बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

एकंदरीत इथल्या कमेंट्स वाचून एपिसोड न पाहिल्याच दु:ख होत नाही.आजकाल सलग अस बघावस वाटतच नाही.
त्या गेस्टनातर पढवून पाठवल आहे,हे ते आले तेव्हाच कळल होत.
मला नाही वाटत त्यांनी फार काही दिवे लावले असतील,घरातल्या लोकांना जर सुनवायच होत तर रेशम किंवा हर्षदालाच पाठवायला हव होत.
आता बघू कोण बाहेर जात,बहतेक सुरेखा पुणेकर जातील.
आता इथून पुढे सगळ बिबॉसपण नाही,कलर्स मराठी ठरवणार.
बघू या त्यांचा काय क्रम आहे.
वाईल्ड कार्ड एंन्ट्री तर त्यांच्या वेगळ्याच असतात.
मागच्या वेळी सुध्दा शमा,त्यागराज,नंकियांचा आपण विचार तरी केला होता का?
अगदी आता सुध्दा कुठून शोधल त्या हीना पांचाळला?
तसच आताही असच शोधलेल असेल.तोपर्यंत शिवानी आणि पराग बाहेर बिबॉ खेळून सोशल मिडिया शो बद्दलच चर्चा करेल याची खबरदारी घेतच आहेत।

>>>>वैशाली खूप पुस्तकी भाषेत बोलते. <<<<
असणारच ना. तिची बोली भाषा विदर्भीय आहे. ते हि आतल्या भागात( खारतळे). ती जेव्हा मराठी सारेगमपात आलेली तेव्हा तिचे साधे बोलणे पण त्याच टोनमधे असायचे आणि एकदम आनी/पानी जे मराठी भावगीताला शोभले नसते. सुरुवातीला टिका झाली तेव्हा ती म्हणाली, मी नक्कीच सुधार करेन.
मग वाटतं, खुप मेहनत घेतलेली दिसतेय. उरलेलं शिक्षण( ग्रॅज्युएशन ) घेतलं. ती बारावीच का होती. असे काहीतरी हिमेश रेशमिया ड्रामा असायचा ना हिंदीत तेव्हा कायतरी सांगितलेले. गरीबी होती म्हणून जमलं नाही.. असो.

पुस्तकी भाषेत म्हणजे आपण जे शब्द नेहमीच्या बोलण्यात वापरणार नाही ते शब्द वापरून बोलते ती. तिचा प्रवास मी समजू शकतो आणि त्याबद्दल कौतुक आहे. ती गा यिका म्हणुन आवडतेच.

परवा अभिजित केळकरला समजवताना हे पाहुणे घराबाहेर पडले की मगच तुझ्या रागाला वाट करून दे असं सांगताना ती जे काय बोलली ते प्रचंड पुस्तकी होतं. संतापाचा उद्रेक की विस्फोट टाइप्स.
she is trying too hard.

‘प्रक्षोभ‘ म्हणाली. तिच्या प्रवासाचे कौतुक आहे. पण माणासाने इतके नाटकी असु नये.
आणि मधेच ती म्हणाली, माझ्या तोंडात ईंग्लिशच येते. :).

परवा अभिजित केळकरला समजवताना हे पाहुणे घराबाहेर पडले की मगच तुझ्या रागाला वाट करून दे असं सांगताना ती जे काय बोलली ते प्रचंड पुस्तकी होतं. संतापाचा उद्रेक की विस्फोट टाइप्स.>>>>>>>हो किती कृत्रिम बोलते,
काल ह्या बद्दल च लिही लिही लिहीलं आणि आणि नेटवर्क बंद पडलं

लहानपणी भातुकली खेळताना कसं आपण सगळं बोलत बोलत खेळायचो, तसं हे लोकं सगळ्या गोष्टी बोलून दाखवतात. मला नीट समजावून सांगताना येत नाहीये.

