बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वैशाली आणि केळकर कधी जाणार?? जाम डोक्यात जातात...
मला नेहा आवडायला लागली आहे थोडी थोडी, चिडकू असली तरी जे पोटात तेच ओठावर असतं तिच्या, चूक केली तर कबूल करायची धमक आहे आणि सुधारायची तयारी पण!!

वैशाली इतकी कुजकट आहे . पूर्ण आठवडा कप्तान च्या रूममध्ये बसून -झोपून केळकरला सोबत घेऊन प्लॅनींग करत असते. स्ट्रॅटेजी आखत असते. पण ती कोणाच्या लक्षातच येत नाही . काही काम करत नाही तरी कोणालाच तिचा राग येत नाही . तोंडावर बोलत नाही . पाठीमागून सारखी याच्या त्याच्या नावाने कुचकट कॉमेंट करत असते. कोणामध्येही मिक्स होत नाहीत . ती आणि केळकर कायम अंतर राखून राहतात. तरी यावेळी किशोरी सोडून कोणीही तिच्यावर राग काढला नाही ?. आश्चर्यच आहे . तीच सारखं झोपून राहणं - कामात आळशीपणा करण कुणालाच खुपत नाही ? . कुठल्याही शनिवारी मांजरेकर तिला कुठल्याच गोष्टीवरून बोलत नाहीत . आणि सह स्पर्धक पण.

वैशाली इतकी कुजकट आहे . पूर्ण आठवडा कप्तान च्या रूममध्ये बसून -झोपून केळकरला सोबत घेऊन प्लॅनींग करत असते. स्ट्रॅटेजी आखत असते. पण ती कोणाच्या लक्षातच येत नाही . काही काम करत नाही तरी कोणालाच तिचा राग येत नाही . तोंडावर बोलत नाही . पाठीमागून सारखी याच्या त्याच्या नावाने कुचकट कॉमेंट करत असते. कोणामध्येही मिक्स होत नाहीत . ती आणि केळकर कायम अंतर राखून राहतात. >>> सुमडीत असते ती,
वैशाली च्या मनातली सगळी मळमळ आज बाहेर पडली आणि केळकरची पण ...
तरी आज केळकर ला बोलले मांजरेकर ते बरं झालं, की नेहा आणि किशोरी तुझ्या बोलण्यावर react झाल्या नाहीत, ऐकून घेतलं त्यांनी मग तू कशाला एक्सप्रेस होत होतास, be a sport na!!! बरोबर बोलले...
बोगस आहेत दोघे, कुजकट Sad

सर्वांत भारी वाटलं, किशोरीने वैशालीला टार्गेट केलं त्याचं. नाहीतर वैशाली पाण्यात राहून कोरडी होती.

वैशाली कॅप्टनरुममध्ये राहून कटकारस्थाने करते आणि ती मास्टरमाईंड आहे हे म मांनी सांगितलं की, अगदी ह्या शब्दात नाही पण समझनेवालोनको इशारा काफी है.

केळकर आता हवेत जाईल, त्या पुण्याच्या ऑडियन्सने त्याचं नाव पहिलं घेतलं आवडणे कॅटेगरीत म्हणून.

म मांनी मस्त सुनावलं त्याला.

मला तर फुल डाऊट आहे वैशालीला सर्वात कमी votes असणार. सुरेखाताईना नसणार.

ऑडियन्सच्या votes ना महत्व देणार नसतील तर काही बोलायला नकोच, दिलं तर वैशाली जाणार नाही फायनलला, आधीच बाहेर पडेल.

नेहा एकंदरीत घरात पण नाही आवडत हे दिसलं मात्र, बहुतेक ती सुधारेल, तिला जाणीव करून द्यावी म्हणून हा टास्क होता. तिच्यात आता positive बदल बघायला मिळतील, hope so.

वैशालीला मात्र काढायला हवं लवकर. केळकरला बाहेर आल्यावर समजेल किती शिव्या खातोय ते, वैशालीला पण समजेल.

बिचुकलेवर अजून केसेस असतील तर यायला हव्यात बाहेर, bb डेरिंग करणार नाहीत आणायचं.

