Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52
बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
यावेळी कोणीच हाऊस मेट
यावेळी कोणीच हाऊस मेट एकमेकांशी जास्त attached नाही दिसत आहेत.. एक टास्क सारख चालल होत भेटिगाठी प्रकरण.. लास्ट सीज़न ला सगळे खूप imotionally attached वाटत होते..atleast दिसत तरी होते..आज नचिकेत आणि bobby चच बघितल.. हीना च्या आईच तर मेरी बेटी को सपोर्ट करो चीच cassate चालू होती..हीनाने केवढ भोकांड पसरल होत..शिवानीच तर बघितलच नाही.. 2 वीक आधी आली तरी रड्गाण..बोर.. सगळ्यात मस्त नचिकेत वाटला..एकदम लाईट केला मूड त्याने घराचा.. नचिकेत्ला भेटायला नेहा पळत आली तेव्हा मला पुर्ण सीज़न मधली बेस्ट नेहा लूक वाइज़ दिसली.. तिच्या पुढच्या शोर्ट हेयरच मस्त पार्टीशन पडल होत परवीन बाबी सारखं..आणि शोर्ट फ्रॉक.कानातले..मस्त दिसत होती..पण नंतर भोकांड पसरल्या वर परत काळे दात दिसले.. :।
शिवानीचे वडील किशोरीला
शिवानीचे वडील किशोरीला म्हणाले, तुम्हांला लहानपणापासून बघतोय. >>> काहीही होतं ते. सेम वयाचे असले तरी कॉलेजात असल्यापासून म्हणायला हवं होतं कारण किशोरीने तसं लवकर काम सुरु केलं.
हीनाची आई फार साधी वाटली, उगाच सगळ्यांना मदत करा हिनाला म्हणत होती. हिनाची मोठी बहीण वाटते.
हीनाच्या आईने नेहा , शिवानीला
हीनाच्या आईने नेहा , शिवानीला ऐकवलं काय काय. रडारडीत काय कळलं नाय. तिला बघून शिवपण टेन्स झाला होता.
पत्र लिहिण्याच्या टास्क मध्ये
पत्र लिहिण्याच्या टास्क मध्ये मंद बिचुकले काहिही लिहित होता.. pause करुन बघीतलं.. लिहिल होत की इथे येताना अहम महाराजांना डिज़ाइनर कपडे घालून आणा.. बाकी काही वाचता आल नाही घाणेरड्या अक्षरामूळे ..कोणाच काय तर कोणाच काय.. अरे सगळ्याना कळल होत की घरचे येणार आहेत जरी बिग बॉस ने नाही सांगितल तरी.. पण कोन अस सगळ खर सांगत बसत नाही..आणि ते पण पत्रातून.. बिचुकले ला मे बी भावनिक पत्र लिहायच असत ते कळत नसेल
आज पालकसभेत कोणाकोणाचे पालक
आज पालकसभेत कोणाकोणाचे पालक आले होते >>> शिवानी, हीनाचे. नेहाचा नवरा आणि किशोरीताईचा मुलगा.
आजचा भाग आवडला...
आजचा भाग आवडला...


पण हिनाने फुटेज खाणं (आजपण) सोडलं नाही , शिवानीचे बाबा आले होते तेव्हा किती रडली...
नचिकेत आवडला मला, चांगलं बोलला सगळ्यांशी
Btw Vootवर download केलेले videos फक्त6 दिवस दिसतात, तेपण सलग नेट असेल तर
असं का ? जुने एपिसोड राहिले होते म्हणून मी download करून ठेवले होते तर सगळे उडाले यार ...
शिवची आई वीणाला म्हणतेय ,
शिवची आई वीणाला म्हणतेय , राखी पौर्णिमा जवळ येतेय.
पण हे उद्या दाखवतात का पाहू.>>हे भारीये..
बिचुकले जेल मध्ये जाऊन आला
बिचुकले जेल मध्ये जाऊन आला तरी फुशारक्या मारणे सोडले नाही.
शिवानि चे वय 22आहे .सो तिच्या बाबां चे वय किशोरी ताईंच्या आसपास असेल.
