बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

थैंक्स धनुडी.
एकदाचा झाला कैप्टन.
नोमीनेशन जर cancel झाले या वीक मध्ये तर रडायला लागेल तो Lol

केळ्या जिंकला का. म्हणजे त्या ढोंगी रुपालीने वैशालीचा टोमणा ऐकून फोन हँग अप केला ? काय हे एकेक केव्हिआर चे वीर. एकाच्यात पण जिंकायची ताकद नाही!

हो, मलाही केळ्या जिंकला ते बरं वाटलं!
केळ्या आणि रुपाली दोघे फेक आहेत यात वाद नाही पण रुपालीचा फेकनेस इज अनादर लेव्हल, तिच्या समोर कोणीही स्पर्धक असता तरी तोच जिंकवासा वाटला असता, अगदी किशोरीही !
केळ्या अ‍ॅट लिस्ट त्याच्या २ मित्रांशी लॉयल आहे , रुपाली तिथेही सोयीस्करपणे दलबदलु-डिसलॉयल आहे, एकही पैलु खरा नाहीये तिच्या व्यक्तिमत्वाचा, टास्क मधे शून्य आणि डोक्याने बिनडोक.
इन फॅक्ट या सिझनमधे खरी मैत्री कोणाची दिसतेय ती केळ्या आणि वैशालीची,(मेजॉरीटी पब्लिकला जे व्हिलन वाटतात ), शिवही ट्रायो छान कंप्लिट करतो, हे तिघे अजुन तरी एकत्र आहेत , इतर अनेक फेक गृप्स, ड्युओ, ट्रायोज बनता बनता मोडले/ दररोज मोडतात !

रूपालीने फोन ठेवला नाही. तिचा पहिला टर्न होता. तिच्यापेक्षा (म्हणजे तिच्या वेळी बझर वाजेपर्यंत जेवढा वेळ गेला त्यापेक्षा) जास्त वेळ अभिजीतने फोन चालू ठेवला म्हणून तो जिंकला. प्रोमोत रूपाली पडताना दाखवली, ती बझर वाजल्यावर पडली होती.
जो दुसरा टर्न घेईल तोच जिंकेल हे उघड होतं.

टास्क संपल्यावर शिवला , आपण कोणाच्या कॅरॅक्टरबद्दल खालच्या पातळीला उतरून बोलू नये, असं वाटायला लागलं. ते अर्थातच हीनाने अभिजितबद्दल जो अँगल पकडला त्याबद्दल होतं. आणि हे सगळं तो हीना नसताना बोलू पाहत होता. पण वैशालीने गलिच्छ , फालतू इत्यादी विशेषणे वापरल्याचे सांगितल्यावर आपल्याला ते माहीतच नाही, असं त्याने दाखवलं.

हो ना भरत, शिव वैशालीला काहीच बोलला नाही. वीणाला खरोखर रडू येत होतं.

वैशाली हिना खालच्या लेव्हलला उतरून भांडखोरपणा करतात.

नेहा काल रडली, तेव्हा मला जाम वाईट वाटलं, ज्येन्यूईन वाटली.

रुपाली वीणा भांडतात, एक होतात पण किशोरीताईला वेगळंच केल्यासारखं केलंय.

माधव मस्त खेळायला लागलाय.

हिना सगळ्यांची सल्लागार झालीय, कधी कधी योग्य सल्ला देते.

काल वैशालीला पण रुपाली, वीणात समेट व्हावा असं वाटत होतं, ती योग्य सांगत होती. केळकर म्हणाला आपण नको मध्ये पडुया, त्यांना ठरवुदे.

वीणा छान दिसत होती, ती दिसते बरेचदा ग्रेसफुल, तिचा ड्रेसिंग सेन्स हिनापेक्षा छान आहे असं माझं पर्सनल मत, फार काही समजत नाही पण डोळ्यांना छान दिसतं.

रुपाली आणि केळकर दोघांनी टास्क छान केला, सोपा होता तसा, केळकरने जास्त छान उत्तरं दिली आणि एन्जॉय केलं सर्व, त्याचं खूप दिवसांचं स्वप्न पूर्ण झालं.

