बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सगळेच इतके इरिटेट करतायत की आताच्या स्थितीत केळ्याच त्यातल्या त्यात जिंकला तर बरा वाटेल मला! नाहीतर सगळ्या हुश्शार लोकांचा पत्ता कट करून किशोरीने ट्रॉफी जिंकली तर फारच मज्जा होईल
<<<
खरच सगळे अनॉयिंग झालेत आता, त्यात नेहा तर अक्षरशः राक्षशीण वाटायला लागलीये , तिचा आवाज, भयानक आय मेकप,केसांचा अवतार, चेहेर्यावरचे खुनशी भाव एकदम राक्षशीण पॅकेज !
लहानपणी रामायण बघायचो त्यातल्या राक्षशीणी अशाच दिसायच्या आणि वागायच्या.
सध्याच्या घडीला खरच किशोरी/केळ्या जिंकले तर आवडेल.

ती शिवानी कित्ती खोटी रडते , बॅड अ‍ॅक्ट्रेस आहे, कम्मॉन प्रेक्षक काय किंवा समोरची टिम काय विश्वास ठेवेल इतक्या वाईट अ‍ॅक्टींगवर>>खरच.. Lol मला तर बैकग्राउंड ला धुम ताना ना धुम ताना ना ना ना..अस तांडव एइकू येत होत .. काय बोगस करत होती..येडी

बिग बॉसला म्हणावं प्रेक्षक तुमच्यावर कधीपासून संशय घेताहेत.

या आठवड्यात शिवला शिवानीच्या टीममध्ये टाकलं, तिथूनच गडबड सुरू झाली.

या आठवड्यात कोण एव्हिक्ट होणार याचा अंदाज येत नाही.
किशोरीच जाण कठीण दिसत आहे,माधव शिवानीचा मित्र आहे,म्हणजे हीनाला बळीचा बकरा बनवणार का?

चॅनल ने ओढून ताणून किशोरीला नॉमिनेट केले म्हणून मला किशोरी जाईल वाटतेय पण सो.मि. वर तिला बराच सपोर्ट दिसत आहे. ती नाही गेली तर माधवही जाऊ शकतो. तो गेला तर शिवानी आणि नेहाची अवघड परिस्थिती होईल. ( बरंच आहे ते तसेही)

शिवानी डायरेक्ट insult करते bb चा ते चालतं. आज bb नी उगाच issue केला फुलांचा.

लग्न task विणाने छान इमोशनल केला, ती म्हणाली task हरले तरी चालेल, शिव किती प्रामाणिक आहे आणि नेहेमी सॉरी म्हणतो त्याची चूक नसेल तरी आणि सर्वांचं ऐकून स्वतःच्या मनाने वागतो. क्युट एकदम. शिव मात्र task मध्ये होता आणि आपली टीम जिंकावी म्हणून प्रसंगी खोटं पण बोलला म्हणजे टीमच्या बाजूने बोलला. आज वीणा छा गयी, दिल जीत लिया उसने. पहील्यांदा शिवपेक्षा वीणा आवडली इथे. नाहीतर दोघांत शिव जास्त आवडतो मला. टास्क हरूनही वीणा जिंकली इथे.

लक्झरी बजेट जोडी task शिव वीणाने जिंकला. मस्त केला दोघांनी, त्याने acting केली, तिने एका सेकंदात सिरीयल ओळखली, तेव्हा शिवानीचा चेहेरा बघण्यासारखा झालेला, टोटली जेलस.

शिवानी परत आल्यापासून बिबॉ बघणं सोडुन दिलय. इथल्या कॉमेट्स वाचून निर्णय (बिबॉ न बघण्याचा) बरोबर आहे, हे पटलय.

पण तरिही, विजेता म्हणून माझ मत शिव लाच असेल.

मलाही शिव जिंकला तर जास्त आवडेल, दोन नं केळकर. बाकी सगळे मागे रहावेत, असं वाटतं आता.

ती नेहा एकाच सुरात ठमाकाकूसारखी बोलत असते, ठासून ठासून, चढ उतार हसणे आनंद व्यक्त करणे सर्व एकसुरी.

लग्न task मध्ये अगदी प्रामाणिकपणे वीणा बोलली. तिच्या टीमच्या लोकांबद्दल पण विरोधात सांगितलं तिने. केळकर काही मुद्दे छान सांगत होता. पण शिवानी आरोहने दुर्लक्ष केलं. शिव तर surrender झाला होता नेहापुढे.

