Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52
बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मी पण मम Wink >>>
मी पण मम Wink >>>
Captaincy च्या task साठी टीम
Captaincy च्या task साठी टीम A मधुन रुपालिची निवड झाली. आणी ब मधुन अभिजित केळकरची निवड झाली. रुपाली ला कैप्टन बनायचे आहे सो ती नेहा माधव हीना यांची मदत मागत होती. तिने एक वाक्य बोलले की पिकनिक टीम मधाल्या कुणाला कैप्टन नको हौऊ देऊया आता तरी सीरियस असलेला येऊ दे.
अजून एक आहे वीणा आणि माधवने
अजून एक आहे वीणा आणि माधवने कलर्स channel चा खूप फायदा करून दिलाय आणि त्यांनाही झालाय फायदा. हे दोघे नीट वागले ना तर channel यांना सपोर्ट करणार.
नेहा झुंज मध्ये एवढी नव्हती, पराग शेवटपर्यंत होता. पराग channel साठी नेहापेक्षा महत्वाचा होता पण त्याने असं केल्यामुळे channel च्या हातात विशेष उरले नाहीये.
मुळात नेहा झी मराठी वर जास्त काम केलेली आहे. हा सर्व फरक आहे. पण वीणा भरकटत चालल्याने channel किती पाठीमागे उभं राहील काय माहिती. ह्यात माधवला फायदा होऊ शकतो.
फायनान्शियल किंवा कमर्शियल दृष्टीकोन बघता channel ला वीणाने जास्त फायदा करून दिलाय. त्यामुळे ऋतुजा किंवा कोणी आलं तर कदाचित channel योग्य निरोप पोचवेल तिच्यापर्यंत. तरी ऐकलं नाही तर दाखवतील इंगा.
मागच्यावेळी कसं होतं मेघा
मागच्यावेळी कसं होतं मेघा झुंज मध्ये होती पण channel साठी आस्ताद महत्वाचा होता पण तोच नीट वागला नाही आणि मेघाला लोकांचा उत्स्फुर्त पाठींबा होता. यंदा नाहीच दिसत एवढा कोणाला.
अजून एक म्हणजे म मां च्या F U
अजून एक म्हणजे म मां च्या F U मध्ये माधव मेन व्हिलन होता. माधवने खरंच आता मस्त खेळावं. स्वभाव चांगला आहे , channel आणि म मांचा सपोर्ट आहे आणि आता लोकांचाही मिळतोय. प्लीज कॅश it माधव.
कैप्टनशिप चे टास्क यावेळी
कैप्टनशिप चे टास्क यावेळी पॉईंट कमावण्याचा आहे . रुपाली ला तिचा भिडू जो तिने कापला होता तो उशी करुन दिलाय आणी अभिजीत केळकर ला त्याने फाडलेले फोटो दिलेत नीट जोडून. ज्याला पॉईंट्स पाहिजे त्याने त्या वस्तू परत करायचा. टाय होऊ द्यायचा नाहिये.
फोन task पण आहेना.
फोन task पण आहेना.
त्यात ती वैशाली कशी बोलतेय, बापरे. काल प्रीकॅप मध्ये बघितलं.
सर्वात निगेटिव्ह ती आहे.
वैशालीचे खरे रंग दिसत नाहीयेत
वैशालीचे खरे रंग दिसत नाहीयेत का कोणाला? सुमडीत निघून जाते ती आग लावून!!! आज्जीबाई सारखी सगळ्यांना समजवायला येते आणि मध्येच काडी टाकून जाते...
Btw बाकी घरातल्या सगळ्यांचा राग समजू शकते मी परागवर, स्पर्धक म्हणून आणि जे वाद झाले म्हणून, पण मांजरेकर का एवढे पेटलेले असतात त्याचं नाव घेऊन, as a host ते निष्पक्ष असले पाहिजेत ना खरंतर???
चूक ते चूक आणि बरोबर तिथे कौतुक असं पाहिजे ना, पण बऱ्याच वेळेला biased वाटतात ते मला, स्पेशली वीणा आणि (काही प्रमाणात) नेहा बाबतीत!!!
हो ते वीणा आणि नेहाच्या
हो ते वीणा आणि नेहाच्या बाजूने असतात, channelने सांगितलं असणार.
