बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नेहाचा नवरा पिंजरा सिरियलमध्ये >> पिंजरा मध्ये होता. दिल दोस्ती चे माहिती नाही.

आरोह आणि रुपाली यांच्यात ट्फ फाईट होईल. आत्ताच विणा, आरोह आणि हिनाला मते दिलीत. रूपाली जायला हवी. नाहीतरी हल्ली तशी जास्त पुढे पुढे नसते. त्यामुळे बिग बॉसने आपणहून तिला काढले तर बरेच.

शिवानी खरोखर सायको वाटते. थोडीफार खूनशी सुद्दा वाटते. विणावर केलेल्या आरोपावर ती चांगलीच तोंडघशी पडली.

अभिजितने किशोरीला सेफ करून गेम खेळला असे वाटले. वीणाला खरंतर नॉमिनेशनचा काहीच फरक पडत नाही व ती तसे मनातही ठेवणार नाही पण पुढच्या नॉमिनेशनच्या वेळी किशोरीसुद्धा याला साथ देईल.

बिचुकलेंना मात्र अजिबात बघवत नाही स्पर्धेत...

D 3 मध्ये चोर होता बहुतेक>>>>>>>> हो नचिकेत पूर्णपात्रे , नाव माहीत नव्हतं, पण हाच होता दिदोदु मधे. अत्ता नेट वर फोटो शोधला.

अभिजितने किशोरीला सेफ करून गेम खेळला असे वाटले. >>
बरोबर. अभिजीत ला पुढे जाण्यासाठे शिव ची गरज आहे म्हणुन त्याला सेफ करायचेच होते.
पण वीणा ला आत्ता सेफ केलं आणि पुढे जाउन जर शिव , अभि आणि वीणा समोरासमोर आले तर तेव्हा शिव नक्कीच वीणा ला निवडेल हे अभिजित ओळखुन आहे. त्यापेक्षा किशोरी ला सेफ केलं तर तिचा फायदा करुन घेता येइइल आणि शिवाय वीणा नॉमिनेट झाली आणि जरी बाहेर पण पडली तरी अभिची स्पर्धाच कमी होते असा विचार असु शकतो. स्मार्ट गेम.
केळ्या मला पुर्वी अजिबात आवडायचा नाही , वैशाली असताना खुप कुचकट्पणा करतोय असं वाटायचं पण आजकाल मला केळ्या सगळ्यात हुषार वाटु लागलाय. सगळ्यांच्याच नजरेत सेफ राहतो.

काल शिवानी चा पचका झालेला बघुन मस्त वाटलं Happy
अरोह टास्क मधे खुप व्हायलंट होउन ओरडत होता . असं वाटलं की मारेल आता हात उचलुन कोणालातरी.
चुकीच्या संगतीत आहेच आणि तो.
या वीक मधे रुपाली जाईल. ती कोणत्याच ग्रुप ला नको आहे आता. आणि काही कंटेंट पण नाही देत.

किशोरी ची काय एनर्जी आहे या वयात. वीणा ला कसली मस्त टशन देत होती ती काल टास्क मधे. भारी पडत होती वीणा वर.
मानलं तीला खरच.

बिचुकले आता पुर्वी सारखे वाटत नाहित. त्यांचा पुर्वीचा सगळा confidance गेला आहे. 8दिवसात जर त्यानी काहिच केले नाही तर मला नाही वाटत त्याना सदस्यत्व देतील. पण बीबी चे काही सांगत येत नाही. अधीच त्याना गेम समजत नव्हता आता तर गेम खुप पूढे गेला आहे.

अभिजितने किशोरीला सेफ करून गेम खेळला असे वाटले. >>बरोबर.. पण काही लोकांना कळत नाही..ते फार भावनिक होतात.. म्हणतात की अभिजित ने किशोरी ला सेफ़ केल सो त्याचे आधीचे सर्व गुन्हे माफ.. अरे बाबानो तो काय तिच्यावर उपकार नही करत आहे किंवा त्याला काय फार फिकिर नाही..तो डबल गेम खेळला..ज्याला कळला त्याला कळला.. Lol पण एक मात्र खरं एवढ्या सगळ्या सावळ्या गोंधळात त्याच्या विरुद्ध कोणी बोलत नाहिये सध्या..असच राहील तर अलगद ट्रॉफी त्याच्याच हातात जाणार. सध्या किशोरी पण मस्तच खेळायला लागली आहे.. तिची एनर्जी खरच मस्त आहे..30शी च्या लोकना दमवते ती..हवा तिथे बरोबर स्टँड़ घ्यायला शिकली स्वताच्या इमेज चा फार विचार न करता तर ती पण होईल विनर.. पण या वीक मध्ये रुपाली चाच नम्बर.. खरच फार फुसकी निघाली ती.. या वीक मध्ये ती स्वत: पण फार काही करत नाहिये.

