विश्वचषक क्रिकेट २०१९

Submitted by Adm on 25 May, 2019 - 01:57

WC2019.jpg
*

वेळापत्रक

होऊ दे चर्चा !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बॅटिंग, बाॅलिंग, कॅप्टनसी, फिल्डिंग सगळ्या जागा टेस्ट करणारी मॅच योग्य वेळी आपल्या वाट्याला आली !

अग , लागोपाठ सात-आठ तासांचे मेगा-बलाॅक !
काल इंग्लंडमधे, आज इकडे मुंबैत !! ssamkaay.JPG

हॅट्रीक ही हॅट्रीक , हें मान्य करूनही मनात एक प्रश्न येतोच - दोन चेंडूत 11 -12 धांवा आवश्यक असताना फलंदाजाला बॅट जोरात फिरवून षटकार मारण्याचा प्रयत्न करणयाला पर्यायच नसतो. अशा वेळी ऑफ स्टंपच्या शक्यतो बाहेर चेंडू टाकणं शहाणपणाचं कीं षटकार जाण्याची दूरचीही शक्यता दुर्लक्षून विकेट मिळवणं ? शामीने घेतलेली नबीची विकेट व बुमराहचं हुकमी याॅरकरसचं अपरतिम 49वं षटक हीच खरं तर निर्णायक होतीं व हॅटटरीकपेक्षां कित्येक पटीने बहुमुल्य, असं मला वाटतं.

*म्हणून तर सामनावीर किताब बुमराला मिळाला ना* - साॅरी, सामना संपल्यावर मीं टिव्ही बंद केला होता. हें माहित नव्हतं.

खरे तर अफगनिस्ताननने आपल्याला एवढे घोळसावे हे फारच लज्जास्पद आहे. त्या तळाच्या फलन्दाजाम्चे दोन तीन सिक्सर अचूक बसले असते तर काय शोभा राहिली असती. ३५ मार्क पडून पास झालो बुवा म्हणून टिर्र्या बडवण्यासारखे आहे ते....

तिसाव्या षटकात कोहली बाद झाला स्कोर होता 135-4
पंचेचाळीसाव्या षटकात धोनी बाद झाला स्कोर होता 192-5

माजी कर्णधार 52 चेंडू खेळून घणाघाती 28 धावांची भर संघाच्या धावसंख्येत घालतो....

अवघड आहे !!!

केदार ऐवजी जडेजा असता तर आपला येवढा तरी स्कोअर झाला असता का?.
रोहित, राहूल वा कोहली फेल गेल्यावर (६० -७० काढून आउट झाल्यावर) केदार पाहिजेच. विजयचा फुगा होउ नये. तो टीममध्ये आवश्यक आहे पण बॅटिंग आणिबॉलिंगमधे सातत्य पाहिजे. काल बॉलिंगही दिली नाही. अफगाण विरूद्ध ही परिस्थिती. विराट त्याचे कौतूक करतो पण काल बॉलिंग द्यायचे डेअरिंग झाले नाही. बॅटींग विकेट असेल तर त्याच्या ऐवजी रिषभ खेळावावा असे मला वाटते. सिमिंग कंडिशन्स असतील तर विजय.
काल धोनी आणि केदारने खूप वेळ घालवला .उशिरा मारायला सुरूवात केली. तेही जमले नाहीच. मॅच जवळ जवळ गेलीच होती. अफगाणींना अनुभव नसल्याने हरले. काल रमीझ राजा आणि मंडळी टॉसच्या विकेट बेल्टर आहे म्हणत होती. आपली आफ्रिकेविरूद्धची मॅच मी इथेच प्रत्यक्ष पाहिली होती. तेंव्हा सारखीच विकेट कालही होती. कसली बेल्टर आणि काय. स्लो, स्पंजी. कसले हे डोंबलाचे एक्स्पर्ट. अलिम दर हा फालतू अंपायर आहे. जाधवला आउट दिले तो बॉल लेग स्टंपच्या बाहेर जातोय हे आंधळ्यालाही कळाले असते. आपल्याकडे रिव्ह्यू होता म्हणून वाचला. विजयला सुद्धा
संशयाचा फायदा द्यायला पाहिजे होता असे म्हणायला वाव आहे..
वेस्ट इंडिजने धमाल केली. काल आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध थोड डोक शांत ठेउन खेळले असते तर जिंकले असते.

