Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52
बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आरोह याने बिचुकलेला भांडी
आरोह याने बिचुकलेला भांडी लावायला की घासायला सांगितली (त्यांची ड्युटी होती म्हणून) त्यावरून चिडले. >>> अच्छा thank u. त्यांना कामं करायचीच नसतात बहुतेक. प्लस त्यात आरोह डोळ्यात खुपतो.
एक मात्र आहे केळकर उत्तम बाबा आहे, बिचुकले मात्र shining जास्त मारतो, मुलाची निरागसता हरवतोय तो.
Btw फार add कमी मिळतायेत असं दिसतंय bb च्या वेळी, त्यांच्या सिरियल्सचेच प्रोमोज जास्त दाखवावे लागतात. आता जास्त मानधन घेऊन trp न देणाऱ्यांना पहिले काढतील बाहेर.
एक मात्र आहे केळकर उत्तम बाबा
एक मात्र आहे केळकर उत्तम बाबा आहे, बिचुकले मात्र shining जास्त मारतो, मुलाची निरागसता हरवतोय तो>> खरच..बळच मुलाला गाण गा..सगळ्यांची नाव सांग करत होता.. बिचारा अगदी बावरला.. केळकर म्हणाला पण नका force करु त्याला..निघताना अगदी आईचा पदर धरून रडत होता.कठिण आहे अशा माणसा सोबत संसार करण..बायकोला पण ही साडी का घातलीस म्हणे..मुलाला महाराज महाराज करुन sorry to say पण ही अशीच लोक मुलग्याना वेगळी special वागणूक देतात.. आणि मुलगे स्वताला अती समजतात..मुलगा लाजत होता तर बिचुकले ची आई पण म्हणाली की बायका लाजतात..एकंदरीत घरावर बिचुकले आणि त्यांच्या मातोश्रींचा वचक असावा अस वाटल..त्या पण बिचुकले चाच मिनी अवतार वाटल्या...आलेल्या सगळ्या मध्ये नचिकेत ,केळकर ची बायको जास्त नॉर्मल वाटले
आणि mrs आरोह पण
आणि mrs आरोह पण
मागे फोन कॉल च्या वेळी पण
मागे फोन कॉल च्या वेळी पण केळकरच्या मुलाने गाणे म्हटले म्हणून बिचुकले ने पण फोर्स केला होता त्याच्या मुलाला गाणं गा च म्हणून. आता परत केळकरची मुले आधी येऊन गेली, त्याच्या मुलाने सगळ्यांची नावे सांगितली म्हणून बिचुकले ला त्याच्या मुलाला त्या शर्यतीत उतरवण्याचे ऑब्सेशन! मूर्ख माणूस आहे! हाकला यार त्याला लवकर !!
हो ना खरंच.
हो ना खरंच.
मागे डीजेने पण लिहिलेलं, अशांची मुलं मग पुढे प्रिन्ससारखी होतात सैराटच्या, खरं आहे.
वाईट वाटतं इतक्या निरागस मुलाचं, आईने आणि आजीने लक्ष द्यायला हवं त्याच्या जडणघडणीत, नाहीतर वाट लावणार हा.
बरं आईचा असा दृष्टीकोन असून बिचुकले कसा असा झाला. का आईही बेरकी आहे.
आज बर्याच दिवसाने बिबॉ
आज बर्याच दिवसाने बिबॉ पाहिलं आणि शॉकिंग वाटले.
ते बिचुकले आले परत? कमाल आहे.
आणि आज काय घरची आलेली भेटायला. इतकी सुरेख मुले आणि हा असा गचाळ, मागसलेल्या विचारांचा शिवेरडा माणूस.... त्याचे काहीतरी भांडी घासण्यावरून प्रॉबलेम होवून शिव्या देणे चालूच. सगळे इतका त्याला भाव देतात?
बिचुकले आईसारखे दिसतात आणि बोलतात सुद्धा.. तशीच जीभ फिरवून वगैरे. भरपूर लाडावलेले आहेत आईने वाटतं.
रुपाली साठी कोण आलेले ते भेटायला?
बाकीच्यांची पण घरची आलेली पण एकंदरीत काहीच बघण्यासारखे नाही.