परागचं नाव अजूनही trp मिळवून देतंय त्यांना आणि बाकीच्यांना. परागद्वेष करतात सगळेच, सगळ्यांना जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी पराग दिसतोय. बाहेर खूप सपोर्ट आहे त्याचा राग असेल म मांच्या मनात किंवा channelच्या मनात, तो निघतो.
वैशालीचे खरे रंग दिसत नाहीयेत का कोणाला? सुमडीत निघून जाते ती आग लावून!!! आज्जीबाई सारखी सगळ्यांना समजवायला येते आणि मध्येच काडी टाकून जाते... >>> हे परवा सांगितलं म मां नी वेगळ्या शब्दात. ह्यामुळे शिव वीणाचं जास्त नुकसान होणार आहे. ती त्यांची वाट लावणार आहे.
वैशालीचे खरे रंग दिसत नाहीयेत
वैशालीचे खरे रंग दिसत नाहीयेत का कोणाला? सुमडीत निघून जाते ती आग लावून!!! आज्जीबाई सारखी सगळ्यांना समजवायला येते आणि मध्येच काडी टाकून जाते...>>>>>>>>हो ना, मी पण हेच म्हंटलं, बाकीच्या टिम मेट्स ना का कळत नाहीये वैशलीचा कपटी स्वभाव? ममा पण कधी त्याचि चुगली करत नाहीत. वीणाला ती ब्रो वाटते? असंच काहीतरी म्हणाली ना ती विकेंड्च्या डावाला? माधव स्वभावाने चांगला आहे पण त्याला स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवता येत नाही, मधेच चिडुन जोरजोरात ओरडायला लागतो. क्धीतरीच नीट सांगु शकतो त्याला काय म्हणायचय ते.
मला त्याच्यात वेड्सरपणाची झाक आढळते कधीकधी.
इथल्या आणि सोमिवरच्या इतर
इथल्या आणि सोमिवरच्या इतर ठिकाणी बिबॉ स्पर्धक समर्थकांचे काही लक्षणे...
१. आपल्या आवडत्या स्पर्धकाला आपला नावडता स्पर्धक उं जरी म्हणाला/ली तर त्यावर नावडत्या स्पर्धकाची उं रेज्ड टू इन्फिनिटी निंदा करणे समर्थकांना जस्टिफाइड वाटते.
२. आपल्याला जे योग्य वाटते आहे त्याच्यापेक्षा वेगळे मत मांजरेकरांचे आले तर मांजरेकरांना सांगितलंय तसं बोलायला अन्यथा आम्हाला योग्य वाटलंय तेच ते म्हणाले असते असा ठाम विश्वास असतो समर्थकांना.
३. २४ तासापैकी दीडच तास आपल्याला दिसतो आणि त्यात आपल्या आवडत्या स्पर्धकाचा चांगुलपणा चॅनेल/बिबॉ/ममा/अजून काही परकीय शक्ती/ दाऊद/ सीआयए/ केजीबी/ एबीसीडीइएफजी/डावे/उजवे यांच्या पार्श्यालिटीमुळे कापून टाकतात.
४. आपला आवडता स्पर्धक कबीर सिंग असला तरी चालतो पण नावडत्या स्पर्धकाने अयोध्यापती राम असलेच पाहिजे अन्यथा त्यांची लायकीच नाही असे पक्के ठरलेले असते.
५. नावडत्या स्पर्धकाला उजव्या पायाला मुंग्या आल्या तरी ते आवडत्या स्पर्धकाविरूद्ध केलेले कटकारस्थान आहे. उजव्या पायाला मुंग्या यावरून काहीतरी सांगायचेच आहे.
६. आवडत्या स्पर्धकाने खा खा माती खाल्ली तरी ती नावडत्या स्पर्धकापेक्षा एक ग्रॅम कमीच होती म्हणून आमचाच बाब्या/ बाबी सोन्याची.
७. रोज दीड तास बघायचे आणि उरलेल्या वेळात माबोवर कडी निंदा, ट्विटरवर रिट्विट, फेबुवर सुनावून येणे वगैरे कडक उपाय बजावणे जेणेकरून बिबॉ आणि ममा जरा ट्रॅकवर येतील.