प्रक्षोभ‘ म्हणाली. तिच्या प्रवासाचे कौतुक आहे. पण माणासाने इतके नाटकी असु नये.
आणि मधेच ती म्हणाली, माझ्या तोंडात ईंग्लिशच येते. :).>>>>>> Happy
खरं तर मला वैशाली माडे गायिका म्हणून खुपच आवडायची, पण इथे तिचा स्वभाव नाही आवडते आणि कृत्रिम बोलणं

जी लोक सुरवातीपासून माहिती असतात. ती बिग बॉस मध्ये आली कि त्यांच वागणं थोडक्यात तीच आवडेनाशी होतात . जी लोक माहितीच नसतात. त्यांच काहीच बिघडत नाही उलट त्यांच्या बद्दल जास्त गुगल केलं जात आणि त्यांना प्रसिद्धी मिळते Happy

पाहुण्यांनी हाउसमेट्सना टास्क शिवायच्या वेळेत एकत्र मिळून मिसळून राहण्याचा आणि पेशन्स दाखवण्याचा धडा शिकवला>>> हो
आणी पण बरेच काही जसे जेवणा च्या टेबल वर न भांडणे ,एका वेळी सगळ्यांनी न बोलने ,एक बोलत असताना दुसर्यनी न बोलने संगितले.
आणखीन बरेच टोमणे ही मारले Biggrin
पण यातुन काही शिकतील सदस्य असे वाटत नाही .पाहुणे गेल्यावर परत सगळे पालथ्या घडावर पाणी.

पाहुण्यांनी हाउसमेट्सना टास्क शिवायच्या वेळेत एकत्र मिळून मिसळून राहण्याचा आणि पेशन्स दाखवण्याचा धडा शिकवला>>> हो
आणी पण बरेच काही जसे जेवणा च्या टेबल वर न भांडणे ,एका वेळी सगळ्यांनी न बोलने ,एक बोलत असताना दुसर्यनी न बोलने संगितले. >>>>>>>अगदी अगदी. पाहुणे गेल्यावर दोन्ही टिम एकत्र बोलत, हसत खेळत बसलेले दिसले. शिव आणि नेहाला एकत्र डान्स करताना बघून धक्काच बसला.

सुरेखाताई रडता रडता त्यान्नी काय काय बनवल त्याची लिस्ट सान्गितली. ऐकून तोण्डाला पाणी सुटले. त्यान्नी आजकालच्या मुलीमध्ये किशोरीला अ‍ॅड केल. Lol

मग नेहाची आयडीया असेल तर तिचं कौतुक केलं ते योग्य होतं. माझ्याकडून पण कौतुक तिचं. >>>>>>>> ++++++++११११११११ नेहाची आयडिया भारी होती.

श.रा. अति करतेय असे ज्यांना वाटले : बिबॉ नी तिला तेच तर करायला पाठवले होते जे तिने केले Happy
ऑडीयन्स लग्गेच एखाद्याला निगेटिव्ह बनवून ट्रोल करायला सुरवात करते पण सर्वात फुटेज घेतले कि नाही श.रा. नी ? >>>>>>>> हो. खरतर वाईल्ड कार्डच्या Prank साठी शराच योग्य होती. कारण ती सईपेक्षा चान्गला खेळ खेळली.

निगेटिव्ह गोष्टी करणं शर्मिष्ठाला अगदी नॅचरली येतंय असं वाटत होतं. >>>>>>> सिरियल्सचा अनुभव. Proud

हिनाचा मसाज मात्र सगळ्यांना आवडला असावा, मनापासून केला. पुढची कॅप्टन हीना असेल मोस्टली, निदान उमेदवार तरी असेल. >>>>>> मागच्या दोन दिवसापासून ती सेन्सिबल वाटतेय. तिने विणाला छान सल्ला दिला काल.

पुष्कीचा मित्र आहेना मॅडी एकदम खास म्हणून दिले जास्त स्टार. >>>>>>>> मला ते जुळे भाऊ वाटतात वागण्या- बोलण्या- दिसण्यात.

