बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Submitted by दीपांजली on 2 August, 2019 - 10:28>>> पूर्ण पोष्टीला +१
शीव चे आई-बहीण जेवढे आवडले, तेवढेच वीणाची आई निगेटीव्ह वाटली. नो वंडर वीणाचा असा अ‍ॅटीट्युड आहे.

विणाला देतील बोलू आईशी.. bb मजा घेतात
मागच्या वेळी सईला पण असंच केलं होतं..
bb कडे त्याच त्याच आयडिया आहेत.

मला शिव जिंकावा असंच वाटतं कारण आज जो trp कमी झालाय तो जास्त पराग गेल्याने, त्याचा अपराध होताच पण ते घडवून आणायला कारणीभूत जे जे आहेत त्यांच्यामुळे trp कमी झाला, त्यापैकी कोणालाच विनर करू नये.

शिव परागच्या वेळी पण नीट वागला, त्याचे फॅन्स बघून trp मिळवून देतात, प्लस शिव वीणा मुळे trp मिळालाय. तो चांगला पण आहे तसा. Task पण छान करतो.

मला शिव जिंकावा असंच वाटतं कारण आज जो trp कमी झालाय तो जास्त पराग गेल्याने, त्याचा अपराध होताच पण ते घडवून आणायला कारणीभूत जे जे आहेत त्यांच्यामुळे trp कमी झाला, त्यापैकी कोणालाच विनर करू नये.>>>इतका विचार करतील तर ते bigg Boss कसले... Lol

वीणाच्या आईच्या समर्थनार्थ आणि तिच्या आईच्या विरोधातल्या वरच्या सगळ्या पोस्ट्सना अनुमोदन... मला खरंतर पर्सनली शिवानी अज्जिबात आवडत नाही आणि स्वतः बिग बॉस तिला सतत सॉफ्ट कॉर्नर दाखवतात त्यामुळे अजूनच संताप होतो... पण घरातील कोणीच तिच्याविरुद्ध जास्त आवाज उठवू शकत नाहीत, कारण खुद्द बिग बॉसच partial आहे... अशा वेळेस वीणाच्या आईने येऊन तिला जे काही झापले ते खूप आवडले, पण नंतर विचार केल्यावर वाटले की त्यांचा ओव्हर ऑलच एटीट्यूड खूप arrogant होता, आणि एटीट्यूड एका लिमिट पर्यंतच चांगला वाटतो म्हणूनच मध्यंतरी वीणा सुद्धा डोक्यात जात होती... आणि तिच्या आईचा attitude तर double होता.. So it crosses the limit.. बाकी शिवची आई एकदम प्रेमळ.. आणि अगदी त्याच्यासारखीच humorous आहे.. बहीण पण rocking एकदम... केळकरचे मुलं फारच गोड.. म्हणूनच तो इतका miss करत असेल family ला.. Sweet family.. पण तृप्तीला सगळ्यांना भेटू दिलं नाही ते आवडलं नाही... आज तर बिचुकलेंची अख्खी family आणत आहेत.. मग काल तिला का नाही बोलू दिलं.. छान बोलली असती तृप्ती.. Mature वाटली..

अन्जु,
तुझ्या सगळ्या रिसेन्ट पोस्ट्स ऑलमोस्ट सेम दिसतायेत मला, शिव जिंकलाच पाहिजे ,टीआरपी देतोय वाचून इ. , कनफ्युजन होतय कि नक्की नवी पोस्ट वाचतीये कि आधीच्या पानावरच्या कि काही दिवसां आधीच्या पोस्ट्स बघतेय , देजावु येतोय पुन्हा एकदा Biggrin Light 1

मला पण वीणा नकोय विनर म्हणून.किशोरी केळकर शीव पैकी कोणिही झाले तर चालेल.वीणा ला खुप attitude आहे . मला बिलकूल आवडत नाही ती.

