विश्वचषक क्रिकेट २०१९

Submitted by Adm on 25 May, 2019 - 01:57

WC2019.jpg
*

वेळापत्रक

होऊ दे चर्चा !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता स्पर्धेत सर्रास 300+ धांवसंखया होतेय. कार्तिक ऐवजी शंकरला घेवून आपण फलंदाजीबाबत तडजोड केलीच आहे. आतां सात गोलंदाजांचा चतुराईने वापर करून धांवा रोखणं व विकेटस घेणं जर जमत नसेल, तर होईल त्या धांवसंखेचं लक्ष्य फलंदाजीने पार करावं . सगळे घेतात म्हणून आपणही 5 पेसरस खेळवणं आत्मघातकीच, हे माझं मत. या स्पर्धेत विजयासाठी फलंदाजीच अधिक प्रभावी ठरणार आहे, हें अधिकाधिक तीव्रतेने जाणवतंय.

*आप्ल्या स्पीनर्सची कसोटी बंग्लादेश विरूद्ध लागेल बघा आता. शाकिब्/तमिम वगैरे लोक ..* -
अहो, ते पेस गोलंदाजांनाही झोडतात, वे.इंडीजला विचारा !

सध्या बुमराह, भुवी, हे जलद गती आणि चहल, कुलदीप हे स्पीनर असे ४ नियमीत व पंड्या, शंकर, तसेच जाधव सरप्राईज फिरकी असे गोलंदाज असताना पुन्हा प्रयोग नको असे वाटते भुवी अनफिट असल्यास शामी हा बदल केवळ संभवतो. बाकी जास्त बदल होणार नाही असे दिसते. कारण प्रयोग करणे आता तशी शक्य वाटत नाही.
त्यामुळे पुढील सामन्यात अंतिम ११ मध्ये रोहित, राहुल, विराट, शंकर, पंडया, केदार, धोनी, भुवी किंवा शामी, बुमराह, चहल, कुलदीप. असाच संघ राहील असे वाटते..
बांग्ला सोबत देखिल खेळपट्टी आणि वातावरन ह्या नुसार बदल झाल्यास एकदा संभवेल तो देखिल चहल अथवा कुदीपच्या पुढील सामन्यातील गोलंदाजी नुसार.

ते पेस गोलंदाजांनाही झोडतात, वे.इंडीजला विचारा !>>> वे. इंडीज ने अत्यंत सुमार आखूड टप्प्यावर मारा केला..

काल आफ्रिकेचे वर्ल्डकप मधील आव्हान संपुष्टात आले जवळपास!

पाकिस्तानविरुद्धच्या बोलिंग परफॉर्मन्समुळे (पहिल्याच चेंडूवर विकेट) शंकरचा कॉन्फिडन्स वाढला असेल. त्यामुळे त्याला लगेच रीप्लेस करून पंतला खेळवू नये. अफगाणिस्तानविरुद्ध त्याला ४थ्या नंबरला खेळवलं तर जास्ती बरं, कारण तो खाली येऊन रनरेट वाढवणारा प्लेअर वाटत नाही. पांड्याला चौथा आणणं हा सरप्राईझ एलेमेंट डिसिजन म्हणून ठीक आहे, पण तो जर रेग्युलर फॉर्म्यूला बनला तर त्याचा निगेटिव्ह इफेक्ट शंकर अन केदारवर होईल असं मला वाटतं.
बॅटिंग ऑर्डरमधे सतत खाली ढकलल्यानी अन बोलिंगला फारसा चान्स न दिल्यानी केदारचा कॉन्फिडन्स अजून हलला नसला म्हणजे मिळवली. जर आत्ता त्याला बसवून जडेजा / शामी ला पाचवा स्पेशलिस्ट बोलर म्हणून आणलं तर केदार कधी राहणेच्या मार्गाला लागेल ते कळणार पण नाही. (आधीच तो इंज्युरी प्रोन आहे म्हणून टेन्शन मधे असतो).