ह्यातही दुसऱ्या टीमला चान्स होता जास्त.

वीणाचं रूपालीला आधी हाडहुड करून मग तिच्या गळ्यात पडून रडणं दुसर्‍यांदा होतंय.
एवढंच प्रेम आहे आणि गेमही खेळायचाय तर बाहेर पडेपर्यंत प्रेम सांभाळून ठेवायचं.

आता हाउसमेट्स पैकी लिटरली मला कोणीही आवडत नाहीए. यांच्यापुढे हीना सॉर्टेड वाटायला लागलीय आणि तिचं मराठी धड नसल्याने तिला जास्त कुसकेपणा जमत नाहीए हा पण अ‍ॅड्व्हांटेज.

रुपाली च्या टीम्ला तसंही फार बोलता येत नव्हतं. उमेदवारानी हॅलो ऐकू येत नाही म्हणाण्याच्या ऐवजी छाळ करणारेच हॅलो हॅलो म्हणत होते Lol केळ्यानेच त्यांना छळले उलट वार करून. नाही म्हणायला हिनाने जरा इन्सल्ट शोधला बायकी असणे वगैरे. अर्थात दुसर्‍यांदा खेळणार्‍याला अ‍ॅडवांटेज होता पण तरी रुपालीच्या टीम मधे वैशालीसारखं दात ओठ खाऊन कुणाला बोलता आलं नाही आणि रुपालीला केळ्याप्रमाणे उलट वार करता आले नाहीत हेही खरे. अगदीच प्रेडिक्टेबल टास्क!!
शिव वीणा ही महा बोर होत आहेत आणि वीणा रुपालीचे फेक प्रेम पण. केळ्या, वैशाली पुढे जातील पण विनर होणार नाहीत. दुसरीकडे नेहा मात्र एकटी वगैरे पडून सहानुभुती + टास्क पर्फॉर्मन्स च्या जोरावर आघाडी घेऊ शकते.

केळ्या आणि वैशाली पक्के आतल्या गाठीचे आहेत.
एकमेकांचा कधीही काटा काढू शकतात हे त्यांनाही महित्येय..
खरी मजा अशा टास्कमध्ये केळ्या आणि वैशाली विरुद्ध टीममध्ये असतील तेव्हा येईल.
बिग बॉसपण रोजच्या equations नुसार टीम बनवतो..

दुसरीकडे नेहा मात्र एकटी वगैरे पडून सहानुभुती + टास्क पर्फॉर्मन्स च्या जोरावर आघाडी घेऊ शकते. >>> काल रडली तेव्हा माझीही सिंपथी घेतली तिने. माझे वोटस तिला जातील का नाही सध्यातरी शंका आहे. मी तसं फार वोटींग करत नाही. मागे शिवला दोन, वीणाला एक दिलं.

बिग बॉसपण रोजच्या equations नुसार टीम बनवतो..>>>>>हो
यार, बि बॉ लक्षच ठेवून असतात, कोणाचं बिनसलं? लगेच हवा देतात,आग वाढवायला.

मलाही नाही वाटत कारण काल वैशाली तिला घा पा बोलत होती तर खरोखर वीणाला वाईट वाटत होतं.>>>>>>हो ना, पण आता तरी विणाला वैशाली चा कुजकट स्वभाव कळावा! वैशाली च्या बोलण्यात विखार जाणवत होता.
टास्क म्हणून ठिके, पण ती एरवी ही तेवढा कडवटपणा मनात ठेवून असते

मला नाही वाटत विना ल रुपाली ट्रस्टवरथी वाटेल कधी - विनाबध्दल तिने सर्वाना जाऊन बऱ्याच शिव्या घातल्या आहेत आणि हे विना ला कळले आहे

