Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52
बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आज तुझ्यामुळे नेहा चक्क आवडली
आज तुझ्यामुळे नेहा चक्क आवडली मला, ती अतिशय योग्य होती पण तू उगाच फालतू इगो ठेवलास...
Actually @anju
आजचा भाग नीट पाहता आला नाही..
आजचा भाग नीट पाहता आला नाही, अधेमधे पहिला थोडाफार..
शेवटी नक्की कोण कॅप्टन झालं? कसं?
शिवानी एवढी का भडकली होती नेहावर? नेहा बिचारी दुखवलेली दिसत होती शिवानी माधववरून बोलल्यामुळे...
हिनाला संचालक नेमकं का केलं? तिला स्वतःचा 1 निर्णय घेता येत नाही नीट, सारखा बदलत होती... ती जाम अंगचटीला जाते आणि आधी शिवच्या आणि काल आरोह भडकला होता , तर त्याला स्मजवताना त्याच्या सारखी जवळ जात होती, तिला कोणी काही बोलत का नाही???
आजचे updates द्या ना कोणीतरी प्लीज.
नेहाला कॅप्टन bb नी केलं,
नेहाला कॅप्टन bb नी केलं, खांब पडला म्हणून जसे आरोह शिव बाद तश्याच ह्या दोघी म्हणजे वीणा आणि ताई बाद.
आता हिना सेफ नाही, इम्युनिटी नाही तिला.
कामाचे वाटप करताना शिवानी शिव मधेच बोलले म्हणून नेहा म्हणाली बोलू नका महणजे त्यांनी सल्ला दिला आणि ते चूक होतं, नेहाचा मुद्दा योग्य होता त्यामुळे शिवानीचा इगो दुखावला, ती उठून गेली, मग आली पण नंतर वाटेल तसं बोलली नेहाला शिव्या देत.
बिचुकले आणि शिवानी नेहाला त्रास देतायेत कॅप्टन झाली म्हणून.
Ohh
Ohh
धन्यवाद अंजू...
शिवानी पराचा कावळा करण्यात एक्सपर्ट आहेच तशीही, उगाच ओरडत असते मधेमधे..
नेहाला full सिंपथी मिळेल आता, शिवानी बाहेर गेली पाहिजे लवकर..
नेहा वीणाचं task पलीकडे एक
नेहा वीणाचं task पलीकडे एक चांगलं नातं आहे, ते आजही दिसलं आणि हेच नचिकेत आला तेव्हा वीणाला म्हणाला.
नॉमिनेट कोण झाल?
नॉमिनेट कोण झाल?
उद्या nomination task आहे
उद्या nomination task आहे
म्हणजे वोटिंग लाईन्स नक्कीच
म्हणजे वोटिंग लाईन्स नक्कीच बंद.
आता यापुढे जो कोणी कॅप्टन
आता यापुढे जो कोणी कॅप्टन होऊन बिचुकलेला टॉयले ट क्लीनिंग ड्युटी घ्यायला (करायचं पुढे) लावेल, त्याला विनर घोषित करावं. सगळ्यांनी हात टेकले तर बिचुकलेला विनर जाहीर करून टाकायचं.
आता यापुढे जो कोणी कॅप्टन
आता यापुढे जो कोणी कॅप्टन होऊन बिचुकलेला टॉयले ट क्लीनिंग ड्युटी घ्यायला (करायचं पुढे) लावेल, त्याला विनर घोषित करावं. सगळ्यांनी हात टेकले तर बिचुकलेला विनर जाहीर करून टाकायचं.>>>>>>
नाहीतर काय? महाचालू माणूस(?) आहे बिचूकले. भरत कॅप्टन सी साठी भारी टास्क सुचवलायत तुम्ही. पण ह्या बाकीच्यांनी नांगी टाकली तर तोच व्हायचा कॅप्टन.
बादवे खांब खांब टास्क मधे जे
बादवे खांब खांब टास्क मधे जे संवाद चातुर्य अपेक्षित होतं ते कोणीच दाखवलं नाही, कि आपल्याला दाखवलं नाही?
धनुडी , कॅप्टनसीसाठी नाही,
धनुडी , कॅप्टनसीसाठी नाही, बिग बॉस सीझन २ चा विनर.
काय म्हाभयंकर रटाळ एपिसोड
काय म्हाभयंकर रटाळ एपिसोड होता, एकही काँटेस्टन्ट काही चांगलं कन्टेन्ट देत नाही

बिचुकलेला आता मात्रं आवरा बिबी, तो गेस्ट आहे विसरलेच आहेत जणु !
