.

ती किशोरीची strategy असेल Wink
बाहेर ती फारच commanding producer आहे असं तिचा मुलगा आणि अलका कुबल म्हणत होते.
तिचा मुलगा Gladrags mr India होता.

strategy>> स्ट्रॅटर्जी ना Wink गेल्या सीझनला भूषण कडूने फार फेमस केला होता हा शब्द.
काहीही चुकलं, अतर्क्य वागलं, अंगावर शेकलं की म्हणायचं, माझी स्ट्रॅटर्जी होती Proud
किशोरी कॅप्टनसीसाठी डेस्परेट झाली होती. तिने हीनाला व्यवस्थित गुंडाळलं. हीना तिचा प्रतिवाद करू शकली नाही आणि फसली बिचारी. हळूहळू बोलत आपला मुद्दा लावून धरणं जमलं काल किशोरीला. पण नेहाचे मुद्दे पर्फेक्ट होते. त्यामुळे किशोरीची स्ट्रॅटर्जी फेल गेली.

ती किशोरीची strategy असेल Wink >>>>> काल ती नेहा आणि शिवानीच्या भांडणात जरा काड्या घालत होती असं नाही वाटलं का कोणाला?

टॉंंट मारत होती. नेहाच्या नवऱ्याने म्हटलेलं ना तुमच्या दोस्ती ची मिसाल. जखमेवर मीठ चोळत होती.
किशोरीला डंब समजू नका Wink

कालच्या प्रकारानंतर नेहाबद्दल कोणाला काही वाटलेलं दिसत नाहीये सोमिवर..।
उलट शिवानी बद्दलचा हेट्रेड वाढलेला दिसतोय..
'माझ्याशी असं कोणी बोलायचं नाही.. मी असं मी तसं'
सगळं डोक्यात गेलंय

काल मला बिचुकलेची मजा वाटली. शिव वीणा अंतर ठेऊन एकमेकांशी बोलत असले तरी हे काय चाललंय, मराठी bb मध्ये हे चालत नाही आणि त्यावेळी हा आणि हीना एका बेडवर बसले होते अर्थात अंतर ठेऊन होते, पण आपली कशी मैत्री आहे वगैरे. अरे तू हिनाशी फिजिकल होतोस ते बघायला किळस वाटते हे सांगा कोणीतरी असं वाटलं. हीना मात्र शिव वीणाच्या बाजूने बोलत होती.

आरोहला मेकर्सनीच शिवशी नडायला सांगितलं असणार trp साठी आणि प्लस तो बिचुकलेशी नडून जास्त trp देतो.

किशोरी कॅप्टनसीसाठी डेस्परेट झाली होती. तिने हीनाला व्यवस्थित गुंडाळलं. हीना तिचा प्रतिवाद करू शकली नाही आणि फसली बिचारी. हळूहळू बोलत आपला मुद्दा लावून धरणं जमलं काल किशोरीला. पण नेहाचे मुद्दे पर्फेक्ट होते. त्यामुळे किशोरीची स्ट्रॅटर्जी फेल गेली. >>> खरं आहे.

हीना आपल्या आधीच्या मुद्द्यावर ठाम राहिली असती तर bb पण काही करू शकले नसते. किशोरी कॅप्टन झाली असती पण हीना स्वत:च फसली सर्वात. सगळ्यांना विचारून निर्णय घ्यायचा अशी मेख होती का गेम मध्ये त्यात ती अडकली हीना.

हीना खरेच भोळी आहे. अडकली. पण तो सगळा गोंधळ बघायला मला मजा आली. एडिटिग चांगले होते.
किशोरी श्रीमंत कोस्मो कुतुंबातील आहे. तीला मराठी गाणे माहीत असणे अवघड आहे. तीचे शिक्षणपण ईंग्रजी माध्यमातले आहे असे ती एका मुलाखतीत बोलताना ऐकले आहे.

आज येरे येरे पावसा ची टीम येणार आहे बीबी मध्ये . संजय नार्वेकर अनिकेत विश्वासराव मृण्मयी गोडबोले.
शेवटी कोणीतरी प्रमोशन ला आले एकदाचे बीबीत.