चारशेचा टप्पा इथे पार झाला. आपण उरलेल्या ४ पैकी दोन मॅचेस मधे आणि दोन्ही नॉक आउटमधे पार पाडायला पाहिजे. Happy

संजय मांजरेकरला तो पनवती आहे याची सहनिवेवेदकांनी जाणेव करून दिली असावी. स्तुती करताना नेहमी डिसक्लेमर लावत होता. Happy

*कसले हे डोंबलाचे एक्स्पर्ट. * +1
काल मराठी चॅनेलवरच्या एक्सर्टचं रूबाबातलं भाकीत होतं - ' भारत 400+, अफगाणिस्तान 150 ते 200 ! '

Pakistani players are highly motivated now ; त्याना घरीं जाण्यासाठी आतां कांहींतरी भरीव करून दाखवणं अपरिहार्य आहे . पाकिस्तान 309, द. आफ्रिका 160 - 4 ( 35 षटकं) !

अलीम दर फालतू अंपायर आहे ह्याविषयी सहमत. काल अफगाणिस्तान मस्त खेळले. पण धोनी ची पद्धत नक्कीच questionable होती. विकेट्स टिकवणं वगैरे ठीक आहे पण ५० चा स्ट्राईक रेट unacceptable आहे. ७०-७५ च्या स्ट्राईक रेटने तरी खेळावं. अर्थात तो आता काही बदलणार नाहीये.

धोनीचा अंदाज फारच गंडला हे मान्य करूनही अफगाण स्पिनर्स नी मजा आणली त्या ओव्हर्स मधे. पुढच्या मॅच मधे तो फास्ट खेळेल ह्यापेक्षा बघ.

आफ्रिकेने फारच निराशा केली ह्यावेळी.

आफ्रिकेने फारच निराशा केली ह्यावेळी. >> मला हे फाफचं मोठं अपयश वाटतं. तो आजिबात डायनॅमिक, ईनोवेटिव आणि टॅक्टिकल वाटला नाही.
'जे जे होईल ते ते पहावे' टाईप्स अगदीच जुन्या पठडीतलं क्रिकेट खेळत होती अफ्रिका टीम. बाकी पेसर्स बर्‍यापैकी विकेट काढत असतांना .. ईतर कुठल्याही स्पिनर्सपेक्षा ताहिरला जास्त विकेट्स मिळत असतांना रबाडाच अपयश अजूनच ऊठून दिसतं.
मार्करमही अगदीच मिसफिट वाटत होता.
आमला, डीकॉक, मिलर, डुमिनी कोणीच चमकलं नाही. कोणी मैदानात एनर्जेटिकसुद्धा वाटत नव्हतं. मॉरिस, ताहीर आणि थोडाफार फाफ एवढेच काय ते बरे वाटले.

*अफगाण स्पिनर्स नी मजा आणली त्या ओव्हर्स मधे* - +1.
अनुकूल खेळपट्टीवर नबी, रशिद व मुजीब यानी अप्रतिम गोलंदाजी केली, हें मान्य करून मगच धोनी- केदारचया संथ फलंदाजीचं मूल्यमापन करणं योग्य.

केदारचया संथ फलंदाजीचं मूल्यमापन करणं योग्य. > धोनी बाद झाल्यावर केदार ने रन रेट पेक्षा पन्नास overs खेळणे हे अधिक मह्त्वाचे आहे म्हणजे रन्स आपोआप येतील असा approach घेतला असे वाटलेले. मला तरी भुवी नसल्यामूळे आपली वाढती शेपूट बघता बरोबर वाटला. केदार रसेल किंवा गेल पठडीतला प्रकार नसून बेव्हन किंवा गेला बाजार बून टाईप आहे असे मला वाटते. त्याच्याकडून होउ शकते तेव्हढे maximization करत त्याने खेचायचा प्रयत्न केला.

