Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52
बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वैशालीला असा त्रास द्यायला
वैशालीला असा त्रास द्यायला हवा होता.>>देईल देईल... तीच कर्म कर्म करत असते ना.. दाखवतील तिला पण तिचं कर्म..
पण त्रास देण्यासाठी काहीही
पण त्रास देण्यासाठी काहीही चाललय. एकाच वेळेस विणा दोन ठिकाणी कशि काय असु शकेल? पोहे पण करायचे अणि डान्स पण ? बाथरुम पण साफ करुन हवी तिनेच , हे जरा अतीच . >>>वीणा सतत हातवारे करून इतरांबद्दल वाईट बोलत असते.. बाकीच्या प्रतिस्पर्ध्यांना सतत कमी लेखते.. उदा. माधव, किशोरी,, स्वतःला फारच gr8 समजते, खूप काम करून आल्याचा आव आणते.. ते पण अतीच असतं.. खरंतर शिव मुळे ती आत्ता आत्ता अभिजीत आणि वैशालीशी बोलायला लागली... नाहीतर group, group तीच करायची... आम्ही कोणाच्या मध्ये जात नाही.. आमच्या मध्ये कोणी यायचं नाही...माधव जायचा तर त्याला कुत्र्याचं पिल्लू म्हणाली होती.. तुम्हाला strategy आखायची आहे तर privacy असताना ठरवा ना.. मेघा,सईपण planning करायच्याच की आणि जबरदस्त पण करायच्या.. कोणी आमच्या मध्ये यायचंच नाही असं म्हणून कसं चालेल.. तरी पराग तिला बोलला त्या week पासून बर्याच ताळ्यावर आल्या बाईसाहेब नाहीतर मी, माझा grp आणि शिव असं म्हणून सतत हवेत असायची..
Voot app download करून नंतर
Voot app download करून नंतर मराठी जत्रा पण download करायला लागेल आणि मराठी जत्रावरून voting करता येतं.>>. Okay, धन्यवाद
वैशाली सुटली ह्या टॉर्चर मधुन
वैशाली सुटली ह्या टॉर्चर मधुन >>> true.
सर्वात घाण बोलणारी ही आहे वैशाली आत्ता घरात आहेत त्यामध्ये, आधी शिवानी आणि बिचुकले पण बोलायचे. फार खालच्या पातळीवर उतरते.
टाईम्स ऑफ ईण्डिया म्हणतायेत
टाईम्स ऑफ ईण्डिया म्हणतायेत की सईची वाईल्ड कार्ड अनाउन्समेण्ट हा बिबॉने केलेला Prank आहे.
परवाचा आणि कालचा टास्क मस्त होता. अशक्य छळल सर्वान्ना. विणाला तर जास्तच. श रा तर सासूच बनली होती तिची. सिरियल्समध्ये काम केल्याचा अनुभव, म्हणून तिला छळण्याचे अगणित उपाय माहित आहेत वाटत. आताचे स्पर्धक ते डिर्झवही करतात.. फक्त कमोडला पुसलेला टॉवेल वापरण आणि सुपमध्ये केस टाकण ते नाही आवडल.
श रा जेव्हा गरम चहा का कॉफी बेडशेजारी पित होती तेव्हाच डाउट आला होता, हि नक्कीच तो कप बेडवर साण्डणार आहे.
किशोरीच ईन्गलिश गाण छान होत. शिव- विणाचा डान्स तर क्यूट होता. सुरेखाताई पहिल्यान्दाच लावणी सोडून वेगळ गाण म्हणत होत्या वाटत.
दोन्हि टिम मधले स्पर्धक अडगळीच्या खोलीत होते तेव्हा किशोरी, हिना, सुरेखा कुठे होते? सई. पुष्की, स्मिता आणि शरा त्यावेळी घरात होते.
कॅप्टनने अडगळीच्या खोलीची चावी सांभाळून ठेवली नाही, हीसुद्धा मोठी चूक आहे. >>>>>>>>> डम्बच आहे तो.
वीणाच्या टीमने जेवण छान सर्व्ह केलं, ताटाभोवती फुलांच्या पाकळ्या वगैरे. रुपालीचा रोल मोठा होता यात. >>>>>>>>>++++++११११११११११११
team A is d winner >>> कसं समजलं. >>>>>>>> कालच्या प्रिकॅममध्ये टिम A हॉटेल युनिफॉर्ममध्ये होती तर टिम बी नेहमीच्या कपडयात होते. माधव, नेहा तोण्ड फुगवून बसले होते. सो, टिम Aच विनर झाली असेल.
