बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मला या सगळ्यांत माधव चक्क बरा वाटायला लागलाय. >>> मलाही बरा वाटतोय आणि त्याला बोलल्याबद्दल वीणाला झापलं ते बरं केलं.

वीणाच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल सांगताना, तू फटकळ आहेस असंही सुनवायला हवं होतं तिला. तिला दहापैकी अकरा गुण द्यायला हवेत म्हटल्यावर शिव खरंच द्यायला निघालेला Lol .

पण वीणाने माधवचे जिंकला म्हणून कौतुकही केलं, ते क्रेडीट घेतलं नाही स्वतः ला, खरं म्हणजे ती विपरीत परिस्थितीत जास्त टिकून होती.

विकएंड च्या डावाला वीणाचा जो एकपात्री प्रयोग चालू असतो त्यालाही टीआरपी मिळत आहे का,कारण ममां एवढा त्रास सहनच करणार नाहीत,तिला अस गप्प केल असत आधीच की नौतर कधी बोलूच शकली नसती.
पण तिचे काही मुद्दे मात्र बरोबर असतात.काल सुध्दा नेहाबरोबर रहायला आवडेल का हे विचारल्यावर तिने सांगितल की नाही ती कॉम्पिटिटर आहे,एरवी ती स्वीट आहे पण टास्कच्या वेळी संचारत अंगात.तिला बहुधा कळल असाव की नेहा विनरही होऊ शकते.मला मात्र अजूनही वीणामध्ये जिंकण्याची जिद्द दिसत नाही.पण ती घरात असावी,तिचा प्रेझेन्स आवश्यक आहे.शिवसाठी पण आणि बिबॉ साठी पण.
किशोरीबद्दल पण जे बोलली ते सगळ चुकीच नव्हत पण त्यातून अँरोगन्स फार दिसतो.पण ममांनी कँप्टन्सी टास्कबद्दल एकदाही कौतुक केल नाही तिच.
माधव बद्दल पण फार हार्श बोलली,पण ममांनी छान सुनावल.
काल कधी नव्हे ते केळकर बोलला,संधीच शोधत असावा .
मला नाही वाटत वैशाली फायनल मध्ये असेल,तीची रेशम करतील.
काल आनंद झाला जेव्हा ममांनी स्मिताच कौतुक केल.

बिचुकलेना तिसऱ्या गुन्ह्यात अटक. टीव्हीवर आला आणि सापडला . आणखीनही बरेच गुन्हे असतील त्याच्या नावावर. आता सगळे त्याच्यापासून त्रासलेले पीडित त्याचे जुने गुन्हे उकरून काढतील आणि म्हणतील " भगवान के घरेमे देर है लेकिन अंधेर नही " Lol

हो अगदी मांजरेकर नाही तरी बिग बॉसची क्रिएटिव्ह टीम नक्की वाचत असणार मायबोली.... मागच्या सीझनलाही बरेचदा ही शंका आलेली.... इथे लिहले गेलेले पॉइंट्स बोलले जायचे वीकेंडच्या डावात Happy
आणि असे असेल तर ते योग्यच आहे..... पब्लीक ओरिएन्टेड शो असेल तर पब्लीकचा कानोसा घेतच असतील..... FB आणि ट्वीटर पेक्षा इथल्या कमेंट्स खरच खूप सेन्सिबल असतात!

सध्या काय झालय की रुपाली आणि वीणाचा बॉंड आहे, वीणा आणि शिवचा बॉंड आहे, शिवचा आणि अभिजीतचा आहे आणि अभिजीतचा आणि वैशालीचा आहे..... थोडक्यात या सगळ्या कड्यांची मिळून एक साखळी झालीय
आता उरलेल्यांनी त्या साखळीला लटकून त्या साखळीतली कमजोर कडी बनायचय की स्वताची एक सेपरेट साखळी बनवायचीय हे त्यांना आता लवकरात लवकर ठरवावे लागेल

पण उरलेल्यात एक नेहा सोडून बाकीच्यांच्यात प्रवाहाविरुद्ध पोहायची ताकद आहे असे वाटत नाही ..... त्यात नेहाला सुद्धा मांजरेकरांनी काल कानपिचक्या दिल्याने ती पण कितपत बंडखोरी करेल शंकाच आहे!