पाच स्पेशलिस्ट बोलर्स ऐवजी मला तरी ३ पेसर्स अन १ स्पिनर घेऊन खेळणं जास्ती योग्य वाटतं. गरज पडल्यास केदार १० ओवर्स टाकायला उपयोगी पडू शकतो. अन ऑलरेडी ३ पेसर्स असताना पांड्या अन शंकरवर पूर्ण १० - १० ओवर्स टाकण्याचं ओझं येणार नाही.

पाच स्पेशालिस्ट बॉलर्स खेळवायला त्यातल्या एखाद दोन जणांना तरी वेळेला बॅट फिरवता यायला पाहिजेल.... इकडे थोडाबहुत भुवी सोडला तर बाकी सगळा उजेडच आहे!

कार्तिक ऐवजी शंकरला घेवून आपण फलंदाजीबाबत तडजोड केलीच आहे. आतां सात गोलंदाजांचा चतुराईने वापर करून धांवा रोखणं व विकेटस घेणं जर जमत नसेल, तर होईल त्या धांवसंखेचं लक्ष्य फलंदाजीने पार करावं >> टीम एवढी चांगली खेळत असताना असा defensive approach का बर दाखवायचा? टॉप ऑर्डर एका बाजूने धावांचे डोंगर रचत असताना दुसर्‍या बाजूने आणखी आक्रमक बोलिंग अ‍ॅटॅक घेऊन उतरणं हे आत्मविश्वास आणि aggressive approach चं लक्षण आहे. England आणि Aus-NZ मध्ये पेसर्स एक्स्ट्रा बॅट्समन पेक्षा जास्त effectively सामने फिरवू शकतात.
आजकाल प्रत्येक टीम 300+ सातत्याने करत असेल तर तुम्ही 350 करू शकणारी बॅटिंग लाइन अप निवडाल की 300+ करुन दुसर्‍या टीमला 250 मध्ये राखणारी बोलिंग लाईन? हा approach चा भाग झाला.

If you want to be a champion then you gotta act like one. Happy

"पाच स्पेशालिस्ट बॉलर्स खेळवायला त्यातल्या एखाद दोन जणांना तरी वेळेला बॅट फिरवता यायला पाहिजे" - सहमत!!. म्हणूनच भुवनेश ला शामी पेक्षा प्राधान्य मिळतं. जॉन राईट च्या काळातला किस्सा आहे. नेहरा वगैरे पण बॅटींग सिन्सीयरली करायला लागला होता. तेव्हा एका पत्रकारानं त्याला छेडल्यावर तो म्हणाला होता, की 'बॅटींग सिन्सियरली नही करूंगा तो कोच डंडा लेके पीछे पडेगा'. जॉन राईटच्या टेन्युअरनंतर झहीर खाने ने सुद्धा बॅटींग फारशी सिन्सियरली केली नव्हती. शामी ने एके काळी टेस्ट मधे बरीच बरी बॅटींग केली होती (२०११ च्या इंग्लंड दौर्यावर, वर द्रविड आणी खाली भुवनेश आणी थोडासा शामी इतकीच बॅटींग होती आपली). पण तो हल्ली अजिबातच बॅटींग स्किल्स वापरत नाही.

इग्लंड आणी भारतीय टीम्स जरी तगड्या असल्या, तरी हा मोठा फरक आहे. इंग्लंड च्या बॅटींग ला टेल जवळ-जवळ नाहीच आणी आपली टेल बर्यापैकी मोठी आहे.

*टीम एवढी चांगली खेळत असताना असा defensive approach का बर दाखवायचा? * - या विशवचषकासाठी आपली core strength आहे - फलंदाजी (फक्त टाॅप ऑर्डर बॅटींग नव्हे) , बुमराह आणि क्षेत्ररक्षण व त्यावर भिस्त ठेवणं याला प्राथमिकता देणं अपरिहार्य आहे. केवळ टाॅप ऑर्डर आतांपर्यंत चांगली खेळली म्हणून आपली खरी शक्तीस्थळं दुर्लक्षून भलते प्रयोग करणं, हें आत्मघातकी ठरणयाचीच शक्यता अधिक.
आहे तीच गोलंदाजी बहरणारच नाहीं, हाच तर खरा नकारात्मणक विचार वाटतो.

