बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ती घरच्यांची आठवण येते म्हणत होती मध्ये म्हणून असेल.

शिवानीकडून negative वाईब्ज येतात मध्ये म्हणाली, तोही राग असेल bb आणि म मांना.

शिवानीला बक्षीस देतील घालून पाडून सुनावलं वीणाला म्हणून पण किशोरीताईने रुपालीबाबत सगळे मुद्दे छान मांडले खरंतर.

मला तर आता वीणाविरोधात म मां आणि bb गेलेले दिसतायेत कारण तिने त्यादिवशी फुलांवरून अविश्वास व्यक्त केला. कारण आधी वीणा म मां बोलत असताना किती बोलायची तेव्हा कधी सुनावलं नाही तिला, फक्त किशोरीताईला बोलली तेव्हाच झापलं. काल त्यामानाने जास्त बोलले. वीणाने सावध राहावं, तिला काढू शकतात रुपालीच्या आधी पण. बिचुकले येतोय आणि वीणा एकटीच त्याच्याविरोधात होती हेही कारण असू शकते. वीणा काही अगदी गुणी वगैरे नाहीये हे मलाही माहितेय पण शिवानीपुढे खूपच चांगली आहे.

शिवानीने किशोरीताईला बरं नसून शिक्षा दिली त्याबद्दल काहीच बोलले नाहीत, तिने sorry म्हटलं म्हणजे झालं का.

ती स्वतः झोपा काढत होती, रूल मोडत होती. काही वेळा माधवला अति बोलायचे त्यामानाने शिवानीसमोर अगदी खालच्या सुरात होते. काही मुद्दे तर दुर्लक्षित केले.

मांजरेकर बोलले शिवानीला. तू कॅप्टन झालीस म्हणजे बिग शिवानी झालीस का? तू टीमचा विचार करायला हवा. तू बायस्ड होतीस. अ‍ॅग्रेसिव्ह होतीस. . तू घरी जा, असं बोलू शकत नाहीस. तुला लागतं, तसंच इतरांनाही. पण तिचं ताणलं नाही. ती लाडकी आहे, हे तर उघडच आहे.

बयेला गिझर कसा वापरायचा हेही माहीत नाही. पाणी बारीक सोडलं तर चांगलं कडकडीत तापतं. बाकीच्यांनी पण दुजोरा दिला.
पाणी तापवण्यावरून हीना अगदी खालच्या टोनमध्येच बोलली होती.

अभिजीतच्या टास्कस करण्याची नक्कल मला समजली नाही. फक्त कुंपणाला प्रोटेक्ट करताना तो आडवा पडत होता. की ते चूक?

हो तुम्ही लिहिलं ते बोलले पण समजावण्याचा सूर जास्त होता पण ती शेवटपर्यंत तणतणतच होती. फक्त एकदाच हसली, केळकर बहिणीच्या नात्याने समजावत होता तेव्हा.

हिनाला शिवानीवरून सुनावण्यापेक्षा शिवशी चीप वागली त्यावरून बोलायला हवं होतं.

अभिजीतच्या टास्कस करण्याची नक्कल मला समजली नाही. फक्त कुंपणाला प्रोटेक्ट करताना तो आडवा पडत होता. की ते चूक? >>> ते जरा उगाच बोलले. मस्करी होती बहुतेक. एवढा काही तो सारखा पडत नाही आडवा Lol . टास्कमध्ये करायचा. रविवार एपिसोड बोअरच वाटतो, उगाच काहीच्या काही असते.

बिचुकले नव्हता तेव्हा नावं ठेवत होते म मां, होता तेव्हा एवढं काही बोलायचे नाही, आता परत पायघड्या. तेव्हा विणाचे कौतुक केलेलं, हिने एकटीनेच भाव दिला नव्हता त्याला असं. आता तिला नावं ठेवतील.

