Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52
बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
स्मोकिंग रुम मध्ये....
स्मोकिंग रुम मध्ये.....आश्चर्यचकित बाहुली
शिवानी स्मोकिंग करतेम्हणजे टास्क मध्ये गेली होती का,काहीतरी लपवायला ?>>काल ओझरती नेहा दिसली मला टास्क संपल्यावर स्मोकिंग झोन मधून बाहेर येताना
कदाचित आता या विकेंडला
कदाचित आता या विकेंडला बिचुकलेला रेड कार्पेट treatment मिळेल bb कडून. दोन गुन्ह्यात जामीन मिळाला. तिसऱ्यात मिळण्याची शक्यता आहे किंवा केस क्लोज होण्याची शक्यता आहे, good going bb.
बेकार शो, तरी मी बघतेय
.
शिवानी स्मोकिंग करतेम्हणजे
शिवानी स्मोकिंग करतेम्हणजे टास्क मध्ये गेली होती का,काहीतरी लपवायला ?>>काल ओझरती नेहा दिसली मला टास्क संपल्यावर स्मोकिंग झोन मधून बाहेर येताना >>> यावेळी मला स्मोकिंग झोन दिसलाच नाहीये. नक्की कुठे आहे.
पराग फॅन्सची शिवानी
पराग फॅन्सची शिवानी आल्यापासून लैच चिडचिड झालीय राव!
नियम एकदा वाचले तरी नेहाच्या डोक्यात आख्ख्या गेमचे वायरींग झालेले असते..... काल तर तीन तीनदा तिला वाचायला लावले नियम!
मग अश्यात किशोरीताईंनी काहीतरी फालतू शंका काढल्यावर चिडचिड होणारच की तिची.... पण तिने टोन सांभाळायला हवा याबद्दल कुठलेही दुमत नाही!
बाकी लोकांची स्ट्रॅटेजी ठरवून झाली तरी रुपाली ते नियमच वाचत बसली होती बघून फार हसू आले!
शिव विरुद्ध बाजूने लॉयल खेळायला लागल्यावर केळ्याची जाम चिडचिड होतीय
शिव विरुद्ध बाजूने लॉयल
शिव विरुद्ध बाजूने लॉयल खेळायला लागल्यावर केळ्याची जाम चिडचिड होतीय >>>
शिव ज्या टीममध्ये असतो तिथे loyal असतो कायम. तो खुनाचा टीम task नव्हता ना म्हणून असं वागला.
शिवानी नेहाची टीम जिंकावी म्हणून bb बरोबर तसे मेम्बर देतात. शातिर दिमाग चांगल्या अर्थाने म्हणतेय आणि फिजिकली सॉलिड अशी टीम आहे त्यांची.
समोर फार डोकं न चालवणारे आहेत. ती हीना फार चीप खेळली परत आणि शिवानी पण.
ती हीना फार चीप खेळली परत आणि
ती हीना फार चीप खेळली परत आणि शिवानी पण.>>>>>> का , काय केलं ? माझं मिस झालं मधे मधे.
शिवला विरोध करताना त्या
शिवला विरोध करताना त्या खुर्ची task सारखं केलं आणि आरोहने task करू नये म्हणून शिवानीने मिठी मारून अडवलं.
अच्छा , थेंकु अन्जु. पण बिबॉ
अच्छा , थेंकु अन्जु. पण बिबॉ टास्कच असा देताएत की बळाचा वापर होतोच. जरा कल्पक असे टास्क सुचत नाहित का ह्याना ?
प्लस शिवानी वीणा आणि हिनावर
प्लस शिवानी वीणा आणि हिनावर पडून राहिली आणि नाटकं करत राहिली. वीणाला खूप लागलं खरंतर पण ती काही बोलली नाही पण रुपालीने पण जाम नाटकं केली.
शिव ज्या टीममध्ये असतो तिथे
शिव ज्या टीममध्ये असतो तिथे loyal असतो कायम. तो खुनाचा टीम task नव्हता ना म्हणून असं वागला.>>>>++११११
मला किशोरीताईंच कौतूक वाटतं की त्या सगळ्या तरूण कंटेस्टंट्स च्या बरोबरीने खेळतात, टास्क मध्ये.
