बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बिचुकले ला कशासाठी आणतायत परत कळत नाही. आता खेळ खूप पुढे गेलाय. घरातल्या कुठल्याच इक्वेशन्स मधे तो बसत नाही आता. ना आता त्याला ते सुरुवातीचे साधा अनपॉलिश्ड माणूस असल्याचे अ‍ॅडव्हांटेज! नुस्ताच न्यूसन्स होणार त्याचा. आणि मग काहीतरी वादग्रस्त होऊन एलिमिनेट करावे लागणार. अनलेस- तेच हवंय चॅनल ला?
<
अर्थत !
बिचुकले येणार आणि माधवची जागा घेणार, माधव गेल्यामुळे शिवानीला भक्कम मित्रं हवाच आहे, त्याहून दंगेखोर सपोर्टर मिळणार, मग दंगा धोपा नुसता , गेम पुन्हा बॅक टु पहिला आठवडा Happy
त्यातून फॅमिलीविक असेल तर रुपालीची येऊन बिचुकल्याला (सध्या तरी शब्दांनी )झोडपणार, यामुळे शो ची चर्चा आणि राडा !
बिगबॉस बरा चान्स सोडेल हे एन्कॅश करणे !
अजुन तडका हवा असेल तर त्याची एंट्री हुकुमशाह म्हणून करा , त्याहून एक्स्ट्रॉ तडका हवा असेल तर मेघाला गेस्ट म्हणून आणा एखाद्या टास्कसाठी, मेघा हेट्स हिम, म्हणजे अजुन राडा ! Proud

सुजा, किशोरीताई नेहा हिना सेफ दाखवतील आणि वीणा माधव danger zone मध्ये. तू म्हणतेस तसं दाखवलं तर जास्त मजा येईल. वीणा, नेहा, माधव danger zone मध्ये.

वीणा बोलण्यात चुकली ना काल फुलांवरून म्हणून votes असले तरी हिसका दाखवणार.

नेहाचा तो विगच आहे. रूपाली त्याला इस्त्री करत होती. . >>> मला वाटलंच मागे.

मला रूपालीला सॉलिड झापलं त्याची मजा वाटली मात्र. जे strong तिथे चिकटते जाऊन. गेलीच असती यावेळी nominate असती तर. पण सॉलिड लकी आहे.

ती नेहा नक्की काय म्हणाली, मी तरी ऐकलं की तिचे वडील गेले तेव्हा तिला एवढं वाईट नाही वाटलं जेवढे तिला माधव शिवानी बोलले तेव्हा वाटलं. हे कसं काय, एखादा गेम शो स्वतःच्या वडिलांच्या जाण्यापेक्षा जास्त असतो का. नंतर तिने म मां समोर फार गोल गोल उत्तर दिलं, तेही मला नीट नाही समजलं.

अनसीन अनदेखामध्ये शिव वीणा माधव आरोह आणि केळकर यांच्या गप्पा छान रंगलेल्या. लालबाग गणपती आणि तिथली लाईन, अनुभव. वीणाने पाणी सांडले तो task कसा केला त्याची acting शिव करत होता ते. कुठेही तिथे जाणवत नव्हतं की माधव आणि वीणामध्ये दुष्मनी आहे किंवा एकमेकांना आवडत नाहीत ते. मस्त वाटलं बघून.

ऋतुजाचं खूप कौतुक करत होते, मागच्या सीझनची आठवण काढून हे सर्वजण.

माघव गेला असेल तर त्याचं जाणं नेहासाठी इष्टापत्ती ठरेल.