रबाडाच अपयश अजूनच ऊठून दिसतं. >> अरे तो अजून फिट झालेला नाहिये १००% त्याचा पेसही कमी आहे बघ सध्या. पण हो एकंदर body language ठिकठाकच वाटली. अमला चे सलामीला येऊन आलेले अपयश नि मिलरचा loss of form अजिबात मदत करत नाहिये.

केदार रसेल किंवा गेल पठडीतला प्रकार नसून बेव्हन किंवा गेला बाजार बून टाईप आहे असे मला वाटते. त्याच्याकडून होउ शकते तेव्हढे maximization करत त्याने खेचायचा प्रयत्न केला.>>+१
मगाशी प्रतिसाद लिहायला घेतला पण पुन्हा तेच ऊगाळणे नको म्हणून हात आवरता घेतला. Happy
दहा बारा ईनिंग्जनंतर केदारला ४०+ बॉल्सची एखादी ईनिंग खेळायला मिळणार त्यात त्याने वरच्या पाचांना जे जमले नाही ते करून दाखवायचे आणि आपण म्हणणार हो मग त्यासाठीच तर त्याला खेळवत होतो. कसे शक्य आहे कोणालाही हे जमवणे? तो काही रॉस टेलर नाही आणि ब्राथवेट तर नाहीच नाही. त्याला किमान एक तरी टॉप ऑर्डर बॅट्समन त्याच्याबरोबर लागतो. पुन्हा त्याचा गेम तो टॉप ऑर्डर बॅट्समन जसा खेळणार त्याला कॉम्प्लिमेंटरी असणार. परवा धोनी ऐवजी कोहली टिकला असता तर केदारचा गेमही बराच फ्ल्युएंट झाला असता.
बोलिंगमध्येही तेच.. वेळ येईल तेव्हा जे दुसर्‍या चार स्पेशालिस्ट बोलर्सना शक्य होत नाहीये ते करून दाखवत... विकेट मिळवायची.
वी आर आस्किंग टू मच ऑफ हिम आणि त्याला प्लईंग ११ मध्ये असूनही गेम टाईम मिळत नाहीये. ही विसंगती मोठी चिंतेची बाब नाही का?
थोडक्यात आपण १० प्लेअर्स घेऊनच खेळल्यासारखे आहे.

बोलिंग किंवा बॅटिंग दोन्हीपैकी एक जमवण्यासाठी त्याच्या जागेवर स्पेशालिस्टच हवा. शंकर, पंड्या, जाधव एवढे बॅटिंग ऑलराऊंडर ही स्ट्रॅटेजी चुकीची वाटते आहे. जाधवच्या जागेवर बॅटिंग स्पेशालिस्ट घेऊन त्याला पुन्हा गेम टाईम मिळेलच ह्याची खात्री नाही. म्हणून ४नंबरला बॅटिंग स्पेशालिस्ट घेऊन (पंत?) बोलिंग स्पेशालिस्ट जो पूर्ण १० ओवरचे काँट्रिब्यूशन देऊ शकतो जाधवच्या जागेवर हवा. सध्या हा बोलिंगचा डबलभार पर्यायाने बुमरावरच पडतो आहे.
त्यादिवशी जडेजा असता तर त्या पीचवर अफगाण पावणेदोनशेच्या आत आटोपले असते. शाकिब सुद्धा जडेजासारखा लेफ्ट आर्म फिंगर स्पिनर आहे आज त्याने ३० धावात ५ विकेट्स काढले.

"अनुकूल खेळपट्टीवर नबी, रशिद व मुजीब यानी अप्रतिम गोलंदाजी केली, हें मान्य करून मगच धोनी- केदारचया संथ फलंदाजीचं मूल्यमापन करणं योग्य." - अफगाणी स्पिनर्स ने चांगली बॉलिंग केली म्हणून धोनी ५० च्या स्ट्राईक रेट ने खेळला, त्याला बॉल टाईम करता येत नव्हता, गॅप्स काढता येत नव्हत्या हे जस्टीफाय नाही होत. त्याचा अनुभव बघता, त्याने रिस्क्स न घेता सुद्धा निदान ७०+ च्या स्ट्राईक रेट ने रन्स करायला हव्या होत्या. एखाद्या अनुभवी / स्ट्राँग टीम ने ह्या कच्च्या दुव्याचा फायदा करून घेतला असस्ता. असो. जे झालं ते झालं. आता पुढच्या मॅचेस ला बघू काय होईल ते.

