Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52
बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
केळ्या अगदी सात्विक संतापाने
केळ्या अगदी सात्विक संतापाने "शिव ला वापरून घेतायत ते लोक" म्हणत होता त्याचे हसू च आले>>>
बाहुलीच्या टास्क मध्ये यानेच नेहाची बाहुली शीव च्या पाठी वर चढून कैमरा ला बांधली होती.
केळया खोट रडण सोडून गेममध्ये
केळया खोट रडण सोडून गेममध्ये फोकस्ड झाला हे छान झाला. वैशाली गेल्याचा चान्गला परिणाम आहे हा.
सध्या केळयाच सतत रडण आरोहकडे शिफ्ट झालय की काय अस वाटतय. शिव विणा विरुद्द टिममध्ये गेल्यापासून चान्गले खेळतायत.
कालच्या टास्कमध्ये अभिजित, माधव, किशोरी, नेहा, शिव आणि विणा छान खेळले.
शिव टास्कसमध्ये समोरच्याला अडवताना बोबड बोलतो ते ऐकताना क्यूट वाटत.
बाकी लोकांची स्ट्रॅटेजी ठरवून झाली तरी रुपाली ते नियमच वाचत बसली होती बघून फार हसू आले! >>>>>>>> हो, नाहीतर मागच्यासारखी फजिती व्हायची.
आपण इथे नेहा जिंकेल,शिव
आपण इथे नेहा जिंकेल,शिव जिंकेल,शिवानीला विनर करतील,केळकरही होऊ शकतो,वीणा नाही होणार,असे तर्क वितर्क करत आहोत,
पण सोमीवर असलेला किशोरी शहाणेचा पाठिंबा पाहाता,तिच विनर व्हायची
आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार,कालपर्यंत ती सेकंडलास्ट होती ,तर आज तिसर्या नंबर वर आहे.
त्यामुळे किशोरी शहाणे ही विनर होऊ शकते.
बरेच गुन्हे आहेत तरी फरार
बरेच गुन्हे आहेत तरी फरार म्हणे आधी, पोलीस प्रोटेक्शनमध्ये इलेक्शन तर लढत होता. Bb त आला आणि अलगद सापडला पोलिसांना.वरती कोणीतरी हे लिहीलेय याचे हसू आले. फरार झालेल्याला पोलीस प्रोटेक्शन देतील की अटक करतील? का वाट बघत बसतील की कधी बिग बॉस मध्ये जातोय ते....??(सहज लिहीलेय. ह.घ्या.)
आता बर्यापैकी चांगले फक्त अभिजित आणि शिव खेळत आहेत असे वाटतेय. नेहा अजूनही डोक्यात जाते. कोठलाही गेमच्या आधी स्ट्रॅटेजी ठरवायच्या वेळी नेहा आपली मते मांडते त्याचे फार हसू येते. त्यावेळी तिचा आविर्भाव असा असतो की हा गेम आणि शो सगळे मी कोळून प्यायलेय...
बाकी मेघा धाडेला अजून कसे गेस्ट म्हणून बोलावले नाही याचे आश्चर्य वाटले. मेघाला मराठी बिग बॉस जिंकल्याचा काहीच फायदा झालेला दिसत नाही. फक्त हिंदी बिग बॉस आणि काही युट्यूब व्हीडीओस मध्ये दिसली. स्मिताला भरपूर फायदा झालेला दिसतोय. तिचे काही चित्रपट येत आहेत . (स्मिताच्या वेबसाईट वर मिळालेली माहिती)
>>त्यामुळे किशोरी शहाणे ही
>>त्यामुळे किशोरी शहाणे ही विनर होऊ शकते.<<
शक्यता कमी वाटतेय. स्मिता, बाप्पा, किशोरी सारखी साधी, सरळ माणसं जिंकत नाहित; एलिमिनेट होतात. कपटी, कट-कारस्थानं करणारे लूझर्स शेवटी विनर होतात...
