विश्वचषक क्रिकेट २०१९

Submitted by Adm on 25 May, 2019 - 01:57

WC2019.jpg
*

वेळापत्रक

होऊ दे चर्चा !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

* मराठी खेळाडू टीम मध्ये . नाही
विजय कोणाचा साजरा करायचा * -
ज्यानी वाडेकर, रमाकांत देसाई, सरदेसाई, गावसकर, वेंगसरकर, तेंडूलकर इ.इ.ना ते मराठी आहेत कीं नाहीं हें न पहाता डोक्यावर घेवून नाचवलं त्या भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी !

मस्त चालू आहे मॅच.!
भारताने बॅटिंग मध्ये कमाल केली आणि आता बॉलिंग मध्ये ही छान कामगिरी करत आहेत.
22 overs /104.!!

तो मांजरेकर आणि रमीज राजा एकत्र काॅमेंट्री ला आले की जाम चिडचीड होतीये.
दादा आणि रमीज आला की जाम मजा येतीये. दादा अजिबात ऐकत नाही.. Happy

काल कॉमेंट्रीत ऐकल का?.

क्लार्क : मला सगळीकडे निळे शर्ट व भारतीय झेंडेच दिसत आहेत. हिरवा रंग कुठेही नाही.
गांगुली : हो. तिकिटे महाग आहेत म्हणून असेल बहुतेक. Happy

एकही लूज बॉल सोडत नाही गांगुली अजूनही. Happy

काल रोहीत पुन्हा एकदा मस्त खेळला. व्यवस्थित पेस केली इनिंग. सुरवातीला शांतपणे खेळून नंतर व्यवस्थित धुलाई केली. डबल सेंचुरी हुकली असे वाटले.

विराटचा वॉक करण्याचा निर्णय अशक्य जोक होता. बॅटीच्या हँडलमधून आवाज आला म्हणे. शेवटच्या तीन ओव्हर राहिल्या असताना आउट दिल असत तरी रिव्यू घ्यायच ठरवायला पाहिजे होत उलट इथ आउट नसताना स्वतःहून बाहेर आला.
बाबर आझम बद्दल पण रिव्यु घ्यायला पाहिजे होता. बॉल बॅटला लागल्याने धोनी नको म्हणाला, पण बॉल पॅडला आधी लागला हे फक्त कुलदीप साम्गू शकत होता. पायचीतच्या बाबतीत कशाबद्दल कुणी मत द्यायचे हे नीट ठरवायला पाहिजे.
सुदैवाने दोन्हीचा आपल्याला फटका बसला नाही.
एकंदरीत व्हेरी वेलच डन टीम इंडिया. Happy

जिंकल्याचा आनंद मोठ्ठाच आहे!
पण पाकचे क्षेत्ररक्षण सुमार अगदी चेंडूवर झेपावतना दिसले नाहीत. चौकार जाणार हे गृहित धरून धावत होते...
अमीर वगळता गोलंदाजीत देखिल प्रभाव दिसला नाही.. सर्फराज जवळपास प्रत्येक चेंडूवर गोलंदाजावर चिडताना दिसत होता..
एकंदरीत एकतर्फी वाटला सामना कालचा.

विराटचा वॉक करण्याचा निर्णय अशक्य जोक होता. बॅटीच्या हँडलमधून आवाज आला म्हणे. >>>>>

विराटचा पंचांनी बाद न देता गोलंदाज/ यष्टीरक्षकाने केवळ करायचे म्हणून अपील केले असताना मैदान सोडण्याचा निर्णय खरोखर अनाकलनिय.

*विराटचा...ह मैदान सोडण्याचा निर्णय खरोखर अनाकलनिय.* - केदार जाधवची गोलंदाजी नाही तर नाही पण निदान फलंदाजी तरी अजमावणयाची ही योग्य संधी आहे, असं विराटला वाटलं असावं! Wink

क्रिकेट बद्दल वाचण्यासाठी कुठ्ले चांगले ब्लॉग्स आहेत का? त्याच त्याच बातम्या वाचून कंटाळा येतो. एखादा खोलात जाउन विश्लेषण करणारा ब्लॉग सुचवा

त्याच त्याच बातम्या वाचून कंटाळा येतो. एखादा खोलात जाउन विश्लेषण करणारा ब्लॉग सुचवा >> इथे वाचा Happy पन्नीकर लिहित नसल्यामूळे .... Sad

कोहली बदलतोय असे दिसतेय. आधी स्मिथ बद्दलची बातमी, मग हा वॉक आऊट .....

काल रोहितचे दोनशे व्हायला हवे होते. भयंकर तुडवायच्या मूड मधे होता राव.

आत पुढच्या मॅचमधे एकदा तरी आपल्याला सहाच्या आसपासचा रन रेट पनास ओव्हर मधे चेस (hopefully successful) करायला लागला पाहिजे म्हणजे प्लेऑफच्या आधी मस्त tune up होईल.

कालची मॅच जिंकल्याचा आनंद झाला, पण मॅच म्हणून एकतर्फी झाली. अर्थात सद्ध्या भारत, आणी इंग्लंड ह्या टीम्स इतक्या तूफान फॉर्मात आहेत की बहुतांशी मॅचेस मधे असे एकतर्फी निर्णय पहायला मिळतील. (आठवा ९० च्या दशकातली ऑस्ट्रेलिया ची टीम). काल पाकिस्तान ने त्यांच्याकडून ह्या एकतर्फी होण्याला हातभार लावला हे सुद्धा तितकच खरं.

कोहली च्या वॉक प्रकरणात जेन्युइन मिस-जजमेंट चा प्रकार वाटला. असं होऊ शकतं. २०११ च्या त्या (भारतीय संघाच्या दृष्टीनं) दयनीय इंग्लंड दौर्यात एका मॅच मधे द्रविड च्या शूलेसेस ला लागून गेलेल्या बॉलवर त्याला आऊट दिलं होतं आणी द्रविड - तेंडुलकर ने चर्चेअंती रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय घेतला होता. बाबर आझम च्या बाबतीत सुद्धा खूप क्लोज कॉल होता. त्यामुळे रिव्ह्यू वाया न घालवण्याचा निर्णय अगदी धडधडीत चुकीचा वाटला नाही.

रोहित शर्मा लाजवाब खेळला काल. पहिल्यापासून त्याचा ह्रिदम वाखाणण्यासारखा होता. राहूल ने सुद्धा त्याला चांगली साथ दिली. नंतर कुलदीप च्या त्या दोन विकेट्स खूपच महत्वाच्या होत्या. त्यावेळी पाकिस्तान डकवर्थ-लुईस च्या पार स्कोअर पेक्षा वीस-एक रन्स नी मागे होते. पण त्या विकेट्स मुळे सगळी समिकरणंच बदलली. शंकर-पंड्या ने भुवनेश ची जागा भरून काढली.

Pages