Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52
बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
गो नेहा गो!
गो नेहा गो!
ती पाट्या बदलण्याची आयडीया मस्त होती..... and for a change ती आधी तिने तिच्या टीमबरोबर शेअर केली नाहीतर ऐन टास्कमध्ये माधवने तिच्यावर आरडाओरडा केला असता..... शिवानीने पण फुल्ल टायमिंग साधून पाट्या बदलल्या...... Idea आणि implementation दोन्हीही मस्त!
अगदी नियमात बसत नसूनही दस्तुरखुद्द बिग बॉसना या कल्पकतेचे कौतुक करावेसे वाटले यातच सगळे आले.... एरवी नेहाबाबत एकदम छद्मीपणाने वागणाऱ्या केळ्याच्या चेहऱ्यावरही चक्क कौतुकमिश्रित अचंबा दिसत होता
ते रोपे नाकारण्याची खेळीही नेहाने खेळून बघितली.... एका पॉइटला सगळे विरोधक तिच्यापुढे हतबल झाले होते..... बिग बॉसने मध्ये पडून आपापसात मिटवा म्हंटल्यावर पण तिने किशोरीला गुंडाळण्याचा प्रयत्न करुन बघितला पण यावेळी किशोरीने बाजी मारली
काही मूव्हज वर्क होतील अन काही होणार नाहीत.... पण स्मार्टनेस दिसतोच
अळणीतल्या अळणी टास्कमध्येही नेहा स्पाईस आणते
बाकी नुसते झटापटी करत राहीले
केळ्या तर नुसता त्या कुंपणात पाय घालून पडून होता..... त्यातही त्याला रुपालीने लोळवले
रुपालीच्या नुसत्या तोंडातच नाही तर अंगात पण दम आहे
काय आवाज लावती इतरवेळी अन काल तर केळ्या अन वीणालाही मस्त लोळवले (बाकी इतर वेळी ती फारशी आवडत नाही)
आरोह मस्त भिडला शिवला..... त्याच्याकडून इतके अपेक्षित नव्हते
पण कालच्या एकंदर एपिसोड मध्ये नेहा इतकाच शिव ही आवडला..... लॉयली खेळला..... आरोह बरोबर तो रोडीज वाला पंगा पण मस्त सोर्ट आउट केला त्याने...... हीना बरोबरच भांडताना काय होते त्याला कळत नाही..... तरीही काल बरेच दमाने घेत होता तो!
वीणा जास्त तोशीष पडू देत नाही स्वताला.... झेपेल तेव्हढे खेळते नाहीतर सरळ गिव्ह अप मारते
हो.... ते अनसीन अनदेखाच्या क्लीप्स मस्त असतात..... ती माधवची परफ्यूम एक्सपर्ट वाली आणि नेहा तिच्या नवऱ्याबद्दल बोलते त्या दोन्ही क्लीप्स मस्त आहेत
हे एपिसोडस/टास्कस मध्ये भांड भांड भांडून मग मस्त गप्पा मारत बसलेले असतात आणि यांचे फॅन्स बसतात ग्रजेस धरुन वादावादी करत! मज्जा!
काल नेहाने जे केलं तेच आज
काल नेहाने जे केलं तेच आज विरुद्ध टीमने केलं पण bb काल काहीच नाही बोलले. >>>
नेहा आणि रुपालीने फुलं रोवून मग झाकून ठेवली होती.. किशोरी वीणाने नुसती काही फुलं रोवल्यासारखी दाखवली आणि बाकीची नुसतीच टोपलीखाली लपवली..
हतबल आणि बिग बॉस मध्ये पडले?
हतबल आणि बिग बॉस मध्ये पडले? किशोरीच्या टीमने व्यवस्थित वाद घातला तिच्याशी. आता तिचं नावच आडमुठेपणा आहे तर भिंतीवर डोकं आपटून काय होणार? शिवाय किशोरीने त्याबद्दल बिग बॉसला सांगितलं होतं.
