बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

गेल्या वेळी रेशम - राजेश ला तसेच केले होते त्यांनी असे त्य्तांच्या इतर बोलण्यावरून वाटायचे. >> हो तसेच . हिंदी मध्ये पण त्या जसलीन आणि अनुप जलोटा वर पण असच प्रेशर आणल होत . तुमच अफेयर आहे म्हणून सांगा ऑडियन्स ला . त्यांच्या करता बिग बॉस ने च डेट काय अरेंज केली त्या जसलीन ला इतर लेडीज ने काय सजवल आणि काय काय नाटक केली . जस इथे मराठी मध्ये वीणा आणि शीवच्या लग्नाकरता वधू -वर सूचक मंडळाचा खेळ खेळला . सगळं बिग बॉस चच प्रोसाहन देतात आणि मग माप काढतात . बिचारे स्पर्धक. जसलीन आणि अनुप जलोटाने बाहेर आल्यावर सांगितलं आमच्यावर बिग बॉस नेच प्रेशर घातलं म्हणून .

धन्स अन्जली आणि अमुपरी. Happy

केळकर पुन्हा आगलाव्याच्या भुमिकेत परतला.

आज हिनाची खरोखर दया आली. >>>>>>>> अगदी अगदी. तिने पहिल्या निर्णयावर ठाम राहायला हव होत. नाहीतर सुजा म्हणतेय तस करायला हव होत तिने. पण बिबी अनफेअर आहे ह्यावेळी. ह्याआधी सन्चालकान्नी चुका केल्या. शिवानी तर काय स्वत: चे नवीन नियम तयार करत होती. त्यान्ची इम्युनिटी का काढली नाही?

शिवानी कृतघ्न आहे. नेहाने तिला कठीण काळात मदत केली होती घरात. ' तुला जर त्रास होत असेल तर मला थोबाडीत मारुन घराबाहेर पडू शकतेस. अस म्हणाली. मागच्या विकच्या नॉमिनेशन टास्कमध्ये तिला वाचवल. हे सगळ विसरली एका झटक्यात शिवानी, तिला घालून पाडून बोलते. Sad

शिव आरोहच्या भाण्डणात आधी चूक आरोहची होती. आरोहने त्याच्याशी डिल केली होती की तो हिरवा खाम्ब सिलेक्ट करेल आणि शिव लाल सिलेक्ट करेल. नेहाशी मात्र आरोहने वेगळी डिल केली. शब्द फिरविला त्याने. लाल खाम्बाकडे गेला.<<
करेक्ट! हि अंदरकि बात लपवायलाच तो एव्हढा आकांड्तांडव करत होता असं वाटत होतं... >>> शिवने त्याला भडकपणे रिएक्ट केल नाही ते छान केल.

हो आहे आरोह चांगला, पण मला त्याच्यापेक्षा शिव आवडतो. >>>>>> मी टू

कसलाही स्टँड घेऊ शकत नाही की कुणाला कन्फ्रन्ट करता येत नाही तिला. >>>>>> थोडस असहमत. काल किशोरीताईन्नी कॅप्टनशिपसाठी स्टॅण्ड घेतला. तस त्यान्ना योग्य वाटल तेव्हा स्टॅण्ड घेतला, पण इतर स्पर्धक ऐकत नाही त्यान्च. तसच त्या नेहमी चुकीच्या लोकान्ची साथ देतात उदा, पराग, बिचुकले आणि आता शिवानी. हे चुकत त्यान्च.

बिचकुले असहणेबल झालाय आता. मला बिबॉमध्ये माझी प्रतिमा मलीन नाही करायची म्हणे , मग काय जेलमध्ये जाऊन त्याची प्रतिमा उज्जवल झाली?

नेहा फक्त एवढच म्हणाली त्याला की जेवताना मी तुमच्याशी कामापुरत बोलते. तर हा येडा ' जेवण म्हणजे काम नाही' बडबडत सुटला.

कालचा शिवानी-नेहाचा भांडणाचा एपिसोड एपिक; अगदि बिबॉच्या किर्तीला साजेल असा. नेहा बाबतचे शिवानीने आणलेले मुद्दे - कॅमेरा अँगल, ओवररिअ‍ॅक्शन, माधवचा गेम करणं इ. मागे वळुन पहाता आणि नेहाच्या हादरलेल्या बॉडि लँग्वेज वरुन त्यात तथ्य आहे हे जाणवत होतं...

काल टास्क दरम्यान परत एकदा नेहात मंजोलिका डोकावत होती... Happy

शेवटच्या आठवड्यांमध्ये बहुतेक चँनेल बिबॉसच्या हातातला रिमोट आपल्या हातात घेईल ,कारण तसही शेवटच्या आठवड्यात कलर्सवरच्या मालिकेतले कलाकार येतातच.
आणि बिबॉसचा हा सिझन फारसा न चालल्याने चँनेलनेही मार खाल्ला असावा.
त्यामुळे आता चँनेल बोले,बिबॉस ऐके अस चित्र दिसल तर आश्चर्य नको वाटायला.

