बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ते एकत्र यावं घराने वगैरे काही होणार नाही>> हो बिग्ग बॉस ला पण ते नकोच आहे . उगीच सांगायाचे आहे म्हणून सगळे तो सल्ला देतात.
शर्मिश्ठा ने तुपा वरुन उगीच स्टार कट केला. ते तुप जूने आणी वापरलेले होते . सो यूज़ नाही केले. त्यात एवडे काय.

सगळे आपापल्या परीने काम करत होते. काही तरी कमी जास्त होतच अचानक. दुसरं काही तरी काम करायला गेस्ट कडून बोलावलं जात. किशोरी पण तेच रडत होती कॅमेरासमोर . कुणालाही कौतुक नाही असं . सुरेख ताई पण तेच . चालायचंच .

शिव दोन्ही कडे गुड बुक्स मध्ये रहायचा प्रयत्न करतोय इकडे वीणा तिकडे वैशाली. म्हणजे कमी जणांकडून नॉमिनेट होईल अशी आयडिया आहे बहुतेक त्याची . वैशालीला काय अगदी सॉरी बिरी डिश वर लिहून बहाल केलं आणि वीणाला बदाम नेहमीप्रमाणे .वैशाली तर मी काही "वांग" नाही वड्याचं तेल वांग्यावर काढायला म्हणून त्या केळकर बरोबर तणतणत होती . मी नाही कोणाचं ऐकून घेणार . हॅट . इत्यादी इत्यादी . शिव का वैशालीच्या पाठी पाठी करतो ?

आजच्या एपिसोड मध्ये मांजरेकर कोणत्या मुद्द्यांवर बोलणार काहीच नाही आहे बोलायला. Biggrin आज कोण जाईल मला सुरेखा ताईच वाटतं आहेत.

>>शिव का वैशालीच्या पाठी पाठी करतो ?<<
घरातली खरी मास्टरमाइंड वैशाली आहे. विरोधक तिला पाताळयंत्री, संधीसाधु म्हणत असतील तर ती गेम बरोबर खेळत आहे. नेहाचा पत्ता कट करण्याकरता तिने फासे टाकलेले आहेत. बघुया काय होतं ते. तिची भाषा मलातरी जड वाटली नाहि; विशेषतः आस्तादच्या तुलनेत... Happy

सोय सॉस, सॉल्टेड बटरची आय्डिया रुपालीची म्हणुन दाखवली पण क्रेडिट पात्र टीम बीला यामागचं गौडबंगाल कळलं नाहि. एडिटिंग टीमच्या डुलक्या?..

खरतर या वेळी या शोची भट्टीच बिघडली आहे,बिबॉ त्यांच्या परीने हर प्रकारे प्रयत्न करत आहेत.मग ते शिवानीच ओरडण,लाथ मारण,परागला त्रास देण असो,बिचुकलेंच्या शिव्या असो,शिव वीणाच स्पेशल बॉंन्डिग असो,पराग प्रकरण असो,गेल
यावेळचे सदस्य आणण असो अथवा सुरेखा किशोरी फाईट असो
भट्टी काय जमी नही.
ममांचाही इंटरेस्ट कमी व्हायचा अशाने.
आटपता घ्यावा शो.

ज्याअर्थी एव्हिक्शनबद्दल काहीच आल नाही त्याअर्थी सुपु बाहेर गेल्या नसाव्यात.म्हणजे किशोरी किंवा वैशालीपैकी जाणार का.
पण माझ्यामते सुपुनी जाव नाहीतर आऊंसारख्या राहतील आणि ट्रॉफीही जिंकतील....हाहा

कालचा वीणा रूपाली मूमेंट गोड होता. मी आत्ता पाहतोय.

हे लोक एकमेकांबद्दल पझेसिव्ह व्हायला लागलेत. शिव वैशाली...तेच होतं.

>>मी तिची पहिली सिरीयल बऱ्यापैकी follow केली होती, व्हिलनचं होती त्यात. स्टार प्रवाह वर लागायची महेश कोठारे यांची होती.

मन उधाण वाऱ्याचे
शर्मिष्ठाच्या पात्राचे नाव नीरजा होते आणि ती ओरिजनल नीरजाची रिप्लेसमेंट म्हणून आली होती
नेहा गद्रेच्या पात्राचे नाव गौरी होते

सोय सॉस, सॉल्टेड बटरची आय्डिया रुपालीची म्हणुन दाखवली पण क्रेडिट पात्र टीम बीला यामागचं गौडबंगाल कळलं नाहि. एडिटिंग टीमच्या डुलक्या?.. >>>> सोय सॉस ची आयडीया नेहाची होती. रुपालीनी कॅमेर्‍यासमोर बोलून क्रेडिट घ्यायचा प्रयत्न केला. पण जेव्हा समोरासमोर बोलणं झालं तेव्हा नेहाच्या टीमनी ही तिची आयडिया असल्याचं सांगितलं. रुपाली व तिच्या टीमनी ऑब्जेक्शन घेतलं नाही.