{पण सोमीवर असलेला किशोरी
{पण सोमीवर असलेला किशोरी शहाणेचा पाठिंबा पाहाता,तिच विनर व्हायची
आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार,कालपर्यंत ती सेकंडलास्ट होती ,तर आज तिसर्या नंबर वर आहे.}
हे नेमकं कुठे दिसतंय?
पहिल्या हिंदी बिग बॉसमध्ये जिंकलेला राहुल रॉय, कुणाच्या अध्यात ना मध्यात असाच होता.
पण आता जमाना बदल गया होगा.
पहिल्या हिंदी बिग बॉसमध्ये
पहिल्या हिंदी बिग बॉसमध्ये जिंकलेला राहुल रॉय, कुणाच्या अध्यात ना मध्यात असाच होता.
पण आता जमाना बदल गया होगा. >>> हो मला आवडायचा तो त्यात. एकदम कुल होता.
वीणाने काल पहिल्या वेळी attack करून मस्त फुलं पळवली, नंतर समोरच्या टीमने target केलं तिला आणि तिसऱ्या वेळी तर शिवानी तिच्या अंगावर पडून राहिली.
मेघाला मराठी बिग बॉस जिंकल्याचा काहीच फायदा झालेला दिसत नाही. फक्त हिंदी बिग बॉस आणि काही युट्यूब व्हीडीओस मध्ये दिसली. स्मिताला भरपूर फायदा झालेला दिसतोय. तिचे काही चित्रपट येत आहेत . (स्मिताच्या वेबसाईट वर मिळालेली माहिती) >>> तिच्याकडे आधीही खूप कामं होती. शेवटी bb नी तिचे आभार मानताना म्हटलं ना की काहीजण हातातली कामं सोडून इथे आली आम्ही बोलावल्यावर आणि तिच्यावर camera नेला. ती सर्वात बिझी होती आणि नंतर अजून झाली. तिचा स्वभाव बघता ती सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारी, फार कटकट न करणारी आहे त्यामुळे तिच्याबरोबर काम करणारेही खुश असतील आणि डिमांड असेल तिला.
नेहाच्या गेम ग्रास्पिंग
नेहाच्या गेम ग्रास्पिंग पॉवरबद्दल शिवानी आणि माधवचं मत रोचक आहे.
मी फिजिकली आणि मेंटली फिट आहे
मी फिजिकली आणि मेंटली फिट आहे असं कन्फेशन रूममध्ये कबूल करूनच शिवानी पाहुणी आणि सदस्य झाली ना?
पाट्या बदलण्यावरून नेहा -शिवानीचं थोबाड फुटलेलं बघून मजा आली. बिग बॉसने कितीही चुचकारून मारलं असलं तरी.
किशोरीचं फायटिंग स्पिरिट आणि आरोहने शिवला दिलेलं टशनपण आवडलं.
टास्क कोण जिंकले?
टास्क कोण जिंकले?
अजून संपलं नाहीए.
अजून संपलं नाहीए.
ओके.पाट्या बदलण्यावरून नेहा
ओके.पाट्या बदलण्यावरून नेहा -शिवानीचं थोबाड फुटलेलं बघून मजा आली. कोणत्या पाट्या?
दोन टीमना शेताचा भाग दिलख
दोन टीमना शेताचा भाग दिला होता, तो त्यांना आतिक्रमण करून वाढवायचा होता. काल शेवटी किशोरीवाल्या टीमने पुष्कळ शेत काबीज केलं होतं.
आज पहिल्या राउ़ंंडला शिवानीने दोन्ही शेतांवरच्या टीमच्या नावाच्या पाट्या बदलल्या. म्हणजे दुसऱ्या टीमचं पूर्ण टास्क invalid होईल.
बिग बॉसने ही युक्ती डोकेबाज आहोत, पण invalid आहे असं सांगितलं. युक्ती नेहाची होती.
नेहाचं थोबाड आणखी एकदा फुटलं.
पण उद्या किशोरीच्या टीमला धक्का बसणार आहे.
ओके. थैंक यू फ़ॉर updates .