खरतर या लोकांची जेव्हा कचाकचा
खरतर या लोकांची जेव्हा कचाकचा भांडण चालू असतात ना तेव्हा या सगळ्या आयांना पाठवायच.
शिवची आई वीणाला म्हणतेय ,
शिवची आई वीणाला म्हणतेय , राखी पौर्णिमा जवळ येतेय. >>>
हो का, हे नाही ऐकलं मी. हे शिव वीणा scripted असेल आणि आता bb ना बास वाटलं असेल तर बांधायला सांगतीलही राखी विनीला शिवच्या हातावर.
सपोर्ट पण खूप आहे हा शिव वीणा लवस्टोरीला आणि haters पण खूप आहेत. दोघांचे अनेक व्हिडीओज काढलेत.
.सो तिच्या बाबां चे वय किशोरी
.सो तिच्या बाबां चे वय किशोरी ताईंच्या आसपास असेल. >>> तेच ना. तरी ते तुम्हाला मी लहानपणापासून बघतोय म्हणाले, किशोरीताई child artist होती का, असा मला प्रश्न पडलाय.
नेहाचं रडणे समजू शकतो एकवेळ
नेहाचं रडणे समजू शकतो एकवेळ पण शिवानी पंधरा दिवसांपूर्वी घरात आली ना. मध्ये एक महिना family त राहून आली तरी किती नाटक. बाबा कुल होते पण अल्बम वगैरे मध्ये घरी बघितला नाही का, कोणाला भेटली नाही का.
नचिकेतने किशोरीताईंना त्रास देऊ नकोस taskमध्ये सांगितलं नेहाला, ती खूप देते. Respect नचिकेत. असं काही शिवानीला मात्र तिच्या पप्पानी सांगितलेलं दाखवलं नाही.
नचिकेतने शिव नेहाला tom आणि jerry म्हणतात असं सांगितलं. म्हणतात का, मी नाही वाचलं fb वर. नचिकेतने नेहा आणि वीणाचं नातं कसं छान आहे task पलीकडे जाऊन तेही वीणाला सांगितलं.
आत गेल्या वर कोणत्या
आत गेल्या वर कोणत्या मुद्द्यांवर बोलायचे हे सांगत असतिल बीबी नातेवाईकांना .
शिवानि आता च तर सगळ्याना भेटून आली.
लास्ट टाईम अस्ताद च्या बाबांनी पकवले होते खुप.
आत गेल्या वर कोणत्या
आत गेल्या वर कोणत्या मुद्द्यांवर बोलायचे हे सांगत असतिल बीबी नातेवाईकांना . >>> हो ना म्हणून मला शिव वीणाला बहिण भाऊ करायचं आहे की काय bb ना असं वाटायला लागलं
अरे नको नको असं अजिबात नको.
हीना सगळीकडे फुटेज घ्यायला
हीना सगळीकडे फुटेज घ्यायला जाते, आज वीणाशी जाम वाद घालायचा होता तिला. वीणाने सुमडीत केळकरला मध्ये आणून स्वत: बाजूला झाली. केळकरने as a कॅप्टन हिनालाच सुनावलं. वीणाने स्मार्टली handle केलं ते. बाकी कोणी असते तर माधवने केलं तसं डाव वीणावर उलटवला असता पण इथे केळकर होताना, अर्थात तो बरोबर बोलला. हीना अति करत होती.
हिनाच्या आईने हिनालाही जरा समजावून सांगायला हवं होतं. कटकट आणि कधी कधी चीप खेळते task मध्ये म्हणून.
नेहाच्या नवऱ्याने शिवला
नेहाच्या नवऱ्याने शिवला चांगले मुद्दाम म्हणाले, इथे सगळ्यांना शिव फक्त टास्क ची शिडी म्हणून हवा आहे.
अ,केळकरने स्मार्ट मुव्ह
अ,केळकरने स्मार्ट मुव्ह म्ह्णून वीणा ऐवजी किशोरीला सेफ केलं असं मला वाटत नाही. सगळ्यांनी केळकर आणि नेहाला सेफ करण्यासाठी पटवून द्यायचं होतं. तोवर वीणा त्याच्याकडे आलीच नव्हती. ती आली तेव्हा टास्क संपल्याचा बझर वाजला. टास्क चालू राहिला असता , तर त्याने वीणाला सेफ केलंही असतं.
