बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हीना च्या कालच्या ड्रेस चे कलर combination छान होते. वीणा आणी नेहा चा ड्रेसिंग सेन्स काहीतरीच आहे . रुपालीचेही ड्रेस छान असतात specially कलर्स.

म्हणून नाही, इन्स्टाग्रॅमवर हिना येण्या आधी वीणाला सर्वात जास्तं फॅन फॉलॉइंग होते , आता हिनाला आहे, हिन्दी शो मधे >>> अच्छा. मी insta वर नाहीये. ट्विटरपण नाहीये.

ह्याचा फायदा तिला votes मिळण्यात होईल जसा काल झाला पण channel तिला पहिल्या तीनांत तरी नक्कीच नेणार नाही.

पहिल्या ३ मधे नाहीच जाणार हिना , त्या पोझिशन्स शिव वीणा नेहाच्या पक्क्या आहेत.
पण किशोरी, वैशाली, रुपाली, माधवपेक्षा पुढे जाऊ शकते.

काल किशोरीताईंचा आवडला मला. मागे कधीतरी विणाचा छान होता, हीना साडीत छान दिसत होती मागे. कालचा तिचा अजिबात आवडला नाही. हीना ग्रेसफुल अजिबात नाही वाटत. एकदाच साडीत वाटली मला.

जानेदो स्मिताचे होते तसे कोणाचेच नसतात, दोन नं मेघा आणि कधी कधी सईचे असायचे.

ते color एकसारखे ठेवुन ड्रेस कशाला घालतात सगळे . पिवळा तर पिवळा ,लाल तर लाल . काहीतरीच वाटते ते. घालाना वेगवेगळे कलर सगळ्यानि.

काल वीणा आणी शीवचा टाईमपास वाला मुद्दा रुपाली ला काढायाची काहि गरज नव्हती.
बरं वीणा आणी शीव मध्ये काय आहे हे सगळ्याना माहिती आहे सारखे कशाला त्यांची friendship आहे बोलून दाखवायची गरज आहे.

रूपालीकडे स्वतःचे मुद्दे असतात का? या तिघांना दाखवण्यासाठी मी बि चुकलेवर आवाज चढवला आणि तो लांबलचक मोनोलॉग केला असं तिने सांगितल्यापासून मला तिचं हसूच येतं.
मग पुन्हा बिचुकले. नंबर गेममध्ये त्यांना उचकवलं. त्यांनी उचकून शिव्या दिल्यावर तेव्हातरी कूल होती. त्यांना थँक्यु वगैरे म्हणाली. दुसर्‍या दिवशी त्यांच्यासाठी मुद्दाम उपासाचे पदार्थ केले. मा फी मागितली. मग शनिवारी मांजरेकरांनी बाकीच्यांना बिचुकलेच्या शिव्यांवरून सुनावल्यावर हिला रडू आलं. इतकी लेट रिअ‍ॅक्शन?

ती वीणावर आणि किशोरीवर नेमकी कशासाठी चिडते?

खरं सांगूका ते शिव वीणाचं bb नी पण कमी दाखवावं आता. अति तिथे माती होते मग, लक्षात आली केमिस्ट्री आणि ती तशीच राहावी अशी इच्छा. सारखं उठून शिवने लव साईन करावं ह्याचं त्याचं, ते आता दाखवू नका.

किंवा चटणीसारखा एखादा सीन दाखवा. त्याचभोवती सर्व फिरवू नका.

सगळ छान ठरलेल आहे बिबॉ आणि चँनेलच.काल बघितल ना शेवटी सुपुलाच काढल ,वास्तविक सोमिवर तर वैशालीला प्रचंड टार्गेट केल होत. पण काढल का तिला नाही.म्हणजे ती नक्कीच राहणार.
ते पाहुणे येऊन गेले,एवढ टॉर्चर केल,सल्ले दिले,काही फरक पडला ,काही नाही.
खरतर,पराग बाहेरच वातावरण खूप तापवत आहे.नेहा,वैशालीबद्दल बोलून.म्हणून हुशारीने बिबॉसने नेहाला सोमिवर भरपूर सिंपथी मिळवून दिली.
बाकी ग्रुप्स तसेच राहातील.किशोरीला,वीणा आणि रुपाली मुळे काहीतरी तरी भाव मिळत होता,मोठ्या ग्रुपमध्ये आली,तर पूर्णपणे झाकली जाईल.
मग वैशाली भांडण कशी लावेल.त्यामुळे ग्रुप बदलण्याच्या शक्यता कमीच.