मधेच शिवानी नेहा दंगाधोपा-रडारड, ती शिवानी अचानक उध्ळल्यासारखी केकाटायला लागली तरी एक गोष्ट मात्रं मुद्द्याचं आणि माझ्या मनातलं बोलली, मी अगदी हेच म्हंटले कि नेहा सिनेमातल्या स्टिल्स मधे जसे हे लोक अॅक्टींग करतात तसे अॅक्ट करतीये, अगदी मी बोलले आणि २ मिनिटात शिवानीही हेच बोलली कि नेहा कॅमेरा अॅडजस्ट कर आणि मग कर रडारड.
नेहा खरच अॅक्टींग करते उगीच इमोशन्स दाखवायला, आज तर ते एकटक बघत होती शिवानीकडे तेंव्हा खरच ‘लाइट्स कॅमेरा अॅक्शन अॅन्ड सॅड फेस अस़ दिसत होतं , खूपच फेक
अर्थात शिवानी स्वतः देखील अटेन्शन साठीच भांडत होती, सगळेच काँटेस्ट्न्ट्स प्रेडिक्टेबल झालेत.
शिव वीणाला समर्पित, वीणा बिनकामाची किरकिरी, नेहा मारकी म्हैस, शिवानी दंगलखोर, हिना कनफ्युज्ड, किशोरी डंब डबलढोलकी, केळकर लब्बाड, बिचुकले असंबध गलिच्छ रटाळ असे सगळ्यांचे ट्रॅक्स गेले कित्येक आठवडे चालु आहेत, काही बदल नाही फारसा.
नेहा नेहमीपेक्षा जास्त आवडली
नेहा नेहमीपेक्षा जास्त आवडली काल!
नेहाला शिव, वीणा, केळकर कडून सपोर्ट मिळतोय...कप्तान झाल्यावर ती आधी त्यांना भेटली याचा त्रास होतोय बहुतेक शिवानीला!
नेहा आणि केळकरच्या भांडणात स्वताची पोळी भाजून घ्यायचा प्लान फसलेला दिसतोय तिचा
Btw हीना नॉमिनेट झाल्याचे
Btw हीना नॉमिनेट झाल्याचे नाही सांगितले बिबॉने, रुपालीकडून मिळालेली इम्युनिटी काढून घेतली फक्तं असं ऐकलं मी, फॉरगर्डच्या नादात काही मिस केलं का मी ?
नाही. फक्त इ म्युनिटी काढली.
नाही. फक्त इ म्युनिटी काढली.
आरोह तूपमीठभात आहे, हे टास्कमधली त्याची रडारड बघून वाटलेलं. ते लिहायचं राहिलं होतं. शिवच्या रोडीजमधून येण्याचा त्याला काय त्रास आहे? रोडीवाल्यांनी त्याला रिजेक्ट केलं होतं का?
बिचुकले बघता बघता गुंडाळतो.
बिचुकले बघता बघता गुंडाळतो. कोणाला कळत पण नाही. केलकर मुळातच कुजकट असावा. आधी वाटत होते वैशालीमुळे काड्या टाकत असेल पण आताही सुरुच आहे. नेहा फार पीळ वाटली काल.
किशोरी जिंकेल ह्यांच्या मुर्खपणामुळे
तुम्हांला टॉयलेट सफाई हे
तुम्हांला टॉयलेट सफाई हे कमीपणाचे काम वाटते का असं विचारायची कोणातही हिंमत नाही.
बिचुकले मांजरेकरांना गुंडाळतो तिथे हाउसमेट्सची काय कथा? नेहाने पहिल्यांदा करून दाखवीन थाटात तेच मिशन घेतलं. पण तिच्या जिवलग मैत्रिणीने व्यवस्थित तिचाच गेम केला.
नेहा कॅमेरा अँगल बघून रडते वगैरे ऐकून तिच्या फॅन्सची रिअॅक्शन काय असेल अशी उत्सुकता वाटली. ते सगळे आरोप ऐकून नेहा स्टन्ड झाल्यासारखी वाटली. मागच्या वेळी " वडील गेले तेव्हाही इतकं वाईट वाटलं नव्हतं," असा डायलॉग फेकला ति ने. आता यापेक्षा भारी डायलॉग कुठून आणणार ? तिला वाटलं या डायलॉगने आपण शिवानी -माधवला गारद करू, पण शिवानीने तो पचवला.
तुम्हांला टॉयलेट सफाई हे
तुम्हांला टॉयलेट सफाई हे कमीपणाचे काम वाटते का असं विचारायची कोणातही हिंमत नाही.
बिचुकले मांजरेकरांना गुंडाळतो तिथे हाउसमेट्सची काय कथा?