कालचा भाग नाही पाहिला,दुपारपासून मँच बघितल्याने रात्री परत नाही लावला टीव्ही.
पण कमेंट्सवरून आणि जे काही प्रोमोज पाहिले त्यावरून कळतय की इमोशनल ड्रामा जास्त असावा.
नेहाने भरपूर सिंपथी मिळवली असली आणि केळकरच्या विरोधात असली तरी मला नाही वाटत की ती वैशालीच्या विरोधात जाईल कारण माधव आणि हीनासोबत टास्क जिंकण हे तितकस सोप नाही हे लवकरच तिला कळेल.
माझ्यामते एक नाही दोन वाईल्डकार्ड एंन्ट्रीजची गरज आहे आता.अर्थात त्याने काही फरक पडणार असेल.तर.
नॉमिनेशन्स अजूनही झालेली दिसत नाहीत,कारण वूट जत्रामध्ये ऑप्शन येत नाही.
म्हणजे केळकरची कँप्टन्सी वेस्ट जाईल जर वोटिंग बंद ठेवल तर.
काल जो प्रोमो पाहिला त्यात रुपाली म्हणत होती की माझ्याकडे शिवसारखा मित्र नाही,म्हणजे हिच्यासाठी पाठवणार आहेत का वाईल्डकार्ड?
तस असेल तर मग बिबॉसला कंटाळा आला शिव वीणाचा.
वीणाला आता जरा सिक्रेटरुममध्ये पाठवाच.म्हणजे वैशाली काय आहे ते कळेल.

अरे काय अजुन भडके उडतील असं वाटलं पण सौम्यच झलं टास्क !
आम्ही श्रीसन्त, मेघाचे फॅन्स ! त्यामुळे ‘ फालतु, गलिच्छ ‘ वगैरे शब्द आम्हाला शिव्या वाटत नाहीत, याहून वाइट अपमान श्री, मेघाने केले होता समोरच्याचे आणि तरी ते दोघेही त्यात्या सिझनला माझे फेवरेट होते !
असो, पण पुन्हा एकदा केळ्या आणि वैशालीनेच बाजी मारली, सोशल मिडीयावर वै आणि केळ्या दोघांना ट्रोल करतायेत या टास्कवरून म्हणून पुन्हा एकदा मराठी ऑडीयन्सला रिअ‍ॅलिटी चेक ची गरज आहे असं माझं मत!
हे व्हर्बल व्हॉयलेन्स टास्क झेपत नाहीये/आवडत नाहीये तर का पहाताय बिबॉ? इट्स नॉट फॉर यु !
बिबॉने टास्कच्या नियमावलीत ‘वाट्टेल ते बोलून समोरच्याला फोन ठेवायला भाग पाडायचय‘ असे क्लिअर म्हंटले होते, अगदी मुद्दामच राडा व्हावा हेतूनेच , व्हॉट एल्स वरणभात ऑडीयन्स एक्स्पेक्टेड ?
वैशालीमुळे त्या टिमला ते टास्क झेपले, वीणा - शिव अगदी सौम्य होते , वेल प्लेड वैशाली अँड केळ्या !
असो, केळ्याने तर सगळ्यांवरच , विशेषतः बायकी मुद्द्यावरून तर जोरदार प्रतिवार केले, हिनानेही चांगला प्रयत्नं केला !
हिनाचा ड्रेस आवडला मला, बाकी सगळे फार सामान्य !

डीजे तसं बघायला गेलं तर हीना एकाच मुद्दयावर बोलत बसली, तोच तोचपणा वाटला. वैशालीने बरेच विविध मुद्दे घेऊन छान झोडायचा प्रयत्न केला. टास्क दृष्टीने विचार केला तर खरंच वैशाली आणि केळ्याने उत्तम केला.

फालतू, गलिच्छ याला नेहाने ऑब्जेक्शन घेतलं होतं. गेल्या आठवड्यात तिला सगळ्यांनी धुतल्यामुळे ती वरणभातावर आली वाटत़.
शिवतर भावाची शप्पत म्हणाला आणि त्याला हिनाने अभिजीतबद्दल बोललेलं आवडलं नाही, म्हणजे तो दूधभात असावा.