ज्यांना मजेत घेता येते त्यांच्यासाठी पोस्ट लिहिलीये. बाकिच्यांनी वाचू नका हं काय!
त्याच्यात वेड्सरपणाची झाक
त्याच्यात वेड्सरपणाची झाक आढळते कधीकधी. >>
खरंय. चांगला वाटतो स्वभावाने पण जरा हुकलेला वाटतो मला माधव. थोडा त्या मैथिलीसारखाच आउट ऑफ प्लेस.
वैशालीला कोणी त्या पंचिंग बॅग टास्क मधेदेखिल टार्गेट केले नाही - याचा अर्थ घरात ती इतर वेळी सुसह्य असावी इतरांच्य तुलनेत. मला जराही आवडत नाही ती पण सध्या शिव आणि केळ्या सारख्यांचा स्ट्राँग सपोर्ट आहेच तिला, आणि कुणाच्या अॅक्टिव्हली हिट लिस्ट वर नाही म्हणजे गेम चांगलाच खेळतेय असे म्हणायला हवं.
रुपालीने संधीसाधूगिरी करून नेहा ला आपल्याकडे वळवण्याचा डाव टाकला आहे. केळ्याचे शत्रू ते आपले मित्र असा प्लान असणार. बाकी सगळा नुस्ता ड्रामा.
कॅप्टनशिप ला फोन वर अब्यूज ऐकायचा आणि हँग अप केले की हरलात असा टास्क खर तर फारसा अवघड वाटत नाही. अगली मात्र होणार हे एकूण.
३. २४ तासापैकी दीडच तास
३. २४ तासापैकी दीडच तास आपल्याला दिसतो आणि त्यात आपल्या आवडत्या स्पर्धकाचा चांगुलपणा चॅनेल/बिबॉ/ममा/अजून काही परकीय शक्ती/ दाऊद/ सीआयए/ केजीबी/ एबीसीडीइएफजी/डावे/उजवे यांच्या पार्श्यालिटीमुळे कापून टाकतात.>> हे बेश्ट ए

मला अजूनही कळत नाहीये की
मला अजूनही कळत नाहीये की "चॅनेलचा माणूस चॅनेलचा माणूस" वगैरेचा इतका बाऊ का केला जातो?
नेहा का असेल चॅनेलची लाडकी?
मागच्या टॉप ३ मधले कोण चॅनेलचे किंवा मांजरेकरांचे आपले माणूस होते?
मागे इथेच कुणीतरी हे लिहले होते की इथे लोकांच्या वोट्सवरच स्पर्धक इलिमीनेट होतात.... हा ग्लोबल फॉर्मेट असल्यामुळे इथे वोट्स चे थर्ड पार्टी ऑडीट वगैरे होते..... चॅनेल किंवा प्रॉडक्शन हाउस नॉमीनेशन किंवा आत घडणाऱ्या इतर बऱ्याच गोष्टी मॅन्यूपलेट करु शकते पण इलिमिनेशन हे पब्लीक वॉट्सनुसारच होते!
परत तेच तेच दळण कशाला दळत बसतो आपण?
नेहाला वीकेंडच्या डावात कमी बोलणी बसतात कारण ती सगळे ऐकून घेते.... बऱ्याचशा गोष्टी/आरोप लगेच मान्य करते.... चटकन सॉरी म्हणून टाकते
माधवला पहील्या एक दोन वीकेंडच्या डावात मांजरेकर ज्या पद्धतीने ओरडलेत ते बघता तो पण काही त्यांचा लाडका वगैरे वाटत नाही
केळ्याची पण ते येता जाता तासत असतात
शिवला मधल्या काही आठवड्यात अगदी वळू वगैरे म्हणून झालेय ..... आता चांगला खेळतोय तर कौतुक करतायत
परागला पण पहीले दोन्ही आठवडे स्टार परफॉर्मर केलाच की आणि जेंव्हा चुकला तेंव्हा व्यवस्थित सुनावले
किशोरी रुपालीचे तर त्या त्या वेळी कौतुक केलय आणि चुकल्या तिथे माप काढलीयत
बाकी सोशल मिडिया वगैरे काही सांगू नका.... पराग पराग करुन नाचणारे "ती त्याने नेहाला मारहाण केल्याची" क्लीप आउट झाली तर त्याच्या घरावर मोर्चे पण घेऊन जातील.... काल पर्यंत नेहा ला शिव्या देणारे आज तिला अगदी पहील्या तीनात पकडायला लागलेत..... त्यांना डोक्यावर घ्यायला पण वेळ लागत नाही आणि उतरावयला पण वेळ लागत नाही
त्यातले खरे प्रोफाइल किती फेक किती याची गणती वेगळीच परत ज्याचा त्याचा पीआर कसे काम करतोय त्यावर पण बरेच अवलंबून असते
त्यामुळे लोक सोशल मिडीयावर काय बोंबलतायत त्यापेक्षा इथल्या लोकांना काय वाटते हे ऐकण्यात मला तरी जास्त इंटरेस्ट आहे!