नेहानेही काल शिवानी आणि आरोहला आपण सेफ करायला पुढला नंबर वीणाचा लावला असता, असं सांगितलं. तेव्हा शिवानी के हाथ के तोते उड गए थे |
फॅमिली वीक अनाउन्स झाल्यापासूनच नेहाने मुसमुसायला सुरुवात केली.
बिग बॉसकडची कल्पकता अगदीच आटलीय. बिचुकलेच्या एंट्रीच्या आधी त्याचं सामान पॅक करून ठेवायला सांगितलं.
फॅमिली वीकमध्ये यंदा फॅमिली मेंबर्सना आणायला जमलं नाही म्हणून सांगितलं. पोरकटपणा.
नेहानेही काल शिवानी आणि
नेहानेही काल शिवानी आणि आरोहला आपण सेफ करायला पुढला नंबर वीणाचा लावला असता, असं सांगितलं. तेव्हा शिवानी के हाथ के तोते उड गए थे | >>> आधी हीना मग वीणा म्हणाली ना ती. म्हणजे असं वीणाला सांगताना ऐकलं. शिवानीशी बोलताना जरा उशिरा बघितलं, तेव्हा नेहा काय सांगत होती ते समजलं नाही पण शेवटी शिवानीने तिच्याकडून हिनाला तीव्र विरोध असेल असं काहीतरी दर्शवले.
मला वाटतं केळकरला लक्षात आलंय कि ताई राहून माधव गेला म्हणजे बाहेर सपोर्ट आहे, आणि आता त्यांचा सपोर्ट आपल्याला पुढे मिळेल हा उद्देश किंवा किशोरीताई सतत सांगत होती रेटून आणि बझर वाजला त्यामुळे असेल.
तो बिचुकले जाम chapter आहे.
तो बिचुकले जाम chapter आहे. काल आरोहला किती नावं ठेवत होता पाठीमागे आणि आरोहच्या समोर कित्ती कौतुक करत होता. शिव, वीणा, केळकरला जाम नावं ठेवत होता. शिवचा मेंदू गुडघ्यात आहे म्हणाला. शिव जिंकायला हवा नेहा शिवानी केळकरपेक्षा. मग कळेल मेंदू कुठे. वीणा तर नाही जाणार एवढी पुढे असं वाटतं.
खरंतर एथिकली शिवानीला फायनलला नेता कामा नये आणि बिचुकलेलाही. अर्थात bb ना एथिक्स कुठे आहेत म्हणा. वीणा खरंतर शिवानीच्या पुढे हवी जायला.
माझी पहिली दोन मिनिटं हुकली.
माझी पहिली दोन मिनिटं हुकली. मी फक्त नेहा-शिवानी-आरोह संभाषण पाहिलं.
हो ना म्हणून मला शिव वीणाला
हो ना म्हणून मला शिव वीणाला बहिण भाऊ करायचं आहे की काय bb ना असं वाटायला लागलं>>>असं काही नाही करणार हो... फक्त गम्मत आहे ती..
Btw Vootवर download केलेले
Btw Vootवर download केलेले videos फक्त6 दिवस दिसतात, तेपण सलग नेट असेल तर Sad
असं का ? जुने एपिसोड राहिले होते म्हणून मी download करून ठेवले होते तर सगळे उडाले यार ...>>>मीनाक्षी voot वर bigg boss च्या page वर सगळ्यात खाली all episodes आणि All Shorts नावाचे दोन parts आहेत त्यात सगळे episodes आणि all shorts मध्ये सगळे unseen undekha दिसतात
हो मोक्षू, मी तेच video
हो मोक्षू, मी तेच video download केले होते, प्रवासात पाहायला.
कारण नेट सुरू करून पाहिले तर फार जाहिराती येतात आणि कधी नेटवर्क चा पण issue असतो. पण काल पाहिलं तर फक्त परवाचा एक unseen चा विडिओ दिसत होता, बाकीचे उडाले होते.
मलाही नचिकेत जाम आवडला !