गुड पोस्ट आणि निरीक्षण भरत.

स्पर्धक वरणभात, दुध भात झाल्यावर. प्रेक्षकांना वरण भात म्हणून नावं ठेवण्यात काय अर्थ आहे.

चला वरण भात प्रेक्षकांनी स्पर्धकांना तसं करायला भाग पाडले, नेहा सारखी ताळ्यावर आली असं म्हणायला हरकत नाही Wink .

आताच यूट्युबवर डीएसके टॉक्स पाहिल.
त्यांच अस म्हणण आहे की वीणा आणि शिव जे मँचिंग कपडे घालतात किंवा जे रुपाली वीणाच रुसवे फुगवे वैगरे आहेत ,ते इनपूट्स त्यांना आतून दिले जातात.
काचेच्या पलीकडे 100लोक मानिटर करत असतात,टास्कच्या तयारीच्या निमित्ताने किंवा,पँन्ट्रीजमध्ये जाण्याच्या निमित्ताने जे लोक येतात तते संदेश घेऊन येतात.काय करायच आहे.
एकंदरीत त्यांच अस म्हणण आहे की हा बर्यापैकी स्क्रिप्टेड शो आहे.
खरखोट माहित नाही.

>>केळ्यानेच त्यांना छळले उलट वार करून.

अगदीच!
त्याला प्रत्येकाची दुखरी नस माहीत आहे आणि तिच दाबली त्याने..... नेहाला तुझ्या मित्रांचा तुझ्यावर विश्वास नाही, तू स्वताची सोय फक्त बघतेस म्हणाला, किशोरीला एकटे पडण्यावरुन बोलला, हीनाला शिवचे नाव घेउन टीझ केले..... त्यामुळे छळायला गेलेले आपसूक डीफेंसिव मोड मध्ये गेले
नाही म्हणायाला हीनाने तो केळ्याचा बायकीपणाचा मुद्दा मस्त पकडला होता..... केळ्यासारख्याच्या चेहऱ्यावरचे भाव पण खर्र्कन बदलले होते पण त्याने सावरले स्वताला..... हीनाने जरा अजून खेचले असते नीट तर कदाचित उचकला असता तो.... पण त्याने फोन नक्कीच ठेवला नसता..... आणि मग ते जरा अग्ली लेव्हलला गेले असते आणि वीकेंडला मांजरेकरांकडून शिव्या पडल्या असत्या तिला!
वैशाली चांगली खेळली पण रुपाली तिला पुरुन उरली..... शिव वीणा तर अगदीच फुसकेपणाने उचकावत होते तिला

इलिमिनेशन नसेल तर केळ्याचा फार मस्त पचका होईल.... पण तो इतका चिवट आहे की मला कॅप्टनसीचा फायदा मिळाला नाही म्हणून परत पुन्हा जेंव्हा जेंव्हा संधी येईल तेंव्हा तेंव्हा अडून बसेल
(अवांतर: केळ्या बिग बॉस मध्ये आल्यापासून त्याची ती सपट लोशन ची जुनी जाहिरात परत TV वर यायला लागलीय)

ते मागचा टास्क हरणाऱ्या टीममधले दोघे जण सरळसरळ नॉमीनेट होणार होते त्याचे काय झाले? विसरले का बिग बॉस?

स्पर्धक वरणभात, दुध भात झाल्यावर. प्रेक्षकांना वरण भात म्हणून नावं ठेवण्यात काय अर्थ आहे.+१११११
आणि तसही इतकं पण बीभत्स मराठी प्रेक्षकांना चालत नाही नाहीतर राजेश आणि रेशम चे स्क्रिप्टेड प्रेमचाळे चालले असते कि लोकांना आणि गेल्या सिझन मध्ये नंदकिशोरने त्याचा टास्क चोख करूनही त्याला पब्लिकने घाल घाल शिव्या घातल्या नसत्या. प्रेक्षकांना बघायचा तर आहेच पण जे पचेल आणि पटेल तेच द्या असं प्रेक्षकांच म्हणणं .

Pages