म्हणून हुशारीने बिबॉसने नेहाला सोमिवर भरपूर सिंपथी मिळवून दिली. >>> हे कुठे आहे. मी ट्विटर किंवा insta वर नाहीये पण fb वर फार कमी पोस्टस नेहाच्या बाजूने आहेत. तिथे तरी नेहाला सिम्पथी मिळतेय हे दिसलं नाही.

म मां आणि bb नी पुरेपूर प्रयत्न केलेत तिला सिम्पथी मिळावी ह्यासाठी पण तेवढी मिळतेय असं वाटत नाहीये.

सोमिवर वैशालीला टारगेट केलं तरी व्होटिंग वाचवण्यासाठी करायचंय. घालवण्यासाठी नाही, त्यात सुरेखांना fan following नसावं.

, त्यात सुरेखांना fan following नसावं.>>> हो सुरेखा ताईना वोटिंग करणारे फैन फॉलोविंग जास्त नसेल. शिवाय त्यानी पराग च्या वेळी संचालन ही नीट केले नव्हते .
काल रुपाली ला त्या मुलाने ताई बोलले तर इतकी काय प्रॉब्लेम होती. तो मुलगा छोटा होता तर ताईच बोलणार ना .काकू तर नाही बोलला ना.
Lol

ते काहीही होतं रूपालीचे उगाचच.

त्या मुलाच्या थ्रू bb ना हे तर सुचवायचं नव्हतं ना की kvr मध्ये शीव आणि केळकरने सामील व्हावं. वैशाली बास आता तुझी व्हिलनगिरी.

कॉर्नर आणि सिंपथीबद्दलच्या डीजेच्या पोस्टला अनुमोदन!
खर म्हणजे तेच लिहायला इकडे आलो होतो.... बिगबॉस ला हव्या त्या टप्प्यावर गेम आता आलेला आहे.... केळ्या आणि वैशाली पुरते व्हिलन झालेले आहेत..... आता त्यांच्याविरुद्ध जो उभा राहील तो हिरो!
नेहा कालच्या एपिसोडनंतर त्यादृष्टीने परफेक्टली प्लेस्ड आहे...... She needs to encash it now!
पण अजुन दोनेक महीने जायचे आहेत आणि दिवसागणिक बदलणारी इक्वेशन्स बघता अजुन काही एपिसोडनंतर केळ्या आणि नेहा गळ्यात गळे घालून फिरताना नाही दिसले म्हणजे मिळवली..... कारण या बिग बॉसच्य घरात काहीही होवू शकते!
काही एपिसोडपूर्वी एकमेकांना जबरदस्त टशन देणारे शिव आणि नेहा गेल्या आठवड्यात सुख दुखे: शेअर करताना दिसलेच की!
पण काल ज्या पद्धतीने तिला कॉर्नर करण्यात आले, अगदी तिच्या जवळच्या माधव आणि हीनानेही तिला सोडले नाही आणि हे सर्व त्याच सगळ्या लोकांबरोबर एकाच सोफ्यावर बसून ऐकायचे, बघायचे अन त्यात वरुन दुसरे कुणीतरी बोलत असताना केळ्या, वैशालीचे छ्द्मी आणि कुत्सित सुस्कारे आणि कमेंटस झेलायच्या आणि या सगळ्यांनंतर इतके संयत रिॲक्ट व्हायचे याला गट्स लागतात.... तिने स्वताचा फोटो लावणे मला तरी अनपेक्षित होते आणि त्यानंतर स्वताला उद्देशून ती जे काही बोलली ते खरे वाटले आणि तिने एकप्रकारे स्वताची बाजूच मांडली
दम आहे पोरीत!
नेहा वूमनकार्ड खेळताना फार क्वचित दिसली.... आणि बाकी सगळे इतकी वेगवेगळी कार्ड खेळतायत.... कुणी विदर्भ कार्ड खेळतय, कुणी वयाचे कारण देवून सिंपथी घेतय तर कुणी माझ्या जीवावर घर चालते वगैरे म्हणून सॉफ्ट कॉर्नर मिळवतय..... कार्डचे सोडा इथे नाती वापरली जातायत, माणसांना वापरल जातय, त्यामानाने नेहाला कधी कुणाला वापरुन घेताना बघितलेले नाहीये..... ती तोंडावर डील करते म्हणून तिला स्वार्थी म्हणतात मग केळ्या दरवेळेला कॅप्टन्सी नॉमीनेशनसाठी अडून बसतो ते काय असते? तो स्वार्थीपणा नसतो? रुपाली किशोरी परागच्या नावावर काहीही खपवतायत तो स्वार्थीपणा नाहीये?
गो नेहा गो!
काल शिवानीचा विषय निघेपर्यंत तिचा बांध फुटला नव्हता पण तिच्या संगतीत राहिल्यामुळे शिवानी बाहेर गेली हा आरोप नेहासारख्या मुलीला अज्जिबात सहन होणारा नव्हता आणि मग इतका वेळ रोखून धरलेले अश्रू तिला आवरता आले नाहीत..... आता केळ्या कितीही, मला असे म्हणायचे नव्हते अशी सारवासारव करत असला तरी त्याला असेच म्हणायचे होते आणि म्हणूनच तो मग लगेच स्पष्टिकरण द्यायला आला!
नेहा आणि शिवानी मध्ये खरच चांगला बॉंड तयार झाला असावा!
या सगळ्यावर शिवानीची प्रतिक्रिया काय ते बघायला आवडेल
मांजरेकरांनी पण काल चांगले होस्ट केले