<<
हो, मांजरेकरला खरच गुंडाळलं , बिबॉलाही गुंडाळतात !
मांजरेकर बिचुकल्याच्या पाठीमगे तो गेल्यावर मात्र शेर बनून आरडाओरडा कांगावा करत होते पण प्रत्यक्षात मात्रं बिचुकल्यासमोर थंड पडले !
काल शिवानीने आणि शिवने मधेच
काल शिवानीने आणि शिवने मधेच चोंबडेपणा केला नसता तर नेहाने बिचुकलेला टॉयलेट सोपवलं असतंच.
हिना अजून जाम गोंधळली काल त्यामुळे ती संचालक म्हणून टोटली फेल्ड. काल इम्युनिटी काढलेली बघून योग्य वाटला निर्णय पण एकंदरीत दया आली तिची, राग नाही आला.
रोडीवाल्यांनी त्याला रिजेक्ट केलं होतं का? >>>
त्याचा समज झालाय की शिवला target करतोय म्हणून प्रेक्षकांनी एक नं votes दिलेत पण actually रुपालीपेक्षा कमी votes असून रुपालीला काढून त्याच्यावर उपकार केलेत हे कुठे माहितेय त्याला. तो हवेत आहे वीणापेक्षा पण त्याला जास्त votes आहेत असं समजून. त्याला ठेवलं त्याचं कारण तो शिव बिचुकलेला नडतोय आणि रुपाली जास्त पैसे देऊन कंटेंट देत नव्हती. रुपालीला नेहा शिवानी grp चा टोटली तोटा झाला. पण आरोहला हे नक्की माहिती असायला हवं होतं इतके दिवस बाहेर राहून की एक नं votes असतील तरी त्यांना दाखवायचं त्यांनाच एक नं दाखवतात. वीणा दोन्ही आठवडे एक नं वर असून तिला danger zone मध्ये ठेवलं आता रूपालीला बाहेर आल्यावर सत्य समजलं असेल. काय होतं सगळीकडे votes ट्रेंड out होत असल्याने एकजात सर्व youtube vlogers नी वीणाला एक नं votes आहेत हे दाखवलं होतं आणि आरोहला सर्वात कमी हेही दाखवलं होतं. मी दोघांना केलेलं voting.
शिवानी स्वत: कॅप्टन झाली तेव्हा कशीही वागत होती, नेहा झाली आणि हिचे ऐकलं नाही तर पोटात दुखायला लागलं त्यामुळे काल सहानुभूती नेहाकडे गेली माझ्यासकट बऱ्याच जणांची.
वीणाचा एक मुद्दा बरोबर होता खांब पडला म्हणून जो नियम शिव आरोह च्या वेळी तोच ती आणि ताईच्या वेळी. हेच bb नी पण ग्राह्य धरलं.
काल मला तरी सर्वात शिव वीणा bonding सीनच आवडला झोपाळ्यावरचा.
I dont give power to anybody
I dont give power to anybody on this planet to talk to me like that हे वाक्य महान होतं. परत त्यात श ब्द ताणलेले, हॅमर केलेले.
शिवानीला ऐतिहासिक, पौराणिक मालिकांत चांगला स्कोप आहे.
लोक म्हणताहेत, शिव अजूनही
लोक म्हणताहेत, शिव अजूनही सुधारत नाही. मुळात आपण बिघडलोय, चुकलोय असं त्याला वाटत नसेल, तर त्याने का सुधारावं?
आता जिच्याशी सतत वाजायचं त्या हीनाबरोबर बाँडिग होतंय त्याचं. कणके चे दिवे तिच्यासोबत बनवले. तीच वींणाला चांगला डान्स शिकवते असे म्हणाला. हळद लागली की नवरा नवरीने एकमेकांचं तोंड पाहायचं नसतं, तसं त्याने वीणा शी बोलूच नये की काय?
कोणाला किती व्होटस आहेत हे
कोणाला किती व्होटस आहेत हे तुम्हा लोकांना कसे कलते?
आता खूप पैसे घेऊन कंटेंट न
आता खूप पैसे घेऊन कंटेंट न देणाऱ्यांनी सावध व्हावं. कितीही votes असून त्यांना काढू शकतात कारण trp नाहीच दिसत bb ना. जे कमी भावात आलेत त्यांना ठेवतील.
शिव वीणा योग्य करतायेत trp आहे त्यांच्या bonding ला आणि आपले tasks पण नीट करतायेत. दोघांनी प्रयत्न केलेत, शिवानी सारखं give up नाही केलं.
फक्त आता त्यांनी विकेंडच्या डावाला स्वतः हून लांब बसावं, म मां कडून वेगळं व्हायचा अपमान करून घेऊ नये.