बिबॉ मध्ये काहीच बघण्यासारखे नाही हेच सिद्ध झाले.
हा भाग बघताना, किती त्या
हा भाग बघताना, किती त्या सिरियलच्या अॅड.
जीव झाला येडापीसा मध्ये कोण आहे तो अॅक्टर? अगदी आताच जंगलातून आपले पुर्वज पकडून आणल्यासारखा आहे.
काही कमेंट्स माझ्या डबल पोस्ट
काही कमेंट्स माझ्या डबल पोस्ट झाल्यात, त्यात मी कधी एडिट करून ऍड करते पण आधीची आणि नंतरची अशा दोन्ही दिसतायेत, अरेरे मोबाईलवरून नेहेमी काहीतरी घोळ होतो म्हणून मला डेस्कटॉपवरून आवडतं, आत्ता माझ्या लक्षात आलं, आता वेळ निघून गेली, काढू शकत नाही मी, sorry for that.
झंपी रुपालीचा भाऊ संकेत आणि
झंपी रुपालीचा भाऊ संकेत आणि त्याच्या मित्राची छोटी मुलगी दिक्षिता आलेली, ती खूप बावरलेली. संकेतने बहिणीला आरसा दाखवला, ज्याच्या त्याच्या प्रभावाखाली येऊन खेळतेस, तू स्वतः कुठेच दिसत नाही आम्हाला, मस्त खडे बोल सुनावले तिला.
जीव झाला वेडापिसाचा हिरो आवडतो मला, मस्त acting करतो, अशोक फळदेसाई नाव, गोव्याचा आहे.
रुपाली यावेळी परत राहतेय की काय भीती वाटतेय, आरोहला सर्वात कमी votes आहेत असं बघितलं youtube वर.
अन्जु, धन्यवाद.
अन्जु, धन्यवाद.
सगळे अस्स येवून भेटतात काय.. इतकं काय रडतात जसे युद्धासाठीस्गेलेत... केळ्याबरोबर ती नेहा आणि शिवानी काय ढसाढसा रडत होत्या...
हा ड्रामा असतो की खरोखर रडत असतात देव जाणॅ.
अरे तो बिचुकले काय माणुस आहे
अरे तो बिचुकले काय माणुस आहे राव, मुलीकडे बायकोकडे दुर्लक्ष आणि सगळं लक्ष पोरावर !
पुअर किड.. किती केविलवाणा रडत गेला 
, आरोहला जिंक वगैरे म्हंटलीच नाही पण नेहाला मात्रं म्हंटली कि तुला लोक डॉमिनेटींग म्हंटले तरी याच अॅटीट्युडमुळे तू ट्रॉफी जिंकणार 
सगळे मेंबर्स त्या मुलापेक्षा मुलीकडे जाऊन लाड करत होते म्हणून पोराला म्हणे बघ तुझ्याकडे कोणी नाही येत, सगळे तिलाच भेटतायेत !
पण त्या पोरालाही कित्ती टॉर्चर करत होते , कित्ती प्रेशर टाकत होते, सतत केळकरच्या पोरांशी तुलना, शेवटी धपाटा घातला का त्याला त्यांचं ऐकत नव्हता, गाणं म्हणत नव्हता म्हणून
इतकी सुरेख बायको, देखणी मुलं , किती लकी माणुस आहे पण हा असा माजलेला !
बायकोलाही ओरडले ही साडी का नेसलीस म्हणून, बिचारी ! खूप डॉमिनेट करत असणार हा माणुस !
घरी परत पाठवा त्याला , सदस्य नकोच!
आधी किती करमणूक करायचा, आता प्रकरण हाताबाहेर गेलय, आरोहवरही खेकसला, शिव्या दिल्या, एकटी शिवानी कंट्रोल करते त्याला, बाकी सगळ्यांनी हात टेकलेत आता !
बिचुकलेच्या फॅमिलीचे ५ मेंमर्स आत सोडले आणि केळकरच्या बायकोला आतही जऊ नाही दिले, शिवानीच्याही बाबांनी तिला सांगितलना कि दोघांपैकी एकालाच यायला सांगितलं, मग बिचुकल्यावर बिबॉ मेहेरबान का ?