नेहा बाबतचे शिवानीने आणलेले मुद्दे - कॅमेरा अँगल, ओवररिअ‍ॅक्शन, माधवचा गेम करणं इ. मागे वळुन पहाता आणि नेहाच्या हादरलेल्या बॉडि लँग्वेज वरुन त्यात तथ्य आहे हे जाणवत होतं...

नेहा मला आवडतच नाही नो मॅटर व्हॉट. ती स्वभावानेच दुष्ट वाटते.

एकलव्य स्टुडीओजचा इनसाइडर खरच सोर्स खात्रीशीर आणि सर्वात पहिला यायचा ऑनलाइन, अर्थात वोटींग पोल्स नाही द्यायचे ते पण इतर खबरी.
चांगली होती ती एकलव्यची रश्मी, कोणाला शिव्या न घालता, फिजिकल अपिअरन्स वर वगैरे कॉमेंट्स न करता रिव्ह्यु द्यायची.
या सिझनला सुरवातीला दिले तिने रिव्ह्युज, पण ती प्रेग्ननंट होती, नुकतच बाळ झालय तिला त्यामुळे देत नाही आता .

तो मराठी पिक्चर येतो ये रे ये रे पैसा त्यात स्मिता पण आहे, ती नाही का येणार प्रमोशनला.

एकलव्यची रश्मी मला खूप आवडते.

रेशम राजेश, पु स लोकांना अपील झाली नाहीत कारण दोघेही married आणि मुलं आहेत असे होते, त्यामुळे ते extra marrital afair वाटलं.

शिव वीणा तसं नाहीये त्यामुळे बऱ्याच लोकांना आवडतंय, bb काय येडे आहेत का trp मिळतो तो कमी करून घ्यायला, नाहीतर दाखवलंच नसतं.

बाजूने बोलतात, विरोध करतात म मां असं करून शिव वीणा जोडीला व्यवस्थित चर्चेत ठेवतात आणि trp मिळवतात आणि त्यांनाही देतात.

आता एवढं दोन वर्षे बघून bb चाली व्यवस्थित लक्षात यायला लागल्या आहेत, शिवानीने पण trp साठी केलं सर्व काल.

नेहा बाबतचे शिवानीने आणलेले मुद्दे - कॅमेरा अँगल, ओवररिअ‍ॅक्शन, >>. या मुद्द्यांनी नेहाच काय इतर कोणीही हादरणार नाही. कारण सगळेच यात मुरलेले आहेत आणि त्यातूनच ते इथवर पोचलेले आहेत. मात्र माधवरच्या आरोपामुळे ती नक्कीच हादरलेली, जास्त करुन दुखावलेली दिसत होती.
माधव जायच्या आधीच्या आठवड्यात ममांनी नेहाला माधवला धोपटण्याचा एक चांगला चान्स दिला होता. पण माधव असा नाहीचे असं सांगून नेहानी तो वाया घालवला होता. तेव्हा मलाही नेहानी हा फुलटॉस सोडून का दिला असं वाटलं होतं. खुद्द ममांनी पण अशा अर्थी काही बोलून दाखवलं होतं. आणि याचाच पे बॅक म्हणून माधवनी नेहाला सेफ केलं, शिवानीला नाही. ते शल्य शिवानी कडे खदखदत होतं, ती भडास तिनी एकदाची नेहावर काढलीच!
असो. सांगायचा मुद्दा की शिवानीच्या त्या बडबडीमुळे आणि नेहाच्या ( जरा उशीरानी का होईना ) गप्प बसण्यामुळे नेहाची बाजू अजूनच स्ट्राँग झाली आहे हे माझे मत.
तो कळलाव्या नारद केळ्या या वेळी नॉमीनेट व्हावा आणि घराबाहेर जावा अशी फार इच्छा आहे. बघू.
नेहा गो गर्ल!

केळ्या झालाय म्हणे फायनली नॉमिनेट आणि फारसे फॅन्स नसल्याने बहुदा तोच जाईल बाहेर.
त्याच्याबरोबर शिव, आरोह आणि किशोरीही झालेत नॉमिनेट .
शिव तर जायचा संबंधच नाही पण आरोह सुध्दा नाही जाणार , त्यालाही फॅन्स आहेत , किशोरीलाही आहेत केळ्यापेक्षा जास्तं फॅन्स.
आता केळ्याची टर्न आली असं वाट्तय , अपेक्षेपेक्षा लवकर.

सध्याच्या सोमि पोस्ट्स वरून केळ्या नॉमिनेट झाला आहे फायनली असे दिसते. पण टू लेट? काही वीक्स आधी नॉमिनेट झाला असता तर कदाचित चान्स होता पण आता तो टॉप २ असल्याची इतकी हवा केली आहे की आता बिबॉ जाऊ देणार नाहीत असे वाटते. त्याची अजिबातच फॅन नाही मी पण त्याच्या आधी शिवानी आणि बिचुकले जायला हवेत मला!