त्यांची रोपं पास करायचं नाही हे तिने आधीच ठरवलं होतं. तसं बिग बॉसलाही सांगितलं होतं.
एकंदरित काल प्रत्येक मुद्द्यावर नेहाचा सपशेल पराभव होऊनही बिग बॉसने तिच्यासाठी माघारीची सोय करून दिली.
रडायला सुद्धा तिला शिवकडे जावं लागलं. माधव आणि शिवानी सोबतच्या तिच्या टीमाम्ध्ये फट पडलीय हे गेले दोनतीन दिवस पुन्हा पुन्हा दिसतंय.
नेहाने किशोरीला, हळू बोला सांगणं was epic.
शिवानी काल बिछान्यात पडून कॅमेर्याशी = प्रेक्षकांशी जे बोलली त्यावरून प्रेक्षकांना तिचं वागणं आवडत नाहीए, हा फीडबॅक तिला दिला गेला असा संशय आला.
स्वरुपच्या संपूर्ण पोस्टशी
स्वरुपच्या संपूर्ण पोस्टशी सहमत.
मलाही काल नेहाचा खेळ आवडला. खेळ म्हटला की थोडीशी खोडी हवीच! आणी त्या खोडीसाठीच बिबॉ सगळे नियम न सांगता लूप होल्स ठेवत असावेत. असं असूनही काल बिबॉनीच शेपूट घातलेले बघून आश्चर्य वाटले.
ती शिवानी कित्ती खोटी रडते ,
ती शिवानी कित्ती खोटी रडते , बॅड अॅक्ट्रेस आहे, कम्मॉन प्रेक्षक काय किंवा समोरची टिम काय विश्वास ठेवेल इतक्या वाईट अॅक्टींगवर


मला हिना जाम आवडतेय, ज्या प्रकारे शिवानीला तिच्या दुप्पट आवाजात गप्प करते :टाळ्या:
वीणानेही चांगला आवाज चढवला शिवानीवर पण लगेच रात्री सॉरी !
हॅट्स ऑफ टु किशोरीताई, मस्तं टास्क केलं आणि नेहाला रेड्याची उपमा देऊन शेवटी मार्क्स घेतानाही मस्तं गप्प केलं तिला , टास्क तू एन्जॉय नाही करत पण आम्ही करतो म्हंटल्यावर नेहा गप्पच झाली
नेहाची पाटी बदलायची आयडीआ तर अत्यंत फालतु , हस्यास्पद होती, मागच्या हिन्दी बिबॉ मधे मठ्ठांचा राजा करणवीर बोहरानी सेम केलं होतं तेंव्हा त्यावेळी सलमानने त्याच्या डंबपणावर भरभरके टिंगल केली होती, पण लुक्स लाइक मराठी बिबॉलाही करणवीर बोहरा इतपतच अक्कल आहे
आरोह छान खेळतोय, शिव पहिल्यांदाच इन्सिक्युअर दिसला , इन्स्टीगेट पण झाला आरोहमुळे.
केळ्करही डोक्याने खेळतोय आरोहला स्वत:कडे वळवून .
आरोहला तिकडे वळवण्यातही
आरोहला तिकडे वळवण्यातही शिवानीचाच हात आहे. परवाच्या भागात तो रडताना दिसला होता.
शिवानी आणि नेहा महाचालू आहेत
शिवानी आणि नेहा महाचालू आहेत .शिवानी नाटक करत असेल तर भारी ऍक्टर आहे आणि नसेल तर तिला शो मधून घरी पाठवायला हवं.
तिच्यामध्ये डॉली बिंद्राचे ट्रेट्स दिसतात .ती पण अचानक अशीच हायपर व्हायची,शिव्या घालायची . नेहा चा अतिशहाणपणा आणि शिवानीचे टँट्रम्स डोक्यातच जायला लागलेत . बिग बॉस नेहमी प्रमाणे संदिग्ध नियम वापरायला आणि वाकवायला देताहेत.