या विशवचषकासाठी आपली core strength आहे - फलंदाजी (फक्त टाॅप ऑर्डर बॅटींग नव्हे) , --> कोणत्या विश्वचषकात नव्हती ? आणि कोणत्या टीमची core strength बॅटींग नसते? Happy अपवाद ९२ ची पाकिस्तान टीम.
बुमराह आणि क्षेत्ररक्षण व त्यावर भिस्त ठेवणं याला प्राथमिकता देणं अपरिहार्य आहे. >> बॅलन्स्ड की काय आहे म्हणे ना आपली टीम ह्यावेळी.

आहे तीच गोलंदाजी बहरणारच नाहीं, हाच तर खरा नकारात्मणक विचार वाटतो. >> तुमचा गैरसमज झाला वाटते. गोलंदाजी बहरणार नाही असे म्हणणे नाही.... बॅटींग core strength जरा जास्तच स्ट्राँग आहे तर गोलंदाजीला अजून बळकटी देऊन फास आवळावा.
थोडक्यात बुक्यांचा मार द्यायला भले भले आहेत पण तोंड दाबायला अजून एखादा हात मिळाला तर अजून डॉमिनेट करता येईल, असे म्हणत आहे.

ईंग्लंडला चांगली बॅटिंग करून हरवायला जाल तर फसाल त्यांना चांगली बोलिंग करून हरवणेच शक्य आहे. आमीर, वहाब नसतांना पाकिस्तान सिरिज मध्ये त्यांनी सगळे ३००+ स्कोर चेस केले. ते दोघे टीममध्ये आल्यावर त्यांना ३००+ चा स्कोर चेस करता आला नाही.

मला वाटते तुम्ही अजून आपल्या सध्याच्या टीम मधला मोठा पॉझिटिव बदल टीपलेला नाहीये. ऑसी,न्यूझी ने पहिले बॅटिंग करून ३००+ केला की तुम्हाला वाटते आहे आपली भली मोठी बॅटिंग लाईनअप कामाला येईल. आठवा २०१५ ची सेमी फायनल, चँपिअन्स ट्रॉफीची फायनल... तिथे ३००+ चेस करणारी बॅटिंग लाईनप घेऊन फायदा नाही तर २५० मध्ये रोखणारी बोलिंग जास्त ईफेक्टिव आहे आणि त्यासाठी पाच स्पेशालिस्ट बोलर्स हवेत.

२५० मध्ये रोखणारी बोलिंग जास्त ईफेक्टिव आहे आणि त्यासाठी पाच स्पेशालिस्ट बोलर्स हवेत.>>>>+111111111

पाटा खेळपट्टी नसेल नि opposition मधे १-२ तरी core dump झालेले बॉलर्स नसतील तर ३००+ चेस करणे नेहमीच challenging आहे. प्लेऑफ मधे ३००+ चेस करणे हे अजून challenging आहे. त्यामूळे फक्त भक्कम फलंदाजी ह्यावर अवलंबून न राहता बळकट गोलंदाजी हे मलाही पटते. तसही आपल्या Top Order + partial middle order ला जे target झेपणार नाही ते त्याखाली येणार्‍या bag of all rounders ला झेपेल हे कठीणच वाटते.

या विशवचषकासाठी आपली core strength आहे - फलंदाजी (फक्त टाॅप ऑर्डर बॅटींग नव्हे) , बुमराह आणि क्षेत्ररक्षण व त्यावर भिस्त ठेवणं याला प्राथमिकता देणं अपरिहार्य आहे. केवळ टाॅप ऑर्डर आतांपर्यंत चांगली खेळली म्हणून आपली खरी शक्तीस्थळं दुर्लक्षून भलते प्रयोग करणं, हें आत्मघातकी ठरणयाचीच शक्यता अधिक. >> Top Order core strength आहे तर "केवळ टाॅप ऑर्डर आतांपर्यंत चांगली खेळली म्हणून आपली खरी शक्तीस्थळं दुर्लक्षून " हे कळले नाही. बर्गचा मुद्दा resiliency चा असावा असे मला वाटतेय. Top Order fail झाली तर काय Plan B काय असेल. चांगली गोलंदाजी कि अजून काही ...