हे जस्टीफाय नाही होत >> जस्टीफाय नसावे त्या पोस्ट मधे तर तो एक फॅक्टर होता हे पण लक्षात असू दे असे असावे, किमान मी तरी तसे धरले. " गॅप्स काढता येत नव्हत्या" हे खरच आहे.

शंकर, पंड्या, जाधव एवढे बॅटिंग ऑलराऊंडर ही स्ट्रॅटेजी चुकीची वाटते आहे. >> बर्गा एक जण पांड्यासाठी बॅकप आहे नि दुसरा स्पिनर्ससाठी. मूळ मुद्दल नीट चालत असेल तर बॅकप वापरला जाणार नाही. पाचवा स्पेशॅलिस्ट बॉलर घेऊन फक्त पांड्या बॅकप रिस्की वाटाले असेल.

पंड्याच बॅकअप गोलंदाज आहे (म्हणजे आपण ४० ओवर्स मध्ये मॅचचा निकाल लाऊ आणि पंड्याला वापरावे लागू नये अशी अपेक्षा आहे) अजून त्याचा बॅकअप करून काय फायदा? ऑप्शन असणे ठीक पण बॅकअप?
आपल्या लीडिंग बोलर्सच्या ४० ओवर्स वर आपल्याला एवढा भरोसा आहे तर आमीर-१५, आर्चर-१५, स्टार्क-१५ फर्ग्यूसन१०४, वूड-१२, कमिन्स, ताहीर-१० ह्या लिडिंग विकेट टेकर्सच्या लिस्ट मध्ये बुमरा-७, यादव-३ वगैरे कुठे आहेत? आपला हायेस्ट विकेट टेकर चहल-८ आहे.
तुला बॅटिंग पर्फॉर्मन्सने आपला बॉलिंग प्रॉब्लेम आत्तापर्यंत झाकून ठेवला आहे असे वाटत नाही का? बाकी देशांचे दोन-दोन बोलर्स (अगदी बांग्ला आणि अफ्रिकेचे सुद्धा) चहलच्या वरती आहे. मान्य ऑसी आणि ईंग्लिश बोलर्स एखाद-दुसरी मॅच जास्त खेळले असतील पण ह्यांचे बोलिंग अ‍ॅवरेज बघ. कुलदीपचा अ‍ॅवरेज ५७ आहे पंड्याचा ४९, चहलचा २५ आणि बुमराचा २७
टॉप-ऑर्डर ने भरपूर रन्स बनवून सुद्धा ते कमी पडतील तेव्हाच हा 'ईंग्लिश कंडिशन्मध्ये स्पेशालिस्ट बोलरच्या कमतरतेमुळे विकेट्सची वानवा' प्रॉब्लेम समोर येईल, असे मला वाटते. खासकरून आपली पहिली बोलिंग असतांना.

अजून त्याचा बॅकअप करून काय फायदा? ऑप्शन असणे ठीक पण बॅकअप? >> ह्याचे उत्तर तुझ्याच पोस्ट चे पहिले वाक्य आहे Happy त्याच्या १० overs दर वेळी चांगल्या पडतील ह्याची खात्री नाही म्हणून शंकर किंवा जाधव असा सहावा बॉलर ठेवळा जाणारच.

तुला बॅटिंग पर्फॉर्मन्सने आपला बॉलिंग प्रॉब्लेम आत्तापर्यंत झाकून ठेवला आहे असे वाटत नाही का? >> एव्हढे सोपे नाही ते. आफ्रिकेची नि अफ्गानिस्तान्विरुद्धची ह्या दोन्ही मॅचेस बॉलर्स नी जिंकून दिल्या आहे. (more contribution than batting). पाच specialist बॉलर हि luxury तेंव्हाच परवडेल जेंव्हा तुमच्या उरलेल्या सहा मधे एक दोन जण बॅकप म्हणून बॉलिंग करूस शकतील नि पाच बॉलर्स मधले दोघे जण तरी चांगली बॅटींग करू शकतील. (चांगली ह्याचा अर्थ मी फार काही अपेक्षित न धरता किमान पक्षी कुंबळे किंवा कमिन्स च्या एवव्हढीच, common sense ठेवून केलेली अशी माफक अपेक्षा ठेवतोय). तसे नसेल तर त्यातल्या त्यात दोन्ही बाजू थोड्या फार सांभाळूस हकतील असे percentage players घेऊन सांभाळले जाणे साहजिक आहे.