मला नाही वाटत शिवानी भारी अ
मला नाही वाटत शिवानी भारी अॅक्टर वगैरे, उलट हसु येण्याइतकी खोटं रडतेय्/चिडतेय असं वाटतय, हिना बघा कस्स्ली मस्तं जेन्युइन ओरडते
@ दीपांजली : भारी म्हणजे
@ दीपांजली : भारी म्हणजे मराठी सीरिअल्स झेपेल इतपत
इशा निमकर ला मागे टाकेल 
भरत आणि दीपांजली च्या पोस्ट
भरत आणि दीपांजली च्या पोस्ट ना ++१११११
डीजे मस्त पोस्ट.
डीजे मस्त पोस्ट.
खरंच फालतू acting होती शिवानीची. वीणा नंतर sorry उगाच म्हणाली तिला. बरोबर बोलली होती ती शिवानीला.
शिवानी रोज एकदा तरी अशी वागणार, कित्ती बाई मला त्रास होतो दुसऱ्याचे दु:ख बघून एकीकडे आणि स्वत: टोकाचा त्रास देणार दुसऱ्याला आणि म मां तिला काहीही बोलणार नाहीत.
नेहा प्रत्येकवेळी फालतू negative वागून आणि तोंडघशी पडून, स्वत:चं महत्व कमी करून घेतेय. भले task जिंकोत शिवानी नेहा, लोकांच्या मनातून उतरत चालल्यात . मागच्या सिझनमध्ये जो पाठींबा मेघाला होता त्याच्या आसपासपण नेहाला दिसत नाही कारण मेघा फक्त task नाही तर इतर बाबतीत पण लोकांना आवडायची.
नेहा दुसऱ्याला रडवते आणि स्वत: रडत बसली शिवजवळ. याउलट वीणा कितीही लागलं तरी डोळ्यातून पाणी नाही.
किशोरीताई आणि हीनाला लोकांचा पाठींबा वाढत चाललाय. किशोरीताई एक ग्रेस ठेऊन आहे आणि हीना एकटीच शिवानीला आणि नेहाला त्यांची जागा दाखवते म्हणून. हे fb पोस्ट वाचून लिहिते. बाकी माहिती नाही.
२-३ दिवस पाहिले नाहीये .. पण
२-३ दिवस पाहिले नाहीये .. पण इथे वाचून कळलं काय टास्क आहे तो .. अश्याच स्वरूपाचा टास्क गेल्या वर्षी होता त्यातच त्या ऋतुजा धर्माधिकारी चा हात मोडला ना !? यावेळच्या लोकांना आरडा ओरडा आणि राडा केल्याशिवाय काही जमतच नाही असं दिसतंय .. ती शिवानी तर कायम तलवारबाजी च करत असते . पहिल्या आठवड्यात बरी वागलेली आता सदस्य झाल्यावर ऊत च आलाय हिला तर ! सध्या फक्त केळकर च फोकस्ड खेळतोय ..तो जिंकावा असं वाटायला लागलंय .. तरी माझ्याकडून कोणीतरी नेहा ला मत द्या प्लीsss ज !!
केळकर जास्त योग्य वाटतो
केळकर जास्त योग्य वाटतो नेहापेक्षा. मला खरंतर दोघेही आवडत नाहीत. शिव जास्त आवडतो पण केळकर शिवपेक्षा पुढे जाईल असं वाटतं.
शिवानी आठवडाभर दादागिरी रडारड करणार आणि शनिवारी म मां काही बोललेच तर sorry म्हणून मोकळी होणार.
शिव पहिल्यांदाच इन्सिक्युअर दिसला , इन्स्टीगेट पण झाला आरोहमुळे. >>> शिवला माधवने पिन मारली रोडीजबद्दल आणि शिवच्या मनात थोडा रागही दिसतोय कारण आरोहने top 5 मध्ये शिवचं नाव घेतलं नाही. ते कदाचित bb च्या सांगण्यावरून असेल शिवला motivate करायला.
