Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52
बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
विनीसाठी चोरली असेल
विनीसाठी चोरली असेल
सगळेजण चॉकलेटस घेतात आणि कुठे कुठे लपवतात मागे नाही का bb नी शिक्षा दिली तेव्हा लक्षात आलं. अर्थात शिवच्या लपवण्याचं समर्थन नाही करणार.
विग नाही आहे तो... तिने
विग नाही आहे तो... तिने actually तसा हेयर कट केला आहे.. बाकिच्या दिवशी बांधते..म्हणून इतकं कळत नाही >>> मग विकेंड डावाला पण बांधावे तिने. विग असेल नसेल, तिच्याकडे खरोखर बघवत नाही. तिला कोणी सांगत कसं नाही, की वाईट दिसतेय ते बरंच आहे, आपल्याला काय असा attitude आहे इन जनरल आणि तिला आरशात समजत नाही का. हल्ली सारखा आरसा बघते अशी परवा चर्चा होती ना.
चॉकलेट नाही अन्जू शीव ने कॉफ़ी
चॉकलेट नाही अन्जू शीव ने कॉफ़ी ची बाटली लपवली सगळ्यांसाठी आलेली. वीणा साठी च असणार.
कॉफीची बाटली लपवणे प्रकार
कॉफीची बाटली लपवणे प्रकार बरेचदा होतो म्हणे बिबी हाउसमधे

मागच्या वर्षी करणवीरने तर कोणाला सापडु नये म्हणून शुजमधे लपवली होती कॉफी , चोरी पकडली गेल्यावर जस्लीन मेघानी इश्युही केला होता त्याचा .
ऐकायला डिस्गस्टींग वाटतं पण ज्यांना कडक स्ट्राँग कॉफीची सवय आहे आणि अचानक लिमिटेड बजेट मुळे १०० दिवस दुधट कॉफी/नो कॉफी वर दिवस घालवावे लागतात त्यांची चिडचिड अगदीच समजु शकते , त्यामुळे कॉफी लपवणे वगैरे होता है , बिबॉ नाही फार हस्तक्षेप करत
काहि विशिष्ठ लोकांकरता
काहि विशिष्ठ लोकांकरता बिबॉच्या घरांत धुम्रपान आणि रंगित पाण्याचीहि सोय असते, असं कुठेतरी वाचनांत आलेलं. बजेट कपातीत कॉफिवर संक्रांत येण्यापुर्वि हे आयटम्स गायब केले जात असतील का?..
वीणा आणी पराग चे जेंव्हा पटत
वीणा आणी पराग चे जेंव्हा पटत होते तेव्हा ही ते कॉफ़ी ची लपवालपवी करत होते.
रंपाची सोय दिसली नाही (
रंपाची सोय दिसली नाही ( बाप्पा त्याबद्दल कम्प्लेन करताना पाहिल्याचे आठवतंय) पण स्मोकिंग साठी रूम होती की पहिल्या सीझन मधे आणि आताही आहे.
तो बिचुकले आला आणि बोर करायला
तो बिचुकले आला आणि बोर करायला सुरूवात केलीय. नेहा अजूनही माधव माधव करत रडत आहे. आता बघणेबल राहीले नाही.
पहिल्या सिझनमध्ये होती असं
पहिल्या सिझनमध्ये होती असं ऐकल्याचं आठवतंय, खखोबिबॉजा. पण प्रश्न हा आहे कि सिगारेट्स्/रंपा चा सप्लाय बिबॉ कडुन होतो कि बिवायओबि?..
काम मॅडी गेल्याचं वाईट वाटलं
काल मॅडी गेल्याचं वाईट वाटलं पण जाताना त्याने शिवानी ऐवजी नेहाला सेव्ह केलं आणि भारी वाटलं. त्या विवाहमंडळाच्या टास्कमधे वीणा परत डोक्यात गेली..किती तो आमचे हार्ट हे लोकं तोडतात म्हणून खोटे अश्रू. त्या शिवच्या डोळ्यात तिच्याबद्दल दिसतात त्याच्या ५% भावना हिच्या डोळ्यात नाही दिसत कधीच. काल ममांनी पण वीणाला लय्च भारी सुनावलं...अॅटिट्यूड वरुन, नेहमीचंच झालंय तिचं ते तोंड पाडून बसणं.
नेहाला ईतके रडायला काय झाले
नेहाला ईतके रडायला काय झाले त्यामानाने केळकर नाही रडला वैशाली घरातून गेल्यावर.
माधवला बिचुकलेची आठवण यायची
माधवला बिचुकलेची आठवण यायची म्हणून परत गळा काढला.
साखळी उपोषणासारखं भांड्यांवरून साखळी भांबण. शिवानी, नेहा, आरोह मग रूपाली. वि. शिव वीणा शिव वीणा.
वीणाचा चेहरा कसा दिसतोय हे बोलतंय कोण तर शिवानी! धन्य.