शीव च्या आई साठी शीव विनर झालेला आवडेल. खुप छान वाटली मला त्याची आई आणी बहिण पण. त्यांचा साठी मी शीव ला वोट करेन.

हसू नका मला पण स्मिताबद्दल constantly मागचयावेळी मी सपोर्ट देत होते, इथे बऱ्याच जणांनी तिला उशिरा ओळखलं, ती सईला हरवून तिसरी आली, मी सर्वात पहिली शिवला सपोर्ट करणारी, त्याच्यातील गुण ओळखणारी आहे Wink तेही रोडीज वगैरे न बघता.

मला शीव चांगला वाटतो पण विणा नाही आवडत त्यामुळे त्यांची जोडी आवडत नाही मला. अन्जू तुच ग तुच सगळ्यांचे चांगले गुण पहिल्यांदा ओळखणारी Happy

मोक्षू good post.>>>thanks Anju... मला पण शिव आवडतो पण सध्यातरी मला जिंकण्यासाठी deserving केळकर आणि किशोरी वाटत आहेत.. वीणाच्या सतत मागे मागे फिरून शिवची स्वतः ची special identity झाकोळली जातेय.. आई आणि बहिणीच्या सल्ल्यानुसार वागला तर काही होऊ शकतं.. Otherwise....

वीणाच्या सतत मागे मागे फिरून शिवची स्वतः ची special identity झाकोळली जातेय.. हो मोक्षू टॉप 2मध्ये स्वत: चे नाव न घेणे . वीणा साठी घरातून बाहेर निघण्याची तयारी दाखवणे असे काही मूर्ख पणा केलाय त्याने.

स्मिताला सपोर्ट करणारा मी दुसरा होतो बहुतेक. दुसऱ्या आठवड्यापासून ते शेवटपर्यंत तिला सपोर्ट केलेला मी.
यावेळी बघणंच सोडलंय, शिवपेक्षा मला वीणा अधिक आवडलेली यंदा मला. अर्थात ती सुरूवातीची म्हणा! बरंच पाणी वाहून गेलं असेल तदनंतर.

शिवच्या सपोर्टमधे हा फोटो व्हायरल जातोय ट्विटरवर, वीणाच्या राँग साइडने कॅमेरा फोकस होतोय समजल्यावर त्याने पिलो ठेवली तिथे पटकन.
https://youtu.be/JaR0SHtpcM8
मागच्या सिझनला श्रीसन्तने पण असेच काही केले होते , त्या सापाच्या टास्कमधे जस्लीन मेघा वर चढून बसल्या असताना कॅमेरा अँगल पाहून पिलो ठेवली होती त्यानी.

स्मिता humanbeing म्हणून चांगली होती. पण तिने गेम इतका नीट खेळला नाही . तिला आपले मुद्दे मांडता येत नव्हते नीट.तिचीही आई खुप गोड होती. तसेपण लास्ट टाईम चा गेम आणी या वेळचा यामध्ये खुप फरक आहे. यावेळी सगळे च जास्तच active आहेत.

स्मिताइतके फेक त्या घरात कुणीच नव्हते. ती फक्त आस्ताद, रेशम , सुशांतच्या मागे लपुन लपुन पुढे आली. आणि सेव्ड बाय डिझायनर कॉश्च्युम्स अँड फॅब बॉडी.

शीव च्या आई साठी शीव विनर झालेला आवडेल.>> +१
अजब काळजी करू नका, ह्या दोघी पहिल्या तिघांत तरी अजिबात दिसत नाहीत कुठेही.>> तसंच होवो. Happy
सध्यातरी मला जिंकण्यासाठी deserving केळकर आणि किशोरी वाटत आहेत.. वीणाच्या सतत मागे मागे फिरून शिवची स्वतः ची special identity झाकोळली जातेय.. आई आणि बहिणीच्या सल्ल्यानुसार वागला तर काही होऊ शकतं.. Otherwise....>>+१

पुंबा पोस्ट लिहितानाच तुमचं नाव पहिलं आलं डोक्यात, पण तुम्ही हल्ली फिरकत नाही म्हणून पोस्ट वाचाल की नाही असं वाटलं, पण मी मनात असलेलं लिहायला हवं होतं, ती नॉमीनेट झाली की मला धीर देणारे तुम्ही पहिले होतात, thank u very much त्यासाठी.