>>तरी माझ्याकडून कोणीतरी नेहा
>>तरी माझ्याकडून कोणीतरी नेहा ला मत द्या प्लीsss ज !!
दिलीत दिलीत..... ९९ मते दिलीत नेहाला
आणि यावेळेला पहील्यांदाच "चुगली" ही करुन आलोय वूट वर
आणि यावेळेला पहील्यांदाच
आणि यावेळेला पहील्यांदाच "चुगली" ही करुन आलोय वूट वर >>> अरे वा तुमची निवड केली तर बघायला आवडेल.
दिलीत दिलीत..... ९९ मते दिलीत
दिलीत दिलीत..... ९९ मते दिलीत नेहाला>> या sss हू !! धन्यवाद

यावेळेला पहील्यांदाच "चुगली" ही करुन आलोय वूट वर>>
आज बीबी मध्ये वधू वरसुचक मंडळ
आज बीबी मध्ये वधू वरसुचक मंडळ कार्य आहे. वीणा आणी शीव जोडी असुन . त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या तक्रारी मंडळा कडे मांडायच्या आहेत. म्हणजे शीव बद्दलच्या तक्रारी वीणा च्या नतेवाईकांनी आणी विणा च्या शीव च्या नातेवाईक नी.
अरारा. बोरिंग होणार हे.
अरारा. बोरिंग होणार हे. पुन्हा ते शिव चे लाजणे आणि वीणाचे लाडिक मुरके बघायचे की काय आख्खा एपिसोड !
त्यापेक्षा भांडणे चालतील मला.
एक मात्र आहे, शेतकरी टास्क शिव -वीणाने सिरियसली खेळला. अजिबात मधे मधे एकमेकाकडे जाणे, सल्ले देणे, तुला लागलं का मी फू करते/तो इ.लाडिवाळपणा केला नाही ते छान केले.
पुन्हा ते शिव चे लाजणे आणि
पुन्हा ते शिव चे लाजणे आणि वीणाचे लाडिक मुरके बघायचे की काय आख्खा एपिसोड !>> शी!!
शिवानी चा वेगळाच daily soap
शिवानी चा वेगळाच daily soap चालू होता.. आणि हिला आरडा ओरड करताना, भांडताना नाही बरा श्वास लागत.. Lolz.. आणि तुम्हाला लागलं म्हणुन मी रडतेय हे पण ओरडून सांगावं लागतं
शिवानी चा वेगळाच daily soap
शिवानी चा वेगळाच daily soap चालू होता.. आणि हिला आरडा ओरड करताना, भांडताना नाही बरा श्वास लागत.. Lolz.. आणि तुम्हाला लागलं म्हणुन मी रडतेय हे पण ओरडून सांगावं लागतं>>>100%सहमत...
वरची दीपांजलीची आणि तिच्या
वरची दीपांजलीची आणि तिच्या समर्थनार्थ लिहिलेली अंजूची पोस्ट या दोन्ही पोस्ट्स ला अनुमोदन.. शिवानी अतिशय worst actress.... At least किती प्रमाणात overacting करावी हे तरी कळायला हवं.. तिला श्वासाचा त्रास होत होता अन् अचानक येऊन दणादणा भांडायला लागली तेव्हा काय श्वास गहाण ठेवला होता का?.... बरं शिवानी रडून sympathy घेतेय का मग मी का मागे राहू असा विचार करून so called हुश्शार नेहा शितोळे लग्गेच स्पर्धेत उतरली.. किशोरीचं यावरचं sarcastically म्हटलेले वाक्य मस्त होतं- रडून काय होत गं? Sympathy मिळते का audianceची??
हीनाने पण मस्त सुनावले शिवानीला....वीणा पण आवडली... तिने भारी सुधारणा केलीये.. योग्य तितके बोलते.. आणि डोकं नसलेल्या शिवानीसमोर डोक आपटण्यापेक्षा sorry बोलली ती...