एक जबरदस्त wild card entry ची खरच गरज आहे!

एक जबरदस्त wild card entry ची खरच गरज आहे.......
सोशल मिडियावर परागच्या रिएंन्ट्रीच्या बातमीने धुमाकूळ घातला आहे.
पण मला आता पराग परत यायला नको आहे.

सोशल मिडियावर परागच्या रिएंन्ट्रीच्या बातमीने धुमाकूळ घातला आहे. >> कुठे ? लोक नुसती "वी वॉन्ट पराग बॅक " म्हणताहेत पण तो येणार नाही किंवा येऊ नये . नक्कीच . असं मलाही वाटतंय .

पराग नको यायला परत . त्याने काहीच फायदा नाही होणार . बाकिचे लोक आता गेम मध्ये खुप पूढे गेलेत. तो जरी आला तर त्याला एकटाच गेम खेळावा लागेल. त्यापेक्षा चांगले वाइल्ड कार्ड आणावेत.

रुपाली आणी वीणा ने किशोरी ताई ला एकदम एकटेच पाडले . आधी तर खुप KVR ग्रुप करत होत्या. रुपाली याच आठवड्या च्या सुरुवातीला वीणा वेळ देत नाही असे बोलत होती . किशोरी ताई आणी मी दोघीच बोलत असतो . असे म्हणत होती. आणी आता रुपाली आणी वीणा घट मैत्रिणी असल्या सारख्या वागतात. खर याला किशोरी ताई ही जबाबदार आहेत. त्या ही त्याना मला हे बोललेले आवडत नाही आपण जास्त मस्ती नको करायला असे सांगत होत्या. मागच्या आठवड्यात.

खर याला किशोरी ताई ही जबाबदार आहेत. त्या ही त्याना मला हे बोललेले आवडत नाही आपण जास्त मस्ती नको करायला असे सांगत होत्या. मागच्या आठवड्यात.>>>>>>हो आणि बाकिच्या लोकांकडून आपल्याला आदर मिळावा, जरा सुपूंना मिळतो असं वाटतं त्यांना, पण असा मागून आदर मिळत नाही.
खरंतर केळ्याचे आणि वैशाली हेच बोलणं चालू होते पण मला तेव्हा त्यांचा रागच येत होता, वैशाली बोलताना असा आव आणते कि ती स्वतः किती ग्रेट, परफेक्ट आहे, ते दोघेही पक्के संधीसाधू आहेत, त्यांचं पितळ कधी उघड पडणार?

घरात आलेल्या पाहुण्यांनी contestants ना आरसा दाखवण्याचं किती महत्त्वाचं काम केलं आणि ममा ने guests च्याच विरोधात 8-10 वाक्यं बोलून सगळ्यावर पाणी फेरलं.. आता सगळे उधळायला पुन्हा तयार... देवा...

आता ममा हे बोलले पण प्रत्यक्षात सदस्यांनी असे केले असते. पाहुण्यांना हाकलून लावणे अडगळीच्या खोलीत टाकणे. तर परत त्यानाच सुनवले असते अथिथी देवो भवो . जरा सहन करायचे . तुमचे patience तपासायचे होते हा task हॉटेलचा होता पण main मुद्दा तुमची सहनशीलता तपासायची होती अमक नी तमक असे बोलवून दाखवले असते. Inshort हे दोन्ही कडुन ही बोलणार.
Infact ममा कितिही असे बोलले तरिही सई पुष्कर शर्मिश्ठा शी असे वागणे सदस्याना शक्यच नव्हते .कारण ते लास्ट सीज़न मधले टॉप 5होते. आणी गेस्ट नी तसे वागायचे हा खेळाचा भाग होता. बीबिं कडुन सूट होती त्याना. जर गेस्ट ना शिक्षा असे केले असते तर हॉटेल तिथेच बंद पडले असते आणी खेळ थांबला असता.