शिवानी का इतकी रडत होती बाळ मांडीवर घेतल्यावर ?
रुपाली जितकी ड्रामेबाज तितकाच रुपालीचा भाऊ खूप साधा, एकदम योग्य फिडबॅक, योग्य सल्ले देऊन गेला.
आरोहची बायको ‘गेम ऑफ थ्रोन्स ‘ फॅन दिसतेय, शिवानीला खलिसी म्हंटली
नेहाला मात्रं म्हंटली कि तुला
नेहाला मात्रं म्हंटली कि तुला लोक डॉमिनेटींग म्हंटले तरी याच अॅटीट्युडमुळे तू ट्रॉफी जिंकणार>> हे मला खुप आवडलं तिचं बोलणं.. छान वाटली ती..
बिचुकलेची मुलगी खुप गोड आहे.
आरोह ची बायको होती कि ठरलेली
आरोह ची बायको होती कि ठरलेली बायको म्हणजे गर्लफ्रेंड होती?
बिचूकले माझ्या साठी exist च करत नाही. मला इतका राग, किळस चिड सगळं एकत्रित वाटतय त्याला नुसता बघितला तरी. मी म्हंटलं होतं की बिबॉ बघणार नाही आता पण तसं झालं नाही.
ह्याला हाकला रे ssssss. माज किती असावा माणसाला. खरंच एकटी शिवानी त्याला उत्तम रित्या हँडल करते. त्याची कामं त्याला करायला लावते
बायको आहे ती आरोहची, ती
बायको आहे ती आरोहची, ती प्रोफेशनल डान्सर आहे, प्रायोगिक नृत्यभूमी असा काहीतरी उल्लेख केला होता आरोहने.
बिचुकले आरोहला नेहमी काल
बिचुकले आरोहला नेहमी काल आलेला मुलगा म्हणतो..
आरोह आत्ताच आलाय, जेल प्रकरण त्याला माहीत आहे इतर housemates ना नाही म्हणून insecure होतोय बिचुकले असं वाटलं..
btw, शिवानी नेहाला म्हणाली की मी पत्रातून अजिंक्य बद्दल सांगितलं, आधी घरी काहीच माहीत नव्हतं n all..
काहीही टेपा लावते..
बिचुकले खरंच डोक्यात गेले आज,
बिचुकले खरंच डोक्यात गेले आज, एवढे छान कुटुंब आहे, तरी शायनिंग मारण्यासाठी मुलाच्या मागे लागला होता.
मुलीला 2 सेकंद घेतलं फक्त , बायकोची साधी विचारपूसही केली नाही, उलट साडीवरून खेकसला तिच्यावर... त्यांंची आई आधी ठीकठाक वाटली, पण नातू रडायला लागल्यावर म्हणाल्या की, रडतोस कशाला, मुलगे रडत नसतात.. डोक्यात गेल्या आजीबाई पण!!
मुळात एवढे गुन्हे नावावर असलेल्या आणि शोमध्ये असतानाच तुरुंगात गेलेल्या माणसाला पुन्हा वाजत गाजत शोमध्ये एन्ट्री देण्याचं कारण काय?? BB ला वेड लागलंय बहुतेक, trp साठी काहीही करावं लागतंय...!
बायकोलाही ओरडले ही साडी का
बायकोलाही ओरडले ही साडी का नेसलीस म्हणून, >>> नेसलीस नाही, घातलीस. बेकार माणूस, उगाच एवढ्या केसेस आहेत का पण पायघड्या घातल्या ना bb नी. तोफांची सलामी पण दिली येताना. मला त्याच्या बायका मुलांची काळजी वाटतेय खरंच.
बिचुकलेच्या फॅमिलीचे ५ मेंमर्स आत सोडले आणि केळकरच्या बायकोला आतही जऊ नाही दिले, शिवानीच्याही बाबांनी तिला सांगितलना कि दोघांपैकी एकालाच यायला सांगितलं, मग बिचुकल्यावर बिबॉ मेहेरबान का ? >>> अगदी अगदी. वीणाच्या बहिणीला पण आत येऊ दिलं नाही म्हणाली ना तिची आई. केळकरची बायको बिचारी किती विनंती करत होती पण नाही. बाहेर गुन्हे जितके जास्त, तितकी तुम्हाला स्पेशल treatment.