पंचिंग बॅगच्या वेळी तो म्हणाला की तो नेहाला पहिल्यापासून सुधारायला सांगत आलाय. म्हणजे तुसडेपणा, उद्धटपणा, उद्दामपणा, आवाजाची पातळी आणि पोत, चेहर्‍यावरचे मारक्या म्हशीसारखे भाव...इ. ते आधी कधी दाखवलं नव्हतं. पण आता सारखं दाखवताहेत.
त्याला कोणालाही नीट समजवता येत नाही, हे उघड आहे. त्यावेळचा त्याचा आवाज, एक्स्प्रेशन्स हे समजवणारे न वाटता भांडणारे वाटतात.
त्यात आता शिवानीची भर पडली. माधव तिला हे इतर हाउसमेट्सना आवडत नाही, प्रेक्षकांना आवडत नाही, असं सांगत होता. पण शिवानी तर हे मलाच आवडत नाही, असं सांगत होती. (याची तुलना शिवानी डिस्टर्ब् ड असताना नेहाने तिला ज्या प्रकारे सम जून घेतलं होतं त्याच्याशी नक्कीच होईल). आपल्या इतक्या जव ळच्या मैत्रिणीबद्दल ही "मला टारगेट केलं जातंय, असा शो ऑफ गेमचा पार्ट म्हणून करतेय" असं म्हणणं हे नक्कीच खूप मोठं स्टेटमेंट आहे.
[दुसर्‍या बाजूने शिवानी नेहाला चांगलंच ओळखून आहे, त्यामुळे ती असं म्हणून शकत असेल का?)
माधव - शिवानीऐवजी अभिजीत केळकर आणि वैशाली असते तर त्यांनी नेहाला अधिक चांगल्या प्रकारे हँडल केलं असतं असं वाटतं.

आता नेहाचा स्वभावच तसा असेल, तर लोकांना आवडत नाही म्हणून बिग बॉसपुरता तो बदलण्यात काहीच अर्थ नाही.
तिच्या डोळ्यांत चटकन पाणी येतं हे अनेकदा दिसलंय. शाळेच्या टास्कमध्ये वैशाली आणि सुरेखांची कहाणी ऐकून ती इ मोशनल झाली होती आणि तिने ते एक्स्प्रेसही केलं होतं. त्यामुळे तुझ्या भावना तू दडपून ठेव, असं तिला सांगण्यात अर्थ नाही. हे जवळचे मित्र असून माधव शिवानी यांना कळत नाही. माधवची तेवढी समज नाही. शिवानीला गेम मैत्री पेक्षा अधिक महत्त्वाचा आहे.

नेहा ,माधव,शिवानीच्या भांडणाच नेमक कारणच अळत नव्हत,तरी त्यावर केवढातरी वेळ घालवणार
हा आठवडा फँमिली वीक आहे,अस म्हणतात
नंतर कधीतरी एखाद्या आठवड्यात कलर्सवरच्या सिरियलमधल्या कलाकारांना आणतील,जस मागच्या वेळी राधा,घाडगे,आणि आणखी एका सिरियलमधले कलाकार आले होते
आता या सगळ्यात बिचुकलेंची काय गरज आहे?

मध्यंतरी एक न्यूज वाचली होती की विजेता नावाच्यया सिनेमात माधवही आहे,त्याच शूटिंग ऑगस्टमध्ये सुरू होत आहे,तेव्हा माधव बिबॉसच्या घरात होता,तेव्हा मला वाटल की कदाचित सिनेमा सोडला असेल,पण आता तो खरतर चांगला खेळायला लागल्यावर बाहेर जात आहे,म्हणजे हे ठरलेल नसेल ना?
वैशालीच जाण ही मला संशयास्पद वाटत आहे,कारण हा त्यांच्या कॉन्सर्टट्सचा सिझन असतो,त्यांचे कार्यक्रम ठरत असावेत,त्यामुळे मुलीच कारण देऊन बाहेर पडली.
याआधीही इथे कोणीतरी हे लिहिल होत की यांच्या वास्तव्याचा काळही ठरलेला असावा,तेव्हा पटल नव्हत पण आता खरच अस वाटत आहे
तसच एकि अनसीनमध्ये वैशालीला तिच्या सारेगमप हिंदी फिनँलेबद्दल विचारल असता ती म्हणाली की वोटिंग लाईन्स बंद झाल्या की दुसर्या दिवशी दुपारपर्यंत आम्हहा फायनलीस्टना रिझल्ट कळलेला असतो.
म्हणजे इथेसुध्दा विकएन्डच्या डावाच्या वेळी यांनाही रिझल्ट कळलेला असतो का?