There are some people here who write very original and worth reading
हल्ली वीणाला ती वैशाली इतकी
हल्ली वीणाला ती वैशाली इतकी का आवडायला लागली आहे. मागे कित्ती एकीने बाप आणि दुसरीने संस्कार काढलेत.
There are some people here
There are some people here who write very original and worth reading Happy +++++१
नी मस्त आहे आवडलं मला.
नी मस्त आहे
आवडलं मला.
माझं होतं थोडं आपल्या तो बाब्या पण मी प्रयत्न करते शक्यतो त्याच्यात दिसलेले दोष लिहायचा आणि जे आवडत नाही त्यांच्यातले गुण लिहायचा. पण तरी झुकतं माप जातंच कुठेतरी आपल्या आवडत्याला
.
यंदा bb fb वर कमी लिहिते जाऊन पण मागच्यावर्षी काही जणांनी मी खूप तटस्थ लिहिते ह्याचं कौतुक केलं होतं तिथे. पण नंतर समहाऊ कंटाळा येत गेला तिकडे लिहायचा म्हणून यंदा आधीपासून कमी लिहिते तिथे.
नेहा का असेल चॅनेलची लाडकी? >
नेहा का असेल चॅनेलची लाडकी? >>> नेहा channelची नाही bb ची लाडकी असं म्हणते मी. channel ची वीणा असेल असं लिहिते.
तो माधव सांगत होता ना तीन कंपनीज involved आहेत. एक endemol, एक channel असं माहितेय मला. तिसरे कोण ते माहिती नाही.
यंदा प्रेक्षकांचा भरभरून पाठींबा कोणालाच दिसत नाहीये. मागच्यावर्षी जसा मेघाला होता तसा.
किशोरीने पंचिंग बँग मध्ये
किशोरीने पंचिंग बँग मध्ये वैशालीला निवडलं होतं. तिच्या छद्मी हसण्याची नक्कल करून दाखवली होती. पण तिच्या पंचेसमध्ये फार दम नव्हता.
वीणा 29वर्षाची आहे . तिनेच
नेटवर वीणाचं वय २५ दिसतंय आणि शिव ला ३० पूर्ण व्हायचीत.>>>
वीणा 29वर्षाची आहे . तिनेच सांगितले होते एका अनसीन अनदेखा मध्ये की ती 4मार्च 1990आहे. शीव सप्टेंबर 1989चा आहे
शेवटी सगळ्यात वर बिग बॉस आहे.
शेवटी सगळ्यात वर बिग बॉस आहे. त्याला जे आणि जेवढं दाखवायचं आहे तेवढंच दीड तास दाखवणार. पण असं वाटतं, बाकी दाखवायला काहीच नाही का. किती वेळा शिव वीणा दाखवतात. त्यांना वर नेऊन खाली धाडकन आपटायचे आहे का. बाकी दाखवा की, बाकी काहीच घडामोडी घडत नाहीत का.
निधप लास्ट सीज़न मध्ये असे होत
निधप लास्ट सीज़न मध्ये असे होत होते माझे आमचाच बाब्या असे कारण मेघा आवडली होती खुप. त्यामुळे तुमचे वरचे जास्त पॉईंट लास्ट सीज़न ला जास्त relate करु शकते.
आणी नावडते ज्याना त्रास देतात त्यांच्या बद्दल जरा आपुलकी वाटते.