*हे कळले नाही. * आपली संपूर्ण फलःदाजी ही core strength आहे, फक्त टाॅप ऑरडरच नव्हे, हें स्पष्ट आहे.
*त्यामूळे फक्त भक्कम फलंदाजी ह्यावर अवलंबून न राहता बळकट गोलंदाजी हे मलाही पटते. * - दोन नियमित पेस गोलंदाज, दोन चांगले फिरकी गोलंदाज व उपयुक्त असे दोन पेस व एक फिरकी गोलंदाज दिमतीला असूनही 'फक्त भक्कम फलंदाजी ह्यावर अवलंबूनन रहाता' असं कसः म्हणतां येईल !
*आपल्या Top Order + partial middle order ला जे target झेपणार नाही ते त्याखाली येणार्‍या bag of all rounders ला झेपेल हे कठीणच वाटते.* - जिथे 4 नियमित व 3 उपयुक्त गोलंदाज निष्प्रभ ठरतात, तिथे तरी 5वा नियमित गोलंदाज घेवून अशी काय जादूची कांडी फिरणार आहे !!

दोस्तो सध्यातरी विजय दुखापत ग्रस्त झाल्याने पंत आत आहे अफगाणिस्तानच्या विरूद्ध.
सगळे फिट असताना ऑपोझिशन पेक्षा मी टीम playing conditions वर निवडेन.
केदार ऐवजी बॅटींग विकेट असेल तर वर पंत येईल. तसही आतापर्यंत बडवायची आवश्यकता असताना केदारला संधी दिली नव्हती.
सीमिंग conditions असतील तर विजय शंकर.

'फक्त भक्कम फलंदाजी ह्यावर अवलंबूनन रहाता' असं कसः म्हणतां येईल ! >>it's elementary really. Bowlers win tournaments and batsman win matches.

4 नियमित व 3 उपयुक्त गोलंदाज >> नियमित असले तई दर वेळी effective असतील असे जरूरी नसावे ना ?

जिथे 4 नियमित व 3 उपयुक्त गोलंदाज निष्प्रभ ठरतात, तिथे तरी 5वा नियमित गोलंदाज घेवून अशी काय जादूची कांडी फिरणार आहे !! >> सिंपलिस्टिक आन्सर... जादूची कांडी फिरवायला गोलंदाजाला फक्त एक बॉल लागतो.... पण जादूची बॅट फिरवायला पुष्कळ बॉल लागतात... चांगला गोलंदाज तुम्हाला असे पुष्कळ बॉल देणार नाही.

भाऊ एक प्रश्न विचारू का? आजची मॅच ऑसी बॅट्समन नी जिंकवली की बोलर्सनी ? तुम्हाला काय वाटतं?

"सध्यातरी विजय दुखापत ग्रस्त झाल्याने पंत आत आहे अफगाणिस्तानच्या विरूद्ध." - जडेजा येईल का एक बॉलिंग ऑप्शन म्हणून?

"पाच स्पेशालिस्ट बॉलर्स खेळवायला त्यातल्या एखाद दोन जणांना तरी वेळेला बॅट फिरवता यायला पाहिजे" - सहमत!!. >>मागच्यावेळी बुमरा, चहल, कुलदीप, शमी, किंवा फॉर दॅट मॅटर भुवी ने बॅटींगच्या जोरावर , किंवा एखाद्या सेट बॅट्समन बरोबर ९/१०व्या विकेटसाठी ऊभे राहून मॅच जिंकून दिल्याचे सांगता येईल का?
मला जेन्यूईनली आठवत नाहीये.