हिना बरोबर सांगत होती तिला, बाहेर तुझी प्रतिमा नीट नाहीये असं सुचवत होती, त्यावरून हे सर्व करतायेत ते. हिनाने मसाज वगैरे करुन स्टार छान मिळवले. >>>>>>>>> हिना काल सेन्सिबल वाटली.
पाणी. आधी दाखवलेलं आपल्याला सांडणार आहे असं, त्यांनी ठरवलं होतं. >>>>>>> ओ, अस होत तर. मी ते आधी काय बोलले ते विसरुनच गेले.
ही त्यांना माकडे म्हणाली >>>>>>>> तिला कोणी बेडूक म्हटल तर तिला राग येतो.
श रा ला वेलचीचा वास आल्यावर उलटी आली ते खर होत का?
नेहा टिम मध्ये फुट पडायला सुरुवात झाली आहे. पाहुणे गेल्यानन्तर केळकर, वैशाली नेहाशी भाण्डणार आहेत.
दोन्हि टिम मधले स्पर्धक
दोन्हि टिम मधले स्पर्धक अडगळीच्या खोलीत होते तेव्हा किशोरी, हिना, सुरेखा कुठे होते? >>> कामं करत असतील, आपल्याला दाखवलं नसेल.
श रा जेव्हा गरम चहा का कॉफी बेडशेजारी पित होती तेव्हाच डाउट आला होता, हि नक्कीच तो कप बेडवर साण्डणार आहे. >>> पाणी. आधी दाखवलेलं आपल्याला सांडणार आहे असं, त्यांनी ठरवलं होतं.
टाईम्स ऑफ ईण्डिया म्हणतायेत की सईची वाईल्ड कार्ड अनाउन्समेण्ट हा बिबॉने केलेला Prank आहे. >>> असं बरेच जण म्हणतायेत. पण ह्या पेपरनेच मागे, पराग सिक्रेट रूम मध्ये असेल काही दिवस सांगितलेलं ना, तसं झालं नाही मात्र.
श रा ला वेलचीचा वास आल्यावर
श रा ला वेलचीचा वास आल्यावर उलटी आली ते खर होत का? >>> हो, तिला allergy आहे.
सई खरंच थांबावी , नॉमिनेशन
सई खरंच थांबावी , नॉमिनेशन मध्ये यावी , तिला कोणीही वोट करणार नाहीय तसेही मागच्या वर्षी फक्त मेघा च्या ग्रुप ची म्हणून वाचत आली होती
नेहा टिम मध्ये फुट पडायला
नेहा टिम मध्ये फुट पडायला सुरुवात झाली आहे. पाहुणे गेल्यानन्तर केळकर, वैशाली नेहाशी भाण्डणार आहेत.>>>>>>पण मला नेहाला डिसीजन बरोबर वाटला, पाच पैकी चार जण अडगळीच्या खोलीत राहिले तर एकट्या खूप लोड येईल, आणि बाहेर राहिले तर ते परत स्टार कमवू शकतात, ह्यापेक्षा अजून काय वेगळं ठरवणार होते ते सगळे मिळून? आणि त्यांनी नेहाला वेळही नाही दिला लगेच सांगायला लावलं. अभिजीत केळकर रूसून काय बसतो
डिसिजन पटला ह्यापेक्षा,
डिसिजन पटला ह्यापेक्षा, कोणाला विचारलं नाही हे जास्त झोंबले असणार बाकी लोकांना. त्यात चावीपण गहाळ झालेली. ह्या दोघांच्या चुकांमुळे बाकीचे सफर झाले.
हाच डिसिजन सर्वांना विश्वासात घेऊन घ्यायला हवा होता.
त्यांनी नेहाला वेळही नाही दिला लगेच सांगायला लावलं. >>> असं असलं तरी तिने एक मिनिट द्या फक्त म्हणून विचारायला हवं होतं फायनल सर्वाना.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=vWoMFHL2Xx8
दुसऱ्यांदा लिहीलेला भलामोठा
दुसऱ्यांदा लिहीलेला भलामोठा प्रतिसाद गेला
कसले डेस्पो गेस्ट आहेत.....
कसले डेस्पो गेस्ट आहेत..... काल जो यांनी घरभर कचरा करुन ठेवलेला ते बघता "घराबद्दल आदर" वगैरे गोष्टी त्यांनी बोलूच नयेत!