काल वीणाने पण फोटो लावून फार पंचींग केले नाही ते आवडले.... शिवने जरी आत बडबड केली असली तरी त्याने बाहेर येउन नेहा आणि हिनाबरोबर जे gesture केले तेही आवडले..... एकतर तो खरच मनाने चांगला आहे किंवा आपली इमेज बाहेर तशी करण्यात तो यशस्वी झालाय.... बाहेर आलेले लोकही त्याच्याबद्दल चांगले बोलतायत!

सुरेखा पुणेकरांनीही जाताजाता कुणालाही नॉमीनेट न करुन चांगुलपणा कमावला!

सुरेखा पुणेकरांनीही जाताजाता कुणालाही नॉमीनेट न करुन चांगुलपणा कमावला! >>> हो. हे सेम बाप्पा आणि दिगंबर नाईक यांनीही केलं.

कोणीतरी male wild card एन्ट्री आहे मास्क लाऊन आलेत त्यामध्ये. माधवला जो उठवतोय तो, अशी चर्चा आहे. ख खो bb जाणे Lol

एखादा सिक्रेट task पण असू शकतो पण wild card entry होणार असं चाललंय काही दिवस त्यामुळे तसं असावं असं वाटतंय.

नाहीतर खोदा पहाड निकला चुहा व्हायचं.

अजून एक गंमत म्हणजे पराग त्या घरातून गेलाच नाहीये, काल किती वेळा त्याचं नाव आणि त्याचा जप भले निगेटीव्ह असुदे. मी एपिसोड बघताना म्हणत होते तेच youtubeवर काही जणांनी review मध्ये सांगितलं की सतत पराग, पराग आणि पराग. सगळ्यांच्या मनात तेच.

हे सर्व त्याच सगळ्या लोकांबरोबर एकाच सोफ्यावर बसून ऐकायचे, बघायचे अन त्यात वरुन दुसरे कुणीतरी बोलत असताना केळ्या, वैशालीचे छ्द्मी आणि कुत्सित सुस्कारे आणि कमेंटस झेलायच्या आणि या सगळ्यांनंतर इतके संयत रिॲक्ट व्हायचे याला गट्स लागतात.... तिने स्वताचा फोटो लावणे मला तरी अनपेक्षित होते आणि त्यानंतर स्वताला उद्देशून ती जे काही बोलली ते खरे वाटले आणि तिने एकप्रकारे स्वताची बाजूच मांडली <<< स्वरुप, अनुमोदन.

नेहा कालच्या एपिसोडनंतर त्यादृष्टीने परफेक्टली प्लेस्ड आहे...... She needs to encash it now!>> अगदि खरय...
काल वीणा सोडुन मला सगळे व्हिलनच वाटले तिथे बसलेले. सगळ्यात २ व्हिलन म्हणजे एक पांढरा बोका अन एक काळी मांजर ..