शिवला नेहा फार फेअर खेळते असा साक्षात्कार झाला त्या टीममध्ये जाऊन Lol . अरे किती चीटिंग करत होती, bb पुढे चाललं नाही ते, ही वेगळी गोष्ट. अर्थात चीटिंग सगळेच करतात, पूर्वी वीणाने पण धोबीपछाडमध्ये केलेलं आणि उल्लू बनवलेलं त्यामुळे कोणाच्याच बाजूने बोलायला नको खरंतर.

शिवानीने जास्त वेळ किशोरीताईना शिक्षा दिली आणि मग त्या रडल्या तर sorry म्हणते उद्या म मां काही म्हणू नयेत म्हणून. काल हिनेच तमाशा केलेला ना रडून किशोरीताईला लागलं वगैरे. किती मानभावीपणा. नाटकी आहे नुसती.

लक्झरी बजेट जोडी task शिव वीणाने जिंकला. मस्त केला दोघांनी, त्याने acting केली, तिने एका सेकंदात सिरीयल ओळखली, तेव्हा शिवानीचा चेहेरा बघण्यासारखा झालेला, टोटली जेलस.>>>
त्यांचा शेवट चा नम्बर होता त्यामुळे त्याना सोपे पडले आणी वीणा ला ही सगळ्या colors च्या सेरीयल ची नावे माहिती होती.
माधव आणी शिवानि चे पण सोपेच होते पण माधव सिरीयल अजिबात बघत नाही वाटत colors वर काम केले असुन पण. अभिजित केळकर ला अवघड होते कारण ती सिरियल बिग्ग बॉस च्या घरात आल्यावर सुरु झाली आहे. म्हणून आधी तो लक्ष्मी सदैव मंगलम बोलला.
वीणा ला सोडून colors मराठी च्या सेरीयल कुणाला माहितीच नाहित.
रुपाली ने चांगला ट्राई केला पण वेडापिसा ओळखले पण तिला सीरियल माहितीच नव्हती. वीणा ची सेरीयल नुकतीच संपली आहे सो तिचे colors च्या ईतर सिरियल च्या लोकां बरोबर भेटणे होत होते colors च्या कार्यक्रमात .त्यामुळे तिला सगळी नावे माहिती आहेत. जर शिवला ओळखायाला लावले असते आणी वीणा ने ऐक्टिंग केली असती तर त्याना जमले नसते.

कोण बाहेर गेलं?
बिचुकलेला खरंच चाहते आहेत का इतके की तो आल्याने यांचा टीआरपी वाढेल?

बिग बॉस चा आवाज कोठल्या व्यक्तिचा आहे? >>> रत्नाकर तारदाळकर.

उद्या बिचुकले बिग बॉसच्या घरात परत >>> चला शिवानी सारखं रेड कार्पेट घाला आणि मखरात बसवा बिग बॉस त्याला.

बिचुकलेना आणायची गरजच काय आता,आता दहावा आठवडा सुरू होत आहे.
तसेही ते जिंकणार नाहीत,टॉप 5 मध्ये पण नाही जाणार
गेस्ट म्हणून आणा आणि एका आठवड्यानंतर घरी पाठवा.

बिचुकले ला कशासाठी आणतायत परत कळत नाही. आता खेळ खूप पुढे गेलाय. घरातल्या कुठल्याच इक्वेशन्स मधे तो बसत नाही आता. ना आता त्याला ते सुरुवातीचे साधा अनपॉलिश्ड माणूस असल्याचे अ‍ॅडव्हांटेज! नुस्ताच न्यूसन्स होणार त्याचा. आणि मग काहीतरी वादग्रस्त होऊन एलिमिनेट करावे लागणार. अनलेस- तेच हवंय चॅनल ला?

बाकी आज एक झलक दिसली त्यात नेहाचा अवतार पुन्हा सर्वात भयंकर! काय कपडे अन काय केस!
ममांना काय आज एकदम ३/४ स्लीव्ज स्पोर्ट जॅकेट, विस्कटलेले केस वगैरे, अनिल, जॅकी वगैरे स्टाइल टफ अँड सेक्सी लूक द्यायचा प्रयत्न असावा Lol

नेहा या विषयाने अख्खा पाऊण तास खाल्ला... जास्तच पण कमी नाही..
नेहा : मी माझं मला माझ्याशी माझ्यासाठी
शिवानी : मी माझं मला माझ्याशी माझ्यासाठी
माधव: मी माझं मला माझ्याशी माझ्यासाठी

जाम footage खाल्लं या तिघांनी...