किशोरीताईंना टार्गेट केलं वीणा रुपालीने तेव्हा थोडं वाईट वाटलं. कसही असो, एक grp होता तिघींचा.

परागच्या नावाशिवाय विकेंड डाव पूर्ण होत नाही, अजूनही trp साठी त्याचं नाव घेतलं जातं.

किशोरीताईंनी त्याला सांगायचा प्रयत्न केला होता की तुझी समजाऊन सांगण्याची पद्धत योग्य नसते.

वीणा एरवी बकबक करते पण हात चालऊ शकत नाही कोणावर, तिने एक दोन फटके मारून बास म्हणून बाजुला झाली.

माधवला वीणा तोंडावर बोलते, अति असतं तिचं मान्य पण बाकीचे मागे विरोधात वागून बोलून अपमान करतात त्याचा, विशेषतः वैशाली आणि केळकर.

सुरेखाताईंनी ग्रेसफुली exit घेतली, very sweet.

बहुतेकांनी नेहा आणि किशोरीचेच फोटो निवडले मनातली मळमळ बाहेर काढायला. तेव्हा या दोघी आपल्याबद्दल काय बो ललं जातंय ते समजून घ्यायच्या आविर्भावात दिसल्या. किशोरी मध्ये आश्चर्यचकित होत होती. पण किशोरी जेव्हा वैशालीबद्दल बोलत होती तेव्हाच्या ति च्या रिअ‍ॅक्शन्स अत्यंत छद्मी, कपटी, कुत्सित अशा होत्या. माझे सगळे बाण कसे बरोबर वर्मी लागलेत टाइप्स. डोळाही मारला. ती मस्त पाय हलवत ऐकत होती.
बाकीच्या मेंढरांना तीच मास्टर माइंड आहे आणि अभिजीत केळकर हा तिचा उजवा हात हे आतातरी समजावं.
अभिजीत केळकरच्याही रिअ‍ॅक्शन्स काहीशा अशाच होत्या. त्याचं हसणं ऐकू येत होतं. त्याचं सगळंच प्रचंड खोटं वाटतं. तो पंच मारत असताना तर मी फास्ट फॉर्वर्ड केलं. त्याचं बोलणं खूप इरिटेटिंग आहे. दोघेही महा- कॅल्क्युलेटिव्ह,रूथलेस, इमोशनलेस वाटले.

किशोरी आपल्या इमेज काँशसनेसमुळे मार खाताहेत. त्या खरं वागत नाहीत. नाहीतर या दोघांना उघडं करायची मस्त संधी होती. त्यांना बाकीच्या सगळ्यांना आपल्या बाजूला घेता आलं असतं.

नेहाला अभिजीतचं जे वाक्य लागलं -" शिवानी तुझ्या ऐवजी आमच्यासारख्या चांगल्या लोकांसोबत असती तर आज इथे दिसली असती| - याचा अर्थ नेहाने शिवानी माझ्यामुळे गेली असा घेतला तर ते चूक वाटत नाही. (त्याने नंतर आपल्याला अजिबात तसं म्हणायचं नव्हतं, असं म्हटलं पण मला ते पटलं नाही. तो जे बोलतो त्याचा अर्थ त्याला नीट माहीत असतो. विचार करूनच बोललेलं असतं.)
अर्थात मला शिवानीबद्दल सहानुभूती नाही. किंवा तिचा खरंच काही सायकॉलॉजिकल इश्यु असावा जो आपल्याला कळू दिलेला नाही. महेश मांजरेकरांनी अभिजीतला अनेकदा सां गितलं की नेहाने शिवानीसोबत रहावं आणि इतरांना काही कळू देऊ नये अशी त्यांचीच सूचना /आज्ञा होती पण हे अभिजीतने हे कानाआड केलं.

तिच्याबद्दल चुगली किंवा दुसरी काही कमेंट आल्यावर वीणाची सारवासारवीची स्पष्टीकरणं येणार हे आता प्रेडिक्टेबल झालं. त्यात तिचे हात मेरी गो राउंडसारखे ३६० अं शातून फिरायला लागतात. ती सुरुवातच मी असं म्हणाले नाही पासून करते. मग दुसर्‍या कोणाच्या तरी नावावर बिल फाडते. किंवा सारवासारव करते. तिचा चेहरा इनोसंट असल्यामुळे ते खपून जातं, पण हा पॅटर्न होत असेल, तर तो खोटारडेपणा म्हणायला हवा.
शिवानीशी मारामारीच्या वेळीही तिने, "मला खरंच आठवत नाही की मी तुझ्या पायावर बुक्क्या मारल्या,| असा स्टँड घेतला. आता मला त्यावर डाउट यायला लागलाय.