अहो दोघींचा इक्वली बेक्कार
अहो दोघींचा इक्वली बेक्कार आहे, माजोरडा चेहरा.
कँप्टन कोण झाल?
कँप्टन कोण झाल?
अभिजीत केळकर वि. आरोह
अभिजीत केळकर वि. आरोह captaincy साठी
त्यात आरोहचं नाव बिग बॉसनी जबरदस्ती घुसवलं.
केळकर आणि शिवानी नॉमिनेशन
केळकर आणि शिवानी नॉमिनेशन मध्ये आले पाहिजेत
पण कँप्टन आजच निवडला जातो ना.
पण कँप्टन आजच निवडला जातो ना.
म्हणजे या वेळेस वोटिंग लाईन्स बंद की काय
तस असेल तर केळकर होऊ देत
पण किशोरी पण छान खेळली होती,ती का नाही?
टॉप टू आणि बॉटम टू सर्वानुमते
टॉप टू आणि बॉटम टू सर्वानुमते निवडायला सांगितले. टॉप साठी फक्त केळकरवर एकमत झालं.
मग बिग बॉसनी सांगितलं हे captaincy साठी होतं. बॉटम टूसाठी आरोहला जास्त मतं होती म्हणून त्याचं नाव बिबॉनी घातलं.
हेच टास्क मध्यरात्रीनंतर झालं.
काहीही करुन ती रुपाली असली
काहीही करुन ती रुपाली असली पाहिजे नॉमिनेशनमधे आणि वोटिंग लाइन्स बंद नसाव्यात.
पण त्या ७-१२ मधे नेहा
पण त्या ७-१२ मधे नेहा शिवानीची टीम जिंकली होती त्याचे काय झाले? ते टास्क कॅप्टनशिपच्या उमेदवारीसाठी नव्हतं का?
बिग्ग बॉस स्वत: घेतलेले गेम
बिग्ग बॉस स्वत: घेतलेले गेम विसरून जातात. ते रूपाली आणी वीणा कैप्टनसि टास्क वेळी पण नोमिनेट झालेल्यांचे काय झाले ?
आता bb नी मस्त गुगली टाकली,
आता bb नी मस्त गुगली टाकली, सगळ्यांना वाटलं बॉटममधले 2 नॉमीनेट होतील. हिनाला चान्स होता तिथे रहायचा, तो तिने घालवला.
शिवानी, नेहा, वीणा तिघींच्या चेहेऱ्यावर 12 वाजलेले असतात. वीणा हसत खेळत असते ते सीन्स दाखवत नाहीत, ते अनसीन अनकट मध्ये असतात. वीणा शिव बरोबर असताना आनंदी असते, आणि केळकर शिव हिना गप्पा मारतात तेव्हा, एरवी अशीच.
पण शिवानी आणि नेहापेक्षा बरीच बरी असते. त्यांचे लुक्स तर कायम खुन्नस देत असतात.
किती वादविवाद, भांडत असतात आणि तेच दाखवतात.
पुढच्या सोमवारी बिचुकले सदस्य होईल, तोपर्यंत गेस्ट असेल.
चॉकलेट नाही अन्जू शीव ने कॉफ़ी ची बाटली लपवली सगळ्यांसाठी आलेली. >>> हो हो कॉफीसाठीच लिहिलं, विनीसाठी चोरली असेल. त्यावरून चॉकलेटस कशी लपवतात हे आठवलं.
ते आपल्याला मिळालेली वस्तू शेअरींग करून खावी खरंतर आणि सगळ्यांसाठी असलेले सर्वांनी घ्यावं. पण इथे सर्व उलटं.
Btw सगळे बिचुकलेच्या अवतीभवती
Btw सगळे बिचुकलेच्या अवतीभवती होते आणि तोही तत्वज्ञान शिकवत होता, जणू एव्हरेस्ट सर करून आलाय. एक महिना जेलात राहून अजून तत्वज्ञानी झाला
BB पण किती हतबल आहे trp साठी, एखाद्या जिंकलेल्या योद्ध्यांच्या थाटात एन्ट्री दिली त्याला, राग.
बिग्ग बॉस स्वत: घेतलेले गेम विसरून जातात. ते रूपाली आणी वीणा कैप्टनसि टास्क वेळी पण नोमिनेट झालेल्यांचे काय झाले ? >>> ते इसरलं bb. रात गयी बात गयी सारखं. आपण बघणारे मूर्ख आहोत, उल्लू स्वत:च होतोय.
पण किशोरी पण छान खेळली होती,ती का नाही? >>> हो पण bb नी डायरेक्ट विचारलं नाही. शेवटचं नाव निवडलं नव्हतं तरी आधी चर्चा करत होते त्यावरून आरोह ला चान्स दिला bb नी. किशोरीताईला काढायचं असेल आता त्यांना. रूपालीला काढा आधी आणि शिवानीला.