ओके. थैंक यू फ़ॉर updates .
Kasala dhakka?
Kasala dhakka?
काय इथे येऊन लिहीणार, सगळं
काय इथे येऊन लिहीणार, सगळं समोर दिसतंय. नेहाचा plan चांगला होता पण दुसऱ्याची जमीन बळकावली ही चतुराई नाही तर गुन्हा आहे कायद्याने
, त्यामुळे शातीर दिमाग आणि त्यातून घडणारा गुन्हा नेहा शिवानीकडून. पण तिच्या शातीर दिमागचं कौतुक पण जमीन परत द्यावी लागली हा पचका.
किशोरीताईला लागलं म्हणून शिवानीची नाटकं, तर बाजूला का नाही केलं नेहाला. काल स्वतः injured केलं विणाला तेव्हा नाही रडली. वीणा योग्य म्हणत होती, उगाच माफी मागितली शिवानीची तिने.
शिवानी आजारी आहे तर परत पाठवा, पूर्ण सहानुभूती तिला आजारपणाबद्दल, अजून पूर्ण बरी झाली नाहीये बहुतेक. बरी होऊदे मग फायनलला डायरेक्ट entry द्या. शेवटी trophy हातात द्या.
फुलं कमी दिली का असं उद्या
फुलं कमी दिली का असं उद्या किशोरीताई विचारणार त्याचा bb ना आपल्यावर दाखवलेला अविश्वास वाटणार. जाऊदे ना कशाला task खेळवता. नेहा शिवानी टीम जिंकली डिक्लेअर करा.
काल नेहाने जे केलं तेच आज विरुद्ध टीमने केलं पण bb काल काहीच नाही बोलले. सरळ सरळ दिसतोय फेवर कोणावर. नशीब तरी फुलांबाबत त्या नेहाने आगाऊपणा केला ते ग्राह्य धरलं नाही.
दोन वेळा नेहा तोंडावर सपशेल आपटली पण तरी कित्ती ग बाई मी हुश्शार असंच सुरु. फालतू रडण्याची नाटकं. वीणाला लागूनही काल ती रडली नाही.
पण उद्या फुलांबाबत संशय निर्माण केला म्हणून किशोरीताई आणि टीम तोंडघशी पडणार आणि जिंकणार नेहा टीम.
पाट्या बदलण्यावरून नेहा
पाट्या बदलण्यावरून नेहा -शिवानीचं थोबाड फुटलेलं बघून मजा आली. बिग बॉसने कितीही चुचकारून मारलं असलं तरी. >>> मस्त पोस्ट, मजा आली. गिरे तो भी टांग उपरचा नमुना म्हणजे नेहा शिवानी.
चला सोमवार मंगळवार कडे
चला सोमवार मंगळवार कडे बिचुकले येणार. त्याला तिसऱ्या केसमध्येपण जामिन मिळाला, good going.
आतल्या (सगळ्या जगाला माहिती
आतल्या (सगळ्या जगाला माहिती आहे तरीपण )
१.सगळं ठरलंय !
२. टीआरपी झोपलाय
3. चॅनेल बोंबलत आहे
4. नवीन कोणीही मोठा स्टार यायला तयार नाहीये
5.अक्षरशः उकिरडा केलाय घराचा
5.अक्षरशः उकिरडा केलाय घराचा
6. या लोकांना अन्न पुरवले जाते आहे
7. क्लिनिग वगैरे च्या सोयी आहेत
8. 70% शो स्क्रिप्ट आहे
9. बिग बॉस चे कन्फेशन रूम 25 वेला बोलावलं तरी एकदाच दाखवली जाते
अनसीन अनदेखा मी क्वचित बघते.
अनसीन अनदेखा मी क्वचित बघते. जास्त करून वीणा शिव केळकरचे बघते. छान bonding आहे तिघांत. नेहा असणार top 2 मध्ये म्हणत होते. शिवानी एरवी होतीच फायनलला पण एक महिना बाहेर बघून आल्यावर असणं योग्य नाही असं तिघांचे म्हणणे.
