बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

काहिपण हेयर स्टाईल करुन दिलिये म्हणजे शिवानी ने >>> मुद्दाम केलं असेल, तिचं इंप्रेशन पडू नये म्हणून.

तिने वीणा चे पण केस कापून दिलेत >>> तेपण विचित्रच दिसतायेत पण नेहाचे अतिच.

त्याला काय माहीत ते बेन घरी गेलच नाही..हे तर सरकारी घरी गेलं होतं >>> Lol

नेहा रडत होती की माधव तुमची फार वाट पहात होता..तर तिला म्हणे की acting करतेस का Lol फूल कचरा >>> Lol

तुरु लय भारी पोस्ट.

वीणा मला कधीच गुड मॉर्निंग गुड नाइट करत नाही म्हणून तो कुढताना आज दिसणार आहे. >>> हो आता त्या grpची target वीणा आहे फुल टू.

शिव हल्ली जाम angry young man झालाय. आरोह तर त्याला जराही आवडत नाही. नेहा काल मधेच बोलली भांडी घासण्यावरून तर तिच्याशी वाद घातला. अर्थात नेहाचं चुकलं होतं. सर्वांनी किती issue केला भांडी घासण्याचा, task चा call होता बहुतेक. त्यामुळे शिव वीणाचं बरोबर होतं आणि ते दहा वेळा आम्ही करू रात्री नाहीतर सकाळी म्हणत होते आणि नंतर रात्रीच कितीही वाजुदेत करू तरी शिवानी, नेहा चं सुरु नंतर रुपाली पण बडबडली.

वीणा मला कधीच गुड मॉर्निंग गुड नाइट करत नाही म्हणून तो कुढताना आज दिसणार आहे. >>> हो आता त्या grpची target वीणा आहे फुल टू........शिव कुढणार आहे?कशाला,सारखे एकत्र तर असतात.

शिव कुढणार आहे?कशाला,सारखे एकत्र तर असतात. >>> शिव नाही आरोह. आरोह म्हणत होता की वीणा त्याला gm, gn करत नाही Lol सगळे त्या grpचे वीणाविरोधात बोलत होते.

बिचुकलेला अशी योद्ध्याच्या थाटात एंट्री दिली असेल तर मराठी प्रेक्षकांना कायदा तोडणार्‍यांचं आकर्षण आहे का वर आलेल्या अतुल ठाकुरांच्या धाग्यावर शिक्का मोर्तबच होईल.>> अगदी अगदी

खर तर अश्या व्यक्तीचा बोजा-बिस्तरा कधीच घराच्या बाहेर फेकुन द्यायला हवा होता.. बि बॉ बघणारी हि आताची मंडळी काय मेसेज घेणार? आपण काहि केलं तरी समाज आपल्याला तितकीच मान्यता देणार .. जे चांगले आहेत त्यांच्याबरोबर? हे काहि योग्य नाहि.
शिव काल खुपच दादागिरी करत होता.. मला तो कधीच आवडला नाहि..
केळ्याच जाईल बि बॉ ट्रॉफी घेऊन यंदा असं वाटतय... मस्त शांत राहुन गेम खेळतोय.. घरातल्या लोकांनाहि आता तोच विनर वाटु लागला आहे.. म्हणजे जो तो १ नंबर वर जाऊन सर्वप्रथम उभा राहिला होता ते बरोबर होतय तर! Happy

मला तर शिवने शिवानी, नेहा, आरोह तिघांची अकारण बडबड एकट्याने डोकं शांत ठेवून फक्त त्यांच्या आवाजाला आवाजाने उत्तर देऊन थांबवली , ते आवडलं. नेहा तिच्या रेकण्याच्या सुरात एकच वाक्य परत परत म्हणत होती आणि शिव त्याच्या सॉफ्ट आवाजात तिला एकच उत्तर परत परत देत होता , ते धमाल होतं. गेल्या आठवड्यात आरोहवर चिडला त्या व्यतिरिक्त क्वचितच त्याला तोल गेलाय.

वीणाचा मात्र आवाज चढला. तिने कूल राहायला शिव कडून शिकून घ्यायला हवं.
टास्क संपल्यावर आपलं आधीचं ओरडणं फुकट होतं हे लक्षात येऊनही नेहा पुन्हा शिवशी वाद घालायला आली. वर आधी भांडी घास, म ग बोलू , हे गिरे तो भी टांग उपर टाइप फिनिशिंग.
तिच्या स्ट्राँग स्टान्सला तितकंच खणखणीत उत्तर मिळाल्याचा व तिला गप्प केलं गेल्याचा हा किमान दुसरा प्रसंग. आधी सातबारात ती किशोरीला हळू बोला म्हणाली तो.

तिने वीणा चे पण केस कापून दिलेत >>> रिअली? तरीच विणाचे केस मला नेहासारखे वाटत होते.

नेहा साधा पोनीटेल, जीन्स, टि- शर्ट ह्यात बरी वाटते.

