बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बिचुकले सदस्य नाहीये हे कळल्यावर त्याला आता चेव आला आहे.
पण आतल्यांना हे माहित नसल्यामुळे ठिणग्या पडतात. चॅनेल त्यात टीआर्पी शोधतोय. धन्य आहे!
गेले दोन दिवस मांजरेकरांनी काय केलं हे त्यांचं त्यांना माहित! त्यांच्याकडे शो पुढे न्यायला काहीही कंटेंट नाही. अक्षरशः सगळा पुअर शो होता.
बिचुकलेला आणखी दोन आठवडे ठेवून घालवून देतील.
आरोह , शिवानीला पण शेवटच्या तीनात यायच्या आधीच घालवतील. शिवानी ट्रॉफीची दावेदार होऊ शकणार नाही कदाचित. तिला जिंकवलं तर जनतेत चुकीचा संदेश जाईल आणि चॅनेलला ते डोईजड होईल.
माझ्या मते शेवटचे तीन - नेहा, शिव, वीणा
(केळकर विनर होऊ शकत नाही. त्याला बाहेरुन फारसा पाठींबा नाही असं ऐकिवात आहे. )
मला नेहाला विनर बघायला आवडेल.

मलाही नेहा आली तर आवडेल. योग्य तिथे अॅग्रेशन , योग्य तिथं माघार, न्यायानं वागणं, लाॅयल्टी, स्त्रीपणाचे चुकीचे फायदे न घेणं, कष्टाची तयारी वगैरे गोष्टी आहेत तिच्यात. विणा माजखोर , खोटारडी, दगाबाज, आळशी, मगरीची आसवं ढाळणारी, निर्लज्ज वगैरे वाटते.
शिव मोहजालात अडकलाय त्याला कर्तव्याचा विसर पडलाय.
केळ्या चांगलाय पण जरा खालमुंडी वाटतो.

मै, भरत ,मोक्षू च्या वरच्या पोस्टी पटल्या.+११११
ममां खुपच बायस्ड वागतात. शिव वर खुपच डाफरतात तो बिचारा उलटून बोलत नाही.>>>अगदी बरोबर म्हणताय धनुडी
मला तुमच्या आणि अन्जूताई च्या कमेंट्स आवडतात आणि पटतात.
भरतजी आणि अन्जूताई खूप छान विश्लेषण करतात.

मांजरेकरांनी बर्‍यापैकी बिचुकलेला झाडला असे वाटले. नंतर नंतर थोडे आवरते घेतले. मध्येच त्याच्यावर जोक मारून थोडेफार वातावरण हलके केले.

अलका कुबल किशोरी साठी बोलली ते आवडले. त्यातल्या त्यात कुबलने बाप्पा मला नागपंचमीला शुभेच्छा देतो हे सांगितले त्याची खूप गंमत वाटली. (असेच मी आणि माझा मावसभाऊ मुद्दाम एकमेकांना त्यादिवशी फोन करतो , गंमत म्हणजे आजच नागपंचमी आहे)

प्रियांका थँक यु. पण माझ्या विश्लेषणात तोच तोचपणा जास्त असतो. आवडत नाहीत त्यांचेही गुण लिहायचा प्रयत्न करते आणि आवडतात त्यांचे दोष दिसले तरी लिहायचा प्रयत्न करते.

मुळात मला जी लोकं बाहेर जाऊन आली आहेत त्यांना सदस्य करुन घेणंच पटलं नाही आणि त्यांना फायनलला नेणं हा तर पहील्यापासून जे टीआरपी देतायेत त्यांच्यावर केलेला अन्याय वाटेल.

बिचुकले पक्का राजकारणी आहे. बाथरुम प्रकरण शेकायला लागले तेव्हा विषय अल्गद दुसरीकडे वळवला. कोणाला कळले पण नाही.

मला शिवचं आवडेल. फिमेल contestant कोणी येणार असेल तर किशोरीताई यावी, लय भारी धमाल येईल Lol

एनीवे नेहालाचं चान्सेस आहेत शिवनंतर.

मला लास्ट पुर्ण आठवडा रुपाली कुठेतरी विझल्यासारखी वाटत होती..तिचा खेळातला interest च गेला होता..एकतर तिला कुठे जाऊ..कोणासोबत राहू हेच कळत नव्हते..त्यात खुनाच्या टास्क वेळी तिने जी माती खाल्ली त्यामुळे हाउस मेट पण हिला हलक्यातच घेत होते..ज्याने तिचा confidance कमीच झाला होता..

