बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नेहाच्या डोक्यातून अशाच घातक आयडिया येतात मात्र.
<<<
घातक काय, बिबी रुल्स चेन्ज करतो त्याला नेहा काय करणार ?
मागच्या सिझनला डंबेल्स चालल्या, यावेळी ऑब्जेक्शन घेतलं म.मांनी !
वजन चालत नाही पण तरी पराग उठून गेला नाही , सहन करत बसला आणि हि लॉस्ट इट, नेहा जिंकली फक्त टास्कच नाही तर त्याला घालवण्यात हे सगळ्याचं तात्पर्य आहे.
नेहा टास्क क्वीन आहे , खूप फोकस्ड आहे हे मानलं पाहिजे.

फोटो फाडतानाचं केळकरचं फेक रडणं विसरलात का? मांजरेकरही बोललेले त्यावर.
रूपाली फेक आहेच.

मला तो हरावा असं वाटतं कारण तो म्हणाला मला प्रत्येक आठवड्यात कप्तानपद हवंच आहे. तेही इम्युनिटीसाठी?
यानेच इम्युनिटीवर भारुड रचलेलं ना? परागला समोर ठेवून.

किशोरी आत्ता खुपच बिचारी वाटायला लागलिये. जावं तिने आता घरी. (आणी कोणाला काढायचं असेल तर वैशालीला काढा आता, आळस येतो मला तिला पाहिलं की)

नेहा टास्क क्वीन आहे , खूप फोकस्ड आहे हे मानलं पाहिजे. >>> आहे नक्कीच आहे पण त्रासदायक आयडियाचं आणते. त्यादिवशी शेवटी washing powder फेकत होते वीणावर मग स्वतःच कबुल केलं वीणासमोर मी असं केलं तरी वीणा टिकली.

तिचे बघून बाकीचे तिच्या वर घातक आयडिया राबवायला जातात.

नेहिलख बिग बॉसने टास्क चालू असताना बोलवून सांगितलेलं, इजा पोचवू नका. का?
त्यावर ती म्हणाली की आम्ही नाहीच पोचवत. Didn't she get the message?या टास्कचा दुसरा भाग झाला असता, तर त्यांच्यावर ते सगळं उलटलं असतं.
जर बळाचा वापर चालतो, तर नेहा पडली तेव्हा शिवला नॉमिनेट का केलं?

परागने एक चूक केली, ती झाली नसती तर डाव नेहावर उलटला असता, त्याने ते उगाच केलं असं वाटतं. सर्व बाजी त्याच्या बाजूने होती badluck. नेहाने bb चं ऐकलं नव्हतं पण ती लकी आहे नेमका परागने गुन्हा केला आणि ती सुटली .

कधी कधी bb पण नेहाच्या बाजूने वाटतात, दुसऱ्यांनी चूक केली तर कडक बोलतात, ही ऐकत नाही तर कडक action घेत नाहीत.

नेहा स्वत: कितीही खालच्या थराला जाऊन task खेळली तर तिच्या दृष्टीने ते योग्य असतंच, दुसरे गेले कि आरडाओरडा.

तिला तिच्या ह्याच वागणुकीमुळे सो मि वर फार पाठींबा नाहीये, task क्वीन असली तरी.

पण तरी आता मला वाटतंय कि bb तिलाच विनर करतील. तिच्या मार्गातले अडथळे आपोआप दूर होतायेत काही न करता.

अर्थात पराग जाण्यात तिचा मोठा हात आहेच. पण एनीवे हाच गेम आहे, परागने असं वागायला नको होतं.

शिव वीणाला सपोर्ट करत जिथे तिथे वाद घालायला जातोय त्याबद्दल त्याला नावं ठेवतायेत. शिव वीणा मुर्खासारखे का भरकटत चाललेत. गेम खेळा.

ह्या सर्वात माधवला पुढे जायचा चान्स नक्कीच आहे त्याने डोक्याने खेळावं. सो मि वर चार मध्ये माधव कालपासून जास्त आवडायला लागलाय. म मां नी पण त्याचं सतत कौतुक करून त्याची प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न केलाय. फायदा घ्यावा त्याने. आळस झटकून dashing व्हावं थोडं.

ह्या सर्वात माधवला पुढे जायचा चान्स नक्कीच आहे त्याने डोक्याने खेळावं. सो मि वर चार मध्ये माधव कालपासून जास्त आवडायला लागलाय. म मां नी पण त्याचं सतत कौतुक करून त्याची प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न केलाय. फायदा घ्यावा त्याने. आळस झटकून dashing व्हावं थोडं.>सहमत