मला तर शिवने शिवानी, नेहा, आरोह तिघांची अकारण बडबड एकट्याने डोकं शांत ठेवून फक्त त्यांच्या आवाजाला आवाजाने उत्तर देऊन थांबवली , ते आवडलं. >>>>>>>>> +++++++++११११११११११
विणाच शनिवारी डोक दुखत होत ते खर होत. शिवला सगळेजण विक बोलतात ह्याचा राग आला होता तिला.

बिचकुले काल जरा शान्त दिसत होता.

शिव विणा काल जरा जास्तच फिजिकल झाले होते. आणि ते सारख सारख काय एकमेकान्ना जेवण भरवण?

शिवानी ' विणा सतत तोण्ड पाडून असते' म्हणते. आधी तिच्या प्रिय मैत्रिणीकडे बघ म्हणाव.

टॉप बॉटमच्या टास्कमध्ये हिना शिवानीबद्दल जे काही बोलली ते परफेक्ट होत.

केळकर जर कॅप्टन झाला ह्यावेळी तर हि त्याची तिसरी वेळ असेल कॅप्टन होण्याची.

त्याला काय माहीत ते बेन घरी गेलच नाही..हे तर सरकारी घरी गेलं होतं >>> Rofl

चिन्ग शेजवान चटणीच्या पॅकेटवर रणवीर सिन्गचा फोटो होता, मला तो बिचकुलेचा वाटला आधी. Lol

काल वीणा आरोह ला बोलत होती की येथे आतपर्यंत कोणीच कुठला टास्क सोडला नाही आहे. पण शीव ने खुन्या चा टास्क सोडून दिला होता. वीणा चा खून करायचा म्हणून.

काल नेहाने अतीच केली रडारड, शुक्रवार पासून रडारडीच चालू होती तिची.
शीव प्रेमात पार आंधळा झालाय काल टॉप 2मध्ये वीणा आणी अभीजित चे नाव घेतले स्वत: चे नाही.>>> अगदी अगदी...त्या नौटंकी वीणाने बरोब्बर त्याचं माकड केलंय. तो almost सईड्या झालाय. मागच्या वीकमधील सगळी स्तुती व्यर्थ ठरवली त्याने. आता टास्क कसा करतो बघू.
बाकी बिचुकलेला आणून काय साध्य केलंय बिबॉ ने हे तेच जाणे. बघू राडे होतात की हा डाव पण फुस्का जातो बिबॉ चा.

तो माधव एलिमिनेटच झालाय कायमचा वर नाही गेला. किती रडारड करत होत्या नेहा आणि शिवानी. कॅप्टनशिप उमेदवारीचे टास्क फालतू होते एकदम. बळेच आरोह ला उमेदवारी दिली.
बिचुकले इज नो लॉन्गर फनी फ्रॉम एनी अँगल. गेस्ट केलाय तर तसेच ठेवा आणि हाकला त्याला नेक्स्ट वीक.

मी पाहूच नाही शकले-नेहाची ती फेक ग्लिसरीन टाकून अ‍ॅक्टींग केल्याची रडारड्, सगळा एपिसोड फॉरवर्ड केला ऑलमोस्ट्, नेहाला स्क्रीन वर बघणे शिक्षा आहे, तिच्या पेक्षा शिवानी परवडली असं झालय इतकी नेहा अनॉयिंग आहे Uhoh
मला सध्या हिना आवडतेय .

काल माधव त्याच्या एफबी चँटमध्ये म्हणाला की अभिजित स्मार्टली खेळत आहे,कधीकधी तो खोट वागतो पण त्या घरात सर्व्हावलसाठी कधीकधी तस वागाव लागत.
शिवबद्दल म्हणाला की तो घरात आल्यापासून कोणासोबत राहायच,कस वागायच,कस बोलायच हे त्याला बरोबर माहित आहे,तो ही मस्त खेळत आहे
शिव वीणा बद्दल विचारल तर म्हणाला की त्यांच्यातील घरातली मैत्री तर प्रेक्षकांना आवडलेलीच आहे पण तुम्हाला बाहेर आल्यावर पण बघायला मिळेल
मला शंका खहे कलर्सने काय आधीच एखादी सिरियल ऑफर केली आहे का?

वीणा, रुपाली, आरोह, हिना, अभिजीत बिचुकले नॉमिनेट आहेत.
(अभिजीत बिचुकले पाहुणे असल्याने त्यांच्या वोटिंग लाईन्स बंद आहेत अस खाली दाखवत होते)

केळकर कॅप्टन झाला.
केळकरने वीणा ऐवजी किशोरीला सेफ केलं.

"आली रे आली आता तुझी बारी आली!!" रुपालीला असं म्हणतील का बिबॉ आता?! Happy हिना आणि आरोह ला राहू देत अजून थोडे दिवस. वीणा कुठे जात नाही, आणि बिचुकले तर गेस्ट आहे.
केळकरने किशोरीला सेफ केले? कसे काय?

