बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वीणानं टाॅवेलनं कमोड पुसला. नंतर तो टाॅवेल विणा, किशोरी शर्मिष्ठा सगळ्यांनी अनेकदा हातात घेतला पण कोणीही हात पण धुतले नाहीत. शेवटीतो टाॅवेल इतर कपड्यांबरोबर धुवायला जाणार असं वीणा म्हणाली. हे फार फार खटकलं.

शिवानी सुर्वे आणि परागने आता बाहेर येऊन गेम्स खेळायला सुरुवात केली आहे.>> म्हणजे ?>>शिवानी सुर्वे ने पहिली मुलाखत दिली आहे ...त्यात ही ती तसच अद्वा तद्वा बोलली आहे..पराग विषयी पण बोलली आहे..थोडाक्यात सुंभ जळला तरी.. अशी अवस्था आहे तिची.. खालील लिंकवर तिचा विडियो:

https://youtu.be/QMKNApPl77g

गम्मत अशी की तिने तिच्या so called fans साठी विडियो काढला पण त्याला काही 300 लाइक्स आणि 1200 Dislikes आहेत आत्ता तरी आणि भरभरून negative comments

त्यावर उत्तर म्हणून पराग ने आपल्या यूट्यूब channel वरून विडियो प्रसारित केला.. त्याला 1.7K लाइक्स आल्या आहेत आत्ता पर्यंत.त्याचा विडियो खालील लिंक वर
https://youtu.be/G5H3J3EzSFc

so आता हे उत्तर प्रत्यूत्तराच चक्र चालू राहत की नाही ते बघायच आहे. Lol

मेधावी, +१
त्याच हाताने दरवाजे उघडले. सगळेजणं टॉवेल असा हातात घेवुन देत होते एकमेकांना बघुनच विचित्र वाटले....

बापरे काय यक्क प्रकार सुरू आहेत. एकूण बिग बॉस टीमच फेल झाली आहे यावेळेस. मागची टीम वेगळी होती का?
टीम नियम स्पष्ट करत नाही आणि वेळीच मध्ये पडून intervene करत नाही यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो.
मी शनिवारचा एपिसोड लास्ट बघितला. नंतर सोडून दिलं. इथे वाचून कळलं की बघत नाही हेच बेस्ट आहे, उगाच दीड तास फुकट जाण्यापेक्षा.

हे फार फार खटकलं. >>> हो. का असं करतायेत, असं मी बघता बघता म्हणत होते. ह्याबद्दल सुनवायला हवंय त्यांना.

नेहाची हॉट चॉकलेट आयडीया भारी होती. पण अनेक चुका करुन, स्वतःचे डीसीजन थोपुन कित्तीबाई मी हुश्शार म्हणायला मोकळी.

हिना बरोबर सांगत होती तिला, बाहेर तुझी प्रतिमा नीट नाहीये असं सुचवत होती, त्यावरून हे सर्व करतायेत ते. हिनाने मसाज वगैरे करुन स्टार छान मिळवले.

पर्सनली केस टाकला सुपमध्ये ते नाही आवडलं मला. स्मिता सांगत होती, कशाला करता असं. ते जरा जास्त वाटलं मात्र. त्यापेक्षा चविष्ट अजिबात नाहीये, आवडलं नाही अजिबात तरी प्यायले मी असं म्हणायचं होतं.

कॅप्टनने अडगळीच्या खोलीची चावी सांभाळून ठेवली नाही, हीसुद्धा मोठी चूक आहे. नेहा आणि माधव दोघेही चुकलेत जास्त.

आजही नेहाची टीम जिंकली तर मात्र bb त्यांच्याच बाजूने असं मी म्हणेन.

श रा छळवादीपणा करण्यात पटाईत आहे. सई दोन नं पण एवढी नाही. स्मिता आणि पुष्करला मनापासून वाईट वाटत होतं मात्र.

स्मिता एक नं, तिचा वावर असला की दुसरीकडे लक्ष जात नाही. किती ग्रेसफुल, down to earth.

रुपाली झाकोळली जातेय आधी पराग आणि आता वीणामुळे पण रुपालीचा तर्क एकदम करेक्ट होता, सर्व पाहुण्यांनी चोरलं असणार, वीणा एकच नेहा, नेहा करत होती.

वीणाच्या टीमने जेवण छान सर्व्ह केलं, ताटाभोवती फुलांच्या पाकळ्या वगैरे. रुपालीचा रोल मोठा होता यात. वीणाने पोहे कसे भिजवले, चाळणीत निथळत ठेवले का नाहीत, मग ते नीट कसे होणार. डान्स मस्त होता, हसू येत होता.

