बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बरेच गुन्हे आहेत तरी फरार म्हणे आधी, पोलीस प्रोटेक्शनमध्ये इलेक्शन तर लढत होता. Bb त आला आणि अलगद सापडला पोलिसांना.

ती शिवानी येऊ शकते तर बिचुकले का नाही ? त्यांना निदान महिनाभर टी.व्ही बघत बिबॉचा होमवर्क करायचा चान्स तरी नसेल मिळाला !
आणा बिचुकलेला, डायरेक्ट डीक्टेटर टास्क पुरता, भारी करतील !

भारी म्हणजे काय करेल, मसाज करायला लावेल हिनाला. दुसरं येतं काय त्याला.>>> करु दे, तिला चाल्तंय की! Happy
मी तर म्हणतो परागलाही आणा, होऊ दे कल्ला, अजून राडे झाले तर जरा बघणेबल होईल.
हा आठवडा जरा बरा वाटतोय शिव ने वीणा बरोबरचा फालतूपणा सोडून टास्क चांगला केल्याने व शिवानीने वातावरण तापवल्याने.

ममांनी बोलायला पाहिजे शिवानीला.. नेहा,वीणा, शिवला ओरडताना टिपेचा स्वर लागतो.. शिवानीला मात्र अगदी सौम्य भाषेत समजावतात.. आज हिनाला शिवानी बोलली तेव्हा हिनाने तिथेच बोलायला हवं होतं तुलाच काढलं होतं ते बघ म्हणून

मसाज तर हिना आधीही देत होती , टास्क भारी करेल म्हणजे आता त्याचं नवं रुप माहित झाल्याने खरा हिट्लर वाटेल, दहशत निर्माण करेल नं.कि सारखी !
गिव्हन अ चॉइस शिवानीला हिट्लर म्हणून पहाण्यापेक्षा बिचुकले परवडेल.
पराग नाही यायचा बहुदा , तो गेला परत गोव्याला.
पण पुन्हा तेच ! जर शिवानी येऊ शकते तर मागच्या सिझनच्या सुशान्त पासून पराग्,बिचुकले पर्यन्त कोणीही एंट्री मारु शकतं !

मी तर म्हणतो परागलाही आणा, होऊ दे कल्ला, अजून राडे झाले तर जरा बघणेबल होईल >>>. +११११११
सगळ्यांना वचपा काढायचा सारखाच चान्स मिळू देना . खर तर सुशान्त / पराग्/ ऋतुजाने तर मोहीमच राबवली पाहिजे बिग बॉस बघू नका म्हणून . बिग बॉसची हिटलर शाही बंद करा Happy

पण पुढचा 10 वा विक फँमिली विक आहे.त्यात तर नाही आणणार.मग राहातात किती विक,लास्टट विक फिनँले विक.तो सोडला, तर जेमतेम तीन विक आहेत.मग कशाला आणायच.
त्यापेक्षा हिंदी चा सिझन चालू होत आहे ना,द्या तिकडे पाठवून.

नेहा झोपली तर तिला जेलमध्ये नाही टाकलं?

शिवानीने नॉमिनेट झालीस, घरी जा, असं म्हणून हीनासाठी सिंपथी व्होट्स वाढवली.
परागलाही बिचुकलेला घरी पाठवण्यावरून मांजरेकरांनी झापलं होतं.

खर तर सुशान्त / पराग्/ ऋतुजाने तर मोहीमच राबवली पाहिजे बिग बॉस बघू नका म्हणून . बिग बॉसची हिटलर शाही बंद करा Happy
<
कालच बॉलिवुडस्पायने सुशान्तची मुलाखत घेतलीये, त्याला काहीही ऑब्जेक्शन नाहीये, म्हणे या परिस्थितीत तिला आणणं भाग होतं बिबॉला, आमच्यावेळी वेगळी सिच्युएशन होती म्हणे !
वर म्हंटला कि तो बिबॉचे बॉस आनंद चव्हाण, तसेच कलर्सचे निखिल साने, शिवानी सगळ्यांचा सुशान्त मित्रं आहे, थोडक्यात हि इज फाइन !

शिवानीने bb नी खेळ थांबवल्यानंतर बांबू वर टाकून bb चांच insult केला, ते चाललं bb ना. मग त्यांनी अडगळीच्या खोलीत नाही टाकलं तिला. टाकायला हवं होतं.

तो आरोह काही कामाचा नाही, खरंच चम्या आहे टास्कमध्ये. शिवला मुद्दाम तिथे दिलं, नेहा शिवानी जिंकावी म्हणून.

एकंदरीत बिबॉस जो काही थोडाफार प्रेक्षकवर्ग राहिला आहे तो ही गमावणार बहुतेक.बिबॉसचा घसरता टीआरपी लक्षात घेता इतर चँनेल्सनी कंबर कसली आहे.
झी मराठी 9.30 आणि 10 वाजता बुधवार ते शनिवार दोन नवीन शो आणत आहे.
झी युवावर 7 ऑगस्टपासून बुधवार ते शुक्रवार 9वाजता म्युझिकल रिअँलिटी शो चालू होत आहे.वैभव मांगले परीक्षक आहे.
बिबॉसच काय खर नाही.

वीणा एवढी बावळट, सहन करते सर्व शिवानी अंगावर पडली ते, रडायला हवं होतं लागलं म्हणून, शिवानी कशी काही नाही झालं तरी रडते उगाच, ही लागूनही शांत. गोंधळ घालायला हवा होता विणाने.