वीणा चा attitude एकदम चुकीचा आहे . तिने स्वता: वैशाली आणी अभिजित केळकर शी बोलायला सुरुवात केलेली ते चालते.आणी स्वता: एकटी खेळणार असे बोलले तर चालते. आणी रुपाली माधव आणी नेहा शी बोलत असताना हिला कशाला एवढा त्रास होत होता. रुपालिला एकटे खेळायचे आहे का खेळू दे असे बोलत होती. वीणा ला स्वता: कसेही वागले तर चालते पण रूपाली ने नाही वागायचे.
वीणा पेक्षा हीना बरी वाटते मला .
रुपाली आणी वीणा ने किशोरिला एकदमच स्वतापासुन तोडून टाकले.
callerऑफ़ the वीक ने वीणा आणी शीव च्या जोडी चे कौतुक काय केले लगेच डोक्यात हवा गेली.
आपल्याच दोघांच्या मागे का पडलेत म्हणे सगळे बाई तुम्ही दोघे एकमेकाच्या मांडी वर डोके ठेउन झोपा काढत होता. आणी बिग्ग बॉस ने शिक्षा केली होती तर त्याचा जराही सीरियसनेस्स नव्हता. म ओरडणार च ना तुमच्या नावाने.
आणी वीणा ला वाटते की काल च्या फोनमुळे सगळे असे वागत आहेत खर रुपाली ला शीव वीणा चे एकत्र असणे सुरुवाती पासुन आवडत नाही.
वीणा स्पष्टवक्ती नाही उधट आणी भांड़खोर आहे.
शिवला झोपवयाला वेळ आहे हीला पण किशोरी ताई शी बोलायला नाही.

चला, आज दीड महिन्यानी बिबॉला झोपेतून जाग आली, फायनली “नॉमिनेशन्स डिस्कस करायला परवानगी नाही“ रुल अप्लाय केला !
इतके दिवस सगळी नॉमिनेश्न्स डिस्कशन्स जोरजोरत चालायची आणि बिबॉ झोपा काढत होते !
बाकी मला सध्या एकही स्पर्धक पॉझिटिव वाटत नाहीये, शिव आणि वीणा पेअर अजिबातच आवडत नाहीये, अत्यंत अनॉयिंग फेक रोमान्स तेही मैत्रीचे नाव देत, सारखे मॅचिंग कपडे घालणे , तिशीचे घोडे असून चाइल्डीश वागणे, अतिशय भंपक मार्गाने चाललेत दोघे, नॉट विनर मटेरिअल अ‍ॅट ऑल !
या सिझनला कोणीही आवडतय म्हणायची सोय नाही, लग्गेच माती खातात Uhoh
शिव वीणा दोघेही माझ्यासाठी बाद विनरच्या स्पर्धेतून.
त्यापेक्षा माधव, हिना बरे वाटायला लागलेत आता मला, >>या दिपांजली च्या पोस्ट शी पुर्ण पणे सहमत .
बिग्ग बॉस त्यांच्या मर्जी प्रमाणे जागे होतात आणी झोपतात. कहीच घडत नसले की जागे होतात. ते जागे झाल्यावर लोक भांडायला मोकळी. भरपुर घडत असेल तर झोपा काढतात.

वीणा स्पष्टवक्ती नाही उधट आणी भांड़खोर आहे. >>> हो खरं आहे. पण ती हीनापण एक नं भांडखोर वाटते मला Lol

मला हीना नाही तेवढी आवडत, तिचे ड्रेसेस पण फार क्वचित बघण्यासारखे असतात, इरीटेट मला ती अति करते. ती मला फक्त हॉटेल task मध्ये आवडली. एका शनिवारी साडीत ग्रेसफुल वाटली.

शिव वीणा अतीच चाललय, bb पण अति दाखवतायेत. अर्थात आपल्याला दीड तास दाखवतात. बाकी आपल्याला माहिती नसतं.

त्यांना सगळे लक्झरी आयटम्स काढून घ्यायचे होते, त्याची पूर्वपीठिका होती ती.
नुसतंच हे टास्क आहे म्हटलं असतं तर मजा आली नसती. म्हणून त्यांना घाबरवायला.

हीनापण एक नं भांडखोर :::: हीना ही असेल भांड़खोर पण तिची समजावण्या ची पध्दत आवडते मला ती रुपाली ला ही रात्री मस्त समजावत होती की तू किशोरी ताईंशी बोलत जा. काही आवडले नाहितर सांग पण बोलत जा.

त्यांना सगळे लक्झरी आयटम्स काढून घ्यायचे होते, त्याची पूर्वपीठिका होती ती.
नुसतंच हे टास्क आहे म्हटलं असतं तर मजा आली नसती. म्हणून त्यांना घाबरवायला.:: exactly
पण तरिही काही सदस्यानी दुर्लक्ष केले .

हा जर task असेल तर मग वीणाने बरोबर ओळखलं आहे. नाहीतर ती चुकतेय.

तिचा attitude चुकीचा होता पण ती म्हणाली ते योग्य होतं ना कि एरवी घर किती भरलेले असते, किती खात पीत असतो, जरा असं खायला लागलं तर चेहेरे लगेच का पाडून बसायचं. अर्थात शिक्षेचा सिरीयसनेस असावा पण अगदी सुतकी चेहेरे पण नकोत. पण तिने सगळ्यांनी घरी जा खायचं नसेल तर हे म्हणायला नको होतं आणि bb ने लगेच तिला टोकायला हवं होतं की ते तू कोण सांगणार. म मां नी तरी बोलायला हवंय तिला.