वीणाच्या हातावर जोर देऊन पडून
वीणाच्या हातावर जोर देऊन पडून राहिली शिवानी, तेव्हा attitude महाभयंकर होता. अर्थात bb चा पाठींबा आहे तिला कसंही वागायला आणि काही बोलत नाही हे proved. त्यात वीणाने तक्रार केली नाही, उलट असते तर शिवानीने घर डोक्यावर घेतलं असते. एकेक बावळट आहेत वीणा टीममध्ये तिच्यासकट.
शिवानी पूर्ण दबंग झालीय.
आत्ता मी तोच शॉट बघतेय, किशोरीताईचं ऐकलं नाही. बझर वाजला तरी उठली नाही वीणाच्या हातावरून, बेकार आहे शिवानी.
वैशालीचा interview बघितला
वैशालीचा interview बघितला बाहेर पडल्यानंतरचा.... घरातल्यापेक्षा बरीच सुसह्य वाटली त्या मुलाखतीत!
उगाच गोलमोल न बोलता बऱ्यापैकी स्ट्रेट फॉरवर्ड बोलली!
अभिजीत, शिव, वीणा, नेहा आणि शिवानी असतील म्हंटली बहुतेक टॉप ५ मध्ये..... अभिजीतच जिंकेल असे तिला वाटतेय.... वीणा नक्की जिंकणार नाही असे म्हणाली
नेहा फोकस्ड आहे पण तिच्याबरोबर पटले नाही असेही म्हणाली
रुपालीला जे काही बोलली त्याचा तिला गिल्ट नाही असे म्हणाली
माधवबद्दल पण तिने योग्य विश्लेषण केले
हीनाबरोबर गेल्या दोन आठवड्यात सुर जुळल्याचे म्हणाली
शिव माणूस म्हणून खुप चांगला आहे असेही म्हणाली!
शिवानी चा चेहरा पाहिला का?
शिवानी चा चेहरा पाहिला का? कळाहीन दिसतो मोठ्या आजारातून उठली आहे असा
वीणा नक्की जिंकणार नाही असे
वीणा नक्की जिंकणार नाही असे म्हणाली >>> नाहीचं जिंकणार.
अभिजीत, नेहा, शिव यापैकीचं जिंकतील.
शिवानी चा चेहरा पाहिला का?
शिवानी चा चेहरा पाहिला का? कळाहीन दिसतो मोठ्या आजारातून उठली आहे असा >>> जोर खूप आहे अंगात, वीणाला injured केलं, किती लागलंय तिला. मला तर तिचा चेहेरा सूड उगवायला आली आहे असा दिसतोय.
एवढं लागलं वीणाला तर विचारायला पण गेली नाही, स्वत:लाच काहीतरी होतंय दाखवत खुर्चीवर पाय पसरून बसून राहिली.
सध्या जे चाललय त्यावरुन
सध्या जे चाललय त्यावरुन अभिजित आणी शीव फाइनल ला असतिल असे वाटते.
ह्यावेळी male contestant
ह्यावेळी male contestant जिंकायला हवा, जास्तकरून शिव. पण हे दोघे असतील तर अभिजीत जिंकेल कदाचित.
शिवानि इतकी विचित्र का वागत
शिवानि इतकी विचित्र का वागत आहे. त्या एकला चलो टास्क मध्ये ती नेहाशी उगीचच भांडत होती. ते चालताना मागे वळण्यावरून. तेंव्हा आरोह शिवानि ला समजावताना बोलला की तू छोट्या रुम मध्ये जाऊन ये. छोटी रुम म्हणजे ती स्मोकिंग वाली ना? मला तो असे का बोलला त्यावेळी काही कळले नाही.
अभिजित गेम च्या बाबतित खुप
अभिजित गेम च्या बाबतित खुप फोकस आहे . किचन भांडणात ही तो फारसा पडत नाही. किन्वा ईतर वेळी ही उगाच कुणाशी भांडणे करत नाही.
छोटी रुम म्हणजे ती स्मोकिंग
छोटी रुम म्हणजे ती स्मोकिंग वाली ना? >>> आता मी लक्ष ठेवेन, नक्की कुठे आहे ती रूम. मागच्यावर्षी फुकडयांवर टीका झाली होती त्यामुळे यंदा दाखवलीच नाही.
मागच्यावर्षी फुकडयांवर टीका
मागच्यावर्षी फुकडयांवर टीका झाली होती त्यामुळे यंदा दाखवलीच नाही........त्याबाबतीत मग रेशमला फुल मार्क्स.फुकायचे सोडले नाही.शिवानीसारखी नाटक नाहीत.जशी आहे तशीच राहिली.