हे लोक दीड तासाचा कार्यक्रम दोन तास खेचतात. मी रेकॉर्ड करून मग पाहतो, शेवटची वीस मिनिटे रेकॉर्ड झाली नाहीत. हीना सेफ आहे नंतर डायरेक्ट लाइव्ह सुरेखा बाहेरून टाटा करताना दिसल्या.

वैशाली आणि केळकर बाहेर जाण अशक्य आहे.कालचा भाग हा केवळ नेहाला तिच्या चुका दाखवण्यासाठीच केवळ नव्हता,तर बिबॉसला एअ गोष्ट कळली की अरे,पराग ,बिचुकले आणि शिवानी गेली म्हणून काय झाल ,इथे खरे कळीचे नारद केळकर आणि वैशाली आहेत ना,बास त्यांना आता कँप्टट्न्सी रुममधून बाहेर काढून फक्त सगळ्यांसमोर बोलत करायच आहे.ते त्यांनी केल.नेहाबद्दल नाही वाटत फार सहानुभूती,फार वुमनकार्ड वापरते आणि मुख्य म्हणजे तिचा स्वार्थीपणाच दिसतो त्याच्यात.का कुणास ठाऊक पण मला हीना बरी वाटायला लागली आहे.पण तिला फुटेज कमी दिल जात आहे त्यामुळे जाईल बहुतेक.काल ममांनी पण खूप बोलून दिल सगळ्यांना,तशा इंन्स्ट्रक्शन्स असाव्यात.
पण बिबॉस फिरसे खेल गये.मानल बाबा.
आणि काही केवीआर ग्रुप फुटणार वगैरे नाही,बिबॉस फुटुच देणार नाहीत.
काल शेवटी बघितल का,रुपाली,वीणा किशोरीच्या गळ्यात पण पडल्या.
काल कस बिबॉसने चुगलीमधून शिवच नाव घेऊन केळकर वीणाला शिवला पटवायला सांगत आहे अस सांगायला लावल,ज्यावर नंतर दोघही नाही म्हणाले.
आता बरोब्बर याच मुहुर्तावर वाईल्डकार्ड एंन्ट्री होईल.म्हणजे मज्जाच मज्जा.
अशी क्रिएटिव्हिटी टास्कच्या बाबतीत का नाही दाखवत बिबॉस.

केळकर आणि रूपाली ते एकच फाईट मध्ये मस्त बोलले. केळकर बरोबर बोलत होता. त्याचा एवढा का राग सोमिवर होतो ते कळतं नाही.

रुपालीला बहुतेक टीप मिळाली आहे (मागच्या वर्षीच्या स्पर्धकांकडून) की विणाबरोबर रहा कारण ती जास्त फेमस आहे, म्हणून ती आता शिव-विणा यांच्याबरोबर जुळवून घेत आहे. उगाचच शिव माझा भाऊ संकेत सारखा आहे असे काहीतरी म्हणत होती.

एवढा का राग सोमिवर होतो ते कळतं नाही.>>>होय काल तो चांगलं बोलत होता,उलट मला वैशाली काहीही न करता negative का होईना पण पब्लिसिटी कशी मिळवतेय ते कळत नाही,
माधव पण थोडा जास्त आवडायला लागला आहे,अर्थात मी हल्ली फक्त विकेंडचा वार बघते,त्यामुळे जास्त सांगू शकत नाही,पण किशोरीला एकटे टाकण्यावरून तो कोणाशी तरी बोलला एक वाक्य की अरे nominate झालेल्या माणसाला एकटे का टाकताय, अशा अर्थाचे

किशोरी आणि रूपालीनी आपल्या आधीच्या सगळ्या चुकांचं खापर परागवर फोडलं. बोळ्याने दूध पितात का या? >>> हो ना, तो नाहीये तर सरळ हात धुऊन घेतले.