अभिजित केळकर जिंकला तर योग्यच होईल.
नेहापेक्षा तो बरा. पराग प्रकरणाच्या वेळीही परागला त्रास देणं तो एन्जॉय करत होता असं वाटलं नाही. नेहा मात्र दुसऱ्याला त्रास देणं एन्जॉयच करते.
सोशल मीडियात तो गोल गोल फिरून पाणी न सांडण्याचा टास्क व्हिडियो व्हायरल झाला ज्यात केळकर व अजून कोणाचा तरी पाय पण बाहेर होता पण फक्त किशोरीलाच त्या नियमानुसार नॉमिनेट केलं. तर त्या व्हिडियोत दिसतं की नेहा आणि माधव पद्धतशीरपणे प्लॅन करून किशोरीच्या पुढे मागे येऊन उभे राहिले कारण त्यांना तिला टार्गेट करून नॉमीनेट करायचं होतं. बाकी कोणीच आशा पद्धतीने खेळताना दिसलं नाही.
आता उरलेल्या लोकात नेहा तर नकोच. वीणा रुड आहे. किशोरी गोड आहे पण लीडरशिप दाखवत नाही. शिव फेक बोबडं बोलतो, बळाचा वापर बिनधास्त करतो. केळकरच विनर मटेरियल आहे. बाकी हीना आरोह शिवानी बिचुकले पूर्ण दिवस घरात नसल्यामुळे आपोआपच बाद.

यावेळच्या स्पर्धकान्ना टास्कसचे नियम कळत नाही वाटत. बावळटासारखे उठले खेळायला बजर वाजण्याआधी.

शिव वीणाला योग्य शिक्षा मिळाली. काल शिवानी चा पचका झालेला बघुन मस्त वाटलं >>>>>>>>> ++++++++११११११११

हिनाला कुठचही मॉर्निन्ग सॉन्ग दया, ती सेम स्टेपस करते. Lol बाकी तिला एक्सरसाईज करण्याची गरज नाही. मॉर्निग सॉन्गवर नाचून होतो की आपोआप तिच्या व्यायाम. बिचकुले तिच्याकडे नाचताना बघत होता. पण आता ते दोघे पुर्वीसारखे वागत नाहीत. अन्तर ठेवून बोलतायत अस वाटतय.

D 3 मध्ये चोर होता बहुतेक >>>>>>> तरीच ह्याला कुठेतरी बघितल्यासारख वाटल. त्याचा प्रोमो बघून, हिन्दी बिबॉमध्ये दिपिका कक्करचा नवरा तिला भेटण्याआधी शायरी करतो आणि ति त्याला धावत येऊन मिठी मारते त्याची आठवण झाली. कालचा प्रोमो त्याची कार्बन कॉपी होती.

चिन्ग शेजवान चटणीच्या पॅकेटवर रणवीर सिन्गचा फोटो होता, मला तो बिचकुलेचा वाटला आधी>>> सुलू काहीपण >>>>>> Proud बिबॉचा काही भरवसा देता येत नव्हता. बिचकुलेच ग्रॅण्ड स्वागत करण्यासाठी त्यान्नी काहीही केल असत. काहीही!

सध्या किशोरी पण मस्तच खेळायला लागली आहे.. तिची एनर्जी खरच मस्त आहे..30शी च्या लोकना दमवते ती. >>>>>>>> अगदी अगदी

काल प्रोमोतलं आरोहचं बोलणं आज दिसलंच नाही की माझं हुकलं? >>> मलापण नाही दिसलं पण समहाऊ त्यावेळी काहीना काही कामं सुरु होती, जेवायचं पण होतं, त्यामुळे मला वाटलं माझं हुकलं असेल. >>>>>>> नाही दाखवल ते. मलापण दिसल नाही. तसच कालच्या टास्कच्या प्रोमोत शिवानी आणि विणा नॉमिनेशनवरुन भाण्डत होते तेही नाही दाखवल एपिसोडमध्ये. विणाने त्यावेळी निळा टॉप घातला होता.

रुपाली नॉमिनेट झाली तेव्हा ती केळकरकडे कशी रागाने बघत होती.

बिचकुले सकाळपासून रात्रीपर्यन्त फक्त खाताना दिसत होता.

जर टॉप सिक्स असेल तर किशोरीताई, केळकर, नेहा, शिव, विणा आणि हिना असायला हवेत. रुपाली, शिवानी, आरोह आणि बिचकुले ह्यानी जाव.

हवा तिथे बरोबर स्टँड़ घ्यायला शिकली स्वताच्या इमेज चा फार विचार न करता >>>> नेमकं ह्यातच मार खातात किशोरीताई, ७/१२ च्या टास्क मधे फुलं कमी आली असं म्हंटल्यावर बिबॉ ने तडी दिली तर लगेच पलटी खाउन मी नव्हतेच म्हणत, विणा म्हणत होती असं रडगाणे सुरू केलं, अरे हिम्मत त तर दाखवा जे म्हटले ते कबूल का होत नाहीत? वर मी कशाला विणा चं ऐकते असं म्हणत होत्या.