आरोह ची बायको होती कि ठरलेली बायको म्हणजे गर्लफ्रेंड होती? >>> बायको अंकिता, मारवाडी आहे पण पुण्यात वाढली असावी म्हणून मराठी छान बोलते आणि किशोरीताई मनापासून आवडतात तिला असं दिसलं.
बिचुकलेची मुलगी खुप गोड आहे. >>> हो ना. किती खळखळून हसत होती.
काहीही टेपा लावते.. >>> होना, पूर्वी जायच्या आधी पण अजिंक्य अजिंक्य आणि तो साताऱ्याचा आहे, दुनियेला सांगून झालं तरी बाबांना माहिती नाही, youtube वर एकाने हाच मुद्दा काढला.
आजच्या एपिसोडमधे अॅबरप्टली
आजच्या एपिसोडमधे अॅबरप्टली एपिसोडमधे एडीट मारलं बिबॉने पराग प्रकरणासारखे लक्षात आलं का ? जस्ट बिचुकले फॅमिली जाण्याआधी ?
हा मूर्ख माणुस छोट्या पोराशी काहीतरी वाइट वागला /धोपटलं बहुदा, आपल्याला डायरेक्ट केळकर बिचुकलेला कंट्रोल करत त्याच्याकडे रागाने बघतानाना दाखवला , नेहा सुध्दा रागाने बघत त्या पोराला बहुदा लांब घेऊन गेली आणि मग मग बिबॉने सिच्युएशन कंट्रोल करायला सगळ्यांना स्टॅचु केलं .
कमाल आहे बिचुकलेच्या वर्तनाची
त्याची आई एवढी प्रवर्चन देत
त्याची आई एवढी प्रवर्चन देत होती, मुलाच्या कानफटात द्यायला हवी होती असा छळतोय तर. फालतू मोठेपणा कशाला, इथे पब्लिकला बाहेर माहितेय काय दिले लावून आलाय तो.
रुपाली वाचेल म्हणतात, आरोहला सगळ्यात कमी votes आहेत
.
रुपाली आणि आरोह डेंजर झोन
रुपाली आणि आरोह डेंजर झोन मध्ये आहेत.
हो पण votes रूपालीला जास्त
हो पण votes रूपालीला जास्त आहेत. आता channel काय करते ते बघूया. रुपाली जायला हवी.
वीणाला सर्वात जास्त आहेत. पण त्यांना दाखवायचं नसेल वीणाला जास्त आहेत तर तसं करतील. कारण मागे पण वीणा हीना आणि नेहाच्या पुढे होती पण त्यांनी तिला danger zone मध्ये टाकलं होतं. त्यावेळी पण एक नं votes होते असं सगळीकडे सांगितलं होतं.
आत्तातरी शिवच्या घरच्यांनी वीणावर नाराजी दाखवली असली तरी शिव fans नी votes दिली आहेत तिला असं दिसतं आणि तिचे स्वत:चे पण fans आहेत.
आत्तातरी शिवच्या घरच्यांनी
आत्तातरी शिवच्या घरच्यांनी वीणावर नाराजी दाखवली असली तरी शिव fans नी votes दिली आहेत तिला असं दिसतं आणि तिचे स्वत:चे पण fans आहेत...........त्यापेक्षा महत्वाच म्हणजे अख्ख कलर्स मराठी आहे ना तिच्यासोबत,मग काय पाहिजे तिला?
ते आहेच पण ती bb ना attitude
ते आहेच पण ती bb ना attitude दाखवत होतीना आणि नाराज होती, त्यामुळे फरक पडेल असं वाटलेलं मला.
एनीवे अनसीन अनदेखा मध्ये मस्त शिव वीणा एकत्र आहेत, गप्पा मारतायेत. शिवला वीणाची आई कुल वाटली आहे. त्यामुळे आपल्याला लिमिटेड दाखवत असावेत किंवा शिव impressed by वीणाची मम्मा.