किशोरीला मानल पाहिजे . बाकीच्या वाचलेल्या सगळ्या स्पर्धकांमध्ये सिनियर असूनही इतके दिवस घरात टिकणं आणि तेही व्यवस्थित टास्क करून सोपं नाहीये . शिवानी तरुण असूनही हाश हूश करत बसते . टास्क मध्ये कधीच जीव तोडून खेळत नाही . पण किशोरीला बघा . ग्रेट आहेत Happy

शिवानी कसली तोंडघशी पडली वीणावर आरोप करून, तिचं target हिना वीणाला बाहेर काढणे आहे. लकी आहे शिवानी, नेहा तिलाच वाचवणार होती हे bbना माहिती होतं आणि केळकर शिव वीणाला सेफ करेल असं वाटलं असेल पण त्याने शिव आणि किशोरीताईंना सेफ करून योग्य पाऊल टाकलं.

वीणा बिचारी कायम नॉमीनेट असते.

आज नेहाला शिवानी आरोह दोघांनी खोटं ठरवलं, नक्की कोण खरं बोलत होते.

आज किती वेळ वादावादी. वीणाने आपला stand योग्य मांडला, केळकरने आणि शिवने सपोर्ट मस्त केला, शेवटी शिवानीला माफी मागावी लागली.

रुपाली आता तरी जाणार का.

नॉमिनेशनमधून वाचण्यासाठी वीणाने आधी नेहाला approach केलं. नंतर ती अभिजीतशी बोलत असताना बझर वाजला .टास्क संपलं.
अभिजीतने शिव आणि किशोरीला सेफ केलं.नेहाने शिवानीला.

आज शिवानीचं थोबाड फुटलं.

नेहाला शिवानी आणि आरोहनी खोटं पाडलं किंवा ती खोटं बोलत होती. So all is not well between Neha and Shivani. Still at least Neha wants Shivani with her. तिने पा ठीत खंजीर खुपसून घ्यायला तयार रहावं.

शिव आणि वीणाला शिक्षा झाली.

बिचुकलेने टॉयलेट ड्युटीला नकार दिला. तो टॉयलेट घाण ठेवतो म्हणूनच अभिजीतने त्याला ही ड्युटी दिली असावी.

काल प्रोमोतलं आरोहचं बोलणं आज दिसलंच नाही की माझं हुकलं?
माधवलापण सकाळी लवकर उठायचं असायचं. पण अभिजीत त्याला तसं सांगूनही उठवायचा नाही, इति आरोह.

नेहाच्या नवऱ्याची हेअर स्टाइल तिला match करते.

इतरांच्या तरी वोटींगलाइन्स ओपन आहेत का कि यावेळी नो एलिमेशन ?
आय जस्ट होप परागचे फॅन्स रुपालीला वोट करून घाण करणार नाहीत Sad
आरोह रहायला हवा अजुन आणि हिना तर टॉप ५ मधे हवीये !

व्होटिंग लाइन्स ओपन आहेत.
इथे आधीही कोणीतरी लिहिलं होतं, अमक्याचा fan असण्यापेक्षा कोण कमी नावडतंय असंच बहुसंख्य प्रेक्षकांचं मत आहे.
परागवर अन्याय झाला असं वाटल्याने ते परागचे fan होत नाहीत.

शिवानी nominated असती, तर मी रूपालीला मतं दिली असती Wink

बाय द वे वीणा खरं बोलली का नाही. तिने दिलेलं जस्टीफिकेशन बरोबर होतं की शिवानी बोलली ते. आपल्याला दाखवताना वीणा घड्यात खडे टाकताना दाखवली आहे. आधीचं पण दाखवायला हवं होतं.

पण सगळ्यांनी वीणाची बाजु घेतली, तिने जे पटवून दिलं ते अगदी आरोह, नेहा आणि शेवटी शिवानीने पण मान्य केलं.

शिव वीणाला योग्य शिक्षा मिळाली.

आता मला सगळ्या मुलीच attitude असणाऱ्या आणि कचकच करणाऱ्या वाटतात. सतत वादात, भांडणात पुढे पुढे एक नं. फक्त किशोरीताई चांगल्या बोलतात, डोक्यात जात नाहीत. वावर पण ग्रेसफुल असतो.

काल प्रोमोतलं आरोहचं बोलणं आज दिसलंच नाही की माझं हुकलं? >>> मलापण नाही दिसलं पण समहाऊ त्यावेळी काहीना काही कामं सुरु होती, जेवायचं पण होतं, त्यामुळे मला वाटलं माझं हुकलं असेल.

मला आरोह बाहेर जाण्याचे चान्सेस जास्त वाटत आहेत.कारण त्याला जर ठेवायचेच असते तर त्याला कँप्टन केले असते.खरतर नेहाने त्याला सेफ करायला हवे होते.
असो.नेहाचा नवरा पिंजरा सिरियलमध्ये आणि दिल दोस्ती मध्ये होता का?

आरोह नको जायला, रुपाली जायला हवी, कधी नव्हे ती नॉमीनेट झालीय, पुढे होईल की नाही सांगता येत नाही. आत्ताच जावी.

Pages