शिवानीला अति महाभयंकर attention seekness चा प्रॉब्लेम आहे, टास्क सगळेच करतात आणि हीच एकटी दमून उसासे टाकते.. आणि नेहा किशोरीशी अती उद्धट पणे बोलतेय... शिवानी नेहा आणि रुपाली ला दाणकन जमीनीवर आणायची गरज आहे.. हीना पण जरा कटकटी आहे पण या तिघी पेक्षा बरीच बरी आहे

कालच बॉलिवुडस्पायने सुशान्तची मुलाखत घेतलीये, त्याला काहीही ऑब्जेक्शन नाहीये, म्हणे या परिस्थितीत तिला आणणं भाग होतं बिबॉला, आमच्यावेळी वेगळी सिच्युएशन होती म्हणे !>> चॅनल काहीही करू शकत . कुठल्याही थराला जाऊ शकत . चॅनलकडे पैसे पण आहेत आणि वकिलांची फौज पण आहे . शिवानीला आणल्यानंर संभाव्य स्पर्धक गेल्या सिझन मधले या सिझन मधले कोण आहेत जे आवाज उठवू शकतात त्यांना हेरून ताबडतोब पैसे खिलवले असतील तोंड गप्प करायला.

नाहीतर गेल्या सिझन मधले तर आवाज उठवूच शकतात . का नाही ? आता तरी ते चॅनलच काहीच देणं लागत नाही .पण पुढे मग या चॅनल वरच्या मालिकेत काम मिळणार नाही म्हणून गप्प बसले असतील आणि चॅनलने पण पैसे खिलवून आम्ही जस सांगतो तसंच बोला असं सांगितलं असेल . चॅनल ने असं सांगणं कठीण नाहीये . कुठेही कुठल्याही क्षेत्रांत राजकारण चालतच चालत . हा या सिझन मधला पराग एक वेळ बोलणार नाही कारण अजून गेम संपलेला नाहीये . तो आपला चरफडत गेला गोव्याला निघून . पण तो मनातून प्रचंड दुखावला गेला असणारच

मी तर आता हवा येऊ द्या बघायला सुरवात करणार . इथले प्रतिसाद वाचून काय घडत असत ते थोडं फार समजतच . सगळं काही समजण्याची जरुरी नाही. सोमवार पासून बंद केलाय बिग बॉस बघणं . काही अडत नाहीये . ती तुपारे मालिका पण मी पहाणं कधीच बंद केली होती . तुपारे करता इथले प्रतिसाद सुद्धा वाचत नव्हते . फक्त कालच तो अतुल ठाकुरांचा लेख वाचला त्यावरून समजलं मालिकेचं शेवट काय झाला ते . बस झालं Happy

हा या सिझन मधला पराग एक वेळ बोलणार नाही कारण अजून गेम संपलेला नाहीये . तो आपला चरफडत गेला गोव्याला निघून . पण तो मनातून प्रचंड दुखावला गेला असणारच >>> channel कदर करेल त्याची पुढे काम देऊन, सध्या त्यांना काही करता येत नसेल. तीन कंपनीज involved आहेत ना. त्यांनी प्रयत्न केले असतील पण नाईलाज झाला असेल. तो शांत राहिला तर त्याच्यासाठी चांगलं आहे पुढच्या करियरसाठी, त्याला food शोज वगैरे मिळतील channelवर. कदाचित पुढच्या bb ला संधी देतील किंवा हिंदीतही देतील.

हीनाने शिवला आणि शिवानीने आरोहला ज्याप्रकारे अडवलं, तसंच शिवानीने वीणा हिनाला अडवलं, हे सर्व आवडलं नाही आणि पटलं नाही.

वर म्हंटला कि तो बिबॉचे बॉस आनंद चव्हाण, तसेच कलर्सचे निखिल साने, शिवानी सगळ्यांचा सुशान्त मित्रं आहे, थोडक्यात हि इज फाइन ! >>> हो बघितली मीही ती मुलाखत. विरोधात गेला तर कामं मिळणे कमी होईल ना. ऋतुजाची पण घ्यायला हवी होती मुलाखत.

शिवानीला अति महाभयंकर attention seekness चा प्रॉब्लेम आहे, टास्क सगळेच करतात आणि हीच एकटी दमून उसासे टाकते.. आणि नेहा किशोरीशी अती उद्धट पणे बोलतेय... शिवानी नेहा आणि रुपाली ला दाणकन जमीनीवर आणायची गरज आहे.. हीना पण जरा कटकटी आहे पण या तिघी पेक्षा बरीच बरी आहे >>> खरं आहे. असो bb नीच डोक्यावर चढवल्याने शिवानीला कसंही वागण्याची मुभा आहे.

खरं आहे. असो bb नीच डोक्यावर चढवल्याने शिवानीला कसंही वागण्याची मुभा आहे.>>>> Lol मला कितीतरी वेळ कळलंच नाही कि अन्जू एवढी भडकून नीच वगैरे का म्हणतेय बिबॉ ना? मग कळलं कि बिगबॉसनीच असं म्हणायचय तिला Lol

Claustrophobia असलेली शिवानी छोट्याश्या स्मोकिंग रूम मध्ये कशी जाते? तेंव्हा नाही काही होत बरे तिला?

स्मोकिंग रुम मध्ये.....आश्चर्यचकित बाहुली
शिवानी स्मोकिंग करतेम्हणजे टास्क मध्ये गेली होती का,काहीतरी लपवायला ?

Pages