केळकर नॉमिनेट झाला असेलही,पण बुधवारपर्यंत नॉमिनेशन चालू आहे ,म्हणजे वोटिंग लाईन्स चालू असतील ना?
इकडेही बिबॉस गुगली टाकणार?

बिचुकले गेस्ट होता त्याचे काय झाले आणि ? Uhoh इरिटेटिंग माणूस, जो घरातल्या कामाला इगो पायी नाही म्हणतो, टास्क धड खेळत नाही, आता एंटरटेनमेन्ट व्हॅल्यू पण नाही राहिली काही. शिवानीही पुन्हा मेन्टली अनस्टेबल वाटतेय. बिबॉ काय विचार करून या दोघांना फेवर करताहेत ते तेच जाणे!

बिबॉ काय विचार करून या दोघांना फेवर करताहेत ते तेच जाणे! >>+1
बिचुकले डोकेखाऊ माणुस आहे. काय प्रॉब्लम आहे काय माहित टॉयलेट साफ करायला. सगळ्यांनी ती ड्यूटी केलीआहे.

शिवानीला फायनलचा assurance देऊन आणलंय बहुतेक. म्हणून तिची नाटकं सुरू. एकाला target करायचं आणि तेच खेचत न्यायचं, वीणा झाली आता नेहा आहे शिवानीचं target. विकेंड यायच्या आधी माफी मागेल मग गोड गोड.

शिवानी दुसऱ्याला अडगळीच्या खोलीत सहज टाकते, पण तिची वेळ आली कुठल्याही प्रकारे तर कित्ती नखरे, कित्ती attitude.

यावेळी बहुतेक कि ताईची विकेट पडणार, कारण फायनली हिना ताईंना कॅप्टन करायला चालली होती, अनेक उलटसुलट निर्णय फिरवून ते bb नी होऊ दिलं नाही.

शेवटी हिरा कोणाला मिळाला, हिनाने मिळवला ते बघितलं, पुढे काही कळलंच नाही.

टास्क manual कसं वाचायचं त्याचा वस्तुपाठ पुष्करने घालून दिला.
बाकी आज सगळा निरुपयोगी टाइमपास.
संजयच्या हातून चोरांपैकी कोणीतरी हिरा पळवला. शेवटी फेकाफेकीत केळकरने पकडून ठेवला. मग पोचला तिजोरीत.

नेहाने नेहमीप्रमाणे 'मला लागलं' ची टेप वाजवली.

नेहाचं मुसमुसणं किंवा तत्सम आवाज ऐकून शिवानीने विचारलं, कोण गेलंय?

या सिझनला खरं तर कोणीच नाहीये टिआरपी क्वीन्/किंग !
सिझनची सुरवत दणक्यत झाली होती बिचुकले, पराग , शिवानी हे पब्लिक सेन्सेशन क्रिएट करत होते, टीआरपी देत होते मग २ आठवड्यत सगळी इक्वेशन्सच बदलली, अख्खा सिझनच ढेपाळला तो अजुन ढेपाळलेलाच आहे, नथिंग कॅन सेव्ह धिस सिझन !
त्यातल्या त्यात प्रेक्षकांचा निर्विवाद सपोर्ट शिवला आहे असे दिसते, तो एक सोडून बाकी कोणीही सध्यातरी डेंजर झोन मधे आल्याचे /एलिमिनेट झाले तर मुळीच आश्चर्य वाटणार नाही.

टास्क manual कसं वाचायचं त्याचा वस्तुपाठ पुष्करने घालून दिला.
<
आस्ताद म्हणायचय का तुम्हाला ?

पुष्कर श्रोत्री. आज त्याने वाचलं manual. सावकाश, एकदा वाचून सगळ्यांना कळेल असं वाचलं.

मी पहिला सीझन पाहिला नाही.

हो छान वाचलं पुष्करने.

बाकी बंडल सर्वच, गोंधळ काही कळेना.

ह्यावेळी डीजे म्हणते तसं कोणीच नाही trp क्वीन किंग पण त्यातल्यात्यात मिळतो असं वाटतं ते दाखवतात. त्यात शिव वीणा bonding आहे नक्कीच, अजूनही तेच दाखवतात म्हणजे मिळतोय एक पैशाचा का होईना trp.

सांगायचा मुद्दा की शिवानीच्या त्या बडबडीमुळे आणि नेहाच्या ( जरा उशीरानी का होईना ) गप्प बसण्यामुळे नेहाची बाजू अजूनच स्ट्राँग झाली आहे हे माझे मत.
तो कळलाव्या नारद केळ्या या वेळी नॉमीनेट व्हावा आणि घराबाहेर जावा अशी फार इच्छा आहे. बघू.
नेहा गो गर्ल!>>>+१

Pages