शिव आणि शिवानीचा पहिल्या दिवशी झालेला वाद त्याबद्दल वीणा मस्त सांगत होती, केळकरला.
किशोरीताई वोटींगमधे खाली होती
किशोरीताई वोटींगमधे खाली होती पण आता हिना माधवच्या पुढे गेली, परागनेपण त्याच्या फॅन्सना सर्व वोटस किशोरीताईला द्या सांगितलं. माधव जाईल यावेळी खरंतर.
लेटेस्ट वोटींग ट्रेंडप्रमाणे
लेटेस्ट वोटींग ट्रेंडप्रमाणे माधवला सर्वात कमी वोट्स आहेत, त्याचे काही फॅनक्लब्स नाहीयेत किंवा चर्चाही फार नाहीये !
किशोरी आहेत ते फॅन्स टिकवून आहे + पब्लिकला ती रीलेट करण्यासारखी वाटते जास्तं ड्रामा/दंगा/शिव्या देत नाही त्यामुळे फार अॅग्रेसिव खेळत नसली तरी वोट्स मिळवते, ती नाही जाणार !
हो माधव जाईल असंच वाटतंय.
हो माधव जाईल असंच वाटतंय. रुपाली नॉमिनेटंच होत नाहीये मात्र
. ती आता शिवानी नेहाच्या छत्रछायेखाली गेलीय.
रुपाली ही बिबॉ हिन्दी सिझन १२
रुपाली ही बिबॉ हिन्दी सिझन १२ ची सोमि खान आहे, सर्वात कमजोर तरी केवळ लक फॅक्टरमुळे कायम टेकन केअर बाय स्ट्राँग कन्टेस्टन्ट्स, टॉप ६ पर्यंत गेली तशी ही सुध्दा जाणार
चेरी ऑन द केक. बघावं तेव्हा
चेरी ऑन द केक. बघावं तेव्हा रे ड्यासारखी रेकणारी नेहा (स्वत" पुन्हा एकदा खोटं /चूक ठरल्यावर) किशोरीला सांगते ओरडू नका.
शिवानी पाताळविजयममधल्या राक्षसासारखे दोन्ही हात वर करून ओरडते, अख्ख्या जगाला माहीत आहे, शिवानी सुर्वे कोण आहे ते.
अख्ख्या जगाला ती बिग बॉसमध्ये केलेल्या राड्या रड्यामुळेच माहीत झालीय.
लागलेलं असूनही परवा वीणाने रडारड नाही केली ते चांगलं झालं. त्यामुळे शिवानीचं रडणं हायलाइट झालं.
हो वीणाचं खरंच कौतुक.
हो वीणाचं खरंच कौतुक.
अख्ख्या जगाला ती बिग बॉसमध्ये केलेल्या राड्या रड्यामुळेच माहीत झालीय. >>> खरं आहे.
कसंही खेळून नेहा शिवानीची टीम जिंकेल ही व्यवस्था करतात bb. सो मि वर जाम टीका आहे दोघींवर, फेसबुकवर तरी आहे.
रुपाली ही बिबॉ हिन्दी सिझन १२ ची सोमि खान आहे, सर्वात कमजोर तरी केवळ लक फॅक्टरमुळे कायम टेकन केअर बाय स्ट्राँग कन्टेस्टन्ट्स, टॉप ६ पर्यंत गेली तशी ही सुध्दा जाणार >>> हम्म.
मागच्यावेळेसारखा task हवा होता भले खूपजण nominate झाले असते तरी चाललं असते पण ती व्हायला हवी होती.
भरत पूर्ण पोस्ट ला ++११११११११
भरत पूर्ण पोस्ट ला ++११११११११
हो आता हाय टाईम! रुपाली
हो आता हाय टाईम! रुपाली नाॅमिनेट व्हायला पाहिजे. आणि शिवानीला बिबॉ ने परत एकदा तिची जागा दाखवली पाहीजे.
Pages