शिवानी किशोरी ताईंना अडगळीच्या खोलीतून बाहेर काढायला आली तेव्हा किशोरीताईंनी तिच्या कडे पाठविली फिरवली तरी हिला प्रॉब्लेम! आणि तिने त्यांच्या वेडावून दाखवलं, ते सगळं चालतं का? शिवानी कुठल्या तोंडाने नेहाला म्हणते तू किशोरी ताईंच्या अंगावर कसं ओरडतेस?
अपने गीरेबांन में झांको असं शिवानी ला सुनवायला पाहीजे.
किशोरीताईंनी पाठ फिरवली ते आवडलं मला

मागच्या सिझनला एखादी व्यक्ती घराबाहेर पडली की वाईट वाटायच ,पण या सिझनला आतापर्यंत बाहेर पडलेल्या लोकांबद्दल आनंद होत आहे की सुटले बाबा.,त्या घरातून.
आता तर काय बिचुकले येणार म्हणे, काय म्हणून अर्थात अळल नाही पण तरीही कोणीही येत,जात,कसही वागत,
तो वीक एंडचा डाव तर इतका बोअर असतो.
अगदीच निराशा केली या सिझनने.

काल मॅडी बाहेर पडला तेव्हा वाईट वाटलं, नेहा साठी सुद्धा. ती आहे स्ट्रॉंग पण तीला माधवचा आधार वाटायचा. (जरी त्याच्या बाजूने तो पूर्णपणे नेहाच्या फॉर नसेल तरी, म्हणून मी वाटायचा म्हंटलं)

माझ्यामते बिबॉसला खरतर किशोरीलाच काढायचे होते.पण केळरचा पाय बाहेर पडल्याचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आणि जनतेत जो प्रक्षोभ झाला त्याने बिबॉ हादरल ,हीनाला काढणार नाहीत कारण बिचुकले येणार आहेत,वीणा आणि नेहा तसही सेफ होत्या,मग राहिल कोण,माधव.
रुपाली मात्र सतत वाचत आहे.

नेहा आणि माधव भांडायचे आणि परत एकत्र यायचे.. आणि नेहा परागला जॉईन होणार होती तेव्हाही ती हेच म्हणाली होती की काहीही झालं तरी मी माधवला nominate करणार नाही.. मैत्री नेहमीच गोडगोड नसते आणि थोड्या थोड्या मतभेदांमुळे तुटत पण नसते... शिवानीचं expression मात्र पहाण्यासारखं होतं नेहा ला save केलं तेव्हा.. ती आशेवर होती की हा आपल्याला save करेल कारण नेहा पेक्षा माधव जवळचा असल्याचं तिने सांगितलं होतं पण बिचारीचा पचका झाला.. तेच हीनाचं.. सिनेमा स्टाइल रडून घेतलं आणि नेहाला save केल्याचं समजल्यावर कोरा चेहरा.. शिव एकदम करेक्ट बोलतो.. हीना सगळंच पर्सनली घेते... आणि शिवानी अतिशय माजलेली आहे.. साधं बोलते तेव्हाही तिच्या चेहर्‍याकडे बघवत नाही.. आणि वीणाचं काही खरं दिसत नाही.. वैशालीला 2 वीकएंड खूप बोलले.. मग ती गप्पच झाली आणि आउट झाली तसं आता वीणाला करतायत वाटतं... शिवानी ज्या फ्रेम मध्ये असते तो पाहावासा वाटत नाही... काय नाक फुगवून बोलते.. काय डोळे करते..!!
माधव आधी रुपाली जायला हवी होती.. पण त्याला confuse confuse म्हणुन सतत dominate केलं गेलं.. शिवानी नेक्स्ट वीकएंड गेली तर अति उत्तम.. बाय द वे.. जसं negative marking system असते तशी negative व्होटिंग सिस्टम असावी असं कोणाला वाटतयं का.. म्हणजे ज्याला बाहेर काढायचं त्याला वोट द्या... जस्ट a thought Wink Wink Wink

निगेटिव्ह व्होटिंगसाठी +१.

शिवानीने नेहाबद्दल जे विधान केलं, - ही हे सगळं गेम म्हणून करतेय का आणि त्यानंतर तिथून उठून गेली, त्यावरून तीच हे सगळं गेम म्हणून करतेय असं वाटलं. त्यानं तर ती याबद्दल रूपाली आणि अभिजीतशी बोलली.

अभिजीतने कान उघाडणी च्या निमित्ताने शिवानीसाठी मैत्रीचा हात पुढे केलाय, असं वाटतंय का? त्याचा नेहावर राग आहे, तिची टीममेट आपल्याकडे वळवून तिला कमजोर करायचा बेत.