त्यांचा जाण्याचा काळ ठरलेला असतो त्यातून एखाद्याने प्रकृतीच्या कारणाने कटकट केली आणि बाहेर जाण्याकरता रिक्वेस्ट केली तर पण काढलं जात . मागच्या सीझनच्या थत्ते यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं कि मी प्रकृतीच्या करणारे इतका बेजार होतॊ ( त्यांना तीव्र डायबेटीस आहे ) कि मी बिग बॉस बोस ना रिक्वेस्ट केली कि मला ताबडतोब बाहेर काढा . आणि त्यांनी रिक्वेस्ट ऐकली . त्यांच्या बाबतीत नाहीतर त्यांना काढणारच होते किव्वा काढायलाच पाहिजे होत तसच इतरांचं पण असावं .

आय गिव्हप ऑन धिस सिझन, काही केल्या काहीच करमणुक नाही, कालचा लग्नाचा फालतु टास्क, वीणाचा इमोशनल होण्याचा खोटा ड्रामा अत्यंतंपकाऊ, मी फॉरवर्ड केला , आजही कित्ती तो वेळ नेहा आणि तिच्या बिहेवियर इश्युज वर घालवला, आधी त्या अनॉयिंग त्रिकुट् (शिवानी माधव नेहा) संवाद , मग मांजरेकरने तोच टॉपिक कित्ती वेळ रेटला, मी फॉरवर्ड करतेय तरी संपतच नव्हतं Uhoh
एक तर नेहाला ना ऐकवत ना बघवत, कंटाळा आलाय सगळ्याच हाइप्ड काँटेस्ट्न्ट्सचा.
माला हिना, केळ्या, आरोह, किशोरी आणि शिव त्यातल्या त्यात प्लेझन्ट वाटतात, हेच आवडतील टॉप ५ मधे पण अर्थातच तसे होणार नाही.
वीणा- शिवानी -नेहा या अनॉयिंग बायकांना टाकणारच फिनालेत !

नक्की काय फरक आहे? शब्दकोशात ढोपरचा अर्थ गुडघा असाच आहे.>>>हो खरंच?? माझ्या माहितीनुसार गुडघे म्हणजे टोंगळे (knee) आणि ढोपर म्हणजे हात वरच्या बाजूला दुमडल्यावर दिसणारा हाताचा खालचा भाग..

माधवला votes द्या म्हणून आस्ताद काळे, शरद केळकर आणि काही हिंदी कलाकार यांनी अपील केलेलं. तो पूर्वी हिंदी सिरीयलमधेही होताना. किशोरीताईना votes द्या हे निवेदिता जोशी आणि अनेक सामान्य माणसांनी केलेलं. सामान्य माणसांची ताकद भारी पडली असेल. अर्थात शेवटी channelवर पण असते म्हणा.

काही जण असतील मिनिमम वीक्स ची गॅरंटी घेऊन आलेले. पण ते डील सगऴ्यांनाच नाही ऑफर करत. अर्थात एलिमिनेट झालेले स्पर्धक मी मुद्दामच बाहेर पडले/लो असे म्हणतील यात नवल नाही.
माधव गेल्यावर आता नेहा- शिवानीमधले डायनॅमिक्स बदलतील का, आता त्यांच्यात समेट करायला कोणी नाही असे वाटेलही पण त्या दोघींचेही फार कुणाशी पटत नाही त्यामुळे एकमेकीशिवाय ऑप्शन उरणार नाही असेही होऊ शकते Happy
रविवारचे फालतू गेम्स, फुसक्या चुगल्या, गुन्हेगार नावाखाली एखाद्याला जास्त फूटेज देणे हे महा कंटाळवणे आणि प्रेडिक्टेबल होत आहे. मी ही हल्ली फा. फॉ करूनच पहात होते पण आता बहुतेक अधून मधून बघेन एखादा एपिसोड, रोज सक्तीने कंटाळा येण्यापेक्षा.