*कोणताही सामना गोलंदाजच जिंकून देतात. * -
माझे काॅमेंटस फक्त चालू विशवचषकाचया संदर्भात आहेत, generalization नाहीं.
बव्हंशी ढगाळ वातावरण असूनही आपल्यापेक्षा प्रभावी असलेला पेस अटॅकही इथल्या खेळपटटयांवर भेदक ठरत नाहीय. आणखी एक पेस गोलंदाज घेवून फरक पडण्याची शक्यता अगदीच कमी आहे. उलट, थोडा बाऊंस मिळाला तर चहल/ कुलदीप प्रभावी ठरणयाचीच शक्यता अधिक.
जिथे 300+ चं लक्ष्य ठेवणं सुरक्षित व तसं लक्ष्य गाठणं असाध्य वाटत नाही, तिथे 5 नियमित गोलंदाजांचं जवळ जवळ शून्य फलंदाजीचं लांबलचक शेपूट घेवून मिरवणं म्हणूनच मला घातकच नाही तर हास्यास्पदही वाटतं.

व्हंशी ढगाळ वातावरण असूनही आपल्यापेक्षा प्रभावी असलेला पेस अटॅकही इथल्या खेळपटटयांवर भेदक ठरत नाहीय.>> +१११

काल स्टार्क, कमिन्स सारखे गोलंदाज देखिल बांग्ला फलंदाजांवर दडपण ठेवू शकत नव्हते! झंपाचे चेंडू मात्र मध्येच उसळत आणि फिरत होते....

बव्हंशी ढगाळ वातावरण असूनही आपल्यापेक्षा प्रभावी असलेला पेस अटॅकही इथल्या खेळपटटयांवर भेदक ठरत नाहीय. आणखी एक पेस गोलंदाज घेवून फरक पडण्याची शक्यता अगदीच कमी आहे. उलट, थोडा बाऊंस मिळाला तर चहल/ कुलदीप प्रभावी ठरणयाचीच शक्यता अधिक.>> anecdotal उदाहरणे द्यायची झाली तर रशीद खान सारख्या गुणी बॉलरचे परवाच्याच मॅच मध्ये काय मातेरं झाले पाहिले ना?
आता तुमच्याकडे असेच मातेरं होऊ शकणारे दोन बॉलर्स आहेत. आपले हुशार कॅप्टन लोक तस होऊ देणार नाहीत हा भाग वेगळा.
पेस attack म्हणजे भेदकच हवा असेही काही नाही. 10-50-0 सुद्धा चालेल.

काल स्टार्क, कमिन्स सारखे गोलंदाज देखिल बांग्ला फलंदाजांवर दडपण ठेवू शकत नव्हते! झंपाचे चेंडू मात्र मध्येच उसळत आणि फिरत होते....>> दादा फायनल स्कोअर बोर्ड बघा.
Starc 10-55-2
Zampa 9-68-1
पाचव्या बॉलिंग ऑप्शन maxwell आणि stoinis चे economy रेट सुद्धा बघून घ्या. मग Coulter-Nile ऐवजी अजून एक स्पिनर असता तर असाही विचार करून बघा. तुमचा स्पेशालिस्ट स्पिनर 10 ओव्हर्स पूर्ण करू शकत नाही ह्यातच सगळे आले.

एवढ्या जुन्या इंग्लिश क्रिकेट हिस्टरी ने 80 नंतर लक्षात राहण्यासारखा एकही स्पिन बॉलर अजून का दिला नसेल?

तुमच्या अजून लक्षात न आल्यास ईतर ठिकाणच्या वन-डे आणि ईंग्लंडमधल्या वन-डे मध्ये जे ३००+ स्कोअर्स होतात त्यांचं ब्रेक-अप बघा.
एशियात पेसर्सच्या पहिल्या १० ओवर्समध्ये ७० किंवा १५ ओवर्समध्य १०० वगैरे रन्स बोर्डावर लागतात. मग स्पीनर्स येऊन तो रन रेट स्लो करतात. शेवटच्या पेसर्स च्या १० ओवर्समध्ये पुन्हा ८०-१०० वगैरे रन्स बनतात. आणि टोटल स्कोर ३००-३३० असा बनतो.