नेहाबद्दल मला एकाच वे ळी ती छक्केपंजे नसलेली - जे आत तेच बाहेर, फार विचार न करता रिअ‍ॅक्ट करणारी वाटते तशीच ती सगळं गेमचा भाग म्हणून करतेय असंही वाटू लागलंय.
स्पेशली बाबा गेले तेव्हा वालं वाक्य. माधवच्या एव्व्हिक्शननंतरचं रडणं पण जास्त वाटलं.

काल मॅडी बाहेर पडला तेव्हा वाईट वाटलं >>> मलाही वाटलं. पण मला किशोरीताई पण जावी असं वाटेना. रुपाली झालीच नव्हती नॉमिनेट. ती जायला हवी होती.

कालच वीणा आणि ममांच नाटक होत बर का,कारण नवीन प्रोमो जो आहे त्यात मस्त शिवशी गप्पा मारत आहे,एवढच नाही तर ममा परफ्युम बॉटल कोणाला.देणार हे पण माहित असल्याच सांगत आहे
तसच बिचुकलेंची एन्ट्री झाल्यावर शिवानी गळ्यात जाऊन पडली,हीनाला आनंद झाला.

पहीले दोन हिंदी bb सिझन negative voting typeचं होते. जास्त votes मिळतील तो बाहेर. ज्याला काढायचं आहे त्याला votes द्या असं होतं.

शिवानी किंवा रुपाली जायला पाहिजे खरंतर पण त्या nominate होतील की नाही हीच शंका आहे खरंतर. झाल्या तरी voting lines बंद ठेवतील.

कालच वीणा आणि ममांच नाटक होत बर का >>> म्हणजे वीणा नाटक करत होती का. म मां तर चांगले झापत आहेत तिला असं वाटलं. वीणाला देणार नाहीत गिफ्ट कारण नेहाची कॉपी केलीस तू असं म्हणाले ना तिला.

आला का बिचुकले Sad .

हा सीझन मी का बघतेय, मलाच पडलेला प्रश्न.

माझा आवडता खेळाडु.. मॅडी गेला काल घराबाहेर.. खुप वाईट वाटलं..जसे बाप्पा गेले होते घराबाहेर तेव्हा वाटलं होतं तसच.. मॅडी खुप चांगल्या मनाचा.. त्याची confuse छबीच लोकांनी पाहिली किंवा ममांनी त्यावर शिक्का मोर्तब करीत राहिले..
पहिल्यांदा मला शिवानी खुप आवडायची पण आता ती सगळं बाहेर बघुन आलीय त्यामुळे तिच्या खेळात किंवा वागण्यात काहि कौतुक वाटत नाहिय..खुप निगेटिव्ह वागतेय.
नेहा अजुनहि आवडती आहे.. तिच्याबरोबर आरोह हि छान वाटतोय..

मला पण आवडायला लागलेला माधव पण मध्ये तो हिनाला जरा जास्तच सुनवायला लागलेला. म मां अति बोलले त्याला ते नव्हतं आवडलं, थोडं बोलायला हवंच होतं तेव्हा पण अतीच बोलले. नेहा शिवानी ह्या निगेटिव्ह मैत्रिणी असताना तो positive असायचा.

कालच वीणा आणि ममांच नाटक होत बर का >>> म्हणजे वीणा नाटक करत होती का. म मां तर चांगले झापत आहेत .......म्हणजे डोक खर दुखतही असेल,पण बिबॉसने त्यातून पण टीआरपी मिळवण्याचा प्रयत्न केला असावा.कारण कानउघाडणीच्या वेळी वीणा शिवानीवर बरसेल अस मांना वाटल पण तस झालच नाही,म्हणून मग हे.

अच्छा UP. तिने फार बोलणं सोडून दिलं असं वाटतंय. ती मागेच म्हणाली होतीना, मी गप्प राहणार आता. ती बोलली तरी prblm, गप्प राहिली तरी prblm.

तिने आणि शिव ने मिळून कंटाळा येईपर्यंत trp दिलाय. त्यामुळे ह्यात नाही दिला तरी ok Lol

त्या नेहाला कोणीतरी सांगा रे तो विग नको घालूस. नेहा शिवानी वीणा यांच्या चेहेऱ्यावर विकेंडच्या डावात बारा वाजलेले होते. किशोरीताई, हीना बऱ्या दिसत होत्या.

