बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मला तरी आवडले guests.. म्हणजे episode जरी boaring होता तरी चौघांची एंट्री झाली तेव्हा एकदम positive वाटलं... आणि त्यांनी खूप त्रास वगैरे दिला असं नाही वाटलं.. In fact हा taskch तसा आहे... शिवाय सध्याचे housemates हेच deserve करतात... मागच्या सिझनला पण guestsni भरपूर त्रास दिलेला पण contestantsni मस्त entertain केलं.. काल तर सगळ्यांची जाम टरकली होती... पुष्करने मस्त टोमणे मारले.. आता बसा म्हणावं 'कर्म कर्म' करत... वीणा पण खूप गर्विष्ठ आहे.. तिची पन जिरवली...

काय माहिती खरं काय ते. बिग बॉस आणि संबंधित फक्त सांगू शकतात.

एखादी कानफटात मारली असती तर bb ने ठेवलं असते परागला, बाकीच्यांना विचारत बसले नसते कारण वीणा शिवानी केसमध्ये ठेवलं ना दोघींना. शिवानी गेली दुसऱ्या गोष्टीमुळे.

परागने लिहिलेलं खरं असेल तर बाकीच्या मारणाऱ्या लोकांना काहीच शिक्षा झाली नाही, nominate पण नाही केलं. आता bb ने तो विषय संपवला.

पण ज्याअर्थी त्याच्या टीममधले पण भडकले त्याच्यावर तर त्याची चूक नक्कीच जास्त असणार.

सोमिवरील चर्चेवरून अस दिसत आहे की बिबॉसचा टीआरपी चांगलाच घसरला आहे.
गेल्यावेळच्या लोकांनी येऊनही फार काही फरक पडलेला नाही.
तिथे तर शर्मिष्ठाला जाम बोलल जात आहे.
या लोकांनी आता येऊ नये,ते म्हणतात ना,की गाण्यातली एखादी जागा किंवा एखादी कला क्रुती एकदाच होते,नंतर त्याला पहिल्याची सर येत नाही
तसच आहे या चौघांनी एवढ प्रेम मिळवल आहे लोकांच,ते तसच राहू देत.

नवीन प्रोमोत दोन्ही टीमच्या तीन तीन members ना अडगळीच्या खोलीत टाकलेलं दिसतंय. नेहा, माधव, वैशाली, केळकर आणि वीणा, रुपाली, शिव.

वीणा टीम ने बेड नीट साफ केला नाही म्हणून मीन्स एक माशी मेलेली दिसली बेडवर त्यांना.

मला वाटत हे माशी वगैरे गेस्ट पैकिच कुणीतरी टाकले असेल मुद्दाम बेडवर. आणी पालक सुपात केस सापडला म्हणून नेहा वैशालीला माधव जेल मध्ये टाकले. वूट वरच्या प्रोमो मध्ये पण पुष्कर सगळे झोपल्यावर किचन मधून कसलेतरी डब्बे मला वाटत चहा साखरेचे लपवत आहे . बिग्ग बॉस ने मुद्दामून असे करायला संगीतले असेल.

माधवला पण अडगळीच्या खोलीत ? कॅप्टन आहे ना तो ? या दोन्ही टीमच्या मेम्बर्स मध्ये भांडण झाली असतील नेहमीप्रमाणे यशस्वी भांडणारे मेम्बर्स पण माधव कॅप्टन म्हणून नीट वागला नाही म्हणून असेल तो पण Proud
बिग्ग बॉस ने मुद्दामून असे करायला संगीतले असेल.>> हो स्पर्धकांना त्रास द्यायलाच पाठवतात गेस्ट ना .
म्हणून ते मस्त ठणठणीत त्रास देताहेत Proud

भांडने नाही पालक सुप मध्ये केस सापडला म्हणून तिघाना जेल मध्ये आणी बेडवर माशा किडे सापडले म्हणून वीणा शीव रुपाली जेल मध्ये काहीही चाललाय. आधी अडगळीच्या खोलीत एकाला ही टाकत नव्हते आता 6जणं एकदम.