नेहा आणि अभिजीत-वैशाली मध्ये फूट पडली तर बरेच असेल नेहासाठी!
पण आता लवकरात लवकर एखादी खतरनाक वाईल्डकार्ड एंट्री आली पाहिजेल.... हीना आली तेंव्हा एकदम स्पायसी वाटलेली पण सध्या अगदीच वरणभात खेळतीय ती!
दुसऱ्यांदा लिहीलेला भलामोठा
प्रकाटाआ
प्रचंड बोअर झाला एपिसोड.
प्रचंड बोअर झाला एपिसोड.
नेहा टीम जिंकली म्हणून नव्हे, एकंदरीतच.
काय नेहा टीम जिंकली
काय नेहा टीम जिंकली
म्हणजे नेक्स्ट नम्बर किशोरी ताई किन्वा रुपाली
आता कोण गेलंय.
आता कोण गेलंय.
त्यात माझी लाडकी स्मिता लवकर
त्यात माझी लाडकी स्मिता लवकर बाहेर गेली. जाता जाता ए टीमला ब्राऊनी पॉइंट देऊन गेली आणि स्टार. बी ला देत नव्हती पण पुष्करने द्यायला सांगितला, हिनाने पायाला मसाज केला म्हणून.
पुष्कीचा मित्र आहेना मॅडी एकदम खास म्हणून दिले जास्त स्टार. त्यांनी काही गोष्टी चांगल्याही केल्या. पण बी टीम जिंकावी असं पुष्कीला वाटत असणार, असो.
हिनाचा मसाज मात्र सगळ्यांना आवडला असावा, मनापासून केला. पुढची कॅप्टन हीना असेल मोस्टली, निदान उमेदवार तरी असेल.
नेहाची सोया सॉस आणि साल्टी बटरची आयडीया (मीठ नव्हतं सापडत म्हणून केलेली) होती की रुपालीची आणि नेहाची होती तर कॅमे-याकडे जाऊन रुपाली का बोलली. नेहाचीच असावी कारण तिचं कौतुक केलं तेव्हा रुपाली काही बोलली नाही. मग नेहाची आयडीया असेल तर तिचं कौतुक केलं ते योग्य होतं. माझ्याकडून पण कौतुक तिचं.
नंतर सर्व एपिसोड ह्याचे त्याचे रुसवे फुगवे यावर गेला. मी येता जाताच बघितला, कित्ती बोअर आणि लांबलचक होता. संपता संपत नव्हता.
सगळ्यांनाच टास्कमधल्या मिळालेल्या star चं क्रेडीट घ्यायचं होतं.
शिवचा मला खरंच राग आला आज, सगळं जाऊन अभिदादा, वैशालीताईला सांगतो वीणाचं. आता गेम खेळ स्वतःचा. ते ताई दादाच तुझ्या डोक्यावर पाय देऊन पुढे जातील. तो पण सांगतो तिला स्वतः हून काही गोष्टी पण दोघांनीही सांगू नये असं मला वाटतं. तुमची मजा मस्ती आणि टीमशी loyalty वेगळ्या ठेवा. वीणा उठसुठ मी individual खेळेन म्हणते पण ते तसा task असेल तेव्हा करशील एरवी कुठल्याना कुठल्या grp ची गरज असतेच की.
सगळे येडे नुसते, त्यांच्यापेक्षा जास्त येडे हे सर्व बघणारे आपण
शिव डोक्याने खेळतोय .
शिव डोक्याने खेळतोय ..नोमॉनेशन पासून वाचत राहील अशाने तो ...
हो पण त्याचे ताई दादा कधी
हो पण त्याचे ताई दादा कधी विश्वासघात करतील समजायचं नाही. त्या दोघांची खात्री देता येत नाही. वीणाला त्यांच्यात घ्यायला बघतायेत पण वीणाने रुपाली, किशोरीताईची साथ सोडू नये.
खर तर वीणाने रुपाली आणि
खर तर वीणाने रुपाली आणि किशोरी ला डोसायला पाहिजे ,दोघी काही करत नाहीत ,त्यांच्यामुळे वीणा चा गेम मागे राहत आहे .
त्या बऱ्या आहेत
त्या बऱ्या आहेत बाकिंच्यांपेक्षा, ती दुसरीकडे गेली तर एकेक महाभाग आहेत. ते तिला नाही पुढे येऊन देणार.