Amupari स्मिता task उत्तम खेळायची. Dignity ठेवणारी आणि ग्रेसफुल पर्सन.

तिची कामे सोडून आलेली ती, आजही ती सर्वात बिझी आहे.

शिवानी मस्त positive होत चाललीय.

सर्वांचे घरचे मस्त, बिचुकलेची आई सॉलिड, तिने सिक्सर मारली. मुलं मस्त आहेत, मुलगा लाजरा आहे, हा उगाच त्याला जबरदस्ती करत होता, बायकोला पण साडीवरून बोलला. फॅमिली छान आहे. केळकरपण वैतागलेला, बिचुकले मुलावर जबरदस्ती करतो म्हणून.

वीणाच्या लक्षात आलंय की आपण बहुतेक 100 दिवस इथे नसणार, उद्याही काढतील तिला. ती आईला सांगत होती रुपाली, शिवानी खूप चांगल्या आहेत.

हिना अति करतेय कटकट. किशोरीताईला पण बोलली.

आरोहची बायको मस्त. रुपालीचा भाऊ संकेत मस्त. छान perfect सांगितलं तिला, आरसा दाखवला.

वीणाच्या आईचा अनुभव बघता, रुपालीच्या आई ला बोलावलं नाही, तिने बिचुकलेची वाट लावली असती. संकेतला पण सांगितलं असेल, तो विषय नको काढू. दक्षिता जाम बावरलेली, तिला घरात रहायचं नव्हतं.

हो अन्जू स्मिता ही चांगली humanbeing ड्रेस मेकअप छान करणारी. टास्क ही चांगली करणारी होती. पण तिच्या खेळात काहीतरी कमी आहे असे वाटायचे त्यावेळी. मेघा चे सई आणी पुष्कर बरोबर भांडण झाले त्याचा फायदा तिला टॉप 3मध्ये येण्यात झाला शिवाय ती ज्या मोठ्या ग्रुप चा हिस्सा होती त्यांचे ही सगळे वोटस मीळाले असतिल तिला.पण एक व्यक्ती म्हणुन छान होती ती. आज ही तिचे इंटरव्यू खुप छान असतात.

हो बाकीचे चुका करत राहिले यामुळे मोठ्या grp मधले सगळे बाद झाले, याचा फायदा तिला नक्कीच झाला पण ते तिच्या वागणुकीमुळे आणि तिचा पी आर ही मस्त होता.

मुलाला अगदी नर्व्हस करून टाकलं त्यांनी. आईलापण पळापळ करायला लावली.
शिवानीचं खूपच बॉंडिंग झालंय त्यांच्याशी.

नेहा शांत होती आज खूप. फक्त बिचुकलेला काहीतरी सुनावलं ते योग्य होतं. तिचे ऐकायला मी mute केलेला volume वाढवला.

बिचुकले आणि आरोह मध्ये नक्की काय झालं. मी tv mute केला थोडा वेळ. हल्ली आता अति वाद झाले की नको वाटतं, बरेचदा mute करते.

फॅमिली वीक अपेक्षेपेक्षा चांगला चाललाय...... प्रत्येक फॅमिली मेंबर स्वताचा एक वेगळा फ्लेवर घेउन येतोय..... so much variety >>> ही पोस्ट काल खूप आवडलेली, ते सांगायचं राहून गेलं. आत्ता शोधून काढली Lol

आरोह याने बिचुकलेला भांडी लावायला की घासायला सांगितली (त्यांची ड्युटी होती म्हणून) त्यावरून चिडले.

Pages