बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आता बिग्ग बॉस मध्ये येण्या आधी झी युवा च्या फुलपाखरु सीरियल मध्ये होता अभिजित केळकर.
मी त्याला ई टीवी मराठी वरच्या गोजिरवाण्या घरात किंवा चार दिवस सासू चे या सीरियल मध्ये पाहिलेल पहिल्यांदा.
शमा सिकंदर च्या ये मेरी लाइफ है सोनी टीवी वरच्या शो मध्ये छोटा रोल होता त्याचा.
लिड रोल नाही केलाय त्याने बहुतेक साइड रोल मध्येच असतो छोट्या मोठ्या.

परफेक्ट मर्डर मध्ये सतीश राजवाडे आणि नंतर अनिकेत होते. केळकर कधीच नव्हता त्या नाटकात. ऊन पाऊस मध्ये कदाचित दोघे असतील. केळकर बरीच वर्षे काम करत आहे पण त्याने नाटक केल्याचे आठवत नाही. रडण्यामध्ये सुशंतचा भाऊ आहे, किती रडतो.

ऊन पाऊस मध्ये अनिकेत आणी केळकर दोघे भाऊ झालेले. त्यातील हिरोईन ने नंतर कुठल्या सीरियल मध्ये काम केलेच नाही. तिची आणी अनिकेत ची जोडी छान होती त्या सिरीयल मध्ये.

रच्याकने
ऊन पाऊस मध्ये अनिकेत विश्वासराव ची हिराॕईन कोण हौती? मुक्ता नावाचं होतं पात्र

@सूलू_८२ ... धन्यवाद

आई माझ्या लग्नाची ग... ही मला बिचुकल्यांनी लिहीलेली कवीता वाटत होती. तुम्ही लिहीले की गाणे आहे त्यामुळे शोध घेतल्यावर दादा कोंडक्यांच्या सिनेमातले (बोट लावीन तिथे गुदगुल्या) मधले गाणे मिळाले.
https://www.youtube.com/watch?v=RJcoiPk-8Rg

धन्यवाद झेंडू, केलकरचं नाव वाचल्याचं आठवत नव्हतं. किशोरी बीचुकलेच्या वेण्या घालत होती, यक्क. किती घाणेरडा होता तो सगळा प्रकार. एका गुन्हेगाराला अशा प्रकारे समर्थन देऊ नये. चुकीचा पायंडा पडतो.

बिचुकले कोर्टाची डेट होती म्हणून बाहेर गेले असं सोमी वर वाचल . त्यामुळे आता काही त्यांना आणू नये अस वाटत . या वेळी शिव आणि हिना दोघेच नॉमिनेट झाले आहेत त्यामुळे हिना बाहेर पडेल नंतर शिवानी जावी अशी इच्छा आहे . मग शेवटचे पाच नेहा, आरोह, वीणा , शिव आणि किशोरी असतील असं वाटत

Pages