श.रा. अति करतेय असे ज्यांना
श.रा. अति करतेय असे ज्यांना वाटले : बिबॉ नी तिला तेच तर करायला पाठवले होते जे तिने केले


ऑडीयन्स लग्गेच एखाद्याला निगेटिव्ह बनवून ट्रोल करायला सुरवात करते पण सर्वात फुटेज घेतले कि नाही श.रा. नी ?
बाकी आय जस्ट होप स्मिता आणि सईने घरातल्यांना थोड्या स्टायलिंग टिप्सही दिल्या असतील
स्मिता सर्वात छान दिसत होती आणि तिचा वावर खूप प्लेझंट होता पण बघा तरीही त्याचा रिझल्ट पुन्हा तोच झाला जो मागच्या सिझनला झाला, फुटेज मुळीच नाही घेता येत तिला , एकटीने शो रुल करु शकत नाही त्यामुळे फॉलॉअरच दिसते, विनर नाही !
त्या हॉटेलच्या पाहुण्यांना बाकी हिनानी सर्वात जास्तं , खूप मनापासून काही कंप्लेंट न घेता स्पा सर्व्हिस दिली , टिम बी डिझर्विंगच होती आणि बरं झालं तीच जिंकली , हिना, केळ्या, वैशालीनेही एंटरटेन चांगलं केलं होतं आणि नेहाचा माकडांचा डॉयलॉग भारी होता
श.रा ने अजुन एक काम चांगलं केलं कि नेहाला फोडायचा प्रयत्नं केला केळ्या-वैशाली पासून !
अत्तच्या रुपाली किशोरी टिमच्या बायांना अजिबात डोकं नाहीये स्वतःचं, नेहासारखी लिडर असल्याशिवाय त्यांना काही जमणार नाही, नेहा तिथे गेली तर २ टिमची स्पर्धा तुलबळ होईल.
आता उद्या वैशाली जाते कि सुरेखाताई माहित नाही, वैशालीला खूप हेट्रेड आहे आणि सुरेखाबाईंचे फॅन फॉलॉइंग कमी त्यामुळे काही सांगता येत नाही.
ऑनेस्ट्ली मला वाटतं केळ्या वैशाली शेवटपर्यंत रहावे , सगळ्या प्रकारचा स्वभाव असणारी, कारस्थानं करु शकणारी माणसं हवीतच शो मधे, इमॅजिन जर मागच्या सिझनला अस्ताद-रेशम टिकले नसते तर सगळा शो गुडीगुडी होऊन बोरिंग झाला असता !
तसेही एक शिव सोडला तर सगळे थोड्याफार प्रमाणात निगेटिव आहेत, बिबॉ च्या वरणभात ऑडियन्सला मात्रं फक्तं ‘वैशाली नेहा केळ्या ‘ निगेटिव दिसतात !
शिव -वीणा -नेहा -केळ्या -वैशाली असे माझे टॉप ५ सध्याच्या स्टेजला, पण अर्थातच बिबॉने ठरवले तर जाईल वैशाली या आठवड्यात.
वैशाली नाही जाणार. कंटेंट
वैशाली नाही जाणार. कंटेंट देतेय ना. घालवलं तर समजायचं की परागला परत येऊ नाही दिलं म्हणून voting कमी तिला प्लस bb पण नाराज.
शिव आणि वीणा दोघेही खूप लहान असल्यासारखे वागतात मात्र कधी कधी. कोणी काही बोलले की लगेच नाराज, रडणार, रुसणार. त्यांना महत्व नाही दिलं, कोणी त्यांचं ऐकलं नाही कि झालं.
बिबॉ च्या वरणभात ऑडियन्सला
बिबॉ च्या वरणभात ऑडियन्सला मात्रं फक्तं ‘वैशाली नेहा केळ्या ‘ निगेटिव दिसतात ! >>> दिसतातपेक्षा bb त्यांची तीच साईड दाखवतात
. केळकर हसतो तरी ह्या दोघी कायम खुन्नस देऊन वावरत असतात.
शिवला टीम सोडू नको टीप दिली वाटतं, काहीतरी सांगत होता. नीट समजलं नाही. प्रत्येकाला टिप्स देऊन गेलेत.