बरं आत्ता हे सगळे शिक्षेचा सिरीयसनेस दाखवतील आणि परत अनादर करतील bb चा. सगळे तसेच आहेत.

काल काय झालं .. जमलं तर हायलाईट थोडक्यात सांगा ना.. हल्ली रात्री खूप लेट अपलोड करतात .. तसही मी २ दिवस मागे आहे ..
रुपाली झाली का कॅप्टन ?सर्वानुमते ?! टास्क नव्हता का ?!

मला हीना नाही तेवढी आवडत, तिचे ड्रेसेस पण फार क्वचित बघण्यासारखे असतात, इरीटेट मला ती अति करते. ती मला फक्त हॉटेल task मध्ये आवडली. एका शनिवारी साडीत ग्रेसफुल वाटली.>>>हो खर बिचुकले गेल्या पासुन तिचा गेम सुधारला आहे. वीणा सारखी बालिश वागत नाही ती. जे मुद्दे मांडते ते योग्य असतात.कपडे मलाही आवडत नाहित तिचे कधी कधी.

हा टास्क नाही आहे शिक्षाच आहे . पण कोणत्या गोष्टी परत वगैरे पाहिजे असतिल तर सदस्याना कोणता तरी त्याग करयला लावतील. किन्वा रुपाली आणी केळकर ला captaincy task मध्ये पॉईंट्स कमी करायला सांगतिल सामान परत मिळवण्यासाठी.

ह्यावेळी मी का बघतेय वाटायला लागलं, इतका बोअर चाललाय सिझन. एकदा बघितलं की सवय होते. आत्तापर्यंत तरी task क्वीन आहे नेहा आणि bb पण तिच्याच बाजूने आहे आणि प्लस नशीब तिच्या बाजूने आहे. हे सर्व बघून तीच जिंकेल हे नक्की आहे.

पण माणूस म्हणून इतकी चांगली नाहीये ती, ते मार्क्स माधवकडे जातील सध्यातरी.

कालच्या एपिसोड मध्ये वीणा शीव वैशाली केळकर nomination ची चर्चा करत होते म्हणून बिग्ग बॉस त्याना ओरडले. नंतर शीव वीणा च्या मांडीवर डोके ठेउन झोपा काढत होता आणी थोड्या वेळाने वीणा शीवच्या मांडीवर डोके ठेउन झोपा काढत होती म्हणून कोंबडा वाजला. वैशाली झोपलेली म्हणूण कुत्रा भुंकला. माधवने आणी हीना ने माईक घातले नाहित म्हणून warning मिळाली. शेवटी सगळे नियम मोडत आहेत असे बघितल्यावर बिग बॉस नी किचन मधले सगळे सामान काढून घेतले. फक्त बेसिक ठवले तांदुळ डाळ. बिग्ग बॉस ची माणसे अलेली मास्क घालुन ती सगळे घेउन गेली.
सगळ्यानि बिग्ग बॉस ची कान धरुन माफी मागितली.
बिग्ग बॉस मे म्हटले माधव कैप्टन होता म्हणून याला त्याला जबाबदार ठरवावे का.? तर घर चे बोलले सगळे जबाबदारआहेत . माधव बोलला की आज सकाळ पासुन भरपुर चुका झाल्या आहेत एका दिवसात होणार्या अर्धा दिवसात झाल्या आहेत . तर तिथे वीणा ने उगीच त्याच्याशी वाद घातला की महिन्या भरच्या चुकांची ही शिक्षा आहे आज ची नाही.

सो मि वर चार मध्ये माधव कालपासून जास्त आवडायला लागलाय.>> मला तर तो पहिल्यापासुनच चांगला वाटतोय शिवानी असल्यापासुन... जास्त कुणाच्या भांडणात जात नाहि.. अन ममां म्हणाले तसा भोळा आहे तो.. त्यादिवशी झाडु मारताना घरच्यांची आठवण काढुन स्वत:च गहिवरला होता..

मला माधव सारखा बिचुकले सोबत रहायचा म्हणून आवडत नव्हता. पण आता तो चांगला गेम खेळू शकतो. त्याने जरा स्पष्ट पने आणी नीट स्टँड घेतला पाहिजे .

मला माधव सारखा बिचुकले सोबत रहायचा म्हणून आवडत नव्हता. पण आता तो चांगला गेम खेळू शकतो. त्याने जरा स्पष्ट पने आणी नीट स्टँड घेतला पाहिजे . >>> मम.

मला माधव सारखा बिचुकले सोबत रहायचा म्हणून आवडत नव्हता. पण आता तो चांगला गेम खेळू शकतो. त्याने जरा स्पष्ट पने आणी नीट स्टँड घेतला पाहिजे . >>> मम.>>मी पण मम Wink

पराग गेल्याचा फायदा शिवला जास्त झाला होता, तो चमकला होता पण तो आता भरकटत चाललाय आणि ह्याचा फायदा माधव करून घेऊ शकतो. सर्व फोकस स्वत: वर घेऊ शकतो.

Pages