आफ्रिका आणि अफगाणिस्तान दोघेही रादर average बॅटिंग लाइन अप्स होत्या हे एव्हाना एस्टॅब्लिश झालेच आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान बॅटिंग सेकंडच्या प्रेशर खाली गडबडल्या असे मला वाटते. दोन्ही वेळेला स्ट्राईक बॉलर्स ना पहिल्या 23 ओव्हर्स मध्ये विकेट काढता आल्या नाहीत हा महत्वाचा मुद्दा लक्षात घे.

इतर संघातील गोलंदाजीची तौलनिक आंकडेवारी आपण 5 नियमित गोलंदाज खेळवण्याचं समर्थन तेंव्हाच होवू शकतं जेंव्हा त्या पांचांपैकी निदान 2-3 जण फलंदाजीत साथ देण्यापुरते तरी विकेटवर टिकणयाची निश्चिती वाटते. सर्वसाधारणपणे फलंदाजीला अनुकूल खेळपट्टयांवर फलंदाजीत जवळ जवळ शून्य अशा 5 गोलंदाजांचं शेपूट घेवून खेळणं घातक आहे, हे माझं ठाम मत कायम आहे.
( अफगाणिस्तान विरूद्ध आपलं हें शेपूट 4 जणांचच होतं. मला दाट शंका आहे कीं धोनी - केदारच्या धोका पत्करून धांवगती वाढवण्याच्या आड या शेपटाची भिती, हेही एक कारण असावं. अशा 5 जणांचं शेपूट क्र. 4, 5 व 6च्या फलंदाजांवर प्रचंड दडपण आणून त्यांचीही कामगिरी खराब करण्याचा धोका आहेच ! )

मला असं वाटतं की पाचवा स्पेशलिस्ट बॉलर ही आपली समस्या (की स्ट्रॅटेजी) नेहमीच राहिली आहे. हा वर्ल्डकप पण याला अपवाद नाही.
या आधी आपल्याकडे एकाच वेळी चांगल्या बॉलर्सचा पर्यायच नसायचा. जे आहेत त्यातलेच निवडा, एखाद्या अष्टपैलू गड्यावर मग बॉलिंग आणि बॅटिंग अश्या दोन्ही जबाबदार्‍या यायच्या. या वेळी मात्र अनेक गुणी बॉलर्सचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे.

जडेजा आणि आश्विन या महान स्पेशालिस्ट बॉलर्सच्या जोरावर आपण चॅम्पियन फायनल घालवली होती. माझ्या मते आपले ४ स्ट्राईक बॉलर्स पुरेसे आहेत. त्यांना सहजी मारताही येत नाही. पांड्याच्या १० ओव्हर मधे ८० रन्स नोघाल्या तरी चालतील. नव्हे त्या निघणारच आहेत. आपल्या उरलेल्या सर्व मॅचेस ३५० + च्या विकेटसवर आहेत. त्यामुळे अर्धा ऑलराउंडर- unproven batsman and bowlers. (विजय किंवा जडेजा उपयोगी पडणार नाहीत). पंत आणि केदारलाच संधी मिळायला पाहिजे. पण विजय शंकरच्या अष्टपैलूपणावर संघ व्यवस्थापनाचा जास्त विश्वास दिसतोय. त्याला घेतीलही पण त्याने संधी मिळाल्यास सोने करावे हीच ईच्छा.

इतर संघांच्या गोलंदाजीत दोघे तिघेच उच्च दर्जाचे आहेत. व हा मोठा फरक आपल्यामधे व इतरांमधे आहे असे मला वाटते. अर्थात जिथे ३५० + धावा होतात तिथे हा फरक बोथट होतो.

Pages