मलाही नचिकेत जाम आवडला !
काय सुरेख भाषा, उच्चार , हसरा चेहरा, ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर आणि किती मस्तं एखाद्या बी.एफ.एफ सारखा बोलत होता नेहाशी , टु गुड, लकी गर्ल नेहा
बाकी नेहा लिहितेही खरच सुंदर, तिचं आणि चक्क शिवानीचही बबांना पत्रं छान शुध्द सुंदर मराठीत लिहिली होती, मागच्या सिझनला आस्ताद सोडून एकालाही शुध्द मराठीत ४ ओळीही लिहायला जमल्या नव्हत्या .
आज हिनाने फारच मेलोड्रामा केला, शिवानीने मात्र आज हिनाच्या आईने तिच्यासमोर हात जोडल्यावर स्टॅचु टास्क सोडून मिठी मारली आणि बर्याच हेटर्सच्या मनातली हेट्रेड थोडी कमी केली.
हो नेहाने छान लिहिलं होतं
हो नेहाने छान लिहिलं होतं पत्र.. मला पण खुप आवडलं... नचिकेत खरंच मस्त वाटला... Fb वर तर कोणीतरी पोस्ट केलंय की 'bigg boss, नचिकेतला घरात राहू द्या आणि नेहाला घेऊन जा' jokes apart, अवघ्या 10 मिनिटात नचिकेतने सगळ्यांच्या मनात स्थान निर्माण केलं... Great.. शिवानीने बाबा खूपच साधे वाटले.. ती तिच्या आईसारखी असेल... आणि हा विचार केल्यावर तिच्या बाबांची दया आली.. कसे handle करत असतील बिचारे बायकोला अन् अशा विचित्र मुलीला.. बाकी बॉबी किशोरी ताईं सारखा आणि हीनाची आई हीना सारखीच वाटली...
बिचुकले गेम खेळायला लागला हा,
बिचुकले गेम खेळायला लागला हा, जाम काड्या टाकतो. त्या हिनाशी फार फिजिकल होतो, किळस वाटते बघायला.
अगदी अगदी...अन्जू तुम्ही मला जे वाटले तेच लिहीले आहे. तो तसा प्रत्येकाशी फिजिकल व्हायला बघतो. विणाने मस्त पैकी त्याला दुर ठेवले आहे.
बिचुकले पहिल्या दिवशी
बिचुकले पहिल्या दिवशी ढेपाळल्यासारखा होता पण आता काल पासुन गेम खेळायला सुरुवात केली. संदेसे आते है हमे तडपाते है या बौर्डर मधल्या गाण्या वरून सगळ्यानी ओळखले फैमिली वीक आहे ते.
तिला काय माहिती की बाहेर ते कुठल्या गडबडीत होते.
बिचुकले हीना ला सांगत होते मला पण बायको मुला ला भेटायचे आहे . तेंव्हा तिला आश्चर्य वाटले. ती बोलली की भेटून आलात ना
तिला काय माहिती की बाहेर ते
तिला काय माहिती की बाहेर ते कुठल्या गडबडीत होते. >>> बायको तरी भेटली असेलच त्याला. काल तो हिनाला सगळं सांगतोय की काय वाटायला लागलं होतं.
शिवची.बहीण पण आली आहे,झापल
शिवची.बहीण पण आली आहे,झापल आहे शिवला.
शिवची.बहीण पण आली आहे,झापल
शिवची.बहीण पण आली आहे,झापल आहे शिवला>>हो, बरोबर वाटलं तिचं,isolated राहू नकोस असं म्हणाली ती.. शिव सुरुवातीला खरंच सगळ्यांमध्ये मिसळायचा.. पण वीणा कोणासोबतच mix होत नाही....त्यामुळे तो सुद्धा isolated वाटतो... वीणा आणि शिव जेवायला सुद्धा सगळ्यांसोबत बसत नाहीत... शिव मध्ये जबरदस्त winning qualities आहेत पण सध्या केळकर आणि किशोरी जिंकण्यासाठी जास्त योग्य वाटत आहेत...पण अजूनही वेळ गेली नाहिये.. शिवने सुधारणा केली तर रिजल्ट may be different..
Pages