नेहा छा गयी. हिला एखादा एक्शन मुव्ही किव्वा पोलिसाची भुमिका मिळायला हवी. आता तिने स्वतः च्या गेममध्ये बदल करावा.

वैशालीचे छ्द्मी आणि कुत्सित सुस्कारे >>>>>>>> काल टास्कमध्ये फटके मारुन झाल्यानन्तर सुद्दा तिच्या चेहर्यावर सेम भाव होते.

हे सर्व त्याच सगळ्या लोकांबरोबर एकाच सोफ्यावर बसून ऐकायचे, बघायचे अन त्यात वरुन दुसरे कुणीतरी बोलत असताना केळ्या, वैशालीचे छ्द्मी आणि कुत्सित सुस्कारे आणि कमेंटस झेलायच्या आणि या सगळ्यांनंतर इतके संयत रिॲक्ट व्हायचे याला गट्स लागतात.... तिने स्वताचा फोटो लावणे मला तरी अनपेक्षित होते आणि त्यानंतर स्वताला उद्देशून ती जे काही बोलली ते खरे वाटले आणि तिने एकप्रकारे स्वताची बाजूच मांडली >>>>>>>>> +++++++++११११११११११

खरं सांगूका ते शिव वीणाचं bb नी पण कमी दाखवावं आता. अति तिथे माती होते मग, लक्षात आली केमिस्ट्री आणि ती तशीच राहावी अशी इच्छा. सारखं उठून शिवने लव साईन करावं ह्याचं त्याचं, ते आता दाखवू नका. >>>>>>>>> अगदी अगदी

रुपाली, विणा, किशोरी, कधीतरी हिना ह्यान्चा फॅशन सेन्स चान्गला असतो. मुलान्मध्ये अर्थातच शिव. माधवसुद्दा बरा आहे. नेहाने आता फॅशन सेन्स सुद्दा बदलायला हवा. परवा साडीवर नाकात घालून आलेली ते बघायला घाण दिसत होत. स्वर्ग नरकच्या टास्कमध्ये मात्र ती ग्लॅमरस दिसत होती. साडीवर मोकळे केस ठेवल्यामुळे.

आधी बहुदा आणि सक्सेसफुल युट्युबरही आहे >>>>>> हिना एवढी छुपी रुस्तम निघेल अस वाटल नव्हत.

काल वीणाने पण फोटो लावून फार पंचींग केले नाही ते आवडले... >>>>>>>> नाजूक नार आहे ना ती.

मांजरेकरांनी पण काल चांगले होस्ट केले >>>>>>>> सहमत

प्रिकॅपमध्ये माधव आणि इतर स्पर्धक बिबॉला सॉरी म्हणतायत. का? काय नवीन कारनामा केलाय त्यान्नी आज? बघायला हव.

कॉल ऑफ द विक च्या वेळीच नेमका आमच्या टिव्हीचा सिग्नल गेला. काल कोणाला काय विचारल आणि त्याने/ तिने काय उत्तर दिल कॉल ऑफ द विकमध्ये?

>>तिने स्वताचा फोटो लावणे मला तरी अनपेक्षित होते आणि त्यानंतर स्वताला उद्देशून ती जे काही बोलली ते खरे वाटले आणि तिने एकप्रकारे स्वताची बाजूच मांडली<<
बाजू मांडली? तिच्यावर राळ उडवणार्‍यांवर सूड उगवण्याचाच प्रकार होता तो. मला वाटलं कि आता ती खरोखर आत्मपरिक्षण, आत्मचिंतन वगैरे करेल; पण कसंचं काय. गई भैस पानीमे...
झाडुन सगळ्यांनी तिला ठोसे मारले हा अतिशय स्ट्राँग मेसेज आहे. काल मिळालेल्या शेला-पागोट्या नंतर हि ती सुधारेल असं वाटत नाहि...

किशोरीताई दिवसेंदिवस केविलवाण्या होत आहेत. त्यांनाहि घरी पाठवायची व्यवस्था करा...