रुपाली न केलेल्या कामाचं क्रेडिट घ्यायला बघयेय ही तक्रार त्यांच्याच टीम मधल्या सुरेखाताईंनी पण केली कॅमेर्‍यासमोर!

नेहानी टीमला न विचारता स्टार परत करण्याचा निर्णय दिला म्हणून केळ्या व वैशाली पेट्ले होते. पण नंतर तिनी ज्या हुशारीनी हॉट चॉकलेट व सोय सॉसची आयडीया राबवून स्टार परत मिळवले त्याला तोड नाही. तिचा पास्ता आणि सूपदेखील खूप छान झाले होते. केस टाकायच्या आधी शमा कसं ते हावरटासार्खी खात होती.

अर्थात पुष्करची माधवशी असलेली मैत्री पण खूप उपयोगी पडली टीम बी ला. माधव हसला ( सईच्या बोलण्याला ) म्हणून शमानी स्टार काढायला लावला होता, पुष्करनी तो गुपचुप परत लावून टाकलेला पाहिला.

नेहाचा माकडांचा एस्क्यूज मजेशीर आणि सार्कॅस्टीक होता. तसंच स्टार परत करण्याचा निर्णय एकटीचा होता , टीमला जबाबदार धरु नका. हे पाहुण्यांना स्वतः सांगायची तिची हिंमतही आवडून गेली.

आज वैशालीक काहीतरी म्हणत होती की वाईल्ड कार्ड कोणीतरी हंक असेल,कुठल्या संदर्भात होत ते.
नेहा परागच्या ट्रँकवर जात आहे,मला एरवी नाही तसवाटत,टास्कच्या वेळी होते ती थोडी वाईल्ड,पण मग त तर वैशाली पण होते की.

शर्मिष्ठाच्या पात्राचे नाव नीरजा होते आणि ती ओरिजनल नीरजाची रिप्लेसमेंट म्हणून आली होती >>> मला पहील्या भागापासून तीच आठवतेय. मी काही भाग बघितलेले.

मी इथे लिहिलेली कमेंट मांजरेकरांच्या तोंडी आलीय. >>> हो हो, मी म्हणालेपण माबो वाचून गेलेत बहुतेक. भरत यांनी लिहिलेलं अगदी सेम टू सेम.

आपण शिव वीणा म्हणतो, मार्क्स तसेच दिलेत. शिव पहीला, वीणा दुसरी.

आज स्मिताचं कौतुक केलं ममांनी, तिचा स्वभाव मुळ छान आहे तशीच वागली इथेही. मी मधे माधव स्मिता कंपेअर केलेली, तेच म्हणाले ते. माधव असेल फायनलला.

घरातली खरी मास्टरमाइंड वैशाली आहे. विरोधक तिला पाताळयंत्री, संधीसाधु म्हणत असतील तर ती गेम बरोबर खेळत आहे. >>> हम्म्म खरं आहे.

नेहाचा पत्ता कट करण्याकरता तिने फासे टाकलेले आहेत. >>> हे दोघांनी टाकलेत केळकर, वैशाली यांनी.

नेहाचा स्वभाव आवडत नाहीये माधवलाही, आज म मांनी तिला आरसा दाखवला, आता सुधारेल. तिच्या टास्कमधल्या कामगिरीबद्दल काही वेळा कौतुक आहेच. पण डीटर्जंट टाकणं, समोरच्या टीमला कद्रुपणे कमी मार्कस देणं हा खुनशीपणाच टास्क मधला. म मांनी या सर्वांवर बरोबर बोट ठेवलं. करेक्ट बोलत होते, तिलाच नाही, सर्वांना.

शिवचे ते एक वाक्य आपल्यापैकी बऱ्याच जणांना आवडलेलं, त्यावर शिवला task performer केलं परत.

शिवला रुपाली बोलत होती तेव्हा वीणाला कित्ती राग येत होता Lol

https://www.youtube.com/watch?v=vRu8lnBSF1Q

सुरेखा पुणेकर evicted. अपेक्षित होतं.

आज नेहाला टिप्स दिल्या म मां नी कसं वाग त्याच्या, मागे परागला पण ओरडून देत होते टिप्स indirectly. नेहाने बदल करावा स्वतःत, ती फायनलला नक्की आहे. केळकर म मां चा लाडका आहे. वैशालीबद्दल मस्त सांगितलं सगळ्यांना, कॅप्टन रूम मध्ये लोळत ती खरंच कारस्थाने करते. तिच्या बेडवर पण लोळत करत असते Lol

म मांच्या हातात असेल तर शिव वीणा नेहा माधव केळकर वैशाली हे असतील फायनलमध्ये. नंबर पुढे मागे होऊ शकतात.