फुकायसाठी अगदी रिंग टास्कही सोडला होता.
शिवानीला श्वास लागतो आणि
शिवानीला श्वास लागतो आणि claustrophobia आहे आणि ती 'लहान खोलीत' जाते?
धन्य आहे बया.
हीना, माधव हेही smoke करतात.
हीना, माधव हेही smoke करतात. बाप्पाही करायचा. मी एकदा voot वर पाहिलं होतं. पराग गेल्यापासून bb बघणं बंद केलं. इथे कधी कधी येऊन वाचते. नवरा अजूनही बघतो.
मला ही बीबी बघायचा कंटाळा
मला ही बीबी बघायचा कंटाळा येतो आजकाल. निम्मा वेळ तर नुसता आरडाओरडा असतो. मागच्या सीज़न ला इतका नव्हता.
पराग हेटर्सना शिवानी
पराग हेटर्सना शिवानी आल्यापासून लैच आनंदाने उकळ्या फुटताहेत राव
पराग हेटर्सना शिवानी
पराग हेटर्सना शिवानी आल्यापासून लैच आनंदाने उकळ्या फुटताहेत राव
येत्या काही एपिसोडस मध्ये
येत्या काही एपिसोडस मध्ये नेहा आणि शिवानीमध्ये भडका उडणार असे दिसतेय..... सीझन संपता संपता नेहा आणि वीणा एकत्र आल्या तरी फारसे आश्चर्य वाटणार नाही!
रुपाली आता शिवानी ला चिकटली
रुपाली आता शिवानी ला चिकटली आहे. >>>>>>> रुपाली सरखी दलबदलू दुसरी नसेल. अजिबात वेळ न घालवता पार्ट्या बदलते आणि अजिबात गिल्ट् नसतो तिच्या वागण्यात.
येत्या काही एपिसोडस मध्ये
येत्या काही एपिसोडस मध्ये नेहा आणि शिवानीमध्ये भडका उडणार असे दिसतेय>>>>> हो असं दिसतय खरं
केळ्या अगदी सात्विक संतापाने
केळ्या अगदी सात्विक संतापाने "शिव ला वापरून घेतायत ते लोक" म्हणत होता त्याचे हसू च आले. वापरतायत म्हणजे? तो त्यांच्या टीम मधे आहे म्हणजे वापरणारच की त्याला. याच्या टीम मधे असता तर याने काय मखरात बसवून ठेवले असते का त्याला? वापरलेच असते की
वीकेन्ड ला सर त्याला ओरडतील म्हणे . दॅट्स नॉट इव्हन द पॉइन्ट!
त्यामुळे तसे पाहिले तर शिवानी, केळ्या हे आवडीचे नसले तरी नो डाउट स्ट्राँग प्लेयर आहेत. नेहानेही आता पुन्हा फुलॉन गेम सुरु केलाय, त्यामुळे ती तर आहेच या लिस्ट मधे. ती शिवानीला दबून राहत नाहीये. गुड फॉर हर. आरोह पण चांगले खेळतोय.
त्यांनी शिव ला अडवायला वीणाला पाठवून बघायचे होते.
रुपाली टिपिकल कणाहीन मेंढरु आहे. शिवानीला तिने आता लीडर म्हणून स्विकारले आहे. गुलामासारखी तिच्या मागे मागे असते आता, हिच्यासमोर ती कसेही वागत असली, कुणाशीही भांडत असली तरी तिला देणेघेणे नसते. ते ऐकूच येत नसल्यासारखे वागते. कधीच घालवायला हवे होते तिला !! पण काय होतंय की मेजर खिलाडी लोकांच्या टार्गेट वर ती नाहीच आहे !! त्यामुळे ती सुमडीत सुटतीय उगीचच!
बाकी बिबॉ चा गेम हा फेअर किंवा सत्याने खेळण्याबद्दल कधीच नव्हता त्यामुळे कोणी नियम तोडले, वाकवले तरी बिबॉ आक्षेप घेतीलच असे नाही. तुम्हाला बाय हूक ऑर क्रूक कॅप्टनशिप / उमेदवारी मिळवायची आहे इतकाच नियम आहे प्रत्येक टास्क चा
हिना अदरवाइज आवडत नाही पण शिवानीशी पंगे घेतेय ते आवडले मला. बाकी वीणा, शिव, माधव हे या ना त्या कारणाने इमोशनली अनस्टेबल लोक. किशोरी जाईल बहुतेक आता.
Pages