रुपालीच्या भावाने पण खुणेने सांगितलं की शिव वीणा जोडी मस्त, त्यामुळे शिव काही फार मनावर घेईल त्याच्या घरच्यांचं असं वाटत नाही.
शेवटी चँनेलच पण सेटिंग असेल
शेवटी चँनेलच पण सेटिंग असेल ना बिबॉसशी,तीन तुमचे तर दोन आमचे.
मला माधव वाटत होता कारण तोही सरस्वतीमुळे फेमस होता ,पण कलर्सने वीणाच्या पारड्याट झुकत माप टाकल.
म्हणजे अस सेटिंग असेल चार तुमचे मग एक आमची,पण विनर तुमचा.
परागपण channelचा नेहापेक्षा
परागपण channelचा नेहापेक्षा जास्त होता. त्यामुळे channelने बरेच प्रयत्न केले असणार आणायचे. त्याचा फूड शो पूर्वी फेमस होता, संध्याकाळी असायचा प्लस झुंज मराठमोळी हा शो.
माधव सरस्वती मध्ये थोडा काळ होता मग तो दुसऱ्या channelच्या गोठ मध्ये काही काळ होता. वीणा पूर्णपणे लीड होती ना कलर्स सिरीयल मध्ये. त्यामुळे ती आहेच महत्वाची पण नीट वागायला हवं, तिला आता confidence नाही राहिला बहुतेक. आईला सांगत होतीना शंभर दिवस मी राहीन इथे, असं समजून चालू नकोस वगैरे काहीतरी.
वीणाच्या बहिणीला पाठवायला हवं होतं bb नी आतमध्ये. वीणा हीना गप्पा मारत होत्या तेव्हा वीणा सांगत होती कि तिची बहिण शिवसारखी आहे, कधी कोणाला नावं नाही ठेवत. बहिणीने आईला जरा तरी गप्प केलं असते असं मला वाटतं.
शिवने आई आणि बहिणीला
शिवने आई आणि बहिणीला त्यांच्या सांगण्यावर हो म्हटलं का?
शेवटी तो सगळ्यांचं ऐकून स्वतःचंच करतो ना?
त्यामुळे मला त्याच्या आणि वीणाच्या वागण्यात बदल अपेक्षित नव्हता.
वीणाच्या आईच्या बोलण्यावर शिवानीची खरी reaction काय असेल याबद्दल उत्सुकता होती. बिचुकले तिला भडकवत होता. पण "माझ्या वडिलांच्या ऐवजी आई आली असती, तर तीही अशीच react झाली असती, "असं काहीसं ती म्हणाली.
मग बिचुकलेच्या डबल राड्यात वीणाच्या आईचं सगळं मागे पडलं.
परागचा स्वतःचा असा फूड शो
परागचा स्वतःचा असा फूड शो नव्हता. कलर्सच्या रकुकरी शोमधला तो शेफ होता. त्याच्या आधी आणि नंतर तिथे विष्णू मनोहर होते. पराग झीच्या खवय्येत गेला.
मग झीचे लोक (दामले) इकडे आले, मेजवानीचा खवय्ये झाला आणि बंदच पडला.
झी मराठी घेतलेलं नाही, त्यामुळे तिकडे सध्या काय चाललंय कल्पना नाही.
परागचा स्वतःचा असा फूड शो
परागचा स्वतःचा असा फूड शो नव्हता >>> हो बरोबर, आठवलं. इ tv होतं तेव्हा संध्याकाळी असायचा एक शो, तो जाऊन स्पर्धा घ्यायचा दोन जणांत रेसिपीजची. तो anchor होता.
आता वेबसिरीज येतेय, कुक विथ पराग.
झी मराठी घेतलेलं नाही, त्यामुळे तिकडे सध्या काय चाललंय कल्पना नाही. >>> मी पण नाही घेतलं.
पराघ मैजवानी रंगतदार रेसिपी,
पराघ मैजवानी रंगतदार रेसिपी, दुपारी दीड वाजता.
संध्याकाळच्या शो मध्ये अमेय वाघ होता.
अच्छा. अमेय वाघ आठवतोय पण
अच्छा. अमेय वाघ आठवतोय पण त्याच्या आधी का नंतर पराग होता बहुतेक. कान्फुस्ड.
Pages