शिवला माधवने पिन मारली
शिवला माधवने पिन मारली रोडीजबद्दल >>पुन्हा एकदा बघा... माधवने नाही तर रुपालीने काडी टाकली.. आणि नंतर आली sort out करून मोठेपणा घ्यायला... माधव उलट शिवला चांगल्या प्रकारे समजावत होता..
सगळेच इतके इरिटेट करतायत की
सगळेच इतके इरिटेट करतायत की आताच्या स्थितीत केळ्याच त्यातल्या त्यात जिंकला तर बरा वाटेल मला! नाहीतर सगळ्या हुश्शार लोकांचा पत्ता कट करून किशोरीने ट्रॉफी जिंकली तर फारच मज्जा होईल
पण बिबॉ च्या मनात तिला एलिमिनेट करायचे आहे वाटते. तिला अस्तित्वात नसलेल्या नियमाच्या आधारे नॉमिनेट केले या आठवड्यात.
ईतर वेळी कोणी कितिही काही
ईतर वेळी कोणी कितिही काही बळाचा वापर किन्वा नियम मोडत असले तर बिग्ग बॉस झोपा काढतात. पण त्या दिवशी किशोरी ताई नी ब्लू लाईन वर पाय ठेवल्यावर लगेच स्वत: हून त्याना nominate केले. डोळयात तेल घालुन त्यांची काय चुक होते हेच बघत होते बहुतेक.
केळकर आणि वीणाचा पाय
केळकर आणि वीणाचा पाय किशोरीच्या आधीच बाहेर पडला होता,तेव्हा हा नियम नाही आठवला वाटत.
नंतर वीणा नॉमिनेट झाली
पण केळकर वाचला.
मी आज पहिल्यांदाच Voot वर
मी आज पहिल्यांदाच Voot वर जाऊन मत देत आहे. 99पैकी किती मते कोणाकोणाला आणि किती कालावधीत देऊ शकतो, म्हणजे एक आठवड्यात 99 मतं देऊ शकतो की एकंदर देऊ शकतो?? मला किशोरी आणि नेहाला मत द्यायचे आहे...
शिवला माधवने पिन मारली
शिवला माधवने पिन मारली रोडीजबद्दल >>पुन्हा एकदा बघा... माधवने नाही तर रुपालीने काडी टाकली.. आणि नंतर आली sort out करून मोठेपणा घ्यायला... माधव उलट शिवला चांगल्या प्रकारे समजावत होता.. >>> हो का. मी नेमका माधव शिव संवाद बघितला. एका जागी बसून बघत नाहीना. त्यामुळे मला तो वाटला. सॉरी आता ती पोस्ट एडीट नाही करता येणार.
रुपालीला काड्या टाकणे आणि दुसऱ्याच्या छत्रछायेखाली रहाणे, जो strong असेल त्याच्या एवढंच येतं otherwise task पण समजत नाही.
शिवानी जायच्या आधी किशोरीने
शिवानी जायच्या आधी किशोरीने शिवानीबद्दल हेच म्हटलेलं की शिवानी बाकीच्या वेळी आजारी असते पण टास्क करताना तिच्या अंगात स़चारतं.
पण ती सर्टिफाइड हुशार नसल्याने तिच्या मताला किंमत नाही.
मीनाक्षी , दर आठवड्यासाठी एकूण ९९ मतं आहेत. ती तुम्ही नॉमिनेटेड सदस्यांना कशीही देऊ शकता.
आज ११ पर्यंत मतदान करा.
Voot मधून मराठी जत्रावर जावं लागेल.
मी ११ votes दिली आणि ती
मी ११ votes दिली आणि ती वीणाला. मी ९९ वगैरे नाही देत. खूप वेळ जातो. मागच्यावेळी शिव वीणा आणि माधवला दिलं पण आत्ता फक्त वीणाला.
Pages