बिचुकले परत येणार अशी पेपरात
बिचुकले परत येणार अशी पेपरात बातमी वाचली म्हणून इकडे आलो तर शिवानी परत आली इ. अपडेट समजले. धन्य प्रकार आहे! बरं झालं लवकर बंद केलं बघणं. बिना शिवानीच कलकलाट माझ्या डोक्यात जात होता, शिवानी आली असेल आणि आता बिचुकलेही तर मग कडेलोट.
बिचुकलेला अशी योद्ध्याच्या थाटात एंट्री दिली असेल तर मराठी प्रेक्षकांना कायदा तोडणार्यांचं आकर्षण आहे का वर आलेल्या अतुल ठाकुरांच्या धाग्यावर शिक्का मोर्तबच होईल.
बरं झालं लवकर बंद केलं बघणं.
बरं झालं लवकर बंद केलं बघणं. >>> अगदी बेस्ट केलंत.
बिना शिवानीच कलकलाट माझ्या डोक्यात जात होता, शिवानी आली असेल आणि आता बिचुकलेही तर मग कडेलोट >>>
सही एकदम.
पराग मात्र येणार नाहीये आणि ते बरोबर आहे म्हणा, त्याला दुसरा प्रोजेक्ट मिळाला बहुतेक. त्याने लिहिलेलं वाचलं की अफवांवर विश्वास ठेऊ नका, मी परत कधीच bb मध्ये दिसणार नाही. त्याने जे केलं त्यामुळे त्याला फायनलला पण बोलावतील असं वाटत नाही.
खरंतर शिवानी जिने धमकी दिली bb ना आणि बाहेर जामिनावर सुटलेले बिचुकले, तेही तीन तीन गुन्ह्यांसाठी ह्या दोघांनाही घ्यायला नको होतं.
यावेळी बिचुकले आला शिवाय
यावेळी बिचुकले आला शिवाय फॅमिली व्हिजिट्स सुध्दा प्लॅन्ड असतील तर कदाचित नो एलिमिनेशन विक असेल, केळ्याचं नशीबच फुटकं, तो कॅप्टन झाला कि एलिमिनेशनच कॅन्सल होतं
केळ्याचं नशीबच फुटकं, तो
केळ्याचं नशीबच फुटकं, तो कॅप्टन झाला कि एलिमिनेशनच कॅन्सल होतं >>>
झाला का नक्की केळ्या कॅप्टन. मागे youtubeवर वीणा कॅप्टन झाली असं hungry spirit वर आलेलं पण प्रत्यक्षात रुपाली झालेली.
बिचुकलेचा मुलगा म्हणजे महाराज आला की bb तोफांची सलामीच देतील.
विग नाही आहे तो... तिने
विग नाही आहे तो... तिने actually तसा हेयर कट केला आहे.. बाकिच्या दिवशी बांधते..म्हणून इतकं कळत नाही >हो बरोबर आहे.विग नाहीयेय तो. शिवानी ने केलाय तिचा हेअरकट .तसा व्हिडीओ आहे एक वूट अनसीन अनदेखा मध्ये .तिने वीणा चे पण केस कापून दिलेत .वूट वर जावून
Shivani Turns Hairstylist असं सर्च केलं तर दिसेल तो व्हिडीओ. मला लिंक insert करता येत नाही.
काहिपण हेयर स्टाईल करुन
काहिपण हेयर स्टाईल करुन दिलिये म्हणजे शिवानी ने
.कालचा भाग अक्षरशः 10.15 मिनट मध्ये पळवत बघीतला.. तेच तेच discussion बघायचा वैताग आलाय.. म्हंटल पुढे टास्क बघू काय बरा असेल तर.. तर तो ही पांचट निघाला.. परत परत काय तेच तेच बघणार...ऐक्चुअली सोमवारी nomination task असतो वाटत म्हणून सुधा bottom 2 साठी कोणी तयार नव्हतं होत..डायरेक्ट निर्णय बघीतला मग...आणि.बिचुकले च असं स्वागत जस काही गढ जिंकून आलाय.. आतल्या लोकना माहीत नाही काय झालेलं ते..नेहा ने 2 3 दा विचारल की काय झालं तर उत्तर द्यायच टाळल..अभिजित ला वाटतय की घरचा काही मैटर..त्याने विचारल बाळ बर आहे ना.. त्याला काय माहीत ते बेन घरी गेलच नाही..हे तर सरकारी घरी गेलं होतं
नेहा रडत होती की माधव तुमची फार वाट पहात होता..तर तिला म्हणे की acting करतेस का
फूल कचरा
आरोहला माहीत असेलच बिचुकलेचं.
आरोहला माहीत असेलच बिचुकलेचं.
आरोहने ग्रुप निवडायची वेळ आली तर टॉक्सिक ग्रुपला पसंती दाखवली.
तो नेहा आणि शिवानीचा आधीपासूनचा मित्र आहे . वाइल्ड कार्ड एंट्री निवडताना हा विचार झाला असेलच.
वीणा मला कधीच गुड मॉर्निंग गुड नाइट करत नाही म्हणून तो कुढताना आज दिसणार आहे.
Pages