काय तो केळकर, शिव कसा मस्त युनिफॉर्मसकट पाण्यात उतरून चष्मा का goggle काढून दिला.

नशीब चहा, साखर, मीठ होतं दुसरीकडे. आता आज समजेल.

नेहा, वैशाली कधी हसतमुख नसतातच, चेहेऱ्यावर सतत १२ वाजलेले आणि खुनशी भाव असतात आणि केळकर हसतमुख आहे पण कुजकट आहे.

प्रेझेंटेबल आणि बघावं असं वाटणारे कमीच आहेत. त्यातल्यात्यात शिव, वीणा आणि रुपाली. रुपाली डार्क शेड लिपस्टिक लावते ते मात्र खटकते. किशोरीताई आणि सुरेखाताई आधी ग्रेसफुल वाटायच्या आल्या तेव्हा, आता फार नाही वाटत. तरी सुरेखाताई जास्त बऱ्या वाटतात. किशोरीताई कृत्रिम वाटते बरेचदा. हीनाही नाही आवडत. ती फक्त एका शनिवारी साडी नेसलेली तेव्हा छान ग्रेसफुल दिसत होती.

सई मला फार आवडत नाही त्यामुळे ती आली तरी काही फार मजा येईल असं वाटत नाही.

टीम नियम स्पष्ट करत नाही आणि वेळीच मध्ये पडून intervene करत नाही यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो. >>> हे सेम मागच्यावर्षीपण होतं.

ते खराट्या च्या काडया काढून टाकणे म्हणजे कायच्या काय होत. नेहा ला बोलवले तेंव्हा ती बोलली इकडे माकडे येतात आणी उलट पुलट करतात Biggrin

पण कशाला हवीये ह्यांना परत सईच.....

दुसरं कोणीच नाहि उरलय का ह्या जगात..... :राहाने लाल झालेली बाहुली:

ती आली तर एका बेडवर वैशाली नि दुसर्‍या बेडवर सई अश्या दोन बाळंतीण बायका बघायला मिळतील.

माकडे येतात आणी उलट पुलट करतात >>> हे लय भारी होतं. ह्या नेहाच्या पंचला मी मनापासून दाद दिली, नवऱ्याला म्हणालेही, ही त्यांना माकडे म्हणाली Lol

sorry आत्ता लिहिताना विसरले.

सईला थोड्या दिवसांसाठी आणले असावं असे बरेच जण म्हणतायेत.

पराग गेल्यावर trp किती कमी झालाय वगैरे ते काही कळले नाही पण सो मि वर सपोर्ट खूप दिसतोय त्याला.

टीम A कडे 5 लोक होती पण सुरेखा ताई कुठे जास्त ऐक्टिव दिसल्याच नाहित . फक्त खरडा करताना. नंतर जाऊन झोपलेल्या. त्यामानाने किशोरी ताई बर्याच काम करत होत्या. आणी म सुरेखा ताई ना वया वरुन बोलले की राग येतो. या उलट टीम B चे 5 ही मेंबर ऐक्टिव होते. त्याना तो प्लस पॉईंट झाला.

पण टीम बी मध्ये आपापसात धुसपुस जास्त होती, ए मध्ये नाही. या task मध्ये bb ला हवी तीच टीम पुढे जाणार. मागच्या task मध्ये बी ला फेवर केलं आता ए ला करायला हवं आहे खरंतर.

हो परागच्या व्हिडीओ आताच बघितला . तो म्हणतोय ना " मी आत मध्ये होतो तेव्हा मला असं भासवलं गेलं कि माझ्या हातून केवढा मोठ्ठा गुन्हा घडला आहे ". पण बाहेर आल्यावर समजल कि तुम्ही मला समजून घेतलत . तुमचा किती सपोर्ट आहे मला. इत्यादी इत्यादी .

त्याने दुसऱ्या एका व्हिडीओ मध्ये प्रेक्षकांना आवाहन केलं आहे . कि माझ्या बरोबरीने इतरांची पण चूक होतीच . पण तरी सुद्धा तुम्ही वैशाली / नेहा आणि केळकर ला ज्या अर्वाच्य भाषेत शिव्या देत आहात . त्या देऊ नका प्लिज . कारण त्यांचे नातेवाईक जे आहेत ते खूप खूप डिस्टर्ब् होतात . माझ्या हि घरचे ज्या पद्धतीने डिस्टर्ब् झाले होते ते बघून मी तुम्हाला विनंती करतोय . हा खेळ आहे . यात असं होणारच . याला म्हणतात . खिलाडू वृत्ती . इतक त्याने सहज पणे सांगितलंय . मान्य आहे नेहा ने / वैशालीने मला त्या खुर्चीवरून उठवण्याकरता खूप चुकीच्या बळाचा वापर केला पण तरीही तुम्ही त्यांना घाणेरड्या भाषेत शिव्या देऊ नका . म्हणूनच पराग प्रेक्षकांना आवडतो Happy