शिवानी बिग बॉस झालीय.
बिग बॉस सांगू इच्छितात...

माझी अशी इच्छा आहे....

नेहाचं मेंटल डिसइंटिग्रेशन तिचे मित्रच करताहेत.

नेहावर किती वेळ घालवला, बरं तेच तेच तेच असतं तिघांचे शिवानी, नेहा, माधव. नेहाकडे बघवतही नाही.

मोक्षू बरोबर होतं तुमचं, रुपालीने काडी टाकली, आज तिला खूप बोलले, मस्तच. तिला मेरीची म्हणजे शिवानीची lamb म्हणाले. शिवला पण झापले रोडीजवरून.

हिनाला जास्त votes आणि वीणा danger zone मध्ये आहे. शिवानी जा आता म्हणाली म्हणून असेल.

शिवानीला फार काही बोललेच नाहीत, फक्त लुकवरून बोलले आणि रडण्यापेक्षा बाकीच्यांना बाजुला का नाही केलं असं म्हणाले. हिनाला योग्य सुनावलं.

हिनाला जास्त votes आणि वीणा danger zone मध्ये आहे >> म्हणजे पाच मधल्या शेवटच्या तीन स्पर्धकाना डेंजर झोन मध्ये ठेवणार त्यात वीणा असेल पण ती जात नाहीये नक्की . उद्या किशोरी -माधव आणि नेहा त्यात माधव आणि नेहाला डेंजर झोन मध्ये ठेवतील . शेवटी माधव -नेहा आणि वीणा तिघांमधून एकाला काढतील म्हणजे माधवला काढतील असं वाटत कदाचित

नेहाचा तो विगच आहे. रूपाली त्याला इस्त्री करत होती.

मांजरेकरांनी सगळ्यांची व्यवस्थित तासंपट्टी केली.
किशोरीने माती खाल्ली, वीणाशी मैत्री आहे असं म्हणून.

माधवने कधी कुणाचं सांत्वन करायला जाऊ नये.

नेहा हे दोनतीन दिवस फार मिझरेबल वाटतेय.
तिने माधव शिवानीला दूर सारून स्वतःचा गेम खेळावा. अन्यथा ती गेलेली बरी।

नेहाला नाही ठेवणार danger zone मध्ये, तिला सेफ दाखवतील.

उद्या टास्क मध्ये, शिवानी वीणावरच राग काढणार.

हिनाला सर्वात जास्त votes नसले तरी दाखवून दिलं आज, शिवानीला जास्त करून.

माधव गेला अशी बातमी आहे. खरं खोटं माहीत नाही.
पण बाहेर नेहा, किशोरी, हिना आणि वीणा ला बाहेर बराच सपोर्ट दिसतोय त्यामुळे गेला असेल खरंच.
#KamaalKishori असा काहीतरी हॅशटॅग पण चालू आहे.
त्यामुळे किशोरी चं जाणं शक्य नाही आता.
पुढच्या आठवड्यात रुपाली ला घालवा.
आज नेहा, शिवानी ने फार बोर केलं.
माधव तर नेहेमीच बोअर करतो.
शिवानी ला फार प्रेमाने सांगतात तिच्या चुका नेहेमीच. आवाज काढत नाहीत तिच्यावर कधीच .

ती मात्र वरच्या टिपेचा आवाज काढते सतत. उद्याच्या प्रोमोत पण वीणाला चढ्या आवाजात सुनावणार शिवानी, असं आहे.

नशीब रुपालीला जबरी सुनावलं म मांनी.

माधव गेला तर task मध्ये आता शिवला जाम भाव मिळणार शिवानी नेहा रुपालीकडून.

नेहाला नाही ठेवणार danger zone मध्ये, तिला सेफ दाखवतील.>> मला असं वाटतंय गेल्या आठवड्यात किशोरीला जास्त पब्लिक सपोर्ट होता . सगळे जण किशोरीला सेफ करा असं जिकडे तिकडे सांगत होते म्हणून त्या तिघांमध्ये किशोरीला सेफ करतील असा आपला अंदाज . शेवटी बिग बॉस च निर्णय घेतात फक्त पब्लिकचा अंदाज पण घेतात म्हणजे कोण चांगल खेळून टीआरपी घेताय आणि कोण शिव्या खाऊन टीआरपी घेतंय ते दोघंही सेफ असतात. शिवानी शिव्या खात खात टीआरपी देईल त्यामुळे तीला बऱ्यापैकी शेवटपर्यंत ठेवतील

Pages