ईंग्लंडमध्ये बहूतेक चांगल्या फॉरेन टीम्सने बर्‍यापेकी पेस अ‍ॅटॅक असणार्‍या टीम्स विरूद्ध पहिले १० ओवर्स बॉल सी-ऑफ करण्यात घालवून ४०-५० च्या दरम्यानच स्कोर बनवला आहे. (वॉर्नर, शर्माची बदललेली सावध स्ट्रॅटेजी, डी-कॉक चे अपयश हेच सांगते, पण ह्या वातावरणाला सरावलेले रॉय, बेअरस्टो असा सावध पवित्रा घेत नाहीत) मग पुढच्या १५-४० ओवर्समध्ये रनरेट वाढवून शेवटच्या १० ओवर्समध्ये ६०-७० रन्स बनवले आहेत आणि ह्याच दरम्यान विकेट्सही भरपूर गमावल्या आहेत.

थोडक्यात ३००+ स्कोर बनले तेव्हा जास्त रन्स (वाढीव रन-रेटने) मिडल-ओवर्स जे स्पीनर्स आणि पार्टटाईम बॉलर्सचे असतात त्यात बनले आहेत. एशियातल्या पेक्षा ऊलट स्ट्रॅटेजीने रन्स बनत आहेत. म्हणून त्या मिडल ओवरमध्ये Coulter-Nile, वहाब, मॉरिस, फर्गसन सारखा एक स्पेशालिस्ट बोलर आपल्याकडे हवा.

लंका टफ फाईट देतेय अजून तरी, कालच्या ह्या पोस्ट्स नंतर पुढच्याच मॅच मधे अडीचशेच्या खालचा स्कोर बघून गंमत वाटलीये.

सर्व संघामधे England ची batting line सर्वात मोठी , explosive नि reliable वाटतेय. त्यांना ३५०+ score disciplined attack समोर successfully चेस करायला किती वेळा जमेल असे वाटते ? एकदा जमला नाहि हे पाहिलेय.

म्हणून त्या मिडल ओवरमध्ये Coulter-Nile, वहाब, मॉरिस, फर्गसन सारखा एक स्पेशालिस्ट बोलर आपल्याकडे हवा. >> जाधवच्या जागी जडेजा हा एकमेव available option आहे आत्ता तरी. (पांड्याला सपोर्ट सिस्टीम म्हणून शंकर राहतोय). तसाही जाडेजा फिल्डींग साठी असतोच अर्धा वेळ तरी आत. जाधव जर बॅटींग नि बॉलिंग दोन्ही करणार नसेल (स्वेच्छेने नाही परिस्थ्तितीमूळे) तर जडेजा काय नि जाधव काय.

तर जडेजा काय नि जाधव काय. >> माझ्या मते, जडेजा त्याचे स्ट्राँग आर्म आणि शोल्डर्स वापरून कन्सिस्टंटली त्याच्या टॉप स्पीडमध्ये डार्टिंग आणि स्किडिंग बॉल्स ब्लॉक होल मध्ये टाकणार असेल तर तो ह्या घडीला (भुवी फीट नसतांना) ५-७ ओअवर्स टाकण्यासाठी जाधव पेक्षा खूप बेटर ऑप्शन आहे. ह्या कंडिशन्समध्ये त्याच्या फिंगर स्पीनपेक्षा त्याची पिचिंग अ‍ॅक्युरसी जास्त ईफेक्टिव आहे असे मला वाटते.

पॉसिबल अप्सेट फॉर इंग्लंड?.. >>> ५५ म्हणजे खूपच कमी रन्स हव्या आहेत जिंकायला. करतील असे वाटते.
लोल! असे म्हणता म्हणता अजून एक विकेट गेली Happy

Pages