>>पुष्कर सगळे झोपल्यावर किचन मधून कसलेतरी डब्बे मला वाटत चहा साखरेचे लपवत आहे . बिग्ग बॉस ने मुद्दामून असे करायला संगीतले असेल.

अरेरे!
हाकलून द्या असल्या गेस्ट्स ना घराबाहेर Proud

सगळ्याच्या सगळ्या स्टाफला अडगळीच्या खोलीत कोंडून यांचा परत एकदा हा सीझन खेळायचा डाव दिसतोय..... मेघा नसल्यामुळे त्यांना जिंकायचा चान्स वाटत असावा Rofl

पुष्कर लास्ट टाईम फैमिली ची आठवण येते म्हणून रडायचा सारखा आणी आता म्हणतो मी अजुन 100दिवस राहीन. Lol

सगळ्याच्या सगळ्या स्टाफला अडगळीच्या खोलीत कोंडून यांचा परत एकदा हा सीझन खेळायचा डाव दिसतोय..... मेघा नसल्यामुळे त्यांना जिंकायचा चान्स वाटत असावा.
>>>> Proud

पण ही लोकं बिचुकलेला आणणार असं वाटतं. श रा म्हणाली उद्या नको यायला तो स्टाफ वगैरे त्यावरून. हायकोर्टात जामीन मिळवायचा प्रयत्न करणार Sad .

शरा मागच्या सीझनमध्ये शान्त होती. आताच ही अशी काय वागते? Uhoh पण तिने आणि सईने नेहाला झापल ते आवडल मात्र. पुष्कर मात्र त्यान्च्या म्हणण्याला नुसत हो हो करत होता. स्वतः मात्र काहीच बोलत नव्हता. ते त्याच एका हातात फुल घेऊन बसण विनोदी वाटत होत. Proud

वैशाली आणि सुपुमध्ये पपईवरुन भाण्डण चालू होते तेव्हा रुपाली एका बेडच्या कोपर्यात पपईचे तुकडे घेऊन बसलेली दाखवली. चोरुन खात होती का?

सई , पुष्कर, स्मिता आणि श रा एका कोपर्यात बोलत बसलेले होते, स्मिता तेव्हा काहीतरी खात होती तेव्हा क्षणभर लास्ट सीजनचा विकएण्डचा वार सुरु असल्याचा भास झाला.

मला तरी आवडले guests.. म्हणजे episode जरी boaring होता तरी चौघांची एंट्री झाली तेव्हा एकदम positive वाटलं... >>>>>>>> +++++++ अगदी अगदी

guests ची नावे ऐकल्यानन्तर आणि त्यान्ना पाहिल्यानन्तर केळया ओव्हर एक्साईटेड वाटत होता. त्याच्या चेहर्यावरचे एक्सप्रेशन्स वेगळेच दिसत होते.

ते साथिया चार वेळा म्हणून झाल्यावर नन्तर सुन्या सुन्या मैफिलित माझ्या चालू केल ते बघून हसायला आल.

शिवचा साडीची घडी घालण्यावरुन झालेला गोंधळ मजेशीर होता.. >>>>>>>>++++++++++११११११११११

बीबीखबरीच्या पोस्टमध्ये लिहलय की नेहा टिमने परागच्या तोण्डावर Detergent टाकल. पण मी एपिसोडमध्ये बघितल तेव्हा त्याच्या डोक्यावर फक्त शेव्हिन्ग क्रिम टाकलेल. वैशाली, केळकर आणि माधव ने त्याला लाथा बुक्क्यान्नी मारल असेल तर तो खाली पडायला हवा होता. तेही दाखवल नव्हत. खर खोट बिबॉच जाणे! जर वैशाली, केळकर आणि माधव ने खरच तस काही केल असेल तर त्यान्नीही जायला हव होत बिबॉमधून.