वैशाली एक नंबरची भोचक आणि
वैशाली एक नंबरची भोचक आणि कुचकट आहे .आणि लकी सुद्धा . गेस्ट नि तिला अजिबातच काहीच काम करायला सांगितलं नाही. बाकीच्या सगळ्यांकडून काही ना काही करून घेतलं . हि बया किचन मध्ये हि नाही /एन्टरटेन करण्यात पण नाही /स्पा मध्ये पण नाही. एक काही तरी नेहाने तिला मदतीला घेतली बेशिट्स बदलायला तेवढीच दिसली . काहीच करता येत नाही तिला फक्त झोपता येत. तरी सर्वात लकी तीच आहे . एकही वैयक्तिक स्टार मिळवून दिला नाही आणि किशोरीला नाव ठेवण्यात पुढे म्हणे "इथे दिसत तेच असत " बरोबर आहे . पब्लिक ला दिसत ना तू किती आळशी आणि कुचकट आहेस ते. तो शिव हि का एवढा वैशालीच्या गळ्यात पडतो कळत नाही . . कधीही माकड होऊ शकत त्याच
वैशाली एक नंबरची भोचक आणि
--------
एन्टरटेन करण्यात पण नाही >>>
एन्टरटेन करण्यात पण नाही >>> गाणी गायली आणि विदर्भाचा काहीतरी स्पेशल पदार्थ केला जो आवडला गेस्टना आणि एक स्टार दिला. बाकी सहमत.
किशोरीताई हळवी होऊन बोलत होती. तिला ती जाणार असं वाटतंय. ती सांगत होती तेव्हा केळकरने डोळे मिटले आणि ही कित्ती बोअर करतायेत असा लुक दिला.
सुरेखाताई रडल्याना म्हणून त्या grpने त्यांना मुजरा केला, कौतुक केलं. तेव्हा किशोरीताई अस्वस्थ झाली, उठून जायला लागली, पण वैशाली म्हणाली तर मान ठेवला तिचा आणि सुरेखाताईंच्या शेजारी बसली झोपाळ्यावर. वीणा झोपली होती तेव्हा बहुतेक, ती नव्हती.
पाहुणे लोक चहा मीठ साखर
पाहुणे लोक चहा मीठ साखर चोरताना पकडले जाऊन त्यांना कोठडीत टाकलं गेलं असतं तर मज्जा आली असती. तसंच हॉटेलच्या सामानाची नासधूस केल्याबद्दल त्यांना दंड लावायला हवा होता किंवा रेस्टॉरंटमध्ये बिल न भरू शकणार्याला भांडी घासायला लावतात (असं म्हणतात) तसं काहीतरी काम करून घ्यायला हवं होतं.
हे जर टास्क आहे तर हाउसमेट्सनी खर्याखुर्या हॉटेल चालकांसारखं वागून पाहायला हवं होतं.
गेस्ट्स मिसबिहेव्ह करताहेत, तर सॉरी आम्ही तुम्हाला सर्व्ह करू शकत नाही. निघा. असं सांगायचं.
---
निगेटिव्ह गोष्टी करणं शर्मिष्ठाला अगदी नॅचरली येतंय असं वाटत होतं. ती नेहा-वैशाली-अभिजीत यांना चांगली स्पर्धक ठरू शकली असती.
---
वैशाली अभिजीत शिवचा वापर करून घेताहेत, तसंच तोही त्यांचा वापर करून घेतोय, असं मला वाटतं. कळेलच पुढे.
---
कोठडीत नेहा स्पष्टीकरण देत असतानाही अभिजित डोळे मिटून बसला होता.
--
वैशाली खूप पुस्तकी भाषेत बोलते. ते सहज अजिबात वाटत नाही. तेच भांडतानाचा तिचा आवेश, शब्द आणि लहेजा खरे वाटतात.
पाहुणे लोक चहा मीठ साखर
पाहुणे लोक चहा मीठ साखर चोरताना पकडले जाऊन त्यांना कोठडीत टाकलं गेलं असतं तर मज्जा आली असती. तसंच हॉटेलच्या सामानाची नासधूस केल्याबद्दल त्यांना दंड लावायला हवा होता किंवा रेस्टॉरंटमध्ये बिल न भरू शकणार्याला भांडी घासायला लावतात (असं म्हणतात) तसं काहीतरी काम करून घ्यायला हवं होतं.
हे जर टास्क आहे तर हाउसमेट्सनी खर्याखुर्या हॉटेल चालकांसारखं वागून पाहायला हवं होतं.
<<<<
Great thinking
--
वैशाली खूप पुस्तकी भाषेत बोलते. ते सहज अजिबात वाटत नाही. तेच भांडतानाचा तिचा आवेश, शब्द आणि लहेजा खरे वाटतात.
<<<<<
+11111
I thought the same during her first fight with Veena.
Pages