वैशाली आणि केळकर बाहेर जाण अशक्य आहे.कालचा भाग हा केवळ नेहाला तिच्या चुका दाखवण्यासाठीच केवळ नव्हता,तर बिबॉसला एअ गोष्ट कळली की अरे,पराग ,बिचुकले आणि शिवानी गेली म्हणून काय झाल ,इथे खरे कळीचे नारद केळकर आणि वैशाली आहेत ना,बास त्यांना आता कँप्टट्न्सी रुममधून बाहेर काढून फक्त सगळ्यांसमोर बोलत करायच आहे. >>> हम्म्म.

नेहाबद्दल नाही वाटत फार सहानुभूती,फार वुमनकार्ड वापरते आणि मुख्य म्हणजे तिचा स्वार्थीपणाच दिसतो त्याच्यात. >>> अगदी अगदी. कालही स्वतःला मारताना, स्वस्तुती जास्त चाललेली.

बाकी सोडून दे बायो पण माधवने पण तुला निवडलं हे लक्षात घे. मग तू काय धुतल्या तांदुळासारखी आहेस का, बाकी सगळेच चुकीचे.

आज ते बाकीचे कोण कोण घुसणार आहेत, मास्क घालून तर वाईल्ड कार्ड एंट्री आहेका.

पण ते सुरेखाताईंचे पाय धर, वगैरे अति होतं, माफी माग एवढं सांगणं ठीक होतं की.

मागच्यावेळी मात्र मेघाला प्रचंड सपोर्ट होता सामान्य माणसांही, एवढा जबरी सपोर्ट यंदा कोणाला दिसत नाही. पराग बाहेर पडल्यावर त्याला दिसतोय अर्थात मेघाच्या तुलनेत कमी आहे तसा. पण सगळीकडे दिसतोय.

माधव फायनलला असेल असं मला वाटतंय. जास्त कुचाळक्या करत नाही कोणाबद्दल अशा माणसाला नेतात ते पुढे, जसं स्मिताला नेलं पुढे तसं.

स्मिता आणि माधवमधे फरक हा की स्मिता त्याच्यापेक्षा जास्त उजवी होती. सतत कामात, हेल्पिंग नेचर याबाबत आणि टास्कस त्याच्यापेक्षा उत्तम करायची. माधव असावा फायनलला असं मात्र मला मनापासून वाटतंय. त्याचा स्वभाव बराच चांगला आहे. पाचवा आला तरी चालेल पण हवा. वैशाली अजिबात नको, तिला किमान एक आठवडा आधी काढा त्या रेशमसारखी.

माधव कुचाळक्या करत नाही त्यामुळे नॉमिनेट होणार नाही. अगदी सुरुवातीला कोणी दोघे बोलत असले की तो नेमका तिथे ऐकायला यायचा.
पहिल्या आठवड्यात शिवानीला टास्क होतं, बिचुकलेला कन्व्हि न्स करायचं की मला नॉमिनेट करू नको. त्यावेळी तर हा तिथे ऐकायला येऊन उभा राहिला आणि बिचुक लेंना म्हणे की तुम्ही तिच्याकडे लक्ष द्या.
मग शिवानीने भर रात्री परागला किचन एरियात सॉरी म्हटलं तेव्हाही हा तिथे आला. आता असं करताना दिसत नाही.
त्याचं टपाल स्पष्टीकरण मला पटलं. चावी हरवण्यापलीकडे त्याने कॅप्टनसी चांगली केली.

वैशालीच्या गाण्यांचा एक चाहता म्हणून सुरुवातीला वैशालीकडून खूप अपेक्षा होत्या. पण इथे टोटली डिस-अपॉइंटेड. (इथे गाण्याचा संबंध नाही, तरीही).
सध्याच्या स्थितीवरून नेहा बाजी मारेल आणि मारावी असे वाटते. वीणा, केळकर वात आणतात.