आता ममा हे बोलले पण प्रत्यक्षात सदस्यांनी असे केले असते. पाहुण्यांना हाकलून लावणे अडगळीच्या खोलीत टाकणे. तर परत त्यानाच सुनवले असते अथिथी देवो भवो . जरा सहन करायचे . तुमचे patience तपासायचे होते हा task हॉटेलचा होता पण main मुद्दा तुमची सहनशीलता तपासायची होती अमक नी तमक असे बोलवून दाखवले असते. Inshort हे दोन्ही कडुन ही बोलणार.>>>exactly माझ्याही मनात हेच आलं.. पण मुळात त्यावर बोलायची गरज नव्हती असं मलातरी वाटलं... कारण असं करून bigg boss ने guests ना disrespect केलं असं वाटलं.. Which is also mean..

खरंतर या contestants ना respect चा meaning आणि प्रत्येकाचा respect करणं महत्त्वाचं आहे हे शिकवणे गरजेचे आहे.. स, पु, मे, स्मि जरा कुठे ही शिकवायला गेले तर ममा ने त्यांनाच वाईट आणि disgusting ठरवलं... ते चौघे आता contestants नाहीत, guest होते हे स्वतः ममा ch विसरला वाटतं

मी जरा उशिराने लावल होत. काल ममाने कोणाला स्टार परफॉर्मर ऑफ द वीक दिल? शिव मध्ये बसला होता म्हणजे त्याला दिला का?

सोया सॉस, बटर वापरायची आयडिया नेहाने दिली म्हणून तिच कौतुक केल का काल? का मी काही मिसल? Uhoh

नेहाचा चेहरा खुनशी कसा होतो त्याची ममा नक्कल करुन दाखवत होते. अशक्य हसले मी. Lol

आज बॉक्सिन्ग टास्क आहे. लास्ट सिझनला हा टास्क सेपरेट घेतला होता. नेहाला सगळ्यान्नी टारगेट केल वाटत टास्कमध्ये.

शीव ला स्टार परफॉर्मर केले. सोया सॉस, बटर वापरायची आयडिया नेहाने दिली म्हणून तिच कौतुक केल का काल? नाही

>>जर गेस्ट ना शिक्षा असे केले असते तर हॉटेल तिथेच बंद पडले असते आणी खेळ थांबला असता.<<
बिंगो! किती तो डिसकनेक्ट बिबॉ आणि मांजरेकरांमधे. मांजरेकरांनाच गेम कळला नाहि हे त्यांनी जगाला दाखवुन दिलं. Lol

अरे वेड्या, टास्क जास्तीत जास्त स्टार्स मिळवायचा आहे कि बिबॉ हॉटेलचे अस्तित्वात नसलेले नियम राबवण्याचा. अगदि इडियॉटिक कामेंट होती ती...

हिंदी बिग बोस मध्ये पण असाच गेस्ट होते आणि खडूस पाने वागत होते ड्रिंक बरोबर नाही, हेच कमी आहे तेच जास्त आहे परत बनवा वगैरे वगैरे , तेंव्हा एका कन्टेस्टंट शेवटी थुकली होती त्या ड्रिंक मध्ये गेस्ट ला द्यायच्या आधी

हिन्दीत ते गेस्ट त्यांचेच सहस्पर्धक होते बाहेरुन आले नव्हते. हिन्दी बिग्ग बॉस मध्ये एक दोन गेस्ट घरातलेच असायचे कार्यात. तरी पण असे करणे चुकीचेच आहे.

आत्ता fb वर एक post वाचली त्यात वीणाला मूकबधिर बातम्यांची वार्ताहर असे म्हटले आहे.. ते वाचून जाम हसू आलं.. कोणाला दुखवायचा हेतू नाहिये पण विनोदी वाटलं म्हणून share केलं..

हो मी ही वाचलीये अशी कमेंट त्या मध्ये लिहले होते हा वेडीओ चा आवाज बंद करुन बघा . वीणा च्या बोलण्याचा वेडीओ होता तो.. वीणा खुप हातवारे करते बोलताना. वरचा प्रतिसाद बघुन आठवले.

It must be
Vaishali's mask off or
Vaishli's mask fell off.

खरंतर आज जायला किशोरी हवी होती, ती अजिबात फिट नाही या गेमसाठी, सतत मानपान आणि इमेज कॉन्शसमुळे फेक !
Btw किशोरी फक्तं ५० आहे ? Uhoh
बरीच मोठी दिसते मग, मला वाटलं सुरेखाताई ६०+ आणि किशोरी ६० असेल !

Pages