यावेळी वाइल्ड कार्ड सुध्हा कोणी मिळालं नाही बिग बॉस ला...एकच काय तो मांजरेकर रेगे फेम आरोह आला...म्हणजे किती वाईट अवस्था आलीये

धन्यवाद प्रियांका Happy
मला मैत्री टास्क मधे शिवचा मित्र खुप आवडला. खुप भारी बोलला आणि काही सल्ले नाही दिले त्याला. भाषा किती गोड वाटते त्याची. मला शिवची बोलण्याची स्टाईल पण खुप आवडते.

प्रोमो एक एपिसोड भलताच एडीटेड असं का करतात ?
चुगली बुथमधे शिवानीला बोलावलं आणि वीणा तिच्याबद्दल बोलली ते प्रोमोत दाखवलं पण अ‍ॅक्चुअल एपिसोडमधे नाही, याशिवाय ते निरनिराळ्या टायटलचे क्राऊन घालणे टास्कच नाही दाखवला Uhoh
बिचुकल्याचे मात्रं रटाळ असंबध्द लांबलचक बोलणं कित्ती वेळ, सगळं फॉरवर्ड करण्याच्या लायकीचं !

प्रोमो एक एपिसोड भलताच एडीटेड असं का करतात ?
चुगली बुथमधे शिवानीला बोलावलं आणि वीणा तिच्याबद्दल बोलली ते प्रोमोत दाखवलं पण अ‍ॅक्चुअल एपिसोडमधे नाही, याशिवाय ते निरनिराळ्या टायटलचे क्राऊन घालणे टास्कच नाही दाखवला >>>>>>>> अरेच्चा हो की . क्राउनवाला टास्क झालाच नाही.

शीव ला विणा मधले 2वाईट गुण सांगता नाही आले . उलट तिथे जाऊन विणा ला तुच सांग ना काहितरी असे बोलला. खरोखर शीव चे कठिण आहे . असा खेळला तर

एक कुणी नोटीस केले आहे का बिचुकले दुसर्यांसाठी कधीच टाळ्या वाजवत नाहित. उदाहरणात friendship डे चा msg झाल्यानंतर बिचुकले सोडून सगळे टाळ्या वाजवत होते. ते एकाच position मध्ये बसुन होते.

शिवानीला क्वीन केलं म मां नी तिथेच सर्व आलं. बाकी बरेच जण किशोरीताई म्हणत होते पण दबंग क्वीन हवी असेल कदाचित त्यामुळे त्यांनीच ते नाव रेटलं, कॅप्टन्सी, शिक्षा असं म्हणाले पुढे. किशोरीताईंना त्रास देऊन देऊन, त्या रडल्या की मग मी काही अनह्युमन ( हाच शब्द वापरलेला तिने, त्यावर सो मि वर इनह्युमन म्हणतात गं, अशा कमेंटस आलेल्या, असो तिला सर्वच माफ ) नाहीये, सॉरी म्हणूसारवासारव करणारी. वीणाला चालबाज आणि शिवला जोरु का गुलाम दिलं. सगळा टी आर पी वसुल करायला बघतात ह्या दोघांकडून, बरं झालं हे काहीच दाखवलं नाही. पचका झाला क्वीनचा.

ती स्वतःला चालबाज पण म्हणवून घेत होती पण म मां नी वीणाला दिला तो किताब.

मला मैत्री टास्क मधे शिवचा मित्र खुप आवडला. खुप भारी बोलला आणि काही सल्ले नाही दिले त्याला. भाषा किती गोड वाटते त्याची. मला शिवची बोलण्याची स्टाईल पण खुप आवडते. >>> हो मस्त होता तो. म मां नी पण कौतुक केलं भाषेचं त्या मित्राच्या.

ह्यावेळी नवीन कॅप्टन आहे, एकदाही न झालेलं कोणीतरी. नांव नाही फोडत पण त्या व्यक्तीला चान्स मिळाला बरं झालं. काहीजणांना डबल मिळतो, काहींना अजिबात नाही.

म मां नी पण कौतुक केलं भाषेचं त्या मित्राच्या. >>ममां वो अधिकार खो चुके है. ना धड मराठी ना धड इंग्रजी. एक ओळसुद्धा नीट बोलत नाही मराठीत तर लगेच घुसतो इंग्रजीत....गरज काय असते त्याची? बरं इंग्रजीही भयाण असते ममांची

काही vlogers नी तेच म्हटलंय जे मी लिहिलं होतं ते की वीणाला votes जास्त असून तिला danger zone मध्ये का टाकतात नेहेमी. आरोहला सर्वात कमी असून त्याला जास्त का दाखवली. वीणाला काढायचा डाव आहे का. शिव वीणाला अति target केलं म मां नी म्हणून पण टीका आहे काही ठिकाणी. एनीवे यामुळे वीणाला सहानुभूतीचं मिळतेय उलट.