शिव रोडीज मध्ये कोणाकोणाच्या मागे होता तेव्हाच त्याच्या घरच्यांनी गृहीत धरायला हवं होतं bb मध्ये पण हा मागे मागे जाणार कोणाच्या तरी. तिथे भाव दिला नसेल कोणी, इथे मिळतोय. आता बोलून सांगून काही उपयोग होणार नाही. मानसिकदृष्ट्याही कोणाशी तरी शेअर करणे ही दोघांची गरज आहे आणि त्या दोघांचा comfort zone ते दोघेच आहेत एकंदरीत. आता त्यांनी किमान तेवढंही नाही केलं तर शिवचा गेम बिघडूही शकतो, कशावरून लांब राहिला वीणापासून तर गेम सुधारेल. तो नीट खेळतोय.
मांजरेकरांना उलट ऐकवायचं,
मांजरेकरांना उलट ऐकवायचं, तुम्हीच आम्हांला जबरदस्ती एकत्र आणत असता म्हणून.
त्याचा समज झालाय की शिवला
त्याचा समज झालाय की शिवला target करतोय म्हणून प्रेक्षकांनी एक नं votes दिलेत पण actually रुपालीपेक्षा कमी votes असून रुपालीला काढून त्याच्यावर उपकार केलेत हे कुठे माहितेय त्याला
<<
हे इतल्या खात्रीने कसं सांगता ? याला काय पुरावा ?
एक कोण तो बिगबॉस खबरी नावाच अकाउंट काहीतरी टाकतं आणि सगळे युट्युबर्स त्याचीच इन्फॉर्मेशन फॉरवर्ड करतात, रुपालीच जाणार होती फारसा सपोर्ट- फॅन्स नसल्यामुळे आणि गेली.
बाकी आरोह शिवची पॉप्युलॅरीटी बघून आलाय, कदाचित मॅक्सिमम फुटेज मिळावं हा सुध्दा प्रयत्न असु शकतो, जसे श्रीसन्तशी भांडून हिन्दी सिझनला पब्लिक फुटेज घ्यायचा प्रयत्नं करायचे
भरत आज एकदम एक नं प्रतिसाद
भरत आज एकदम एक नं प्रतिसाद
हे इतल्या खात्रीने कसं सांगता
हे इतल्या खात्रीने कसं सांगता ? याला काय पुरावा ? >>> bollywood spy, act riders, hungry spirits बघून.
बिगबॉस खबरी >>> हा कोण मला माहिती नाही, मी याचं बघत नाही. याचं बघून सगळे टाकत असतील तर मला माहिती नाही.
मी जास्त करून bollywood spy आणि act riders बघते. तिसऱ्याचा पण मला कंटाळा येतो. पाच ते सात मिनिटांपर्यंत असतील तेवढेच पहिल्या दोघांचे vlogs बघते. मोठे मोठे बघत नाही.
अॅक्च्युअली आरोह आवडतो मला,
अॅक्च्युअली आरोह आवडतो मला, जेन्युइन वाटतो. भांडतो मनापासून, रडतो मनापासून
रोडीजचा उल्लेख मात्र बालीश आहे त्याचा. पण एकूण साधा मुलगा वाटतो.
हीनाने किती बेअकलीपणा केला काल खरंच. बिग बॉस खरंच डोक्याला हात लावून 'सिरियसली?' असं म्हणाले असतील! आणि सारखी माफी, सारखं हात जोडणं आणि सारखं निर्णय बदलणं
मस्त टीपी झाला.
शिवानीने माधववरून नेहाला डिवचलं तेव्हा मला नेहा खरंच बंद पडल्यासारखी वाटली. आऊट ऑफ द ब्ल्यु हे काय? असा चेहरा झाला तिचा. शिवानी किती भडक आहे जनरलीच. कधीच आवडली नाही ती.
बिचुकलेला मात्र कोणीच हॅन्डल नाही करू शकत. या माणसाशी अजिबात न बोलणं हाच पर्याय आहे , पण आपल्याला बाहेरून बोलायला काय जातंय, बिचारे बाकीचे स्पर्धक, त्यांना त्याला सहन करावंच लागतं.
क्च्युअली आरोह आवडतो मला,
क्च्युअली आरोह आवडतो मला, जेन्युइन वाटतो. भांडतो मनापासून, रडतो मनापासून Proud रोडीजचा उल्लेख मात्र बालीश आहे त्याचा. पण एकूण साधा मुलगा वाटतो.
<ळ
+१
बिबॉने आधीपासूनच डे १ पासून आणायला हवं होत्ं त्याला, शिवला टफ काँपिटिशन दिली असती.
Pages