थॅंक्स भरत. इतके डिटेल्स लिहिलेत.
——-
आतावर जे काही भाग वाचून/पाहुन , ह्या बीबॉ खेळामध्ये उत्तम चौरस व्यक्तिमत्व , निखळ खेळाडुपणा वगौरेला काहिच महत्व नाहि असेच दिसून येतेय.
जो कटकारस्थानी, शकुनी तो टिकणार आणि जिंकणार सुद्धा आणि वर असेही निष्कर्ष की त्यालाच खेळ कळला/ तोच हुशार आणि लोकांची पसंती. लोकांना ( चॅनेलला) निगेटीवीटी आवडते आजकल आणि तेच खपते.
मग कशाला ते ड्रामा चार्ट मध्ये सर्वसमावेशकता, प्रामाणिकपणा वगैरे चर्चितात. आजकालचे जीवनाचे प्रतिनिधित्व आहे हे बिबॉ वाटतं. मायबोलीवरही असेच चित्र आहे म्हणा. असो.
केळ्कर आणि वैशाली इतके मनाचे कुसके आहेत की आश्चर्य वाटते, अश्या लोकांचा सर्वावयल मोड हाच असतो का.
किशोरीताई ईमेज सांभाळताना त्रेधातिरपीट उडते. बाकी, वीणा आणि रुपाली दगेबाजच आहेत. रुपालीला, वीणा-शिवचा लाईमलाईट शेअर कराय्चा असतो.

>>>>काल शेवटी बघितल का,रुपाली,वीणा किशोरीच्या गळ्यात पण पडल्या.<<<
नाटकी असेल ते. अजून त्या कनफ्युजच आहेत, कोणत्या काठीचा आधार घ्या. तोवर आपली नौका डुबू नये म्हणून प्रेमाची नाटकं.

खरं सांगायचं तर जिंकण्यासाठी डिझर्विंग सध्यातरी एकटा शिव वाटतो. त्याचे निगेटिव्ह points आहेत पण तसे नगण्य आहेत बाकीच्यांच्या तुलनेत. बोलण्यात कधी कधी एकच फाईट आणि वातावरण टाईट करून समोरच्याला सपशेल तोंडघशी पाडतो, जसं गुणांचा टास्क होता तेव्हा केलं. सर्वच टास्कस उत्तम करतो. वाईट सिच्युएशन सांभाळण्याची ताकद आहे. पोरगं चमकतेय हळूहळू. परागच्यावेळी बाकीच्या लोकांपेक्षा ह्याने उत्तम समयसुचकता दाखवली. ऐनवेळी डोकं चालवून केळकर वैशालीला मात्र दूर करायला हवं आहे.

सध्यातरी आपुन फिदा इसपे.

अभ्यास करून आलेल्या सो कॉल्ड हुश्शार स्पर्धकांना एक कळत नाही, ज्याला खूप कॉर्नर करतात त्याला पब्लिकची सिंपथी मिळते, नेहाला आज हिरो बनवलय सगळ्या हाउसमेट्सनी !
मला नेहा आवडली आज, शिवानीबद्दलही जे बोलली ते जेन्युइन वाटलं, रुपालीसारखी फेक नाही रडली.
तिच्याबद्दल हेट्रेड कमी झालाय पब्लिकचा आणि टास्क क्वीन नेहा आहेच , त्यामुळे शिवनंतर सध्या विनर क्वालिटी फक्त नेहात आहे !
इन फॅक्ट शिव वीणामुळे किंवा वीणा शिवमुळे ट्रॅक भटकणार अशी भरपूर शक्यता आहे .
किशोरीही तिच्याच गृपच्या पोरींनी पंच केल्यामुळे सिंपथी मिळवून गेली आज !

बाप्पा, सुरेखा आणि किशोरी जेव्हा तरुण होते, तेव्हा त्यांच्या सिनियर्सना टरकून असणर, किंवा त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे सिनियर्सचं पटलं नाही, तरी उद्धटपणा करत नसणार. ही आताची पिढी त्या बाबतीत एकदम विरुद्ध आहे. पटलं नाही, तर सरळ म्हणतात. 'मी तुमचा रिस्पेक्ट करते, पण तुमचं वागणं बरोबर नाही, हे यांना झेपत नसणार, म्हणून त्यांना धक्का बसतो, असं मला वाटतं. तरुण मुलंही अनेकदा जोशात लिमिट्स क्रॉस करतात, पडतं घेत नाहीत आणि इथले ड्रामेबाज तर नाहीच घेणार नमतं. त्यामुळे या मधल्या पिढीचं अवघड आहे.
किशोरीचं बाकी काही आवडत नाही, पण एक मात्र आहे, ती स्वतःहून बोलायला जाते, त्या वेळी इगो आणत नाही. हीही मोठीच गोष्ट आहे. आणि वैशालीच्या बाबतीतली तिची ऑब्झर्वेशन्स अगदी करेक्ट होती- ती कॅप्टन्स रूममध्ये पसरलेली असते आणि छद्मी हसते.