मी अगदी छोटे vlogs असतात ते बघते. पाच मिनिटांपर्यंत असतात ते. बाकी टायटल वाचते.

पराग कान्हेरेचा दुसरा एपिसोड आला, क्रीस्पी भेंडी जी शिवानी सुर्वेने शिकवलेली. तो म्हणाला मी सगळ्यांबद्दल चांगलंच बोलणार आहे, तिथल्या चांगल्या आठवणी आणि रेसिपीज तिथल्या मित्र मैत्रिणींनी शिकवलेल्या करणार आहे. मला तर वाटतं bb यांनीच छुप्या पद्धत्तीने वेब सिरीज काढून दिली की काय Lol . त्यालाही काम मिळालं आणि bb ची चांगली add होतेय. परागचा trp साठी असा उपयोग करून घेतायेत.

म मां शिव विणाला सतत टारगेट करतात ते चूकच आहे. पण शिवबद्दल एक बरोबर बोलले की, बिचकुले 'शिवचा मेन्दू गुडघ्यात आहे' बोलला त्याच्यावर शिव रागावला नाही. तेच जर आरोह किव्वा हिनाने म्हटल असत तर राडा झाला असता.

प्रोमो एक एपिसोड भलताच एडीटेड असं का करतात ? >>>>>>>>> अगदी अगदी बिचकुलेला Confession Room रुम मध्ये बोलावून ममांने त्याची फिरकी घेतली ते प्रोमोतच दाखवल फक्त.

तसच एका प्रोमोत शिव अनसेफ म्हणून विणाच नाव घेतो, ती त्याच्याकडे शॉकिन्गली बघते तेसुद्दा एपिसोडमध्ये नव्हतच.

शिवचा मित्र खुप आवडला. खुप भारी बोलला आणि काही सल्ले नाही दिले त्याला. भाषा किती गोड वाटते त्याची. मला शिवची बोलण्याची स्टाईल पण खुप आवडते. >>>>>>>> +++++++++१११११११११ शिवच्या मित्राला पुढच्या बिबॉमध्ये ( जर झाला तर) आणायला हव.

अलका कुबल, जितेन्द्र जोशी छान बोलले. नेहा का नाही उभी राहिली टास्कला? Uhoh

फायनली अजिन्क्य ननावरे दिसला. शिवानीसारख्या मुलीला झेलणार्या माणसाला बघायच होत मला.

नेहा छान दिसली काल. तिने तिच्या डोळयान्च्या मेकअपवर लक्ष दयाव. तिचे डोळे छान आहेत. Happy

बाकी शिव आणि किशोरीताईचे कपडे भयानक होते.

रिन टास्कमध्ये शिवने त्याच्या कॉलेजचा सान्गितलेला किस्सा कुठेतरी वाचल्यासारखा/ बघितल्यासारखा वाटतोय मला.

शिवानी तिच्या चित्रपटाच प्रमोशन करायला आली आहे का परत? बोलताना तिच्या डोळयातले अश्रू दिसत नव्हते. तरीही डोळे पुसण्याची नाटके करत होती.

हिनाने केलेल काम क्यूट होत.

विणा बालाजीच्या सिरियल्समध्ये कॅमिओ करत होती. तिच बोलण ऐकताना शिवानी जिलियस झाल्यासारखी वाटत होती.

नेहाचे बोलणे अर्धवट एडिटल्यासारख वाटल मला.

आजच्या टास्कचा प्रोमो बघितला. बिचुकले खाम्बाभोवती प्रदक्षिणा घालतोय की काय? Lol

हो वीणाने पण आधी हिंदीत काम केलंय असं वाचलं म्हणून मराठीत लीड घेतलं असावं. मला नव्हतं माहिती. मला राधा म्हणून कधी आवडली, कधी नाही त्यामुळे ती सिरीयल बघितली नाही.

शिवानी तिच्या चित्रपटाच प्रमोशन करायला आली आहे का परत? >>> हेच लिहिलंय काही जणांनी सो मि वर.

शिव वीणा किशोरीताई केळकर यांनी छान सांगितलं. त्यांनी केलेली कामं खरंच चांगली आहेत.

शिवानीची हिंदी सिरीयल अनामिका चांगली चालली होती पण मराठी एकही चालली नाही. जी चालली तिथे तिला replace केलं दुसरीने. मी नंतर बघायची सोडलेली म्हणजे replace करायच्या आधीच सोडली. पण तिथे शिवानी आणि संग्रामजी जोडी आवडलेली.