केळकर योग्य गेम खेळतोय. शिवानी आल्यावर नेहा माधवने हिनाला खड्यासारखं बाजूला केलं तेव्हा तो हिनाला सपोर्ट करत होता, आताही गेम साठी परफेक्ट किशोरीताईला सेफ करणं. नेहापेक्षा तो योग्य वाटायला लागलाय.

यावेळी रुपालीच जावी...ती सारखी सारखी नॉमिनेट नाही होत. या सगळ्यांत केळ्या मस्त वाटायला लागलाय. त्याचा एकंदर गेमप्लॅन बघता काल शिवनंतर तो वीणाला सेफ न करता किशोरीला करेल अशी जाम खात्री वाटत होती व त्याने केलंही. हा सगळ्यात बेस्ट प्लेअर आहे घरातला. त्या वीणावर शिवानीने केलेलं आरोप प्रकरणही एवढं ताणलं जाणं अर्थहीन होतं. आता खरंच ती खालून उचलून खडे टाकत होती की ती म्हणतेय तशी रांजणातलेच हाताने काढलेले परत रांजणात टाकत होती हे त्या बिबॉ व वीणा-केळ्या शिवाय कुणालाच माहीत नाही. त्यामुळे त्यात काहीही खरं असू शकतं. वर वीणा म्हणे हे तू आधी माझ्याशी बोलायला पाहिजे होतं. का ही ही. वीकेंडला मांज्याने अथवा चुगलीरुपी आलेल्या आरोपांना कधी डायरेक्ट मान्य न करता गोल गोल उत्तरं देवून उडवून लावते.
बिचुकलेच्या हायजीनचे इश्यूज पुन्हा हायलाईट व्हायला सुरुवात झालीच. त्यात तो माणूस टॉयलेट साफ करायला काही तयार होईना अजूनही. यावरुन काल केळ्या व त्याची बाचा-बाची अपेक्षित होती. पण छे, चांगली संधी हुकली.
बाकी कुणीतरी माझ्याकडून आरोहला द्या मतं प्लीज. रुपालीच्या अधीतरी त्याने जावू नये असं वाटतं.

केळ्याचं कसय ना, थिअरी सगळी करेक्ट पण रिझल्ट्स कसा येणार माहित नाहीये कारण तो नॉमिनेटच होत नाही आणि ऑडीयन्सची रिअ‍ॅक्शनच त्याला माहित नाही !
त्याला आणि घरातल्या सगळ्यांना वाटतय कि याला बाहेर खूप सपोर्ट असणार , पण ते अगदीच चूक आहे, केळ्याला सपोर्ट अगदीच कमी आणि टिंगल जास्तं होते त्याची सोशल मिडीयावर .
कसाबसा टॉप ५ मधे जाईल बिबॉने मॅनिप्युलेट केलं तर , पण ज्या दिवशी त्याच्याबरोबर शिव -वीणा -नेहा - शिवानी नॉमिनेट होतील त्यावेळी तो उडणारच .

हो केळ्याची फारच टिंगल होते सोमि वर. मला तो हुषार प्लेयर वाटतो , आवडत नसला तरी. अजिबात नॉमिनेट न होणे, योग्य लोकांची लॉयल्टी वळवून घेणे हे बरोबर जमवलेय त्याने. तरी पण शेवटी तो विनर होणे अवघड आहे. तो चान्स शिव चा सगळ्यात जास्त वाटतो मला.

हो, सध्यातरी तरी मेजॉरिटी सपोर्ट शिवला आहे, मागच्या सिझनला मेघा बद्दल होतं तसं या सिझनच त्यातल्या त्यात एकमत एक निर्विवाद विनर म्हणून शिवला एकट्यालाच आहे.

उद्या शिवची विकेट काढणार त्याची आई, विणाला ताई म्हण Lol असली उर्मट मुलगी नको घरात असं वाटलं असणार, फुल टू सिक्सर.

वीणाला पण सुनावेल गोड शब्दात, माझ्या मुलाचा नाद सोड.

शिव विनर व्ह्यायला हवाय मलाही.

बॉबी मस्त आहे, नचिकेत मस्त बोलला. बाकी बोअर. आज शिवानी छान दिसत होती, तिचे पप्पा highted आहे.

बिचुकले गेम खेळायला लागला हा, जाम काड्या टाकतो. त्या हिनाशी फार फिजिकल होतो, किळस वाटते बघायला.

त्या विणाचे केस किती वाईट, शिवानी कडून कसे कापून घेतात. तिने वाट लावलीय नेहा, वीणाची Lol

शिवानीचे वडील किशोरीला म्हणाले, तुम्हांला लहानपणापासून बघतोय.
त्यांचं वय किशोरीपेक्षा जास्त असायला हवं ना?

Family members येईपर्यंत फक्त बिचुकले दाखवले. बोअरपेक्षापण वाईट. फाफॉ करून पळवलं.

Pages