सगळ्याच्या सगळ्या स्टाफला अडगळीच्या खोलीत कोंडून यांचा परत एकदा हा सीझन खेळायचा डाव दिसतोय..... मेघा नसल्यामुळे त्यांना जिंकायचा चान्स वाटत असावा >>>>>>>>> Rofl

आता एकदा बघायला सुरुवात केली आहे म्हणून कसे तरी 100दिवस काढायाचे >>> Lol असंच होतंय. >>>>>>> सेम पिन्च, अन्जू. Happy

शिव आणि वीणाला वेगळं नका रे करु. दाखवू नका जास्ती त्यांचं हवं तर. पण क्युट पेअर त्यांचीच वाटते खरंतर आणि मागच्यावेळेसारखं नाहीये की दोन्ही पेअरमधे एकाचं लग्न झालेलं, मुलं होती. ती हिना नको शिवबरोबर.

दोन वेगळ्या टीम्स असून आपल्या टीमबरोबर गद्दारी न करता त्यांच्यात चांगली मैत्री असेल अगदी स्पेशल तर असूदेकी. मला आवडते त्यांची जोडी. >>>>>>>>> सहमत. काल विणा रूपालीच्या माण्डीवर झोपलेली होती तेव्हा रुपाली तिला अशी हसून खेळून का राहत नाही सर्वान्शी बोलली, मला सई- मेघाच सेम conversation आठवल, सई सारखी डिप्रेस्ड असायची तेव्हा मेघाही तेच म्हणायची. रुपाली आणि विणामध्ये मेघा- सईचे व्हाईब्स जाणवतात.

एक star सुरेखाताईनच्या गाण्याला मिळाला पण वैशालीच्या नाही. >>>>>>>> सुरेखाताईन्नी कुठल गाण म्हटल, अन्जू?

ते डान्स करणे आणी गाणे म्हणणे तर शाळेत ऑफ़ पीरियड असल्यावर मुले काही तरी ऐक्टिविटी करतात ना तसे होते. Biggrin Rofl
एक star सुरेखाताईनच्या गाण्याला मिळाला पण वैशालीच्या नाही. >>>>>>>> सुरेखाताईन्नी कुठल गाण म्हटल, अन्जू?>>>>>>किशोरी ताईनी माईकल जैक्सन चे गाणे म्हणले त्याला मिळाला ना एक स्टार

शर्मिश्ठा त्या मनबावरे तिल संयु सारखी वागत आहे का ? Light 1

किशोरी ताईनी माईकल जैक्सन चे गाणे म्हणले त्याला मिळाला ना एक स्टार >>> हो हो, thank u Amupari.

sorry sorry सुरेखाताई बैठकीची लावणी शिकवत होत्या वीणाला तेव्हा गात होत्या आत. मी confused झाले.

इंग्लिश ब्रेकफास्ट मधे बीन्सचा समावेश असतो हे काल नव्याने कळलं. आणि बीन्स, ब्रेकफास्टला खाणार्‍या पुष्करचं कौतुक वाटलं... Lol

पाहुण्यांत फक्त स्मिता आपला आब आणि रुबाब राखुन होती. बाकि सगळे...

बँड-एड आणि बँडेजमधे फरक असतो हे वीणाला नॅशनल टिवीवर दाखवुन दिल्याने तिचा तिळपापड झाला. गरज अजिबात न्हवती, पण माधवने "बेटर बी सेफ दॅन सॉरी" या न्यायाने तिची माफि मागुन टाकली...

सई स्मिता पुष्कर शर्मिश्ठा याना आधिच बिग्ग बॉस मध्ये पाहुन झालाय . ते कसे वागतात बोलतात सगळ्याना माहिती आहे . त्याना परत बघायला काय मजा. यापेक्षा वेगवेगळ्या नविन लोकांना बोलावले असते तर बघायला मजा आली असती बघायचा उत्साह वाढला असता.

Pages