कॉल ऑफ द विक च्या वेळीच नेमका आमच्या टिव्हीचा सिग्नल गेला. काल कोणाला काय विचारल आणि त्याने/ तिने काय उत्तर दिल कॉल ऑफ द विकमध्ये?
>>विदर्भातून आलेला कॉल ऑफ़ वीक ने मांजरेकरांच्या हॉस्टिंग चे खुप कौतुक केले . आणी शीव आणी वीणा ची जोडी आवडतेय म्हणून सांगितले तुम्ही टॉप मध्ये असणार संगितले . शीव आवडतो आणी वैशाली चांगली खेळतेयस असे संगीतले .काहीही विचारले नाही.

नेहा काही आत्मपरीक्षण किंवा स्वतःमधे बदल करेल असे वाटत नाही. तिला काल पूर्ण एपिसोड मस्त फूटेज मिळालं आणि तिच्या ते नक्कीच लक्षात आलं असणार. इव्हन पराग च्या प्रकरणानंतरही तिने "मला भरपूर फुटेज मिळालं" असं म्हटलं होतं. तिच्या दृष्टीने तोच सगळ्याचा सारांश! फोकस्ड आणि हुषार प्लेयर आहे ती एकूण.
किशोरीबद्दल राज शी सहमत. सुपुंचे इतर लोक कौतुक करत असताना किशोरीने उठून जाणे वगैरे आणि धड तो स्टँड घेतला तर त्यावर फर्म रहायचे सोडून वैशालीचे ऐकून परत तिथे येऊन बसली! "मला समजून घ्या" म्हणून अभिजीत च्या किंवा याच्या त्याच्या विनत्या करणे. "सिनिऑरिटीच्या रिस्पेक्ट"चे रडगाणे, खूप पथेटिक वाटतेय आता सर्व.
रुपाली खोटारडी नं १! शिव शी भांडून नेहमीप्रमाणे फोकस घ्यायचा प्रयत्न केलाच, शिवाय वीणाच्या बाबतीत "ओवर प्रोटेक्टिव" काय अन प्रेम काय (सिन्स व्हेन? असं विचारवंसं वाटलं मला! Happy ) सगळे फेक!!

मै च्या सगळ्या पोस्टला +१

नेहानी आत्मपरीक्षण केलं आहे. म्हणूनच तिनी स्वतःवर ठोसे मारुन काय कर , काय नको वगैरे बोलून घेतलं. आत्मपरीक्षण बाकीच्यांनी केलं पाहिजे. विशेषतः केळ्या आणि वैशाली आणि रुपाली यांनी.
केळ्या आणि वैशाली कपटी आणि खोटारडे आहेत. रुपाली जास्त खोटारडी आहे.
सुधारायचा वाव किंवा गरज प्रत्येकालाच असते. या खेळापुरता विचार केला तर नेहा फारशी बिघडलेली वाटतच नाही. वैयक्तिक जिकणं आहे म्हणजे स्वार्थी असायलाच पाहिजे. तिनी टीमला न विचारण्याची चूक केली हे मान्य करुनही तिचा निर्णय बरोबर होता हे ममांनीही मान्य केलंय.
नेहा गो गर्ल!

काल वीणाला उपदेशाचे डोस पाजताना मांजरेकर म्हणाले - स्पष्टवक्तेपणा आणि रुडनेस यात केवळ एक थिन लाइन आहे. ती ओलांडु नका...
नेहाच्या बाबतीत ती लाइन अस्तित्वातच नाहि. काल तिचा टर्न आल्यावर डॅमेज कंट्रोल करण्याची नामी संधी स्विकारुन (स्वत:चाच फोटो लावुन) लगेच ती अव्हेरली सुद्धा. डॅमेज कंट्रोल करण्या ऐवजी अजुन वाढवलं. क्षुल्लक कारणांवरुन तिची होणारी मंजोलिका घरात्/बाहेर कोणालाच आवडत नाहि...

लोकांच्या नजरेत न येता, आपला स्वार्थ कधी लपवायचा आणि कधी बाहेर काढायचा हे आत्तापर्यंत केवळ माधव आणि शिवला जमलेलं आहे...

लोकांच्या नजरेत न येता, आपला स्वार्थ कधी लपवायचा आणि कधी बाहेर काढायचा हे आत्तापर्यंत केवळ माधव आणि शिवला जमलेलं आहे...>>>++111

Pages