मी पण आज starting आणि शेवट बघेन. टीव्ही सुरु असेल पण ते गेम्स, हे ते बोअर होतं.

नेहा शिवानी रुपाली त्रिकुट फार निगेटिव्ह वाटायला लागलं आहे. याउलट केळकर, शिव, वीणा, हीना छान वाटतात. माधव त्यांच्यात असला की छान गप्पा मारतो. शिव त्या दुसऱ्या grp मध्ये असला कि फार निगेटिव्ह वागतो त्याचं ऐकून. जसं रुपालीने काडी टाकली आणि वर माधवने प्रोत्साहन दिलं तेव्हा केलं ते.

सगळ्यात आता किशोरीताई आवडायला लागलीय जास्त. यावेळी votes दिली नाहीत तिला. पुढच्यावेळी देईन.

किशोरीताईने रूपालीला सुनावलं ते मात्र बघायचं आहे, प्रोमो मस्त आहे पण काट छाट करता कामा नये.

ढोपर म्हणजे हात वरच्या बाजूला दुमडल्यावर दिसणारा हाताचा खालचा भाग..>> त्याला कोपर म्हणतात . गुढगा आणि ढोपर एकच आहे . बरोबर आहे मांजरेकर च Happy

मामांच वाक्य दाखवतात ad मधे विणाला म्हणताएत कि मी डायरेक्टर आहे मला attitude दाखवलेला आवडत नाही. मग शिवानी काय कमी attitude दाखवते?

वीणाचं खरंच डोकं दुखत होतं बहुतेक, ती attitude दाखवते कधीतरी पण आत्ता दाखवत नव्हती, तिला उगाच बोलले म मां.

आता शिव हिना नाचत होते बघून दुखत असेल तर माहिती नाही, पण डोकं दुखत असेल तर सुचत नाही काही.

कित्ती बोअर एपिसोड, मी येता जाता बघितला. शिवानीला डोक्यावर चढवायचे आहे ठरवलं आहे तर तिचा attitude कसा दिसणार म मां ना.

शिवानीला बक्षीस असेल, वीणा ला सुनावलं म्हणून, ती एरवी पण अशीच बोलते हाच attitude.

खरंतर किशोरीताई मस्त बोलल्या रुपालीला, त्या ग्रेसफुल आहेत तर काय करणार, त्यांना घा पा बोलता येत नाही कोणाला.

किती सज्जन, गोड, संत ताईंना आणलेलं शिवानीवर आरोप करायला Lol .

खरंच वीणाच डोकं दुखत असेल असं वाटलं तर जबरदस्ती आहे का तिने हसून दाखवाव आणि यावं नि त्याव . फारच मांजरेकर बोलले तिला . अटीट्युड दाखवते आणि असं तस. त्यांच्या त्या बोलण्याने पण राग यायचा एखाद्याला सारखं काय अटीट्युड दाखवते म्हणतात म्हणून . पण राग आलेला पण दाखवता येत नाही . तोंड दाबून बुक्क्याचा मार Happy

वीणाला ममां म्हणाले"i cant grant u yr wish"तुला या आठवड्यात तरी कोणी घरातून काढू शकत नाही.म्हणजे बाई शिवानीसारख्या मला जाऊ द्या ना घरी मोड वर गेल्या आहेत किऔवा फँमिली वीक आहे हे अगोदरच कळल असाव.

Pages