अनसीन अनदेखा मध्ये वीणा किती हसून खेळून बोलत असते, केळकर शिव माधव आरोह हीना यांच्याशी. ते सीन्स दाखवत नाहीत. त्यांच्या गप्पा मस्त रंगतात. हे असलं bb ना दाखवायचं नसतं.

बघितला प्रोमो बिचुकलेला बघितल्यावर हीना शिवानी जबरदस्त खुश झाल्यात. शिवानीला खरंतर माहितेय बाहेर काय दिवे लावलेत त्याने तरीही खुश एकदम. बाकी shocked.

हीना आता मसाज नको, तुझा गेम खेळ.

माधव गेला तेव्हा चांगले वाटले पण त्याने नेहाला सेफ केले तेव्हा मात्र तो गेल्याचे वाईट वाटले. नेहाला सेफ करायला नको होते. तिचा चेहरा बघवत नाही आता..!! माधव गेल्यावर जे काय रडत होती त्यामुळे असे वाटले की माधव कायमचाच गेला काय...(ह.घ्या.).

पुढच्या आठवड्यात रुपाली किंवा माजोरडी शिवानी जायला हवी.

नेहा लकी आहे सगळे सेफ करतात पण नाही केलं तरी ती फायनलला नक्की असेल आणि जिंकेलही. काही सांगता येत नाही. पर्सनली मला आवडत नाही ती.

आतातर वीणाची काळजी वाटते मला. बिचुकले आणि शिवानीला फायनलपर्यंत नेण्यासाठी तिचा बळी देतील की काय.

श्शी बिचकुले ला आणला परत? आता बिबॉ बघण्याची उरलीसुरली इच्छा मेली. नाही बघणार आता. इथे येउन वाचेन फक्त

नेहाला सेफ करायला नको होते. >>>>>>> +++++++११११११११

त्या नेहाला कोणीतरी सांगा रे तो विग नको घालूस. >>>>>>>>> अगदी अगदी काल रडताना किती भयानक दिसत होती!

काल अभिजितला बघितल्यावर मला तैमुरचा बाहुला आठवला. Lol

लक्झरी बजेट आल्यानन्तर शिव त्याच्यामधली वस्तू , ते चॉकलेट असाव कदाचित. पॅण्टमध्ये लपवत होता. कॅमेराने ते बरोबर पकडल.

शिवानी किशोरी ताईंना अडगळीच्या खोलीतून बाहेर काढायला आली तेव्हा किशोरीताईंनी तिच्या कडे पाठविली फिरवली तरी हिला प्रॉब्लेम >>>>>>> ++++++++१११११११ त्यानन्तर किशोरीताई रडत असताना तिला मिठीत घेतल , तेव्हा तिच्या डोळयात साध टिपूसही नव्हत पाण्याच. तिची नजर एकदम थण्ड, सायकोसारखी होती त्यावेळी.

त्या नेहाला कोणीतरी सांगा रे तो विग नको घालूस. >>>>>>>>> अगदी अगदी काल रडताना किती भयानक दिसत होती!>>विग नाही आहे तो... तिने actually तसा हेयर कट केला आहे.. बाकिच्या दिवशी बांधते..म्हणून इतकं कळत नाही...पण काल रडताना scalp दिसत होता..म्हणून वाटल की विग नसावा.. पण तिची एकुण स्टाइल च भयानक आहे.. लिपस्टिक तरी जरा नीट लावली तरी चेहरा बरा दिसेल

नेहाला सेफ करायला नको होते. >>>>>>> बाप्पा ने जेंव्हा नेहाला सेफ केले होते तेंव्हा एलिमीनेशन नव्हते . वोटिंग बंद होते यावेळी पण तसेच असेल.

लक्झरी बजेट आल्यानन्तर शिव त्याच्यामधली वस्तू , ते चॉकलेट असाव कदाचित. पॅण्टमध्ये लपवत होता. कॅमेराने ते बरोबर पकडल.>>>
कॉफी ची बाटली होती ती . नेहा नंतर बोलतहोती कॉफ़ी नाही मिळत आहे. आणी तिने शीव ला विचारले की बाटली पहिली का तर तो चक्क नाही बोलला. स्वत: ला इतके वेगळे आइसक्रीम वग्गैरे येउन पण कॉमन बजेट मधली कॉफ़ी कशाला चोरायची.

Pages