किशोरी ला 'उद्धवा अजब तुझे सरकार' गाणे माहित नाही?>>>>> ह्या गाण्याचा काय किस्सा आहे? माझं गेलं बहुतेक मधलं मधलं.

नेहा ने बिचुकले ना जेल च्या तिथे उभारण्याची शिक्षा दिल्ली होती. त्यांची शिक्षा संपली तरी ते तिकडून येत नव्हते तर वीणा केळकर किशोरी त्याना बोलवायला आले. तर ते तीकडे नेहमी प्रमाणे उगीच काही पण बडबड करत होते. आणी मी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणार आहे म्हनूण सगळे जण थांबा बोलले वीणा निघुन गेली पण किशोरी ताई आणी केळकर थांबले तर त्यानी बरीच बडबड केली नेहाला निंदक म्हणून नावे ठेवली आणी मी माझे बोलणे एक गाणे गाऊन संपवतो म्हणून हे उध्वा अजब तूझे सरकार हे गाणे म्हणले. त्यांची बडबड एकून पकायला झाले.

गेल्या वर्षी एकलव्य स्टुडिओज म्हणून यूट्यूब चॅनल होते त्यांच्याकडे आतल्या खबरा असायच्या. बाकी आताची सगळी चॅनल्स फालतू आहेत एकजात. काहीही खोट्या, चुकीच्या बातम्या पकडून येडपट अनालिसिस करत बसतात. काल सगळ्यांनी "हिनाला नॉमिनेट केलेय" असे पसरवले होते. खरं तर तिची इम्युनिटी काढून घेतली आहे, नॉमिनेट नाही केलेले तिला.
वोटिंग ट्रेन्ड चेही असेच आहे. असे कुठे कळते कोणाला किती वोट्स आहेत ते. ते वोटिंग काही पोल घेतल्यासारखे रिजल्ट्स दाखवत नाही. हे लोक एकमेकाच्या कॉप्या मारतात आणि अफवा पसरवतात असेच वाटते.

हिनाने सगळ्या स्पर्धकांना विचारून डिस्कस करून डिसिजन घ्यायचा होता ना ? मग तिने कुणाला किशोरीचं बरोबर वाटतंय आणि कोणाला नेहाचा बरोबर वाटतंय ते हात वर करून जाणून घ्यायला पाहिजे होत आणि जिला जास्त मत मिळतील तिला कॅप्टन म्हणून डिक्लेयर करायला पाहिजे होत . पण तिने दरवेळी याच त्याच सेपरेट सेपरेट मत जाणून घेऊन हजार वेळा तिचा निर्णय बदलला आणि फसली बिचारी
.
शिव आणि वीणा बदल बोलायचं तर ते दोघं एकमेकांबरोबर कम्फर्टेबल असतील तर काय झालं त्यांनी असं वागलं तर ? सतत शिवानीची अरेरावी आणि त्या बिचुकल्याचा पाचकळ पणा बघण्यापेक्षा हे काय वाईट आहे ? बिग बॉस पण आधी सुरवातीला शनिवारी जोडीला प्रोत्साहन देते .त्यांना शनिवारी जबरदस्ती एकत्र नाचायला लावते . मांजरेकरांच्या थ्रू चिडवतात . त्यांना सतत सांगितलं जात तुमची जोडी छान दिसतेय पडद्यावर . हे सगळे वेडे चाळे त्यांच्या कडून करवून घेतात . ते मुद्दामून दाखवतात आणि मग अचानक कानपिचक्या देतात . तुमचा गेम वरचा फोकस कमी झालाय यावं नि त्याव . अरेच्या . बिग बॉस कायमच डबल ढोलकी वागायला लागले तर स्पर्धकांनी वागायचं तरी कस ? बिग बॉस ने एक काय ते ठरवा ना . प्रेमचाळे चालणार का नाही ? आधी प्रोत्साहन द्यायचा आणि मग कानाखाली मारायच हे नाही चालणार :).

Pages