वैशालीला votes कमी असतील तरी bb ने ठेवलंय तिला. नेहाविरुद्ध वापरायला.

म मां पराग, शिव ला झापायचे तेव्हा एकदम वरच्या टिपेत झापायचे आणि बाकीच्यांना खालच्या सुरात सांगतात.

अक्खा विदर्भ म्हणजे महाराष्ट्र नाही हो, त्यात ती वैशाली जिंकली की तुम्हाला इथला गाशा गुंडाळावा लागेल च्रप्स.

(ह. घ्या.)

भरत ह्यांचे कोणते वाक्य म. मा. नी वापरले?

मी ठरवून नाहि बघितले भाग. मला उगाच सवय नाही लावयचीय टीवीची.

शिव जिंकावा. तो व्यव्स्थित आहे बर्‍याचश्या बाजूने ठिक आहे. टोकाचा जळकट, कुसका आणि संधीसाधू नाहिये. जरासा बालिश आहे. पण ते चालून जातय.
नाहितर एकंदर सगळेच भंगार आहेत. कोणच्चीच प्लेअर म्हणून पण व्यक्तिमत्व नाहिये... अगदीच उथळ आणि आजारी विचारांनी बदबदलेले. तो पराग पण कशाला येतोय? बी अ गुड स्पोर्ट. एकदा बाहेर गेल्यावर काय ते परत घ्या परत घ्या म्हणून.

इथे येवुन वाचेन.

झंपी, इथला खालून दुसरा प्रतिसाद.
हॉटेल टास्कमध्ये कंटेस्टंट्सनी नाठाळ गेस्ट्सशी कसं वागायला हवं त्याबद्दल.

वीणा फार चंचल आहे. मागे परागला हुडूत करायला तिने सांगितलेलं की किशोरी, रूपाली आणि मी असा आमचा तिघींचा ग्रुप होता, तू घुसलास.
अगदी गेल्या शनिवारपर्यंत तिला रूपाली आणि किशोरी दोघी सारख्या होत्या. आज किशोरीला हाकलून शिवला घेतलं.
शनिवारच्या भागातले तिचे हातवारे फार डोक्यात जातात. बाकीचे लोक मांजरेकर समोर आहेत म्हणून जरा अदबीने बोलतात, ही त्यादिवशी एकदम उधळते.
मांजरेकरांनी प्रगतिपुस्तक पुन्हा लिहिलं ते चांगलं केलं. टास्कच्या वेळी निकाल घोषित झाल्यावर फक्त हरलेल्या टीमनेच टाळ्या वाजवल्या होत्या.

नेहाचा फार लवकर पराग करून टाकला या लोकांनी.

किशोरी सतत गुडी गुडी दिसण्याचा प्रयत्न करत असतात मग सुरेखाच्या कौतुक सोहळ्याचा त्यांना का त्रास झाला ते कळलं नाही. आपण मोठ्या स्टार आहोत /होतो हे त्यांच्या बोलण्यातून वारंवार डोकावत असतं. डिझायनर ड्रेसेस, सव्वा लाखाची व्हॅनिटी केस, माझा ऑरा, यंव आणि त्यंव.

सुरेखांनी जेवण वाढल्यावर स्वतःही पाहुण्यांना कसं वाटतंय हे जाऊन विचारायला हवं होतं. इथे प्रत्येक जण स्वतःला चम कवायला आलाय हे त्यांना एव्हाना कळायला हवं होतं आणि त्यांना क्रेडिट कसं दिलंय हे रूपालीचं स्पष्टीकरण पटलं .
टीव्ही टास्कमध्ये किशोरीचं त्यांना समजावणं चुकलं असं वाटत नाही. त्यांनी एकटीनेच मागचा सीझन पाहिला नाहीए. आणि कार्टून, हॉलिवूड, स्लो मो, हे सगळं त्यांना कळलं नसतं.

किशोरीनी वीणा शिवबद्दल टाइमपास म्हटलेलं या दोघांना एवढं का लागावं ? आतापर्यंत तरी त्यात काही सीरियस आहे असं दिसत नव्हतं. परागला या दोघांबद्दल कमेंट करण्यावरून झापलं गेलं होतं.

मला या सगळ्यांत माधव चक्क बरा वाटायला लागलाय. तो आता त्याला वाटेल तिथे आपलं मत स्पष्टपणे आणि खंबीरपणे मांडूही लागलाय , जिथे सामोपचार हवा, तिथे तेही आहे. त्याच्या एकट्यातच पॉझिटिव्हिटी दिसते. हिंदी बिग बॉसमध्ये प हिल्या सीझनला राहुल रॉय असाच होता आणि तो अनपेक्षितपणे जिंकला होता.

शिवपण विदर्भाचाच आहे की. तेव्हा अख्ख्या विदर्भाची मते (या आधारावर मतदान होऊ नये आणि होत नसावं) वैशालीला एकटीला काय म्हणून?

Pages