पुष्कीचा कालचा टिशर्ट त्याने डिझाईन करुन घेतला वाटत. Push लिहलेल होत शर्टावर आणि त्याच्यापुढे चावीची डिजाईन. Pushkey ह्या अर्थाने. Happy

सगळे येडे नुसते, त्यांच्यापेक्षा जास्त येडे हे सर्व बघणारे आपण >>>>>>> Biggrin

बिचुकले गेल्या पासुन हीना चांगली खेळू लागली आहे. ते असताना फक्त त्यांच्या पूढे पाठिमागे करायची . >>>>>>>>>> ++++++++++ २२२२२२२२२

मला अस का वाटतय की डबल एव्हिक्शन होणारेय यावेळी.

हिनाचा मसाज मात्र सगळ्यांना आवडला असावा, मनापासून केला. पुढची कॅप्टन हीना असेल मोस्टली, निदान उमेदवार तरी असेल. >>>>>> मागच्या दोन दिवसापासून ती सेन्सिबल वाटतेय. तिने विणाला छान सल्ला दिला काल.>>>बिचुकले गेल्या पासुन हीना चांगली खेळू लागली आहे. ते असताना फक्त त्यांच्या पूढे पाठिमागे करायची .
कालच्या एपिसोड मध्ये शीव अचानक का चिडला खुर्ची आपटण्याची काही गरज नव्हती . वीणा आणी रुपाली मध्ये नेमके काय झाले ते ही नीट दाखवले नाही.

कालच्या एपिसोड मध्ये शीव अचानक का चिडला खुर्ची आपतण्याची काही गरज नव्हती . >>>>>>>> शिव वैशालीशी बोलत असताना त्याच न ऐकता ती माधवशी बोलत होती. त्याचा राग आला शिवला.

वीणा आणी रुपाली मध्ये नेमके काय झाले ते ही नीट दाखवले नाही. >>>>>>>> टास्क सम्पल्यानन्तर विणा सतत रुपालीच्या मागेमागे करत होती त्याचा रुपालीला राग आला. रुपालीच बरोबर होत, टास्कनन्तर ती जाम थकून गेली होती. तिला फ्रेश व्ह्यायलाही वेळ दिला नाही विणाने.

भरत यांची सकाळी ७.२६ ला लिहिलेली पोस्ट मस्त आणि परफेक्ट आहे.

श रा चं बोलणे एकदम ठमाकाकु टाईप असते, ठसका असतो बोलण्यात त्यामुळे रोल्स तसेच मिळतात आणि वागते तशीच task मध्ये.

मी तिची पहिली सिरीयल बऱ्यापैकी follow केली होती, व्हिलनचं होती त्यात. स्टार प्रवाह वर लागायची महेश कोठारे यांची होती.

ओके सुलू. शिवला खुपच राग येतो पण मागे पण एकदा ग्लास फोडला आणी आता खुर्ची आपटली.
वीणा नेहमी स्वतच्या मर्जी प्रमाणेच वागते आणी दुसर्यांनी स्वतच्या मनाप्रमाणे केले तर चिडते. रूपाली खरच खुप थकल्या सारखी वाटत होती.

मागच्या दोन दिवसापासून ती सेन्सिबल वाटतेय. >>> हो, ते म मां नी पण सुनावलं आणि परवा शिवही बोलला तिला बिभस्तपणा केला त्यावरून.

शिवला खुपच राग येतो पण मागे पण एकदा ग्लास फोडला आणी आता खुर्ची आपटली. >>>>>>>>> अस असेल तर सावराव त्याने लवकर. नाहीतर शिवानी- परागनन्तर त्याचा नम्बर लागायचा.

मी तिची पहिली सिरीयल बऱ्यापैकी follow केली होती, व्हिलनचं होती त्यात. स्टार प्रवाह वर लागायची महेश कोठारे यांची होती. मी पण पहिली होती . नेहा गद्रे होती ना त्यात आता सेरीयल काही आठवत नाही पण शहरी गर्लफ्रेंड आणी गावाकडच्या मुलीशी जबरदस्ती लग्न अशी story line होती.