तिच बोलण ऐकताना शिवानी जिलियस झाल्यासारखी वाटत होती. >>> खरं जेलस व्हायला नको कारण वीणापेक्षा तिने काम जास्त केलंय. भले सिरियल्स न चालोत. पण ती होते जेलस सतत वीणावर. लक्झरी task शिव वीणा जिंकले तेव्हाही जेलस ती आणि मग माधवकडे राग व्यक्त केला, त्याने ओळखलं नाही म्हणून.

मला तर वाटतं bb नीच छुप्या पद्धत्तीने वेब सिरीज काढून दिली की काय Lol .>>>>>>>बघ अन्जू Lol मी परत" नीच छुप्या पद्धतीने सिरीज काढून दिली" असं वाचलं Rofl

नेहा वीणा तिच्यापुढे बऱ्या वाटायला लागल्या मला. ती दिसायला सुंदर असली तरी हसतमुख कमी असते, सतत खुन्नस लुक्स.

धनुडी, त्यात ती वीणावर जाम जळते सगळ्यात. जायच्या आधी शिव वीणावर खार खाऊन असायची, आता शिवचा उपयोग करून घ्यायचा आहे task साठी म्हणून त्याच्याशी गोड गोड.

परत" नीच छुप्या पद्धतीने सिरीज काढून दिली" असं वाचलं >>> Lol करते एडीट. दोघांच्या मध्ये स्पेस देते. खरंतर योग्य लिहिलंय मी दोन्ही अर्थाने Wink .

Lol अन्जू
धनुडी, त्यात ती वीणावर जाम जळते सगळ्यात. जायच्या आधी शिव वीणावर खार खाऊन असायची, आता शिवचा उपयोग करून घ्यायचा आहे task साठी म्हणून त्याच्याशी गोड गोड.>>>> हो ते दिसतंच तिच्या चेहेऱ्यावर. ती स्वतः ला खुप ग्रेट स्टार समजते, ती खुप आधी दिगंबर नाईक ला म्हणालेली की माझे दिवस नाही माझा पूर्ण काळ येणार ााााआहे

शिवानि ची 'जाना ना दिल से दुर' सिरियल पण चांगली चालली होती . स्टार प्लस वर होती. 1.5वर्ष चाललेली ती .लिड होती ती त्यात. शिवानि वीणा वर का जळते माहिती नाही पण तिने वीणा पेक्षा जास्त काम केलाय हिन्दी आणी मराठी मध्ये ही तेपण लिड म्हणुन.

हो, हिंदी दुसरी माहिती नाही पण अनामिका चालली जास्त अस मी लिहिलं. मराठी मात्र नाही चालत तिच्या.

ती लहान वयात काम करायला लागली, सोळाव्या वर्षी गाडी घेतली वगैरे. मग वकीलाशी बोलते अशी लीगल धमकी वगैरे दिली bb ना, मग bb म्हणाले तर म्हणे माझ्याकडे पैसाच नाही, मी पैशासाठी आले इथे. 12, 13 सिरियल्स करून पैसाच नाही. ही पर्सनल कमेंट नाही करत, bb त जे दिसलं समोर ते लिहिलं.

आत्ता पण bb ना trp नाही, तिला काम नाही म्हणून मांडवली झाली असेल, भाव कमी देऊन bb नी परत आणल्याची शक्यता जास्त वाटते.

काल ममांचा सूट काय भयाण होता!! Uhoh बिचुकले परवडले त्यांच्यापेक्षा असे म्हणायची वेळ आली !! Lol
यावेळी शिवानी, हिना, रुपालीचे कपडे आवडले. किशोरीचा चांगला होता तसा पण टू मच वाटतात मला तिचे गेटप. खूप झगमगाट कायम, जरदोझी आणि ज्युलरी. वीणाचा ड्रेस चांगला होता पण जरा मेसी वाटला त्या इकडून तिकडून लोंबणार्‍या पदरामुळे. नेहाने एकूणच आख्ख्या सीझन मधे कपड्यांवर फारसा विचार केला नसावा Happy पण बरीच बरी दिसली काल. मागच्या सीझन ला मेन अजिबात कपड्यांवर लक्ष द्यायचे नाहीत. झब्बा घातला की झाले अशी बहुधा त्यांची कल्पना होती. यावेळी शिव आणि आरोह चे कपडे चांगले असतात. माधव चे पण छान स्टायलिश असायचे. केळ्याचेही कधी कधी चांगले असतात. काल चांगले होते.

Pages