पण तरीही परागला परत आणण्याची मागणी लोकांनी करू नये.तुम्ही घरी परतून सोमिवर अँक्टिव्ह झालात म्हणजेच तुम्ही कंटेस्टंट म्हणून रहात नाही.

आणतील असं वाटत नाही कारण आणायचं असतंच तर वेगळा मार्ग काढला असता म्हणजे वातावरण निवळेपर्यंत सिक्रेट रूम मध्ये ठेवलं असते मग अजून काहीतरी trick केली असती तो घरात रहावा त्यानंतर म्हणून. हे असं सगळे खूप नाराज असताना त्याच्या टीममधलेपण, आणायचं नाटक नसतं केलं.

त्याला वेगळी मदत करेल channel म्हणजे त्याला परत कुकरी शो वगैरे देईल.

पण तरीही परागला परत आणण्याची मागणी लोकांनी करू नये >> हो. मलाही तसच वाटत. एकदा बाहेर पडलात ना मग बाहेर पडलात . त्याने पण परत आपल्याला बोलावतील अशी अपेक्षा बाळगू नये . आणि बोलावलं तरी जाऊ नये नाहीतर मग किंमत रहात नाही . तो आपला पैसे मिळतील म्हणून कदाचित अपेक्षा पण करेल.माहिती नाही .पण खरं तर आपल्या पुढच्या कामाला लागावं हेच खर Happy

बिग्ग बॉस मध्ये कोण किती काम करत माहिती नाही. पण प्रत्येक जण मी खुप काम केल म्हणत असतो. आज च्या एपिसोड मध्ये सुरेखा ताई मी सगळं जेवण केल. किशोरीला काही तरी येत नव्हत असे बोलत आहेत.

गेल्या दोन दिवसांच्या एपिसोड मध्ये बिग बॉसने दाखवून दिले की बिग बॉस पेक्षा कंटेस्टंट मोठे होऊ शकत नाहीत.. यावेळच्या कंटेस्टंटना बिग बॉसचा अजिबात respect नाहिये.. मोठ्यांचा पण respect नाही.. हे त्यांनी पाहिल्या आठवड्यापासून दाखवून दिलंय. तर त्यांची जिरवण्यासाठी bigg boss ने guests ना पाठवून सगळ्यांना आपापली लायकी दाखवली..

नेहाने पुष्करला माकडांबद्दल सांगितलं त्यावेळेस एकीकडे हसू आलं तर दुसरीकडे तिचा रागही आला की कोणी इतकं कसं उर्मट असू शकतं असं वाटलं..

मला वीणा आवडते.. तिचे points पण चांगले असतात पण ती फारच उद्धट आणि गर्विष्ठ आहे... तिला पण जागा दाखवली.. ती सगळ्यात जास्त घाबरलेली वाटली..खरं म्हणजे task व्यतिरिक्त न भांडता पण या घरात राहता येतं ही शिकवण देण्यासाठी bb ने या चार जणांना आत पाठवले आणि अगदी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून सगळ्यांना एकत्र पण आणले.. पण मिळालेल्या संधीचा फायदा हे काही करणार नाहीत असं दिसतंय एकूणच precap बघून.. पुन्हा भांडायचं म्हणताहेत... कठीण आहे.. असो.. पण इतर weeks पेक्षा सई, स्मिता, पुष्कर, शमा असल्याने या week मध्ये मजा येतेय

Voting कसं करायचं सांगू शकेल का कोणी??>>>

Voot app download करून नंतर मराठी जत्रा पण download करायला लागेल आणि मराठी जत्रावरून voting करता येतं. ह्यावेळी फक्त मोबाईलवरून आहे.

पण त्रास देण्यासाठी काहीही चाललय. एकाच वेळेस विणा दोन ठिकाणी कशि काय असु शकेल? पोहे पण करायचे अणि डान्स पण ? बाथरुम पण साफ करुन हवी तिनेच , हे जरा अतीच . अर्थात हे ते मुद्दाम ठरवु न आले होते त्याना टार्गेट करायचं.
वैशाली सुटली ह्या टॉर्चर मधुन

Pages