काल खर तर सगळ्यांनी खुप काम केल होत पण जो तो क्रेडिट घ्याय साठी धडपडत होता. रुपाली तर झोपली ही नव्हती. तरी सुरेखा ताई तिच्या नावानी औरड़त होत्या.

शिव आणि वीणाला खूप राग येतो, बरेचदा बालिशपणा करतात.

त्यादिवशी माधव एक गोष्ट शिव ला सांगत होता, बिचारा त्याचं नाव घेऊन सांगत होता, जरासे ऐकून मग वैशाली दुसरं काही बोलत असताना तिच्याकडे लक्ष दिलं आणि तिचे ऐकत बसला, माधव परत म्हणाला शिव मी तुझ्याशी बोलतोय तरी त्याने तेच केलं. अतिशय mannerless होतं ते. माधव चिडला ते बरोबर होतं पण शिवने उलट चिडून ग्लास फोडला.

वीणा काही तोडत फोडत नाही, बकबक करत बसते. हिलाच महत्व द्यायचं आणि हिचेच ऐकायचं आणि मग रडते शिवकडे जाऊन.

दोघेही सर्वात लहान आहेत घरात तर task व्यतिरिक्त बालिशपणा जास्त. वीणा जास्त बालिश शिवपेक्षा.

मला रुपाली आणि विणाचं जे चाललं होतं ते पण आवडलं, म्हणजे विणाने नंतर रुपालीला मनवण्यासाठी जी डायरेक्ट मिठी मारली आणि नंतर परत तिच्या वर रागवत होती, छान बॉंडिंग वाटतं दोघींमध्ये

छान बॉंडिंग वाटतं दोघींमध्ये >>> हो आहे छान पण वीणा बरेचदा गृहीत धरते तिला. शिव कसा grp ला पण वेळ देतो, ऐकतो. ही फक्त शिवचं ऐकताना दिसते किंवा आपल्याला तेच दाखवतात.

वीणा आणी रुपालिचे बॉंडिंग आहे छान पण वीणा रुपालीला फार गृहित धरते. त्यांचे भांडण वेगळ्याच कारण वरुन चाललेले आणी बाहेर सुरेखा ताईंचे काहितरी वेगळाच की मी जे गाणे गायले आणी शीव आणी विणा ने त्यावर डांस केला तो पब्लिक ला आवडला असणार म्हणून जळून भांडण करत आहेत रुपाली . Biggrin

किशोरी ताई जर पराग बरोबर नसत्या तर चांगला गेम खेळल्या असत्या.
त्या सकाळी 'शुभ सकाळ बिग्ग बॉस' बोलतात ते आवडते मला.

सुरेखाताईचे कसं शिव लाडका मुलगा आणि वीणा कजाग सून. त्याही जेलस झाल्या असतील डान्सवरून पण रुपाली पण खूप काम करत होती पण तिने कधी ज्या ऑर्ग्युमेंटस केल्या त्यावरून काही star गेले.

ते एकत्र यावं घराने वगैरे काही होणार नाही, आपापसात grp मध्ये पण नाहीयेत एकत्र.

वीणा कशी समोरच्या grp मध्ये जाऊन बोलते तशी स्मिता करायची पण पु स ला ती आवडायची नाही आणि मेघा तिच्याशी बोलायची, त्याचं छान जमायचं.

मग नंतर बाहेर येऊन पु आणि स दोघे आमचं चुकलं स्मिता खूप चांगली आहे स्वभावाने आम्ही तिच्याशी मैत्री केलीच नाही असं बरेचदा सांगितलं. ती तर target होती तुमची घरात सतत.

जानेदो हम स्मिताको भूल नही सकते, शायद अगले सिझनमे शिव वीणाको याद करेंगे Lol

Pages