पण यावेळी कोणच आवडाले नाहिये. त्यामुळे नावडत्याना नावे ठेवली जातात फक्त
मला लास्ट सिझन आधी मेघा
मला लास्ट सिझन आधी मेघा अजिबात आवडली नव्हती मग मात्र आवडायला लागली पण स्मिता मात्र आधीपासून शेवटपर्यंत आवडली. सई नव्हती फार आवडत.
विदर्भातून आलेला कॉल ऑफ़ वीक
विदर्भातून आलेला कॉल ऑफ़ वीक ने मांजरेकरांच्या हॉस्टिंग चे खुप कौतुक केले . आणी शीव आणी वीणा ची जोडी आवडतेय म्हणून सांगितले तुम्ही टॉप मध्ये असणार संगितले . शीव आवडतो आणी वैशाली चांगली खेळतेयस असे संगीतले .काहीही विचारले नाही. >>>>>>>> धन्स अमुपुरी.
तिशीचे घोडे असून चाइल्डीश वागणे, >>>>>>> शिव विणा तिशीचे वाटत नाही मला. हो पण सध्या जरा अति करतायत. बोअर होतय. चाईल्डिशपणा विशीच्या आतल्यान्नीच करावा असा काही नियम आहे का?
तसच भांडा पण हळू भांडा,>>>>>>>> आता हळू कस भाण्डायच ते माधवनेच सान्गाव.
बाकी तो चान्गला खेळतोय.
केळकर किती डेस्परेट आहे कॅप्टनशिप साठी ते गेल्या दोन आठवडयापासून दिसतय.
नीधप
मागे इथेच कुणीतरी हे लिहले
मागे इथेच कुणीतरी हे लिहले होते की इथे लोकांच्या वोट्सवरच स्पर्धक इलिमीनेट होतात.... हा ग्लोबल फॉर्मेट असल्यामुळे इथे वोट्स चे थर्ड पार्टी ऑडीट वगैरे होते..... चॅनेल किंवा प्रॉडक्शन हाउस नॉमीनेशन किंवा आत घडणाऱ्या इतर बऱ्याच गोष्टी मॅन्यूपलेट करु शकते पण इलिमिनेशन हे पब्लीक वॉट्सनुसारच होते!
परत तेच तेच दळण कशाला दळत बसतो आपण?
मागच्या वेळी मेघा जिंकली असली तरी पुष्कर नंबर दोन होता असं आठवतं आहे. त्याला इतकी वोट असणं शक्यच नाही कारण त्याला लिटरली कोणीच चाहते नव्हते. त्यावरून तरी असं वाटतं की चॅनेल सर्व गोष्टी स्वतःच्या सोयीने ठरवत असावं. शो मध्ये काम करून नंतर सोडून दिलेले जे लोक आहेत (पडद्यामागचे ) त्यानिही हाच फीडबॅक दिला आहे की पब्लिक सेंटिमेंट विचारात नक्कीच घेतात पण वोट हा एकमेव निकष कधीच नसतो.
लास्ट सिझन आधी मेघा अजिबात
लास्ट सिझन आधी मेघा अजिबात आवडली नव्हती मग मात्र आवडायला लागली पण स्मिता मात्र आधीपासून शेवटपर्यंत आवडली. सई नव्हती फार आवडत.>>>>>सेम पिंच अंजू, पण मला मेघा शेवटपर्यंत आवडत नव्हती, स्मिता मात्र आवडत होती, आणि मला रेशम आवडायची. मेघा जिंकल्यावर वाईट वाटलं, पण ती जिंकेल हे समजत होतं
नव्या पोस्ट्स आल्या कि
नव्या पोस्ट्स आल्या कि अन्जुच्याच इतक्या दिसतस्त , डेजावु का काय होतो, कळत नाही जुन्या वाचतेय कि नव्या

सॉरी अन्जु
अन्जू ची phd झाली बीबा वर
अन्जू ची phd झाली बीबा वर

पण अन्जू तुमच्या सगळ्या पोस्ट अगदी मनापासून लिह्ल्या असतात.
होतंय खरं असं माझ्याच पोस्ट
होतंय खरं असं
माझ्याच पोस्ट जास्त.
फार अभ्यासू वगैरे नसतात, पडीक असते माबोवर तेव्हा लिहीत राहते.
AJ rupali pan bore kartey
AJ rupali pan bore kartey.kishori Ani rupali doghihi khup bore kartahet
Pages