वैशालीला सेकन्ड लास्ट कमी मतं होती. ती जायलाच हवी आता. मग केळ्याचं बघू काय होतं ते. सरळ खोटं बोलला काल- त्याने शिवला विचारलं होतं, की वीणा इकडे येते का बघ. नाही काय म्हणतो? मांजरेकर म्हणाले सुद्धा, की पुरावा आहे.
आणि त्याचे तेच ते जुने इश्युज काढून बोलणं ही बोअर होतं.
नेहा स्ट्रॉन्ग आहे, ती आता थोडी हसती खेळती झाली, गेमनंतर एरवी जरा सैलावली तर जिंकेल. पण तिनं स्वतःत बदल करायला हवेतच, हाय टाईम.

वैशाली गेली तर केळ्याकडे शिव आहेच कि, केळ्या राहीलच टॉप ५ मधे !
माधव - हिना हे सुध्दा कमी बोलून ,जास्त कोणाला खुन्नस न दिल्यामुळे नॉमिनेशन्स मधून वाचतात, जातील अनपेक्षितपणे पुढे, हेटर्स नसल्यामुळे.
हिनाला तर सगळ्यांपेक्षा जास्त सोशलमिडीया फॅन फॉलॉइंग आहे .

हिनाला तर सगळ्यांपेक्षा जास्त सोशलमिडीया फॅन फॉलॉइंग आहे . >>> गुज्जू आहेना ती, त्यांचेही votes मिळतील तिला पण श रा सारखं करतील तिच्याबाबत. सहावी ठेवतील फारतर.

वोट्स आणि channel, endemol ह्यांना कोणाला जिंकवायचं आहे , असा एकत्रित विनर यावेळी असेल कारण मागच्यावेळी मेघाला जो सपोर्ट होता उत्स्फुर्त, तो यंदा मलातरी दिसत नाही आत आहेत त्यापैकी कोणाला.

मला नेहा आधी आवडत होती. पण टास्क मध्ये ती जरा जास्तच अग्रेसिव होते. आणी इतर वेळी ही भांडताना खुपच चिडून बोलते. हे जर तिने बदलले तर ती एक चांगली प्लेयर होऊ शकेल. परवा शीव वैशालीवर चिडला होता तेंव्हा मस्त समजावले त्याला.
वीणा आणी रुपालीचा राग आला काल किशोरी ताईला खुप टारगेट केले त्यानि.
रुपाली तर काहीही बोलली रुपाली स्वत: आतपर्यंत backfoot वर खेळत होती . पराग मुळे वाचत होती. पराग दुसर्या ग्रुप मध्ये चाललेला तेंव्हा रडत होती.आणी आता किशोरी ताईना बोलते. आणी तिने किशोरी ताई न चा गेम च उघड केला . ते करायची काही गरज नव्हती.
आधी disrespect होतो म्हणून काही बोलली नाही म आता बोलून होत नाही का disrespect.

गुज्जू आहेना ती, त्यांचेही votes मिळतील तिला पण श रा सारखं करतील तिच्याबाबत. सहावी ठेवतील फारतर.
<<<
म्हणून नाही, इन्स्टाग्रॅमवर हिना येण्या आधी वीणाला सर्वात जास्तं फॅन फॉलॉइंग होते , आता हिनाला आहे, हिन्दी शो मधे
वगैरे दिसलेद असेल या आधी बहुदा आणि सक्सेसफुल युट्युबरही आहे, तिथेही तिला भरपूर सबस्क्राइबर्स असल्यामुळे असेल.
वीणाला सध्या 187K फॉलॉअर्स आणि हिनाला बरेच जास्ती , 281K फॉलॉअर्स आहेत.

Pages